मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधार

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एकटाच आहे, असतो आणि राहणार तो त्याला त्याची ना सावली, ना प्रतिबिंब ना कसला डाग, ना कुठला बट्टा सदा एकटाच, पण शाश्वत, निर्मळ . जेव्हा कुठे कोणीही, काहीही नसते, तिथे तो आपले हातपाय पसरतो.. मस्त राहतो.. . तोच त्याला घेरुन राहतो अन् तोच त्याच्यात भरुन राहतो पण शांत शांत, एकटा जरूर आहे पण एकाकी नाही तोच त्याचा सोबती, तोच त्याचा सवंगडी . तिन्ही लोकात स्वैर संचार त्याचा त्याला आमंत्रण नाही लागत आगत स्वागत नाही लागत तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा तोच येतो तुमच्याकडे तुम्हाला कुशीत घेतो त्याच्यातली शांतता जी अमर आहे, निर्व्याज, नि:स्वार्थी आहे ती तुमच्यासोबत वाटून घेतो, नि:संकोचपणे . अंधार एकटाच आहे, असतो आणि राहणार तो |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/०२/२०१५)

वाचने 3438 वाचनखूण प्रतिक्रिया 12

ज्योति अळवणी 20/02/2015 - 08:40
आवडली कविता

ज्ञानोबाचे पैजार 20/02/2015 - 09:47
छान आहे आवडली. Aandhera Kayam Rahe अंधेरा कायम रहे (फोटो अंजा वरुन साभार) पैजारबुवा,

In reply to by विवेकपटाईत

तात्या, जल्ला अंधाराबद्दल लिवलांय ओ!! आता परमेश्वर सगळीकडे असतो मग अंधार एकटा कसा राहील असा प्रश्न असेल तर मग कविच काय ते सांगू शकेल.

चाणक्य 20/02/2015 - 19:54
आमच्या मिकाची नाहीये ही