अंधार

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
20 Feb 2015 - 7:59 am

एकटाच आहे, असतो आणि राहणार तो
त्याला त्याची ना सावली, ना प्रतिबिंब
ना कसला डाग, ना कुठला बट्टा
सदा एकटाच, पण शाश्वत, निर्मळ
.
जेव्हा कुठे कोणीही, काहीही नसते,
तिथे तो आपले हातपाय पसरतो..
मस्त राहतो..
.
तोच त्याला घेरुन राहतो
अन् तोच त्याच्यात भरुन राहतो
पण शांत शांत,
एकटा जरूर आहे पण एकाकी नाही
तोच त्याचा सोबती, तोच त्याचा सवंगडी
.
तिन्ही लोकात स्वैर संचार त्याचा
त्याला आमंत्रण नाही लागत
आगत स्वागत नाही लागत
तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा
तोच येतो तुमच्याकडे
तुम्हाला कुशीत घेतो
त्याच्यातली शांतता
जी अमर आहे, निर्व्याज, नि:स्वार्थी आहे
ती तुमच्यासोबत वाटून घेतो, नि:संकोचपणे
.
अंधार
एकटाच आहे, असतो आणि राहणार तो

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२०/०२/२०१५)

भावकविताशांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

20 Feb 2015 - 8:21 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह! :HAPPY:

ज्योति अळवणी's picture

20 Feb 2015 - 8:40 am | ज्योति अळवणी

आवडली कविता

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Feb 2015 - 9:47 am | ज्ञानोबाचे पैजार

छान आहे आवडली.
Aandhera Kayam Rahe
अंधेरा कायम रहे
(फोटो अंजा वरुन साभार)

पैजारबुवा,

सस्नेह's picture

21 Feb 2015 - 1:37 am | सस्नेह

घाबल्ले ना मी !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Feb 2015 - 1:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोल्हापुरकर घाबरतात? =))

आवडली आणि पटली देखील!!

विवेकपटाईत's picture

20 Feb 2015 - 7:54 pm | विवेकपटाईत

कविता आवडली, पण परमेश्वर तर सर्वठिकाणी असल्यामुळे तो एकटा कसा राहणार ...

तात्या, जल्ला अंधाराबद्दल लिवलांय ओ!!

आता परमेश्वर सगळीकडे असतो मग अंधार एकटा कसा राहील असा प्रश्न असेल तर मग कविच काय ते सांगू शकेल.

चाणक्य's picture

20 Feb 2015 - 7:54 pm | चाणक्य

आमच्या मिकाची नाहीये ही

खटासि खट's picture

21 Feb 2015 - 9:26 pm | खटासि खट

खवळलेल्या काप्रेची का ?

पदकि's picture

20 Feb 2015 - 11:11 pm | पदकि

मस्त

मदनबाण's picture

22 Feb 2015 - 1:56 pm | मदनबाण

वाह... वाह ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jiya Re... :- { Jab Tak Hai Jaan }