महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

पडघम २०१४-भाग १७: पूर्ण देशातील अंदाज

Primary tabs

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
11 May 2014 - 9:42 pm

पडघम २०१४-भाग १७: पूर्ण देशातील अंदाज

यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)
भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात
भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली
भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश
भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब
भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड
भाग १४: बॅटलग्राऊंड स्टेटस-उत्तर भारतातील इतर राज्ये
भाग १५: बॅटलग्राऊंड स्टेटस-पूर्व भारतातील राज्ये
भाग १६: बॅटलग्राऊंड स्टेटस-दक्षिण भारतातील राज्ये

आता या भागात आपण आतापर्यंत मांडलेल्या अंदाजांचा आढावा घेऊ.त्यापूर्वी पश्चिम भारतातील गोवा, दिव-दमण आणि दादरा नगर हवेली या चार लोकसभा मतदारसंघांचे अंदाज राहिले आहेत त्याविषयी लिहितो.

गोव्यातील दोनपैकी उत्तर गोव्याची जागा भाजपला तर दक्षिण गोव्याची जागा कॉंग्रेसला धरतो.
दिव-दमण आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांवर गुजरातमधील वातावरणाचा मोठा परिणाम होतो.त्यामुळे या दोन्ही जागा भाजपला मिळतील असे धरतो.

तसेच पूर्व भारतात अंदमान-निकोबारच्या जागेचा अंदाज व्यक्त केलेला नव्हता. १९९९ प्रमाणे यावेळीही भाजपचे विष्णूपद रे जिंकतील असे मला वाटते. तसेच दक्षिण भारतात लक्षद्वीपच्या जागेचाही अंदाज व्यक्त केलेला नव्हता.ही जागा कॉंग्रेस जिंकेल असे धरतो.

तेव्हा विभागनिहाय निकालांचे अंदाज पुढीलप्रमाणे

१. दक्षिण भारत

 
दक्षिण भारत  
एकूण जागा १३१
   
एन.डी.ए ३२
भाजप १६
तेलुगु देसम १२
पी.एम.के
मद्रमुक
   
यु.पी.ए २९
कॉंग्रेस २७
केरळ कॉंग्रेस मणी
मुस्लिम लीग
   
डावी आघाडी १२
   
इतर ५८
अण्णा द्रमुक २१
वाय.एस.आर कॉंग्रेस १४
द्रमुक १३
तेलंगण राष्ट्रसमिती
जनता दल (धर्मनिरपेक्ष)
एम.आय.एम

२. पूर्व भारत

 
पूर्व भारत  
एकूण जागा १५४
   
एन.डी.ए ५४
भाजप ४८
लोक जनशक्ती
उत्तर-पूर्वेतील इतर एन.डी.ए पक्ष
   
यु.पी.ए ३७
कॉंग्रेस २६
राजद १०
झारखंड मुक्ती मोर्चा
   
डावी आघाडी १५
   
इतर ४८
तृणमूल कॉंग्रेस २५
बीजू जनता दल १४
जनता दल (संयुक्त)
झारखंड विकास मोर्चा
सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट
उत्तर-पूर्वेतील इतर पक्ष

३. उत्तर भारत

 
उत्तर भारत  
एकूण जागा १५१
   
एन.डी.ए ९१
भाजप ८७
अकाली दल
हरियाणा जनहित कॉंग्रेस
   
यु.पी.ए २६
कॉंग्रेस २४
नॅशनल कॉन्फरन्स
   
इतर ३४
समाजवादी पक्ष १६
बहुजन समाज पक्ष १३
आय.एन.एल.डी
पी.डी.पी
आम आदमी पक्ष

४. पश्चिम भारत

 
पश्चिम भारत  
एकूण जागा १०७
   
एन.डी.ए ८३
भाजप ६७
शिवसेना १५
शेतकरी संघटना
   
यु.पी.ए २३
कॉंग्रेस १६
राष्ट्रवादी कॉंग्रेस
   
इतर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

तर पूर्ण देशातील निकालांचे अंदाज पुढील तक्त्यात दिले आहेत.

         
  दक्षिण भारत पूर्व भारत उत्तर भारत पश्चिम भारत एकूण
  १३१ १५४ १५१ १०७ ५४३
           
एन.डी.ए ३२ ५४ ९१ ८३ २६०
भाजप १६ ४८ ८७ ६७ २१८
तेलुगु देसम १२       १२
पी.एम.के      
मद्रमुक      
लोकजन शक्ती      
उत्तर-पूर्वेतील इतर एन.डी.ए पक्ष      
अकाली दल      
हरियाणा जनहित कॉंग्रेस      
शिवसेना       १५ १५
शेतकरी संघटना      
           
यु.पी.ए २९ ३७ २६ २३ ११५
कॉंग्रेस २७ २६ २४ १६ ९३
केरळ कॉंग्रेस मणी      
मुस्लिम लीग      
राष्ट्रीय जनता दल   १०     १०
झारखंड मुक्ती मोर्चा      
नॅशनल कॉन्फरन्स      
राष्ट्रवादी कॉंग्रेस      
           
डावी आघाडी १२ १५ २७
           
इतर ५८ ४८ ३४ १४१
अण्णा द्रमुक २१       २१
वाय.एस.आर कॉंग्रेस १४       १४
द्रमुक १३       १३
तेलंगण राष्ट्रसमिती      
जनता दल (धर्मनिरपेक्ष)      
एम.आय.एम      
तृणमूल कॉंग्रेस   २५     २५
बीजू जनता दल   १४     १४
जनता दल (संयुक्त)      
झारखंड विकास मोर्चा      
सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट      
उत्तर-पूर्वेतील इतर पक्ष      
समाजवादी पक्ष     १६   १६
बहुजन समाज पक्ष     १३   १३
आय.एन.एल.डी      
पी.डी.पी      
आम आदमी पक्ष      
महाराष्ट्र नवनिर्माण सेना      

यावरून कळते की एन.डी.ए ला २६० (भाजप: २१७) आणि यु.पी.ए ला ११५ (कॉंग्रेसला ९३) जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे ७ खासदार आणि वाय.एस.आर कॉंग्रेसचे १४ खासदार नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला फार अडचण करतील असे नाही.तसेच सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि उत्तर पूर्व भारतातील इतर काही पक्ष यांचाही पाठिंबा नरेंद्र मोदींना मिळायला अडचण येऊ नये.तेव्हा नरेंद्र मोदीच भारताचे पुढचे पंतप्रधान होतील असे मला वाटते.

काही राज्यांमध्ये जनमत चाचण्यांपेक्षा मी एन.डी.ए ला कमी जागा दिल्या आहेत.उत्तर प्रदेशात भाजप तब्बल ३८% मते मिळवेल असे काही चाचण्या म्हणत आहेत.चतुरंगी लढतीत भाजपने ३८% मते मिळविल्यास माझ्या अंदाजाप्रमाणे भाजप ६० जागा सुध्दा जिंकू शकेल.अर्थात ३८% मते पक्षाला मिळणे या गृहितकावर हे अवलंबून आहे.तसे झाल्यास एन.डी.ए ला निर्विवाद बहुमत मिळेल. नक्की काय होते हे १६ मे रोजीच कळेल.

मतमोजणी झाल्यानंतर मी एकूण निकाल आणि माझे अंदाज यांच्यात तुलना करणारा एक लेख नक्कीच लिहेन.

सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल आणि सहकार्याबद्दल आभार. मिपाकरांचे प्रोत्साहन नेहमीच हुरूप वाढविणारे असते. तसेच पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे ज्ञानोबाचे पैजार, पैसाताई, राहुलजीव्ही, सुहासदवन आणि श्रीरंग जोशी यांनी ही आकडेवारी एकत्र करायला महत्वाची मदत केली. त्यांचे परत एकदा आभार मानून पडघम-२०१४ या लेखमालेची सांगता या लेखाबरोबर करत आहे.

धन्यवाद

प्रतिक्रिया

अभ्यासपुर्ण लेखमाला, तुमच्या चिकाटीस सलाम !!!
या शेवटच्या लेखाच्या प्रतिक्षेत होतो..

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 9:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

उगा काहितरीच's picture

11 May 2014 - 11:21 pm | उगा काहितरीच

+1

लॉरी टांगटूंगकर's picture

11 May 2014 - 11:22 pm | लॉरी टांगटूंगकर

+१११

@क्लिंट@:एवढ्या जागा मिळाल्या तर तुमच्या तोंडात साखर पडो. भाजपला साधारणपणे २२० किंवा त्या पेक्षा थोड्या जास्त जागा मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणार यात शंका नाही.सध्याच्या एनडीएला २६० जागा मिळाल्या तर अनेक छोटे मोठे पक्ष त्यांना येवून मिळतील. वायएसआर आणि टीएसआर बद्दल तुम्ही बोलला आहातच.मात्र त्याबरोबरच नवीन पटनाईक,द्रमुक किंवा अद्रमुक आणि आत्ता कितीही नाही नाही म्हणत असल्या तरी ममता / माया येणार नाहीतच असे नाही. खरे तर माया/ममता/ जयललिता न येता सरकार बनले तर तेच जास्त चांगले ठरेल.आपण परिश्रमपूर्वक ही लेखमालिका लिहिली याबद्दल आपले आभार!

क्लिंटन's picture

11 May 2014 - 10:44 pm | क्लिंटन

हो बरोबर.

समजा २६० जागा खरोखरच एन.डी.ए ला मिळाल्या तर उगते हुए सुरज को प्रणाम म्हणून इतर अनेक पक्ष मागे यायची शक्यता आहेच. मग सेक्युलॅरिझम वगैरे गेले तेल लावत. जनमताचा कौल मोदींना मिळाला मग त्यांना नाही म्हणणारे आम्ही कोण हे जस्टीफिकेशन आहेच. :) त्यातल्या त्यात नवीन पटनायक बरोबर आले तर चांगले होईल. जितके शक्य होईल तितके जयललिता, ममता आणि मायावती या पाताळयंत्री राजकारण्यांना दूर ठेवता आले तर चांगलेच.

अनुप ढेरे's picture

12 May 2014 - 9:46 am | अनुप ढेरे

नवीन पटनायक बरोबर आले तर चांगले होईल.

याची शक्यता खूप कमी वाटते. ओरिसामध्ये लोकल पातळीवर फार फाटलं आहे भाजपा आणि बीजेडीचं असं वाचनात आलं होतं मध्ये.

क्लिंटन's picture

12 May 2014 - 9:45 pm | क्लिंटन

याची शक्यता खूप कमी वाटते.

हो बरोबर. याची शक्यता कमीच आहे.तरीही मायावती, ममता, जयललिता यांच्यासारख्यांपेक्षा नवीन पटनायक कधीही परवडले. अर्थात कोणालाही बरोबर घ्यायची गरज लागली नाही तर सर्वात चांगले होईल.

प्रसाद१९७१'s picture

14 May 2014 - 1:25 pm | प्रसाद१९७१

सगळे येतील, अगदी मुलायम, ममता सुद्धा येतील. पाय चाटत येतील. ही लोक सत्ते वर येण्यासाठी काहीही करतील.

पैलवान's picture

14 May 2014 - 5:22 pm | पैलवान

उगते हुए सुरज को प्रणाम म्हणून इतर अनेक पक्ष मागे यायची शक्यता आहेच. मग सेक्युलॅरिझम वगैरे गेले तेल लावत.

अगदी!!
साहेबांचा नॅशनलिस्ट पक्ष पण एनडीए मध्ये जाईल...

शशिकांत ओक's picture

2 Aug 2014 - 4:46 pm | शशिकांत ओक

निवडणुक अंदाज आणि निकाल...
क्लिंटन आपण अत्यंत कष्टपुर्वक विदा मिळवून सादर केलेल्या विविध राज्यातील अंदाज सहज पाहण्यात आले. कांग्रेस व अनेक पक्षांचे पानिपत पाहता पूर्व निकालाचा अनुभव नेहमीच कामाला येतो असे नाही असे दिसते. असो. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा चुनाव मधे आपले ्अंदाज वाचायला मिळावेत.

पैसा's picture

11 May 2014 - 10:00 pm | पैसा

प्रचंड मोठं काम केलंस! तरी हे अंदाज बरेच सावध वाटत आहेत. प्रत्यक्षात भाजप + मित्रपक्षांना याहून जास्त जागा मिळू शकतील असे वाटते.

द. गोव्याची जागा काँग्रेसला जाईल असा तुझा अंदाज असला तरी यावेळी परिस्थिती वेगळी आहे. विधानसभा निवडणुकांत भाजपाने द. गोव्यात चांगली कामगिरी बजावली होती. मगोपने अगदी मनापासून भाजपचा प्रचार केला आहे. आणि आआपच्या उमेदवार स्वाती केरकर या भाजपापेक्षा काँग्रेसचीच मते खातील असा अंदाज आहे. प्रचारात काँग्रेसचे अस्तित्वच कुठे जाणवले नव्हते. अ‍ॅड. नरेंद्र सावईकर तसे बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत. त्यामुळे द. गोव्यातही भाजप जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही.

उ. गोवा श्रीपाद नाईक यांच्यासाठी सोपी लढत असते. त्यातही दयानंद नार्वेकर यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केल्याने श्रीपादभाऊंना ही लढत आणखीच सोपी झाली आहे.

काही अनपेक्षित निकालांमुळे एन डी ए पूर्ण बहुमत कदाचित मिळवू शकेल असे वाटते. काही झाले तरी परत निवडणुका नको आहेत आणि सध्याचे सरकार तर गेलेच पाहिजे.

क्लिंटन's picture

11 May 2014 - 10:46 pm | क्लिंटन

तरी हे अंदाज बरेच सावध वाटत आहेत. प्रत्यक्षात भाजप + मित्रपक्षांना याहून जास्त जागा मिळू शकतील असे वाटते.

हो बरोबर.यापेक्षा जास्त जागाही मिळू शकतील.म्हणूनच मी एन.डी.ए वर २६० ते २९० मध्ये बुल स्प्रेड आणि युपीए वर १४० आणि ११० मध्ये बेअर स्प्रेड करत आहे :)

पैसा's picture

11 May 2014 - 10:48 pm | पैसा

:)

प्रीत-मोहर's picture

12 May 2014 - 8:48 am | प्रीत-मोहर

+१...

नार्वेकरांनीही काही ठराविक एरियातच प्रचार केला. पुर्ण मतदार संघही नाही. आमच्या भागात दयानंद नार्वेकर आलेसुद्धा नाही.

एक गंमत सांगते. T-20 world cup च्या मॅचेस च लाईव स्ट्रीमिंग आमच्या इथे असलेल्या Goa Cricket Association च्या ग्राउंडावर सुरु होत. तर आम्ही तिथे मस्त मॅच बघत बसलो होतो. तर आप वाल्यांनी आपली प्रचाराची गाडी तिकडे अणुन पार्क केली. आणि त्यांची गाणी, वै. वै. सुरु केली. माझ्या मागचे तरुण शिव्या घालत हओते त्यांना अक्षरशः काँग्रेस चा दुसरा पक्ष म्हणे. आणि काही वेळाने लोकांनी त्यांना तिथले हाकलले .

प्रीत-मोहर's picture

12 May 2014 - 8:53 am | प्रीत-मोहर

माझ मत उत्तर गोव्यात आहे, पण सासर द. गोव्यात असल्याने तिथली स्थिती माहित आहे.

पै तै ,चर्चिल आलेमाव वगैरे लोकांच काँग्रेसमधुन बाहेर पडण बरच महागात पडेल काँग्रेस ला. आलेमाव ब्रदर्स आणि फॅमिलीने गोव्यात काँग्रेस चा प्रचारही केलेला नाहीये. चर्चिल्कन्या वालंका उठुन गोव्याबाहेर पोचली होती प्रचाराला.

दुश्यन्त's picture

11 May 2014 - 10:08 pm | दुश्यन्त

वर पश्चिम भारतात (महाराष्ट्रात) आरपीआयला २ जागा दाखवल्या आहेत. मात्र हा पक्ष केवळ एक जागा (सातारा) लढवत आहे आणि ती जागा ते नक्कीच हारणार आहेत. मात्र सेनेच्या २ जागा वाढू शकतात किंवा स्वाभिमानीची एखादी जागा वाढू शकते तेव्हा एकूण बेरीज फार बदलणार आहे असे वाटते.

क्लिंटन's picture

11 May 2014 - 10:35 pm | क्लिंटन

वर पश्चिम भारतात (महाराष्ट्रात) आरपीआयला २ जागा दाखवल्या आहेत. मात्र हा पक्ष केवळ एक जागा (सातारा) लढवत आहे आणि ती जागा ते नक्कीच हारणार आहेत.

तपशीलातील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. सोमवारी एक्झिट पोल्सचे अंदाज प्रसिध्द होतील.त्यापूर्वी ही लेखमाला पूर्ण करायची होती.मधल्या काळात एका नातेवाईकांच्या आजारपणामुळे या लेखमालेवरील काम मागे पडले होते.तेव्हा गेल्या दोन दिवसात बरेच लेख पूर्ण करायचे होते आणि त्याचा ताण पडला. यातून ही तपशीलातील चूक झाली. ती दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल करत आहे.

सुहास झेले's picture

12 May 2014 - 12:31 am | सुहास झेले

सुपर्ब...ह्या अप्रतिम लेखमालेसाठी आभार. तू निवडणुकांचा अभ्यास प्रचंड मेहनतीने, चिकाटीने आणि काळजीपूर्वक केला आहेस, ते प्रत्येक लेखात दिसून येते. जागांचे बहुतेक अंदाज बरोबर वर्तवलेस. आता वाट १६ मे ची :)

कॉंग्रेसचा नायनाट होवो :)

जेपी's picture

12 May 2014 - 7:39 am | जेपी

क्लिंटन जी , आपके
मुंह में घी शक्कर.

प्रीत-मोहर's picture

12 May 2014 - 8:49 am | प्रीत-मोहर

क्लिंटन असच होउदेत!!!
तथास्तु!! आमेन

मोहन's picture

12 May 2014 - 11:00 am | मोहन

अत्यंत अभ्यासपूर्ण लेखमाला.
त्या टी व्ही वरच्या " कोंबड्यांच्या झुंजी " व त्यांचे निवडणूक अंदाज ह्यांच्या पेक्षा कितीतरी पट सरस विश्लेषण वाचून समाधान झाले.
तुमचा अंदाज -बुल स्प्रेड , अचुक येइल असे वाटते.

कलंत्री's picture

12 May 2014 - 12:11 pm | कलंत्री

क्लिंटन : अभिनंदन.

सौंदाळा's picture

12 May 2014 - 12:30 pm | सौंदाळा

आतापर्यंत वाचलेल्या मालिकांमधली सर्वात परिश्रम घेऊन लिहीलेली लेखमाला.
अत्यंत उत्क्रुष्ट विश्लेषण.
तुमचे अंदाज बरोबर ठरोत आणि

एकूण निकाल आणि माझे अंदाज यांच्यात तुलना करणारा एक लेख

लिहिण्याची वेळच न येवो अशी शुभेच्छा व्यक्त करतो ;)
तसेच आगामी विधानसभा निवड्णुकांदरम्यान अशीच लेखमाला परत वाचायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

सह्यमित्र's picture

12 May 2014 - 12:49 pm | सह्यमित्र

अतिशय अभ्यासपूर्ण लेखमालिका.खूपच छान!!

श्रीगुरुजी's picture

12 May 2014 - 12:50 pm | श्रीगुरुजी

क्लिंटन,

तुमच्या लेखमालेबद्दल अभिनंदन! भाजपला कोणाच्याही कुबड्या न घेता संपूर्ण बहुमत मिळावे व काँग्रेसला ५४ पेक्षा कमी जागा मिळाव्या अशी इच्छा आहे. इश्वरेच्छा बलियसी!

llपुण्याचे पेशवेll's picture

12 May 2014 - 12:55 pm | llपुण्याचे पेशवेll

अजून एक शक्यता समजा एनडीए २४०-२५० पर्यंत सिमित झाले तर त्या जागा नक्की अन्य ठीकाणी जातील जेणेकरून काँग्रेसच्या पाठींब्याने तिसरी आघाडी पुढे यायची शक्यता आहे. मोदींना रोखायला काहीपण, कसेपण, कुठेपण या न्यायानी. शक्यता कमी असली तरी शून्य नक्कीच नाही.
क्लिंटनबा, फार परिश्रमपूर्वक लिहीलेली लेखमाला.

मृत्युन्जय's picture

12 May 2014 - 1:07 pm | मृत्युन्जय

मेहनत खुप घेतली आहे हे दिसतेच आहे. पण हे असे होण्याची शक्यता खुप कमी वाटते. खासकरुन पुर्व आणि उत्तर भारतात. दक्षिण आणि पश्चिम भारतात मात्र परिस्थिती बरोबर दिसते आहे. एनडीए ला साधारण २०० ते २२० जागा मिळतील असे वाटते. मी चुकीचा ठरल्यास मला आनंदच होइल.

प्रसाद१९७१'s picture

12 May 2014 - 1:35 pm | प्रसाद१९७१

धन्यवाद. जरी काही राज्यात थोडा फरक वाटला तरी एकुणात अभ्यासपुर्ण.

मोदी सरकार पूर्ण बहुमतानी यावे ही इछ्छा.

हरिश_पाटील's picture

12 May 2014 - 4:12 pm | हरिश_पाटील

+११११ अप्रतिम

मदनबाण's picture

12 May 2014 - 4:37 pm | मदनबाण

आम्हा सर्व मिपाकरांसाठी दिलेल्या या माहिती बद्धल आणि घेतलेल्या मेहनती बद्धल आभार ! :)

मूकवाचक's picture

12 May 2014 - 5:45 pm | मूकवाचक

+१

हि लेखमालिका लिहीण्यासाठी तुमची मेहनत, परीश्रम, चिकाटी व अभ्यास ह्या साठी तर बोलण्यास शब्दच नाहीत म्हणुन _/\_ स्विकारा. *good*

बाकी तुम्ही वर्तवलेले सगळे अंदाज बरोबर यावेत व मोदी सरकार पूर्ण बहुमतानी सत्तेत यावे अशी आशा बाळगतो.

पिलीयन रायडर's picture

12 May 2014 - 5:41 pm | पिलीयन रायडर

+११११११११

हेच्च म्हणते..

दुश्यन्त's picture

12 May 2014 - 7:40 pm | दुश्यन्त

इंडियाटुडेचा मतदानोत्तर एक्झिट पोल एनडीला पूर्ण बहुमत मिळेल असे दाखवतोय (२६१ ते २८३). बाकीचे पोल पण साधारण असेच आकडे दाखवत आहेत. तसे झाले तर २७२ चा जादुई आकडा गाठायला अडचण येवू नये. आणि तेलंगण राष्ट्र समिती, बीजेडी वगैरे मागाहून बरोबर येतील किंवा काही जन बहरून पाठींबा देतील.ममता, माया, जयललिताच्या नाकदुर्या काढायला लागू नये हीच इच्छा. सगळ्यात बेभरवशी तर ममताच वातात.मात्र पोल दाखवतात तसे २६०+ जागा सध्याच्या एनडीएला मिळाल्या तर चिंताच मिटली.
एकूण मोदींच्या नेतृत्वात भाजप मित्रपक्षांसह सरकार बनवेल अशीच जोरदार शक्यता आहे. १६ मेला असाच निकाल येवो.

क्लिंटन's picture

12 May 2014 - 9:43 pm | क्लिंटन

प्रतिसाद देणार्‍या सर्व मिपाकरांना धन्यवाद. मिपाकरांच्या प्रोत्साहनामुळे आणि चर्चेत सक्रीय सहभाग घेतल्यामुळेच ही लेखमाला शक्य झाली. महाराष्ट्रावरील लेख आलेले असताना माझ्या नातेवाईकांच्या आजारपणामुळे मी तितका सक्रीय सहभाग घेऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी.

आनन्दा's picture

13 May 2014 - 11:54 am | आनन्दा

यावेळेस १९८४ पेक्षा देखील जास्त मतदान झाले आहे. मोदींना (फक्त भाजपाला) बहुमत मिळो अश्या मनापासून हार्दिक शुभेच्छा, पण राजीव गांधींसारखे पाशवी बहुमत न मिळो अश्या बाकींच्यांना शुभेच्छा!! मला व्यक्तिशः या वेळच्या निवडणूका सारे स्टॅतिस्टिकल अंदाज चुकवतील असे वाटते, कारण एक मोठा नवीन वर्ग यावेळेस मतदानासाठी उतरला आहे, आणि त्याच्या ट्रेण्ड चा बेंचमार्क कुठेही उपलब्ध नाही.

हाडक्या's picture

13 May 2014 - 3:20 pm | हाडक्या

धन्यवाद, क्लिंटन ..!!
उत्तम मालिका. कशी कधी प्रश्न पडतो की इतके सायास तुम्हाला रोजचे काम सांभाळून कसे जमत असतील!
ग्रेट आहात.

बाकी मोदींबद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवठेला बरा. ते पीएम झाले न झाले तरी फार मोठा फरक पडणार आहे असे कोणी मानू नये. खरेतर या अति-स्वप्नाळू आणि अवास्तव अपेक्षांमुळेच काँग्रेससारख्या धूर्तांचे फावते आणि ते परत परत येत राहतात. आपण आणि आपल्या आजू बाजूचे आहे तसेच (रस्त्यांवरची अनागोंदी, बारीक सारीक 'चलता है' म्हणत केलेल्या गोष्टी इत्यादि) राहणार असेल तर मोदी देखील या खंडप्राय देशात लगेच फार मोठा परिणाम करू शकणार नाहीत याची जाणीव ठेवावी लागेल.

क्लिंटन's picture

13 May 2014 - 8:44 pm | क्लिंटन

बाकी मोदींबद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवठेला बरा. ते पीएम झाले न झाले तरी फार मोठा फरक पडणार आहे असे कोणी मानू नये. खरेतर या अति-स्वप्नाळू आणि अवास्तव अपेक्षांमुळेच काँग्रेससारख्या धूर्तांचे फावते आणि ते परत परत येत राहतात. आपण आणि आपल्या आजू बाजूचे आहे तसेच (रस्त्यांवरची अनागोंदी, बारीक सारीक 'चलता है' म्हणत केलेल्या गोष्टी इत्यादि) राहणार असेल तर मोदी देखील या खंडप्राय देशात लगेच फार मोठा परिणाम करू शकणार नाहीत याची जाणीव ठेवावी लागेल.

हो बरोबर. आता १६ तारखेची वाट बघत आहे.मला स्वतःला तरी मोदी पंतप्रधान होण्यात फार अडचण येईल असे वाटत नाही.तरीही एकदा ते आकड्यांमधून कन्फर्म झाले की मोदींपुढील आव्हाने म्हणून अजून एक लेख लिहावा असे म्हणत आहे :)

श्रीगुरुजी's picture

13 May 2014 - 8:49 pm | श्रीगुरुजी

१६ मे च्या मतमोजणीसाठी धागा सुरू करायची इच्छा आहे. त्यात निवडणुकीपुर्वीच्या मतदानपूर्व चाचणीचे अंदाज, मतदानोत्तर चाचणीचे अंदाज व तुमचे स्वतःचे अंदाज असे तीनही अंदाज द्यायचे आहेत. प्रत्यक्ष निकालानंतर तीनही अंदाजांची तुलना करता येईल.

या निवडणुकीसाठी तुम्ही सुरवातीपासून अनेक अभ्यासू लेख लिहिले आहेत. त्यामुळे हा धागा सुरू करण्याचा मान तुमचाच आहे. १५ मे पूर्वी हा धागा सुरू करता येईल का? तुम्हाला वेळ नसल्यास मी सुरु करीन.

या निवडणुकीसाठी तुम्ही सुरवातीपासून अनेक अभ्यासू लेख लिहिले आहेत. त्यामुळे हा धागा सुरू करण्याचा मान तुमचाच आहे. १५ मे पूर्वी हा धागा सुरू करता येईल का? तुम्हाला वेळ नसल्यास मी सुरु करीन.

१५ मे पूर्वी मला धागा सुरू करणे थोडे कठिणच आहे.कारण सगळे एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोल शोधून त्यांचे दुवे देणे हे थोडे वेळखाऊ काम असेल.आणि खरे सांगायचे तर गेले काही दिवस एक्सेल फाईल्स, पीव्होट टेबल इत्यादींमध्ये खेळून थोडीशी दमछाकच झाली आहे.तेव्हा तुम्हाला धागा सुरू करायचा आहे ते जरूर करा. यात मानाचा प्रश्नच नाही.शेवटी जे काही लेख येतील ते आपल्या मिपासाठीच. मग ते कोणी का चालू केले असेनात :)

विटेकर's picture

13 May 2014 - 5:02 pm | विटेकर

या लेखासाठी मुद्दाम आलो होतो.
झकास लेख ! मला तुमचे विश्लेषण नेहमीच आवडते, अतिशय वस्तुनिष्ठ आणि न्यायी असे! तुम्ही भाजपवाले वाट्ता पण ते तुमच्या विष्लेषणात अजिबात डोकावत नाही !
तुमचा अंदाज थोडासा सावध वाटतो भाजप+ सहज बहुमत मिळवेल असा माझा कयास आहे. अर्थात आध्र आणि दक्षिण फार स्लीपरी आहे हे ही तितकेच खरे !
तुमच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम !

जयंत कुलकर्णी's picture

13 May 2014 - 8:52 pm | जयंत कुलकर्णी

फारच अभ्यासपूर्ण. काही दिवसातच तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून टिव्हीवर दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. मी पूर्ण मालिका नीट वाचली व फार कमी ठिकाणी माझी मते वेगळी होती. अर्थात हा प्रतिसाद आपल्याला व आपल्या टीमला धन्यवाद देण्यासाठी लिहिला आहे.

भास्कर केन्डे's picture

14 May 2014 - 2:14 am | भास्कर केन्डे

खास अभिनंदन! सगळी लेखमाला एक नंबर. तुमचे अभिनंदन करण्यासाठी खूप दिवसांनी मिपावर लॉगिन केले. पुढील लेखांची वाट पहात आहे. येऊ द्या.

आनन्दिता's picture

14 May 2014 - 4:05 am | आनन्दिता

क्लिंटन,

खुप कष्ट घेतलेत राव तुम्ही.. अन त्यातुन आकाराला आलेली ही लेखमाला केवळ अफाट.

तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर भाजप ला बहुमत मिळो अन तुमच्या तोंडात साखर पडो.!

भाजपा ची व कॉग्ग्रेस ची आर्थिक धोरणे सारखी आहेत. दोघांच्या काही मजबूरी ( उदा. दलिताना पाठिंबा, अन्न सुरक्षा ई )
देखील सारख्या आहेत. प्रशासनात मनमोहन यांच्या पेक्षा आलेच तर मोदी उजवे ठरतील. मनमोहन यानी स्वयंपाकाच्या
गॅस पुरवठ्यातील गैरप्रकार शोधून समस्या सोडविली आहे. असा काही प्रयत्न करून खालच्या थरातील भ्रष्टाचार दूर करण्याचे
मोदीनी ठरविले तर........? पण हा त्तरच मोठा अजब प्राणी आहे.

तुमच्या अभ्यासाला आणि चिकाटीला सलाम....
निकाल तुम्ही मांडले तसेच लागले तर अत्यानंद होईल.
ह्या वेळी भाजपाला पूर्ण बहुमत मिळो आणि काँग्रेसचा नायनाट होवो ही ईच्छा आहे.....

ऋषिकेश's picture

15 May 2014 - 11:31 am | ऋषिकेश

माझा अंदाज
एन्डीए २५२
युपीए १०९

Dhananjay Borgaonkar's picture

15 May 2014 - 3:38 pm | Dhananjay Borgaonkar

तुमच्या पॅशनला सलाम. खुपच चिकाटीचं काम आहे हे.
आशा आहे की - अब की बार मोदी सरकार..

प्यारे१'s picture

16 May 2014 - 11:14 am | प्यारे१

आपले अंदाज चुकल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन! ;)

जोक्स अपार्ट, बरेच अंदाज 'अतिसावध' होते हे लिखाणातही जाणवत होतंच. :)