चूकचक्र..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
27 Jan 2011 - 3:13 pm

डिस्क्लेमर टाकावाच लागणार.

निम्ननिर्दिष्ट लिखाण "मनोवृत्तीं"विषयी आहे.. पण त्यात एअर क्रॅश आणि तदनुषंगिक मृत्यू यांचे उल्लेख आहेत. इथे लिखाणाचा मूळ विषय मृत्यू नाही हे नक्की.

अनेक मित्रांना माझ्या लिखाणात वारंवार येणार्‍या विमान अपघातांमुळे विमान उडतं कमी आणि पडतं जास्त अशी समजूत होऊन काहीशी एंझायटी झालेली जाणवली म्हणून आधी व्यक्त करावंसं वाटलं. (ही अनाठायी भीती घालवण्यासाठीही काही लिहीन नक्कीच कधीतरी..)

-------------------------------------------------

जनरल एअरमनशिप हा एक काहीसा अवांतर वाचनसदृश विषय पायलट ट्रेनिंगमधे होता. त्याचं पुस्तक माझ्या कारच्या डिकीतल्या रद्दीत जीर्ण अवस्थेत दिसलं. त्यावरून हात फिरवता फिरवता त्यातला एक धडा आठवला.

पायलट्समधे दिसणार्‍या मनोवृत्तींचं त्यात विश्लेषण होतं. एक अशी थिअरी आहे की विमान अपघात (आणि फॉर दॅट मॅटर कोणतेही अपघात..) हे एका चुकीने होत नसून एका चूकमालिकेने होतात. "चेन ऑफ एरर्स".. दुष्टचक्र..चूकचक्र..!!

आणि या चेन ऑफ एररला कारण ठरतात स्वभावदोष. त्याचे पाच स्पष्टपणे वेगळे करता येण्यासारखे प्रकार आहेत (किंवा कोणीतरी शहाण्या माणसाने पाच प्रकार वेगळे केले आहेत असं म्हणू.. आपण ठरवलं तर सहावा काढू शकू.. मान्य..).

कमीजास्त फरकाने सर्व पायलट कोणत्यातरी एका टायपात बसतात.

अगदी पायलट नसलेल्या इतर सर्व व्यक्तींमधेही या टेंडन्सीज असतातच. आणि हेच स्वभावविशेष अशा किंवा दुसर्‍या काही नावांनी इतर क्षेत्रातही चर्चिले जातात..

इतर क्षेत्रात तरी ते परवडतात हो.. पण पायलटच्या आयुष्यात मात्र त्याचे परिणाम भीषण होतात. कॉकपिटच्या छोट्या जागेत सतत अ‍ॅलर्ट राहून थकलेल्या पायलट्सना जेव्हा अचानक इमर्जन्सीचा सामना करावा लागतो तेव्हा यातली कोणतीतरी एक दुर्दैवी शिळा येऊन डोक्यावर कोसळते आणि चुकांचा गुणाकार करत सर्वांचाच जीव घेऊन जाते.

हे मनाचे "साचे" आहेत. त्यातल्या एका साच्यात आपण सुकणार्‍या शाडूमातीसारखे घट्ट होत जातो आणि अडकून बसतो..

मी मला समजलं तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतःही यात कुठेतरी आहोत हे तुम्हाला दिसेलच..कुठे आहात ते तुम्हीच ठरवा..

पहिला साचा: अँटि -ऑथॉरिटी..

ब्रीदवाक्य : " हा कोण मला सांगणारा..!!?"

एव्हिएशन मेटरॉलॉजी डिपार्टमेंटने सांगितलेलं असतं की अमुक भागात हवामान खराब आहे. क्युम्युलोनिम्बस ढग लँडिंगच्या झोनमधे दिसताहेत. त्यामुळे "तिथे जाऊ नका" असा सल्ला कम आदेश एअर ट्रॅफिक कंट्रोलवरचा ड्यूटी अधिकारी पायलटला उड्डाणातच रेडिओवरून देतो. पायलट मनाशी म्हणतो, "मी दहा हजार तास केलेत या बोईंगवर..आणि हा मला शिकवतोय ढगांविषयी..मला ऑर्डर सोडतोय.."

तो केवळ कोणाची आपल्यावर येऊ पाहणारी ऑथॉरिटी टाळण्यासाठी, धुडकावण्यासाठी तीनशे पॅसेंजर्स घेऊन तस्सा त्या ढगांमधे घुसतो. मग लक्षात येतं की त्यात जबरदस्त वादळ दडलेलं आहे. अचानक विमानाची दिशा उलटीपालटी होते.. आवश्यक ग्लाईडस्लोपपेक्षा विमान एकदम खाली घसरतं. मग कुठल्यातरी अत्यंत महत्वाच्या पार्टमधे आईस फॉर्मेशन झाल्याचं लक्षात येतं. मग त्यातून जेमतेम सुटका करून घेत पायलट मार्ग बदलतो आणि दुसर्‍या विमानतळावर जायला निघतो.

तेव्हा लक्षात येतं की आल्टर्नेट विमानतळावर जाण्याएवढं इंधन आता विमानात शिल्लक नाही. याचं कारण असं की फ्लाईट डिस्पॅचरने फ्लाईटपूर्वी हवामान पाहून आल्टरनेट विमानतळाची गरज पडेल हे विचारात घेऊन जास्त इंधन घेण्याची केलेली सूचना या पायलटने उडवून लावलेली असते.

जास्त इंधन न घेण्याचं कारण: "आय डोन्ट लाईक टू टेक एक्सेस फ्युएल..आय नो हाउ मच फ्युएल इज नीडेड.."

मूळ कारण : "हा डिस्पॅचर कोण मला शिकवणारा..!!"

शेवटी सहज टाळता येण्यासारखी दुर्घटना घडवून आणली जाते आणि जळलेल्या अवशेषांतून किंवा समुद्रतळातून महिन्याभराने ब्लॅक बॉक्स सापडला की त्यावर या पायलटचे लास्ट वर्डस म्हणून चीड भरलेला एखादा "फक" ऐकू येतो. तीनशे जीव आणि पायलट हकनाक बळी जातात.

दुसरा साचा: इन्व्हल्नरेबल.

ब्रीदवाक्य "दुर्घटना होते ती नेहमी इतरांना.. मला कध्धी नाही.."

"अ‍ॅक्सिडेंट्स अकर ओन्ली टू अदर्स.."

मी स्वतः याचं ढळढळीत उदाहरण होतो एकेकाळी. माझा एक मित्र, रूममेटच, विमानोड्डाण शिकण्याच्या काळात एकटा सेलम ते कोईम्बतूर क्रॉसकंट्री करत होता. त्याला फोटोग्राफीची फार आवड. सेलमला टेक ऑफ घेतल्यानंतर, त्याने कोईंम्बतूरचा कोर्स सेट केला आणि फोटो काढायला लागला. तलाव, नद्या, डोंगर अहा..

मग कॉकपिटच्या आतच स्वतःकडे कॅमेरा रोखून बसल्याजागी पोझेस्..क्लिक क्लिक..

जवळजवळ सगळा वेळ त्याचं लक्ष फोटो काढण्यातच होतं. जवळजवळ अर्धा तास झाल्यावर तो एकदम धक्का बसल्यासारखा भानावर आला आणि त्याच्या लक्षात आलं की वार्‍याने त्याचा ट्रॅक भलताच चुकला होता. मग त्याने लक्ष देऊन कोईंम्बतूरची दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला. पण ती विज्युअल फ्लाईट होती. जमिनीवरच्या क्लूजवरूनच रस्ता काढायचा होता. नॅव्हिगेशनची उपकरणं मर्यादित होती आणि त्याच्या उपयोगाने फक्त आपण दक्षिणेकडे कुठेतरी चाललोय एवढंच कळत होतं. सतत ट्रॅक न ठेवल्याने आता कोईम्बतूरपासून किती डेव्हिएट झालोय ते त्याला जमिनीवरची काहीतरी खूण सापडली तरच कळणार होतं. जमिनीवर तर ओळखीचं काहीच दिसत नव्हतं..

मग गर्भगळित अवस्थेत असताना त्याला डावीकडे कोईम्बतूर शहर दिसलं. त्यानं रेडिओवरुन तसं घोषित केलं आणि एअरपोर्ट शोधायला सुरुवात केली. त्याला जो रनवे वाटला तो रनवे नाहीच आहे हे भीषण सत्य त्याला खूप खाली आल्यावर समजलं. ती जागा म्हणजे एअरपोर्ट नाहीच आहे हे सत्यही त्यानंतर लगेच समजलं.. आणि दोनच मिनिटांत ते शहरही कोईम्बतूर नाहीच आहे हे अतिभीषण सत्य दाणकन त्याच्यावर आदळलं. ते जे काही शहर होतं त्याला एअरपोर्टच नव्हता.

पुढच्या दोन तासात प्राण कंठात धरून, तीन चुकीच्या जागी लँडिंगचा प्रयत्न करून, रेड अ‍ॅलर्ट सिच्युएशन घोषित करवून, माझा मित्र कसा परत आला ते त्याला आणि आम्हालाही अजून कळलेलं नाही. तो त्या दिवशी योगायोगाने उपलब्ध तीन विमानांपैकी नेमकं लाँग रेंज टँक असलेलं एकमेव विमान घेऊन गेला होता म्हणून परत आला. नाहीतर एक तास आधीच फ्युएल संपून विमान धराशायी झालं असतं.

हे सर्व पाहूनसवरूनही मी जेव्हा सेलम कोईम्बतूर एकट्याने पहिली क्रॉसकंट्री करायला गेलो तेव्हा मी कॅमेरा घेऊन गेलो आणि चार हजार फुटांवर पोहोचल्यावर कोर्स सेट करून फोटो काढायला लागलो.

सेलमपासून थोड्या अंतरावर अचानक मला काही दिसेनासं झालं .. तेव्हा लक्षात आलं की एका अवाढव्य ढगात मी शिरलो होतो. त्याची उंची काही किलोमीटर होती..आणि लांबी... काय माहीत?.. कदाचित कोईम्बतूरच्याही पुढेपर्यंत. अफाट सागरासारखा तो शुभ्र ढग होता. त्याच्या वरून बाहेर पडण्याइतकी उंची माझं विमान गाठू शकलं नसतं कारण त्याची क्षमता दहा हजार फुटांपर्यंत उडण्याचीच होती. आणि त्याच्या खालून बाहेर पडायला जावं तर तो जमिनीलगत शंभरेक फुटांवर पसरलेला असला तर..? काय माहीत? तितके खाली जाताना एखाद्या टेकडीवर कपाळमोक्ष ठरलेला. परत जावं म्हटलं तर मी पूर्ण डिसओरिएंट झालो होतो. गंडलो होतो. कुठल्या दिशेत उलटं फिरून या ढगातून कमीतकमी वेळात बाहेर पडता येईल हे ही विसरून गेलो होतो. नुसता सेलमच्या दिशेत वळलो तरी आलो त्याच रेषेत मी परत बाहेर पडणं शक्यच नव्हतं. मी आंधळा झालो होतो. शुभ्रांधळा..

मग मी पुढेच जायचं ठरवलं.

मी ढगाच्या बरोब्बर मध्यात घुसलो होतो. मी तो आधीच बघायला हवा होता. पण मी त्यावेळी फोटो काढत होतो.

मी कोणताही व्हिज्युअल रेफरन्स नसताना घट्ट पांढर्‍यातून अंगावर काटा आणणारा प्रवास केला. कंपासवर पापणीही न लवता लक्ष ठेवून. "शुभ्र काही जीवघेणे" या शब्दांना माझ्या डिक्शनरीत वेगळाच अर्थ चिकटला त्या दिवशी.

आणि अर्ध्या तासाने एकदम ढग संपला. त्यातून बाहेर आलो आणि जिवाच्या आकांताने सर्वात आधी जमिनीकडे पाहिलं.. माझ्या मते मी नदीच्या प्रवाहाच्या वर असायला हवा होतो.

अगदी हवा तस्सा माझ्या बरोब्बर खाली कावेरी नदीचा प्रवाह चार हजार फुटांवरून लहान ओघळासारखा मला दिसला.. नदीच्या दर्शनाने इतका आनंद मला आयुष्यात कधी झाला नव्हता. जीव वाचला. पुढे कोईंबतूरला जाऊन सुरक्षित परतही आलो. पण इन्व्हल्नरेबिलिटीचं उदाहरण मी यशस्वीपणे तयार केलं होतं.

अपघात होऊ शकतो तो माझ्या रूममेटला.. माझ्या बाबतीत मला कध्धी नाही..

..हाय की नाय?

तिसरा साचा : इम्पल्सिव्ह

ब्रीदवाक्य : "आय मस्ट डू समथिंग.."

"मला काहीतरी करायलाच हवं."

हा प्रकार आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. त्यामुळे मी खास ओळख काय करून देणार? पण पायलटविश्वात याचं काय होऊ शकतं हे पाहता येईल.

"काहीतरी करायलाहवं" मधला हा "च" खूप घातक आहे. सतत काहीतरी करत राहिलं नाही तर काहीतरी चुकतंय असं वाटणं हाच तो विधुळा गुण.

आणि "काहीतरी करायला हवं" म्हणजे अगदी कैच्याके सुद्धा.

एका पायलटने उगाच शांत बसता येत नाही म्हणून आपल्या लहान पोराला फ्लाईटचा कंट्रोल हातात दिला. त्याने खेळता खेळता चुकून ऑटोपायलट मोड बंद केला. विमान उजवीकडे कलत कलत डाईव्ह करायला लागलं. पायलट आणि को-पायलटने कंट्रोल्स घेण्याआधीच खूप उशीर झाला आणि विमान अनकंट्रोल्ड स्पिनमधे शिरलं. पानासारखं गिरक्या खात विमान कोसळलं आणि सर्व ७५ जण मारले गेले.

बसतो विश्वास? पण एकदम सत्य आहे हे..

हे पायलटने नसता उद्योग म्हणून केलं..तो गप्प बसू शकत नव्हता..

अशाच व्यक्तींबाबतीत इमर्जन्सी आली की मात्र उतावळेपणा, वळवळी वृत्ती, हा गुण आ वासून जीव घेऊ शकतो. "इमर्जन्सी" म्हणजे एव्हिएशनच्या भाषेत ग्रेव्ह डेंजर..समोर मृत्यू उभा दिसणे..

अशा वेळी इम्पल्सिव्हिटी हा गुण महागात पडतो. तो पायलटला एका दिशेत काही निर्णय घेऊ देत नाही. क्षणाक्षणाला काहीतरी करत राहण्याच्या तीव्र झटक्यामुळे परस्परविरोधी क्रिया केल्या जातात.

म्हणजे लँड करु म्हणून जमिनीजवळ येतायेता अचानक वेगळी इम्पल्स येऊन इंजिनची पॉवर वाढवून टेक ऑफचे सेटिंग करणे..मग विमान शंभरेक फूट वर चढेपर्यंत अचानक धीर सुटून पुन्हा इंजिन पॉवर कट करणे आणि लँडिंगचा निर्णय घेणे. तेवढ्यात खाली रनवे संपत आलेला आहे आणि उतरायला जागा शिल्लक नाही हे लक्षात येऊन परत इंजिन फुल पॉवरवर चढवणे..

किंवा कॉकपिटमधे धूर येतोय हे पाहून इलेक्ट्रिक फॉल्ट आहे असं अचानक वाटून तातडीने सगळेच इलेक्ट्रिक सर्किट ब्रेकर्स बंद करुन टाकणे. मग त्यामुळे आवश्यक उपकरणेही बंद झाली हे लक्षात येऊन तातडीने सर्व ब्रेकर्स पुन्हा चालू करणे..

एक इंजिन आग लागून बंद पडले आहे हे लक्षात आल्यावर ते बंद करण्याऐवजी चुकून झटकन दुसर्‍या चांगल्या चालू आणि जीवनरक्षक इंजिनाचा इंधनपुरवठा बंद करणे आणि तेही बंद पाडणे. की चालले विमान जमिनीकडे..

विश्वास नाही ना बसत? पण या सर्व माझ्या मनातल्या गगनभेदी थापा नाहीत हां.. खर्‍या घडलेल्या आहेत अशा गोष्टी..आणि जीव घेऊनच संपल्या आहेत.

पुढचा साचा : "रेझिग्नेटरी"

ब्रीदवाक्य: "नाउ नथिंग कॅन बी डन.."

"नियतीने निर्णय घेतला आहे. आता करण्यासारखं काही राहिलं नाही.."

इमर्जन्सीच्या वेळी एखादी अधिकच वाईट, निराशाजनक घटना दिसली की हे लोक रिटायर होऊन टाकतात.

"डाव बास.."..

शेवटपर्यंत शक्य तेवढा शांतपणा ठेवून प्रयत्न करत राहणं हे वाटतं त्यापेक्षा अत्यंत अवघड आहे. एकदा आपला अवतार संपल्याची खात्री झाली की हे लोक नुसतेच शांत राहतात. करत काही नाहीत.

एक इंजिन चालू होतं तोपर्यंत आशा होती आता दोन्ही इंजिनं बंद पडली आहेत.. आता ईश्वराचं स्मरण करा...

आता क्रॅश अटळ आहे.. त्यामुळे आपण आपले समुद्राच्या दिशेने जाऊ..तिथेच कोसळलेलं बरं.. शहरावर कोसळून तिथेही कोणी मरेल..

किंवा..

आल्टर्नेट एअरपोर्ट म्हणून आपण जो काही ठरवला होता तिथपर्यंत पोहोचण्याएवढं इंधन आता शिल्लक राहिलेलं नाही. तेव्हा उगीच झगडत बसण्यात काय अर्थ आहे. आता जे काही होईल ते दैवा हाती..

अशा क्रॅशेसच्या ब्लॅक बॉक्समधे लास्ट वर्डस म्हणून शांतपणे देवाच्या नावाचा जप, किंवा नातेवाईकांना उद्देशून संदेश रेकॉर्ड झालेला मिळू शकतो.

रेझिग्नेटरी लोकांना देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याचं एक झणझणीत उदाहरण म्हणजे एअर ट्रॅन्जॅट या एअरलाईनच्या पायलट्सचं ..

त्यांच्या एअरबस ३३० विमानात इंधनाचं लीकेज होऊन ते संपून गेलं. दोन बाजूंच्या इंधनटाक्यांपैकी ज्या बाजूला लीकेज होतं त्या टाकीतलं इंधन कमी झाल्याचं पाहून पायलट्सनीच दुसर्‍या भरलेल्या टाकीतलं इंधन तिकडे सोडलं (बॅलन्स करण्यासाठी). आणि तेही त्या गळक्या बाजूने वाहून गेलं. अशा रितीने सरळसरळ पायलटच्या चुकीने दोन्ही टाक्या रिकाम्या झाल्या आणि दोन्ही इंजिन्स बंद पडली.

लक्षात घ्या...कल्पना करा..

या शुभमुहूर्तावर विमान होतं एकदम अटलांटिक समुद्राच्या खोल पाण्यावर ..
जवळात जवळचा एअरपोर्ट होता एकशेवीस किलोमीटर्सवर..
दोन्ही इंजिने बंद..
ग्रॅव्हिटीच्या फोर्सने कोसळता कोसळता ग्लाईड होत होत अंतर काटणे एवढाच मार्ग उरलेला.
त्यासाठी पंखांचे फ्लॅप्स आणि इतर भागांचा उपयोग करून कोसळण्याचा आणि लँडिगचा वेग नियंत्रित केला पाहिजे.
पण हे भाग इलेक्ट्रिक पॉवर नसल्यामुळे बंद झालेले.

रेझिग्नेटरी पायलटने कंट्रोलवरचे हात सोडून आकाशाकडे जोडावे अशी स्थिती.. आणि तीही पायलट्सनी स्वहस्ते निर्माण केलेली.

तरीही पायलट्सनी त्या दोनशे त्र्याण्णव प्रवाशांनी भरलेल्या अवाढव्य एअरबसला एक हँग ग्लायडर समजून उडवलं आणि एकशेवीस किलोमीटर केवळ ग्रॅव्हिटीचा खुबीने वापर करून ते एअरपोर्टपर्यंत आणलंही.

अलाउड वेगाच्या दुपटीने वेगात लँडिंग करावं लागलं कारण ब्रेक्स लावणारं कोणतंही साधन चालत नव्हतं. त्यामुळे काहीजण किरकोळ जखमी झालेही..पण किरकोळच..

केवळ रेझिग्नेटरी पायलट्स नव्हते म्हणून दोनशे त्र्याण्णव आणि स्वतः फ्लाईट क्रू यांचे जीव वाचले.

......

(आता एकच भाग अजून.. मग आटोपतो.. सध्या विस्तारभयास्तव क्रमशः)

जीवनमानतंत्रभूगोलविज्ञानमौजमजाप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

27 Jan 2011 - 3:23 pm | कच्ची कैरी

हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद!

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Jan 2011 - 3:29 pm | ब्रिटिश टिंग्या

हात आखाडता घेउ नका! अजुन भाग येउ द्यात!

रच्याकने, माझ्याकडे एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशनचे चार सीजन्सचे व्हिडिओज आहेत. कोणाला हवे असतील तर घेउन जा! वर्थ वॉचिंग! :)

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 3:39 pm | नरेशकुमार

हे गवि सगळ्यांचा विमान प्रवास खरंच बंद करुन सोडनार आहेत.

तुम्ही NGC वरील seconds from disaster चीच आठवन करुन देता नेहमी.

माहितीत भर पडतेय गवि.
येउद्या अजुन विस्ताराने.

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 3:41 pm | स्वाती दिनेश

माहितीत भर पडतेय गवि.
येउद्या अजुन विस्ताराने.
गणपासारखेच म्हणते,
स्वाती

प्रास's picture

27 Jan 2011 - 4:14 pm | प्रास

माहितीत भर पडतेय गवि.
येउद्या अजुन विस्ताराने.

हेच म्हणतो मी.....

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2011 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार

गवि उत्तम लेखन, वाचतोय.

मात्र काही काही तुमच्या सरावातले शब्द आमच्यासाठी नविन आहेत. त्यामुळे त्यांचा अर्थ पण देता आला तर बरे होईल.

गवि's picture

27 Jan 2011 - 4:36 pm | गवि

क्युम्युलोनिम्बस ढग - काळे, विजा आणि वादळी वारे, हवेचे अतिशक्तिमान प्रवाह यांनी युक्त ढग.

आवश्यक ग्लाईडस्लोप - लँडिंगपूर्वी विमान खाली खाली येताना, शेवटी रनवेवर एकदम योग्य त्या बिंदूला जमिनीस्पर्श व्हायचा असेल तर जो काल्पनिक उतारमार्ग हवेत मेंटेन करावा लागेल तो.

फ्लाईट डिस्पॅचर : हवामान, तांत्रिक आणि कायदेशीर असे सर्व प्रकारचे क्लिअरन्सेस मिळवून विमान उड्डाणासाठी तयार करणारा आणि पायलटला प्रीफ्लाईट ब्रिफिंग देणारा एअरलाईनचा अधिकारी.

सोलो क्रॉस कंट्री - एकट्याने केलेले दोन विमानतळांमधील किंवा दोन ठिकाणांमधील उड्डाण. (एअरपोर्टच्या आसपासचे जनरल प्रॅक्टिस फ्लाईंग नव्हे)

कोर्स सेट केला: विमानाचे नाकाड एका दिशेत टिकवून फिक्स केलं.

ट्रॅक - इष्ट ठिकाणी पोचायचे असेल तर ठेवावा लागणारा फ्लाईटचा अपेक्षित मार्ग

व्हिज्युअल फ्लाईट : इन्स्ट्रुमेंटवर अवलंबून नसलेली आणि डोळ्यांनी जमिनीकडे पाहून मार्गाची खात्री करुन घेणारी फ्लाईंगची पद्धत. फक्त ढोबळपणे दिशा कळण्यासाठी कंपास वगैरे.

ऑटोपायलट : टेक ऑफ करून विमान एका पातळीवर लेव्हल झालं की पुढे त्याला ठराविक दिशेत, ठराविक उंचीवर उडत राहण्यासाठी केलेली ऑटोमॅटिक सोय. या मोडमधे टाकल्यावर विमाने बर्‍याच गोष्टी आपोआप सांभाळतात. बोईंग, एअरबस आणि जनरली कमर्शिअल विमानांत असते.

स्पिन : विमानाला खाली कोसळताना जर अनियंत्रित सर्पिलाकार गती मिळाली (वाळके पान जसे गरगरत खाली कोसळते) तशी अवस्था प्राप्त झाली तर त्यातून रिकव्हर होणे जवळजवळ अशक्य असते. पायलटसनाही अशा वेळी काही उमज पडणे अवघड असते.

सर्किट ब्रेकर्स : इलेक्ट्रिक उपकरणांसाठी असलेली फ्यूजसदृश स्विचेस.

फ्लॅप्स : पंखांवर असलेले एक्स्टेंडेबल भाग. हे खालीवर करून पंखांचा आकार बदलता येतो अतएव पंखांना मिळणारी उचल कमीजास्त करता येते. टेक ऑफ किंवा लँडिंग याचा ग्रेडिएंट (स्लोप) तीव्र किंवा उथळ करण्यासाठी अत्यावश्यक. अन्यथा लँडिंगच्या वेळी अतिरिक्त वेग शिल्लक राहून रनवेवरच विमान अनावर होऊ शकते.

(किंवा उलट केसमधे टेक ऑफनंतर लगेचच एखादी टेकडी असेल तर हे फ्लॅप्स झटपट उंच चढून टेकडी टाळण्यास मदत करतात.)

यात राहून गेलेला कुठला असेल तरी जरुर विचारा.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2011 - 4:41 pm | परिकथेतील राजकुमार

लगोलग शंकासमाधानाबद्दल धन्स हो गवि :)

गवि नेहमीच छान लिहितात. पुढचा भाग सुद्धा लवकर येउद्या.

- सूर्य.

स्पा's picture

27 Jan 2011 - 4:30 pm | स्पा

गवि एकदम थरारक अनुभव

छान लिहलय!
हवेत किंवा जमिनी वर अचानक काही होत नसत, चुकांची मालीकाच घडत असते हे खर आहे.
(या वरुन मला कुंगफु पांडा मधल " कोइ हादसे नही होते" हे वाक्य आठवल.)

आवशीचो घोव्'s picture

27 Jan 2011 - 6:04 pm | आवशीचो घोव्

भन्नाट आहे

गवि, धन्यवाद, खुप छान लिहिलं आहेत. एक शंका आहे, जेंव्हा विमानाच्या ईंधन टाकितुन ईंधन गळतं ते हवेतच उडुन जातं की पेट घेतं कि काय होतं त्याचं नक्की ? गाडीतुन गळणा-या ऑईल किंवा पेट्रोलचि जशी धार लागते तसं काहि होतं का ?

धन्यवाद.

गाडीतून गळण्यासारखंच.. हवेत उडून जातं. पण तिथे काही हीट सोर्स, ठिणगी असेल तर पेट घेतं.
अर्थातच कुठल्या पार्टमधून आहे लीकेज त्यावरही आहेच अवलंबून..
या केसमधे लिन्केजमधूनच पाईप कट झाला होता त्यामुळे नुसतंच गळून गेलं..

मुद्दामही टाकून द्यावं लागतं. लँडिंग वेट एक्सीड होत असेल तर.

(म्हणजे टेकऑफनंतर इंधन बर्न व्हायच्या आधीच इमर्जन्सी लँडिंगची वेळ आली तर फ्युएलसहित वजन घेऊन लँडिंग शक्य नसतं..तेव्हा..)

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 6:23 pm | नरेशकुमार

अहो, गवि. सहज एक शंका.

मुद्दामही टाकून द्यावं लागतं. लँडिंग वेट एक्सीड होत असेल तर.

टेक ऑफ घेतल्या घेतल्या लगेच लॅन्डींग केलेल्या बर्‍याच केसेसे असतील. त्या सर्व ठिकानी असेच होते का ? म्हनजे फ्युएल फेकुन देतात ?

फ्युएलसहित वजन घेऊन लँडिंग शक्य नसतं..तेव्हा..

अश्या काही केसेस आहेत का सांगा. वाचायन्यास उत्सुक.

फ़्युएलचं वजन फार जास्त असतं.फेकावं लागेल की नाही हे मुळात किती भरलंय त्यावर अवलंबून आहे.

समज फ़्लाईट्मधे 2000 किलो इंधन भरले आहे.विमानाचे with passengers वजन 9000किलो आहे. Total Takeoff weight=11000.

समज max अलाउड लँडिंग वेट 10000 किलो आहे.

फ़्लाईट पूर्ण पार पडली तर समजा 1500 किलो इंधन खर्च होईल आणि लँडिंग वेट 9500 राहील.

पण टेकऑफ़नंतर लगेच emergency landing वेळ आली तर विमान 11000 किलोचे असेल.मग 1000 किलो फ़ेकावे लागेल.असे एकूण गणित.

श्री. गवि.

शंका समाधानाबद्दल अतिशय धन्यवाद. आपल्या या ज्ञानदान यज्ञासाठी लाखो शुभेच्छा.

हर्षद.

सन्जोप राव's picture

27 Jan 2011 - 6:21 pm | सन्जोप राव

अंगावर काटा आणणारे लिखाण. विमानप्रवास या विषयावर इतके प्रभावी लिखाण वाचलेले नाही. उत्तम!

छोटा डॉन's picture

27 Jan 2011 - 6:32 pm | छोटा डॉन

रावसाहेबांशी सहमत.
गविंचे 'विमानप्रवास' हा हटके विषय हाताळणारे लिखाण वाचायला आवडते.

- छोटा डॉन

क्लिंटन's picture

28 Jan 2011 - 12:25 pm | क्लिंटन

असेच म्हणतो. उत्तम लेख.अजून येऊ देत.

अतिशय सुंदर अनुभव लिहिले आहेत, जबरदस्त वाचताना थक्क व्हायला होते.

रेझिग्नेटरी पायलट्स म्हण्जे कोण असते ? ते पायलट पेक्षा वेगळे असतात का?

रेझिग्नेटरी पायलट्स म्हण्जे कोण असते ? ते पायलट पेक्षा वेगळे असतात का?

हे राम..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Feb 2011 - 4:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ओ गवि, तुम्ही हे राम नका म्हणू इतक्यात.

@गणेशा :- तो वेगळा पायलट नाही हो, पायलट प्रकार चार चे नाव आहे. वाचण्याच्या नादात ती संज्ञा विसरलात बहुतेक तुम्ही.

तुम्ही माझा विमानप्रवास बंद करणार आहात गवी!
बरं, हे लेख वाचू नयेत असेही वाटत नाहीत्.......दुष्टचक्र आहे हे!

५० फक्त's picture

27 Jan 2011 - 10:03 pm | ५० फक्त

@ रेवती, खरंय अगदी खरंय

हे म्हणजे डायटिंग करणा-याने गणपा / स्वाती / प्राजु आणि इतर सुगरिणि व बल्लवाचार्यांचे लेख पाहण्यासारखं आहे.

पाहुन भिती वाटते आणि पाहिल्याशिवाय राहवत नाही.

हर्षद.

रेवती's picture

27 Jan 2011 - 10:11 pm | रेवती

वा!! समर्पक उदाहरण दिलत.

स्मिता.'s picture

27 Jan 2011 - 10:39 pm | स्मिता.

गवि,
तुमचे लेख खरंच फार माहितीपूर्ण असतात. काहिच माहिती नसलेल्या विषयातलं ज्ञान थोडं असलं तरी बरंच काही कळल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुमचे हे विमानसंबंधी लेख आवडतात... मस्त लिहिता तुम्ही.

पण खरंच मनात भिती वाटते हो! आधी वाटायचं आपल्याला पण विमान उडवायाला मिळायला हवं, कसली मज्जा येत असेल... आता विमानात बसले की पूर्ण वेळ मी तुमच्या लेखांची आणि पेपरातल्या काही बातम्यांचीच उजळणी करत असते. हा फोबिया घालवायला हवा!

चिगो's picture

27 Jan 2011 - 11:10 pm | चिगो

अफाट लिवलय, गवि...

>>अगदी पायलट नसलेल्या इतर सर्व व्यक्तींमधेही या टेंडन्सीज असतातच. आणि हेच स्वभावविशेष अशा किंवा दुसर्‍या काही नावांनी इतर क्षेत्रातही चर्चिले जातात..

मान्य.. माझ्यात थोडा "इंपल्सिव्ह"चा अंश आहे, असं वाटतं, बट नॉट अ‍ॅट ऑल रेझिग्नेटरी...

>>इतर क्षेत्रात तरी ते परवडतात हो.. पण पायलटच्या आयुष्यात मात्र त्याचे परिणाम भीषण होतात.

हे तर प्रचंड मान्य... मी (पायलट नसलो तरी) दुसर्‍यांवर परीणाम होऊ शकणार्‍या गोष्टींमधे माझ्या स्वभावाला मुरड घालण्याचा प्रयत्न करतो...

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2011 - 9:35 am | llपुण्याचे पेशवेll

धन्यवाद गवि. मस्तं लिखाण केले आहे.

आजानुकर्ण's picture

28 Jan 2011 - 9:47 am | आजानुकर्ण

वेगळ्या विषयावरील लेखन आवडले

टारझन's picture

28 Jan 2011 - 11:22 am | टारझन

मस्त लेखन .. पण गवी ह्याच विषयांवर लिहीतात :)

- स्कायलँडर

विटेकर's picture

28 Jan 2011 - 11:03 am | विटेकर

धन्यवाद गगनविहारी जी...
तुमचे या विषयातील लेख मी घाबरत- घाबरतच वाचतो.. पण वाचतोच.
मी १९९५सालापासून विमान प्रवास करत आहे .. आणि गेल्या दहा वर्षात कामाच्या निमित्तने मी अनेक वेळा भारत भ्रमण केले आहे. सर्वसाधारण पणे मी महिन्यातून ३-४ वेळा अरत -परत विमानप्रवास करतो.
पण माझी भिती अजून गेली नाही. प्रत्येत वेळी उड्डाण भरताना माझ्या पोटात गोळा येतो . मी एकतर तोंडाने स्त्रोत्र पठण करतो किंवा कानात तेच वाजवतो. विमान स्थिर होऊन पट्टे काढण्याची सूचना येईपर्यंत मी अस्वस्थच असतो. तसेच खराब हवामानामुळे पुन्हा पट्ट्यांची सूचना आली की पुन्हा पोटात गोळा! उतरताना इतकी भिती वाट्त नाही, कदाचित आपण आता लवकरच जमिनींवर उतरणार म्हणून असेल.
इतका प्रवास करुन ( काही परदेशी उड्डाणे - ८ /८ तासांची देखील ) माझी भिती कमी का होत नाही? तसेच अनेक जणांची उड्डाण भरताना तंतरलेली मी पहिली आहे .. हे असे घाबरणे सामान्य आहे का? एरव्ही मी उंचीला भीत नाही. महाराष्ट्रातील बहुतेक अवघड गडे- कोटांवर जऊन आलो आहे ..पाण्याला तर अजिबात भित नाही.. समुद्रात अनेक वेळा पोहलोदेखिल आहे !
पण खराब हवामानात जेव्हा दाबाचा पट्टा निर्माण होऊन विमान अचानक खाली जाते ; तेव्हा देखील काही जण त्याची मजा घेऊ शकतात ! असे का होते? याचा मनःस्थितीशी काही संबंध आहे का?
एकदा एक डिल फिस्कट्ल्यावर मला विमानप्रवासची इतकी भिती वाट्ली की मी तिकिट र् द्द करुन रेल्वेनी आलो !
तसेच वजन जास्त असण्याचा आणि विमान प्रवासाच्या भितीचा संबंध आहे असे मला एक पायलट म्हणाला .. हे खरे आहे का? बहुधा नसावे .. इंडियन एअरलान्स च्या हवाई सुंदरी (?) पाहिल्यावर इतके सड्पातळ कारण असावे असे वाट्त नाही?
एक सल्लागार म्हणाले की हा फोबिया नव्हे.. फोबिया झाला तर प्रवास करताच येणार नाही?
काही प्रकाश टाकता येईल का?

या विषयावर वेगळं लिहावं लागेल.

मी ही या बाबतीत बराच फोबिक आहे. आणि एकदा का विमानोड्डाण शिकले की मग स्वत:कडे कंट्रोल नसताना काय अवस्था होते ते मलाच माहीत.

फोबिया हा खूप तीव्र असला तर प्रवास करताच येणार नाही पण सौम्य भीती असू शकते. क्रॅशच्या बाबतीत काही वाचलं पाहिलं असेल तर कायमची मनात बसू शकते.

विमानात आपल्याला दारेबिरे हवाबंद करून आयसोलेट करण्यात येतं आणि जमिनीचा आधार सोडून आपण लिटरली त्रिशंकू अवस्थेत संपूर्ण हेल्पलेस आहोत असा फील येत असल्याने इतर वाहनांपेक्षा त्यात जास्त भीती वाटते.

त्या अपघातांविषयी आणि एकूण विमानांविषयी अधिक माहिती घेतली तर ही भीती खूप कमी होऊ शकते.

आता यापुढे एअर क्रॅश ऐवजी एअर सेफ्टीवर काहीकाळ लिहीन..त्याने विमानप्रवासाच्या भीतीवर काही दिलासा मिळू शकेल.

विमानप्रवासाचे पायलटच्या नजरेतुन वर्णन म्हणजे मेजवानीच. (असेच प्रसंग खुप ड्राईव्ह करणार्‍या लोकांकडुन ऐकले आहेत, फरक फक्त परीणामांच्या स्केलचा.

धमाल मुलगा's picture

10 Feb 2011 - 4:30 pm | धमाल मुलगा

गगनविहारींच्या हक्काच्या विषयातली आणखी एक झकास भरारी :)

एकडाव गवि विमान उडवताना सोबत जायला पाहिजे! मजा येईल. :)
(नंतर मी सब-किरवंत म्हणून ब्रँच उघडेन. ;) )

शिल्पा ब's picture

10 Feb 2011 - 6:06 pm | शिल्पा ब

लेख मस्तच आहे....मला विमानप्रवास फारसा आवडत नाही, आणि आता परत अशा प्रवासात तुमच्या लेखांची आठवण होऊन तो पायलट काय करत असेल हेच विचार येत राहतील.
असो...लिहित राहा ...माहिती मिळते.

टारझन's picture

10 Feb 2011 - 6:10 pm | टारझन

वा गवि वा १!! मजा आ गया भाई :)

आईच्यान खतरनाक लेख.
धन्य ते पायलटस.
विमानप्रवासात वर विटेकरांनी म्हंटल्याप्रमाणे ब-याच वेळेला टरकते.
झक मारली अन विमानात बसलो असे वाटते. अन हवामान खराब असेल तर विचारायलाच नको.
सुरुवातीला तर पार तंतरायची.आताशा एवढा त्रास होत नाहि.
मागे फयान वादळाच्या आसपास चंडीगढ-मुंबई असा प्रवास केला होता.
पुर्ण प्रवासभर विमान नुसते हिंदकळतच चालले होते. कसाबसा मुंबईला पोहोचलो अन शेवटी सुटकेचा निश्वास टाकला.
परंतु पुर्ण प्रवासभर ट्र्क/एसटी मधे बसून प्रवास करतोय असेच वाटत होते.
विमानात बसल्यावर होणारा अजून एक त्रास म्हणजे,लँडिंगच्या दहा मिनिटे आधीच डोके दुखायला लागते. कान फाटल्यासारखे होतात. जीव नकोसा होतो.
असो,
दोन्ही लेख वाचले. उत्तम.

अभिज्ञ.

निनाद's picture

11 Feb 2011 - 9:32 am | निनाद

परंतु पुर्ण प्रवासभर ट्र्क/एसटी मधे बसून प्रवास करतोय असेच वाटत होते.
तसाही फार फरक नसतोच ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Feb 2011 - 10:13 am | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

गामा पैलवान's picture

20 Mar 2016 - 1:55 am | गामा पैलवान

गवि,

हतबल न झालेला तो जिगिषुबल वैमानिक कोण होता? रॉबर्ट पिशे तर नव्हे? भर अटलांटिकावर इंधन समाप्त आणि पोर्तुगालमधला नजीकचा विमानतळ १२० किमी दूर, यावरून आठवलं. जबरदस्त प्रसंगावधान राखून होता तो.

आ.न.,
-गा.पै.

गवि's picture

20 Mar 2016 - 8:49 am | गवि

हो. तोच तो.

आणखी एक गिमली ग्लायडर या नावाने प्रसिद्ध घटना आहे. समुद्रावर नाही पण जमिनीवर अशक्यप्राय अंतर विनाइंजिन काटणं असलेली. तेही इंधन भरताना युनिट्सच्या गोंधळामुळे. त्यातले पायलट्स तर आणखीच भारी म्हणायचे. त्याविषयी पूर्वी इथे वेगळं लिहीलंय.

गामा पैलवान's picture

20 Mar 2016 - 12:32 pm | गामा पैलवान

धन्यवाद गवि. तुमचं एकेक लेखन वाचतोय. जाम पकड घेतंय. :-)
आ.न.,
-गा.पै.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 3:04 pm | तर्राट जोकर

हो. तोच तो. >> त्याच्याबद्दल तुम्ही लिहिल्याशिवाय वाचणार नाही. एअरक्रॅशबद्दल तुम्ही लिहिण्याचा एक उंच बेंचमार्क सेट केलाय. विकिपीडियावरील माहिती त्याच्या पासंगासही पुरत नाही. समस्त मिपाकरांतर्फे मी आपल्याला विनंती करतो ह्या रेकॉर्ड ग्लायडींग केस बद्दल लिहा.

गवि's picture

20 Mar 2016 - 3:13 pm | गवि

थँक्स..

गिमली ग्लायडर ही अनेक बाबतीत तशीच केस आहे. इंधन भरताना चुकीने कमी भरणं व्हर्सेस फ्युएल पाईप लीकेज असे कारणांचे फरक, पण ग्लायडिंग सेम.

साम्य असल्याने वेगळं लिहीलं नाही.

जव्हेरगंज's picture

20 Mar 2016 - 1:26 pm | जव्हेरगंज

वा! भरपूर लेख वाचलेत तुमचे!!

मस्तच असतात !!!

जव्हेरगंज's picture

20 Mar 2016 - 1:27 pm | जव्हेरगंज

वा! भरपूर लेख वाचलेत तुमचे!!

मस्तच असतात !!!

गामा पैलवान's picture

21 Mar 2016 - 12:20 am | गामा पैलवान

गवि,

मी ऐकलेलं की रॉबर्ट पिशे चालवत असलेल्या ट्रान्सॅट २३६ विमानास घातपात केला गेला होता. प्रमुख यंत्रज्ञाची (मेक्यानिक) एक भाग बदलण्याविषयी चिंता दुर्लक्षण्यात आली, असा विकीवर विदा आहे. खखोदेजा.

आ.न.,
-गा.पै.

अभिजीत अवलिया's picture

28 Mar 2016 - 11:29 pm | अभिजीत अवलिया

गवि काय भन्नाट लिहिले आहे हो तुम्ही .... आवडले ...