करण आणि फ्रेण्ड्स ... भाग १२-१४

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
19 Aug 2011 - 11:32 am

आधीचा भाग ... http://www.misalpav.com/node/18868

भाग बारा

करणने सारी रात्र जागूनच घालवली. डोळ्यासमोर फक्त मेनकाचा चेहरा येत होता. आपण खरंच मेनकाला भेटणार आहोत? हे तो सतत मनाला पुसत होता. दहा बारा पिंच करायचे प्रयत्नसुद्धा झाले. सॅवियोनेही करणला दोनदा पिंच करून आपला हात साफ करून घेतला होता. हा जोक नाहिय हे पटवण्यासाठी करणने ‘तो ईमेल जंक असेल तर?’ असाही एक प्रश्न करणने उपस्थित केला. अन म्हणून तो पडताळण्यासाठी त्याने बॉलिवूडब्लॉग्सच्या "कॉण्टॅक्ट अस" टीमला ईमेल पाठवला. एकदोन तासानी त्यांच्याकडून रीप्लाय आला आणि तो ईमेल त्यांच्याकडूनच आल्याचे कळले. करणचा जीव भांड्यात पडला. रिप्लाय मध्ये पुन्हा अवॉर्ड कधी मिळणार असे त्याने विचारलेच. पण बॉलिवूडब्लॉग्सच्या टीमने करणला नव्या ईमेलची वाट पाहायचा तोच सल्ला पुन्हा दिला.

... ‘छ्या! वाट पाहणं केवढं कठीण काम असतं...’ करणने रात्री ३ साडेतीन वाजता सॅवियोला उद्देशून म्हटलेले हे शेवटचे शब्द. तळपाय वेगाने हलत होते. करण कॉम्प्युटरवर बसून इन्बॉक्स रीफ्रेश करत होता. "नवा ईमेल कधीही येईल... अगदी आत्ताही", असं तो ठणकावून सॅवियोला सांगत होता. सॅवियो मात्र, ‘उद्या शाळेत जायचंय, झोप आता’अशी विनंती कंटाळून करत होता तरी करणने मानलं नव्हतं. सॅवियोचं जांभया देत कसबसं अक्काबाईशी खोखो खेळणं चालू होतं. करणने त्यालाही झोपू दिले नव्हते.
साडेतीनला इण्टरनेट आपसूकच डिस्कनेक्ट झालं अन करण एम.टी.एन.एलला शिव्या देत पलंगावर आदळला.... सॅवियो केव्हाच झोपेत हरवला होता... पलंगावरही करणला झोप यायचा सवालच नव्हता....

... ‘आंखोमें तुम्हें बसा लिया’ मध्ये मेनकाच्या हातात हात घालून सेशेल्सच्या निळ्या समुद्रात भिजणारा अनुज कुठेतरी गायब झालेला होता ... त्याची जागा करणने घेतली होती... पुढचा तीन तासांचा हा नवा "प्यार का साथ" त्या अनुज कुमारच्या अनुपस्थितीतच आटोपला. क्लायमॅक्स मध्ये काळ्या हूडमधे चेहेरा लपवत मेनकाला गोळी घालणाऱ्या विलन कुलदीपसिंग च्या छातीवर ‘ब्लॅकवल्चर’ असं लिहिलेलं होतं, करणचा हात खेचत करणला मेनकापासून दूर नेणाऱ्या अनुजच्या वडिलांच्या जागी समीर दिसू लागला होता. समीरचे केस पांढरलेले होते... दूर सॅवियो अन सोलंकी मिस मागल्या एक्स्ट्राजच्या गर्दीत एकमेकांच्या विरोधात बंदूक सरसावून उभे ठाकले होते. सॅवियो करणच्या बाजूचा असावा अन सोलंकी मिस मेनकाच्या साईडने असाव्यात... सोलंकी मिस सॅवियोला ओरडत होत्या ....

"गॅस्ट्रीक ज्युस हॅज सल्फ्युरीक ऍसिड? यू मस्ट गेट अ नोबेल फॉर धिस न्यू डिस्कवरी ..." आणि असं म्हणून त्यांनी सॅवियोवर पाच गोळ्या डागल्या ...

... ‘गॅस्ट्रीक ज्युस मध्ये तर हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. एवढं साधं सॅवियोला ठाऊक नाही? आणि गोळ्यांचा आवाज दिवाळीतल्या टिकल्या फुटल्यासारखा का आला?’ ...
करणची विज्ञानबुद्धी अजून झोपली नव्हती हे नशीब. अचानक हडबडून करण जागा झाला. सॅवियो पट़्टीचा मार खाऊन परत जागेवर येऊन रागात बसला होता. करणचं स्वप्नातलं सेशेल्स शाळेत बदललं. तो गोळ्या डागल्याचा आवाज म्हणजे सावियोने खालेल्या त्या पाच पट्ट्या होत्या. आज सोलंकी मिसकडून पुन्हा मार खाल्ल्याने सॅवियोने चिडून करणकडे पाहिलं... त्याने चिडूनच करणला ओठांच्या डाव्या कोपऱ्यात काहीतरी असल्याचं मुक्यानेच दर्शवलं. करणने हडबडीत आपली लाळ पुसली.

"मी काल रात्री तुला झोप म्हणून सांगत होतो. घरी झोपला नाहीस आणि आता शाळेत झोपा काढतोयस?", सॅवियो चिडून म्हणाला. करण ओशाळला.
"तरी भट़्टाचार्य मिसना नीट दिसलं नाही म्हणून नशीब. बेंचवर डोकं टाकून पडलेलास तू आणि त्या तुझ्याबद्दल मला विचारू लागल्या. मी ‘तो खाली पडलेला शार्पनर शोधतोय’ असं सांगितलं माहितिये?", सॅवियोने सांगितले.
करण एव्हाना चांगलाच जागा झाला होता.
"सॉरी रे! आणि थॅन्क्स"
"आणखी एकदा सॉरी म्हण."
"का?"
"कालचा पनिशमेण्ट होमवर्क करताना ‘गॅस्ट्रीक ज्युसमध्ये सल्फ्युरीक ऍसिड असतं’ असं तूच म्हणालास मला आणि मी तसंच लिहिलं. त्याचाच आज मार खाल्लाय. तुझ्या चुकीच्या उत्तरामुळे!", सॅवियोने गाल फुगवले.
त्यावरून करणला आठवली कालची रात्र. सॅवियोने करणला काही प्रश्न विचारलेले त्याला आठवत होते खरे... पण कदाचित करणने आपल्या धुंदीत त्यांची उलट्सुलट उत्तर दिली असावीत. पण त्यात करणचा काहीच दोष नव्हता. मेनकाला भेटायला मिळणार हे कारणच करणला वेडं करण्यास पुरेसं होतं. पण तरी आपण एवढं चुकीचं उत्तर सॅवियोला दिलं हे करणला क्षणभर पटलंच नाही. पण थोडा वेळ विचार केल्यावर ‘मुळातच सॅवियोला गॅस्ट्रीक ज्युसमध्ये कुठलंतरी ऍसिड असतं हेच ठाऊक नाही मग त्याने सल्फ्युरिक ऍसिडविषयी त्याच्या होमवर्कमध्ये कसं काय लिहिलेलं असणार?’ असा सारासार विचार केल्यावर आपणच हे उत्तर त्याला आपल्या तंद्रित दिल्याचं करणने जाणलं.
"ओके फाईन. सॉरी फॉर द सल्फ्युरिक ऍसिड!"
"ठिक आहे. माफ करतो. पाच पट्ट्या उधार राहिल्या... आणि एवढं सॉरी बोलतोयस तर आणखी एक सॉरी बोलून टाकच आज...", सॅवियोने दबक्या स्वरात करणला म्हटले.

करण गोंधळून त्याच्याकडे पाहू लागला. सॅवियोने पूजाकडे बघत इशारा केला. करणला उमगलं. त्याने गुपचुप पूजाकडे बघितलं. ती गप्पपणे सोलंकी मिस देत असलेल्या नोट्स लिहिण्यात बिझी होती. तिच्या चेहेऱ्यावर दोन दिवसांपासून हास्य फुललं नव्हतं.
"मी परवाच म्हणालो सॉरी तिला.", करण सॅवियोला म्हणाला, "पण गेले दोन दिवस ती माझ्याशी बोलली नाहीय. कदाचित तिने मला अजून माफ केलं नसावं."
"तुझ्याशीच काय कुणाशीच बोलत नाहीय. तिच्या बाकी गर्ल्स ग्रुपमध्येही गप्प बसून असते.", सॅवियोने सोलंकी कार्टून काढत माहिती पुरवली, "माझी मम्मी जेव्हा डॅडींवर रागावते तेव्हा खूप खूप आरडाओरडा करत भांडते. पण जर अशी गप्प झाली तर मात्र डॅडींची खैर नाही. मॅटर बरंच सिरीयस असतं. पुढचे कित्येक दिवस मग जेवणात मीठ जास्त असतं, चिकन शिजलेलं नसतं. कपडेही मळलेलेच असतात. इस्त्री केलेली नसते. भांड्यांची आदळापट चालू असते. कधीकधी डॅडींना सोफ्यावर झोपावं लागतं. धिस टाईप ऑफ ऍन्गर इस रियली सिरियस. मुली गप्प झाल्या म्हणजे हेल्ल!"

"काय?", करणने घाबरून पुन्हा पूजाकडे पाहिलं. ‘च्यायला आपण बरंच अपसेट केलंय तिला’ करण ओशाळला.
"तुझे पप्पा काय करतात मग अशा सिचुएशनमध्ये?", करण आपलं सजेशन विचारतोय हे बघून सॅवियो दिमाखात म्हणाला, "मम्मीला चॉकोलेट्स आणतात. डेटवर नेतात. लास्ट टाईम डयमण्ड रींग पण आणली होती!"
सॅवियोच्या ह्या प्रश्नावर करण गप्प झाला. सॅवियोचं म्हणणं खरं होतं. मॅटर खरंच सिरीयस होतं. जास्त वेळ पूजाशी अबोला धरून काहीच साध्य होणार नव्हतं. ‘त्यापेक्षा तिला लवकरात लवकर सॉरी बोल्लेलं बरं’ असं करणने ठरवलं. शाळा सुटल्यावर जाता जाता कॅडबरीचं चांगलं पन्नास रूपयांचं चॉकोलेट विकत घ्यायचंही त्याने ठरवलं.
शाळा सुटली. घरी जाताना पूजा तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात होती म्हणून मागून मागून चालणाऱ्या करणला तिला बोलावणे जमत नव्हते. एका सिग्नल कडे मग पूजा बाकी ग्रुपपासून वेगळी झाली. तीच संधी करणने साधली. त्याने पूजाला गाठले.

"हाय!", करणने पाठून हाक मारली तसं पूजा मागे वळली. करणला बघताच पूजाने पुन्हा मान फिरवली अन ती काहीही न बोलता तशीच पुढे चालू लागली.
"पूजा!", करण विव्हळत तिच्या मागून चालू लागला, "सॉरी गं! मी उगीच काहीतरी बोलून बसलो. मला माफ करशील. मला अजिबात अक्कल नव्हती तुझ्यावर संशय घेताना. आय ऍम सच अ फूल!", करण पुन्हा म्हणाला.
पूजा गप्प.
"अगं काहीतरी बोल. माझ्याशी भांड तरी. मला स्वेयर केलंस तरी चालेल. तू कुणाशीच का बोलत नाहीयेस?", करण अगदीच अगतिक झाला होता.

पूजा थांबली. तिने थोड्या रागातच करण कडे पाहिलं. आज प्रथमच पूजा प्रधानचा रागीट चेहेरा करणने पाहिला होता. अन तिच्या पहिल्या वहिल्या रागाचे कारण आपण असल्याची भावना करणला मनातल्या मनातल्या बोचू लागली. करणला तिच्या डोळ्यात बघवत नव्हते, त्याने खाली बघत अवघडत तिला पुन्हा एकदा "सॉरी" म्हटले.
थोडा वेळ शांततेच गेला. करणने हळूच पूजाकडे पाहिलं तसं ती वहीत काहीतरी लिहिताना दिसत होती. करण थोडा बावरला. त्याने मान उंचावून ती काय लिहितेय हे पाहायचा प्रयत्न केला. पूजाने लिखाण संपवलं अन वही करणच्या तोंडासमोर धरली... करणने भीतभीतच मजकूर वाचला...

"आय शुड नॉट स्पिक. माझा मूड नाहीय. एनीवेज मी बोलूही शकत नाही.... तोंडात बॉईल्स आलेत!!!"
करणला हायसं वाटलं. "बॉईल्स!!", थोडं हसूही आलं. सॅवियो महाराजांच्या मुलींच्या मूडबद्दलच्या कथा सपशेल फसल्या होत्या, "थॅन्क गॉड!", हे करणच्या मनातले शब्द असायला हवे होते. पण ते तोंडातून बाहेर पडलेच. "आय मिन आय ऍम सो सॉरी!"
पूजाने उपरोधिकपणे डोळे फिरवले. करणने तिला चॉकोलेट दिलं. पूजाने पुन्हा काहीतरी वहित खरवडलं, "डू यू वॉण्ट टू किल्ल मी? चॉकोलेट काय? मी लिक्विड डायटवर आहे. तेही चमच्याने तोंडात अगदी आत ढकलावं लागतं. नाहीतर बॉईल्स जळतात."
करणला तिची अवस्था जाणवून चुकचुकल्या सारखं वाटलं. पन्नास रूपयेही तसे फुकटच गेले होते. पूजाने पुढे लिहिले, "बट आय ऍम स्टील मॅड ऍट यु. तू मला फर्स्ट प्राईझ मिळालं ते अजून सांगितलं नाहीस. सॅवियोने इतरांना सांगताना ऎकलं मी. आय वॉज सो हर्ट!", एवढं भराभर लिहित असतानाही पूजाचं अक्षर चांगलं वळत होतं.
"फर्स्ट नाही सेकण्ड."
"व्हॉटेवर! जिंकलास ना पण. थोडी अपसेट झाले म्हणून काय झालं? मनधरणी केली असतीस... फ्रेण्ड्स असतातच कशाला."

"नेक्स्ट टाईम लक्षात ठेवीन.", करण असं म्हणाला आणि त्याने आपली चूक ओळखून लगेच जीभ दातांखाली दाबली, "म्हणजे नेक्स्ट टाईम जर भांडण झालं तर..." आणि पुन्हा गप्प झाला.

काही वेळ शांत राहून पूजाने मग "ईट्स फाईन!", म्हणून लिहून आपल्या भावना करणला कळवल्या. करण हसला तसं पूजानेही वहीत एक स्माईली काढून दाखवला. हसताही येत नव्हतं बिचारीला. शेवटी दोघे बाय करून आपापल्या वाटेने निघाले. पूजाचं घर आलं होतं. पूजा गेट उघडून आत शिरणार तसं मागून पुन्हा करणची हाक ऎकू आली...
तिनं मागे वळून पाहिलं तसं पलिकडून करणने तिच्या दिशेने एक कागदाचं विमान उडवलं होतं, ते अलगद तिच्या पुढ्यात येऊन पडलं. तिने थोडं चमकूनच करणकडे पाहत ते उचलून उघडलं अन आतला मेसेज वाचून काढला.
"गेस्स व्हॉट? माझ्या मनात गुंजणारं एक नाव, माझ्या हृदयात डोलणारा एक चेहेरा माझ्या समोर प्रत्यक्षात प्रकटणार आहे... लवकरच... मेनका! येस आय एम गोईंग टू रिसीव माय गिफ्ट फ्रॉम हर... पर्सनली!"
पूजानेही आश्चर्याने आपले दोन्ही हात आपल्या आ वासलेल्या तोंडावर ठेवले... तिला विश्वासच बसत नव्हता. करणला त्याचं दैवत लाभणार होतं... पूजा करणसाठी भरपूर खूश झाली होती... हर्षभरीत नजरेने करणकडे बघत ती काही सेकंद तिच्या दुखण्यास विसरली असावी...

... कारण ती कानांपर्यंत हसत होती.

**********************

भाग तेरा

"कळलं कधी भेटायचंय मेनकाला?"
"हो. मेनकाशी भेट सोनीटीव्हीच्या ऑफिसात होणार आहे. परवा सकाळी."
"काय??"

संध्याकाळी सॅवियोने आणलेलं जेवण जेवत करण सॅवियोशी बोलत होता, "अरे हो. दुपारीच ईमेल आला बॉलिवूडब्लॉग्सचा. सोनीटिव्हीच्या सेट-इण्डियाच्या ऑफिसात मेनकाचा एक इण्टरव्ह्यू आहे. तिकडेच बॉलिवूडब्लॉग्सचा प्राईझ सेरेमनीपण आटोपणार आहे. बॉलिवूडब्लॉग्स सोनीचीच वेबसाईट आहे ना म्हणून त्यांच्या ऑफिसात वरळीला जायला लागेल. सकाळी दहा वाजता.", करणने एक्साईट होऊन म्हटले.

"पण स्कूलचं काय?"
"तोच तर प्रॉब्लेम आहे... बंक करायला लागणार, एक दिवस."
"पण स्कूल दुपारी असतं. प्राईझ सेरेमनी संपवून बारा पर्यंत संपवून येऊ स्कूलला."
सॅवियोच्या "येऊ" वर करण त्याच्याकडे भुवयी वर करून पाहू लागला.
"ऑफकोर्स! मी पण येणार आहे तुझ्यासोबत", सॅवियोने म्हटले.
"तुझे मम्मी डॅडी परमिशन देतील?", करणने प्रश्न केला.
"हो मग. अरे जाताना तुझ्यासोबत कुणीतरी असायला हवंच. मम्मीडॅडींना जमणार नाही. सकाळी त्यांची ऑफिसं असतील. शिवाय उद्या संध्याकाळी तुझा हॅण्डबॅण्ड काढून इन्स्पेक्शन करून घ्यायचं आहे न डॉक्टरकडून. डॅडी तेव्हा येणारच आहेत तुझ्याबरोबर. मग पुन्हा परवा सकाळी त्यांना जमणार कसं? मी येईन तुझ्यासोबत. जाताना डॅडींच्या कार मधून बांद्रा पर्यंत जाऊ. मग तिथून बस पकडू वरळीसाठी. वाया सीलिंक."
"इथून जायचं ठिक आहे रे. पण तिथे गेल्यावर काय? ... आय विल बी स्सो स्केअर्ड. मी काय कपडे घालू? तिच्याशी कसं बोलू? आय वुड बी टू स्पेलबाऊण्ड टु से एनिथिंग....", करणच्या भुवया वर चढल्या होत्या.
"जस्ट से आय ऍम अ बिग फॅन ऑफ युअर्स!", सॅवियोने खांदे उडवत अगदी स्वाभाविक उत्तर सुचवलं.
"ह्ह!", करणने सॅवियोचं सजेशन जस्सच्या तस्सं फेटाळलं, "दॅड वुड बी टू क्लिशे."
"मग अजून वेगळं काय बोलणार?"
सॅवियोच्या ह्या प्रश्नावर करणच्या पायांची हालचाल थोडी वाढली आणि तोंडातला घास थोडा वेळ तोंडातच रेंगाळला.
"बाय द वे पूजाला सांगितलंस, कधी भेटणार मेनकाला ते?", सॅवियोने विचारले.
"नाही."
"मग सांग. नाहीतर पुन्हा रागावून बसायची", सॅवियोने बाजूच्या फोनचा रिसीव्हर उचलला अन करणला पूजाला फोन करायला सूचित केले.
करण शांतपणे म्हणाला, "फोन करून काहीच उपयोग नाही. ठेव तो फोन."
"का?"
"पूजा माझ्याशी बोलू शकणार नाही?"
"का? काय झालं? तिला नक्की सॉरी बोलला आहेस की नाही?", सॅवियोच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"बोललो सॉरी. पन्नास रूपयांचं चोकॉलेट पण दिलं. थॅन्क्स टू यू!", करणने सॅवियोकडे सोलंकी मिसच्या ‘होपलेस्स’ आवेशात बघितलं.
"तिला माउथ अल्सर्स आलेत. म्हणून ती इतके दिवस बोलत नाहीये.",
"असं?"
"मग? नाहीतर तू काय काय सांगत होतास मला? नुसतं घाबरवून सोडलंस."
"मी खरं तेच सांगितलं. माझ्या मम्मीला कधी माऊथ अल्सर्स येत नाहीत. नाहीतर मलाही कळलं असतंच की मुलींचं गप्प बसायचं हेही एक कारण असतं ते?", सॅवियोने आपली बाजू मांडली. करणने उपहासाने मान डोलावली. पूजाला कसंतरी करून सांगालाच हवं म्हणून मग तिला त्यांनी टेक्स्ट मेसेज केलाच.

"तुझ्या आईचं काय? समीरदादाचं काय? त्यांना कधी सांगणार आहेस...", सॅवियोने मेसेज करता करता म्हटले.
"फोन येईल ना उद्या तेव्हाच विचारेन."
"आणि त्यांनी नाही म्हटलं तर....?", सॅवियोने ‘विचारू नये’ तो प्रश्न विचारला.
करण चिंतीत झाला. घास पुन्हा तोंडात रेंगाळाला, ह्याखेपेस जरा जास्तच. पायांची हालचाल पण जलद झाली.
’तसं आईचं नाही म्हणायचं काहीच कारण नाही... पण समीरचं काहीच सांगता येत नाही.... त्यात मनोहर मामांची तब्येत... समीर अन आई केवढ्या दगदगीत असतील तिकडे ... कुसुममामी ... छोटी श्रिया. सगळे मनोहर मामांच्या बरे होण्याच्या काळजीने पछाडलेले... मामांकडूनही अजून चांगला रीस्पॉन्स मिळत नाहीये... अशा अवस्थेत आई आणि समीर हो म्हणतील?’

... उत्तर नकारार्थीच मिळत होतं ...

‘आपण कॉम्पिटीशन जिंकल्याचं सांगूया. मग ऎकतील ते. आई तरी ऎकेलंच... पण समीरचं काय? .... त्याला मेनकात इंटरेस्ट नाही की त्या कॉम्पिटीशनमध्ये ... मेनकाला भेटायला जायचं अन तेही हा मोडलेला हात घेऊन ... समीर नक्कीच नाही म्हणणार... आईलाही मग ब्रेनवॉश करेल... पण फक्त आईशीच बोललो तर...’
इथे करणला एकदम आशा वाटू लागली, ‘हो! पॉसिबल आहे... तिला कळेल माझं पॅशन... इट्स ऑलवेज माय ड्रीम टू मिट मेनका. शी नोज दॅट.... आईने मला नेहेमी सपोर्ट केलाय... आई नक्कीच हो म्हणेल ... आपण आईलाच विचारू.’
"हॅलो कसला विचार चाल्लाय.", सॅवियो करणच्या शून्यात गेलेल्या डोळ्यांसमोर हात हलवत होता.
करण तंद्रीत आला, "अं काहीनाही."
"मग काय ठरवलंस? काय सांगणार आहेस त्यांना?"
"आईला विचारेन. ती हो म्हणेल."
"पण सपोझ तिने नाही म्हटलं तर.", सॅवियोने पुन्हा तोच प्रश्न केला.
"ती म्हणेल. होच म्हणेल.", करणने आपली चिंता लपवण्याचे असफल प्रयत्न केले, ‘आई नाही म्हणेल’ किंवा ‘आपल्याला मेनकाला भेटायला मिळणार नाही’ हा विचार दुरान्वयानेही त्याच्या मनाला शिवला नव्हता. मेनकाला भेटायचा हा ‘वन्स इन अ लाईफटाईम’ चान्स करण असा कसा सोडणार?
"पण इन केस जर नाही बोलली तर? मेनकाला भेटायला जाणार की नाही?", सॅवियोने थोडी लिबर्टी घेतली अन थेट मूळ प्रश्न केला.

करण चिडला, "तो माझा प्रश्न आहे. मी बघेन. यू डू नॉट वर्री! तुला माझ्यासोबत यायचंय की नाही?"
सॅवियो थोडा ओशाळाला, "ड्युड! जस्ट रीलॅक्स. मी कधी नाही म्हटलं यायला. तुझ्या आईविषयी विचारतोय मी..."
पुन्हा करणने चिडून सॅवियोकडे पाहिलं. सॅवियो गप्प झाला. करणच्या चिडण्याने मग थोडा सेलिब्रेशनचा मूड पांगलाच. रात्रीचा आजच्या दिवसाचा करणचा होमवर्क छापून संपवल्यावर सॅवियो गुपचूप झोपी गेला. पण सॅवियोने उपस्थित केलेल्या प्रश्नाने करणला मात्र झोपू दिले नाही.
दुसऱ्या दिवशीची सकाळ अन दुपारही उलटली. तरी सॅवियोने केलेला प्रश्न करणच्या पुढ्यात तसाच उभा होता. त्याच विचारांत भट़्टाचार्य मिसनी दिलेलं पॅराडॉक्सचं साधं फिगर ऑफ स्पिचही करणला नीट लिहिता आलं नाही. रिसेस झाली पण करणला भूक नव्हती. बेंचवर डोकं ठेवून करण पहुडलेला. बेंचवर ठकठक झाली तसं करणने डोकं वर करून पाहिलं. ही पूजा होती.

‘काय झालं?’ पूजाने भुवयांनीच खुणावले. सॅवियोही करणच्या बाजूस येऊन बसला.
"परवा मेनकाला भेटायचंय. काल कन्फर्मेशन ईमेल आलं.", सॅवियोने माहिती पुरवली.
‘ग्रेट!’ पूजाने अंगठे वर करून विशेस कळवल्या तसं करणने खांदे पाडले.

पूजाला कळलं नाही. तिने सॅवियोकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिले.

"फर्स्ट टाईम मिटींग आहे ना मेनकाशी. म्हणून असा नर्व्हस होऊन पडलाय. पुन्हा घरी आईची परमिशन...", असं म्हणत सॅवियोने करणकडे पाहिलं अन करणने पूजाच्या नकळत सॅवियोला डॊळे वटारले.
"म्हणजे आईने परमिशन दिलीय म्हणून बरं", सॅवियोने संभाषण बदलले.
पूजाने तिरप्या हास्याने डॊळे मचकावून ‘सगळं ठिक होईल’ असा दिलासा दिला अन आपला थर्मास उघडला.
"अगं आज टिफिनमध्ये ज्यूस आणलास की काय?", सॅवियोने विचारले. पूजाने नकारर्थी मान डोलावली.
"चहा?", सॅवियोने मूर्खासारखा प्रश्न केला तसं तिने डोळे फिरवून थर्मास सॅवियोच्या पुढ्यात धरला. त्यात टॉमॅटॊ सूप होते.
"आता हे पिणार कसं?", सॅवियोने प्रश्न केला तसं पूजाने स्ट्रॉ बाहेर काढली.
"मस्त आहे. सूप स्ट्रॉनेही पिता येतं?", सॅवियोने विचारलं तसं त्याला चिडवून पूजा थोडी शरमल्यासारखीच ते सूप चोखू लागली...

काही सेकंद सगळे गप्पच होते पण शेवटी न रहावून तिघांमध्ये एकच हशा पिकला. करणचा मूड त्या स्ट्रॉ आणि सूपच्या निमित्तानेका होईना पण त्यावेळापुरता थोडा ठिक झाल.

संध्याकाळी करण रूडॉल्फ अंकलसोबत डॉ. श्रिनिवासांच्या क्लिनिक वर गेला. डॉक्टरनी फायनल इन्स्पेक्शन करून बॅन्ड काढला. हाताचं फ्रॅक्चर भरलं होतं. कुठेच विशेष दुखत नव्हतं. परतताना अंकलनी करणला घरी सोडलं. त्यांना थॅन्क्स बोलून करण घरी आला. दार उघडून त्याने आत प्रवेश केला असेल नसेल तोच फोनची रींग वाजली. करणच्या पोटात एकच धस्स झाले.
"ही आईच असेल"... तिची परवानगी मागायची वेळ आली होती. त्याने नर्व्हस हातांनी रिसीव्हर उचलला.
"हॅलो आई?"
"हॅलो समीर बोलतोय."

लक आज अजिबात फेवर मध्ये नव्हतं.

"हाय कसा आहेस..."
"मी ठिक आहे. तुझा बॅण्ड निघाला का?"
"हो. डॉक्टरकडूनच येतोय... अं.. आईला देशील का फोन? मला तिच्याशी बोलायचंय.", करणने कसंबसं समीरला धीर एकवटून विचारलं.
समीर थोडा अवघडला, "का? माझ्याशी बोलायचं नाही? मामाची तब्येत विचारली नाहीस ती?"
करणने कपाळावर हात मारला, "हो तेच विचारायचं होतं. कसे आहेत मामा?"
"तेच सांगायला फोन केलाय...", समीरने पॉज घेतला, "ऑपरेशन करायला लागणार आहे... आज संध्याकाळीच... न्यूरोसर्जन बोलावलेत."

करणचं उरलेलं अवसान गळालं.

"हॅलो करण? आहेस का?"

"अं... अं... हो कळलं मला... पण अचानक कसलं ऑपरेशन?"

"मामांची इतके दिवस काहीच सुधारणा नाही मग एम.आर.आय करवला... कळलं मेंदूत रक्तपुरवठा नीट न झाल्याने सिरिब्रल कॉर्टेक्समध्ये बधीरपणा आलाय. तो घालवण्यासाठी एक छोटी प्रोसिजर करावी लागणार आहे."
"ओह माय गॉड! मग आता? खूप सिरियस आहे का सिचुएशन?"
"व्हॉट डू यू एक्स्पेक्ट? ऑपेरएशन म्हणजे सिरीयस ना.", करणने केलेल्या बाळबोध प्रश्नाने समीर थोडा कुरकुरलाच. करण फोनवर शांत झाल्याचे त्याला जाणवले आणि सावरून पुन्हा म्हणाला, "कुसुममामी आईसोबत पेपर वर्क करतेय, सगळ्या ऑपरेशनच्या आधीच्या फॉर्मालिटीज पूर्ण करतेय."
"मग तू नाही हेल्प करत कुसुममामीला?", करण त्या निमित्ताने तरी आई फोनवर येईल अशा आशेने समीरला सुचवत म्हणाला.
"तुला काय वाटलं मी हेल्प केली नाही. त्याआधीचा सगळा फॉर्म मीच भरला...", समीर पुन्हा इरीटेट झाला, "पण हे क्लॉज जरा सिरीयस आहेत. तिथे आईच धीर देऊ शकेल कुसुममामीला."
"किती वेळ लागेल आईला मग?", करणने पुढे विचारले.
"सांगता येत नाही.... कुसुम मामी बरीच रडतेय रे... ", समीरचा आवाज थोडा हळवा झाला, "यू नो ऑपरेशनचे क्लॉजेस. फॅटालिटीची कंडिशन पण मान्य करावी लागते... दिलासा एवढाच की ऑपरेशन केल्यावर रीजल्टस चांगले येऊ शकतील... म्हणून हा सगळा प्रपंच. कुसुममामीला कसं बसं समजावलं आम्ही."

करणला आपण किती स्वार्थी वागलो ह्याचं चटकन आकलन झालं. तो गप्प झाला. ह्या परिस्थितीत आई किंवा समीरला आपण जिंकलेली कॉम्पिटीशन, प्राईझ आणि मेनकाशी होणारी मुलाखात वगैरे काहीच सांगणं शक्य नव्हतं. करणने मनोहरमामांच्या तब्येतीच्या काळजीत इकडे हातातून निसटून चाललेल्या ह्या लाखमोलाच्या संधीला पाहून खिन्न मनाने पुढचं संभाषण संपवलं. अशा क्रायसिस मध्ये आईशी बोलूनही उपयोग नव्हताच.
पुढची काही मिनिटं करण चेहेरा हातांत झाकूनच बसलेला... खोल विचार करीत... कॉईन फ्लिप करायचा वेडा विचारही त्याच्या मनास शिवून गेला... पण आई आणि समीरच्या विरोधात जाणं त्याच्या जिवावर आलं होतं... जर कॉईन ‘हो’ म्हणालं तर? ... काय करावे कळत नव्हते.
‘आय थिंक आय हॅव टू ड्रॉप द आयडिया.’ करणचे मन सांगत होते, ‘चोरून गेलो तर आई आणि समीरला वाईट वाटेल.. दे विल थिंक दॅट आय ऍम सेल्फीश... दे विल बी सो हर्ट... बट ... आय ऍम मिटींग मेनका... मेनका... माय आयडॉल... हाऊ कॅन आय मिस सच अपॉर्च्युनिटी?’
मनावर काहीतरी जड ठेवून मग करणने शेवटी निर्णय घेतलाच...
"मी मेनकाला भेटणार नाही. दॅट्स इट!", त्याने निश्चय केला. मनातली खिन्नता आता डोळ्य़ांतून बाहेर येण्याच्या मार्गावर होती. दारावर बेल वाजली.

हा सॅवियो होता. तो संध्याकाळचं जेवण घेऊन आलेला. करणचे पाणावलेले डोळे पाहून सॅवियो अवघडलाच.
"हे करण! काय झालं?"
"काही नाही?"
"सांग ना. एनिथिंग सिरीयस? तुझे मामा..."
"...नो नो ऍब्सोल्युटली नॉट!"
"मग काय?"
"मी ठरवलंय की मेनकाला भेटायला जायचं नाही", करण उसासा टाकून म्हणाला.
सॅवियोलाही ते ऎकून थोडा धक्का लागला. नाही म्हटलं तरी फिल्म ऍक्ट्रेस्स मेनकाला भेटायला नेहेमी थोडंच मिळणार होतं.
"आर यू श्युर?"
"येस."
"पुन्हा विचार करून बघ!"

बस्स यापुढे विचार नाही’करणने मनात ठरवले होतेच, "नो. इट इज डन. माझं डिसीजन फायनल आहे. यू नो एवढं कन्फ्युजन मी नाही हॅंडल करू शकत! आईशी कसं बोलू अशा अवस्थेत. समीर अजिबात ऎकणार नाही. तिथे मामा बिचारे ऑपरेट होणारेत आणि इथे माझं सफरींग कुणालाच कळत नाहीये. जर देवाला मला मार्ग दाखवायचा असेल आणि हे इंडिकेट करायचं असेल की मी मेनकाला भेटायला जावं देन ही मस्ट शो मी सम वे ... ही मस्ट डू समथिंग अमेझींग... असं काहीतरी जे दैवाच्या पार असेल... लाईक सन शुड राईज इन द वेस्ट... लाईक समीर शुड अडॉर मेनका... लाईक यू शुड फिनिश युअर होमवर्क ऑल बाय युअरसेल्फ...".
आपण काय बरळतोय ह्याचे करणला काहीच भान राहिलं नव्हतं. हा आटपिटा सॅवियोने त्याच्यावर विचार करायचा दबाव टाकू नये म्हणून होता. एक मात्र नक्की होतं... हा निश्चय बदलण्यासाठी काहीतरी दैवी चमत्कारच घडावा लागणार होता...

करणच्या ह्या बरळण्यावर सॅवियो थोडा चमकलाच...

"यू वोन्ट बिलिव्ह ह्वॉट यू जस्ट सेड!", सॅवियोने चकित स्वरात म्हटले तसे करणही सॅवियोकडे बघू लागला.
"आज सगळा होमवर्क मी स्वतः केलाय... खरंच!

...
... करणच्या भाषेत सांगायचं तर खरोखरच चमत्कार घडला होता.

********************

भाग चौदा

"आता तोंड पाडून बसायला काय झालं?", सॅवियो करणला म्हणाला, "ठरलंय ना आता की उद्या नाही जायचं ते."
करणने उसासा टाकला, "हो रे पण इट्स जस्ट सो अनफेयर. मनोहरमामांच्या ऍक्सिडण्टच्याच वेळी ही मेनकाशी मिटींग करायची संधी आलीय. इट्स नॉट डन यार. व्हॉट शुड आय डू?"
सॅवियो कंटाळलाच, "जायचं की नाही ते तुझ्यावर आहे. एवढं वाटत असेल तर आपण जाऊ ऊद्या. आई आणि समीरला जाऊन आल्यावर सांग."

करण हेही मानत नव्हता, "पण नंतर संगितलं तर समीर आणि आईला किती वाईट वाटेल. मला स्वतःलाही गिल्टी फिल होईल मग."

"आय गिव अप!", सॅवियो चिडलाच, "असं असेल तर मग माझं ओपिनियन विचारू नकोस. इट्स ऑल अप टू यू!", त्याने स्कूलबॅग चढवली अन दाराशी गेला, "आता स्कूलाला यायचंय की घरीच बसणार आहेस?"
करणही मग खिन्न मनाने उठला अन स्कूलबॅग खांद्यावर चढवून बाहेर पडला. शाळेतला मूड आजही तसाच होता. पूजाच्या माऊथ अल्सर्समध्येसुद्धा काही विशेष फरक पडला नव्हताच. पहिलं लेक्चर ऑफ होतं. भट़्टाचार्य मिस आल्या नव्हत्या. त्यामुळे क्लासमध्ये बराच गोंधळ चालला होता. आज सॅवियोने भाव खात सगळ्यांना त्याने केलेला होमवर्क वाटला होता. दानिश शहा, कुंजन शाह, हेतन शर्मा आणि विनोद पाटिल सगळ्यांनी आज ऑफ लेक्चर मध्ये सॅवियोचाच होमवर्क उतरवला.

"आजचा होमवर्क तू केलास? कसा काय?", पूजाने सॅवियोला मूक विचारलं.
"नवनीत गाईड्स", सॅवियोने तोंडभर हसून दाखवले, "सोलंकी मिसचे कालचे सगळे होमवर्क क्वेश्चन्स गाईड मध्ये सापडले!"
"बरं आहे.", पूजाने खांदे उडवले.
त्या थट़्टा मस्करीत मग पूजाचं लक्ष सुतकी चेहरा करून बसलेल्या करणकडे गेलं.
"काय झालं?", तिने खुणेनेच करणला विचारलं, "मामांची काही खबर?"
"आज सकाळी ऑपरेशन आटोपलं. डॉक्टरांनी एक दिवसाचा अवधी दिलाय. अंडर ऑब्सर्वेशनसाठी."
"ओके. ऑपरेसन सक्सेस्स्फुल झालं ते बरंय. एकदा मामा बरे झाले तर बिनादिक्कत मेनकाला भेटायला जाऊ शकतोस.", पूजाने आपल्या भावना लिहून कळवल्या तसं तिच्या ह्या वक्तव्यावर करण थोडा चमकलाच.
ही आयडिया चांगली होती. जर आज मामांची तब्येत चांगली झाल्याचे कळले तर आपण मेनकाला भेटायला जाऊ शकतो. म्हणजे आपल्या मनावरही दडपण राहणार नाही आणि आई अन समीरला काही वाईट वाटायचा चांस राहणार नाही. आई होही म्हणेल.

"या दॅट्स राईट. थॅन्क्स!", करण उल्हासित झाला होता. त्याने पूजाचे आभार मानले. आता फक्त मनोहर मामांकडून चांगला रीस्पॉन्स यायचा अवकाश होता.

पूजाने खुणेनेच "इट्स ओके." म्हणून करणच्या थॅन्क्सचे ऑब्लिगेशन्स पूर्ण केले.

पुढचा क्लास बरा गेला. समांथा मिस आज जीन्स आणि शॉर्ट टॉप घालून आलेल्या म्हणून सॅवियोसहीत बाकीची टवाळखोर मुलं आज पुढे बसलेली. त्यांच्यासाठी समांथा मिसचा भूगोल (!) आज छान जमला होता. मग आल्या सोलंकी मिस. त्यांनी आज सगळ्यांचा होमवर्क तपासला आणि त्या सदोदित झाल्या. सर्वांनी होमवर्क केल्यामुळे नव्हे तर वेगळ्याच कारणाने...

सॅवियो, कुंजन, दानिश, विनोद अन ज्यांनी कुणी सॅवियोचा होमवर्क छापला होता त्या सगळ्यांना त्यांनी पनिशमेन्ट दिली अन सगळा होमवर्क पुन्हा नव्याने करायला सांगितले. त्या मुलांशी खरंतर डबल गेम खेळल्या होत्या. गाईड मधून अभ्यास करणारी मुलं शोधावीत म्हणून त्यांनी गाईडमध्येच चुका झालेले वीस सम्स काल मुद्दामून होमवर्क मध्ये दिले होते. सॅवियोने त्या चुका जश्शाच्या तश्श्या आपल्या नोटबुकमध्ये उतरवल्या अन तो आणि त्याची मित्र मंडळी पुरती जाळ्यात अडकली. आपलं नेहेमीचं सावज सापडलं म्हणून सोलंकी मिसही अत्यानंदित होत्या. त्यांनी यथेच्छ खुललेल्या चेहेऱ्याने त्या सगळ्यांना पट़्ट्या मारून आपला नेहेमीचा आसुरी आनंद उपभोगला. तिकडेच पूजा अन करणचे निस्सिम भक्त असलेले गिरिजा, कुणाल, सलोनी सिंग, लव आणि कुश (ट्विन्स) आणि उरलेला सगळा वर्ग आज दोघांचे मनातल्या मनात शतशः आभार मानत होता. आज सोलंकी मिसची रणचंडिका झालेली पाहून बाकी सगळे कृतार्थ चेहेऱ्यांनी करण अन पूजाकडे बघत होते. त्या सर्वांनी सॅवियोचा न घेता पूजा-करणचा होमवर्क छापला होता केवळ म्हणूनच नव्हे तर पूजा अन करणने स्वतः गाईड मधून काहीही छापलं नव्हतं म्हणूनही. आपण स्वतः होमवर्क केल्याचा सॅवियोचा आनंद पहिली पट़्टी खाताच मावळला. भेदरलेल्या डॊळ्य़ांनी आणि सणकणाऱ्या हातांनी तो आपल्या बाकावर येऊन बसला. आज एवढा मार खाल्ला होता की त्या दुखणाऱ्या हाताने सोलंकी मिसचं कार्टून काढणंही सॅवियोला जमलं नाही!

घरी परतल्यावर करणने आई अन समीरला मोबाईलवर फोन लावला. पण चार पाच वेळ ट्राय करूनही दोघांचाही लागला नाही. "आई किंवा समीरच करतील. लेट्स वेट!" असं मानून मग वाट बघत करणने काही तास चिंतीत अवस्थेत घालवले. संध्याकाळी आईचा फोन आलाच.
"करण अरे देव पावला! मनोहर शुद्धीवर आलाय.", आईच्या आनंदीत आवाजात फोनची खरखर जाणवत होती. करणला त्याचा जीव अगदी भांड्यात पडल्यासारखा वाटला.
"खरंच कधी शुद्धीवर आले मामा?", करणने हर्षभरीत स्वरात विचारले.
"एक तासांआधीच. डॊळे उघडून अंगठा दर्शवून ते बरे असल्याची खूण केली आयसीयूतून.", आईला आनंदाश्रू फुटले असावेत. तिचा आवाज गदगदीत झाला होता, "मी आणि समीर केव्हापासून तुझ्या मोबाईलवर फोन ट्राय करत होतो. पण इकडे घाटात पाऊस इतका वाढलाय की नेटवर्कच मिळत नाहीये. त्यात हॉस्पिटलची लॅण्डलाईनही डेड. कसाबसा हा आता लागलाय."
"ओके ग्रेट. कुसुममामी अन श्रिया बरे आहेत ना!"
"हो. सगळे खुष आहेत. समीर आणि कुसुम डॉक्टरांशी बोलतायत म्हणून फोनवर येऊ शकणार नाहीत."
"असूदे. मला तुझ्याशीश बोलायचंय.", करणने धीर केला अन एक छोटा पॉज घेऊन तो म्हणालाच, "आई मी ती कॉम्पिटीशन जिंकलो, मेनका फॅन वेबसाईटची. मला सेकण्ड प्राईझ मिळणार आहे आणि तेही मेनकाच्या हातून! इजन्ट इट ग्रेट!! पण त्यासाठी वरळीला सोनीटिव्हीच्या ऑफिसात जायला लागेल. रूडॉल्फ अंकल रेडी आहेत मला घेऊन जायला... मी जाऊ का?"

समोरून उत्तर आले नाही.

"हॅलो! हॅलो?? आई आहेस का?", करणने मोठ्या आवाजात विचारले पण पलिकडे केवळ शांतताच.
एव्हाना समोरून आवाज येणं पूर्ण बंद झालं अन फोन लाईन अकस्मात कट झाली.
"ब्लडी रीलायन्स. शीट!", करणने शिव्या देत फोन ठेवला. आई आणि समीर दोघांचा मोबाईल रीलायन्सचा आणि कालपासून दोन्ही खरखर करीत होते. पुन्हा कान्हेफाट्याच्या बाजूला घाट असल्याने मोबाईलच्या रेंजचा प्रॉब्लेमच. करणने पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला पण काही लागला नाही. शेवटी मग आपल्या मोबाईलवरून त्याने आईच्या मोबाईलवर मेसेज केला अन "उद्या मेनकाच्या हातून मला वेबसाईट कॉम्पिटीशन्चं प्राईझ मिळणार आहे. मी रूडॉल्फ अंकल बरोबर जाऊ का?" असं थोडक्यात विचारलं.

...आता तिचा रिप्लाय येण्याची वाट पाहायची होती...

ह्या साऱ्या प्रपंचात उद्याचा दिवस कधी उजाडला ते कळलेच नाही. सकाळचे सात वाजले होते. पाच वाजताच उठलेल्या करणच्या पायांची हालचाल शिगेला पोहोचली होती.
"काय सांगू डॅडींना? आपण जातोय का त्यांच्यासोबत?", सॅवियोने फोन उचलून म्हटले.
"थोडा वेळ थांबता नाही का येणार?", करणने भाबड्या आशेत सॅवियोकडून आणखी वेळ मागितला.
"डॅडींनी आधीच दोनदा फोन केलाय विचारायला. त्यांना अजून थांबता येणार नाही. ऑफीसला जायला ऊशीर होईल रे.", सॅवियोने करणकडे पाहिलं. वेळेगणिक करण खिन्न होत चाल्ला होता. करणच्या डॊळ्यात अश्रूंची वाट मोकळी व्हायच्या मार्गावर होती. सॅवियोने करणची खिन्नता जाणली. तो करणच्या बाजूला येऊन बसला. दोन मिनिटं शांत राहून मग त्याने करणला समजवले.

"करण अजून आईचा रीप्लाय नाही आलाय, म्हणजे आईचा नकारच समज. यू कान्ट हेल्प ईट."
करणने रडवेल्या चेहेऱ्याने सॅवियोकडे पाहिले. त्याचं मन सॅवियो म्हणतोय ते मानत नव्हतं पण एकीकडे आईचा न आलेला रीप्लायही सगळं सांगित होता. नेटवर्क मिळत नसतं तर आई किंवा समीरने दुसऱ्या कुठल्यातरी फोनने कॉल ट्राय केला असताच. नक्कीच आईने आपली विनंती फेटाळलीय. करणने अंदाज बांधला.
"ठिक आहे", करणने डोळे पुसले, "सांग अंकलना. आपण नाही जात आहोत ते."
त्याच औदासिन्यात करण बेडरूममध्ये गेला अन काल रात्रीपासून ऊराशी बाळगलेला आपला मोबाईल बिछान्यावर फेकून सुन्न मनाने खुर्चीवर बसून हातांनी डॊळे झाकून तो हुंदके देऊ लागला. मेनकाशी भेटायची ही एकमेव संधी शेवटी निघूनच गेलेली होती....

... तोच ‘बीप बीप’ असं काहीतरी वाजलं अन करणने डॊळ्यांवरून हात काढले. वायब्रेटर मोडवर असलेल्या मोबाईलने हालचाल केली अन करण दोन सेकंद गारठलाच. त्याने नर्व्हस हातांनी मोबाईल उचलला अन अनलॉक केला....

... ‘न्य़ु मेसेज अराईव्हड!’... करणने थंडगार पडलेल्या आपल्या बोटांनी मोबाईलची कळ दाबली अन मेसेज वाचला...

... रीप्लाय फ्रॉम आई ... करणने आवंढा गिळला...

... "ओके यू कॅन गो." ...

करणच्या स्वतःच्या डॊळ्यंवर विश्वास बसत नव्हता. दोनदा मेसेज वाचून झाला असावा. आईने खरंच हो म्हटलेलं! दॅट्स अ मिराकल! करणचं थंड अवसान अचानक ऊबेने खुमखुमलं... हात पाय डोकं ताळ्यावर आले होते... मेनकाने मनात पुन्हा साद घातली ... त्याच आवेशात करण हॉलमध्ये पळाला अन सॅवियोच्या हातून फोन खेचून घेऊन रूडॉल्फ-अंकलना आपण येत असल्याचे त्याने कळवले... गोंधळलेल्या सॅवियोला मग आईचा रीप्लाय दाखवून त्याने नाचत आपल्या आनंदात सामील करून घेतले अन दोघे पुढे वाढून ठेवलेल्या एक्साईटमेन्ट साठी कपडे घालून तयार झाले ...

... साडेसातला टूर निघाली... डेस्टिनेशन वरळी! ....

*********************

(पुढचा भाग ... http://www.misalpav.com/node/18884)

कथाआस्वादलेखप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

धनुअमिता's picture

19 Aug 2011 - 12:29 pm | धनुअमिता

हा हि भाग खुप छान आहे.

पुढचे भाग तयार असतील तर येवूद्यात पटकन.

orkut var kashi vachata yeil hi kadambari.

Pls answer it.

विनीत संखे's picture

19 Aug 2011 - 1:24 pm | विनीत संखे

येतायत येतायत... :)

किसन शिंदे's picture

19 Aug 2011 - 12:37 pm | किसन शिंदे

वाचायचं काम चालू आहे..

अप्रतिम हा ही भाग ..
मागचा आणि हा भाग सर्वात छान जमलाय ..
अप्रतिम वाटते आहे वाचायला...

लिहिलेले आहेच तर कालच्या सारखे २-३ वेळा पुढचे भाग लगेच देवुन टाका..

सॅवियो हे पात्र खुपच छान बसवले आहे.. एकदम फिट .. आवडले.