दिसली समद्यांना ...

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
27 Sep 2014 - 8:58 pm

आयने हाक मारली, लगीच उटले आज.
शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने.

साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली.
परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले.
गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले.
पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले.

अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी.

गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय. आज तिला कविता म्हणायला सांगू.”
म्या पुडं आले, कविता बराबर बोल्ली.
जाग्यावर जाऊन बसली.

मंग रडू यायलं.
गुर्जींना काई समजना.

मंग खाल मानेनं म्या हळू माज्या रिबनीचं फूल ओडलं.
“ओ गुर्जी, आन्जीची नवी रिबन बगा, कसली लाल हाय...” राज्या म्हन्ला.
समदे आले भवती.

कवाधरनं ती दावत व्हते!
दिसली आता समद्यांना!

* शतशब्दकथा

कथाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

27 Sep 2014 - 9:02 pm | आदूबाळ

छानच!

अटेन्शन सीकिंगची आन्जीची ऐड्या भारीच आहे.

यसवायजी's picture

27 Sep 2014 - 9:35 pm | यसवायजी

लै बेस. अन्जी रॉक्स अगेन.

रेवती's picture

27 Sep 2014 - 9:47 pm | रेवती

कसली गोड आहे ती! बर्‍याच मुलींना लहानपणी मोठे केस असण्याची व त्याला रिबन बांधण्याची हौस असते, मलाही होती. ही ही, एकदम गोड वाटले.

काउबॉय's picture

27 Sep 2014 - 9:48 pm | काउबॉय

आन्जी भेट्ल्याने बरं वाटल...! अगदी तसच बरं जस आन्जिला तुम्ही मोझाम्बिकहुन परतल्यावर वाटलं असेल ;)

कवितानागेश's picture

27 Sep 2014 - 11:20 pm | कवितानागेश

कित्ती गोड. :)

चित्रगुप्त's picture

27 Sep 2014 - 11:44 pm | चित्रगुप्त

अतिशय सूक्ष्म-भावदर्शी, हळुवार, मजेदार लेखन.

मुक्त विहारि's picture

28 Sep 2014 - 12:51 am | मुक्त विहारि

मस्त

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2014 - 12:55 am | प्रभाकर पेठकर

आन्जीच्या शुद्ध आणि निरागस हेतूने मन कौतुकाने भरून आले.
आन्जीची लाल रिबन आवडली सांगा, तिला.

कंजूस's picture

28 Sep 2014 - 5:03 am | कंजूस

आन्जी मारतेय शायनिंग.

जेपी's picture

28 Sep 2014 - 6:46 am | जेपी

आवडली कथा.

किती गोड!बर्याच दिवसांनी अाली अान्जी,ती पण मस्त लाल लाल रिबन बांधुन!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Sep 2014 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार

निरागस अंजी....
तिचा सांगा हा निरागस पणा असाच जपुन ठेव,

पैजारबुवा,

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2014 - 10:48 am | बिपिन कार्यकर्ते

लैच्च भारी!

रुपी's picture

28 Sep 2014 - 11:33 am | रुपी

लय भारी!

किसन शिंदे's picture

28 Sep 2014 - 12:28 pm | किसन शिंदे

भारी आयड्या! कथा आवडली.

दशानन's picture

28 Sep 2014 - 12:44 pm | दशानन

मस्तच!

इशा१२३'s picture

28 Sep 2014 - 3:11 pm | इशा१२३

छानच...

प्यारे१'s picture

28 Sep 2014 - 5:13 pm | प्यारे१

ए लाल रिब्बिन.

खासच!

स्पंदना's picture

28 Sep 2014 - 5:19 pm | स्पंदना

माझी बाय ती!
नव्वी नव्वी रिब्बन घातली का? मस्तच हो! आन्जीला सगळच शोभुन दिसत.

प्रचेतस's picture

28 Sep 2014 - 10:55 pm | प्रचेतस

आंजी रॉक्स

चिगो's picture

28 Sep 2014 - 11:43 pm | चिगो

आंजी मंजी एकदम ब्येष्ट.. लै मंजे लैच गोड पोरगी हाय, बघा..

शलभ's picture

28 Sep 2014 - 11:51 pm | शलभ

सहीच..

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2014 - 5:05 am | श्रीरंग_जोशी

ही शतशब्दकथा खूप आवडली.

सविता००१'s picture

29 Sep 2014 - 10:11 am | सविता००१

ही आन्जी खरच खूप गोड आहे. लहानपणात घेउन जाते लगेच...

आंजीला दोस्त भारी भेटला की !

एस's picture

29 Sep 2014 - 2:20 pm | एस

म्या पायली व्हती, पर बोल्लू नव्हतो! स्वॉरी बरं का! :-)

बॅटमॅन's picture

29 Sep 2014 - 3:46 pm | बॅटमॅन

ही आंजी म्हणजे फीमेल लंपन म्हणावी की काय?

लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी चांगली आहे, ब्राह्मणी तोंडवळा आहे. अनुभव विश्व सीमित आहे आणि लंपन प्रचंड निरागस आहे.
त्यामानानं आन्जी गरीब घरातली नि बहुजन वर्गातली आहे, गरीबीमुळं आलेला थोडा वेगळा थोडासा निलाजरा बेरकेपणा (चाबरट म्हणतात तसं. पण दुसर्‍याचं नुकसान न होईल इतपत) ही आन्जीची वैशिष्ट्यं.

हे मला जाणवलेलं. चुक बरोबर ठाऊक नाही. लेखिका अधिक भर घालतीलच.

हम्म, अगदी नेमके आहे. लंपनने ते विश्व जसे उभे केले तसेच आंजीने हे वेगळे विश्व उभे केले या अर्थी म्हणालो इतकेच.

लंपनचं अनुभवविश्व सीमित?

सायकलचं दुकान असणार्‍या दोस्तापासून ते जुगारापर्यंत ते जवळच्या माणसांच्या वियोगापर्यंत असं विस्तृत अनुभवविश्व लाभलं आहे लंपनला.

बाकीबद्दल अर्थातच सहमत आहे.

लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

आतिवास's picture

2 Oct 2014 - 5:15 pm | आतिवास

कुठे लंपन आणि कुठे आन्जी!
'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची.... ' या चालीवर वाचावे :-)

बहुगुणी's picture

6 Oct 2014 - 9:26 pm | बहुगुणी

आन्जी पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

इथे मिपावरच अभिजित (अभ्या) सारखे अप्रतिम कुंचलेकार उपस्थित आहेत आन्जीला चित्रबद्द करायला, एक सुंदर 'कॉफी टेबल बुक' तयार होईल. मनावर घ्याच.

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 3:54 pm | बॅटमॅन

हम्म, रैट्ट सार.

अन टुमणे/हट्ट/मागणी याबद्दल सहमत आहे हेवेसांनल. ग्रामीण साहित्य या रूपात पुढं आलं तर अजून मज्या यील.

आतिवास's picture

8 Oct 2014 - 4:07 pm | आतिवास

लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

मान्य आहे. पण ते कधी होईल ते माहिती नाही, होईल का नाही हेही सांगता येत नाही.
पुस्तक काढायचं तर पुरेशा कथा (किमान ५० तरी माझ्या मते) लिहायला हव्यात. उगाच आकडा गाठायचा म्हणून लिहित सुटले तर त्या कथा कंटाळवाण्या होतील एरवी या कथा आवडणा-या वाचकांनाही.

त्यामुळे आपली मागणी लक्षात आहे पण पुरवठा कधी होईल ते मात्र सांगता येत नाही :-)

कपिलमुनी's picture

29 Sep 2014 - 6:18 pm | कपिलमुनी

शतशब्दकथा आवडली !

विजुभाऊ's picture

29 Sep 2014 - 7:10 pm | विजुभाऊ

ब्याटमुनी तुमचे विचार करणे सुयोग्य आहे. अन्जी पहिल्यान्दा वाचली तेंव्हा अस्मादिकंच्या मस्तकातदेखील हेच विचार रुंजी़ घालत होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2014 - 7:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

सरस !

वाचकांच्या मनात आंजीची व्यक्तीरेखा (अगदी स्वभावासकट) तयार झाली आहे... यापेक्षा लिखाणाचे जास्त यश ते काय असणार ?

बबन ताम्बे's picture

29 Sep 2014 - 7:53 pm | बबन ताम्बे

आवडले.

तिमा's picture

29 Sep 2014 - 8:25 pm | तिमा

आमचे मत आन्जीलाच!

लाललाल रिबन लावलेली आंजी गोड आहे .. आवडली .

पहाटवारा's picture

30 Sep 2014 - 5:07 am | पहाटवारा

गोडांबी आंजाक्का ! गुनी गो बाय् ती !
-पहाटवारा

आतिवास's picture

30 Sep 2014 - 7:30 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 4:15 am | निनाद मुक्काम प...

लय भारि

चार दिवसांपूर्वीच वाचली होती गोष्ट!! मनात घर केलं हो आपल्या आंजीने!

पैसा's picture

2 Oct 2014 - 6:29 pm | पैसा

आंजी मस्तच!

सखी's picture

2 Oct 2014 - 8:33 pm | सखी

आवडली हीपण शतशब्दकथा, आन्जी तर नेहमीच आवडीची.

यशोधरा's picture

2 Oct 2014 - 9:42 pm | यशोधरा

खूप गोड :)

मधुरा देशपांडे's picture

7 Oct 2014 - 1:45 am | मधुरा देशपांडे

आन्जी नेहमीप्रमाणेच आवडली.

आयुर्हित's picture

7 Oct 2014 - 2:11 am | आयुर्हित

अप्रतिम लेख!
लई हुश्शार आहे बघा ही आंजी!

सुहास..'s picture

7 Oct 2014 - 7:30 pm | सुहास..

क्लास !!

मदनबाण's picture

8 Oct 2014 - 4:20 pm | मदनबाण

गोड आन्जी... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX