"रोबोट" चे स्कॅनींग, माझ्या नजरेतून...!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
5 Oct 2010 - 9:14 pm

गेल्या शुक्रवारी १ ऑक्टोबरला रजनीकांतचा "रोबोट" चित्रपट प्रदर्शीत झाला.
सुरुवातीपासूनच उत्सुकता होतीच.
रविवारी बघितला. मोठ्या पडद्यावर.
बघायला जाण्या आधी, भारतीय चित्रपट आणि तोही सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन थ्रिलर म्ह्टल्यावर मन थोडे नाही म्हटले तरी साशंक होतेच, ते यासाठी की एवढा खर्च करून त्यात कल्पनादृष्टी नीट वापरली असेल की नाही?
कारण, हरमन बावेजाचा लव्ह स्टोरी खुप स्पेशल इफेक्टची रेलचेल असूनही पडला होता. अर्थात तो मी बघितला नव्हताच.
पण, रोबोटचा दक्षिणेकडचा "शंकर" हा निर्माता असल्याने व तो हिंदित डब असल्याने थोडे हायसे वाटत होते.
कारण त्याचे पूर्वीचे काही चित्रपट बर्‍यापैकी कल्पनाशक्ती वापरुन बनवले गेले होते. उदा. जीन्स, हिंदुस्तानी वगैरे.
तसा सायन्स्स फिक्शन क्रीश हीट झाला होताच. पण त्यात स्पेशल इफेक्ट्स हातचे राखून वापरले होते आणि त्याची कथा पाच पाच जणांनी लिहीली होती आणि बरीच मोठी आणि क्लीष्ट होती.
रोबोटचा लेखक एकच आहे. शंकर.
कथा सोपी आहे. जास्त क्लिष्ट नाही.
आणि कल्पनाशक्ती म्हणाल तर अद्भुत, अद्वितीय.
दक्षिणेत तर रजनिकांतच्या फॅन्स नी सकाळी दोन वाजल्यापासून सकाळी चार च्या शो साठी रांगा लावल्या होत्या अशी बातमी टाईम्स ला होती. आणि एकेक तिकिट ५००० रु ना काळ्या बाजारात विकले गेले होते, असे वाचनात आले.
खरोखरच चित्रपट बघण्यासारखा आहे, यात वादच नाही.

कथा :
डॉ. वशी याने एक रोबोट (नाव: चिट्टी) बनवला असतो जो त्याला (त्याच्या सारखे अनेक रोबोट बनवून) सैन्यात शत्रूविरुद्ध वापरायचा असतो. त्याचा प्रतिस्पर्धी आणि गुरु डॉ. व्होरा याला तसाच रोबोट बनवता येत नाही. तो चिट्टीकडून त्याची न्युरोटीक संरचना चोरण्याच्या बेतात अस्तो. त्याला तसाच रोबोट बनवून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना घातक कामासाठी त्याला विकायचा असतो. पण तो बनवता येत नसल्याने डॉ. वशी च्या रोबोट्ला तो विविध कारणांनी सैन्यात घेण्यासाठी नाकारतो.
काही चुका रोबोटकडून ही अशा घडतात (आगीतला "तो" प्रसंग) की व्होराच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. मग तो वशीला रोबोट मध्ये भावना निर्माण होईल असे करायला भाग पाडतो, म्हणजे रोबोट स्वतः काही निर्णय घेवू शकेल.
रोबोटमध्ये भावना येतात आणि अघटीत घडते. रोबोट मध्ये वशीच्या मैत्रीणिवद्दल (ऐश्वर्या) प्रेमभावना निर्माण होते आणि त्यासाठी तो वशीच्या विरोधात जातो.
मॅन. मशीन. मोहब्बत.
वशी त्याला तोडून टाकतो. डिसमॅण्टल करतो. पण तोडलेला रोबोट पुन्हा बनवून व्होरा त्यात विध्वंसक चीप बसवतो.....
पुढे काय?
चित्रपट जावून पहाच.

स्पेशल ईफेक्ट्स बद्दल :
- चित्रपटात स्पेशल ईफेक्ट्स ची अगदी सुरुवातीच्या दृश्यापासून इतकी रेलेचेल आहे की काय सांगावे.
- सगळे इफे़क्ट्स जागतीक दर्जाचे आहेत. त्यासाठी चित्रपट कोठेच कमी पडत नाही.
- क्लायमॅक्सचा सीन तर या सगळ्यांवर कडी आहे. कळस आहे. त्यातली कल्पनाशक्ती आणि इफे़क्ट्स आजपर्यंत कोणत्याच चित्रपटात आपण यापूर्वी बघितले नाहियेत. अगदी हॉलीवूडच्या चित्रपतात सुद्धा नाही. बरं!
एकदम ओरिजीनल आणि क्लास....झकास.

अ‍ॅक्शन दृश्ये :
- अद्वितिय, अप्रतिम.
- रेल्वेचा मारामारीचा आणि पाठलागाचा सीन ग्रेट (महान)
- रोबोट स्वरूपातला रजनीकांत (चिट्टी) ऐश्वर्याला लग्नाच्या मंडपातून पळवून नेत असतांना रस्त्यावरची अ‍ॅक्शन दृश्ये लाजवाब, थरारक.
- चित्रटातली इतर सगळी अ‍ॅक्शन दृश्ये थरारक.

इतर वैशिष्ट्ये:
- सैन्यात घेण्या आधी एका मिटींग मध्ये डॉ. व्होरा रोबोटला "सैन्यात वापरण्यास अयोग्य" आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या पद्धतीने काही सूचना रोबोटला देतो, त्यातले स्पेशल इफेक्ट आणी कल्पना अगदी खासच.
- इलेक्ट्रो मॅग्नेटिक मोड मध्ये गुंडाची सगळी शस्त्रे ओढली जातात आणि तो अवतार काली सारखा दिसतो, आणि अडानी स्त्रीया लगेच अंगात येवून घुमायला लागतात. विनोद निर्मीती, अ‍ॅक्शन, स्पेशल इफेक्ट, अंधश्रद्धेचा पगडा .. सगळे कल्पकतेने एकाच दृश्यात दाखवले. वा!
- मच्छरा सोबतचा रोबोतचा संवाद. छान आणि ओरिजीनल विनोद.

अभिनय :
- रजनिकांतने डॉ. वशी आणि पहीला रोबोट, तसेच दुसरा व्होराचा रोबोट दोघांची ही भूमीका उत्तम साकारली आहे.
- रोबोटने अभिनय छान केला आहे.
- काही दृश्य मनाला चटका लावून जातात.
गाणी:
- गाणी मात्र खास लोकप्रिय आणि श्रवणीय नाहीत.
- मात्र गाणी प्रेक्षणीय आहेत.
(हिंदुस्तानी मधील "माया मच्छींद्र "गाणे आठवतेय?)

हा चित्रपट ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर बघावा. दुप्पट पैसे वसूल.
ज्यांनी बघीतला त्यांनी आपले मत व्यक्त करावे.

चित्रपटविचारबातमीशिफारसप्रतिक्रियासमीक्षा

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

5 Oct 2010 - 9:27 pm | अविनाशकुलकर्णी

बघितला पाहिजे

पाहिला नाही पण २ परिक्षणे वाचली एक मित्राच आणि एक पेपर मधल. तद्दन भिक्कार चित्रपट असल्याच दोघांनी म्हटलय .
त्यामुएळे खिश्याला खार लावुन हा चित्र्पट पहाणे नाहिच.

आजच पाहीला.निमिष यांच्याशी अगदी सहमत ,पैसे वसुल चित्रपट आहे हा. एकदम धमाल.

स्वछंदी-पाखरु's picture

5 Oct 2010 - 10:22 pm | स्वछंदी-पाखरु

का हो निसो ???? तो रजनीकांतचा फेमस फायटींग सीन ....

ज्यात रजनीकांत एकटा असतो व त्याच्या दंबूकी मध्ये एकच
गोळी असते........... (ढॅण्ट टॅ ढॅण.......)
आणि समोर तीन गुंड असतात!!! (ढीश..... ढीश...)

मग रजनीकांत त्याच्या खास शैलीने ;) म्हणजेच रजनीकांत त्याच्या गळ्यात लटकणारी ब्लेड ओढुन काढतो.
मग ती ब्लेड मधल्या गुंडाच्या दीशेने फेकतो व पटकन दंबुक काढुन त्या ब्लेडला गोळी मारतो (ढीशक्याँव.........)

मग चक्क त्या दंबुकीच्या गोळीचे ब्लेडनी कापल्या गेल्याने दोन तुकडे होतात आणि मग ती ब्लेड बरोबर मधल्या गुंडाला लागते व तो मरतो आणि ते दोन तुकडे त्याच्या डाव्या व उजव्या बाजुला उभ्या असलेल्या दोन्ही गुंडाना लागतात व ते मरतात......
आँsssss??????

मग आपली दंबुक गरागरा फिरवून खिशात घालतो......

हा असला काही सीन नाहिये का हो????

स्वपा

येनाss रासकलाssss....... माईंssड इट आय से.....

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Oct 2010 - 2:09 am | विश्वनाथ मेहेंदळे

हा आणि असे अनेक प्रसंग ढकलपत्रातून वाचले आहेत. कधी रजनीच्या नावावर तर कधी मिथुनच्या नावावर. मला तो प्रसंग बघायची इच्छा आहे. खरोखर असा प्रसंग चित्रित झाला आहे काय हे पाहण्याची उत्सुकता आहे. परवाच फेसबुक वर एक क्लीप पाहिली त्यात एक गोरा असे प्रकार करत होता. बहुधा स्वीडिश चित्रपट होता. नक्की माहित नाही.

मी तमिळ बघितला. त्यामुळे गाणी छान वाटली.
अरिमा अरिमा तर १७६० वेळा ऐकले. शब्द कळत नाही पण Rhythm झकास.
Special Effects.... कधीही न बघितलेले.
जितका पिक्चर आवडला तितकाच थिएटर मधला शिट्यांचा, टाळ्यांचा आवाजही धमाल होता..
निमिष सोनार यांचे परिक्षण तितकेच छान...

बाकी कुणी कितीही नाव ठेवा.... रजनी is THE BEST.....

स्वप्निल..'s picture

6 Oct 2010 - 12:25 am | स्वप्निल..

मी पण बघितला. बिल्कुल नाही आवडला.

अंतु बर्वा's picture

6 Oct 2010 - 12:55 am | अंतु बर्वा

Name: Chitti..
Speed: 1 terahertz...
Memory: One zeta byte...
Processor: Pentium millenia V2...

मंडळी थेटरात जाउन रजिनी चा चित्रपट पाहण्याची पहिलीच वेळ... पैसा वसुल चित्रपट आहे. निसों नी म्हटल्याप्रमाणे सर्व द्रुष्ये एकदम ओरिजनल... आणी रजनी साठी पडणार्‍या टाळ्या आणी शिट्ट्यांमधे रोबोट पाहणं म्हनजे छान अनुभव होता... गाणी मात्र खास नाहीत... कलिमंजारो लडकी परबत थी यारो, मोहोंजोदरो इसको दिल मे उतारो, अशी गाणी स्वानंद किरकिरेंनी लिहावी हे काही पचलं नाही... मोहीत चौहान ने गायलेलं एक गाण मात्र छान आहे...

ऑल इन ऑल, वर्थ अ वॉच...

चिंतामणी's picture

6 Oct 2010 - 1:39 am | चिंतामणी

हे वाचताना काही वर्षापुर्वी आलेल्या ईमेलचे आठवण झाली आणी ती इथे ठेवायचा मोह आवरला नाही.

--------------------------------------------------------------------------------
--Forwarded Message Attachment--

Joke: Why Newton committed suicide
Here is the reason. Why Newton Committed Suicide.....

Once, Newton came to India and watched a few Tamil movies that had his head spinning. He was convinced that all his logic and laws in physics were just a huge pile of junk and apologized for everything he had done.

In the movie of Rajanikanth, Newton was confused to such an extent that he went paranoid.

Here are a few scenes

1) Rajanikanth has a Brain Tumor which, according to the doctors can't be cured and his death is imminent. In one of the fights, our great Rajanikanth is shot in the head. To everybody's surprise, the bullet passes through his ears taking away the tumor along with it and he is cured! Long Live Rajanikanth!

2) In another movie, Rajanikanth is confronted with 3 gangsters. Rajanikanth has a gun but unfortunately only one bullet and a knife. Guess, what he does? He throws the knife at the middle gangster? & shoots the bullet towards the knife. The knife cuts the bullet into 2 pieces, which kills both the gangsters on each side of the middle gangster & the knife kills the middle one.

3) Rajanikanth is chased by a gangster. Rajanikanth has a revolver but no bullets in it. Guess, what he does. Nah? not even in your remotest imaginations. He waits for the gangster to shoot. As soon as the gangster shoots, Rajanikanth opens the bullet compartment of his revolver and catches the bullet. Then, he closes the bullet compartment and fires his gun. Bang... the gangster dies...

This was too much for our Newton to take! He was completely shaken and decided to go back. But he happened to see another movie for one last time, and thought that at least one movie would follow his theory of physics. The whole movie goes fine and Newton is happy that all in the world hasn't changed. Oops, not so fast!

The 'climax' finally arrives. Rajanikanth gets to know that the villain is on the other side of a very high wall. So high that Rajanikanth can't jump even if he tries like one of those superman techniques that our heroes normally use. Rajanikanth has to desperately kill the villain because it's the climax. (Newton dada is smiling since it is virtually impossible?) Rajanikanth suddenly pulls two guns from his pockets. He throws one gun in the air and when the gun has reached above the height of the wall, he uses the second gun and shoots at the trigger of the first gun in air. The first gun fires off and the villain is dead.

Newton commits suicide...

ज्ञानेश...'s picture

6 Oct 2010 - 11:58 am | ज्ञानेश...

'मनोरंजन' हे एकमेव उद्दीष्ट ठेऊन थेटरात गेलात, तर तुमचे पैसे नक्की वसूल होतील. लॉजिकला काही काळ सोडचिठ्ठी द्यावी, आरामशीर अंग सैल सोडून ऐसपैसपणे खुर्चीवर रेलावे, टाळ्या- शिट्या वाजवाव्यात, धिंगाणा घालावा.. मुव्ही एंजॉय करावा.
तीन तास सर्व ताणतणावातून सुटका करण्याचा खात्रीशीर उपाय !

मी-सौरभ's picture

7 Oct 2010 - 9:25 am | मी-सौरभ

तामिळ मधे बघायची ईच्छा आहे. बघुया :)

आपण लिहिलेले वाचुन बघावा म्हणत आहे.
बाकी कामा मुळे टीव्ही पाहत नसल्याने प्रमोज सुद्धा बघितलेल्या नाहीत की कुठली अ‍ॅड पण ..
सो डायरेक्ट पाहयला जातो ...

विसोबा खेचर's picture

7 Oct 2010 - 2:04 pm | विसोबा खेचर

चित्रपट नक्की बघणार रे.. छान परिक्षण :)

(रजनीकांतप्रेमी) तात्या.

--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

धन्यवाद तात्या.
आपल्याकडून मिळालेली प्रतिक्रीया मोलाची आहे.

त्यामुळे हा पिक्चर बघायला हरकत नाही. पुढच्या आठवड्यात नक्की........

हर्षद आनंदी's picture

9 Oct 2010 - 10:08 pm | हर्षद आनंदी

अस वाट्तय तरी