सब सूर तीवर मेल मिलायो..१ (यमन)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
12 Oct 2010 - 9:56 pm

सब सूर तीवर मेल मिलायो..(ओळख..)

यमनवर आत्तापर्यंत बरंच लिहून झालं आहे त्यामुळे अधिक काही लिहीत नाही..एवढंच सांगतो की यमन हा आपल्या रागसंगीताचा प्राण, रागांचा राजा, माणसातलं माणूसपण म्हणजे यमन..नारायणरावांचं 'नाथ ह माझा..' म्हणजे यमन..!

रागाचं लक्षणगीत येथे ऐका -

लक्षणगीत म्हणजे ज्या काव्यपंक्तित (बंदिशीमध्ये) त्या त्या रागाची लक्षणं सांगितलेली असतात, वर्णन केलेलं असतं..

सब सूर तीवर मेल मिलायो - नीधपम' संगती.. 'मेल' या शब्दावर सुंदर सम आहे. 'तामे अंश गंधार नी सहचर.. म्हणजे या रागाचा वादी स्वर गंधार आहे आणि संवादी निषाद आहे म्हणजेच तो गंधाराचा सहचर आहे.. 'सहचर' हा शब्द किती सुरेख वापरला आहे!

'परि सूर संगत अंग मनोहर..'

'परि सूर..' ची स्वरावली खास यमनची बर्रका..

'अंग..' शब्दाची परे ही संगतीदेखील अगदी यमनची ओळख पटवणारी..!

हिंदुस्थानी रागसंगीतामध्ये ज्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं असे आमचे आचार्य श्रीकृष्ण नारायण तथा अण्णासाहेब रातंनजनकर यांची ही बंदिश.. चतुरपंडीत भातखंडेबुवांची आग्रा परंपरा अण्णासाहेबांनी समर्थपणे पेलली अन् पुढे नेली.. खूप मोठी माणसं ही..!

हे आमचे अण्णासाहेब रतंनजनकर. हिंदुस्थानी संगीताच्या दुनियेतलं प्रात:स्मरणीय व्यक्तिमत्व.. अण्णासाहेबांच्या बंदिशी हा एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे, नव्हे प्रबंधाचा विषय आहे!

यमनचं सरगम गीत येथे ऐका.. कानांना किती सुख लाभतं ते पाहा.. हे यमनचं निर्गुणी रूप. ऐकणार्‍यांनी स्वत:ला भावेल तसा याचा अर्थ काढावा.. सारे सूर कसे प्रसन्न आहेत पाहा.. आजतागायत अक्षरश: शेकड्यांनी संगीत दिग्दर्शकांना या सुरांनी वेड लावलं.. अगदी भास्करबुवा बखले, बाबूजी, मदनमोहन.. किती नावं घ्यावीत? कुणी कुणी सुटलं नाही या यमनच्या मायाजालातून..!

आणि सरतेशेवटी येथे आपल्याला यमनची बंदिश ऐकता येईल.. यमनच्या अनेक उत्तमोत्तम बंदिशी आहेत त्यापैकी ही एक..

या लेखनमालेचा एकच हेतू की आपल्यापैकी प्रत्येकानं आपल्या रागसंगीताकडे वळावं, त्याची आपल्याला गोडी लागावी.. इतकं मोठं, मोलाचं गाणं आपले पूर्वज आपल्याकरता ठेऊन गेले आहेत त्याचा आपण सर्वांनी मनमुराद आस्वाद घ्यावा व समृद्ध व्हावं..

अनमोल खजिना आहे हा, साजूक तुपातली मिठाई आहे ही.. तिची गोडी प्रत्येकानं चाखावी इतकाच हेतू..!

अण्णासाहेब, महालेसाहेब यांना सादर अभिवादन व गायिका सौ वरदा गोडबोले हीचं अभिनंदन आणि शुभेच्छा..!

तात्या.

संगीतवाङ्मयआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

12 Oct 2010 - 10:06 pm | इंटरनेटस्नेही

छान! :) आमाच्या सारख्या संगीत क्षेत्रातल्या काही म्हणजे काहीच न कळण्या-यांकरिता चांगला महितीचा स्त्रोत.
-

(राष्ट्रीय संगीत अडाणी पुरस्कार प्राप्त) इंट्या.

इंटरनेटस्नेही's picture

12 Oct 2010 - 10:06 pm | इंटरनेटस्नेही

छान! :) आमाच्या सारख्या संगीत क्षेत्रातल्या काही म्हणजे काहीच न कळण्या-यांकरिता चांगला महितीचा स्त्रोत.
-

(राष्ट्रीय संगीत अडाणी पुरस्कार प्राप्त) इंट्या.

तर्री's picture

12 Oct 2010 - 10:26 pm | तर्री

यमनाची ओळख कितीही झाली तरी ह्या रागाचे नाविन्य काही कमी होत नाही . तात्या अगदी खरे आहे : कोणताही संगीतकार ह्या रागाच्या "मोहजाला"तून सुटणार नाही. नव्या ( तुलनेने ) सलिल साहेबांची कित्ती गाणी " यमना मधली " आहेत.
तात्या चांगला लेख झाला आहे . यमना सारखे तुमचे लेखनही सदाबहार.
भूप ते भैरवी , जमवा .....वेळात वेळ काढून !

कौशी's picture

12 Oct 2010 - 10:50 pm | कौशी

पुर्वी कधी ऐकले नव्ह्ते!!!आवडले.....

चिंतामणी's picture

13 Oct 2010 - 12:56 am | चिंतामणी

यमनाची ओळख कितीही झाली तरी ह्या रागाचे नाविन्य काही कमी होत नाही हे त्रिकलाबाधीत सत्य आहे. या रागाचे अनेक अविष्कार ऐकले आहेत. अनेक मैफली मधे, रेकॉर्ड मधून ऐकला आहे. याची अनेक रुपे मराठी तसेच हिंदी गाण्यात बघीतली तसेच ऐकली आहेत.

हा राग त्रिदोशनाशक आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे.

जाता जाता- याचा एक फार उच्च अविष्कार उ. विलायत खाँ साहेबांनी अजरामल करून ठेवला आहे.

ज्यांना याचा अनुभव घ्यायचा आणि त्याच्या जादुत बुडायचे आहे त्यांनी ईमेल आ.डि. व्यनी करावा.

विसोबा खेचर's picture

13 Oct 2010 - 1:56 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकवरांचा मी कृतज्ञ आहे.. वाचनमात्रांचेही औपचारिक आभार मानतो..

तात्या.

--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!

पाषाणभेद's picture

14 Oct 2010 - 10:04 am | पाषाणभेद

तात्या, मस्त ओळख करून दिलीत.
मी काय म्हणतो, एक रागांच्या, शास्त्रीय संगीताबाबतीत आमचा कान तयार करणारी बेसीकची लेखमाला लिहाच गडे.

स्पा's picture

14 Oct 2010 - 11:09 am | स्पा

जबराट.....

समंजस's picture

14 Oct 2010 - 11:44 am | समंजस

लेख.

[ माझ्या सारख्याने शास्त्रीय संगीत समजून घेणे म्हणजे ईयत्ता ४ थीत असताना इन्टीग्रल, डेरीवेटीव्ज, लॅपलस ट्रॉंन्सफॉर्म शिकणे :) ]