मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोंबिवली कट्टा....

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो, दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे. नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे. ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल. प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे... मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.

वाचने 19274 वाचनखूण प्रतिक्रिया 117

In reply to by किसन शिंदे

मुक्त विहारि Wed, 05/08/2013 - 22:44
दोष माझा आहे... मी खूप दिवसांनी सुट्टीवर येत आहे... माझ्या मनांत होते... मी स्पा जवळ फक्त विषय काढला.. ठि़काण, वेळ आणि दिवस ,,, हे सगळे मी ठरवले आहे.. दोष द्यायचाच असेल तर मला द्या...

In reply to by मुक्त विहारि

किसन शिंदे Wed, 05/08/2013 - 23:00
मी हे याचसाठी म्हणालो कारण, २५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं. असो. कट्ट्याला शुभेच्छा!!

In reply to by किसन शिंदे

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 05/09/2013 - 00:22
मध्यवर्ती मुंबईकरांनो.... कितीही कट्टे करा पण ठिकाण स्टेशनजवळ ठेवा. आम्हा खाचीकोपऱ्यातल्या मुंबईकरांची सोय बघा, अशी नम्र विनंती आहे.

In reply to by सूड

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 05/09/2013 - 00:42
ते वाक्य "....२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं..." या वाक्यावर लिहिले आहे. आणि सूड, शब्द जपून वापर... ठाणे मध्यवर्ती मुंबैत येत नाही, ठाणे हेच मध्यवर्ती मुंबै आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मुक्त विहारि गुरुवार, 05/09/2013 - 00:38
रात्री राहायची सोय करायचा प्रयत्न केला जाईल. महिलांसाठी सोय केली आहे. पुरुषांसाठी पण केल्या जाईल.

In reply to by किसन शिंदे

स्पा गुरुवार, 05/09/2013 - 10:00
या मेल्या स्पावड्याने राजकारण केलंन..!!
मा/श्री किसनजी शिंदे साहेबांना माझ्या (न) केलेल्या राजकारणामुळे जो त्रास झाला, याबाबत त्यांची मी जाहीर क्षमा मागतो, ते मोठ्या अंत:करणाने मला क्षमा करतीलच,यात शंकाच नाही .
५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं.
यावरून तरी किसनजीना कल्पना यायला हवी होती कि, मुंबईच्या मध्यवर्ती भागात एवढा महाकट्टा आयोजित केलेला असताना म्या पामर डोंबिवली सारख्या खेड्यात कट्टा करण्याचा विचार तरी करू धजेन काय हॅ हॅ.. असो मुवि काका येथे येणार असून त्यांना मिपाकरांना भेटायची प्रचंड इच्छा आहे, त्यातूनच त्यांनी कट्ट्याचा प्रस्ताव मांडला. त्यांना मी ह्या प्रकारची पूर्ण कल्पना दिली कि म्हटलं अहो. डोंबिवली ठाण्यापासून तब्बल १७ किमी एवढ्या प्रचंड अंतरावर आहे, आणि मुंबईपासून तर अतिभयंकर ४८ किमी. कोणी येथे येणं कसं शक्य आहे? तुम्ही सरळ इथल्याच मेम्ब्रांना व्यनी करा , विषय संपवा. पण त्यांच्या उत्सुकतेने घात केला :D असो .. किसनजी शिंदे साहेबांची मी परत माफी मागतो. यापुढे त्यांना असा पत्रास होणार नाही, सदर घोषणेतून आमचे नाव वगळलेले आहे,सबब आम्हास कुठलाही व्यनी,करू नये मुवि काका , आपण भेटूच :) अवांतर : यापुढे उत्तर ,दक्षिण, पूर्व , पश्चिम, आग्नेय, वायव्य अशा मुंबईच्या दश दिशा , आणि मध्य (ठाणे) येथे आयोजित होणार्या सर्व कट्ट्याना आमच्या अनंत शुभेच्छा - खेडवळ स्पा

In reply to by स्पा

प्रचेतस गुरुवार, 05/09/2013 - 10:08
हम्म्म. बाकी आमच्या पुण्याचे कट्टे असे गाजावाजा करून ठरवत नसल्याने अशी ऐनवेळी तोंडघशी पडायची वेळ येत नाही.

In reply to by प्रचेतस

पैसा गुरुवार, 05/09/2013 - 10:14
सत्य सांगितल्यावर मीठ मिरच्यांचा मार खावा लागतो बरेचदा.

In reply to by मोदक

प्रचेतस गुरुवार, 05/09/2013 - 12:58
अरे तिकडं कर्जतच्या पुढे जसं मुंबै तस इकडं लोणावळ्याच्या पुढे पुणं. --- कट्टर चिंचवडकर (वल्ली)

In reply to by प्रचेतस

ओके हं बाळ, तुला बक्षीस देऊ हं आपण. तोंडघशी न पडण्याची इतकी मोठी achievement केल्याबद्दल. (तिऱ्हाईतांच्या कृतींनुसार आपल्या आयुष्यातले निर्णय न बदलणारा) विमे

In reply to by किसन शिंदे

मा श्री किसनचन्द्र साहेब (मिपाचे तरुण सळसळते आणि धमन्या फोडून ओसंडून वाहू पाहणारे रक्त इ इ ), राजकारण वगैरे असे घाणेरडे आरोप जाहीरपणे करण्यापूर्वी फोन उचलून एकदा बोलायची तसदी घेतली असतीत तर बरे झाले असते. कट्टा आहे की सरकारनामाची स्क्रिप्ट ??
२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय
चाय से ज्यादा केटली गरम ???

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सूड Fri, 05/10/2013 - 07:51
बोलले असतील हो !! काय येवढं मनाला लावून घ्यायचं. आणि समजा बोललाच असेल मुद्दाम, पण आपण राजकारण केलेलं नाही तर मग असल्या प्रतिसादांकडे लक्ष का दया? लोक काय सतरा तोंडांनी बोलणार.* *मला माहितीये असले समजुतदारपणाचे प्रतिसाद शोभत नाहीत माझ्याकडून तरी जे वाटलं ते लिहिलं.

In reply to by सूड

थट्टे ने बोलले असतील हो !! काय येवढं मनाला लावून घ्यायचं.
ठीक आहे, तू म्हणतोस तशी शक्यता आहे. मला थट्टेचा सूर कळला नसेल नीट.
आणि समजा बोललाच असेल मुद्दाम, पण आपण राजकारण केलेलं नाही तर मग असल्या प्रतिसादांकडे लक्ष का दया? लोक काय सतरा तोंडांनी बोलणार.*
असा पण तो आरोप माझ्यावर नव्हता रे. नाहीतर इतकेच बोलून थांबलो असतो का ?
मला माहितीये असले समजुतदारपणाचे प्रतिसाद शोभत नाहीत माझ्याकडून तरी जे वाटलं ते लिहिलं.
काय दिवस आलेत बघ रे ;-) पुण्याला जाऊन भलताच सुधारालास म्हणायचे. आजचा सुविचार :- यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वमविवेकीता । एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।।

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सूड Fri, 05/10/2013 - 14:11
>>यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वमविवेकीता । एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।। याचा अर्थ पण सांगा आमच्यासारख्या संस्कृत कळत नसणार्‍यांसाठी. ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अग्निकोल्हा Fri, 05/10/2013 - 14:13
असा पण तो आरोप माझ्यावर नव्हता रे. नाहीतर इतकेच बोलून थांबलो असतो का ?
चाय से ज्यादा केटली गरम ???

In reply to by किसन शिंदे

अग्निकोल्हा Wed, 05/08/2013 - 23:27
असो, माझा वरील प्रतिसाद कृपया वैयक्तिक मानु नये. कारण मी त्यातुन फक्त सर्वसामान्य मिपाकरांच्या मनातील भावनांना शब्दरुप द्यायचा प्रयत्न माझ्या अल्पमतिनुसार केला आहे. चुभुद्याघ्या.

In reply to by श्रीरंग_जोशी

मुक्त विहारि Wed, 05/08/2013 - 23:09
आणि मी तर ह्या वेळी जमल्यास (इंतर व्ह्यू आणि त्या अनुषंगाने येणारी इतर झंझटे नसतील तर) सगळ्या कट्ट्यांना हजेरी लावणार.. बायको गेली तेल लावत..

सूड Wed, 05/08/2013 - 23:22
शुभेच्छा!! आम्हाला अटेंड करता येणार नाहीत असे कट्टे करायचं सगळ्या मुंबैकरांनी/ ठाणेकरांनी ठरवलंच असेल तर काय करणार. :)

In reply to by मुक्त विहारि

सूड गुरुवार, 05/09/2013 - 01:03
येवढं लांब कशाला जायचं, इथून पर्वतीवरुन बघाय्चं. असं काहीही नाही जे पर्वतीवरुन दिसत नाही. ;)

In reply to by सूड

मुक्त विहारि गुरुवार, 05/09/2013 - 01:10
ह्या पुण्याच्या पाण्याचा, हवेचा आणि वातावरणाचा गुण मात्र जोरदार हं.... पुणं तेथे काय उणं ही म्हण काय उगाच नाही पडली. @ सूड.. हलकेच घ्या..

In reply to by ढालगज भवानी

अभ्या.. गुरुवार, 05/09/2013 - 11:07
श्री. पेठकर काकांच्या कट्ट्याला शुभेच्छा. पण स्पावड्या तू तर परवा ठिकाण न प्रोग्राम कुठले वेगळेच सांगत होतास की रे. हे मुक्तविहारींचे वेगळे आहे का काही? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/09/2013 - 06:49
कट्ट्याला शुभेच्छा. चर्चा/ प्रतिसाद कमी आणि कट्टा संखेनं जबरदस्त होऊ द्या. ;) फोटू, जेवणावळी, कोण कोठून आला ( आणि का आला ?;) सदस्याचं नमोगत. वगैरे. काही खासगी पण कट्ट्यावर झालेल्या जाहीर चर्चा, मिपाकरांची व्यवस्थित ओळख, फोटोखाली व्यवस्थित माहिती आणि सर्वार्थाने टापटीप धागा धागा काढण्यासाठीही मनःपूर्वक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/09/2013 - 07:08
कोणत्याही तारखेस आणी कुठेही होणाय्रा कट्ट्यास विणम्र शुभेच्छा! :-) तसेच कट्टा होउन वृत्तांत आल्यास हार्दिक हबिनंदण! ;-)

चौकटराजा गुरुवार, 05/09/2013 - 07:30
डोंबिवलीच्या जावयाना वर्गणीत काही कन्सेशन आहे का .... ? एक चिकट मा. पुणेकर जावई - चौ रा.

In reply to by कवितानागेश

किती उन्हाळा आहे. त्यात हे म्हणजे... उकडुन जीव जाईल बिचार्‍याचा. त्या पेक्षा काहीच नसलेले बरे. म्हणजे मोकळे पणे चापता येईल आमरस.

In reply to by कुंदन

प्यारे१ Fri, 05/10/2013 - 03:46
हा हा हा हा हा हा... ख प लो! (रामदास काका नानाच्या हाताने बुल्गानिन दाढी कोरताना तात्याच्या स्टाईलमध्ये गातात नि दुसर्‍या हाताने जयपाल आरशातली स्वप्रतिमा बघत फोटो काढतात. हुश्श्श... जमलं ब्वा एकदाचं. ;) )

महेश नामजोशि गुरुवार, 05/09/2013 - 12:02
कल्पना अतिशय चांगली आहे. मी डोंबिवलीचाच असल्यामुळे बहुतांशी येईन. जी काही वर्गणी वगैरे असेल ती आल्यावर देईन. मी या ग्रुपवर नवीनच आहे. त्यामुळे कुणालाही ओळखत नाहि. हरकत नाहि. नवीन ओळख होइल. गप्पा होतिल. कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा. महेश नामजोशी

In reply to by महेश नामजोशि

गवि गुरुवार, 05/09/2013 - 12:06
वर्गणीबिर्गणी काही नाही हो.. मा.श्री. स्पा हे सन्माननीय सदस्य "दरियादिल" अशा स्वभावाचे आहेत..

नन्दादीप गुरुवार, 05/09/2013 - 12:58
रत्नागिरी पेक्षा देवगड बरा असे मत नोंदवतो.... (मूळ देवगड आणि सद्ध्या रत्नागिरी येथे असल्याने दोन्ही मधला फरक (हापूस) उत्तम रित्या माहिती आहे)