चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र
लेखनप्रकार
“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत.
“ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या.
“अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.
“कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या.
“मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत .
“काय? आज चक्क मटा ? अहो, संध्यानंद बंद होईल की हो अशाने? खी. खी.. खी… ”, इति नारुतात्या.
“डोम्बल तुमचं नारुतात्या, अहो एवढा सिरीयस विषय आणि तुम्ही दात काय काढताय?”, घारुअण्णा तणतणत.
“बरं…बरं! त्यांना म्हणावे जळजळ पोहोचली बरं का, घारुअण्णा”, इति शामराव बारामतीकर.
“अहो बारामतीकर, तुमच्या साहेबांचा ह्यात हात आहे. एवढा मोठा सामाजिक प्रश्न आणि तरीही तुम्ही साहेबांचीच बाजू कशी काय घेऊ शकता हो, ऑ? ”, घारुअण्णा अजून घुश्श्यात, “एवढा शेतीचा जाणकार माणूस पण त्यानेच सर्व कॄषीक्षेत्राची वाताहत करावी यासारखे दुर्दैव नाही ह्या देशाचे. आता नसती अवदसा सुचली आणि दारूचे परवाने देत सुटले आहेत तुमचे साहेब.”
“अहो, ह्यात नेमका मुद्दा काय ते कळेल का? म्हणजे जर हे सत्तास्थान नागपुरात असते आणि एका ड्रायव्हरला एका कंपनीचा डिरेक्टर बनवून त्याला परवाने दिले तर आपला महाराष्ट्र, मद्यराष्ट्र बनता इथे रामराज्य अवतरले असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?”, बारामतीकर बरेचसे उपरोधाने आणि किंचित रागाने.
“अहो पण साहेबांचा ह्यात ‘हात’ कसा काय असेल? त्यांनी तर हातातला ’हात’ हळूच काढून त्यावर घड्याळ चढवले ना? खी. खी.. खी…”, नारुतात्या तेवढ्यातही आपली विनोदबुद्धी पाजळत.
“गपा हो नारुतात्या! अहो बारामतीकर, दारूने समाजाचे नुकसान होते, समाजविघातक आहे ही दारू आणि तिचा असा उदोउदो केला जावे जे काही पटत नाही!”, चिंतोपंत नागपूर विनाकारण चर्चेत आल्याने कळवळून जात.
“हा! असे म्हणा की मग काहीतरी मुद्दा घेउन, उगाच राजकीय चिखलफेक करण्यात काय आहे?”, इति बारामतीकर.
“बरं बुवा! दारूने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, होत आहेत आणि होत राहतीलच, त्यामुळे दारू समाजविघातक आहे ह्यावर काय म्हणणे आहे तुमचे? ”, नारुतात्या सिरीयस होत.
“अहो नारुतात्या, कुठल्याही गोष्टीला तारतम्य असावे लागते की नाही, दारूचेही तसेच आहे, तारतम्य न पाळता दारू ढोसल्यास विनाश हा होणारच. पण त्यामुळे दारूवर सरसकट बंदी घालणे जरा आततायीपणाचे आणि मूर्खपणाचे लक्षण आहे, ह्यावर काय काय म्हणणे आहे तुमचे?”, बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका चर्चेत सामील होत.
“भले शाबास! बहुजनह्रदयसम्राट, देशात जनतेला खायला अन्न नाहीयेय! त्यामुळे त्यांच्या दोन वेळेच्या अन्नाची सोय बघायची की दारुचा महापूर आणायचा? गरज कशाची आहे?”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत.
“अहो तसे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत देशात, नव्हे एकंदरीतच जगात, म्हणून काय बाकीचे सगळे सोडून द्यायचे का?”, भुजबळकाका शांतपणे.
“हे बघा बहुजनह्रदयसम्राट, वाईनर्या बांधुन कितपत समाजकल्याण साधले जाणार आहे ?”, चिंतोपंत जरा तडकून.
“गरीबाला भाकर तुकडा,शेतकर्याच्या मालाला रास्त भाव, समाजकल्याण हे सर्व मुद्दे बरोबर आहेत पण त्यांचा दारु बनविणे आणि न बनविणे किंवा त्यासाठी परवाने देणे ह्याच्याशी थेट संबंध जोडणे म्हणजे जरा भावनिक किंवा सेन्टीमेन्टल होते आहे, व्यावहारिक नाही. व्यावहारिक पाताळीवरुनही विचार करून बघा जरा!”, भुजबळकाका ठामपणे .
“वा रे व्यावहारिक, अहो संस्कृति नावाचा काही प्रकार आहे की नाही? आपल्या हिंदू संस्कृतीत हे बसते का?”, घारुअण्णा चिडून.
“कोणत्या संस्कृतीच्या गप्पा सांगता आहात तुम्ही घारुअण्णा? रामायण आणि महाभारतातही दारू प्राशन केल्याचे दाखले आहेत, तेही एक प्रथा म्हणून प्राशन केल्याचे.”, भुजबळकाका हिरीरेने, “आणि बहुजनांच्या संस्कृतीचा तर तो आजही भाग आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये दारूचे स्थान मानाचे आहे.”
“अरें देवा! विश्वेश्वरा बघ रे बाबा तुच आता. धर्मच बुडवायाचा प्रयत्न आहे हा, म्हणून तर घोर कलियुग आले आहे असे म्हणत होतो मी, ते काही खोटे नाही!”, घारुअण्णा हताश होत .
“डोंबलाचे कलीयुग! अहो लोकांनी, दारु कशी पिउ नये व कशी प्यावी, हे समजावून घेतले की झाले, त्याचीच गरज फक्त, बास्स!”, भुजबळकाका.
“अहो भुजबळकाका, हे तर दारूचे उदात्तीकरण झाले असे नाही का वाटत?”, चिंतोपंत.
“नाही चिंतोपंत, उदात्तीकरण नाही वाटत मला तरी!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून.
“हो, हे वाटणे खूप सापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणजे तुम्ही नेमके कसे आणि काय बघता ह्यावर ते अवलंबून आहे.”, सोकाजीनाना मंद हसत, “म्हणजे असे बघा, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा दोन बाजू प्रत्येक गोष्टीला असतात. अगदी प्रत्येक मानवनिर्मीत आणि नैसर्गिक गोष्टीला सुद्धा. आपण त्या गोष्टीकडे कुठल्या बाजूने बघतो, म्हणजे आपली सापेक्षता काय आहे ह्यावर, काय दिसणार हे अवलंबून आहे. आता बघा, सूर्यही नैसर्गिक गोष्ट आहे पण त्यालाही एक बोचरी आणि मानवासाठी हानिकारक बाजू आहे!”
“काय बोलताय काय सोकाजीनाना, हे काही पटत नाही ब्वा!”, नारुतात्या बुचकळ्यात पडून.
“सूर्याच्या उष्णतेमुळे घाम येतो आणि घामामुळे शरीराला दुर्गंध येतो तसेच काताडीचा रंग काळा पडतो ही सूर्याची एक दुसरी बाजू आहे की नाही. पण त्यामुळे आपण सूर्याला झाकून टाकण्याचा वेडेपणा करतो? तर नाही. त्यावर उपाय शोधतो. तसेच आहे, जे भुजबळकाका म्हणत आहेत ते. अहो ज्यांना ती भावते ते पितात, ज्याला जी परवडते ती तो पितो. जे तारतम्य ठेवून पितात ते त्यातला आनंद लुटतात, ज्यांना त्यातली मर्यादा कळत नाही आणि पाळता येत नाही ते बहकले जातात आणि त्याचे दुष्परिणाम तेच भोगतात. त्यावर तुम्ही आम्ही कोण संस्कृतीरक्षक बनून पोलिसिंग करणारे? ज्याचे त्याला ठरवू देत की काय करायचे ते. राहीला मुद्दा ह्यातल्या राजकारणातला, तर तुमच्यात धमक आहे ते परवाना राजकारण थांबविण्याचे? मग उगा बोंबाबोंब कशाला?”
“अहो, त्या दारुताही काहीतरी मजा असेलच की, उगाच नाही तो गालिब म्हणून गेला ‘ला पिला दे साकियां, पैमाना पैमाने के बाद’. फार कशाला आपले केशवसुतही म्हणून गेलेत ‘काठोकांठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळूं द्या ! ’ ” सोकाजीनाना मिश्कील हसत.
“अहो घारूअण्णा असे डोळे फाडून काय बघता आहात, मी काही ‘एकच प्याला’ मागवणार नाहीयेय आता, चहाच हवा ब्वा आपल्याला! चला तर आपला चहा मागवा कसें!”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत.
घारुअण्णांनी हसणे आवरात चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.
वाचने
22804
वाचनखूण
प्रतिक्रिया
128
वादळ
रच्याकने
क्या बात. मंडळी ऑन डिमांड हजर
In reply to क्या बात. मंडळी ऑन डिमांड हजर by गणपा
येथे ज्यांची खुमखुमी जिरली
छ्या ...
In reply to छ्या ... by जेनी...
आस्सं कस्सं वो पूजातै, आमी तं
दारु-सोडा
In reply to दारु-सोडा by तिमा
ऑब्जेक्शन
In reply to ऑब्जेक्शन by मी-सौरभ
हो सौरभशेठ मराठी भाषेत त्याला
In reply to हो सौरभशेठ मराठी भाषेत त्याला by llपुण्याचे पेशवेll
'चखना' बरोबर.
“नाही चिंतोपंत, उदात्तीकरण
In reply to “नाही चिंतोपंत, उदात्तीकरण by मदनबाण
"बाणा..बाणा... किती क्लेश
गरिब जनतेलाहि या फळांच्या
In reply to गरिब जनतेलाहि या फळांच्या by जेनी...
होय ना.
In reply to होय ना. by श्री गावसेना प्रमुख
सेनापती
In reply to सेनापती by चिंतामणी
अंत्योदय १०
In reply to अंत्योदय १० by श्री गावसेना प्रमुख
पांढरे कार्ड २
In reply to पांढरे कार्ड २ by चिंतामणी
समाजाच्या भल्यासाठी आम्हाला
आंग आश्शी!!!
In reply to आंग आश्शी!!! by पिवळा डांबिस
:)
In reply to :) by सोत्रि
चला सोकाजी नाना आता स्वताच्या मुलांच्या हातातही दारु देणार तर?
In reply to चला सोकाजी नाना आता स्वताच्या मुलांच्या हातातही दारु देणार तर? by निश
प्रश्न सोकाजीनानांना आहे.
In reply to प्रश्न सोकाजीनानांना आहे. by गवि
गविसाहेब,माझ हे विचारण सगळ्यानाच होत.
In reply to गविसाहेब,माझ हे विचारण सगळ्यानाच होत. by निश
करायची वेळ येते तेही विषेशतहा
In reply to करायची वेळ येते तेही विषेशतहा by गवि
गवि साहेब, हरकत नाही सत्य सिध्द व्ह्यायला वेळ हा लागतोच.
In reply to गवि साहेब, हरकत नाही सत्य सिध्द व्ह्यायला वेळ हा लागतोच. by निश
मुलं घरच्यांना विचारुन दारु
In reply to मुलं घरच्यांना विचारुन दारु by जेनी...
पूजा पवारजी, म्हणुन तुम्ही माझे व गविसाहेबांचे प्रतिसाद परत वाचा
In reply to पूजा पवारजी, म्हणुन तुम्ही माझे व गविसाहेबांचे प्रतिसाद परत वाचा by निश
निश ,विचरुन म्हणजे ,त्यांना
In reply to निश ,विचरुन म्हणजे ,त्यांना by जेनी...
हज्जारदा सहमत!!
In reply to करायची वेळ येते तेही विषेशतहा by गवि
पुन्हा बाडिस
In reply to प्रश्न सोकाजीनानांना आहे. by गवि
बरोबर
In reply to चला सोकाजी नाना आता स्वताच्या मुलांच्या हातातही दारु देणार तर? by निश
निश,
In reply to निश, by सोत्रि
पहिल्या ओळीपासुन ते शेवटच्या
In reply to पहिल्या ओळीपासुन ते शेवटच्या by जेनी...
शेवटचं वाक्य झकास बोललात.
In reply to निश, by सोत्रि
सोत्रि साहेब, नक्कीच तुम्ही तस करु नका.
In reply to सोत्रि साहेब, नक्कीच तुम्ही तस करु नका. by निश
निश तुमची तळमळ समजते आहे.
In reply to सोत्रि साहेब, नक्कीच तुम्ही तस करु नका. by निश
राहता राहीला प्रत्येक देशातील कल्चर चा मुद्दा तर..
In reply to राहता राहीला प्रत्येक देशातील कल्चर चा मुद्दा तर.. by निश
माझा पूर्ण विराम.
In reply to माझा पूर्ण विराम. by सोत्रि
सोत्रि साहेब्,माझाही पूर्ण विरामच.
In reply to सोत्रि साहेब्,माझाही पूर्ण विरामच. by निश
निश तुला माझ्याकडुन एक
In reply to निश तुला माझ्याकडुन एक by जेनी...
सोत्रिअण्णांआ चहा आणि
In reply to निश, by सोत्रि
+१
In reply to +१ by दादा कोंडके
बाहेरख्यालीपणा...
In reply to बाहेरख्यालीपणा... by सोत्रि
सोत्रि साहेब, माफ करा पण..
In reply to सोत्रि साहेब, माफ करा पण.. by निश
=))
In reply to =)) by सोत्रि
सोत्रि साहेब, दारु ह्या विषयावर पूर्णविराम ठरला होता.
In reply to सोत्रि साहेब, दारु ह्या विषयावर पूर्णविराम ठरला होता. by निश
निश यांचे प्रतिसाद वाचून वार्
In reply to बाहेरख्यालीपणा... by सोत्रि
हम्म...
In reply to बाहेरख्यालीपणा... by सोत्रि
माझ्या मते बाहेरख्याली पणा,
ज्या गोष्टी मला आनंद देतात त्या अनुभवांपासून माझ्या मुलांनी वंचित रहावे हा दुटप्पीपणा झाला, जो मला मान्य नाही.
तुम्हाला ज्या गोष्टी आनंन्द देतात त्या गोष्टींनी तुमच्या मुलालाही आनंन्द मिळेल हे कशावरुन
In reply to माझ्या मते बाहेरख्याली पणा, by श्री गावसेना प्रमुख
अरे कसला फुकाचा शब्दछल चालवला
In reply to अरे कसला फुकाचा शब्दछल चालवला by गणपा
पोराच्या तोंडात बाटली रिकामी
In reply to पोराच्या तोंडात बाटली रिकामी by श्री गावसेना प्रमुख
मोठा झाल्यावर यातच आलं.
मोठा झाल्यावर
यातच आलं.In reply to मोठा झाल्यावर यातच आलं. by गणपा
मोठा
मोठा
म्हणजे ३५/ ४०चा नव्हे, जो पर्यंत त्याला बापाची गरज असते तेव्हढा मोठा. म्हणजे तो २०/२५ वर्षा चा झाल्यावर त्याने तुमच्या समोर घेतली तर तुम्हाला चालेल का?In reply to मोठा by श्री गावसेना प्रमुख
खाली गविंनी आणि पेठकरकाकांनी
In reply to खाली गविंनी आणि पेठकरकाकांनी by गणपा
पुर्णविराम माझ्याकडुन
In reply to पोराच्या तोंडात बाटली रिकामी by श्री गावसेना प्रमुख
तो मोठा झाल्यावर तुम्हाला
In reply to माझ्या मते बाहेरख्याली पणा, by श्री गावसेना प्रमुख
गा. प्रमुख,
In reply to गा. प्रमुख, by सोत्रि
हो ना वाचले ,पण धाकट्याच काय्
In reply to बाहेरख्यालीपणा... by सोत्रि
अरे हे वाचलच नाही!
In reply to अरे हे वाचलच नाही! by दादा कोंडके
अरे हे ही वाचलच नाही!
In reply to अरे हे ही वाचलच नाही! by सोत्रि
त्यांच म्हणने चांगले वाईट हे
आवडले
समयोचित
थोडी थोडी पिया करो
हेच
विषय आणि आशय जुळत नाहित असे वाटतेय
मस्त चर्चा
हाहाहाहा
In reply to हाहाहाहा by मी_आहे_ना
हतबद्ध म्हतले आहे हातबद्ध
In reply to हाहाहाहा by मी_आहे_ना
हतबद्ध नाही हतबुद्ध हो बाकी
In reply to हतबद्ध नाही हतबुद्ध हो बाकी by बॅटमॅन
खीक
In reply to खीक by मी_आहे_ना
हाओ तर! बिनदुधाचे ग्रीन टी
In reply to खीक by मी_आहे_ना
चालेल आम्हाला नेहमीप्रमाणे
In reply to चालेल आम्हाला नेहमीप्रमाणे by llपुण्याचे पेशवेll
>>>>कोणी दारू घेत असेल तर
In reply to >>>>कोणी दारू घेत असेल तर by प्यारे१
प्यारेकाका,
In reply to प्यारेकाका, by गवि
दारुपासून लांब राहणं तुम्हाला
In reply to प्यारेकाका, by गवि
@हे मोजण्याची सुरुवात + गिल्ट
In reply to >>>>कोणी दारू घेत असेल तर by प्यारे१
टेस्टमध्ये पास झाल्यावर
In reply to टेस्टमध्ये पास झाल्यावर by गणपा
जोपर्यंत
In reply to टेस्टमध्ये पास झाल्यावर by गणपा
हि(च) हि(च) हि(च)
In reply to हि(च) हि(च) हि(च) by जेनी...
ओ ऽ ऽ तुला ऽ लागली कुनाची
In reply to ओ ऽ ऽ तुला ऽ लागली कुनाची by बॅटमॅन
टपलेलाच असतो कैबे माझ्या
In reply to टपलेलाच असतो कैबे माझ्या by जेनी...
=))
निश यांच्याशी सहमत आहे. दारू
In reply to निश यांच्याशी सहमत आहे. दारू by llपुण्याचे पेशवेll
बिन्गो!
In reply to बिन्गो! by सोत्रि
"मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी"
In reply to "मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी" by बॅटमॅन
व्वा काय आठवन केलीत.
In reply to व्वा काय आठवन केलीत. by सोत्रि
च्यामारी या गुगल वैतागलेला,
In reply to व्वा काय आठवन केलीत. by सोत्रि
च्यामारी या गुगल वैतागलेला,
In reply to व्वा काय आठवन केलीत. by सोत्रि
त्यातले किस्से लै भारी आहेत