जागो ग्राहक जागो - एक अनुभव

बाळ सप्रे's picture
बाळ सप्रे in जनातलं, मनातलं
30 Mar 2012 - 2:13 pm

दिड एक वर्षापूर्वीची गोष्टं..
टिपिकल ट्रॅप.. बिग बझार/ उत्सव प्रदर्शनात स्लिप भरलेली.. तिथे मिळवलेला फोन नं. वापरून फोन आला.. लकी ड्रॉ मध्ये तुमचा नंबर लागलाय.. ३ दिवस ४ रात्री हॉलिडे फ्री वगैरे वगैरे.. खरं तर फक्त टाइमपास म्हणून गेलो. ठरवलं होतं थोड ऐकायचं.. काय फ्री असेल तर घ्यायचं आणि परत फिरायचं..

भन्नाट दावे केलेले.. ज्या हॉटेल्सचा मार्केट रेट ७०००-८०००रु दर दिवशी आहे अशी हॉटेल्स ७००-८००रुपयात मिळतील.. ते पण फक्त "युटिलिटि चार्जेस"!! भारतात आणि परदेशात हजारो ठिकाणी टायअप्स्.. सर्व बुकिंग सेवा ऑनलाइन उपलब्ध.. परदेशात तर युटिलिटि चार्जेस दर आठवड्याला फक्त $१०० !! व्हिसा, तिकिट बुकिंग साठी हेल्प डेस्क आहेच.. १० वर्षाची मेंबरशिप होती.. ८०,००० आणि २० वर्ष-१,५०,०००

एवढे पैसे नक्कीच घालायचे नव्हते.. आम्ही परत फिरायच्या तयारीत..
तो म्हणाला तुमच्यासाठी खास ५ वर्षाचे फक्त ३५,५००

वाटलं एखादी सिंगापूर्/दुबई वारी केली तर होतीलं पैसे वसूल.. एअर टिकिट्स सुद्धा आजकाल १० हजाराच्या आत मिळतात.. एकंदरीत ७-८ दिवसाचा खर्च केसरी/सचिन पेक्षा खूपच कमी येतोय.. म्हटलं उद्या सांगतो..
पण त्याने मार्केटिंग वाल्यांचा हुकुमी एक्का टाकला.. ऑफरचा आजचा शेवटचा दिवस!!

आणि त्या बेसावधक्षणी अनपेक्षितपणे त्या विक्रेत्याच्या विपणन कौशल्याला बळी पडुन "सेंचुरियन स्प्रिंग हिल्स हॉलिडेज" ची ५ वर्षाची मेंबरशिप घेतली.
विक्रेत्यानं आपलं काम चोख पार पाडल होतं..

आता पाळी होती कस्ट्मर सर्व्हिसची..
फोन मेल करण्यापूर्वी बघु ऑनलाइन होतं का काम .. पहिला धक्का बसला.. साइटवर बुकिंग वगैरे काहीच लिंक सापडली नाही..
मग फोन केले.. मेल्स केली.. तारखा सांगितल्या आणि सिंगापूर हॉटेल्सची क्वोट्स मागवली.. पहिल्यांदा फोनवर "२-३ दिवसात हॉटेल्सकडून कन्फर्मेशन येइल.. आल्यावर कळवतो" अशी उत्तरं मिळाली.. मग फोनच कोणी उचलेना.. उचललाच तर "आत्ता बिझी आहे, थोड्यावेळाने फोन करतो/ते" अशी उत्तरं.. आणि परत फोन करणे वगैरे नाहीच.. एस्कलेट करायलाही काही वाव नाही.. फोन नं/ मेल आयडी काहीच नाही.. कसाबसा त्या सेल्सवाल्याचा नंबर मिळवला.. त्याला गाठला.. तो धादान्त खोटं बोलला होता.. आता म्हणतो.. सिंगापूर?? दुबई?? तिथे आमचे टायअप्स् नाहीत.. त्या कस्टमर सर्व्हिसवाल्याना काहि माहित नाही!! तुम्ही इकडे जा.. तिकडे जा.. हे छान आहे.. ते छान आहे..

म्हटल तुम्हाला वाटत तिथे जायला नाही घेतलीय मेंबरशिप ..माझे पैसे परत करा..
आता कॅन्सलेशन शक्य नाही.. अ‍ॅग्रीमेंट वाचा.. घेतल्यापासून २४ तासाच्या आतच कॅन्सलेशन करता येतं.

आणखी धक्का!!

काही दिवसांनी वाटलं महाबळेश्वर/माथेरान ई. ट्राय करु..
त्याची क्वोट्स मागवली.. आता मात्र लगेच रीप्लाय.. ८-१० हॉटेल्सचे रेट्स पाठवले होते.. जरा जीवात जीव आला..सहज म्हणून त्यातल्या काही हॉटेल्सच्या साईट्स बघितल्या.. तर जवळजवळ तेच रेट्स.. ५०-१०० रु कमीच..
परत फोन केले.. ऑफिसमध्ये जाउन भांडलो.. कंझ्युमर कोर्टाची धमकी दिली..
काही फरक नाही..
उत्तर एकच.. आमचे हेच रेट्स आहेत.. हवे तर घ्या .

आता मात्र साफ कळून चुकलं की ही शुद्ध फसवणूक आहे.. पैसे बुडित खाती टाकले होतेच .. पण कुठलीही खरेदी/गुंतवणूक करताना काटेकोर असल्याचा अभिमान असल्यामुळे या फसवणूकीच दु:ख जास्त होतं..
ग्राहक मंच/ कोर्ट वगैरेसुद्धा काही अनुभव नसल्यामुळे नक्की कस पुढे जायच हे कळत नव्हतं.. पण काहीतरी पाउल उचलायची खुमखुमी मात्र होती.. पण एवढा वेळ्सुद्धा नाही .. साहजिकच पहिला विचार आला ऑनलाईन काही करता येत का पाहू..

बरचसं गुगलून बघितल्यावर खूप माहिती मिळाली.. त्यात संपूर्ण ऑनलाईन पर्याय मिळाला तो म्हणजे "ICRPC- International consumer rights protection council"
त्यांचे नियम खूपच स्ट्रिक्ट वाटले.. फोन करुन डिस्टर्ब करु नका, सतत स्टेट्स विचारु नका.. ६० दिवसांनंतर तुमची केस हाताळली जाईल वगैरे वगैरे.. पण एक गोष्ट महत्वाची वाटली की ICRPC च्या रेप्युटेशन मुळे बर्याच केसेस कंझ्युमर कोर्टात जाण्यापूर्वीच मिटवल्या जातात..
त्यांच्या सूचनेप्रमाणे यच्चयावत कागदपत्र ताबड्तोब पाठवून दिली आणि त्यानी नोटीस पाठवण्याची वाट पहात बसलो.. बरोबर ६० दिवसांनी मेलवर चौकशी केल्यावर कळले की कागदपत्रं त्यांना मिळालीच नाहीत.. त्यांचा पत्ता असा आहे कि तिथे कुरियर जात नाही (कासारवडवली, जि. ठाणे) म्हणून पाठवलेली साध्या टपालाने.. मग परत सगळी कागदपत्रे पाठवा.. यावेळी मात्र Regd. A.D.ने..

यावेळी मात्र ७ दिवसात मेल मिळालं "Legal Notice to Centurion" आणि एक आशेचा किरण दिसला.. आणि काय आश्चर्य दुसर्‍या दिवशी सेंच्युरियन एक्झिक्युटिव्ह्कडून फोन.. तुम्ही म्हणाल तिथे हॉलिडेज देतो, आपण भेटू, मी नवीन स्किम तुम्हाला सांगतो वगैरे.. पण यावेळी मात्र ठामपणे सांगितलं ३५५००+२०००० नुकसान भरपाईचा चेक घेउन येणार असाल तर या नाहीतर मला तुमच्याशी बोलयची इच्छा नाही.. पुढील कारवाईसाठी तयार रहा . तेही तुमच्या खर्चाने..
शेवटी ३५५००+९% व्याजावर तुकडा पडला.. चेक मिळाला.. पैसे खात्यात जमा झाले.. आणि सचिनला शंभरावे शतक झळकवल्यावर झालं नसेल इतक समाधान झालं..

आता आपल्या माहितीत तरी असं कोणी फसू नये म्हणून किंवा असल्यास योग्य दिशा दाखवावी म्हणून हा लेखप्रपंच !!

अर्थव्यवहारप्रवासजीवनमानमौजमजाशिफारससल्लाअनुभव

प्रतिक्रिया

मस्तच माहितीपूर्ण अनुभव...

संपत's picture

30 Mar 2012 - 2:22 pm | संपत

उपयुक्त लेख..

मिपा नियमीत वाचत चला.. असल्या गंडणार्‍या स्किम्स बद्दल पुर्वीही काही धागे येउन गेलेते.
ते वाचले असते तर हा मनस्ताप झाला नसता. :)
असो पैसे मिळाले. नशिबवान आहात.

आता आपल्या माहितीत तरी असं कोणी फसू नये म्हणून किंवा असल्यास योग्य दिशा दाखवावी म्हणून हा लेखप्रपंच !!

पण या बद्दल धन्यवाद बर का. :)

इरसाल's picture

30 Mar 2012 - 2:29 pm | इरसाल

आवडले.
पण ICRPC ची साइट उघडत नाहीये. तसे मला त्या साइट वर काम नाही पण कधी काळी लागले तर ......

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2012 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार

तोवर ह्यावरती काम भागवा.

इरसाल's picture

30 Mar 2012 - 2:40 pm | इरसाल

क्षणभर वाटले की विजुभो आहेत की काय ? (फटु देख्के)

पाषाणभेद's picture

30 Mar 2012 - 10:38 pm | पाषाणभेद

परा, आपण दिलेली साईट मुळ लेखकाने उल्लेखलेल्या साईटपेक्षा वेगळी आहे का?
बाळ सप्रेंनी साईट चा पत्ता द्यावा ही विनंती.

बाळ सप्रे's picture

2 Apr 2012 - 11:40 am | बाळ सप्रे

पराशेठनी दिलेली लिंक बरोबर आहे..

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2012 - 2:31 pm | परिकथेतील राजकुमार

शेवटी ३५५००+९% व्याजावर तुकडा पडला.. चेक मिळाला.. पैसे खात्यात जमा झाले.. आणि सचिनला शंभरावे शतक झळकवल्यावर झालं नसेल इतक समाधान झालं..

प्रचंड अभिनंदन.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारे ह्यातून काहितरी धडा घेतील आणि ठामपणे अशा लोकांविरुद्ध उभे राहतील अशी आशा करतो.

चिरोटा's picture

30 Mar 2012 - 2:50 pm | चिरोटा

माहितीपूर्ण लेख. जगात दोन प्रकारेच फुकट पैसा मिळतो- लॉटरी,जुगार वगैरे किंवा देणगी स्वरुपात.ह्या बहुतांशी स्कीम्स असतात त्या 'बकरा' कापण्यासाठीच बनवलेल्या असतात.

यकु's picture

30 Mar 2012 - 2:52 pm | यकु

अभिनंदन!

पैसा's picture

30 Mar 2012 - 2:58 pm | पैसा

अभिनंदन आणि धन्यवाद! इथे सगळ्यांना सांगितल्याबद्दल.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Mar 2012 - 3:09 pm | अत्रुप्त आत्मा

आंम्ही एकदा(च) गंडता/गंडता वाचलेलो आहे,तेंव्हापासुन आजतागायत कुठेही कोणिही स्किम/फ्री/एम एल एम/नेट मार्केटिंग- असे शब्द जरी वापरले तरी काढता पाय घेतो... आणी मागे लागले तर त्यांचा काढतो...

"लकी ड्रॉ", "फ्री", "ऑफर" हे रेड फ्लॅग शब्द आहेत. लगेच अंगठा लाल बटणवर नेऊन फोन कॉल तोडायचा.. अगदी शिष्टाचारही नाही पाळला तरी चालेल..

चेक परत मिळाला हे नशीबच.. अनुभव चांगल्या प्रकारे लिहिला आहेत.

Madhavi_Bhave's picture

30 Mar 2012 - 3:41 pm | Madhavi_Bhave

अभिनंदन फारच उपयुक्त लेख. आपल्याला कोणी फसवले तर काय मानसिक त्रास होतो ह्याचा अनुभव आहे. म्हणून मनापासून अभिनंदन. मी गेल्या सोन वर्ष पासून सदस्त्य आहे पण मराठी कसे लिहायचे तेच काळात नव्हते. हा माझा पहिलाच अभिप्राय आहे. मिसळपाव मी मना पासून वाचते. खूप चं लेख असतात जे वाचून मनाला उभारी येते. माधवी

पिंगू's picture

30 Mar 2012 - 4:34 pm | पिंगू

अभिनंदन.. शेवटी काय झगडल्याशिवाय काहीच मिळत नाही.

- पिंगू

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2012 - 5:34 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद थोडा अश्लिलतेकडे झुकणारा वाटला.

संस्कृतीरक्षक
परा

इष्टुर फाकडा's picture

30 Mar 2012 - 8:32 pm | इष्टुर फाकडा

आडवा !!!!

अमितसांगली's picture

30 Mar 2012 - 5:23 pm | अमितसांगली

चांगली माहिती दिलीत...पण सुशिक्षित लोकही अशा भूल-थापांना बळी पडतात हे वाचून धक्का बसला....असो....

मराठी_माणूस's picture

30 Mar 2012 - 8:23 pm | मराठी_माणूस

"फुकट जेवण" अस्तित्वात नसते हे लक्षात ठेवले की अशा मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ येत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2012 - 9:09 pm | प्रभाकर पेठकर

चांगली उपयुक्त आणि मार्गदर्शक माहिती.

मी तर पहिल्यापासून ह्या लोकांपासून दूर राहात आलो आहे. पण मला वाटतं कधी ह्या फंदात पडायचे झालेच तर सर्व काही कागदावर आपल्या मनासारखे लिहून देत असतील तरच (लिहून दिल्या नंतरच) विचार करावा.

अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही चिकाटीने त्या फसवणूक करणार्‍या लोकांच्या मागे लागलात ते बरं झालं. तुम्हाला तुमचे पैसे आणि नुकसानभरपाई मिळाली त्याबद्दल तुमचे अभिनंदन.

५० फक्त's picture

30 Mar 2012 - 9:19 pm | ५० फक्त

उत्तम माहिती , अभिनंदन आणि धन्यवाद.

रेवती's picture

30 Mar 2012 - 9:22 pm | रेवती

बरं झालं धडा शिकवलात कंपनीला.
फसवणूक आता बंद करतील या गोड गैरसमजात नाहिये पण असाही उपाय निघू शकतो हे आम्हाला आणि त्या लोकांना समजलं. अनुभव छान लिहिला आहे.

1. कोणतीही फुकट वस्तू तुमचा पैसा, वेळ आणि मनाची शांतता हिरावून घेऊ शकते.
२..खालील गोष्टी गुप्त ठेवा:
Pan # / आहार ID / पास्स्पोर्त # / Driving पेर्मित
३. आपला घराचा / मोबिल phone खालील संकेत स्थळावर जावून register करा
National do not call register http://ndnc.in/

4. आपला एमैल किंवा फोने नुम्बेर खाली प्रमाणे संकेत स्थळावर प्रकाशित प्रयाचा झाला तर करा
शबदा मध्ये किंवा (myemail at gmail.com or Phone # as nine eight...) असा प्रकाशित करा.

जाणकारांनी अजून काही असेल तर लीन्हावे.

इनिगोय's picture

2 Apr 2012 - 3:35 pm | इनिगोय

वेबसाईटला एक तळटीप आहे.

* This website is not affiliated to NDNC registry or Government of India

याचा अर्थ काय? इथे समस पाठवणे सुरक्षित आहे ना?

स्मिता.'s picture

30 Mar 2012 - 9:39 pm | स्मिता.

अश्या फसवणूक करणार्‍या लोकांकडूनन तुम्हाला पैसे परत मिळाले ही खरोखर आश्चर्यमिश्रीत कौतुकाची बाब आहे. त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि हा अनुभव येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

@ अमितसांगली:
सुशिक्षित लोकही अशा भूल-थापांना बळी पडतात हे वाचून धक्का बसला.
तुमचं बरोबर आहे. पण बर्‍याच वेळा हे फसवणारे लोक असा काही आभास निर्माण करतात आणि विश्वासात घेतात की सुशिक्षीत माणसालाही त्यात पटण्यासारखं वाटतं. अश्यावेळी अत्यंत सावध राहून वागणे बरे.

आणि चिकाटीने पैसे परत मिळवल्याबद्दल अभिनंदन!

ICPRC ची माहिती दिलीत, पण ज्यांनी फसवलं त्यांचीही दिली तर आधिक बरं.

'Centurion Spring Hills Resort' असा शोध घेतला तर हे संस्थळ सापडलं, लवासाशी संबंधित असावं (तरीच ;-) ).....

तुम्हाला गंडा घालणारी कंपनी हीच का? की त्यांच्या हॉटेल्सचं नाव वापरून व्यवसाय करणारे इतर कुणी नतद्रष्ट?

बाळ सप्रे's picture

30 Mar 2012 - 10:57 pm | बाळ सप्रे

हो तेच ते.. या हॉटेलवाल्यांचाच हा दुसरा धंदा आहे.. पण या हॉलिडे क्लबविषयी नेटवर काही माहिती नाही देत ते.. हा क्लब वगैरे Daelive.com शी संलग्न आहे.. Country club, club Mahindra हे सगळे याच पठडीतले..

इतक्या स्वस्तात महागाची वस्तु कोणी का देईल? हा विचार करायचा प्रत्येक वेळी.

सर्वसाक्षी's picture

30 Mar 2012 - 11:29 pm | सर्वसाक्षी

फुकटात कुणी हॉलिडे पॅकेज देईल हे तुम्हाला खरे कसे वाटले?

मला असे फोन येतात तेव्हा मी सराईतपणे सांगतो ' भेटायला अवश्य येईन. फक्त एकच अट. तुमच्या अशा सेमिनारला आलेले आणि एक पै न गुंतवता केवळ तुम्हाला भेटायला आले म्हणुन हॉलिडे पॅकेज उपभोगलेल्या फक्त ३ ग्राहकांची नावे आणि दूरध्वनी क्रमांक द्या'

मामला खतम!

दादा कोंडके's picture

31 Mar 2012 - 12:43 am | दादा कोंडके

आणि तुमचं पाठपुरावा करून त्यांना धडा शिकवल्यामुळे कौतुकही वाटतं.

एकदा अशा ठिकाणी गेलं की कुठल्याचं जाळ्यात आडकायचं नाही असं ठरवून गेलेली निगरगट्ट माणसंदेखील चेक देउन येतात. दरवेळी काहितरी नव्या क्लृप्त्या वापरून ही मंडळी आपल्यापेक्षा दोन पावलं पुढंच असतात. म्हणून कुठल्याही मॉलमध्ये मोबाइल नंबर देउ नये. कुठल्याही अनोळखी माणसाकडून फोन आल्यानंतर 'हा नंबर तुम्हाला कुठून मिळाला' याचं समाधानकारक उत्तर मिळाल्याशिवाय पुढचं बोलूच नये.

मला पण आलेल्या अशाच एका अनुभवाला एक वर्ष पुर्ण होतय. पण विषय वेगळा असल्यामुळे नविनच धागा टाकावा म्हणतोय. ;)

मोदक's picture

31 Mar 2012 - 1:06 am | मोदक

अगदी असाच अनुभव...

कोणत्यातरी टीनपाट हॉलीडे कंपनीने फोन करून त्रास द्यायला सुरूवात केली. तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये किचन अ‍ॅप्लायन्सेस चे फ्री गीफ्ट लागले आहे, त्याबरोबर २०,०००/- चे हॉलीडे व्हाऊचर पण मिळेल.

खूप टाळाटाळ करून एका शनिवारी (आई वडीलांसह) त्यांच्या औंध ऑफिसात गेलो.
बाबौ.. मासळी बाजार बरा. ३० / ४० टेबले, प्रत्येक टेबलाशेजारी ५ जण. ४ फ्यामिली आणि एक सेल्सवाली. विनाकारण गळेपडूपणा करत, "कुठे कुठे फिरता तुम्ही?", "इन्कम किती?" "आवडलेले ठिकाण कोणते?" असले प्रश्न विचारून आणि त्यांचे वेगवेगळे अल्बम दाखवून हैराण केले. मी अत्यंत शांतपणे दर १० / १५ मिनीटाला १ छोटा ग्लास कोल्ड्रींक संपवत सगळ्यांची मजा बघत बसलो.

ऑफर अशी होती की त्यांची ६० / ७० हजाराची मेंबरशीप १२ हप्त्यात घ्यायची

प्रश्नांची उत्तरे एकदम फ्लॅट टोन मध्ये देत होतो. उत्तरे ऐकून प्रश्न विचारणार्‍या कन्येचा चेहरा जास्ती पडत गेला.. :-)

प्रश्न - आप कारसे आए हो क्या.. पार्किंग ठीकसे मिला ना..?
मी - अ‍ॅप्रीशीएट यूवर कन्सर्न. (कार का बाईक हा प्रश्नच उद्भवू दिला नाही ;-))

प्रश्न - घर आपका खुद का है या रेंटेड..?
मी - पर्सनल डीटेल्स शेअर नही करूंगा.. आप प्लीज हॉलीडे व्हाऊचर के बारेमे बताईये.

प्रश्न - सर आपका पॅकेज कितना है..?
मी - दो वक्त का खाना निकलताहै, अमाऊंट नही बताऊंगा.

साधारणपणे २ तास सगळे सहन केल्यानंतर मी इंटरेस्ट नाही म्हणून सांगीतले.. कारण सांगीतले की ऑफर पटली नाही.. मला नक्की काय पटले नाही तेही शेवटपर्यंत सांगीतले नाही. ;-)

किचन अ‍ॅप्लायन्सेस म्हणून त्यांनी झकास प्याक केलेला एक मध्यम बॉक्स दिला.. मी पण निर्लज्जपणे बॉक्स तिथेच उघडून आत काय आहे (किंवा खरेच कांही आहे का..?) ते बघितले, आणि मगच तो घेवून आलो.

तिथे जमलेले बहुतेक पब्लीक सोशल प्रेशर मुळे या फसव्या कल्पनांना बळी पडते असा कयास आहे.

मन१'s picture

2 Apr 2012 - 12:19 pm | मन१

दिलेली उत्तरे आणि केलेली कृती नुसतीच भन्नाट नसून अनुकरणीयही आहे, इतरांनी बो९ध घ्याचा शी आहे.

कार्टं पयल्यापासून हुश्शार हो....! ;)

मोदक's picture

4 Apr 2012 - 7:15 pm | मोदक

आमच्या कार्टेपणाचे आणखी किस्से रायगडवारीत ऐकवीनच..

सोत्रि's picture

31 Mar 2012 - 1:05 am | सोत्रि

तिथे जमलेले बहुतेक पब्लीक सोशल प्रेशर मुळे या फसव्या कल्पनांना बळी पडते असा कयास आहे

+१ सहमत!

- (असल्या अनुभवातून एकदा गेलेला) सोकाजी

स्वाती दिनेश's picture

2 Apr 2012 - 1:36 pm | स्वाती दिनेश

चिकाटीने मागे लागून पैसे परत मिळवलेत, अभिनंदन!
स्वाती

सहज's picture

3 Apr 2012 - 8:56 am | सहज

हेच म्हणतो.

साबु's picture

3 Apr 2012 - 10:38 am | साबु

- तिथे जमलेले बहुतेक पब्लीक सोशल प्रेशर मुळे या फसव्या कल्पनांना बळी पडते असा कयास आहे

हेच म्हणतो...

ऋषिकेश's picture

5 Apr 2012 - 2:44 pm | ऋषिकेश

उपयुक्त माहिती.. आभार!