सब सूर तीवर मेल मिलायो..१ (यमन)
सब सूर तीवर मेल मिलायो..(ओळख..)
यमनवर आत्तापर्यंत बरंच लिहून झालं आहे त्यामुळे अधिक काही लिहीत नाही..एवढंच सांगतो की यमन हा आपल्या रागसंगीताचा प्राण, रागांचा राजा, माणसातलं माणूसपण म्हणजे यमन..नारायणरावांचं 'नाथ ह माझा..' म्हणजे यमन..!
रागाचं लक्षणगीत येथे ऐका -
लक्षणगीत म्हणजे ज्या काव्यपंक्तित (बंदिशीमध्ये) त्या त्या रागाची लक्षणं सांगितलेली असतात, वर्णन केलेलं असतं..
सब सूर तीवर मेल मिलायो - नीधपम' संगती.. 'मेल' या शब्दावर सुंदर सम आहे. 'तामे अंश गंधार नी सहचर.. म्हणजे या रागाचा वादी स्वर गंधार आहे आणि संवादी निषाद आहे म्हणजेच तो गंधाराचा सहचर आहे.. 'सहचर' हा शब्द किती सुरेख वापरला आहे!
'परि सूर संगत अंग मनोहर..'
'परि सूर..' ची स्वरावली खास यमनची बर्रका..
'अंग..' शब्दाची परे ही संगतीदेखील अगदी यमनची ओळख पटवणारी..!
हिंदुस्थानी रागसंगीतामध्ये ज्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं असे आमचे आचार्य श्रीकृष्ण नारायण तथा अण्णासाहेब रातंनजनकर यांची ही बंदिश.. चतुरपंडीत भातखंडेबुवांची आग्रा परंपरा अण्णासाहेबांनी समर्थपणे पेलली अन् पुढे नेली.. खूप मोठी माणसं ही..!
हे आमचे अण्णासाहेब रतंनजनकर. हिंदुस्थानी संगीताच्या दुनियेतलं प्रात:स्मरणीय व्यक्तिमत्व.. अण्णासाहेबांच्या बंदिशी हा एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे, नव्हे प्रबंधाचा विषय आहे!
यमनचं सरगम गीत येथे ऐका.. कानांना किती सुख लाभतं ते पाहा.. हे यमनचं निर्गुणी रूप. ऐकणार्यांनी स्वत:ला भावेल तसा याचा अर्थ काढावा.. सारे सूर कसे प्रसन्न आहेत पाहा.. आजतागायत अक्षरश: शेकड्यांनी संगीत दिग्दर्शकांना या सुरांनी वेड लावलं.. अगदी भास्करबुवा बखले, बाबूजी, मदनमोहन.. किती नावं घ्यावीत? कुणी कुणी सुटलं नाही या यमनच्या मायाजालातून..!
आणि सरतेशेवटी येथे आपल्याला यमनची बंदिश ऐकता येईल.. यमनच्या अनेक उत्तमोत्तम बंदिशी आहेत त्यापैकी ही एक..
या लेखनमालेचा एकच हेतू की आपल्यापैकी प्रत्येकानं आपल्या रागसंगीताकडे वळावं, त्याची आपल्याला गोडी लागावी.. इतकं मोठं, मोलाचं गाणं आपले पूर्वज आपल्याकरता ठेऊन गेले आहेत त्याचा आपण सर्वांनी मनमुराद आस्वाद घ्यावा व समृद्ध व्हावं..
अनमोल खजिना आहे हा, साजूक तुपातली मिठाई आहे ही.. तिची गोडी प्रत्येकानं चाखावी इतकाच हेतू..!
अण्णासाहेब, महालेसाहेब यांना सादर अभिवादन व गायिका सौ वरदा गोडबोले हीचं अभिनंदन आणि शुभेच्छा..!
तात्या.
वाचने
4384
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
प्रतिक्रिया
छान! आमाच्या सारख्या संगीत
छान! आमाच्या सारख्या संगीत
चांगला परीचय .
छान!!!
त्यात्या, लै भारी.
प्रतिसाद देणार्या सर्व
तात्या, मस्त ओळख करून
जबराट.....
छान