डोंबिवली कट्टा....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
8 May 2013 - 10:30 pm

प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो,

दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे.

नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे.

ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल.

प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.

ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे...

मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.

हे ठिकाणधोरणविचारप्रतिसादशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

आधी नुसते समाधान व्यक्त करत आहे.

किसन शिंदे's picture

8 May 2013 - 10:34 pm | किसन शिंदे

हम्म!

या मेल्या स्पावड्याने राजकारण केलंन..!!

मुक्त विहारि's picture

8 May 2013 - 10:44 pm | मुक्त विहारि

दोष माझा आहे...

मी खूप दिवसांनी सुट्टीवर येत आहे... माझ्या मनांत होते... मी स्पा जवळ फक्त विषय काढला..

ठि़काण, वेळ आणि दिवस ,,, हे सगळे मी ठरवले आहे..

दोष द्यायचाच असेल तर मला द्या...

किसन शिंदे's picture

8 May 2013 - 11:00 pm | किसन शिंदे

मी हे याचसाठी म्हणालो कारण, २५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं.

असो. कट्ट्याला शुभेच्छा!!

मुक्त विहारि's picture

8 May 2013 - 11:05 pm | मुक्त विहारि

आम्ही दोन्ही ठिकाणी येवू,,,

आहे काय आणि नाही काय...

उलट मला तर दोन्ही ठिकाणी यायला आवडेल..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 May 2013 - 12:22 am | विश्वनाथ मेहेंदळे

मध्यवर्ती मुंबईकरांनो.... कितीही कट्टे करा पण ठिकाण स्टेशनजवळ ठेवा. आम्हा खाचीकोपऱ्यातल्या मुंबईकरांची सोय बघा, अशी नम्र विनंती आहे.

सूड's picture

9 May 2013 - 12:36 am | सूड

ठाणे मध्यवर्ती मुंबैत येतं अशी मध्यंतरी ज्ञानात भर पडली होती, आता डोंबिवली पण यायला लागलं का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 May 2013 - 12:42 am | विश्वनाथ मेहेंदळे

ते वाक्य "....२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं..." या वाक्यावर लिहिले आहे.

आणि सूड, शब्द जपून वापर... ठाणे मध्यवर्ती मुंबैत येत नाही, ठाणे हेच मध्यवर्ती मुंबै आहे.

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 12:38 am | मुक्त विहारि

रात्री राहायची सोय करायचा प्रयत्न केला जाईल.

महिलांसाठी सोय केली आहे.

पुरुषांसाठी पण केल्या जाईल.

स्पा's picture

9 May 2013 - 10:00 am | स्पा

या मेल्या स्पावड्याने राजकारण केलंन..!!

मा/श्री किसनजी शिंदे साहेबांना माझ्या (न) केलेल्या राजकारणामुळे जो त्रास झाला, याबाबत त्यांची मी जाहीर क्षमा मागतो, ते मोठ्या अंत:करणाने मला क्षमा करतीलच,यात शंकाच नाही .

५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं.

यावरून तरी किसनजीना कल्पना यायला हवी होती कि, मुंबईच्या मध्यवर्ती भागात एवढा महाकट्टा आयोजित केलेला असताना म्या पामर डोंबिवली सारख्या खेड्यात कट्टा करण्याचा विचार तरी करू धजेन काय हॅ हॅ.. असो

मुवि काका येथे येणार असून त्यांना मिपाकरांना भेटायची प्रचंड इच्छा आहे, त्यातूनच त्यांनी कट्ट्याचा प्रस्ताव मांडला.
त्यांना मी ह्या प्रकारची पूर्ण कल्पना दिली कि म्हटलं अहो. डोंबिवली ठाण्यापासून तब्बल १७ किमी एवढ्या प्रचंड अंतरावर आहे, आणि मुंबईपासून तर अतिभयंकर ४८ किमी.
कोणी येथे येणं कसं शक्य आहे? तुम्ही सरळ इथल्याच मेम्ब्रांना व्यनी करा , विषय संपवा.
पण त्यांच्या उत्सुकतेने घात केला :D

असो .. किसनजी शिंदे साहेबांची मी परत माफी मागतो. यापुढे त्यांना असा पत्रास होणार नाही, सदर घोषणेतून आमचे नाव वगळलेले आहे,सबब आम्हास कुठलाही व्यनी,करू नये

मुवि काका , आपण भेटूच :)

अवांतर : यापुढे उत्तर ,दक्षिण, पूर्व , पश्चिम, आग्नेय, वायव्य अशा मुंबईच्या दश दिशा , आणि मध्य (ठाणे) येथे आयोजित होणार्या सर्व कट्ट्याना आमच्या अनंत शुभेच्छा

- खेडवळ स्पा

प्रचेतस's picture

9 May 2013 - 10:08 am | प्रचेतस

हम्म्म.

बाकी आमच्या पुण्याचे कट्टे असे गाजावाजा करून ठरवत नसल्याने अशी ऐनवेळी तोंडघशी पडायची वेळ येत नाही.

स्पा's picture

9 May 2013 - 10:10 am | स्पा

चालायचंच , मुवि काकांना आला असेल आता अनुभव
परत अशी चूक नाही करणार ते

पैसा's picture

9 May 2013 - 10:11 am | पैसा

काड्या टाकतो आहेस! तुम्ही लोक सुधारायचे म्हणून नाही!

प्रचेतस's picture

9 May 2013 - 10:12 am | प्रचेतस

काड्या???
नाय ब्वा.
सत्य ते सांगितलं. बाकी सत्य हे कटू असतं. ;)

पैसा's picture

9 May 2013 - 10:14 am | पैसा

सत्य सांगितल्यावर मीठ मिरच्यांचा मार खावा लागतो बरेचदा.

प्रचेतस's picture

9 May 2013 - 10:20 am | प्रचेतस

=)) =)) =))

होना, इतके सुमडीत होतात की पुण्यातल्या लोकांनाही कळत नैत! :P

प्रचेतस's picture

9 May 2013 - 11:31 am | प्रचेतस

अगदी अगदी. :)

वल्ल्या तू "पुणेकर" आहेस..?

अरे तिकडं कर्जतच्या पुढे जसं मुंबै तस इकडं लोणावळ्याच्या पुढे पुणं.

---
कट्टर चिंचवडकर (वल्ली)

गुड. मग आता तुमचा पुढचा कट्टा भोसरी / उंद्री एमआयडीसी मध्ये का..? :D

अत्रन्गि पाउस's picture

9 May 2013 - 5:21 pm | अत्रन्गि पाउस

हा शब्द प्रयोग करतान्ना जपून्...शिवि वाट्ते...:)))))

अत्रन्गि पाउस's picture

9 May 2013 - 5:30 pm | अत्रन्गि पाउस

हा शब्द प्रयोग करतान्ना जपून्...शिवि वाट्ते...:)))))

चाणक्य's picture

10 May 2013 - 12:00 pm | चाणक्य

उंड्री लई लांब आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 May 2013 - 1:25 am | विश्वनाथ मेहेंदळे

ओके हं बाळ, तुला बक्षीस देऊ हं आपण. तोंडघशी न पडण्याची इतकी मोठी achievement केल्याबद्दल.

(तिऱ्हाईतांच्या कृतींनुसार आपल्या आयुष्यातले निर्णय न बदलणारा) विमे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 May 2013 - 1:19 am | विश्वनाथ मेहेंदळे

मा श्री किसनचन्द्र साहेब (मिपाचे तरुण सळसळते आणि धमन्या फोडून ओसंडून वाहू पाहणारे रक्त इ इ ),

राजकारण वगैरे असे घाणेरडे आरोप जाहीरपणे करण्यापूर्वी फोन उचलून एकदा बोलायची तसदी घेतली असतीत तर बरे झाले असते. कट्टा आहे की सरकारनामाची स्क्रिप्ट ??

२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय

चाय से ज्यादा केटली गरम ???

सूड's picture

10 May 2013 - 7:51 am | सूड

बोलले असतील हो !! काय येवढं मनाला लावून घ्यायचं. आणि समजा बोललाच असेल मुद्दाम, पण आपण राजकारण केलेलं नाही तर मग असल्या प्रतिसादांकडे लक्ष का दया? लोक काय सतरा तोंडांनी बोलणार.*

*मला माहितीये असले समजुतदारपणाचे प्रतिसाद शोभत नाहीत माझ्याकडून तरी जे वाटलं ते लिहिलं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 May 2013 - 10:47 am | विश्वनाथ मेहेंदळे

थट्टे ने बोलले असतील हो !! काय येवढं मनाला लावून घ्यायचं.

ठीक आहे, तू म्हणतोस तशी शक्यता आहे. मला थट्टेचा सूर कळला नसेल नीट.

आणि समजा बोललाच असेल मुद्दाम, पण आपण राजकारण केलेलं नाही तर मग असल्या प्रतिसादांकडे लक्ष का दया? लोक काय सतरा तोंडांनी बोलणार.*

असा पण तो आरोप माझ्यावर नव्हता रे. नाहीतर इतकेच बोलून थांबलो असतो का ?

मला माहितीये असले समजुतदारपणाचे प्रतिसाद शोभत नाहीत माझ्याकडून तरी जे वाटलं ते लिहिलं.

काय दिवस आलेत बघ रे ;-) पुण्याला जाऊन भलताच सुधारालास म्हणायचे.

आजचा सुविचार :- यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वमविवेकीता । एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।।

सूड's picture

10 May 2013 - 2:11 pm | सूड

>>यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वमविवेकीता । एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।।
याचा अर्थ पण सांगा आमच्यासारख्या संस्कृत कळत नसणार्‍यांसाठी. ;)

अग्निकोल्हा's picture

10 May 2013 - 2:13 pm | अग्निकोल्हा

असा पण तो आरोप माझ्यावर नव्हता रे. नाहीतर इतकेच बोलून थांबलो असतो का ?

चाय से ज्यादा केटली गरम ???

कवितानागेश's picture

8 May 2013 - 10:43 pm | कवितानागेश

कोण स्पा?
धन्यवाद.

अग्निकोल्हा's picture

8 May 2013 - 10:53 pm | अग्निकोल्हा

कोण म्हणतं येणार नाही... कट्याला आल्याशिवाय रहावणार नाही!

किसन शिंदे's picture

8 May 2013 - 10:56 pm | किसन शिंदे

:) फोर्टचा कट्टा आठवतो का हो??

असो, माझा वरील प्रतिसाद कृपया वैयक्तिक मानु नये. कारण मी त्यातुन फक्त सर्वसामान्य मिपाकरांच्या मनातील भावनांना शब्दरुप द्यायचा प्रयत्न माझ्या अल्पमतिनुसार केला आहे. चुभुद्याघ्या.

किलमाऊस्की's picture

8 May 2013 - 10:56 pm | किलमाऊस्की

सध्या समाधान व्यक्त करत आहे.

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 1:28 am | मुक्त विहारि

तुम्ही आलात की, परत कट्टा करू.

निवेदिता-ताई's picture

9 May 2013 - 9:27 am | निवेदिता-ताई

:) कट्ट्याला शुभेच्छा.!!!

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2013 - 10:58 pm | श्रीरंग_जोशी

मुविंचा बहुधा पहिलाच कट्टा असावा.

आयोजनाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा!!

मजा करा, ऐश करा, हा कट्टा आता तुमचा झाला :-).

मुक्त विहारि's picture

8 May 2013 - 11:09 pm | मुक्त विहारि

आणि मी तर ह्या वेळी जमल्यास (इंतर व्ह्यू आणि त्या अनुषंगाने येणारी इतर झंझटे नसतील तर) सगळ्या कट्ट्यांना हजेरी लावणार..

बायको गेली तेल लावत..

लेखनविषय अन लेखनप्रकारावरून कट्ट्याच्य विस्तृत व्याप्तीची कल्पना आली ! a

सूड's picture

8 May 2013 - 11:22 pm | सूड

शुभेच्छा!! आम्हाला अटेंड करता येणार नाहीत असे कट्टे करायचं सगळ्या मुंबैकरांनी/ ठाणेकरांनी ठरवलंच असेल तर काय करणार. :)

मुक्त विहारि's picture

8 May 2013 - 11:53 pm | मुक्त विहारि

व्य.नी केला आहे..

विनोद१८'s picture

9 May 2013 - 12:00 am | विनोद१८

या कट्ट्याचे स्वागत करतो.

येवा मिपाकरान्नो डोम्बिवली आपलीच असा.

विनोद१८

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 May 2013 - 12:19 am | विश्वनाथ मेहेंदळे

लागोपाठ दोन दिवस दोन कट्टे करण्याऐवजी एकच करूया.

सुहास झेले's picture

9 May 2013 - 12:38 am | सुहास झेले

ह्येच बोलतो... :) :)

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 12:50 am | मुक्त विहारि

एकत्र येणे मह्त्वाचे आहे. ठिकाण मह्त्वाचे नाही.

मेनु देखिल महत्त्वाचा असतो.

कुंदन's picture

9 May 2013 - 12:38 am | कुंदन

आहे कुठे ह्यो नंदी पॅलेस?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 May 2013 - 12:54 am | विश्वनाथ मेहेंदळे

करामा आणि बुर्ज-अल-अरब यांच्या बरोब्बर मध्ये.

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 12:58 am | मुक्त विहारि

वि.मे., अजून खूण राहीली..

शारजाच्या डोंगरावरून दिसते हे हॉटेल..

सूड's picture

9 May 2013 - 1:03 am | सूड

येवढं लांब कशाला जायचं, इथून पर्वतीवरुन बघाय्चं. असं काहीही नाही जे पर्वतीवरुन दिसत नाही. ;)

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 1:10 am | मुक्त विहारि

ह्या पुण्याच्या पाण्याचा, हवेचा आणि वातावरणाचा गुण मात्र जोरदार हं....

पुणं तेथे काय उणं

ही म्हण काय उगाच नाही पडली.

@ सूड.. हलकेच घ्या..

जे दिसत नाहे अस्तित्वातच नसतं.

गवि's picture

9 May 2013 - 11:33 am | गवि

जबरदस्त..

त्यातही उजव्या अर्धभागाचं दृश्य पाहणार्‍यांना डावीकडचं अस्तित्वात नसतं..

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 12:56 am | मुक्त विहारि

पण हॉटेल एकत्र भॅटायला एकदम मस्त आहे.

डोंबिवली , एम.आय.डी.सी. मध्ये आहे.

डोंबिवली एम.आय.डी.सी. मध्ये..??? :-))

प्रभाकर पेठकर's picture

9 May 2013 - 2:54 am | प्रभाकर पेठकर

मला जमणार नसते तेंव्हाच ठरवून कट्टे करा.

मी कट्टा करेन तेंव्हा कोण्णालाच बोलावणार नाही.

ढालगज भवानी's picture

9 May 2013 - 5:50 am | ढालगज भवानी

हाहा सगळ्यांना कट्टाप करुन,कट्टी घेऊन केलेला एकट्याचा कट्टर कट्टा.

अभ्या..'s picture

9 May 2013 - 11:07 am | अभ्या..

श्री. पेठकर काकांच्या कट्ट्याला शुभेच्छा.
पण स्पावड्या तू तर परवा ठिकाण न प्रोग्राम कुठले वेगळेच सांगत होतास की रे. हे मुक्तविहारींचे वेगळे आहे का काही? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2013 - 6:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कट्ट्याला शुभेच्छा. चर्चा/ प्रतिसाद कमी आणि कट्टा संखेनं जबरदस्त होऊ द्या. ;)
फोटू, जेवणावळी, कोण कोठून आला ( आणि का आला ?;) सदस्याचं नमोगत. वगैरे. काही खासगी पण कट्ट्यावर झालेल्या जाहीर चर्चा, मिपाकरांची व्यवस्थित ओळख, फोटोखाली व्यवस्थित माहिती आणि सर्वार्थाने टापटीप धागा धागा काढण्यासाठीही मनःपूर्वक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2013 - 7:08 am | अत्रुप्त आत्मा

कोणत्याही तारखेस आणी कुठेही होणाय्रा कट्ट्यास विणम्र शुभेच्छा! :-)
तसेच कट्टा होउन वृत्तांत आल्यास हार्दिक हबिनंदण! ;-)

चौकटराजा's picture

9 May 2013 - 7:30 am | चौकटराजा

डोंबिवलीच्या जावयाना वर्गणीत काही कन्सेशन आहे का .... ?
एक चिकट मा. पुणेकर जावई - चौ रा.

यशोधरा's picture

9 May 2013 - 7:34 am | यशोधरा

कट्ट्याला शुभेच्छा.

कट्ट्यास शुभेच्छा आणि लाईव्ह अपडेट्सच्या प्रति़क्षेत.

पैसा's picture

9 May 2013 - 9:17 am | पैसा

कट्ट्याला शुभेच्छा!

अमोल केळकर's picture

9 May 2013 - 10:59 am | अमोल केळकर

कट्ट्यासाठी शुभेच्छा

अमोल केळकर

किणकिनाट's picture

9 May 2013 - 11:19 am | किणकिनाट

कट्ट्यासाठी शुभेच्छा.

सहभागी होण्यास नक्की आवडेल. जमवायचा प्रयत्न करेन.

नि३सोलपुरकर's picture

9 May 2013 - 11:27 am | नि३सोलपुरकर

कट्ट्यास मनःपूर्वक शुभेच्छा
आणि वृत्तांताच्या प्रति़क्षेत.

रामदास's picture

9 May 2013 - 11:28 am | रामदास

जमल्यास रस घेउन तिकडेच येतो. पुर्‍यांचं काय ते बघा.

कुंदन's picture

9 May 2013 - 11:33 am | कुंदन

पुर्‍या तात्या आणेल चर्चगेट हुन.

jaypal's picture

9 May 2013 - 11:36 am | jaypal

विनोद बुध्दी अजुनही राखुन आहात. ;-)

श्रीरंग_जोशी's picture

9 May 2013 - 7:34 pm | श्रीरंग_जोशी

या नियमाने मीठ दांडीवरून आणायला हवे.
पण राहूद्या, गांधींचं गुजरात राहिलं नाही आता ;-).

कवितानागेश's picture

10 May 2013 - 11:48 am | कवितानागेश

आमरसाचा बेत असेल तर मी स्पासाठी हे घेउन येते! :)

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2013 - 1:48 pm | अत्रुप्त आत्मा

@मी स्पासाठी हे घेउन येते! smiley>>> =)) काय हे??? =))

सूड's picture

10 May 2013 - 2:09 pm | सूड

काय हे !! =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 May 2013 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार

किती उन्हाळा आहे. त्यात हे म्हणजे... उकडुन जीव जाईल बिचार्‍याचा.
त्या पेक्षा काहीच नसलेले बरे. म्हणजे मोकळे पणे चापता येईल आमरस.

रामदास's picture

9 May 2013 - 11:37 am | रामदास

दुबईततून पुनश्च डॉलरांची थप्पी पाठवलेली दिसते आहे.

jaypal's picture

9 May 2013 - 11:51 am | jaypal

arab

कुंदन's picture

10 May 2013 - 2:03 am | कुंदन

त्यात्या , रामदास , जयपाल अन नाना हे एकाच व्यक्तीचे विविध आय डी आहेत का?

प्यारे१'s picture

10 May 2013 - 3:46 am | प्यारे१

हा हा हा हा हा हा... ख प लो!

(रामदास काका नानाच्या हाताने बुल्गानिन दाढी कोरताना तात्याच्या स्टाईलमध्ये गातात नि दुसर्‍या हाताने जयपाल आरशातली स्वप्रतिमा बघत फोटो काढतात. हुश्श्श... जमलं ब्वा एकदाचं. ;) )

महेश नामजोशि's picture

9 May 2013 - 12:02 pm | महेश नामजोशि

कल्पना अतिशय चांगली आहे. मी डोंबिवलीचाच असल्यामुळे बहुतांशी येईन. जी काही वर्गणी वगैरे असेल ती आल्यावर देईन. मी या ग्रुपवर नवीनच आहे. त्यामुळे कुणालाही ओळखत नाहि. हरकत नाहि. नवीन ओळख होइल. गप्पा होतिल.
कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा.
महेश नामजोशी

वर्गणीबिर्गणी काही नाही हो.. मा.श्री. स्पा हे सन्माननीय सदस्य "दरियादिल" अशा स्वभावाचे आहेत..

स्पा's picture

9 May 2013 - 12:19 pm | स्पा

कोण स्पा ?

-धन्यवाद

-- लीस्पाऊजेट

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 May 2013 - 1:19 pm | घाशीराम कोतवाल १.२

दरियादिल
चुकुन भलतच वाचल होत
बाकी आमच्या स्पांडुरंगाची दिल दरिया आणि जेब समंदर आहे हो

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 May 2013 - 10:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे

दिल दरिया आणि जेब समंदर

मी वेगळी म्हण ऐकली होती…

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 12:41 pm | मुक्त विहारि

नक्की या...

अनन्न्या's picture

9 May 2013 - 12:17 pm | अनन्न्या

आमरस रत्नागिरी हापूस विकत घेऊन त्याचाच करा हो! तेवढेच आम्ही तेथे आल्यासारखे होईल!!

प्रचेतस's picture

9 May 2013 - 12:22 pm | प्रचेतस

वर्गणी वाढेल हो मग. ;)

सूड's picture

9 May 2013 - 1:01 pm | सूड

त्या हापूस पाठवणार असतील रत्नांग्रीहून वर्गणी म्हणून !!

नन्दादीप's picture

9 May 2013 - 12:58 pm | नन्दादीप

रत्नागिरी पेक्षा देवगड बरा असे मत नोंदवतो....
(मूळ देवगड आणि सद्ध्या रत्नागिरी येथे असल्याने दोन्ही मधला फरक (हापूस) उत्तम रित्या माहिती आहे)