✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फुस्स...

आ
आतिवास यांनी
Sun, 05/12/2013 - 22:53  ·  लेख
लेख
दत्तुमामा आलेत. म्हंजे आमच्या आत्याचा नवरा. आमच्या तीन आत्या. एक पुन्याची. हे तिचे नवरे. दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं. तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई. म्या तिला बघिटलीचं न्हवं. दत्तुमामा खाऊ आन्तेत. म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला. आय चा करत व्हती. म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया. दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?” दर बारीला हेच विचारतेत. दिवाळीला आलते, तवा मी पयलीत व्हते. आताशिक सकरात आली जवळ. मंग आताबी पयलीतच –हाणार की! म्या दामटून म्हन्ली, “तिसरीला” दत्तुमामा म्हनले, “वा! छान, अभ्यास कर हं, मोठी हो”. येकदम फुस्स ! हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत. यास्नी आता कधीबी पानी देनार न्हाय! * शतशब्दकथा

Book traversal links for फुस्स...

  • ‹ हसू
  • Up
  • बटाटा भाजी ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अनुभव

प्रतिक्रिया द्या
16066 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

वॉव.

अभ्या..
Sun, 05/12/2013 - 22:58 नवीन
वॉव. :)
  • Log in or register to post comments

भाषेचा लहेजा

अभ्या..
Sun, 05/12/2013 - 23:10 नवीन
अतिवासतै एक छोटीशी शंका. हा भाषेचा लहेजा बीड-उस्मानाबादचा की बार्शी-पंढरपूरचा? बाकी तुम्ही अगदी हुकूमत मिळवलेला शतशब्द कथांचा फॉर्म्याट ट्राय करावा असे फार फार वाटू लागले आहे. :) केवळ अप्रतिम आणि अप्रतिम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नासिकाक्षेप

बॅटमॅन
Sun, 05/12/2013 - 23:21 नवीन
मध्येच नाक खुपसतोय, पण अभ्या अशी भाषा मिरजेत देखील ऐकलेली आहे - फार फरक नाही जाणवला कधी. काय बरोबर का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हम्म. भाषेबाबतीत

अभ्या..
Sun, 05/12/2013 - 23:29 नवीन
हम्म. भाषेबाबतीत बॅट्याआप्पांची दखल हवीच. ;) मिरजेत काय पूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात चालू शकेल. पण हेच संवाद जरा मनाशी बोलून बघ ना. फरक जाणवेल तुला. मला तर लगेच जाणवतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आनतेत, विचारतेत, जातेत, इ.

बॅटमॅन
Sun, 05/12/2013 - 23:32 नवीन
आनतेत, विचारतेत, जातेत, इ. रूपे आपल्याकडे इतकी नसतात- आन्त्यात, जात्यात, इ. रूपे जास्त. हा मुद्दा नजरेतून सुटून गेला होता, तो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद अभ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आता लेखिकाताई जवा सांगतील

अभ्या..
Sun, 05/12/2013 - 23:41 नवीन
आता लेखिकाताई जवा सांगतील तवाच खरं कळल म्हना. ;) आपण बसलाव नुसते वावड्या उडवीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खरंय.

बॅटमॅन
Sun, 05/12/2013 - 23:42 नवीन
:) खरंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शैली?

आतिवास
Mon, 05/13/2013 - 09:26 नवीन
अभ्या, बॅटमन; या लेखनमालेतली ही एक मोठी उणीव आहे की यात वापरलेली भाषाशैली एका भौगोलिक प्रदेशातली नाही. कधी ती लातूर-उदगीर वाटते; कधी बीडची वाटते; तर कधी मिरज-सांगलीची. माझा विविध भागांशी जवळचा संबंध आल्यामुळे या सगळ्या शैलींचे काही ना काही संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे असं म्हणावं लागेल की या कथेतली छोटी मुलगी अशा एका (काल्पनिक) गावात राहतेय की तिथं या सगळ्या भाषाशैलींचा प्रभाव असणारी भाषा आहे :-) लेखकाला असलेल्या स्वातंत्र्याचा मी असा फायदा घेते आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लिहा...

आतिवास
Mon, 05/13/2013 - 11:34 नवीन
अभ्या, माझ्या वाचनात तरी मराठीत हा प्रकार आलेला नाही आजवर. इंग्रजी ब्लॉगविश्वात हा प्रकार आणि "फिक्शन ५५" - म्हणजे ५५ शब्दांतली गोष्ट - मोठ्या प्रमाणात वापरले जातात. मराठीतही तो अनेक लोकांनी वापरला, म्हणजे त्यात लिहिले, तर समृद्ध होईल तो फॉर्मॅट (आणि मराठीही)अधिक. जरुर लिहा, मला वाचायला आवडेल नक्की. शुभेच्छा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त!

पैसा
Sun, 05/12/2013 - 23:01 नवीन
हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.
आवडलं!
  • Log in or register to post comments

भारीच!!!

बॅटमॅन
Sun, 05/12/2013 - 23:06 नवीन
भारीच!!!
  • Log in or register to post comments

दत्तु मामा म्हंजी घराचं

प्यारे१
Sun, 05/12/2013 - 23:08 नवीन
दत्तु मामा म्हंजी घराचं जावायबाप्पू. सनावाराला याचं, जावयाचा मान घ्याचा, जिऊन जायचं. सपला इषय. कसं? त्येन्ला काय पडलं पोरगी शाळंत जाती, पास हुती, नापास हुती का आनकी काय त्ये. लई भारी. आवडली. :)
  • Log in or register to post comments

आयला ! म्हंजे, पोरान्लाबी

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 05/13/2013 - 12:22 नवीन
आयला ! म्हंजे, पोरान्लाबी लSSSय अक्कल अस्ती, तेबी तुमाला तोलून बगत्यात, इचार करून आपलं त्वांड उगडावं. हे बी कळंना व्हय जावायबाप्पून्ला ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

झकास!

खेडूत
Sun, 05/12/2013 - 23:28 नवीन
झकास! एकदम पर्सन्ग समोर 'हुबा केलासा'.
  • Log in or register to post comments

नेहेमीप्रमाणेच झकास शतशब्दकथा

आदूबाळ
Sun, 05/12/2013 - 23:44 नवीन
नेहेमीप्रमाणेच झकास शतशब्दकथा! (एक फालतू शंका - आत्याचा नवरा मामा कसा काय बुवा?)
  • Log in or register to post comments

(फालतु उत्तर- सगळ्या आत्यांचे

स्पंदना
Mon, 05/13/2013 - 04:47 नवीन
(फालतु उत्तर- सगळ्या आत्यांचे नवरे मामाच असतात, अन सगळ्या मावश्यांचे काका! रुल इज रुल!) सरळ उत्तर- सगळी नाती ही कुळ-गोत्र वेगळ हे दाखवणारी असतात. वडीलांचा भाऊ हा समगोत्र त्याच्याशी विवाह संबंध होत नाहीत. पण मामा हा आईचा भाऊ वेगळ्या गोत्राचा म्हणुन मामेभावाशी विवाह संबंध चालतात. तेच मावशीच. त्यांच्या घरात आईची बहिण, आईसारखी, म्हणुन तिचे घर समगोत्र मानुन तिथे विवाह केला जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

येकदम बरोब्बर! म्हणूनच

अनामिक
Mon, 05/13/2013 - 12:37 नवीन
येकदम बरोब्बर! म्हणूनच आम्हाला आत्याच्या नवर्‍याला काका म्हणणार्‍यांचं हसू येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

(एक फालतू शंका - आत्याचा नवरा

आतिवास
Mon, 05/13/2013 - 09:35 नवीन
(एक फालतू शंका - आत्याचा नवरा मामा कसा काय बुवा?) हाहा! कुणी कुणा दुस-या व्यक्तीला काय हाक मारावी हे आपण कसं ठरवणार? माझ्या ओळखीच्या दत्तात्रय नाव असलेल्या एका गृहस्थांना इतर लोकांबरोबर त्यांची स्वतःची मुलंही "दत्तुमामा" म्हणायची आणि मुलांच्या आईला गाव "मामी" म्हणायचं म्हणून मुलंही आईला "मामी" म्हणायची.... समाज तर्कानुसार चालत नाही - आणि ते किती बरं आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

व्वा! अतिवास शतशब्दावलीला शत

स्पंदना
Mon, 05/13/2013 - 04:47 नवीन
व्वा! अतिवास शतशब्दावलीला शत प्रणाम!
  • Log in or register to post comments

100 %

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/13/2013 - 06:57 नवीन
100 % :-)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुरेख कथा/

प्रचेतस
Mon, 05/13/2013 - 08:53 नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख कथा/ तुमची या कथाप्रकारावर चांगलीच हुकूमत आहे.
  • Log in or register to post comments

+१

सुहास झेले
Mon, 05/13/2013 - 13:11 नवीन
यप्प... अगदी सहमत :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ब्येस!

यशोधरा
Mon, 05/13/2013 - 10:12 नवीन
ब्येस!
  • Log in or register to post comments

मस्त..

मुक्त विहारि
Mon, 05/13/2013 - 10:37 नवीन
आवडली....
  • Log in or register to post comments

येकदम फुस्स !

खबो जाप
Mon, 05/13/2013 - 10:41 नवीन
येकदम फुस्स ! हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत. यास्नी आता कधीबी पानी देनार न्हाय!
च्यामारी दत्तुमामालाच एकदम फाट्यावर मारलं किहो …. ह्या ह्या ह्या :-)
  • Log in or register to post comments

सुंदर फॉर्मॅट.

गवि
Mon, 05/13/2013 - 10:46 नवीन
सुंदर फॉर्मॅट. आत्तापर्यंतच्या सर्व आवडल्या. खास आहेत एकाहून एक. अडकू नका. प्रयोगशीलता बदलत राहूदे.
  • Log in or register to post comments

ब्येस

तिमा
Mon, 05/13/2013 - 11:39 नवीन
लेख आवडला. हा अनुभव आम्हा शहरी बाळांनाही आला आहे ? ' कोण तू ", यमीचा लेक का ? कितवीत आहेस ? अरे, नानासाहेब, कधी आलात ?".. वगैरे वगैरे. आम्ही तोंड वासून उभेच! नुसतेच इचारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ब्येस

तिमा
Mon, 05/13/2013 - 11:36 नवीन
न्हान मुलगी म्हनून काय झालं? बराबर समजतंय तिस्ला ! कथा आवडली. हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत. हा अनुभव आम्हा शहरी बाळांनाही आला आहे ? ' कोण तू ", यमीचा लेक का ? कितवीत आहेस ? अरे, नानासाहेब, कधी आलात ?".. वगैरे वगैरे. आम्ही तोंड वासून उभेच!
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे..

लाल टोपी
Mon, 05/13/2013 - 11:53 नवीन
लहान मुलांच्या भावविश्वाला थोडक्यात पण प्रभावी शब्दरुप
  • Log in or register to post comments

लई ब्येस लिवलंय ! लासच्या दोन

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 05/13/2013 - 12:29 नवीन
लई ब्येस लिवलंय ! लासच्या दोन वळी जंक्शन हायती. आजून बक्कळ लिवा.
  • Log in or register to post comments

मस्त

दिपक
Mon, 05/13/2013 - 12:58 नवीन
एकदम रांगडी कविता ! आवडली :-)
  • Log in or register to post comments

दत्तुमामाचा चांगलाच मामा केला

चावटमेला
Mon, 05/13/2013 - 14:04 नवीन
दत्तुमामाचा चांगलाच मामा केला :)
  • Log in or register to post comments

हा हा हा

स्मिता.
Mon, 05/13/2013 - 14:35 नवीन
असे अनुभव बरेच आहेत. ते ही दोन्ही बाजूंचे ;) काय करणार, बर्‍याच वेळा औपचारीकता पाळावी लागते.
  • Log in or register to post comments

लई झ्याक!

सुधीर
Mon, 05/13/2013 - 18:04 नवीन
लई झ्याक! (हांगाशी असं म्हणणार होतो पण शब्दाचा अर्थ माहीत नाही. बहुदा "लय बेस" वा "लई झ्याक" असाच आहे काय? हांगाशी शब्द ऐकायला खूप आवडतो.)
  • Log in or register to post comments

हांगाशी = हां बग अशी= बरोबर,

बॅटमॅन
Mon, 05/13/2013 - 18:08 नवीन
हांगाशी = हां बग अशी= बरोबर, योग्य, भारी, इ.इ. संधी झालाय त्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

धन्यवाद!

सुधीर
Mon, 05/13/2013 - 18:31 नवीन
हो हो अस्स आहे होय. शब्द भारीच आहे मग. आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

100 नंबरी

सोत्रि
Mon, 05/13/2013 - 20:52 नवीन
झक्कास! - (100 नंबरी) सोकाजी
  • Log in or register to post comments

छोटीच्या मनातल्या भावना मस्त

गणपा
Mon, 05/13/2013 - 21:14 नवीन
छोटीच्या मनातल्या भावना मस्त उतरल्यात. त्याला पुरक अश्या भाषेचा साजही खासच. नावही तोडीस तोड. :)
  • Log in or register to post comments

आभार

आतिवास
Tue, 05/14/2013 - 10:02 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

बारक्या चिमुरडीला हे लक्षात आले हेच कौतुक आहे

नरेंद्र गोळे
Tue, 05/14/2013 - 17:18 नवीन
खरंय! बोलती तोंडे मिळतात अनेक, मात्र ऐकते कान मिळणे अवघडच असते!! फक्त एवढ्या बारक्या चिमुरडीला हे लक्षात आले हेच कौतुक आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर..

चिगो
Wed, 05/15/2013 - 16:07 नवीन
पुन्हा एकदा लाजवाब कथा.. आवडली..
  • Log in or register to post comments

हाहाहा मस्त

अद्द्या
गुरुवार, 05/16/2013 - 10:22 नवीन
हाहाहा मस्त :D
  • Log in or register to post comments

मागचाच एखादा प्रतिसाद उचला

तुमचा अभिषेक
गुरुवार, 05/16/2013 - 11:33 नवीन
मागचाच एखादा प्रतिसाद उचला आता .. तुम्ही लिहित राहायचे आणि आम्ही वाचत जायचे..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा