<गोवरी>
प्रेषक, यकु, Thu, 15/03/2012 - 15:11
खोपडीच्या मुळाशी किती जोर देशी
उगाच्या उगाची किती कुंथीशी
मानवाची नसे कोणतीही स्थिती
चूर्णे खा जराशी ठेवी ती उशीशी
जात जातीत भेदे अशी ती कशी
जळेना कळेना मढी जाळीशी
बाबारे कोरडे तरी तेच आहे
लिहिशी कविता तू ती कशाने अशी
यात ना काही तरी तू तोच आहे
पिसारा कशाला उगा दाविशी
करावे भरावे उणे तूच पाहे
खपावे मरावे गोवरी जाळताहे
(कविवर्यांशी ओळख नसल्याने धार मुद्दाम थोडीशी कमी केली आहे. ओळख असती तर लोकशिक्षण, मुक्त अभिव्यक्ती आणि लोकरंजन वगैरै वगैरै वगैरे सर्वव्यापी फालतूपणासाठी काही शब्द बदलता आले असते )
प्रतिक्रिया
भयानक-करुण-शांत?
एकाच दिवसात जास्त धागे तयार करणार्यांसाठी काहीतरी कायदा येणार होता म्हणे!
========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ
कथा ' बालकथा' बालगीत
कथा बालकथा बालगीत
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
यकुशेठ, काही खरं नाही
यकुशेठ,
काही खरं नाही राव.
पुण्यात या आता लवकर. मस्त कट्टा करू एक.
विडंबन झकासच.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।