सफर मै धुप तो होगी तुम चल सको तो चलो - भाग १

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in जनातलं, मनातलं
11 Oct 2011 - 6:08 am

"सफर मै धुप तो होगी तुम चल सको तो चलो" हि गझल जेंव्हा जगजित आणि चित्रा सिंग यांनी गायली तेंव्हा त्यांनी विचार ही केला नसेल कि त्यांच्या आयुष्या किती असे प्रसंग येतिल जे या ओळींची सत्यता दाखवतील.

२३ सप्टेंबर रोजी जगजीतसिग यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात मेंदुतील रक्तस्त्रावामुळे दाखल केल्याची बातमी वाचली आणि काळजाचा ठोका चुकला. खरतर जगजीतसिंगच्या गझला त्याच्या सुरुवातीच्या दिवसापासुन ऐकलेल्या चाहत्यांपुढे माझा आणि जगजीतसिंगच्या गझल चा परिचय फक्त ११ वर्षे जुना आहे. उन्हाळी सुट्टीमधे काकाच्या नव्या नेटकॅफे मधे जगजीतसिंगच्या दोन गझल (कोई मौसम ऐसा आए, प्यार का पेहेला खत लिखने में) वारंवार ऐकणारा मी कधी त्याचा चाहता झालो मलाच कळले नाही. त्यावेळेस माझ्याकडे जगजीतसिंगच्या जवळ जवळ सार्‍या गझल होत्या. कुठलीही गझल लाइव्ह इन कॉन्सर्टमधे ऐकली कि ती मिळवायची हा जणु छंदच लागला होता. पुण्यामधल्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे सगळ्यात स्वस्त तिकिट काढण्यासाठी किती उधार्‍या केल्या ते मला माझच माहित आहे. नाहितर इव्हेंट मॅनेजमेंटमधिल कुणाचीतरी ओळख काढुन तिकिट मिळवायची. अजुनही तो लाइव्ह इन कॉन्सर्ट चा आटापिटा आठवला कि हसु येते. पण समाधान पण वाटले कि आपण जगजितसिंग यांना गाताना याची देहि याची डोळा पाहिले नव्हे अनुभवले. बहुतेक लाइव्ह इन कॉन्सर्ट मधे जगजितसिंग ला भेटायची काही संधी मिळते आहे का हे हि पाहायचे. पण एकदा का जगजीतजींच्या आवाजात न्हाऊ लागल्यावर सगळाच विसरायला व्हायचं. त्यांच असच देहभान विसरुन प्रत्येकाला नॉस्टेल्जिक व्हायला लावणारी गझल म्हणजे "वो कागजकी कश्ती, वो बारिश का पानी".

मला आजही आठवते कि पुण्याच्या शेतकीमहाविद्यालयाच्या समोरील पोलिस मैदानात झालेल्या जगजितजींच्या मैफिलीत या गझल नंतर एक वयस्कर गृहस्थ सुरक्षारक्षकांच्या लक्षात येण्याच्या आधिच मंचावर चढले आणि जगजीतजींच्या गळ्यात हार घातला. हि गझल आहेही तशीच. प्रत्येकाला आपल्या बालपणाची आणि निरागसता नावाच्या भावनेची आठवण करुन देणारी. सुदर्शन 'फकिर' (1934 – 2008) या बेगम अख्तर साठी गाणी लिहिलेल्या शायरने हि गझल लिहिली आणि या शायरच्या पहिल्याच गझलने त्याला फिल्म फेअर चे पारितोषिक मिळवुन दिले. १९८२ साली जगजीतसिंग सुदर्शन फकिर यांना भेटले आणि त्या दोघांनीही एकमेकांची साथ अखेरपर्यंत सोडली नाही.

बहुधा २००१ साली टिवीवर जगजीतसिंगची लाईव्ह मुलाखत होती, आणि प्रेक्षकांना जगजीतसिंगशी प्रत्यक्ष फोनवर बोलण्याची मुभा मिळणार होती. बर्‍याच वेळानंतर फोन लागला आणि प्रथम कोणीतरी मी काय विचारणार आहे याचे तपासणी केली आणि फोन ट्रान्सफर झाला आणि जगजीतसिंग मधुर आवाजातील "नमस्कार" कानावर पडले आणि मी हरखुन गेलो. त्याच नादात मी मी पटकन बोलुन गेलो "मेरे पास आपकी ३३० गझल है|" त्यावर जगजीतसिंग हसुन म्हणाले कि मैंने तो ३५० गझल गायी भी नही है| मग मी जरा ओशाळुन म्हणालो मेरा मतलब लाईव्ह इन कॉन्सर्ट आणि अलबम मधल्या अशा दोन्ही मिळुन. मला आजही जगजितजींशी बोलल्याचे अप्रप वाटते. मी ऐकलेली जगजीतसिंग यांची शेवटची मैफल म्हणजे २००९ साली विधीमहाविद्यालयाच्या मैदानात झालेली मैफल. त्यावेळेसच जगजीतसिंग थकल्याची जाणिव होत होती.

मला तश्या आवडण्यार्‍या जगजितसिंगच्या बर्‍याच गझल आहेत पण मला आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो "उम्र जलवों मै बसर हो, ये जरुरी तो नही" या गझल चा.

उम्र जलवोंमे बसर हो, ये जरुरी तो नही,
हर शब्-ए-गम कि सहर हो ये जरुरी तो नही.
(आयुष्य दैदिप्यमानच असले पाहिजे हे जरुरी नाही, प्रत्येक दुखा:च्या रात्रीची सकाळ होईल, हे जरुरी नाही).

याच गझल मधे त्याने देवाच्या आराधनेबद्द्ल टिपणी केली आहे. आणि दारु देणार्‍या स्त्रीला (साकीला) चक्क चक्क देवाची उपमा दिली आहे. प्रथमदर्शनी हास्यास्पद वाटले तरी फार अर्थपुर्ण शेर आहे.

सबकी नजरोंमे हो साकी,ये जरुरी है मगर
सबपे साकी की नजर हो, ये जरुरी तो नही.
(सर्वच देवाकडे मागत असतात, देवाकडे पहात असतात त्यांच्या भावविश्वात, मनात देवच असतो. पण त्याच वेळी देवही त्यांच्याच कडे त्यांच्या मागण्याबद्दल विचार करत असेल हे जरुरी नाही)

किंवा याच गझल मधील पुढिल शेर ज्यात त्याने चक्क चक्क मशिदीतली बांग दिली आहे, ती म्हणजे नाबाद आहे. गझलची पहिली ओळ झाल्यावर आलेल्या त्या बांग मुळे अक्षरशः एखादा भाविक नमाज पढत असल्याचे दृश्य डोळ्यासमोर उभे रहाते.

शेख मस्जिद मै करता तो है सजदे लेकिन,
उसके सजदो मै असर हो ये जरुरी तो नही.
(जरी एखादा पुजा\नमाज करत असेल, याचा अर्थ असा नाही कि त्याच्या भावनेमधे एवढे बळ असेल कि देव्\अल्ला त्याचे साकडे ऐकेल अन त्याची इच्छा पुर्ण होईल.)

किंवा त्याच्याही पुढे एखादा प्रेमी आपल्या प्रेमिकेला आव्हान देतो.

नींद तो दर्द के बिस्तर पे भी आ सकती है,
उनके आगोश मैं सर हो, ये जरुरी तो नही.

या गझल चा प्रत्येक शेर स्वतः मधे एक तत्त्वज्ञान आहे. अशाच मला आवडणार्‍या इतर गझल म्हणजे - ठुकराओ अब के प्यार करो, मै नशे मैं हुँ
अब मै राशन कि कतारो मै नजर आता हुँ
आहिस्ता आहिस्ता
तेरा चेहरा कितना सुहाना लगता है
सुना था के वो आयेंगे अंजुमन मैं
आये है समझाने लोग
गम का खजाना तेरा भी है मेरा भी
बात निकलेगी तो फिर दुरतलक जायेगी.
अजनबी हर जगा हर डगर बेशुमार आदमी
हि न संपणारी यादी आहे. प्रत्येक गझल एकणार्‍याला त्याच्या आयुष्यातल्या एका भागाशीच पुन्हा परिचय करुन देते.

जगजीतसिंगच्या पुर्ण आयुष्यात त्याला साथ देणारी अर्धांगिनी चित्रा सिंग यांनीही आपल्या पतीसमवेत भारतिय गझल जगताला केलेले योगदान विसरता येणार नाही. या दांपत्याच्या आयुष्यातिल सर्वात मोठा आघात म्हणजे त्यांचा २१ वर्षाचा पुत्र विवेक एका मोटार अपघातात मारला गेला आणि त्यामुळॅ चित्रासिंग यांनी गाणे गायचे सोडुन दिले. त्यांचे भावविश्वच जणु कोसळुन गेले. चित्रासिंगचे वजन ४३ किलोपर्यंत घटले. फारच कृशपणामुळॅ चेहरा भकास दिसु लागला. त्या लोकांना टाळु लागल्या. त्यांचा गळ्यातुन स्वर बंद झाला आणि पुढील १४ वर्ष तो बंदच राहिला. एके दिवशी त्या जेंव्हा विवेकच्या फोटोकडे पाहत होत्या. त्यांना आठवले कि विवेकला त्या दोघांचा किती अभिमान होता. अन तेंव्हाच त्यांनी ठरवले कि पुन्हा गाण सुरु केले होते. पण इतकी वर्षे गाण बंद असल्यामुळे आवाजाला पुर्वी सारखी धार राहिली नव्हती. त्यामुळे त्यांनी रियाज सुरु केला होता. पण त्यांचे गाणे पुन्हा रंगमंचावर येण्याआधिच जगजितसिंग कालवश झाले. चित्रासिंग जगजितसिंग यांना आपला गुरु मानत. त्यांच्या मते जगजितसिंगच्या गाण्यामधे कारागिरी आणि हरकती कमी प्रमाणात असुनही त्यांचे गाणे मनाला भिडायचे. त्यांच्या लग्नाला ४३ वर्षे झाली होती. त्यांची जोडी गायन क्षेत्रात प्रसिद्ध झाल्यावर बर्‍याच संगितकारांनी त्यांची जोडी फोड्ण्याचा प्रयत्न केला पण दोघांनी सर्व निभावुन नेले.

(क्रमशः)

संगीतगझलसद्भावनाआस्वादलेखअनुभव

प्रतिक्रिया

लेखमालिकेचा पहिला भाग चांगला जमलाय.

सुंदर जमलाय हा भाग!!
पुढच्य भागाच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Oct 2011 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा अभिजीत..दा..अतिशय छान लेख लिहिलायत,,,मी पण जग्गुवेडाच आहे,आणी त्याच्या खुप मैफिलींना हजेरी लावलेला आहे...ते एक न संपणारं सुख असायचं,,,कागज की कश्ती असो नायतर त्यानी तोंडानी काढलेला घुंगरांचा पदन्यासाचा एखादा तोडा असो,,,ती अपल्यासाठी एक रम्य आठवणच आहे...जग्गु तसा खुप गमत्यापण होता,,त्याच्या लाइव्ह कॉमेंट्स अतीशय खळखळुन हसवायच्या,,,असाच एकदा बेवड्यांवरुन तो एक जोक सांगत होता जोक संपला आणी एका खोड्याळ श्रोत्यानी थम्सअपची बाटली मुद्दाम मधल्या उतरत्या जागेवरुन स्टेज कडे सोडली,,जग्गु जोक मधल्या पात्राला हताशी घेऊन लगेच बोल्ला-''अरे गुप्ताजी.....बोतल तो आ गई,,आप कब आओगे...!?'' आणी नंतर असा काही हशा उसळला की ज्याचं नाव ते...

जगजीतनी गायलेल्या अश्या किति सहज गम्य रचना सांगाव्या ,,,माझ्यावर एकेकाळी खुप प्रभाव टाकुन गेलेली १ अशीच प्रतिभाशाली रचना या निमित्तानी शेअर करतो---

''धुप मे निकलो घटांओंमे नहाकर दोखो,,,जिंदगी क्या है किताबों को हटाकर देखो''...

http://youtu.be/wfbKyaxQQt4

http://www.youtube.com/watch?v=wfbKyaxQQt4

काही निवडक आवडत्या क्रमश: पैकी एक.
वाट पहातोय.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Oct 2011 - 2:12 pm | llपुण्याचे पेशवेll

जगजित सिंग याना भावपूर्ण श्रद्धांजली. :)

सुरेख गझलीची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद! लेखमाला सुरू ठेवा. आम्ही वाट पाहतोय!

वाहीदा's picture

11 Oct 2011 - 5:14 pm | वाहीदा

मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको ...

डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे,
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुंचे,
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब ..
ना अंधेरा.. ना उजाला हो, ना अभी रात, ना दिन ..

जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आएं...
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको
मौत तू एक कविता है !

-गुलज़ार (चित्रपट- आनंद)

वरिल गुलजार यांचे शब्द श्रध्दांजली म्हणून लिहीत आहे तुमच्या पुढील लेखमालेची वाट पहात...

पैसा's picture

11 Oct 2011 - 11:28 pm | पैसा

जगजीतसिंगचा कुटुंबाबरोबरचा फोटो पाहताना कालवाकालव झाली काळजात.