Whipple या सर्जरी विषयी माहिती हवी आहे.

योगीन's picture
योगीन in काथ्याकूट
3 May 2015 - 10:38 am
गाभा: 

Whipple या सर्जरी विषयी कोणाकडून माहिती मिळू शकेल काय?
महाजालावर बरीच माहिती उपलब्ध आहे. तरीही कोणाचे काही वैय्यक्तिक अनुभव
समजल्यास आवडेल.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2015 - 10:53 am | प्रसाद गोडबोले

IIN ला एडमिशन घ्या । नुसती माहीतीच नाही तर सर्जरी करायलाही शिकाल :))

माझ्या काही तज्ञ मित्रांना आपला निरोप पोचवला आहे व त्यावर शोध घेणे सुरु झाले आहे,
उत्तर अपेक्षित आहे, पण किती वेळ लागेल याची कल्पना नाही..

मला वाटते आपल्या तज्ञ डॉक्टरमित्रालाच हा प्रश्न विचारला असता तर बरे झाले असते!
कारण ज्यांनी ही शस्त्रक्रिया सुचविली आहे त्यांना ही शस्त्रक्रिया करण्याचा काहीतरी अनुभव असेलच कि!!
१) त्यांनी स्वत: किती शस्त्रक्रिया केल्या आहेत
२) त्यांचा स्वताचा शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचे/होण्याचे प्रमाण (success rate)किती आहे
3) ज्या रुग्णांनी ही शस्त्रक्रिया केली आहे त्यांचे आयुष्य किती वाढले?
४) ज्या रुग्णांनी ही शस्त्रक्रिया केली आहे त्यांचे आयुष्य किती सुखाचे झाले आहे? हा प्रश्न आपण स्वत: त्या रुग्णांना प्रत्यक्ष भेटून विचारायचा आहे.
५) एकूण कितीवेळेला शस्त्रक्रिया अपेक्षित आहे? खर्च अपेक्षित आहे?
६) रुग्णास पूर्ण बरे होण्यास किती दिवस लागतील?
७) शस्त्रक्रिया चुकली किंवा चुकीच्या पद्धतीने झाली तर काय करावे लागेल?
८) काही मोठी गुंतागुंत झाली तर ती निस्तरण्यास काय पर्यायी व्यवस्था आहे?

(कदाचित चुकीच्या वेळी) काही क्षुल्लक प्रश्न
अ) ही सर्जरी करणे का भाग पडत आहे? हे कळले तर बरे होईल. जेणेकरून आपल्याला माहिती हवी आहे, किंवा माहिती मिळवायला हातात वेळ आहे, त्याअर्थी ही कर्करोगाची केस नसावी असे वाटते. पण जर असेल तर आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे?

ब) मूळ आजार काय आहे व ही सर्जरी करून तो १००% दूर होणार आहे का?

क)
१. ही सर्जरी अत्यावश्यक आहे.
२. याशिवाय संपूर्ण जगात दुसरा पर्यायच नाही.
3. ही सर्जरी करून मूळ आजार १००% दूर होणार आहे.
४. रुग्णालाही दुखणे बरे होवून त्याला कायमचा आराम पडणार आहे
५. ही सर्जरी करून त्याचे आयुष्यही वाढणार आहे
असे सर्व मुद्दे लिहून आपले डॉक्टर आपल्याला त्यांची सही करून प्रतिज्ञापत्र तयार करून देणार आहेत का?

का फक्त आपल्याला आपल्याजवळच्या रुग्णावर एक प्रयोग करून पहायचा आहे?
अशी केस १२५ करोड मध्ये किंवा १०लाखात एकच असते, असे म्हणून आपले तज्ञ पण रुग्णाला घाबरवून सोडणारे डॉक्टरमित्र आपल्याला सहज गंडवू शकतात.

आपले डॉक्टर हा "प्रयोग" आपल्यावर आपल्याच खर्चाने, आपली प्रतिज्ञापत्रावर सही घेवून, त्यांच्या कर्माची सगळी जबाबदारी आपल्यावरच टाकून करत आहेत का? हे कळले तर अधिक बरे होईल.

संदीप डांगे's picture

3 May 2015 - 3:50 pm | संदीप डांगे

कम्मॉन आयुर्हित... बॅक इन अ‍ॅक्शन...

१. ही सर्जरी अत्यावश्यक आहे.
२. याशिवाय संपूर्ण जगात दुसरा पर्यायच नाही.
3. ही सर्जरी करून मूळ आजार १००% दूर होणार आहे.
४. रुग्णालाही दुखणे बरे होवून त्याला कायमचा आराम पडणार आहे
५. ही सर्जरी करून त्याचे आयुष्यही वाढणार आहे
असे सर्व मुद्दे लिहून आपले डॉक्टर आपल्याला त्यांची सही करून प्रतिज्ञापत्र तयार करून देणार आहेत का?

असा डॉक्टर कुठे असेल तर त्याची आयुष्यभर चाकरी करायला तयार आहे. कुठल्याही पॅथीमधे...

आपले डॉक्टर हा "प्रयोग" आपल्यावर आपल्याच खर्चाने, आपली प्रतिज्ञापत्रावर सही घेवून, त्यांच्या कर्माची सगळी जबाबदारी आपल्यावरच टाकून करत आहेत का?

अपेक्षीत उत्तरे:
डॉक्टर १: तुमचा आजार तुम्हाला मी दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही बरे व्हाल याची मी का खात्री देऊ?
डॉक्टर २ : सर्व समाज/व्यवस्था किडलेली आहे त्यामुळे डॉक्टरांकडून प्रामाणिक सेवेची/उपचाराची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

चला करा त्रिशतक तीन ओळींच्या धाग्याचे...

अत्रन्गि पाउस's picture

3 May 2015 - 10:20 pm | अत्रन्गि पाउस

च्यायला त्या स्माय्ल्या कुठेत ??

असे धागे धोरणात बसत नाहीत. कारण नेमके तुम्ही कशासाठी ही माहिती शोधताय हे समजले नाही. शक्य आहे की कोणा जवळच्या व्यक्तीवर उपचारासाठी तुम्ही माहिती मिळवत आहात. पण इथे जे डॉक्टर्स आहेत तेही नेमका सल्ला अशा प्रकारे देऊ शकणार नाहीत.

बाकी राहिला प्रश्न प्रोसीजरचा. ते आंतरजालावर उपलब्ध आहेच. मात्र तुम्ही अशा मिपावर मिळणार्‍या सल्ल्यांपेक्षा तुमच्या डॉक्टरना आणि इतर कोणा डॉक्टर पेशातील तज्ञांना प्रत्यक्ष भेटून, केस समजावून २/३ डॉक्टर्सचा सल्ला घेणे योग्य ठरेल. तुम्हाला आणि ज्या व्यक्तीला या शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना मनापासून शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2015 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

Whipple procedure किंवा Kausch-Whipple procedure किंवा Pancreaticoduodenectomy+ हे अत्यंत गुंतागुंतीचे ऑपरेशन गंभीर आजारासाठी केले जाते. त्यामुळे तज्ञ नसलेल्या माणसाने त्याबाबतची माहिती जालावरून अथवा कोणत्याही तांत्रिक/ गैर-तांत्रिक माध्यमातून घेणे गैरसमजाचे कारण होऊन धोक्याचे ठरू शकते. तेव्हा ते टाळा असा सल्ला देऊ इच्छितो.

किंबहुना अश्या तर्‍हेच्या गुंतागुंतीच्या गोष्टींसंबंधीची माहिती केवळ त्या विशिष्ट विषयातल्या तज्ञाकडूनच घेणे आवश्यक आहे. इतर वैद्यकीय व्यावसायीकांचा सल्लाही केवळ "याबाबतीत कोण विश्वासू तज्ञ आहे?" या प्रश्नाच्या उत्तरापर्यंतच मर्यादीत ठेवावा.

संदीप डांगे's picture

4 May 2015 - 3:26 am | संदीप डांगे

अतिशय योग्य प्रतिसाद.
पैसाताईंशी सहमत.

आनंदी गोपाळ's picture

4 May 2015 - 11:17 pm | आनंदी गोपाळ

अहो, किमान ३ धाग्यांवर

तुमचा आजार तुम्हाला मी दिलेला नाही.

हे माझं वाक्य घेऊन थयथयाट पाहिला जस्ट तुमचा.

तज्ज्ञ सांगतो त्यावर विश्वास वगैरे तर कधीच दिसला नाही तुमचा?

नक्की काय अन कुठे दुखलंय?

संदीप डांगे's picture

5 May 2015 - 8:31 am | संदीप डांगे

तज्ज्ञ सांगतो त्यावर विश्वास वगैरे तर कधीच दिसला नाही तुमचा?

मिश्रेया यांच्या धाग्यावर 'तज्ञ सल्ला कसा शोधावा' याबद्दल आम्ही एक उपाय सांगितला आहे. शोधा...

तुमच्या अडचणीचा धागा असल्याने तुमची तिकडे उपस्थिती दिसली नसावी, नेहमी प्रमाणे ढाल-तलवार घेऊन डॉक्टरांच्या चुकांना पाठीशी घालणारी..?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 5:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसाताई आणि एक्का काकांशी सहमत.

whipple हे स्वादुपिंडाच्या कर्करोगावर उपचार म्हणून केले जाते.
माझ्या वडिलांचे या प्रकारचे ऑपरेशन झाले. त्यात ते वाचले नाहीत.

आम्हाला या सर्व प्रवासात एकही व्यक्ती किंवा 'केस' या प्रकारचे उपचार
घेतलेली अजून तरी सापडलेली नाही. इतरांचे अनुभव ऐकल्या वाचल्यास
थोडे हलके वाटेल ,अशा हेतूने हा धागा लिहिला आहे.

पैसा's picture

4 May 2015 - 8:29 pm | पैसा

वाईट वाटलं. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. आम्ही सगळे मिपाकर तुमच्या दु:खात सहभागी आहोत.

आम्हाला या सर्व प्रवासात एकही व्यक्ती किंवा 'केस' या प्रकारचे उपचार घेतलेली अजून तरी सापडलेली नाही.

फक्त माहितीसाठी - स्टीव्ह जॉब्सची हिच शस्त्रक्रिया २००४ साली झाली होती.

संदीप डांगे's picture

5 May 2015 - 8:25 am | संदीप डांगे

सत्य परिस्थिती माहित नसल्याने माझ्याकडून या धाग्यावर काही अनावश्यक प्रतिक्रिया टाकल्या गेली असल्यास संपादकांना प्रतिसाद उडवण्याची विनंती.

योगिन, तुमच्या वडिलांबद्दल ऐकून वाईट वाटलं. आपल्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत.

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2015 - 8:36 am | श्रीरंग_जोशी

तुमचे दु:ख समजू शकतो परंतु मूळ धाग्यात तुमच्या वडिलांच्या या शस्त्रक्रियेपश्चात मृत्यूबाबत स्पष्टपणे लिहायला हवे होते.

धाग्यातला मजकूर पाहून बहुतांश वाचकांना वेगळा समज झाला.

ईश्वर तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती देवो.

या प्रकारच्या धाग्यांसाठी सर्व मिपाकरांना एक सूचवणी -

'माहिती हवी आहे' प्रकारचे धागे टाकताना धागाकर्त्याने मिपाखेरीज वेगळा संपर्क पत्ता द्यावा (इमेल, फोन क्र. इत्यादी). कारण मिपाचे सदस्य नसणारे शेकडो लोक नियमीतपणे मिपाचे वाचन करतात. त्यांच्यापैकी कुणी त्या विषयासंबंधीत माहिती पुरवू शकतो. तेवढ्यासाठी मिपाचे सदस्यत्व कुणी घेईलच असे जरूरी नाही.