पडघम २०१४-भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
7 May 2014 - 10:24 pm

पडघम २०१४-भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात

यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)

सुरवातीला गुजरातमध्ये २००७ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.

तक्ता क्रमांक १

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

       
गुजरात२००७२००९ २००७२००९२००७२००९
 मते %मते %मतांमधील फरकविधानसभा जागाविधानसभा जागा आघाडीलोकसभा जागा आघाडीलोकसभा जागा
भाजप४९.१%४६.५%-२.६%११७१०६१८१५
कॉंग्रेस३८.०%४३.४%५.४%५९७५८११
महागुजरात जनता पक्ष १.४%१.४%००००
इतर१२.९%८.७%-४.२%६१००

तक्ता क्रमांक १ वरून खालील गोष्टी कळतात
१. २००७ ते २००९ या काळात भाजपची मते कमी झाली आणि कॉंग्रेसची वाढली. २००९ च्या निवडणुकांच्या वेळी भाजपला निवडणुका लढवायला मुद्दा नव्हता. युपीए-२ मध्ये जे घोटाळे बाहेर आले त्यांचे मूळ युपीए-१ मध्ये असले तरी ते घोटाळे बाहेर आलेले नव्हते.त्यामुळे कॉंग्रेस पक्ष आताइतका बदनाम झाला नव्हता. याविषयी अधिक इथे

तसेच २००९ मध्ये गोवर्धन झाडपियांनी नरेन्द्र मोदींबरोबर मतभेद झाल्यामुळे स्वत:चा महागुजरात जनता पक्ष स्थापन केला.त्यांनी भावनगर मतदारसंघातून निवडणुक लढवून भाजपपुढे मोठी अडचण निर्माण केली होती.भावनगर या आपल्या बालेकिल्ल्यातही भाजपचा अगदी थोडक्यात (१% पेक्षा कमी मताधिक्याने) विजय झाला होता.

२. २०१२ मध्ये केशुभाई पटेलांनी गोवर्धन झाडपियांना बरोबर घेऊन आपला गुजरात जनता पक्ष स्थापन केला.त्या पक्षाने विधानसभेत १८२ पैकी अवघ्या २ जागा जिंकल्या पण आणखी किमान १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि गुपपची मते कॉंग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होती.

तक्ता क्रमांक २ मध्ये २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये लागलेले निकाल दिले आहेत

तक्ता क्रमांक २

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
गुजरात२०१२  
 मते %विधानसभा जागालोकसभा जागा आघाडी
भाजप४७.९%११५२१
कॉंग्रेस३८.९%६२५
गुजरात जनता पक्ष३.६%२०
इतर९.६%३०

तक्ता क्रमांक ३ मध्ये २०१२ च्या विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी दिली आहे.

तक्ता क्रमांक ३

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

         
लोकसभा मतदारसंघभाजपकॉंग्रेसगुपपइतरएकूणआघाडीआघाडी %भाजप+गुपपआघाडी %
अहमदाबाद पूर्व५६.२%३५.२%२.३%६.३%१००.०%भाजप२१.०%भाजप२३.२%
अहमदाबाद पश्चिम५८.८%३३.१%१.४%६.७%१००.०%भाजप२५.७%भाजप२७.१%
अमरेली३९.७%३५.६%८.८%१५.९%१००.०%भाजप४.०%भाजप१२.८%
आणंद४४.१%४२.३%१.२%१२.४%१००.०%भाजप१.८%भाजप३.०%
बनासकांठा४१.२%४२.०%१.०%१५.९%१००.०%कॉंग्रेस०.८%भाजप०.२%
बार्डोली५१.५%३८.५%२.८%७.२%१००.०%भाजप१२.९%भाजप१५.७%
भरूच४६.०%३७.३%१.५%१५.२%१००.०%भाजप८.७%भाजप१०.२%
भावनगर५०.३%३६.२%३.४%१०.१%१००.०%भाजप१४.१%भाजप१७.५%
छोटा उदयपूर४६.३%४३.१%१.७%८.९%१००.०%भाजप३.२%भाजप४.९%
दाहोद४१.६%४२.२%३.०%१३.१%१००.०%कॉंग्रेस०.६%भाजप२.४%
गांधीनगर५७.९%३४.०%२.४%५.७%१००.०%भाजप२३.९%भाजप२६.३%
जामनगर४६.०%३८.८%६.९%८.३%१००.०%भाजप७.२%भाजप१४.१%
जुनागढ४०.५%३४.२%१४.०%११.३%१००.०%भाजप६.३%भाजप२०.४%
कच्छ४४.३%४२.३%४.०%९.४%१००.०%भाजप२.०%भाजप६.०%
खेडा४६.५%४२.४%२.६%८.५%१००.०%भाजप४.२%भाजप६.८%
मेहसाणा४९.२%३८.६%१.७%१०.६%१००.०%भाजप१०.६%भाजप१२.३%
नवसारी५८.१%३४.३%१.९%५.७%१००.०%भाजप२३.८%भाजप२५.७%
पंचमहाल४३.४%४४.६%२.४%९.६%१००.०%कॉंग्रेस१.३%भाजप१.१%
पाटण४४.८%४५.१%१.७%८.३%१००.०%कॉंग्रेस०.३%भाजप१.४%
पोरबंदर४५.७%२९.५%११.५%१३.३%१००.०%भाजप१६.२%भाजप२७.७%
राजकोट४३.८%३८.२%११.१%६.८%१००.०%भाजप५.६%भाजप१६.८%
साबरकांठा३७.९%५०.७%०.९%१०.५%१००.०%कॉंग्रेस१२.८%कॉंग्रेस१२.०%
सुरत५९.०%३१.९%६.३%२.८%१००.०%भाजप२७.१%भाजप३३.४%
सुरेन्द्रनगर४८.५%४२.३%२.४%६.८%१००.०%भाजप६.२%भाजप८.६%
वडोदरा५५.०%३२.५%०.९%११.६%१००.०%भाजप२२.६%भाजप२३.५%
वलसाड४६.८%४३.१%१.१%९.१%१००.०%भाजप३.७%भाजप४.७%

तक्ता क्रमांक ३ वरून आपल्याला कळते की भाजपला २१ तर कॉंग्रेसला ५ लोकसभा मतदारसंघक्षेत्रांमध्ये आघाडी मिळाली होती. ज्या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसला आघाडी मिळाली होती त्यापैकी चार मतदारसंघांमध्ये गुपपने भाजपची मते खाल्यामुळे कॉंग्रेसला आघाडी मिळाली होती. यावरूनच गुपपने भाजपचे किती नुकसान केले हे समजून येईल.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे अंदाज

माझे अंदाज पुढील गृहितकांवर आधारीत आहेत:
१. नरेन्द्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने जाहिर केल्यामुळे राज्यात भाजपची जोरदार लाट असेल.
२. केशुभाई पटेलांचा गुपप आता भाजपमध्ये विलीन झाला आहे. पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे या पक्षाची कामगिरी लोकसभा निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकांइतकी चांगली झाली नक्कीच झाली नसती. तरीही गुपपने जितकी मते घेतली असती त्यापैकी बहुसंख्य मते भाजपकडे वळतील.
३. २०१२ मध्ये इतरांना ९.६% मते मिळाली होती.त्यापैकी साधारण ५% मते कमी होतील आणि ती भाजप आणि कॉंग्रेसकडे वळतील.त्यापैकी भाजप किमान ३% मते आपल्याकडे खेचेल आणि कॉंग्रेसला उरलेली २% मते मिळतील.
४. या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपला ५२-५३% मते तर कॉंग्रेसला ४२-४३% मते मिळतील.

गुजरात हे थेट दुरंगी लढत असलेले राज्य आहे.अशा राज्यात मोठ्या पक्षाने ५०% मते ओलांडली तर त्या पक्षाला व्यस्त प्रमाणात अधिक जागा मिळतात. तसेच गुजरातमध्ये होईल.

विविध मतदारसंघांविषयीचे अंदाज
१. वडोदरा: या मतदारसंघात नरेन्द्र मोदी विरूध्द कॉंग्रेसचे मधुसूदन मिस्त्री असा सामना आहे. या मतदारसंघातून मोदी विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असे मला वाटते.
२. गांधीनगर: या मतदारसंघात भाजपचे लालकृष्ण अडवाणी विरूध्द कॉंग्रेसचे किरीट पटेल असा सामना आहे. गांधीनगरमधून अडवाणींना विजयी व्हायला काहीच हरकत नसावी.
३. अहमदाबाद पूर्व: या मतदारसंघात भाजपचे परेश रावळ विरूध्द कॉंग्रेसचे हिम्मतलाल पटेल असा सामना आहे.अहमदाबाद शहर हा भाजपचा बालेकिल्ला आहे.परेश रावळ जरी अराजकीय उमेदवार असले आणि हरिन पाठक यांना उमेदवारी नाकारल्यामुळे अडवाणी गटात नाराजी असली तरी गुजरातमध्ये (आणि देशात इतर अनेक ठिकाणी) स्थानिक उमेदवाराला फारसे महत्व राहिलेले नाही तर नरेन्द्र मोदीच या मतदारसंघांमध्ये उभे असल्याप्रमाणे परिस्थिती आहे.त्यामुळे परेश रावळ यांना विजय मिळवायला काहीच तोशिश पडू नये.
४. खेडा: या मतदारसंघात भाजपचे देवुसिंग चौहान विरूध्द कॉंग्रेसचे केंद्रीय मंत्री दिनशा पटेल यांच्यात सामना आहे.दिनशा पटेल २००९ मध्ये अगदी थोडक्यात (०.१४% ने) बचावले.देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेता यावेळी खेडामध्ये दिनशा पटेल यांचा पराभव होईल. देवुसिंग चौहान मागच्या वेळच्या पराभवाची भरपाई करणार असे मला वाटते.
५. आणंद: या मतदारसंघात भाजपचे दिलीप पटेल विरूध्द कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री माधवसिंग सोळंकी यांचे चिरंजीव दिनेश सोळंकी यांच्यात सामना आहे.आणंद कॉंग्रेसचा अगदी बालेकिल्ला नसला तरी राज्यात इतर अनेक ठिकाणी पक्षाची वाताहत झाली आहे तशी परिस्थिती आणंदमध्ये नाही.दिनेश सोळंकी विजयी झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
६. साबरकांठा: या एकमेव मतदारसंघात कॉंग्रेसला २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगल्यापैकी आघाडी होती.मतदारसंघात कॉंग्रेसचे शंकरसिंग वाघेला आणि भाजपचे दिपसिंग राठोड अशी लढत आहे.मला वाटते या मतदारसंघात कॉंग्रेसचे शंकरसिंग वाघेला बाजी मारणार.

याव्यतिरिक्त कॉंग्रेस वलसाड/ बार्डोली यापैकी एखादी जागा जिंकेल असे मला वाटते.

या पार्श्वभूमीवर मला वाटते की राज्यात पुढीलप्रमाणे निकाल लागतील:

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 
एकूण जागा२६
भाजप२३
कॉंग्रेस३

प्रतिक्रिया

पैसा's picture

7 May 2014 - 11:34 pm | पैसा

अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण. गुजरातमधे कोणाला बोलण्यासारखे फार काही राहलेय असे आता वाटत नाही! ;)

विकास's picture

7 May 2014 - 11:43 pm | विकास

गुजरात मधे अंदाज काय आहेत हे माहीत असले तरी त्यासंदर्भाने केलेले बाकी सर्व माहितीपूर्ण विश्लेषण आवडले.

गुजरातबद्दल साधारण असेच अंदाज (भाजप-२३, कॉंग्रेस- ३) सर्वत्र दाखवले जात आहेत. माझ्यामते कदाचित भाजप एखादी जागा आणखी जिंकू (२४) शकेल. मात्र आपण दिलेला अंदाज योग्य वाटत आहे.
जवळपास सर्वच सर्व्हेमध्ये या निवडणुकीत भाजपला गुजरातपेक्षाही मोठे यश मध्य प्रदेश आणि कदाचित राजस्थानमध्येही मिळेल असे दाखवले जात आहे ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे.या निवडणुकीपुरत बोलायचं झाल्यास आपल्या राज्याचा माणूस पंतप्रधान होण्यासाठी कॉंग्रेसचे परंपरागत मतदारही चांगली प्रमाणात भाजपकडे वळतील अन्यथा गुजरातमध्ये कॉंग्रेस अगदीच मृतावस्थेत नाही हे स्पष्ट होते.

सुहास झेले's picture

8 May 2014 - 1:13 am | सुहास झेले

जबरी आकडेवारी आणि मोदींची भरारी बघता, २३-३ किंवा २४-२ हाच निकाल अपेक्षित आहेत. अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंयस. आवडले :)

श्रीगुरुजी's picture

8 May 2014 - 8:50 pm | श्रीगुरुजी

२५-१ किंवा २६-० असा निकाल सुद्धा लागू शकतो.

शिद's picture

8 May 2014 - 9:00 pm | शिद

२६-०

खुपच अवास्तव अपेक्षा नाही वाटत का तुम्हाला? *unknw*

बाकी क्लिंटन रावांचे विश्लेषण नेहमी प्रमाणेच मुद्देसुद आणि छान.

थॉर माणूस's picture

9 May 2014 - 9:12 am | थॉर माणूस

नशीब २७- -१ वगैरे नाही आलं.
भाजपा - २७२+ किंवा एनडीए - ४००+ वगैरे ऐकून झालंय.

अशा अवास्तव अपेक्षांमुळेच पुढे घोळ होतील की काय असं मधे एकदा वाटून गेलं होतं. (एकदा तर एका कार्यकर्त्याच्या वल्गना ऐकून खरंच यांना मत द्यावं का असा प्रश्न ही पडला होता. पण सध्या फारसे पर्यायही उपलब्ध नाहीत. :| )

श्रीगुरुजी's picture

16 May 2014 - 8:20 pm | श्रीगुरुजी

शेवटी गुजरात मध्ये भाजप २६-० आणि देशभरात भाजप २७२+ असाच निकाल लागला.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 May 2014 - 8:57 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. चाणक्य वाल्यांचा अंदाजही खरा झाला म्हणायचा.
गुजरात २६-० राजस्थानात तसेच, दिल्लीतही तसेच.

सौंदाळा's picture

9 May 2014 - 10:20 am | सौंदाळा

मस्तच सुरु आहे लेखमाला.
आता १६ तारखेच्या आत तुमचा संपुर्ण भारताबद्दलचा अंदाज वाचण्याची प्रचंड उत्सुकता आहे.