घरातील ज्येष्ठ व्यक्ती

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
3 Aug 2010 - 3:29 am

आज दुपारची गोष्ट आहे. १० वर्षाच्या माझ्या मुलीची मैत्रिण आमच्याकडे माझ्या मुलीशी खेळायला म्हणून आली होती. आई म्हणजे माझ्या सासूबाई नेहेमीप्रमाणे लोकरीचा स्वेटर वीणत बसल्या होत्या. या चिमुरडीचा आल्या आल्या चिवचिवाट सुरु झाला. तिनी आल्या आल्या स्वेटरचं कौतुक केलं, तो शिकून घेण्यात रस दाखवला.
आई फक्त शांतपणे म्हणाल्या "बघ, म्हणजे येईल." : ) आणि वीणू लागल्या.
मैत्रिणीचा उत्साह बघून आमच्या पिल्लाला कंठ फुटला नसेल तर नवल - "आज्जी खूप छान वीणते. तिनी ऑलरेडी अर्धा स्वेटर वीणला आहे. ती मला शिकवणार आहे"
मला ते सगळं ऐकून खूप लाज वाटली. महीना झाला मी घारात आहे सध्या पण कधी आईंच्या वीणकामात रस घेतला नाही की स्वेटर अर्धा झालाय का कुणासाठी चाललाय याची साधी विचारपूस केली नाही.
या मुली मात्र आज्जीबरोबर आज खूप खेळल्या, एकटक वीणकाम पहात राहील्या. आईही खुलल्यासारख्या वाटल्या : )
हा आमचा नेहेमीचा अनुभव - जिथे मी आई म्हणून मुलीला कडक वळण लावायला जाते तिथे आज्जी तेच वळण हलक्या हातानी , सफाईनी लावून टाकते.
परवाची गोष्ट मुलीला एक गणित अवघड गेलं. अगदी रडवेली झाली ती. मी समजूत काढायला गेले तर ती अधिकच बिथरली. आईंनी मला हातानीच खुणावलं आणि गप्प बसवलं. मुलीला थोडी स्पेस दिली, रडू दिलं एकटं. थोड्याच वेळात श्रावणातल्या ऊन्-पावसासाराखा तिचा मूड हा हा म्हाणता बदलला. ती पूर्ववत हसू खेळू लागली. मी मनोमन आईंचे आभार मानले.
ज्येष्ठ व्यक्तींचं घरातील असणंच विशाल वृक्षासारखं भारदस्त, शीतलता देणारं, आश्वासक असतं. सर्वांना शक्य असतच असं नाही पण घरात एक टीनेजर असतेवेळी जर काही ज्येष्ठ व्यक्ती असतील तर माझ्या तरी मते जीवन बरच सुकर होतं.

समाजजीवनमानराहणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सहमत.
आमचंही बाळ वय वर्षे दहाकडे सरकायला लागलय तसं कधीकधी टेंशन येतं.
आजकाल क्वचित आरश्यापुढे एखादं मिनिट उभा असतो आणि माझ्या काळजाचा ठोका चुकतो.;)
आजी आजोबा असताना मात्र फार खूष असतो.

अगदी अगदी! आज्जी आजोबांचे व्हायब्रेशन्स (ऑरा) इतके शांत आणि शीतल असतात. तू बघ ना रेवती आई फक्त हे म्हणाल्या "(वीणताना मला) बघ म्हणजे येईल) ........... On the contrary I would have sweatted my b*tt off on such small question from such a small child. मी तिला उलट्-सुलट टाके दाखवून पार कन्फ्यूज केलं असतं. मला याचं कौतुक वाटतं की या मोठ्या लोकांना माहीत असतं लहान मुलांना कितपत माहीती द्यायची कसं शंतपणे लाईफ घ्यायचं :)

या मोठ्या लोकांनी अनुभवातून शिकलेले असते आणि कदाचित आपणही शिकू...पण असे शांत आजी आजोबा असलेले केव्हाही चांगले...सगळ्यांसाठीच.

प्रियाली's picture

3 Aug 2010 - 6:54 am | प्रियाली

मुलांना आजी-आजोबा, भावंड (सख्खी, नात्यातली), इतर नातेवाईक यांची गरज असतेच. तरी, आजी आजोबांबरोबर ती अधिक कम्फर्टेबल असतात.

कोण म्हणतं २१ व्या शतकातल्या बायकांना स्वयंपाक येत नाही? माझी बारा वर्षांची लेक पोळ्यांची कणिक तिंबते आणि चांगल्या गोल पोळ्या लाटते. आजीने शिकवलं म्हणते. ;)

प्रत्येक बाईला दुसरं काही नाही तरी कणिक तिंबता आलीच पाहिजे. इतरत्रही उपयोगी पडते.

शिल्पा ब's picture

3 Aug 2010 - 7:03 am | शिल्पा ब

काय उपयोगी पडते? कणिक का तिंबणं? :-)

रणजित चितळे's picture

3 Aug 2010 - 2:14 pm | रणजित चितळे

घरात मोठं माणुस असले की स्वतःचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. बरं वाटतं. पण हल्ली लोकांना खुपदा स्वतःच्या स्पेसच्या नादात मोठ्ठी नकोशी वाटायला लागतात.

मी-सौरभ's picture

4 Aug 2010 - 12:28 am | मी-सौरभ

माझी आजी जेव्हा आम्च्या घरी असते तेव्हा घरात एक मस्त वातावरण असतं ......

हा आमचा नेहेमीचा अनुभव - जिथे मी आई म्हणून मुलीला कडक वळण लावायला जाते तिथे आज्जी तेच वळण हलक्या हातानी , सफाईनी लावून टाकते.

तुमच्या पहिल्या घटनेत आणि वळण लावण्यातील संबंध कळला नाही.

आई फक्त हे म्हणाल्या "(वीणताना मला) बघ म्हणजे येईल) ........... On the contrary I would have sweatted my b*tt off on such small question from such a small child. मी तिला उलट्-सुलट टाके दाखवून पार कन्फ्यूज केलं असतं. मला याचं कौतुक वाटतं की या मोठ्या लोकांना माहीत असतं लहान मुलांना कितपत माहीती द्यायची कसं शंतपणे लाईफ घ्यायचं

ही तुमची वैयक्तिक समस्या वाटते. शिकवण्याची मक्तेदारी ज्येष्ठ लोकांकडेच आहे असे नाही. मी सहावीत (१० वर्षाचाच असताना) असताना आमच्या शाळेत सगळ्यांना विणकाम शिकवले होते; शिकवणार्‍या ताई २५-३५ वयोगटातील होत्या.

परवाची गोष्ट मुलीला एक गणित अवघड गेलं. अगदी रडवेली झाली ती. मी समजूत काढायला गेले तर ती अधिकच बिथरली. आईंनी मला हातानीच खुणावलं आणि गप्प बसवलं. मुलीला थोडी स्पेस दिली, रडू दिलं एकटं. थोड्याच वेळात श्रावणातल्या ऊन्-पावसासाराखा तिचा मूड हा हा म्हाणता बदलला. ती पूर्ववत हसू खेळू लागली. मी मनोमन आईंचे आभार मानले.

क्षुल्लक कारणावरून रडणे आणि रडक्या मुली....पुन्हा तेच. आवरा !

क्षुल्लक कारणावरून रडणे आणि रडक्या मुली....पुन्हा तेच. आवरा !
त्यांचे लेखन तुम्हाला पटले नाही तरी अश्या प्रकारे आपल्या अपत्याला तिर्‍हाइताने बोललेले कोणत्याही पालकांना आवडणार नाही.....तुमचा तो अधिकारही नाही.
प्रतिसाद देताना कृपया स्वत:ला आवरा.

Pain's picture

4 Aug 2010 - 2:05 am | Pain

मान्य. ते संपादित करा. आणि योग्य भाषेत असहमती कशी दर्शवायची ते सांगा.