चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
7 Nov 2012 - 7:17 pm

“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत.

“ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या.

“अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

“कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या.

“मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत .

“काय? आज चक्क मटा ? अहो, संध्यानंद बंद होईल की हो अशाने? खी. खी.. खी… ”, इति नारुतात्या.

“डोम्बल तुमचं नारुतात्या, अहो एवढा सिरीयस विषय आणि तुम्ही दात काय काढताय?”, घारुअण्णा तणतणत.

“बरं…बरं! त्यांना म्हणावे जळजळ पोहोचली बरं का, घारुअण्णा”, इति शामराव बारामतीकर.

“अहो बारामतीकर, तुमच्या साहेबांचा ह्यात हात आहे. एवढा मोठा सामाजिक प्रश्न आणि तरीही तुम्ही साहेबांचीच बाजू कशी काय घेऊ शकता हो, ऑ? ”, घारुअण्णा अजून घुश्श्यात, “एवढा शेतीचा जाणकार माणूस पण त्यानेच सर्व कॄषीक्षेत्राची वाताहत करावी यासारखे दुर्दैव नाही ह्या देशाचे. आता नसती अवदसा सुचली आणि दारूचे परवाने देत सुटले आहेत तुमचे साहेब.”

“अहो, ह्यात नेमका मुद्दा काय ते कळेल का? म्हणजे जर हे सत्तास्थान नागपुरात असते आणि एका ड्रायव्हरला एका कंपनीचा डिरेक्टर बनवून त्याला परवाने दिले तर आपला महाराष्ट्र, मद्यराष्ट्र बनता इथे रामराज्य अवतरले असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?”, बारामतीकर बरेचसे उपरोधाने आणि किंचित रागाने.

“अहो पण साहेबांचा ह्यात ‘हात’ कसा काय असेल? त्यांनी तर हातातला ’हात’ हळूच काढून त्यावर घड्याळ चढवले ना? खी. खी.. खी…”, नारुतात्या तेवढ्यातही आपली विनोदबुद्धी पाजळत.

“गपा हो नारुतात्या! अहो बारामतीकर, दारूने समाजाचे नुकसान होते, समाजविघातक आहे ही दारू आणि तिचा असा उदोउदो केला जावे जे काही पटत नाही!”, चिंतोपंत नागपूर विनाकारण चर्चेत आल्याने कळवळून जात.

“हा! असे म्हणा की मग काहीतरी मुद्दा घेउन, उगाच राजकीय चिखलफेक करण्यात काय आहे?”, इति बारामतीकर.

“बरं बुवा! दारूने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, होत आहेत आणि होत राहतीलच, त्यामुळे दारू समाजविघातक आहे ह्यावर काय म्हणणे आहे तुमचे? ”, नारुतात्या सिरीयस होत.

“अहो नारुतात्या, कुठल्याही गोष्टीला तारतम्य असावे लागते की नाही, दारूचेही तसेच आहे, तारतम्य न पाळता दारू ढोसल्यास विनाश हा होणारच. पण त्यामुळे दारूवर सरसकट बंदी घालणे जरा आततायीपणाचे आणि मूर्खपणाचे लक्षण आहे, ह्यावर काय काय म्हणणे आहे तुमचे?”, बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका चर्चेत सामील होत.

“भले शाबास! बहुजनह्रदयसम्राट, देशात जनतेला खायला अन्न नाहीयेय! त्यामुळे त्यांच्या दोन वेळेच्या अन्नाची सोय बघायची की दारुचा महापूर आणायचा? गरज कशाची आहे?”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत.

“अहो तसे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत देशात, नव्हे एकंदरीतच जगात, म्हणून काय बाकीचे सगळे सोडून द्यायचे का?”, भुजबळकाका शांतपणे.

“हे बघा बहुजनह्रदयसम्राट, वाईनर्‍या बांधुन कितपत समाजकल्याण साधले जाणार आहे ?”, चिंतोपंत जरा तडकून.

“गरीबाला भाकर तुकडा,शेतकर्‍याच्या मालाला रास्त भाव, समाजकल्याण हे सर्व मुद्दे बरोबर आहेत पण त्यांचा दारु बनविणे आणि न बनविणे किंवा त्यासाठी परवाने देणे ह्याच्याशी थेट संबंध जोडणे म्हणजे जरा भावनिक किंवा सेन्टीमेन्टल होते आहे, व्यावहारिक नाही. व्यावहारिक पाताळीवरुनही विचार करून बघा जरा!”, भुजबळकाका ठामपणे .

“वा रे व्यावहारिक, अहो संस्कृति नावाचा काही प्रकार आहे की नाही? आपल्या हिंदू संस्कृतीत हे बसते का?”, घारुअण्णा चिडून.

“कोणत्या संस्कृतीच्या गप्पा सांगता आहात तुम्ही घारुअण्णा? रामायण आणि महाभारतातही दारू प्राशन केल्याचे दाखले आहेत, तेही एक प्रथा म्हणून प्राशन केल्याचे.”, भुजबळकाका हिरीरेने, “आणि बहुजनांच्या संस्कृतीचा तर तो आजही भाग आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये दारूचे स्थान मानाचे आहे.”

“अरें देवा! विश्वेश्वरा बघ रे बाबा तुच आता. धर्मच बुडवायाचा प्रयत्न आहे हा, म्हणून तर घोर कलियुग आले आहे असे म्हणत होतो मी, ते काही खोटे नाही!”, घारुअण्णा हताश होत .

“डोंबलाचे कलीयुग! अहो लोकांनी, दारु कशी पिउ नये व कशी प्यावी, हे समजावून घेतले की झाले, त्याचीच गरज फक्त, बास्स!”, भुजबळकाका.

“अहो भुजबळकाका, हे तर दारूचे उदात्तीकरण झाले असे नाही का वाटत?”, चिंतोपंत.

“नाही चिंतोपंत, उदात्तीकरण नाही वाटत मला तरी!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून.

“हो, हे वाटणे खूप सापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणजे तुम्ही नेमके कसे आणि काय बघता ह्यावर ते अवलंबून आहे.”, सोकाजीनाना मंद हसत, “म्हणजे असे बघा, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा दोन बाजू प्रत्येक गोष्टीला असतात. अगदी प्रत्येक मानवनिर्मीत आणि नैसर्गिक गोष्टीला सुद्धा. आपण त्या गोष्टीकडे कुठल्या बाजूने बघतो, म्हणजे आपली सापेक्षता काय आहे ह्यावर, काय दिसणार हे अवलंबून आहे. आता बघा, सूर्यही नैसर्गिक गोष्ट आहे पण त्यालाही एक बोचरी आणि मानवासाठी हानिकारक बाजू आहे!”

“काय बोलताय काय सोकाजीनाना, हे काही पटत नाही ब्वा!”, नारुतात्या बुचकळ्यात पडून.

“सूर्याच्या उष्णतेमुळे घाम येतो आणि घामामुळे शरीराला दुर्गंध येतो तसेच काताडीचा रंग काळा पडतो ही सूर्याची एक दुसरी बाजू आहे की नाही. पण त्यामुळे आपण सूर्याला झाकून टाकण्याचा वेडेपणा करतो? तर नाही. त्यावर उपाय शोधतो. तसेच आहे, जे भुजबळकाका म्हणत आहेत ते. अहो ज्यांना ती भावते ते पितात, ज्याला जी परवडते ती तो पितो. जे तारतम्य ठेवून पितात ते त्यातला आनंद लुटतात, ज्यांना त्यातली मर्यादा कळत नाही आणि पाळता येत नाही ते बहकले जातात आणि त्याचे दुष्परिणाम तेच भोगतात. त्यावर तुम्ही आम्ही कोण संस्कृतीरक्षक बनून पोलिसिंग करणारे? ज्याचे त्याला ठरवू देत की काय करायचे ते. राहीला मुद्दा ह्यातल्या राजकारणातला, तर तुमच्यात धमक आहे ते परवाना राजकारण थांबविण्याचे? मग उगा बोंबाबोंब कशाला?”

“अहो, त्या दारुताही काहीतरी मजा असेलच की, उगाच नाही तो गालिब म्हणून गेला ‘ला पिला दे साकियां, पैमाना पैमाने के बाद’. फार कशाला आपले केशवसुतही म्हणून गेलेत ‘काठोकांठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळूं द्या ! ’ ” सोकाजीनाना मिश्कील हसत.

“अहो घारूअण्णा असे डोळे फाडून काय बघता आहात, मी काही ‘एकच प्याला’ मागवणार नाहीयेय आता, चहाच हवा ब्वा आपल्याला! चला तर आपला चहा मागवा कसें!”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

घारुअण्णांनी हसणे आवरात चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

धोरणसमाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

7 Nov 2012 - 7:29 pm | तुषार काळभोर

परत वादळ उठणार आता...

तुषार काळभोर's picture

7 Nov 2012 - 7:33 pm | तुषार काळभोर

ज्याचं त्यानं आपापलं प्रमाण ठरवावं, याच्यशी सहमत. त्रयस्थाने फारतर समजावावं.

-(थेंबालाही हात न लावलेला)पैलवान

क्या बात. मंडळी ऑन डिमांड हजर झाली.
नेहमी प्रमाणेच सोकाजीनानांशी बाडीस. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Mar 2013 - 11:16 pm | निनाद मुक्काम प...

येथे ज्यांची खुमखुमी जिरली नाही ,त्यांनी बिचार्‍या सोत्रींना पुढे गाठून त्यांचा
कात्रज करायचा प्रयत्न केला ,
जुन्या कढीला उत आणण्याचा नेहमीचा प्रकार ,
गवि ह्यांच्यामध्ये शब्दांची अचूक पखरण करण्याचे कसब आहेत ,
आम्ही पडलो ...

जेनी...'s picture

7 Nov 2012 - 7:43 pm | जेनी...

छ्या ...

आजतरी निदान च्या घेणार नाय तुमी ..आसं वाटलं होतं :-/

पण च्याशिवाय सोकाजीनानाची गाडी काय हलत नाय .....:-/

आस्सं कस्सं वो पूजातै, आमी तं च्या प्यालाच युन बस्लो न् काय!

तिमा's picture

7 Nov 2012 - 8:07 pm | तिमा

'दारु-सोडा' किंवा 'सोडा-दारु' नांवाचे संस्थळ चालू करा. चकण्याला मिसळपाव आहेच.

मी-सौरभ's picture

8 Nov 2012 - 5:04 pm | मी-सौरभ

१. चखना असा शब्द आहे चकणा नाही
२. मिसळपाव हा चखना क्याटेगरीतला आयट्म नाही...

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Nov 2012 - 5:07 pm | llपुण्याचे पेशवेll

हो सौरभशेठ मराठी भाषेत त्याला चकणा म्हणतात किंवा चकना असेही म्हणतात गावाकडे. :) तो तिरळ्या डोळ्याचा चकणा निराळा.

प्रभाकर पेठकर's picture

9 Nov 2012 - 11:03 am | प्रभाकर पेठकर

मराठीत, 'चाखणे' हा शब्द आहे तेंव्हा त्यावरून आलेला 'चखणा' शब्दच योग्य वाटतो.
'कुठे बघतो आहे' ह्याचा अंदाज बांधणार्‍यांना 'चकवतो' तो 'चकणा'.

“नाही चिंतोपंत, उदात्तीकरण नाही वाटत मला तरी!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
ह्म्म... आता वाईन देखील बियरच्याच भावेने अगदी १००रु बाटली या दराने मिळाला लागेल... चहा कशाला प्यायचा तो ? त्या पेक्षा फळांचा / द्राक्षाचा रस प्यायलेला उत्तम नाही का ? ;) मी तर म्हणतो सरकारने रेशनच्या दुकानावर देखील वाईचे कॅन ठेवावेत्,जसे रॉकेल देतात तशी वाईन द्यावी... म्हणजे गरिब जनतेला देखील या फळांच्या /द्राक्षाच्या रसाचा आनंद लुटता येईल. शेवटी आम आदमीचे सरकार आहे ना ? ;)

जाता जाता :--- राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अभय बंग यांची मानसिकता बकाल आहे अशी टीका केली आहे,याच अभय बंग यांच्या बद्धल युके चा पेपर म्हणतो...
Dr Abhay Bang: the revolutionary paediatrician
हे जर खरं असेल तर नक्की कोणाची मानसिकता बकाल असावी बरं ?

सोत्रि's picture

7 Nov 2012 - 10:04 pm | सोत्रि

"बाणा..बाणा... किती क्लेश करून घेशील?", इति बहुजनह्र्दयसम्राट.

- (भुजबळकाकांचा पंखा) सोकाजी

गरिब जनतेलाहि या फळांच्या \द्राक्षाच्या रसांचा आनंद लुटता येईल ...
ह्या वाक्याला जबरदस्त सप्पोर्‍ट . खरच असं करता येइल का ?? :(

;)

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Nov 2012 - 9:32 am | श्री गावसेना प्रमुख

होय ना.
रेशनकार्ड वर वाटा आनन्द येइल दीवाळीला

चिंतामणी's picture

14 Nov 2012 - 12:19 am | चिंतामणी

कुठल्या रेशन कार्डावर किती कोटा हेसुध्दा सांगुन टाका ना.

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 9:54 am | श्री गावसेना प्रमुख

अंत्योदय १०
बी पी एल ८
केशरी ७
पांढरे कार्ड २(हे सरकारी किंवा खाजगी नोकरी वाले असतात म्हणुन,हे स्वताच्या पैशाने खुप पिउ शकतात)

चिंतामणी's picture

14 Nov 2012 - 11:16 am | चिंतामणी

फक्त दोनच???????????

हा अन्याय आहे सेनापती.

याचा फेरविचार करावा. अन्यथा आम्हाला गाव नवनिर्माण सेनेची स्थापना करावी लागेल. :P

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 11:34 am | श्री गावसेना प्रमुख

समाजाच्या भल्यासाठी आम्हाला हे करावच लागेल्(स्वताच्या पैशांनी घ्या अन प्या),

(अवांतर.चिमण्या नंतर परत येतीलच)

पिवळा डांबिस's picture

8 Nov 2012 - 3:35 am | पिवळा डांबिस

आता कसं समदं रीतीपरमानं झालं!!!!
:)

अहो ज्यांना ती भावते ते पितात, ज्याला जी परवडते ती तो पितो. जे तारतम्य ठेवून पितात ते त्यातला आनंद लुटतात, ज्यांना त्यातली मर्यादा कळत नाही आणि पाळता येत नाही ते बहकले जातात आणि त्याचे दुष्परिणाम तेच भोगतात. त्यावर तुम्ही कोण संस्कृतीरक्षक बनून पोलिसिंग करणारे?
कं लिवलंय, कं लिवलंय!!!!
सोक्या, सोक्या, लेका बालिष्टर का नाही रे झालास?
:)

सोत्रि's picture

8 Nov 2012 - 7:07 am | सोत्रि

धन्यवाद पिडांकाका :-)

-(बॅरिस्टर) सोकाजी

चला सोकाजी नाना आता स्वताच्या मुलांच्या हातातही दारु देणार तर?
कारण तारतम्याने केलेली कोणतीही गोष्ट मग ते दारु पिण का असेना चांगलच अस सोकाजीनानांच मत मग मला एक सांगा स्वताच्या मुलांच्या हातातही दारु देणार का? तुमच उत्तर आता कदाचीत हो असेल पण खरच देऊन बघा नाही तुमचा हात थरथरला तर मन घाबरल व मणामणाच ओझ जर नाही तुमाला जाणवल तर सांगा मला.

प्रश्न सोकाजीनानांना आहे. काहीसा व्यक्तिगत आहे. तरीही सोकाजीनानांनी त्याला हरकत न घेतल्यास तो इथे ठेवता येईल. (शिवाय सोकाजीनाना म्हणजे हे मिपाचे की ते चावडीवरचे हा प्रश्न आहेच ;) )

आता एक सदस्य म्हणूनः

मला हा प्रश्न विचाराल तर इतर कोणी माझ्या पोराच्या हाती मद्याचा प्याला देऊ नये. ती संधी मला मिळावी, आणि मी त्याला शारिरीक / मानसिक दृष्ट्या योग्य वयात या गोष्टीचा योग्य आनंद घ्यायला शिकवण्याइतकी जबाबदारी घ्यावी अशी माझी इच्छा आहे.

कारण त्याच्यापासून चोरुन ती गोष्ट करणं म्हणजे ती वाईट , लपवण्यासारखी आहे असं आपल्याच मनात असल्याचा पुरावा आहे. अशा वेळी स्वतःही घेऊ नये आणि मुलांना देण्याचा प्रश्नच नाही.

जर मनातून आपल्याला खात्री असेल की आपल्या पोराला जबाबदारीने आनंद घ्यायला शिकवावा अशा योग्यतेची ही गोष्ट आहे, तर मग टल्ली न होता, योग्य दर्जाचं मद्य योग्य पदार्थांसोबत योग्य प्रमाणात घेण्याची स्वंयंपूर्ण मर्यादा त्याच्यात डेव्हलप करणं ही माझी जबाबदारी आहे. अशामुळे त्याची अवस्था अनेक ठिकाणी वर्णन केलेल्या भीषण अवस्थेसारखी होणार नाही.

मी टाळलं, त्याला नुसता प्रचारकी विरोध केला आणि मग बंडखोर वयोगटात पोचल्यावर आणि माझ्यापासून दूर असताना त्याला कोणीही हा प्याला दिला तर जे होईल ते नक्कीच वाईट असेल.

मी त्याला नीट शिकवलं तर मी जगात नसतानाही तो स्वतः मर्यादा ओळखेल याची खात्री मला आहे.

त्यासाठी बाप आणि मुलाचं तसं नातं हवं.. सर्वच बाबतीत, दारुच्याच नव्हे.

गविसाहेब,माझ हे विचारण सगळ्यानाच होत.
पण मी लिहिल आहे आधी करुन बघा मग सांगा.
लिहिताना आपण लिहुन जातो पण जेव्हा करायची वेळ येते तेही विषेशतहा आपल्याच मुलांच्या बाबतीत तेव्हा त्यांच्या भल्या वाईटाचा विचार हा केला जातोच. म्हणुन म्ह्टल आहे मी आधी करा मग सांगा

करायची वेळ येते तेही विषेशतहा आपल्याच मुलांच्या बाबतीत तेव्हा त्यांच्या भल्या वाईटाचा विचार हा केला जातोच.

तोच करुन ही इच्छा व्यक्त केली आहे. पोरगं योग्य वयात आल्याशिवाय प्रत्यक्ष कृती शक्य नसल्याने तुमच्या म्हणण्यातली तात्विक शक्यता तोपर्यंत एक शक्यता म्हणून (सिद्ध झालेली नसल्याने) सत्य मानावी लागेल.

धन्यवाद.

गवि साहेब, हरकत नाही सत्य सिध्द व्ह्यायला वेळ हा लागतोच.
तेव्हा सत्य सिध्द होण्याची वाट पाहुयात. तेव्या तुमच्यातल पित्याच मन जिंकेल बघा नाही देणार त्तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात दारुचा ग्लास. नकाच देउ अजिबात. तसले प्रयोग ही करु नका. वाटल्यास मी आताच माझ दारुविषयीच माझ मत सपशेल मागे घेतो. मुलाना दारुच्या जवळही जाऊ देउ नकात. उलट तुमची दारूविषयीची मत मान्य पण मुलांना दारुच्या जवळीहि फिरकु देउ नका.
धन्यवाद

मुलं घरच्यांना विचारुन दारु केव्हापासुन प्यायला लागली ??

( आश्चर्याचा जोरदार झटका बसल्याची डेन्जर स्मायली कल्पावी )

पूजा पवारजी, म्हणुन तुम्ही माझे व गविसाहेबांचे प्रतिसाद परत वाचा.
मुल घरच्याना विचारुन दारु पितात कि नाही हा मुद्दा नाही आहे तर दारु पिण हे चांगल की वाईट हा मुद्दा आहे.
मुल जरि घरातील लोकाना विचारुन दारु पित नसले तरी समाजातील ईतर लोकाना विशेषतहा पीणार्‍या मित्रांच्या अतिआग्रहामुळे दारु पितात. हे तर नक्की म्हंजे अनुकरतात हे नक्की.

निश ,विचरुन म्हणजे ,त्यांना 'कळेल असं '.

पण ,
मुल जरि घरातील लोकाना विचारुन दारु पित नसले तरी समाजातील ईतर लोकाना विशेषतहा पीणार्‍या मित्रांच्या अतिआग्रहामुळे दारु पितात. हे तर नक्की म्हंजे अनुकरतात हे नक्की.

********************************************************८८

मला नाहि वाटत असं .काहि मुलांचा कंट्रोल असतोच .तर जे पितात त्यांना मनातुनच इच्छा होत असणार प्यायची .
जबरदस्ति केली म्हणुन ह्यापेक्षा इच्छा झाली म्हणुन पितात .
असं म्हणावसं वाटतय .

तुषार काळभोर's picture

9 Nov 2012 - 2:02 pm | तुषार काळभोर

"मला नाहि वाटत असं .काहि मुलांचा कंट्रोल असतोच .तर जे पितात त्यांना मनातुनच इच्छा होत असणार प्यायची .
जबरदस्ति केली म्हणुन ह्यापेक्षा इच्छा झाली म्हणुन पितात ."

मी कंट्रोल वैग्रे काही करत नाही, पण जस्ट नाही इच्छा होत म्हणून पित नाही. तरीही, मद्य वाहणार्‍या पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायला मला खूप आवडतं. मी कोणालाही अडवत नाही. मी कोण अडवणारा?

ज्याला आवडते ते पितात. ज्याला कळते आनंद कुठे संपतो व चढणं कुठं सुरू होतो तो सावरतो स्वतःला...ज्याला कळतं पण वळत नाही तो भोगतो परिणाम...
हे परिणाम मग कधी हँगओवर सारखे साधे असतील, तर कधी दारूच्या नशेत बायकोचा चारित्र्याच्या संशयावरून खून इतके गंभीर असतील.

काहींना ज्यामध्ये आनंद वाटतो त्या ध्वनिक्षेपकाच्या भिंतीतून येणार्‍या संगिताचा आम्हाला त्रास होतो म्हणून आम्ही भैरवीलासुद्धा नाके मुरडावीत का?
इथेही मी म्हणेल, मला संगीतातलं काही कळत नाही..मला मला कसलंच संगीत नाही आवडत. पण ज्यांना एकांतात रफी ऐकायचाय त्यांना मी का अडवू? आणि ज्यांना हिमेशचं गाणं रीमीक्स करून ऐकायचंय, त्यांना तरी का अडवू?

मी_आहे_ना's picture

8 Nov 2012 - 12:19 pm | मी_आहे_ना

+१ (आणि शासनाच्या नियमानुसार वय वर्षं २५, आपण ठरवलेलं वय, ह्यातलं जे जास्त असेल ते... म्हणजे खूप वर्षं आहेत..) :)

प्रकाश घाटपांडे's picture

8 Nov 2012 - 2:01 pm | प्रकाश घाटपांडे

मी टाळलं, त्याला नुसता प्रचारकी विरोध केला आणि मग बंडखोर वयोगटात पोचल्यावर आणि माझ्यापासून दूर असताना त्याला कोणीही हा प्याला दिला तर जे होईल ते नक्कीच वाईट असेल.

अगदी बरोबर बोललात गवि!

सोत्रि's picture

8 Nov 2012 - 12:37 pm | सोत्रि

निश,

हा प्रश्न चावडीवरच्या सोकाजीनानांना नसून मला आहे असे समजून उत्तर देतो आहे.

१. मी जपानला असताना एकदा एका जपानी मित्राच्या घरी एका समारंभाला गेलो होतो. जपानमध्ये साके अतिशय पवित्र मानली जाते आणि प्रत्येक समारंभात ती अनिवार्य असते. त्या प्रथेप्रमाणे जेव्हा सर्वांना साकेचा छोटासा ग्लास दिला गेला तेव्हा माझ्या मुलांनाही दिला गेला. माझा मुलांना तो मी घेऊ दिला.

२. एका ख्रिश्चन मित्राच्या मुलाच्या एका समारंभासाठी (भारतात) गेलो असताना, त्या कार्यक्रमात रेड वाईनचा छोटा ग्लास त्यांच्या प्रथेप्रमाणे फिरत होता. तोही माझ्या मुलांनी घेतला.

ह्याचा अर्थ असा नाही की मी त्यांना दारु प्यायची सवय लावतोय. Be like romans when in Rome हे मला पटते. मुलांच्या नशिबाने त्यांचे अनुभव विश्व ह्या क्रॉस कल्चरल अनुभवांमुळे समृद्ध व्हावे अशी त्यामागची भावना होती. त्यातुनही त्यांना ते आवडले नाही तर ते पुन्हा ते घेणारही नाहीत किंवा आवडले तर ते घेतीलही. पण तो निर्णय त्यांचा असेल जो अनुभव सिद्ध असेल. माझ्या मोठ्या मुलाला साके आणि वाईन अजिबात आवडल्या नाहीत पण धाकट्याला आवडल्या.

मला असे वाटते की, आपले आयुष्य क्षणभंगुर आहे आणि जगात उपभोगण्यासारख्या इतक्या गोष्टी इतक्या आहेत की आपले आयुष्य त्यासाठी कमी आहे. त्यामूळे उपभोगयुक्त गोष्टींचा उपभोग घेणे हे मला जास्त महत्वाचे वाटते त्यांचा बाउ करण्यापेक्षा. ज्या गोष्टी मला आनंद देतात त्या अनुभवांपासून माझ्या मुलांनी वंचित रहावे हा दुटप्पीपणा झाला, जो मला मान्य नाही.

त्यातुनही चावडीवरचे सोकाजीनाना जे म्हणाले की तारतम्य सगळ्याच गोष्टी उपभोगताना असायला अहे ते माझ्याकडे आहे असे मला वाटते आणि त्यामुळेच माझा मोठा मुलगा योग्य वयाचा व्हायची मी वाट बघतो आहे जेणेकरून मी एका मित्राप्रमाणे त्याचाबरोबर चिल्ड बीयरचा ग्लास 'चियर्स' म्हणून ओठाला लावीन.

- (चियर्स) सोकाजी

:)

पहिल्या ओळीपासुन ते शेवटच्या ओळीपर्यंत प्रचंड ताकदीची सहमती .

खुपच स्पष्ट आणि योग्य प्रतिसाद गवि .

घरातलं बरचसं मोकळं ( तनावरहित ) वातावरण . मुलांचा वडीलांशी रोजच्या रोज होणारा संवाद .
ह्यामुळे बहुतेक करुण दडपण रहात नसावं .आदर म्हणुन आपण पितो ही गोष्ट लपवली जाइल ,पण आदर आणि
संस्कार ह्यांचा ताळमेळ म्हणुन ' तारतम्य ' बाळगले जात असावेत .

शेवटचं वाक्य झकास बोललात. मला माझ्या पोराचा आदर नको आहे, विश्वास हवा आहे.

सोत्रि साहेब, नक्कीच तुम्ही तस करु नका. विषारी सापात विष असत हे सगळ्यानाचा ठाउक असत म्हणुन आपण घरात साप पाळत नाही.खर तर तेच विष साप दंशावरच एक मेडिसीन असुनही. रहाता राहीला

निश तुमची तळमळ समजते आहे. धन्यवाद.

फक्त एकच बोलून थांबतो की दारुविषयी "साप, विष, राखरांगोळी, गटार" आणि असे अनेक शब्द लागू होण्यामागे त्याचे अतिरिक्त वापरामुळे दिसणारे दुष्परिणाम आहेत. अतिरिक्त वापर टाळण्यासाठी त्या मूळ गोष्टीचा इतक्या तीव्रतेने विटाळ मानण्यातच प्रॉब्लेम आहे.

पुढची पिढी त्यांच्या आयुष्यात, विशेषतः तरुण वयात कधीच दारुशी आमनेसामने येणार नाही हे अशक्य आहे. अशा वेळी लहानपणापासून त्याच्या मनात "दारु" या संकल्पनेविषयी ठासून विष , पाप अशा कल्पना भरुन ठेवलेल्या असतील तर जी गुंतागुंत होईल त्याची तुम्हाला कल्पना येत नाहीये.

त्यापेक्षा जेव्हा ती घटना घडेल त्याच्या आधीच माझी पुढची पिढी वेल इन्फॉर्म्ड असेल तर ती स्थ्रिर राहील. मर्यादा कळलेली असेल.

ती पिढी मनातून गिल्टी राहून पण त्याचवेळी त्या गोष्टीविषयी अधिकाधिक सुप्त आकर्षण वाटून त्याच्या कह्यात जाणार नाही. आग्रहाला बळी पडणार नाही. समस्येवर उतारा म्हणून दारु पिण्यापेक्षा केवळ आनंदासाठी ते करेल.

हे सर्वांना पटणं कठीण आहे, म्हणून पूर्णविराम.

राहता राहीला प्रत्येक देशातील कल्चर चा मुद्दा तर..
जपान देशातील त्यांच्या लोकांची त्या देशाबद्दल असलेल देशप्रेम मुलांना शिकवा.
कित्येक देशात खुलेआम वेश्याव्यवसायाला मान्यता आहे म्हणुन त्या देशात गेलात तर त्या वेश्याव्यवसायाचा उदोउदो करणाआ का? नाही ना. मुलाना द्यायचच असेल तर बाहेरच्या लोकांच्या चांगल्या सवयी द्या. उगाच ते लोक दारु पितात म्हणुन त्यांच्या नको त्या गोष्टिंच अनुकरण करु नका.

सोत्रि's picture

8 Nov 2012 - 1:22 pm | सोत्रि

माझा पूर्ण विराम.

-(हतबद्ध) सोकाजी

सोत्रि साहेब्,माझाही पूर्ण विरामच.
येणारा काळच ठरविल काय बर की वाईट ते.
दारू ही वाईट आहे. ती होती व राहीलच.
माझाही पूर्ण विरामच पण दारुला.

जेनी...'s picture

8 Nov 2012 - 1:30 pm | जेनी...

निश तुला माझ्याकडुन एक पूस्प्गुच .

आणि एक छोट्टासा पूर्णविराम .

(नेमकं काय म्हणायचय ते नीट स्पष्ट न झाल्यानं तोंड पाडुन बसलेला स्मायली )

बॅटमॅन's picture

8 Nov 2012 - 3:14 pm | बॅटमॅन

सोत्रिअण्णांआ चहा आणि बालिकेचा आपलं आज्जीचा **पूष्प्गुच हे आपले लै फेव्हरीट पदार्थ आहेत बरंका!!!

**हाच खरा उच्चार आहे असे सुद्द मरथिच्या बिरगेडी सब्दकोशतुन कल्ते.

दादा कोंडके's picture

8 Nov 2012 - 5:03 pm | दादा कोंडके

मला असे वाटते की, आपले आयुष्य क्षणभंगुर आहे आणि जगात उपभोगण्यासारख्या इतक्या गोष्टी इतक्या आहेत की आपले आयुष्य त्यासाठी कमी आहे. त्यामूळे उपभोगयुक्त गोष्टींचा उपभोग घेणे हे मला जास्त महत्वाचे वाटते त्यांचा बाउ करण्यापेक्षा. ज्या गोष्टी मला आनंद देतात त्या अनुभवांपासून माझ्या मुलांनी वंचित रहावे हा दुटप्पीपणा झाला, जो मला मान्य नाही.

सहमत!
अशाच प्रकारे बाहेरख्यालीपणाला सुद्धा चालना दिली पाहिजे. एडस किंवा इतर लैंगिक रोग होउ नये म्हणून पती/पत्नीशी एकनिष्ठ रहा असे मोरल पोलिसींगसुद्धा भंपकपणा आहे. जोडीदाराची संमती असली तर योग्य ती काळजी घेउन ठेवलेले संबंध आनंद आणि फक्त आनंदच देतात. त्यासाठी नुसतं कायद्यानी मान्यता देउन काम भागणार नाही त या उद्योगासाठी 'उत्तेजन' दिलं पाहिजे. गावोगावी स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी व्येशाग्रहं उभंकरणं गरजेचं झालय. त्यातून समाजाची लैंगिक उपासमार तर दूर होइलच व बेरोजगार लोकांना "काम" ही मिळेल. सुरुवात म्हणून राजकारण्यांचे जागोजागी बार व परमीट रूम्स हॉटेल्स आहेत तिथं हे चालू करता येइल. सरकारला करही मिळेल आणि त्याच्या बदल्यात तिथं आरोग्यसेवा पुरवता येतील.

काल गिर्‍हाईक दारूच्या दुकानात लपून छ्पून जात असे. पण आज इतर किराणादूकानातून इतर सामान आणण्या बरोबरच दारूचीही तिथेच खरेदी केली जात आहे. त्याचप्रमाणे आज गिर्‍हाईक बुधवारपेठेत लपून छपून जात असेल तर तेच काम करण्यासाठी त्याची इतर वाढलेल्या उपनगरांत सोय केली पाहिजे. त्यासाठी पोषक सामाजिक वातावरण करण्याची गरज आहे.

जै हिंद, जै म्हाराष्ट्र!

सोत्रि's picture

8 Nov 2012 - 6:00 pm | सोत्रि

दादा,

थोडे विषयांतर होते आहे पण आता विषय निघालाच आहे तर होउन जाऊदे.

अशाच प्रकारे बाहेरख्यालीपणाला सुद्धा चालना दिली पाहिजे.

जसे सोकाजीनाना म्हणाले, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशीच ह्या 'विषया'लाही दुसरी बाजू आहे. ती विचारात न घेता दिलेला हा तुमचा प्रतिसाद.

बाहेरख्यालीपणा जो तुम्हाला अभिप्रेत आहे त्याच्या अगदी नेमके उलट, ती एक गरजही असू शकते.

बरेच लोक कामानिमीत्त बराच काळ त्यांच्या घरापासून दूर राहतात, पोटाची खळगी भरण्यासाठी. अनेक भारतीय आखातात नोकरीसाठी जातात, त्यांना दोन वर्षातून एकदा किंवा वर्षातून एकदा घरी जाण्याची परवानगी असते. अशा लोकांची शारिरीक भूक ही त्यांच्या शरिराची गरज असते. त्यांनी काय करावे? तुमच्या म्हणण्याप्रमाणे "बाबा रे पोटाची खळगी भरण्याची खाज तुझी, तु घर सोडून का गेलास? पण आता गेला आहेस तर तु तुझ्या शरिराच्या भुकेला मार कारण आम्ही संस्कृतीरक्षक आहोत आणि तुझ्या शरिराच्या गरजेपेक्षा आम्हाला आमची संस्कृती जास्त महत्वाची आहे, कारण आमचे पोलिसिंग भंपकपणा अजिबातच नाही." असे सांगावे लागेल, काय?

परवा चेन्नैमध्ये एक हेवी लोडेड ट्रक बघितला, तो मिझोराम मधून आला होता, अर्थात ड्रायव्हर मिझोरामचाच होता. त्याने आपल्या जिवनावश्यक वस्तू आपल्याला वेळेत मिळाव्या म्हणून घरदार सोडून यायचेच्, त्याचे कर्तव्यच आहे ते, पण त्याच्या शरिरीक गरजा मात्र त्याने विसरून जायच्या आणि 'मोराल पोलिसिंग'पुढे मान तुकवायची कारण बाहेरख्यालीपणा समाजविघातक आहे.

काय चांगले, काय वाईट हे ठरविणे फारच अवघड आहे हो.

- (सामाजिक तारतम्य असलेला) सोकाजी

सोत्रि साहेब, माफ करा पण..
तुमच्या म्हणण्यात काहि प्रमाणात तथ्य असल तरिही स्त्रियांच शोषणच होत ना? तुमची शारिरीक भुक भागवायला स्त्रियाना त्यांच्या आयुष्याचे धिंडवडे काढायला लागतात.त्याना अपार यातना देऊन त्यांचि अब्रु पार मातीमोल केली जाते त्याच काय? स्त्रियानाही मन आहे आयुष्य आहे.पुरुषाच्या चाळवलेल्या भुका भागवायला अजुन किति स्त्रियानी आपल्या आयुष्याच मोल द्यायच ते सांगा? लांब राहणार म्हणुन गरजा भागवायला कोणाचही शोषण करायचा अधिकार कोणालाच नाही आहे.

सोत्रि's picture

8 Nov 2012 - 6:15 pm | सोत्रि

अरे, आपला पूर्णविराम ठरला होता ना ;)

- (मिश्कील) सोकाजी

सोत्रि साहेब, दारु ह्या विषयावर पूर्णविराम ठरला होता.
ह्या विषयावर नव्हता पण असो माझाही आता ह्या विषयावर पूर्णविराम .

स्त्रियांच शोषण करण हे अतिशय वाईट व निंदनीय आहे व त्याचा मी निषेध करुन मी ह्या विषयाला पूर्णविराम देतो.

निश यांचे प्रतिसाद वाचून वार्‍यावरची वरात मधला एक प्रवेश आठवला.

दादा कोंडके's picture

8 Nov 2012 - 7:32 pm | दादा कोंडके

संपूर्ण दारूबंदी घोषीत करूही नये आणि ते शक्यही नाहिये. पण समाजात त्याच्याबद्दलचा जो दृष्टीकोन आहे, जे निगेटीव मत आहे ते तसच असलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. जशी दारू म्हणजे विष, ही धारणा चूकीची आणि टोकाची आहे त्याच प्रमाणे थोड्या प्रमाणात आहारी न जाता दारू घेतल्याने नुकसान होत नाही, दारू न पिणे म्हणजे मोठ्या आनंदाला मुकणे वगैरे सार्वजनिक मतही चुकीची आहेत. दारूची मुबलकतासुद्धा व्यसनाधीनतेला कारणीभूत असतेच. बहुसंख्य समाजाला ज्याला संयम/विवेक थोडासा कमी आहे त्यासाठी विवेकी लोकांना दारू विकत आणण्यासाठी थोडसं लांब जावं लागलं तर बिघडलं कुठे?

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Nov 2012 - 9:32 am | श्री गावसेना प्रमुख

माझ्या मते बाहेरख्याली पणा,
हा कायम फिरस्तीवर असलेल्या लोंकानी खुंटीवर टांगलेला विषय असावा.
बाकी दादा उपरोधीक पणे बोलले असतील्,
तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे की ज्या गोष्टी मला आनंद देतात त्या अनुभवांपासून माझ्या मुलांनी वंचित रहावे हा दुटप्पीपणा झाला, जो मला मान्य नाही.
तुम्हाला ज्या गोष्टी आनंन्द देतात त्या गोष्टींनी तुमच्या मुलालाही आनंन्द मिळेल हे कशावरुन

अरे कसला फुकाचा शब्दछल चालवला आहे?
सोकाजी काय पोराच्या तोंडात बाटली रिकामी करायला निघालेत काय?
कैच्याकै.

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Nov 2012 - 2:47 pm | श्री गावसेना प्रमुख

पोराच्या तोंडात बाटली रिकामी
आम्ही कुठे म्हणतोय्,तुम्हीच म्हणताय म्हणुन.अहो त्यानीं त्याला घेउ देत असेच म्हणाले ना.आज तो लहान असावा ,तो मोठा झाल्यावर तुम्हाला विचारेलच हे कशावरुन.

मोठा झाल्यावर
यातच आलं.

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Nov 2012 - 4:34 pm | श्री गावसेना प्रमुख

मोठा म्हणजे ३५/ ४०चा नव्हे,
जो पर्यंत त्याला बापाची गरज असते तेव्हढा मोठा.
म्हणजे तो २०/२५ वर्षा चा झाल्यावर त्याने तुमच्या समोर घेतली तर तुम्हाला चालेल का?

खाली गविंनी आणि पेठकरकाकांनी समर्पक शब्दांत माझ्या मनातल्या भावना मांडल्यात म्हणुन पुन्हा शक्ती आणि वेळ खर्चण्यात अर्थ नाही.
तुमाला त्या कळतील अशी भाबडी आशा बळगतो.

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Nov 2012 - 5:08 pm | श्री गावसेना प्रमुख

पुर्णविराम माझ्याकडुन

तो मोठा झाल्यावर तुम्हाला विचारेलच हे कशावरुन.

मोठा झाल्यावर विचारुच नये.. स्वतःच ठरवावं..

मोठेपणी त्याचा सल्लागार होण्यापेक्षा आधीपासूनच त्याला मोठेपणासाठी तयार केलं तर उपयोग आहे.

शिवाय आपल्याला ज्या गोष्टींनी आनंद मिळाला त्याने पुढच्या पिढीलाही मिळेलच याची "गॅरंटी" कधीच नसणार. पण तरीही आपण आपल्याला आनंद देणार्‍या गोष्टींचं "योग्य तेवढं" आणि "योग्य तेव्हा" एक्स्पोजर पुढच्या पिढीला देतोच ना? आवडलं, घेईल.. नावडलं, नाही घेणार..

एकाद्या गोष्टीला ती जितकी घातक आहे त्याहून खूप जास्त घातक म्हणत राहून आणि "पापा"त,"अवैधा"त वगैरे ढकलून आपण मोकळे होऊ शकत नाही. त्याने सुप्त आकर्षण दबलेलं राहतं आणि आपली "इन्स्पेक्टर"सदृश नजर दूर गेली की उसळून घातक ठरतं.

सोत्रि's picture

9 Nov 2012 - 3:38 pm | सोत्रि

गा. प्रमुख,

तो निर्णय त्यांचा असेल जो अनुभव सिद्ध असेल. माझ्या मोठ्या मुलाला साके आणि वाईन अजिबात आवडल्या नाहीत पण धाकट्याला आवडल्या.

तुम्ही हे वाचले नसेलच! बहुदा बोल्ड मध्ये नसल्याने तुम्हाला दिसले नसावे ;)

- (आनंदी) सोकाजी

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Nov 2012 - 4:39 pm | श्री गावसेना प्रमुख

हो ना वाचले ,पण धाकट्याच काय्?त्याने केलेल चालेल काय तुम्हाला?

दादा कोंडके's picture

9 Nov 2012 - 3:45 pm | दादा कोंडके

परवा चेन्नैमध्ये एक हेवी लोडेड ट्रक बघितला, तो मिझोराम मधून आला होता, अर्थात ड्रायव्हर मिझोरामचाच होता. त्याने आपल्या जिवनावश्यक वस्तू आपल्याला वेळेत मिळाव्या म्हणून घरदार सोडून यायचेच्,

उदाहरणादाखल त्या ट्रकड्रायव्हर सारखंच एखादी व्यक्ती महाराष्ट्रातून एका आठवड्यासाठीही चेनैला जाउ शकते. मग ती गरज चेनैमध्ये मिझोराममधून एक महिना राहिल्यावर की महाराष्ट्रातून एक आठवडा आल्यावर निर्माण होते हे कसं ठरवणार?
वर्ल्ड इज ग्रे मान्य आहे. पण एखादी गोष्ट चांगली की वाईट हे मेजॉरीटी बघून ठरवायला अवघड जाउ नये. मग कायद्याची गरजच काय?

सोत्रि's picture

9 Nov 2012 - 3:49 pm | सोत्रि

अरेच्चा, त्याच्याखालचेच हे ही वाचलच नाही तुम्ही! :)

काय चांगले, काय वाईट हे ठरविणे फारच अवघड आहे हो.

:)

- (काहीही न ठरवणारा) सोकाजी

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Nov 2012 - 4:43 pm | श्री गावसेना प्रमुख

त्यांच म्हणने चांगले वाईट हे नव्हे,गरज केव्हा निर्माण होते ते होय.

श्रीरंग_जोशी's picture

8 Nov 2012 - 7:11 am | श्रीरंग_जोशी

वाह सोकाजीनाना, एका वादग्रस्त विषयावर सर्वसमावेशक भाष्य कसे करावे याचा आणखी एक उत्कृष्ट नमुना.

दारू व इतर तंबाखूजन्य पदार्थ आपल्या सामाजिक मूल्यांनुसार बर्‍याच प्रमाणात आक्षेपार्ह असले तरी त्यापासून कररूपाने सरकारला जो महसूल मिळतो त्याचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. त्यामुळे कोणी काही म्हणाले तरी सरकारी धोरणाद्वारे त्यावर प्रतिबंध घातला जाणार नाही.

इरसाल's picture

8 Nov 2012 - 9:21 am | इरसाल

आणी "टिंबा" चा खुणपर्यंत लेख. (टु द पॉईंट का काय ते)

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Nov 2012 - 9:26 am | श्री गावसेना प्रमुख

थोडी थोडी पिया करो
बादमे गटर मे लोळा करो.1

मी_आहे_ना's picture

8 Nov 2012 - 10:14 am | मी_आहे_ना

अगदी हेच, सोकाजीनाना. धन्यवाद. तारतम्य पाळून (जसे कोणी म्हणले, मुलं आजूबाजूल असताना नको, ड्राइव्ह करायचे असेल तेव्हा नको इ. इ.) कुठलीच गोष्ट पूर्ण वाईट कशी असू शकेल.
अजून एक मुद्दा - गुटखाबंदीसारखे दारूबंदीचेही कोलीत ह्या माकडांच्या हातात पडू नये असं वाटतं.

सोत्रिच्या चावडीवरिल गप्पा नेहमीप्रमाणेच मनोर॓जक, पण ह्या वेळेस मन्ड्ळी॑चा गाप्पा॑चा विषय आणि आशय तसेच प्रतिसाद जुळत नाहित असे वाटतेय.

बारामती, मद्यसम्राट, परमिटे, भ्रष्टाचार, धान्यापासून माद्य बनविणे, महाराष्ट्र आणि मद्य्र्राष्ट्र हे मुद्दे आणि मद्यप्राशनातील पारिमाणे, योग्यायोग्यता ह्या वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात असे मझ्या अल्पबुद्धीस वाट्ते आहे.

ब॑गना यापेक्शा जास्त ट्यार्पी नक्कीच योग्य आहे.

किणकिनाट
प्रस॑ग आणि सोबत पाहुन मी घ॑टा वा ग्लास बनतो
पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........

प्रकाश घाटपांडे's picture

8 Nov 2012 - 1:48 pm | प्रकाश घाटपांडे

मस्त चर्चा चालली आहे. सोत्रि व गवि यांच्याशी सहमत आहे.
असे वाचले होते कि दारु पिणार्‍या १०० लोकांपैकी १३ ते १४ व्यसनी होतात. अर्थात तुम्ही त्या १३ तले कि उर्वरित मधले हे सांगणे मुश्किल.
तेव्हा आपल शास्त्रापुरती घेण उत्तम.

मी_आहे_ना's picture

8 Nov 2012 - 2:05 pm | मी_आहे_ना

सगळ्यांचे पूर्णविराम आले, चला आता मागवा एक एक, ही चर्चा थांबवायला.
(हतबद्ध झालात तरी स्ट्रॉ असतेच)
;)

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Nov 2012 - 3:36 pm | llपुण्याचे पेशवेll

हतबद्ध म्हतले आहे हातबद्ध नाही म्हटले आहे. :)

हतबद्ध नाही हतबुद्ध हो :) बाकी पुण्याच्या पेशव्यांनी "हातबद्ध" अशी व्हर्जन जी उल्लेखिलेली आहे, तिजवरून येक लै लै बेक्कार श्लेष आठवला ;)

मी_आहे_ना's picture

8 Nov 2012 - 3:54 pm | मी_आहे_ना

अहो ते सोत्रिंनी लिहिलंय 'हतबद्ध' म्हणून मीही तेच म्हणलो.
ते जाऊदे, च्या (नाहीतर सोकाजीनाना मागवतील ते) पिणार का सांगा
:)

हाओ तर! बिनदुधाचे ग्रीन टी/लेमन टी/इ.इ. सर्व "चहे" वेल्कम हैत :)

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Nov 2012 - 4:58 pm | llपुण्याचे पेशवेll

चालेल आम्हाला नेहमीप्रमाणे चहा चालेल . कोणी दारू घेत असेल तर सोड्यामधे लिंबू पिळून त्यात मीठ घालून प्यायला जाम आवडते.

प्यारे१'s picture

8 Nov 2012 - 5:11 pm | प्यारे१

>>>>कोणी दारू घेत असेल तर सोड्यामधे लिंबू पिळून त्यात मीठ घालून प्यायला जाम आवडते.

फुल्ल टू-ल्ल्ल सहमत

- 'कन्व्हर्टेड' प्यारे! ;)

बाकी टू सोकाजी नि गवि व इतर सगळेच,

एक छोटीशी :) टेस्ट करायची. एक वर्षभर दारु प्यायचीच नाही असं ठरवायचं नि ते पाळायचं.
मग आपण दारु पितो की दारु आपल्याला पिते ते समजेल. आपण म्हणतो की आपला कंट्रोल आहे नि आम्ही एकदम कंट्रोल मध्ये असतो. पण जेव्हा दारु प्यायची नाही असं ठरतं तेव्हा जी तडफड होते ती काय प्र तीची असते त्यावर समजून जातं. इतर कुणासाठी नको, स्वत: स्वतःसाठी करा नि प्रामाणिकपणे कबूल करा. हीच गोष्ट 'सगळ्या' चांगल्या वाईट गोष्टींसाठी.

गवि's picture

8 Nov 2012 - 5:20 pm | गवि

प्यारेकाका,

अगदी हीच गोष्ट.. मी "टेस्ट" म्हणून न करता माझ्याकडून आपोआप झाली. केवळ आता मागे पाहताना ते जाणवतं. मुद्दाम नोंद ठेवून प्रयत्नपूर्वक मद्यापासून दूर राहण्याची "टेस्ट" घ्यावी लागणे याचा अर्थ व्यसन ऑलरेडी लागलं आहेच. टेस्ट घेण्याचीही गरज नाही.

त्या वेळी लक्षात आलं नाही पण मागे पाहून हिशोब लावला तेव्हा लक्षात आलं की एक वर्षं काय, त्याहून जास्त काळ अजिबात मद्य न घेता गेला होता. कारण ? : मुद्दाम ठरवून किंवा निग्रह करुन नव्हे. वेळच जमून आली नाही. लक्षात आलं नाही. आठवणही झाली नाही. कंपनी नव्हती किंवा स्वतःचा तसा मूड बनला नाही.. अशा कारणांनी इतका मोठा खंड पडला. त्यानंतर पुढचे योग्य ऑकेजन (गोवा वारी इत्यादि) आल्यावर पुढची बैठक झाली तेव्हाही "अरे, तब्बल अमुक इतक्या महिन्यांनी आज आपण हे पितोय", अशी जाणीवही झाली नाही.

हे मोजण्याची सुरुवात + गिल्ट = अल्कोहोलिझम.

दारुपासून लांब राहणं तुम्हाला प्रयत्न न करता शक्य झालं म्हणून सगळ्यांनच्च जमेल असं नाही. कारण दारु. सिगारेट बंद चा नारा (फेसबुकवर स्टेट्स इ.इ.) देऊन १५-२० दिवसात टेबलला बसलेले बघितले आहेत.

>>>>मुद्दाम नोंद ठेवून प्रयत्नपूर्वक मद्यापासून दूर राहण्याची "टेस्ट" घ्यावी लागणे याचा अर्थ व्यसन ऑलरेडी लागलं आहेच.

अशा टेस्ट घ्याव्यात ना पण? प्रयत्नपूर्वक काळ ठरवावा लागेल ना? परिक्षा घेण्यासाठी किमान कालावधी आवश्यक असावा.

>>>> वेळच जमून आली नाही. लक्षात आलं नाही. आठवणही झाली नाही. कंपनी नव्हती किंवा स्वतःचा तसा मूड बनला नाही.. अशा कारणांनी इतका मोठा खंड पडला. त्यानंतर पुढचे योग्य ऑकेजन (गोवा वारी इत्यादि) आल्यावर पुढची बैठक झाली तेव्हाही "अरे, तब्बल अमुक इतक्या महिन्यांनी आज आपण हे पितोय", अशी जाणीवही झाली नाही.

दारु घेत नाही म्हणून अहंगंड नि घेतो म्हणून न्यूनगंड अथवा उलट असा अर्थ अपेक्षित नाहीच्च. दारु- जसं पाणी प्यायलो काय नि नाही प्यायलो काय याची आपण आठवण ठेवत नाही असा तुमचा दृष्टीकोन असलेला जाणवतो आहे. तुमच्यासाठी एक 'कॅज्युअल' गोष्ट असावी. मान्य. पण अशा वेळी अशा प्रकारचा दृष्टीकोन लोक ठेवत नाहीत. असला तरी तितकी ऐपत असेल असं नाही. ऐपत असली तरी शारीरिक क्षमता असेल असं नाही. त्यामुळं 'आगे धोखा है' चा बोर्ड आधीपासूनच असला तर काय वाईट????

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2012 - 10:10 pm | अत्रुप्त आत्मा

@हे मोजण्याची सुरुवात + गिल्ट = अल्कोहोलिझम. >>> क्या बात है ग.वि. क्या बात है...! उस्ताद हो आप...सचमुच के उस्ताद :-)

टेस्टमध्ये पास झाल्यावर बक्षिस म्हणून. ही का? ;)
झटपट काय नियम अटी काय आहेत या 'टेस्ट'साठी व्यनी करा बरं.

इरसाल's picture

9 Nov 2012 - 12:08 pm | इरसाल

तुम्ही आमाला ही बाटली देत नाय.......(मायदेशी येताना घेवुन येवुन)
तोप्रयन्त आमी तुमाला तिरके परतिसाद देनार, तुमच्या धाग्यावर उलटेसुलटे बोलनार

जेनी...'s picture

9 Nov 2012 - 12:10 pm | जेनी...

हि(च) हि(च) हि(च) :D

बॅटमॅन's picture

9 Nov 2012 - 1:54 pm | बॅटमॅन

ओ ऽ ऽ तुला ऽ लागली कुनाची उचकी :D :P

टपलेलाच असतो कैबे माझ्या पोश्टानवर ??? :-/

तुलाबी पूस्प्गूच द्यावा लागल मंग मला :-/

सोत्रि's picture

9 Nov 2012 - 7:30 pm | सोत्रि

ए.. ए... मलाsss पण!!! मलाsss पण!!!!!! "पूस्प्गूच"
:D :D :D

- (पूस्प्गूच कसा असतो ते बघण्याची आस लागलेला) सोकाजी

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Nov 2012 - 4:57 pm | llपुण्याचे पेशवेll

निश यांच्याशी सहमत आहे. दारू वाईट होतीच आणि आहेही. जरी रामायण किंवा महाभारत काळात प्यायली गेली असली तरी. यादवांचे कुळही दारू पिऊन आपापसात भांडूनच संपले. त्यामुळे पूर्वी मोठ्या प्रमाणात प्यायली जात असलेली (अगदी मनुस्मृतीतही याचे उल्लेख आहेत. शंकराचार्यांच्या काळात सरस्वतीला दारूचा नैवेद्य दाखवल्याचेही पुरावे आहेत आणि आजही सरस्वतीपूजनाला काशाच्या वाटीत दूध आणि सैंधवाचे प्रतिकात्मक मद्य नैवेद्य म्हणून ठेवले जाते) दारू मधल्या काळात समाजाने किंवा बहुतांश समाजाने एकदम वाळीत का टाकली. याचाही विचार करावासा वाटतो. का तारतम्याच्या नावाखाली आपल्या संस्कृतीत असलेल्या सगळ्याच गोष्टी चूक आहेत असे म्हणायचे?
आणि क्रॉस कल्चर वगैरे म्हणायचे झाले तर ख्रिश्चनांची दारू पिण्याची सवय मुळीच अनुकरणीय वाटत नाही. वाटतच असेल तर त्यांची शिस्त, सरळ (विषेशतः पाश्चात्त्यांचे) वागणे जास्त अनुकरणीय वाटते.
बाकी आपले ते 'तारतम्य' आणि इतरांचे चे ते 'पोलिसिंग' असतेच. :)

सोत्रि's picture

8 Nov 2012 - 6:13 pm | सोत्रि

दारू मधल्या काळात समाजाने किंवा बहुतांश समाजाने एकदम वाळीत का टाकली. याचाही विचार करावासा वाटतो

पुपे, लाख पते की बात!

एकढी प्राचिन संस्कृती (फक्त दारुच नव्हे, असंख्य गोष्टी) काळाच्या ओघात का गडप झाली आणि आपण ती का विसरुन गेलो त्याचा शोध घेणे फारच गरजेचे आहे. दारु बद्दलच जर बोलायचे झाले तर मुस्लिम आक्रमणाखाली भारत शेकडो वर्षे भरडला गेला आणि त्यांच्या संस्कृतीने आपल्या संस्कृतीवरही आक्रमण केले होते. त्याप्रमाणे इस्लाममध्ये दारु निषीद्ध आहे. त्यामुळे त्या इस्लामी रेट्यामुळेही दारु संस्कृती लोप पावली असू शकेल. हे फक्त वानगी दाखल.

त्या अनुषंघाने अभ्यास करून, चर्चा होऊन दारुबद्दल विचार करायला हवा. उगाचच सरसकट दारुबद्दल आकस ठेवून दारु म्हणजे विष, दारु पिणे आणि गटारात लोळणे अशी विधाने करून विरोध करणे मला तरी पटत नाही.

आणि हे माझे म्हणणे दारुचे उदात्तीकरण तर अजिबात नाही. कारण तारतम्य तर मझ्याकडे आहेच पण तारतम्य आणि पोलिसिंगमधला फरकही मला नक्कीच कळतो. :)

- (अभ्यासू) सोकाजी

"मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी" या नावाचे एक पुस्तक आहे. विविध व्यक्तींनी मद्याबद्दल स्वतःला काय वाटते ते लिहिलेले आहे, त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा एक "मद्येतिहास"पर लेख आहे.

सोत्रि's picture

8 Nov 2012 - 7:47 pm | सोत्रि

अरुण शेवत्यांचे हे पुस्तक. एका दारु स्पेशल दिवाळी अंकात (आता नाव विसरलो) प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. खूपच छान लेख आहेत. सर्पुस्तकचाकात्याहवे असे. (ह्या पुस्तकाचा रेफरंस घेतला होता हा लेख लिहीताना :) )

खूप धावाधाव करून मिळवलेले हे पुस्तक माझ्या संग्रही आहे. कोणाला हवे असल्यास वाचायला मिळेल पण त्यासाठी चेन्नैत यावे लागेल ;)

- () सोकाजी

च्यामारी या गुगल वैतागलेला, मराठी टंकने भयंकरच कठीण झाले आहे. :(

- (गुगल क्रोमला वैतागलेला) सोकाजी

च्यामारी या गुगल वैतागलेला, मराठी टंकने भयंकरच कठीण झाले आहे. :(

- (गुगल क्रोमला वैतागलेला) सोकाजी

त्यातले किस्से लै भारी आहेत मात्र :) अत्रे आणि ब्रह्मचारी पिक्चरचा किस्सा तर एक नंबरच!!