अंधार
एकटाच आहे, असतो आणि राहणार तो
त्याला त्याची ना सावली, ना प्रतिबिंब
ना कसला डाग, ना कुठला बट्टा
सदा एकटाच, पण शाश्वत, निर्मळ
.
जेव्हा कुठे कोणीही, काहीही नसते,
तिथे तो आपले हातपाय पसरतो..
मस्त राहतो..
.
तोच त्याला घेरुन राहतो
अन् तोच त्याच्यात भरुन राहतो
पण शांत शांत,
एकटा जरूर आहे पण एकाकी नाही
तोच त्याचा सोबती, तोच त्याचा सवंगडी
.
तिन्ही लोकात स्वैर संचार त्याचा
त्याला आमंत्रण नाही लागत
आगत स्वागत नाही लागत
तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा
तोच येतो तुमच्याकडे
तुम्हाला कुशीत घेतो
त्याच्यातली शांतता
जी अमर आहे, निर्व्याज, नि:स्वार्थी आहे
ती तुमच्यासोबत वाटून घेतो, नि:संकोचपणे
.
अंधार
एकटाच आहे, असतो आणि राहणार तो
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२०/०२/२०१५)
वाचने
3437
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
व्वाह!
छान
आवडली
In reply to आवडली by ज्ञानोबाचे पैजार
बाबौ !
In reply to बाबौ ! by सस्नेह
कोल्हापुरकर घाबरतात?
आवडली आणि पटली देखील!!
कविता आवडली, पण परमेश्वर तर
In reply to कविता आवडली, पण परमेश्वर तर by विवेकपटाईत
तात्या, जल्ला अंधाराबद्दल
नाही
In reply to नाही by चाणक्य
खवळलेल्या काप्रेची का ?
मस्त
वाह... वाह !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jiya Re... :- { Jab Tak Hai Jaan }