पडघम २०१४- भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
11 Apr 2014 - 9:42 pm

यापूर्वीचे लेखन

भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक

सुरवातीला राजस्थानात २००८ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.

तक्ता क्रमांक १

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

       
राजस्थान२००८२००९ २००८२००९२००८२००९
 मते %मते %मतांमधील फरकविधानसभा जागाविधानसभा जागा आघाडीलोकसभा जागा आघाडीलोकसभा जागा
भाजप३४.३%३६.६%२.३%७८४२११४
कॉंग्रेस३८.८%४७.२%८.४%९६१४४१४२०
बसपा७.६%३.४%-४.२%६०००
इतर१९.३%१२.८%-६.५%२०१४०१

तक्ता क्रमांक १ वरून खालील गोष्टी कळतात
१. बसपा आणि इतरांची मते १०.७% मते कमी झाली.त्यापैकी ८.४% मते कॉंग्रेसकडे गेली तर २.३% मते भाजपकडे गेली.
२. २००८ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपची इतकी वाईट अवस्था झाली नव्हती.पण २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी फ्लोटिंग मतांपैकी कॉंग्रेसने बहुतांश मते आपल्याकडे खेचून घेतली.त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या वेळी मात्र कॉंग्रेसने जोरदार विजय मिळवला तर भाजपची अवस्था फारच वाईट झाली.
३. २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी दौसा मतदारसंघाचे निकाल इंटरेस्टींग होते. या मतदारसंघात मीना आणि गुज्जर समाजाचे प्राबल्य आहे. मीना समाजाचे नेते किरोरीलाल मीना आणि गुज्जर समाजाचे कमार रब्बानी हे दोघेही अपक्ष म्हणून लढले.या निवडणुकीत विजय झाला किरोरीलाल मीना यांचा. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

किरोरीलाल मीना यांनी नंतर आपला नॅशनल पीपल्स पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला आणि या पक्षाला २०१३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ४ जागा आणि ४.२% मते मिळाली.

या पार्श्वभूमीवर २०१३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.
तक्ता क्रमांक २

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
राजस्थान२०१३  
 मते %विधानसभा जागालोकसभा जागा आघाडी
भाजप४५.२%१६३२४
कॉंग्रेस३३.१%२११
नॅशनल पीपल्स पार्टी४.२%४ 
बसपा३.४%३०
नोटा१.९%० 
इतर१२.१%९०

तक्ता क्रमांक २ वरून खालील गोष्टी कळतात
१. २००८ मध्ये भाजप आणि कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांना एकूण ७३.१% मते मिळाली तर २०१३ मध्ये वाढून ७७.३% मते मिळाली.त्यातही भाजपची मते २००८ च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत तब्बल १०.९% ने वाढली तर कॉंग्रेसची मते ५.७% मते कमी झाली. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर डिसेंबर २०१३ मधील निवडणुका झालेल्या चार राज्यांपैकी सर्वात जास्त परिणाम राजस्थानात झाला.
२. भाजपला ४५.२% इतकी मते यापूर्वी कोणत्याच निवडणुकांमध्ये मिळालेली नव्हती. यातून भाजपने निवडणुक अगदी स्वीप केली आणि २०० पैकी तब्बल १६३ जागा जिंकल्या.कॉंग्रेसला २१ जागांवर समाधान मानावे लागले.

तक्ता क्रमांक ३ मध्ये राजस्थानात २०१३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल कसे लागले हे दिले आहे.

तक्ता क्रमांक ३

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

        
लोकसभा मतदारसंघभाजपकॉंग्रेसबसपाएन.पी.पीनोटाइतरआघाडी पक्षआघाडी %
अजमेर५०.१%३४.१%१.१%०.३%१.७%१२.७%भाजप१६.०%
अल्वर४३.२%२४.०%६.३%१०.०%०.८%१५.६%भाजप१९.१%
बांसवाडा४६.८%३९.५%१.६%१.७%३.८%६.७%भाजप७.२%
बारमेर५०.२%३९.०%२.३%०.७%१.९%५.८%भाजप११.३%
भरतपूर३८.०%२६.०%१४.८%६.८%०.७%१३.७%भाजप१२.०%
भीलवारा५०.०%३६.४%१.४%१.४%२.६%८.१%भाजप१३.५%
बिकानेर३९.१%३५.२%१.७%०.२%२.०%२१.९%भाजप३.९%
चित्तोडगढ४४.७%३७.७%१.०%३.५%२.५%१०.५%भाजप७.०%
चुरू४६.१%३३.१%९.२%०.१%१.४%१०.१%भाजप१२.९%
दौसा३२.५%२४.७%१.३%२७.४%१.८%१२.४%भाजप७.९%
गंगानगर३४.३%२६.२%४.६%०.४%१.२%३३.२%भाजप८.०%
जयपूर५५.४%३६.७%०.६%१.३%१.४%४.६%भाजप१८.८%
जयपूर ग्रामीण३८.४%३४.४%१.२%९.६%१.३%१५.१%भाजप४.०%
जालोर५०.८%३५.४%१.७%१.१%२.८%८.२%भाजप१५.५%
झालावार-बारन५३.१%३१.४%१.६%५.७%२.०%६.२%भाजप२१.८%
झुनझुनु३२.७%२६.४%५.०%०.३%१.१%३४.६%भाजप६.३%
जोधपूर५२.१%३९.९%१.१%०.५%१.७%४.६%भाजप१२.२%
करौली-धौलपूर३०.३%३५.०%१३.४%१४.१%१.७%५.४%कॉंग्रेस४.७%
कोटा५०.१%३३.७%०.९%८.४%२.३%४.६%भाजप१६.४%
नागौर४५.४%३०.१%६.०%०.१%१.९%१६.५%भाजप१५.३%
पाली५३.५%३७.५%१.८%१.२%२.०%४.०%भाजप१६.०%
राजासमंद५२.८%३१.२%०.९%०.२%१.९%१३.०%भाजप२१.६%
सिकर४५.३%३०.३%१.१%०.०%१.१%२२.२%भाजप१५.०%
टोंक-सवाई माधोपूर४३.२%२६.९%३.६%१३.७%२.२%१०.३%भाजप१६.३%
उदयपूर४७.८%३९.६%१.८%२.१%३.५%५.१%भाजप८.२%

यावरून समजते की करौली-धौलपूर मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघांमध्ये भाजपला आघाडी होती.

माझे लोकसभा २०१४ साठीचे राजस्थानातील अंदाज
१. २०१३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बसपा, एन.पी.पी आणि इतर यांना मिळून १९.७% मते होती.त्यापैकी एन.पी.पी ची मते मुख्यत्वे दौसा, अल्वर आणि करौली-धौलपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकवटलेली होती. यातील एन.पी.पी ची किमान २% कमी होतील तर बसपा, अपक्ष आणि इतर यांची मते किमान ८% ने कमी होतील असे धरतो.
२. या १०% पैकी किमान ७% मते भाजपला तर ३% मते कॉंग्रेसकडे वळतील असे धरतो. म्हणजेच भाजपची मतांची टक्केवारी ५२% तर कॉंग्रेसची ३६% पर्यंत जाईल. यातून भाजपला राज्यातून जोरदार विजय मिळेल.

काही मतदारसंघांबद्दलचे अंदाज
१. दौसा: या मतदारसंघात लढत इंटरेस्टींग होईल. एन.पी.पी कडून किरोरीलाल मीना परत उभे आहेत.भाजपकडून हरिश्चंद्र मीना तर कॉंग्रेसकडून केंद्रिय मंत्री नमोनारायण मीना उभे आहेत. २००९ मध्ये नमोनारायण मीना टोंक-सवाई माधोपूरमधून निवडून गेले होते.इतर दोन अपक्ष उमेदवार उभे आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळी दौसामधून भाजपला आघाडी होती आणि एन.पी.पी दुसऱ्या क्रमांकावर होता. विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपने या मतदारसंघातील ८ पैकी ५, एन.पी.पी ने २ तर अपक्षाने १ जागा जिंकली होती. एन.पी.पी चा तितका प्रभाव विधानसभेत पडला नव्हता (राज्यातील भाजपची लाट त्याला कारणीभूत होती असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये). तरीही स्वत: किरोरीलाल मीना निवडणुक लढवत आहेत.कॉंग्रेसनेही केंद्रिय मंत्री नमोनारायण मीना हा थोडीफार ताकद असलेला उमेदवार दिला आहे. मीना समाजातील तीन उमेदवारांमध्ये मतविभाजन होऊन अपक्ष उमेदवार निवडून आला तर आश्चर्य वाटू नये.

२. झुनझुनू: या मतदारसंघातून कॉंग्रेसचे नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ नेते सीसराम ओला यांच्या सूनबाई राजबाला ओला कॉंग्रेसच्या उमेदवार आहेत.तर भाजपकडून आमदार संतोष अहलावत या रिंगणात आहेत.ही लढत ’काटेकी टक्कर’ होईल असे वाटते. संतोष अहलावत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भरपूर मताधिक्याने जिंकल्या आहेत.तर राजबाला ओलांसाठी सीसराम ओलांचे नाव उपयोगी पडेल असे वाटते.मतदारसंघात विधानसभा निवडणुकांच्या वेळी बसपाने बरीच मते घेतली होती.ही मते नक्की कोणाला जातात यावर निकाल ठरेल.तरीही राजबाला ओला यांचे पारडे जड आहे असे वाटते. झूनझूनूमधून भाजपने आतापर्यंत एकदाही विजय मिळविलेला नाही (१९८९ मध्ये भाजपशी युती केलेल्या जनता दलाचे जगदिप धनकर जिंकले पण प्रत्यक्ष भाजपला ही जागा कधीच जिंकता आली नाही) आणि मुख्य म्हणजे ओला झुनझुनूमधून कधीच हरलेले नाहीत.तेव्हा या जागेतून कॉंग्रेस जिंकेल असे वाटते.

३. जयपूर ग्रामीण: या मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार आहेत केंद्रिय मंत्री सी.पी.जोशी तर भाजपचे उमेदवार म्हणून २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये रजतपदक मिळविणारे राज्यवर्धनसिंग राठोड. सी.पी.जोशी म्हणजे कॉंग्रेसने उमेदवार तगडा आहे. त्यातून भाजपने राज्यवर्धनसिंग राठोड सारखा स्वत:चा अराजकिय आणि बाहेरचा उमेदवार दिला आहे.या लढतीमध्ये सी.पी.जोशी बाजी मारतील असे वाटते.

४. करौली-धौलपूर: या मतदारसंघातली लढत इंटरेस्टींग आहे.या एकमेव मतदारसंघात विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने आघाडी मिळवली होती.या मतदारसंघात एन.पी.पी आणि बसपाने बरीच मते घेतली आहेत.ही मते लोकसभेत कोणत्या पक्षाकडे जातात यावर लोकसभेचा निकाल अवलंबून असेल.राजस्थानातील परिस्थिती लक्षात घेता ही जागा भाजप जिंकेल असे वाटते.

५. अजमेर: या मतदारसंघात कॉंग्रेसकडून सचिन पायलट तर भाजपकडून संवरमल जाट उभे आहेत. स्व.राजेश पायलट दौसा मतदारसंघातून निवडून येत. सचिन पायलट २००४ मध्ये दौसामधूनच निवडून गेले. दौसा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अनुसुचित जमातींसाठी राखीव झाला.त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी अजमेरमधून निवडणुक लढवली.दौसा आणि अजमेर शेजारचे मतदारसंघ नाहीत तसेच अजमेरमध्ये राजेश पायलटांच्या पुण्याईवर मते मिळतील अशी परिस्थिती नाही.तसेच सचिन पायलटांना केंद्रातील युपीए सरकारविरूध्दच्या नाराजीचा सामना करावा लागेलच. विधानसभेतील १६% ची पिछाडी राज्यातील परिस्थिती लक्षात घेता कॉंग्रेस भरून काढेल (भाजपची ८% मते आपल्याकडे वळविणे) जरा कठिणच आहे. अजमेरमधून सचिन पायलटांचा पराभव होणार आणि भाजप जिंकेल असे वाटते.

६. बारमेर: या मतदारसंघात कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कर्नल सोनाराम भाजपचे उमेदवार आहेत.कर्नल सोनाराम कॉंग्रेसकडून १९९६,१९९८ आणि १९९९ मध्ये निवडून आले होते. २००४ मध्ये जसवंतसिंगांचे चिरंजीव मानवेंद्र सिंग तर २००९ मध्ये कॉंग्रेसचे हरीश चौधरी निवडून आले. यावेळी हरीश चौधरीच कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. तर जसवंतसिंग हे बंडखोर म्हणून उभे आहेत. हा मतदारसंघ भाजपने एकदाच (२००४) मध्ये जिंकला.यावेळी कर्नल सोनारामांना बरोबर घेतले आहे आणि राज्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे.तेव्हा या मतदारसंघात भाजप जिंकेल असे वाटते.

बाकी टोंक-सवाई माधोपूरमधून कॉंग्रेसच्या क्रिकेटपटू महंमद अझरूद्दिन यांची डाळ शिजणे थोडे कठिण वाटते. झालावर-बारनमधून मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिरंजीव दुष्यंत सिंग आरामात निवडून येतील असे वाटते.

तेव्हा राजस्थानात जयपूर ग्रामीण आणि झुनझुनू या जागा कॉंग्रेस, दौसा मधून इतर आणि इतर सगळ्या २२ मतदारसंघांमधून भाजप निवडून येईल असे वाटते.

तक्ता क्रमांक ४

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 
एकूण जागा२५
भाजप२२
कॉंग्रेस२
इतर१

प्रतिक्रिया

शिद's picture

11 Apr 2014 - 10:17 pm | शिद

जबरा विश्लेषण....

सव्यसाची's picture

11 Apr 2014 - 11:53 pm | सव्यसाची

बारमेरचा निकाल काय लागतो याची उत्सुकता आहे..
जसवंत सिंग यांनी असा काय अचानक निर्णय घेतला हे काही विशेष आकळत नाहीये..

आजानुकर्ण's picture

11 Apr 2014 - 11:55 pm | आजानुकर्ण

पुढचा भाग महाराष्ट्राचा येऊद्या.

यात एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मागील विधान सभेच्या तुलनेत साताठ टक्के जास्त मतदान झालं. (म्हणजे २५ लाख जास्त मतदार आले )शिवाय पूर्वी नोटा नव्हता तो आला. दोन टक्के म्हणजे सुमारे पाच लाख लोकांनी तो वापरला, तरी कोन्ग्रेस जवळपास नामशेष झाली. 'नोटा' मुख्यत्वे कॉंग्रेस विरोधात वापरला गेला असे दिसते. आणि ३ ते ५% कल बदलला तरी मोठा फरक पडताना दिसतोय. नवे मतदार हा फरक पाडताना दिसत आहेत.

'नोटा' वापरणारे सुशिक्षित असल्याने नकारात्मक मतदान करतात असं वाटलं, तरी इथे अति मागास भागात पण नोटा बराच वापरला गेलाय..

ऋषिकेश's picture

12 Apr 2014 - 1:10 pm | ऋषिकेश

तुमी एम्पी, राजस्थान अशी सोपी राज्ये घेऊन राहिले भाऊ.
आता उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र अशी राज्ये येऊ द्या की! :P

निल्या१'s picture

15 Apr 2014 - 3:12 am | निल्या१

निवडणुका संपून गेल्यावर मग महाराष्ट्र आले तर मग काही मजा नाही.
होवून जावू द्या धुळवड.

अनन्त अवधुत's picture

15 Apr 2014 - 5:52 am | अनन्त अवधुत

+१

पैसा's picture

12 Apr 2014 - 11:06 pm | पैसा

झकास! राजस्थानचे निकाल असेच लागतील असं वाटतं.

आज इतर सगळीकडे होतं आहे तसंच गोव्यात प्रचंड प्रमाणात (साधारण ७५%) मतदान झालं आहे. मात्र निकालांसाठी बरेच दिवस थांबावं लागणार!

अनन्त अवधुत's picture

15 Apr 2014 - 5:59 am | अनन्त अवधुत

तुम्ही १६ एप्रिलला गावाला जाणार असे म्हणालात. महाराष्ट्रात १७ एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे.
त्याआधी अंदाज सांगा हि विनंती.
खरे तर अंदाज १६ मे पर्यंत कधीही दिलेत तरी चालतील. तुम्ही अंदाज कधीही दिले तरी भर चैत्र\वैशाखात इथे धुळवड सुरु होईल हे नक्की
पण सध्या माहोल गरम आहे, आणि सगळ्यांना उत्सुकता लागली आहे निकालाची.
टीव्हीवरचे अंदाज सगळेच पाहत असतील, पण अंदाज वर्तवणारा माहिती आहे (पक्षी: तुम्ही) अशी ठिकाणे कमी.

भुमन्यु's picture

15 Apr 2014 - 3:14 pm | भुमन्यु

आवडला लेख... महाराष्ट्र कधी?

शिद's picture

17 Apr 2014 - 8:18 pm | शिद

महाराष्ट्र कधी?

लवकरत लवकर येऊ दे तुमच्या पोतडीतुन बाहेर.