कृष्णलीला..

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जे न देखे रवी...
29 Aug 2013 - 1:38 pm

कुठे दोन-चार स्पीकर्स तर कुठे दहा फुटांच्या डॉल्बीच्या अजस्त्र भिंती..

कुठे पाच-दहा हजाराचं शुल्लक बक्षीस तर कुठे एक कोटीचं..

कुठे भगव्या टि-शर्टमधल्या कार्यकर्त्यांचा घोळका तर कुठे पांढर्‍या...

कुठे गोविंदा रे गोपाळा तर कुठे मच गया शोर सारी नगरी रे..

कुठे चार-पाच थरांचा तर कुठे विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्‍या नऊ-दहा थरांचा थरार..

कुठे हाता-पायावर निभावतं तर कुठे जिवाशी जातं..

कुठे मानाची तर कुठे जगातली सर्वात मोठी..

कुठे हिंदी तारे-तारका तर कुठे मराठी..

कुठे लावणीतलं या रावजी तर कुठे हिंदीतलं चिकनी चमेली..

उत्तराखंडमधली मोठ्ठी नैसर्गिक आपत्ती..पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी दाभोळकरांची हत्या..सीमेवर झालेली जवानांची क्रुर हत्या..रूपयाची आर्थिक हेळसांड..

हे सगळं विसरून २१ व्या शतकातला मॉर्डन कान्हा सज्ज झालाय कोट्यावधीचे लोणी खायला!

कदाचित हेच सगळं अपेक्षित असावं त्या सावळ्या घनःश्यामाला!!

वावरसंस्कृतीकलाधर्मसमाजजीवनमानराहणी

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

29 Aug 2013 - 1:42 pm | अग्निकोल्हा

सज्ज न होण अनपेक्षित कोणाला आहे ?

यशोधरा's picture

29 Aug 2013 - 1:50 pm | यशोधरा

ह्म्म..

अगदीच बुवा नास्तिक तुम्ही. देवाची पुजा तुमच्या डोळ्यांवर का येते?

सूड's picture

29 Aug 2013 - 1:58 pm | सूड

ती झाली काल मध्यरात्रीच!! आता दिवसभर फक्त धुडगूस आणि धिंगाणा. ;)

आज पुण्यात तारकानवमी आहे.

आतिवास's picture

29 Aug 2013 - 1:56 pm | आतिवास

आहे खरं हे असं :-(

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Aug 2013 - 4:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

द्येवा, सुरवात तर छानचं.
अश्याच अजुन कविता येऊ द्या :)

प्रचेतस's picture

29 Aug 2013 - 10:21 pm | प्रचेतस

सुरेख कविता रे.

बाकी हा दहीहंडी फोडणारा निरागस कान्हा खास तुमच्यासाठी द्येवा.

a

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 12:58 am | अग्निकोल्हा

केल्या गेल्या आह्या.

स्पंदना's picture

30 Aug 2013 - 6:27 am | स्पंदना

दोन महिन्यापासुनची तयारी त्यांची.
काय बोलाव काही कळत नाही खरच!