मदत : दुवा कसा द्यावा?

दुवा (लिंक) कसा द्यावा?

काही नवीन सदस्यांना भेडसावणारा अजुन एक प्रश्न म्हणजे एखाद्या गोष्टीचा दुवा कसा द्यावा.
माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न करित आहे.
(हीच एकमेव सोप्पी पद्ध्त आहे असा माझा मुळीच दावा नाही. Smile )

१) ज्याचा दुवा द्यायचा आहे त्याचा जालावरील पानाचा पत्ता (URL) कॉपी करावा.

२) प्रतिसादाची खिडकी उघडावी.

हवा असलेला शब्द टंकावा. (जसे या उदाहरणात "पाककृती" टंकले आहे.)
तो शब्द हायलाईट करावा.
नंतर Insert / Edit link या बटणावर क्लिकावे. (उजवी कडुन सहावं बटण.)
आणि मगाशी कॉपी केलेला पत्ता Link href मध्ये पेस्ट करावा.

पुर्वदृश्य करुन, मग प्रकाशित करावे.

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

थँक्स.
पातोळ्या खाउन नागपंचमी साजरी केलीत का नाहीत गणपा?

कुणी नैवेद्यच नाही दाखवला. Wink

गणपा द ग्रेट!!!

मागे असाच एक सोपा धागा मदत -मिपावर फोटो चिकटवणे करुन दिला होता.

व्यवस्थापनाने गणपाचे दोन्ही धागे वाविप्र मधे उपलब्ध करुन द्यावे.

व्यवस्थापनाने गणपाचे दोन्ही धागे वाविप्र मधे उपलब्ध करुन द्यावे.

सहमत आहे. (गणपाने ते आपल्या खवत लावल्यास अजुन उत्तम)

गणपा ह्या धाग्याबद्दल देखील तुला 'दुवा' द्यावा तेवढा कमीच Wink

वाचनखूण साठवल्या गेली आहे.

गणपाशेठ..
कमी शब्दात अचुक माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद

रेसिपी आवडली! Wink

धन्यवाद. वाविप्र मधे ठेवायला हवे. पण वाविप्र बघायला हवे हे नव्यांना कसे कळणार? Wink

>>>>>रेसिपी आवडली!

सहमत आहे. आणि "प्रेझेंटेशन" ( पक्षी : स्क्रीनशॉट्स Smile ) पण मस्त. Blum 3

प्रयत्न करुन बघतो दुवा बरोबर देता येतो आहे का ते

काय आज चूल बंद का?

नाही त्या नापाकक्रिया कसल्या करत बसलायस. Wink

छ्यान.. अचुक माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद

मी नेहमी दुवा देताना तो नविन खिडकीत उघडेल असाच देतो. दुवा देताना खालीलप्रमाणे कोड लिहावा,

मगे ते असं दिसतं...

परवशता पाश दैवे... भाग १

हे आपल्याला माहीत नव्हते बॉ.

अच्छा. असा देतात होय दुवा. धन्यवाद रे गणपा. Wink

दुवा कसा टाकायचा याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद्.प्रयत्न करुन बघते.

"गनपा, द्येव तुजं भलं करो! पोराबाळांचं खिल्लार वाढो तुज्या घरात"
असा दुवा द्यावा...
Smile

आमेन!!

गुड गुड, नाठाळांना अजून दोनचार गोष्टी शिकवा बुवा गणपाशेठ.

प्रतिसाद कसा द्यावा, उपप्रतिसाद कसा द्यावा, सही मोठी असावी का प्रतिसाद वगैरे. Wink

हात वर करावा आणि दुवा द्यावा

धन्यवाद गणपाभौ.. ह्याच ठीकाणी पराशेठनाही धन्यवादाची पोचपावती देतो, ज्यांनी हा दुवा दिला..