लहान मुलांच्या जर्मन पुस्तकांतील चित्रांचे प्रदर्शन

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in कलादालन
8 Oct 2010 - 5:09 pm

तोच तोच काथ्या पुन्हा पुन्हा कुटून, फुटक्या कौलांवर पुन्हा पुन्हा दगड मारून कंटाळा आला असेल आणि वीकेंडला थोडा रुचिपालट हवा असेल तर हा घ्या...

Sybille Hein

सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या (किंवा इतरांच्याही) बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो. मॅक्स म्युल्लर भवनातर्फे सध्या 'सुदर्शन कला दालन' शनिवार पेठ इथे आताच्या जर्मन बालपुस्तकांतल्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. इतक्या वेगवेगळ्या शैलीतली आणि इतकी देखणी चित्रं आहेत की मुलांचंच नव्हे तर मोठ्या माणसांचंही भान हरपून जावं.

Jacky Gleich

त्या सोबत चंद्रमोहन कुलकर्णी, राजू देशपांडे आणि माधुरी पुरंदरे यांनी काढलेली मराठी बालपुस्तकांतलीही काही देखणी चित्रं प्रदर्शनात आहेत.

शिवाय पुष्कळशी सचित्र जर्मन/इंग्रजी बालपुस्तकं सुध्दा ठेवलेली आहेत. मुलांना ती पाहायला आणि वाचायला नक्की आवडतील.

स्थळः सुदर्शन कला दालन, अहिल्यादेवी शाळेजवळ, गाडगीळ पथ, ४२१ शनिवार पेठ
कालावधी: १० ऑक्टोबरपर्यंत, रोज सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत
संपर्क: २४४३ ०८०३

अधिक माहिती इथे मिळेल.

प्रदर्शनातली काही चित्रं इथे

कलासंस्कृतीबालकथादेशांतरवाङ्मयमौजमजारेखाटनस्थिरचित्र

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

8 Oct 2010 - 7:23 pm | मुक्तसुनीत

येथे ही माहिती दिल्याबद्दल आभार.
प्रदर्शनाला जमेलसे दिसत नाही. मात्र दुव्यंमधे दिसणारी चित्रे रोचक आहेत.

धनंजय's picture

8 Oct 2010 - 8:49 pm | धनंजय

चित्रे मस्त आहेत.
मॉरीस सेंडॅकच्या पुस्तकांमधील चित्रांची आठवण झाली.