तुझी पुलावर आठवण येते... एका गीताची ओळख .. राग पूलबहार

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
6 Sep 2012 - 3:40 pm

हिमशिखरांतून खळखळ गाते
मनमंदीर तर झगमग झुलते

कुणास कोणी हरवून जेते
तुझी पुलावर आठवण येते.
----

काव्यजालिंदरसार , सर्ग २५, ऋचा ५१

काही घटना अशा असतात की मनावर त्यांचा जो परिणाम होतो तो पुसता येत नाही... कितीही काळ गेला तरी. हिमशिखरे , हिरवळ, खळाळत वाहणारी नदी, डोंगरउतार , नदी पार जाण्यासाठीचा लोखंडी पूल... असं दृश्य समोर आलं की मन आठवणीत हरवून जातं. तिच्या आठवणी, नदीच्या आठवणी ,पुलाच्या आठवणी.. असो... पुलबहार रागाची ही परफ़ेक्ट सिचुएशन.
या पुलबहार रागाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं " तुम याद ना आया करो".. त्याचं हे गाणं लोकांना कमी माहित असलेलं ( विस्मृतीतच गेलेलं म्हणा ना..)

http://www.youtube.com/watch?v=JWHqAFXCqH0

गीतगायनासाठी साक्षात हिंदकेसरी शब्बीरकुमार आणि लता ; म्हणजे पुढे बोलायची गरजच नाही. शब्बीरच्या कठीण गायकीपुढे लता अगदी तोडीस तोड गायली आहे; दादच द्यायला हवी.

लक्ष्मी प्यारेंनी या गाण्यासाठी पुलबहार रागाचा वापर केला आहे. जनमेजयाने लिहिलेल्या "बोलीगीतसार" या ग्रंथात या रागाचा प्रथम उल्लेख सापडतो.
(पुलावरली गाणी , डुंबनदीचे प्राक्तन , हिरवळीवरील हिंमत या नावाने फ़क्त पुलबहार रागातल्या गाण्यांचे काही म्यूझिक विडिओ नुकतेच प्रकाशित झाले. त्यांची ओळख पुन्हा केव्हातरी.)या रागा च्या नावाची गंमत आहे. पूल बहार किंवा पुल् आउट या अर्थाने ही काही गाणी वापरली गेली आहेत. पण याबद्दल तज्ञांमध्ये वाद आहेत, त्यावर पुन्हा केव्हातरी. :)

विशेष उल्लेख या गाण्याच्या कोरिओग्राफीचा... नृत्यदिग्दर्शनात काय असणार आहे असून असून . उगीच कौतुक करायचं झालं; असं वाटेल काहींना. पण या गाण्यातला प्रत्येक पदन्यास अफ़लातून. विशेषत: नृत्य शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास करावा अशा काही अदा आहेत यात. .राज बब्बर म्हणजे अत्यंत अंडररेटेड अभिनेता. ऎंशीच्या दशकात त्याने जो थोर अभिनय केला तो आता पहायला मिळणं कठीण.आपला राज बब्रू डोळे वटारून उत्तम अभिनय करताना तुम्हाला नेहमी आवडतोच पण यात प्रेमाच्या काही मोहक अदा दाखवल्या आहेत पठ्ठ्याने. की वा रे माझा बब्रू; अशी दादच द्यावी. काय तो सुंदर पोषाख आणि केशरचना , काय त्याचं ते पुलावर त्याच्या स्त्रीची वाट पाहणं, पुलाच्या तारांवर आडवे झोपून प्रेम, नदीकिनारीचे मोहक पदन्यास, आपल्या स्त्रीला पायाने कवेत घ्यायची मोहक कसरत,तिच्या मोकळ्या केसांत त्याने स्वत:ला गुंतवणे, ये हृदयीचे ते हृदयीची ऎक्शन वगैरे वगैरे.... आणि शेवटचं त्याचं ते डोंगरउतारावरून धावत येणं... खल्लास.. शब्द संपले.

जरूर पहा...
पुलबहार रागाच्या प्रेमातच पडाल.

नृत्यसंगीतसंस्कृतीबालकथाबालगीतवाङ्मयइतिहास

प्रतिक्रिया

=))

जालिंदरबाबा की जय हो.

महेश हतोळकर's picture

6 Sep 2012 - 4:31 pm | महेश हतोळकर

धन्य हो सरजी! कंबलबहार झालं, पूलबहार झालं. आता पुढे?
क्लासच्या अ‍ॅडमिशनसाठी कधी भेटू?

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Sep 2012 - 4:42 pm | बिपिन कार्यकर्ते

च्या**! =))))))))))))))

सूड's picture

6 Sep 2012 - 4:47 pm | सूड

गुणी गायकांचं गाणं ऐकायला चांगलं वाटलं.

अन्या दातार's picture

6 Sep 2012 - 4:48 pm | अन्या दातार

मेलो मेलो. अरे या पुलावरुन उडी मारुन जीव देईल कुणीतरी. काय महती वर्णावी या रागाची.
मास्तर, दंडवत स्वीकारा. :)

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग !

डोस्क हाय का बागाईत !! दंडवत !!!

मन१'s picture

6 Sep 2012 - 5:24 pm | मन१

असाच पूर्वी http://www.misalpav.com/node/8819 हे वाचून मेलो होतो.
तुमचाच "कंबलबहार" राग.
व्वा.

मूकवाचक's picture

6 Sep 2012 - 5:30 pm | मूकवाचक

=))

नवनवीन रागांची ओळख करून देण्यासाठी आपण जी लेखमालिका चालू केलीत त्याबद्दल पुन्हा आभार मानत नाही.
या गाण्याचे विशेष प्रेम असल्याबद्दल आपण एकदा उल्लेख केला होता.
लताजींनी या गाण्यासाठी बराच रियाज केल्याचे जाणवते तर शब्बीर कुमार यांचे गाणे हृदयातून आलेले न वाटता सहजपणे बेंबीच्या देठातून आलेले वाटत आहे. माझ्यासारख्या गाण्यातले ओ कि ठो न समजणार्‍यांनाही या गाण्याने भूल पाडली आहे. एक अनमोल भेटच आज 'अधिक भाद्रपद कृ ६ भरणी' या शुभदिवशी दिलीत असे म्हणायला हरकत नाही.

कॉमन मॅन's picture

6 Sep 2012 - 6:48 pm | कॉमन मॅन

फर्मास लेख..

>>शब्बीरच्या कठीण गायकीपुढे लता अगदी तोडीस तोड गायली आहे; दादच द्यायला हवी.

हे सर्वात मस्त..:)

भडकमकर मास्तर's picture

6 Sep 2012 - 6:54 pm | भडकमकर मास्तर

आत्ताच व्यनि मध्ये खूप होतकरू नृत्यकला विद्यार्थ्यांचे निरोप मिळाले..

राजचे काही फोटो दाखवा... फोटो दाखवा.. वगैरे वगैरे...
थोडी झलक म्हणून हे फोटो चढवत आहे .. पण प्रत्यक्ष विडीओची सर या फोटोंना नाही...

ये हृदयीचे ते हृदयी...

डोंगर उतारावरची धाव

पूलबहार

दिल खेचक नृत्यकल्लोळ

आनन्दा's picture

6 Sep 2012 - 7:29 pm | आनन्दा

हहपुवा :)

तिमा's picture

6 Sep 2012 - 8:35 pm | तिमा

मास्तर, तुमचे किती उपकार मानायचे ? हा धागा तुम्ही काढला नसता तर या सुंदर गाण्याला, कोरिओग्राफीला आणि नृत्यनिपुण हिरो व हिरवीणीच्या अत्युच्च अदाकारीला आम्ही मुकलो असतो!
अगदी सुरवातीलाच ती 'पा, पा, पा करत आपल्या डोक्यावरुन उडी मारते त्यामुळे थ्रीडी इफेक्ट आला. त्यानंतर त्या पुलावरच्या कठड्यावर आणि खाली लीलया उड्या मारुन तिने आपले शरीरचापल्य दाखवले आहे. केसांची लांब पोनी तर घोड्याच्या केसांसारखी डौलात उडत असते. त्या थोर, गरीबांच्या मिथुन चक्रवर्तीला (मिथुनला गरीबांचा अमिताभ म्हणत आणि बब्बरला गरीबांचा मिथुन) इतकं सुंदर नाचता येत असेल अशी पुसटशीही कल्पना नव्हती.
लक्ष्मी-प्यारेंनी पण काय ठेका लावला आहे. अगदी आपल्या डोक्यावरच कोणी ताल धरलाय असं फिलिंग आलं. पण काही म्हणा, लताबाईंना शब्बीरच्या आवाजाची खोली नाही गाठता आली.
अवांतर : का कोणास ठाऊक, पण या गाण्यात राज बब्बर थोडा किरीट सोमैय्यांसारखा दिसतोय!

पैसा's picture

6 Sep 2012 - 8:36 pm | पैसा

कोणीतरी या गाण्याचं भयानक रसग्रहण केलेलं आठवतंय.

http://www.youtube.com/watch?gl=US&v=CKvxAUxrto0

या लिंकवर साधारण २.४५ मिनिटांत राज ड्फ्फर हिरवीणला उचलतो आणि मग ती हिरवीण त्याला गुडघ्याने मारते तो प्रकार भयानक आहे. संगीत आणि इतर बाबींबद्दल काय बोलावे?

देवा तू पाव!

भडकमकर मास्तर's picture

6 Sep 2012 - 8:52 pm | भडकमकर मास्तर

राज ड्फ्फर हिरवीणला उचलतो आणि मग ती हिरवीण त्याला गुडघ्याने मारते

या मार्मिक प्रसंगाचे फोटो काढले नाहीत... ह ह पुवा करणारे आहेत...
वर्णन करायचे झाले तर साधारणपणे हातापायीमध्ये स्वसंरक्षणासाठी आक्रमकावर प्रतिहल्ला करायच्या ज्या ज्या युक्त्या वापरल्या जातात त्यातली युक्ती ही स्त्री स्वतःच्या प्रियकरावर वापरते.... धन्य ती स्त्री आणि धन्य तो नाच...

पैसा's picture

6 Sep 2012 - 9:38 pm | पैसा

मास्तुरे, रसग्रहणासाठी १०/१० आणि संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी ११/१०!!!

रसग्रहंण परत एकदा वाचलं आणि हिंदकेसरी शब्बीरकुमार वगैरे वाचून परत एकदा हहपुवा झाली!

कवितानागेश's picture

7 Sep 2012 - 2:26 pm | कवितानागेश

हे प्रतिसाद वाचून आणि फोटु पाहून राहवेनाच.
मन हेलावले या गाण्यानी!!
वाचनखूण साठवतेय. ;)

त्या बिचार्‍या पुलाची दया आली.
काय काय सहन करावं लागलं बिचार्‍याला.
=)) =)) =)) =))

स्पंदना's picture

7 Sep 2012 - 7:04 am | स्पंदना

च्ब!
पुलकित करणारे गाणे अन पुलपुललीत लेख.

चौकटराजा's picture

9 Sep 2012 - 8:31 pm | चौकटराजा

शास्त्रीय संगीत नव्याने शिकण्याची सोय झाली. गौरी रागाचे प्रकार, कानड्याचे प्रकार, मल्हाराचे प्रकार कल्याणाचे प्रकार ऐकले होते. बहाराचेही हिंडोल ,बसंत , भैरव ई शी झालेले संकर ऐकले पण हे ज्ञान नव्याने मिळत आहे. मुलबहार ह्या रागात माँ मुझे अपने ऑचलमे छुपाले हे गीत आहे असे ऐकतो. त्यावर
जास्त प्रकाश टाकावा. याचे ही अनेक अनवट् उपप्रकार असून त्यात 'तेरा मुझसे है पहलेसे नाता कोई, 'बच्चे मनके सच्चे' ई गीते आहेत असेही ऐकिवात आहे.

जाई.'s picture

9 Sep 2012 - 9:52 pm | जाई.

=)) =))

जाई.'s picture

9 Sep 2012 - 9:53 pm | जाई.

=)) =))