२) एका खेळियाने - जेसी जैसा कोई नहीं !

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
19 May 2010 - 6:23 pm

कुठल्याही खेळामध्ये "प्रतिनिधित्त्व करणे" ह्या गोष्टीला खूप खूप महत्त्व असतं. तुम्ही नुसतं "स्वान्त सुखाय" न खेळता स्पर्धात्मक पातळीवर तो खेळ खेळला आहात, तुमच्या स्वतःच्या कौशल्याला, ताकदीला तोडीच्या प्रतिस्पर्ध्याशी आजमावून पाहिलं आहे हेच खूप मोठं यश मानता येईल. अगदी शाळा - कॉलेज - विद्यापीठाकडून, जिल्हा, विभाग किंवा राज्याचं प्रतिनिधित्त्व करायला मिळणं ही खरोखरंच अभिमानास्पद गोष्ट असते. काही मोजक्याच भाग्यवंतांना त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याच सौभाग्य लाभतं. क्रिकेटमध्ये "एशिया वि. आफ्रिका" वगैरे आंतर खंडीय सामने देखील झाले. पण जर कोण्या एका खेळाडूनं कुठल्या स्पर्धेत उभ्या मानवतेचं प्रतिनिधित्त्व केलं असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? जर त्याला असं सांगण्यात आलं की "बाबा रे, ह्या एका स्पर्धेत मानवाचं, मानवीय संस्कृतीचं प्रतिनिधित्त्व करायची जबाबदारी तुझी आहे - you are competing for the mankind. तुझ्यावर जबाबदारी आहे मानवतेच्या शत्रुंना ओरडून सांगण्याची की सगळे मानव एक आहेत... जाती, देश, वंश, वर्ण, लिंग ह्यावरून तुम्ही करत असलेला भेदभाव हे निव्वळ थोतांड आहे. कुठलाही वर्ण, वंश, जात ही दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ - कनिष्ठ असू शकत नाही. तुला अशी कामगिरी करून दाखवायची आहे की सर्वांचा मानवता ह्या एकाच धर्मावरचा विश्वास अजून दृढ झाला पाहिजे!" तर?? काय म्हणाल अश्या माणसाला???? प्रेषित?????

उगाच विशेषणं शोधत नको बसायला. आपण त्याला म्हणू - जेम्स क्लीव्हलँड ओवेन्स !

जेम्स क्लीव्हलँड ओवेन्स - अलाबामातल्या हेन्री आणि एमा ओवेन्स ह्या शेतमजूर दांपत्याचा मुलगा आणि एका गुलामाचा नातू. जन्म १२ सप्टेंबर १९१३. हेन्री आणि एमाच्या ११ मुलांपैकी जेम्स ७ वा. अशक्त, सतत खोकणारं, किरटं पोर. ब्राँकायटिस आणि न्युमोनिया तर पाचवीला पुजलेले. घरी अठराविश्वे दारिद्र्य. दोन वेळेचं खायला मिळायची जिथे भ्रांत तिथे अंगावर कापड आणि डोक्यावर छप्पर कुठून येणार? वयाच्या सातव्या वर्षी जेम्स कपाशीच्या शेतात गोणी उचलायच्या कामावर लागला. दिवसात जवळपास १०० पौंड कपाशीची पाठीवरून ने-आण करावी लागे. आजचं मरण उद्यावर ढकलायला ओवेन्स कुटंबीय ओकविल होऊन उत्तरेला ओहायो राज्यात क्लीव्हलंडला आले तेव्हा जेम्स ९ वर्षांचा होता. क्लीव्हलंडमधल्या शिक्षिकेनी नाव विचारलं... जेम्स त्याच्या सदर्नर अ‍ॅक्सेंटमध्ये बरळला "जे.सी. ओवेन्स (जेम्स क्लीव्हलंड ओवेन्स)". त्या शिक्षिकेला काही ते नीट ऐकू आलं नाही. तिनी लिहून घेतलं जेसी (Jesse) ओवेन्स. आणि पुढे जन्मभर हेच नाव जेम्सला चिकटलं. जेम्स ओवेन्सचा झाला जेसी ओवेन्स !

घाणेरीच्या रोपट्यासारखा कोणीही पाणी न घालता जेसी वाढत होता. नशीब एकच की आता मजुरीबरोबर शाळाही चालू होती. जेसी विशेष हुशार विद्यार्थी नव्हता पण सर्वांत वेगवान नक्कीच होता. फेअरमाउंट ज्युनियर हायस्कूल मध्ये चार्ल्स रायली नावाच्या क्रीडाप्रशिक्षकानी जेसीमधले गुण हेरले आणि त्याला शाळेच्या track and field संघात जागा मिळाली. १९३३ मध्ये ईस्ट टेक्निकल हायस्कूलकडून खेळताना त्याने १०० आणि २२० यार्ड धावण्यात आणि लांब उडीत (तेव्हा त्याला बोर्ड जंप म्हणत) शालेय राष्ट्रीय विक्रम नोंदवले. आणि इथून जेसीची कारकीर्द बहरायला लागली. ओहायोच्या (buckeye state) मधून आलेला जेसी buckeye bullet म्हणून ओळखला जाऊ लागला. शाळेची फी भरायला आणि पोटाची सोय करायला लायब्ररीत काम करणे, गॅसस्टेशनवर काम करणे, कपडे धुवून देणे, कोणाची फुटकळ कामे करणे चालू होतंच. पण खरी धमाल तर पुढे होती. १९३५ मध्ये उत्तर अमेरिकेतल्या "बिग टेन" राज्यांच्या मिशिगनमधल्या स्पर्धांच्या २ आठवडे आधी मित्रांशी मस्ती करताना जेसीची पाठ दुखावली होती. २५ मे १९३५ च्या त्या स्पर्धेच्या दुपारी तर जेसीला वाकवत देखील नव्हतं. पण कसं कोणास ठाऊक, वॉर्म अप करताना त्याला बरं वाटू लागलं. आणि दुपारी ३:१५ ते ४:०० ह्या वेळात जे काही घडलं ते एका शब्दात सांगायचं म्हणजे "इतिहास."

दु. ३:१५ वा - जेसीनी १०० यार्ड (९१ मीटर्स्)ची रेस ९.४ सेकंद वेळ नोंदवून जिंकली - विश्वविक्रमाशी बरोबरी!

दु. ३:२२ वा - त्याच्या एकमेव लांब उडीत त्यानी २६ फूट सव्वाआठ इंच लांब उडी मारली - नवीन विश्वविक्रम जो पुढे २५ वर्ष अबाधित होता!

दु. ३:३४ वा - २२० यार्ड शर्यतीत जेसीची वेळ होती २०.३ सेकंद - नवीन विश्वविक्रम !

दु. ४:०० वा - २२० यार्ड "लो हर्डल्स" शर्यत विजेता - वेळ २२.३ सेकंद - नवीन विश्वविक्रम ! २३ सेकंदांच्या आत ती शर्यत पूर्ण करणारा पहिला खेळाडू

अवघ्या ४५ मिनिटांत जेसीनी ३ नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केले होते तर एका विश्वविक्रमाशी बरोबरी केली होती ! अ‍ॅथलेटिक्सच्याच नव्हे तर इतर कोणत्याही खेळाच्या इतिहासात कोण्या एका खेळियाने असा पराक्रम केलेला नव्हता आणि आजतागायत कोणी असा पराक्रम करू शकलेलं नाही. शब्दशः न भूतो न भविष्यति !

पण ह्याही पेक्षा मोठा आणि महत्त्वाचा पराक्रम अजून जेसीची वाट बघत होता. १९३६ चं बर्लिन ऑलिंपिक्स हे म्हणजे नाझी विरुद्ध इतर असं अघोषित युद्धच होतं. आर्यन वंशाच्या श्रेष्ठत्त्वाच्या, आणि फॅसिस्ट विचारांनी हिटलर पिसाटला होता. नाझी जर्मनीचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जमीन-आस्मान एक करण्याची त्याची तयारी होती. "काळ्या बांड्गुळांना" संघात स्थान दिल्याबद्दल जर्मनीत अमेरिकेची टर उडवली जात होती. एका जर्मन अधिकार्‍यानं ओवेन्स आणि इतर निग्रो अ‍ॅथलिट्स सारख्या non-humans ना खेळायची परवानगी दिल्याबद्दल तक्रार केली होती. जागोजागी काळ्या स्वस्तिकाचं चिन्ह असलेले लालभडक झेंडे फडकत होते. खाकी गणवेषातले Storm Troopers (जर्मन सैनिक) ठायी ठायी नाझी सॅल्युट करताना दिसत होते. नाझी राष्ट्रगीत "Deutschland Uber Alles" चे सूर उरात धडकी भरवत होते. नाझी सुप्रीमसी सिद्ध करायला हिटलर पेटून उठला होता. ऑलिंपिक्स हे "खेळ" न राहता धर्मांध शक्ती आणि मानवता ह्यांच्यातलं द्वंद्व बनले होते. पण जर्मन सरकार जरी नाझीझमचा डंका पिटत असलं तरी ३ ऑगस्ट १९३६ रोजी बर्लिनच्या ऑलिंपिक स्टेडियममध्ये जमलेली १ लाख दहा हजार प्रेक्षक आपला देश, धर्म, वंश, वर्ण.. सगळं विसरून त्यांच्या लाडक्या खेळाडूला पाठिंबा देत होते "येस्सी... येस्सी....येस्सी....येस्सी!"

३ ऑगस्टला जेसीनी १०० मीटर्सची शर्यत १०.३ सेकंदांत जिंकली. दुसरा आला तो त्याचा (कृष्णवर्णीय) देशबांधव राल्फ मेटाकाल्फ. नाझी वर्चस्वाच्या हिटलरच्या दंभावर पहिला आघात झाला !

४ ऑगस्टला लांब उडीच्या स्पर्धेत जेसीचे पहिले २ प्रयत्न "फाऊल" ठरले होते. अजून एक फाऊल आणि जेसी स्पर्धेबाहेर जाणार होता. जेसी स्वतः त्या वेळेबद्दल सांगतो "I fought, I fought harder . . . but one cell at a time, panic crept into my body, taking me over." विमनस्क स्थितीत जेसी बसलेला असताना त्याला खांद्यावर कोणाचातरी हात जाणवला. त्यानी वर पाहिलं. एक निळ्या डोळ्यांचा, सोनेरी केसांचा तरूण त्याच्याकडे सस्मित बघत होता. त्या तरुणाने हात पुढे केला आणि म्हणाला "मी जर्मनीचा लुझ लाँग. टेन्शन घेऊ नकोस. फायनल्स साठी ७.१५ मीटर्स गाठणं तुला मुश्किल नाही. तू बोर्डच्या थोडं मागून उडी मार... निवांत क्वालिफाय होशील. काळजी नको करूस." कल्पना करा... लाँग जेसीचा सर्वात कडवा प्रतिस्पर्धी होता.... नाझी जर्मनीचा लांब उडीतल्या सुवर्णपदकाचा सर्वांत प्रमुख दावेदार होता... त्यानं "काळ्या" ओवेन्सला हरवून सुवर्णपदक जिंकावं अशी खुद्द फ्युररची इच्छा होती. पण लाँग शेवटी हाडाचा खेळाडू होता ! आपल्या सर्वांत धोकादायक प्रतिस्पर्ध्याला धीराचे चार शब्द ऐकवायला, त्याला मदत करायला, त्याला सल्ला द्यायला .. आणि ते ही साक्षात फ्युरर समोर बसलेला असताना... हजारो लोकांच्या साक्षीनं.. पुढे यायला तो कचरला नाही. हिटलरचा वांशिक वर्चस्वाचे बुरूज एका खेळाडूनं उध्वस्त केले. धर्म, जात, पंथ, वंश, वर्ण, देश.. सगळ्या सगळ्या सीमा मिटून गेल्या. लाँग आणि ओवेन्स आणि इतर हजारो - लाखोंचा धर्म citius altius fortius, वांशिक श्रेष्ठत्त्वाच्या फुटकळ कल्पनांच्या चिधड्या उडवत होता.

लाँगच्या सल्ल्याप्रमाणे ओवेन्सनी पुढची उडी चांगली ४ इंच मागून घेतली आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम फेरीतल्या पाचव्या प्रयत्नानंतर जेसी आणि लाँग संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. पण नंतरच्या दोन प्रयत्नांत आपली कामगिरी उंचावत जेसीनी सुवर्णपदक पटकावलं तेव्हा त्याचं अभिनंदन करायला प्रथम धावला तो रौप्यपदकविजेता लाँग ! लाँगबद्दल जेसी म्हणतो "You can melt down all the medals and cups I have and they wouldn't be a plating on the 24-karat friendship I felt for Luz Long at that moment. Hitler must have gone crazy watching us embrace". लाँग दुसर्‍या महायुद्धात मरण पावला पण ओवेन्स त्याच्या कुटुंबीयांच्या कायम संपर्कात राहिला.

५ ऑगस्टला - दुसर्‍या दिवशी जेसीनी २०० मीटर्स शर्यत २०.७ सेकंदांचा नवीन ऑलिंपिक विक्रम प्रस्थापित करून जिंकली. नंतर मार्टी ग्लिकमन आणि सॅम स्टोलर ह्या ज्यू खेळाडूंना अचानक "काढून टाकल्यामुळे" ओवेन आणि मेटकाल्फला ४ बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत भाग घेण्याची संधी मिळाली आणि जेसीनी आपलं चौथं सुवर्णपदक जिंकलं. जेसी परत आला आणि त्याच्या स्वागत एका बोर्डनी झालं ज्यावर लिहीलं होत Owens 4 - Hitler 0.

पुढे दुसर्‍या महायुद्धामुळे ३६ ची स्पर्धा जेसीची पहिली आणि शेवटची ऑलिंपिक स्पर्धा ठरली. इतकंच नाही तर त्याची कारकीर्द महायुद्धामुळे संपुष्टात आली. दुर्विलास पहा, जेसी परत आला तेव्हा अमेरिकेत त्याचं कौतुक झालं, लोकं त्याच्याशी हात मिळवायचे, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायचे, त्याला मिठी मारायचे... पण कोणी त्याला नोकरी देऊ केली नाही. "When I came back to my native country, after all the stories about Hitler, I couldn't ride in the front of the bus, I had to go to the back door. I couldn't live where I wanted. I wasn't invited to shake hands with Hitler, but I wasn't invited to the White House to shake hands with the President, either." ४ ऑलिंपिक सुवर्णपदकांचा मानकरी आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी घोड्यांशी, कुत्र्यांशी शर्यती लावायचा. नंतर जेसीनी दिवाळखोरीचा अर्ज केला. तो मंजूर झाला आणि जेसी अमेरिकन सरकार साठी सदिच्छा दूत (goodwill ambassador) झाला. आपल्या प्रेरक भाषणांतून कष्ट, प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटीचं महत्त्व सांगत राहिला ते १९८० साली त्याचं निधन होईपर्यन्त.

लहानपणी वीणा गवाणकरांचं "एक होता कार्व्हर" शेकडो वेळा अधाशासारखं वाचलं होतं. जेसी आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर मधलं साम्य म्हणजे दोघेही कधीच कोणाविरुद्ध "लढले" नाहीत. त्यांच्या वागण्यात, इतका अन्याय सहन करूनही, यत्किंचितही कटुता नव्हती. कोणाही बद्दल आकस, चीड नव्हती. म्हणूनच जेसी सच्चा "खेळाडू" होता. जेसी गेला तेव्हा राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर त्याच्याबद्दल म्हणाले "Perhaps no athlete better symbolized the human struggle against tyranny, poverty and racial bigotry". पण जेसी स्वतः म्हणायचा "मी बर्लिनला कोणाला हरवायला गेलो नव्हतो. माझी कोणाशीही स्पर्धा नव्हती. ऑलिंपिक्समध्ये तुम्ही कोणाला पराभूत करायला जात नाही, तुम्ही जाता तुमची सर्वोत्तम कामगिरी करायला. मला जर कोणाचा पराभव करायचा असेलच तर तो स्वतःचा."

असा होता जेसी. सगळी बंधनं लंघून केवळ एक अ‍ॅथलीट म्हणून, एक खेळाडू म्हणून काळाच्या दगडावर आपलं नाव कायमचं कोरून जाणारा. म्हणूनच आजही 'सर्वोत्कृष्ट ऑलिंपियन कोण?' असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा सर्वांचं एकच उत्तर असतं "जेम्स क्लीव्हलंड ओवेन्स"

क्रीडामौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद्_पुणे's picture

19 May 2010 - 6:34 pm | प्रमोद्_पुणे

केवळ अप्रतिम लिहिले आहे. एका महान खेळाडूची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 May 2010 - 8:47 pm | घाशीराम कोतवाल १.२

प्रमोद नुसता महान खेळाडु नव्हे तर काळाच्या पडद्याआड गेलेल्या महान व्यक्ती बद्दल लिहल आहे सॉलिड

ऑलिंपिक्समध्ये तुम्ही कोणाला पराभूत करायला जात नाही, तुम्ही जाता तुमची सर्वोत्तम कामगिरी करायला.

हॅट्स ऑफ जेसी

बाळकराम's picture

22 May 2010 - 3:04 am | बाळकराम

असेच म्हणतो!
मोर्गन साहेब- जबरदस्त लेख लिहिला आहे तुम्ही! :)

जेसी ओवेन्सची ही ओळख आवडली!

असेच लिहित रहा आणि ते पुस्तकाचं प्लीज मनावर घ्या बुवा!

बाळकराम

Dhananjay Borgaonkar's picture

19 May 2010 - 6:35 pm | Dhananjay Borgaonkar

लै भारी...तुमच्या लेखणीत कमालीची जादू आहे.
भन्नाट लेख.
उद्याच्या लेखाच्या प्रतिक्षेत..

मेघवेडा's picture

19 May 2010 - 6:38 pm | मेघवेडा

ऑलिंपिक्समध्ये तुम्ही कोणाला पराभूत करायला जात नाही, तुम्ही जाता तुमची सर्वोत्तम कामगिरी करायला.
=D> =D> =D>

अगदी खरंय!!

Owens 4 - Hitler 0

_/\_ त्रिवार वंदन!!

लेख नेहमीप्रमाणेच उत्तम हेवेसांनल! मस्त रे जेपी!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

शिल्पा ब's picture

20 May 2010 - 12:04 am | शिल्पा ब

+१....ओवेन्स, केवळ अप्रतिम =D>
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

सहज's picture

19 May 2010 - 6:42 pm | सहज

मॉर्गनसर कमाल!

भारावून केलेले प्रभावी लेखन!

लहानपणी ओवेन्स आणि लुझ लाँग यांची गोष्ट "किशोर" मासिकात वाचली होती, पण तेव्हा लाँगचे धैर्य केव्ह्ढे मोठे होते त्याची जाण आली नव्हती. आत्ता मात्र वाचताना खरोखरच भारावून गेलो.

citius altius fortius ह्या ऑलिम्पिकच्या ध्येयवाक्याची ओवेन्स आणि लाँग ह्यांनी शान राखली.

धन्य तो ओवेन्स आणि धन्य तो लुझ लाँग ...

अस्मी's picture

20 May 2010 - 2:40 pm | अस्मी

सहमत

लाँग जेसीचा सर्वात कडवा प्रतिस्पर्धी होता.... नाझी जर्मनीचा लांब उडीतल्या सुवर्णपदकाचा सर्वांत प्रमुख दावेदार होता... त्यानं "काळ्या" ओवेन्सला हरवून सुवर्णपदक जिंकावं अशी खुद्द फ्युररची इच्छा होती. पण लाँग शेवटी हाडाचा खेळाडू होता ! आपल्या सर्वांत धोकादायक प्रतिस्पर्ध्याला धीराचे चार शब्द ऐकवायला, त्याला मदत करायला, त्याला सल्ला द्यायला .. आणि ते ही साक्षात फ्युरर समोर बसलेला असताना... हजारो लोकांच्या साक्षीनं.. पुढे यायला तो कचरला नाही. हिटलरचा वांशिक वर्चस्वाचे बुरूज एका खेळाडूनं उध्वस्त केले.

अक्षरशः डोळ्यात पाणी आलं __/\__ सह्ही लेख

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

चक्रमकैलास's picture

19 May 2010 - 6:44 pm | चक्रमकैलास

अतिशय उत्तम ओळख झाली एका महान खेळाडूची...

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

मी_ओंकार's picture

19 May 2010 - 6:45 pm | मी_ओंकार

भन्नाट लेख. मस्त.

- ओंकार

सुमीत भातखंडे's picture

19 May 2010 - 6:53 pm | सुमीत भातखंडे

मस्त
तुमच्या खास शैलीत लिहिलेला लेख वाचताना मजा आली.

राघव's picture

19 May 2010 - 7:15 pm | राघव

शब्दच नाहीत.
एका अत्यंत महान अन् सच्च्या खेळाडूची तेवढीच भारावून केलेली ओळख.
हॅट्स ऑफ.. त्या दोघांनाही अन् त्यांची एवढी ओळख करून देणार्‍या तुम्हालाही!

राघव

टिउ's picture

20 May 2010 - 8:33 pm | टिउ

असेच म्हणतो.

प्रभो's picture

19 May 2010 - 7:24 pm | प्रभो

मस्त रे, जे पी!!

संताजी धनाजी's picture

19 May 2010 - 7:26 pm | संताजी धनाजी

मस्त!
- संताजी धनाजी

गणपा's picture

19 May 2010 - 7:50 pm | गणपा

वाह जेपी काळाच्या पडद्या आड गेलेल्या एका खेळीयाची भारावलेली ओळखकरुन दिल्या बद्दल आभार.
खरच पुस्तकाच मनावर घ्या.

अनिल हटेला's picture

19 May 2010 - 7:59 pm | अनिल हटेला

सहमत.....

:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

मी-सौरभ's picture

20 May 2010 - 12:14 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

भडकमकर मास्तर's picture

20 May 2010 - 12:25 am | भडकमकर मास्तर

कालचा तुमचा पेसचा झेंडावाला फोटो आणि आजचं हे वाक्य ... Hitler must have gone crazy watching us embrace". लाँग दुसर्‍या महायुद्धात मरण पावला पण ओवेन्स त्याच्या कुटुंबीयांच्या कायम संपर्कात राहिला.....

उत्तम लेखन...

चिर्कुट's picture

20 May 2010 - 10:10 am | चिर्कुट

हॅट्स ऑफ.. जेसी =D>

>>खरच पुस्तकाच मनावर घ्या.
+१००

- (ऑलिम्पिक मध्ये 'गोट्यां'चा समावेश झाला तर भारताला १ सुवर्ण मिळवून द्यायची जबाबदारी घेणारा)चिर्कुट

मनिष's picture

20 May 2010 - 10:13 am | मनिष

एकापेक्षा एक वरचढ लेख होतायत! मला पेस पेक्षाही हा जास्त आवडला! :)

llपुण्याचे पेशवेll's picture

20 May 2010 - 11:14 am | llपुण्याचे पेशवेll

भन्नाट ओळख.. एका उत्तम खेळाडूची ओळख करून दिल्याबद्दल आपला आभारी आहे जेपी.
(एकदा रॉकी मार्शियानो वर पण लेख येऊद्या)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 May 2010 - 11:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जेसी ओवेन्सला सलाम आणि तुमच्या लेखणीलाही!

अदिती

टुकुल's picture

20 May 2010 - 12:19 pm | टुकुल

जबरदस्त लिखाण, एकदम खुळ करुन टाकता तुम्ही.
एका महान खेळाडु आणी व्यक्तीची ओळख करुन दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

--टुकुल

अप्पा जोगळेकर's picture

20 May 2010 - 2:26 pm | अप्पा जोगळेकर

शहारुन टाकणारं लिखाण आहे. सबंध लेखमालाच भन्नाट असणार याची खात्री पटलीय.

"When I came back to my native country, after all the stories about Hitler, I couldn't ride in the front of the bus, I had to go to the back door. I couldn't live where I wanted. I wasn't invited to shake hands with Hitler, but I wasn't invited to the White House to shake hands with the President, either."

यापेक्षा वाईट काय असू शकेल ?

जे.पी.मॉर्गन's picture

20 May 2010 - 3:20 pm | जे.पी.मॉर्गन

तरीही जेसीनी कधीही कोणाबद्दलही कुठेही वाईट बोलल्याचं, कोणाचा द्वेष केल्याचं, कुठेतरी गरळ ओकल्याचं, अगदी कृष्णवर्णीयांसाठी "लढल्याचं" कुठेच वाचायला / ऐकायला मिळालं नाही. इन फॅक्ट टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस ह्या अमेरिकन कृष्णवर्णीय अ‍ॅथलीट्सनी अमेरिकेतल्या वर्णद्वेष आणि कृष्णवर्णीयांच्या हालाखीकडे लक्ष वेधण्यासाठी १९६८ च्या मेक्सिको ऑलिंपिक्स मध्ये पदकं घेताना काळे मोजे (बूट न घालता) आणि काळे हातमोजे घालून निषेध केला होता.
http://en.wikipedia.org/wiki/1968_Olympics_Black_Power_salute

पण जेसी ओवेन्सनी ह्याला विरोध केला. त्यावरची त्याची टिपण्णी मोठी मार्मिक आहे. तो म्हणाला - "The black fist is a meaningless symbol. When you open it, you have nothing but fingers – weak, empty fingers. The only time the black fist has significance is when there's money inside. There's where the power lies." खूपसं जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरसारखं. "लढण्यापेक्षा" कष्ट करून आपल्या समाजाची उन्नती साधण्यावर त्यांचा भर होता. मला तर हा प्रकार "संत" कॅटेगरीतला वाटतो.

म्हणूनच खरंतर ही मालिका लिहायला घेताना पहिला लेख जेसी वरच टाकायचा होता. पण सुरुवातीला सर्वांना माहिती असलेला लिएंडर इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी घेतला. एरवी जेसीचं कर्तृत्व कोण्या समाजसुधारकापेक्षा कमी नाही असं मला वाटतं.

जे पी

जे.पी.मॉर्गन's picture

20 May 2010 - 3:20 pm | जे.पी.मॉर्गन

तरीही जेसीनी कधीही कोणाबद्दलही कुठेही वाईट बोलल्याचं, कोणाचा द्वेष केल्याचं, कुठेतरी गरळ ओकल्याचं, अगदी कृष्णवर्णीयांसाठी "लढल्याचं" कुठेच वाचायला / ऐकायला मिळालं नाही. इन फॅक्ट टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस ह्या अमेरिकन कृष्णवर्णीय अ‍ॅथलीट्सनी अमेरिकेतल्या वर्णद्वेष आणि कृष्णवर्णीयांच्या हालाखीकडे लक्ष वेधण्यासाठी १९६८ च्या मेक्सिको ऑलिंपिक्स मध्ये पदकं घेताना काळे मोजे (बूट न घालता) आणि काळे हातमोजे घालून निषेध केला होता.
http://en.wikipedia.org/wiki/1968_Olympics_Black_Power_salute

पण जेसी ओवेन्सनी ह्याला विरोध केला. त्यावरची त्याची टिपण्णी मोठी मार्मिक आहे. तो म्हणाला - "The black fist is a meaningless symbol. When you open it, you have nothing but fingers – weak, empty fingers. The only time the black fist has significance is when there's money inside. There's where the power lies." खूपसं जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरसारखं. "लढण्यापेक्षा" कष्ट करून आपल्या समाजाची उन्नती साधण्यावर त्यांचा भर होता. मला तर हा प्रकार "संत" कॅटेगरीतला वाटतो.

म्हणूनच खरंतर ही मालिका लिहायला घेताना पहिला लेख जेसी वरच टाकायचा होता. पण सुरुवातीला सर्वांना माहिती असलेला लिएंडर इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी घेतला. एरवी जेसीचं कर्तृत्व कोण्या समाजसुधारकापेक्षा कमी नाही असं मला वाटतं.

जे पी

मदनबाण's picture

20 May 2010 - 9:11 pm | मदनबाण

अप्रतिम लेख...
मिपाकरांसाठी ही लेखमाला म्हणजे एक मेजवानीच आहे... :)

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

स्वाती२'s picture

20 May 2010 - 9:37 pm | स्वाती२

मस्त!

बेसनलाडू's picture

20 May 2010 - 11:16 pm | बेसनलाडू

इतक्या महान खेळाडूबद्दल आधी काहीच माहिती नव्हती. तुमच्या लेखनातून जी ओळख झाली, तिने फार भारावून गेलो आहे. इतक्या सुंदर लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
(भारावलेला)बेसनलाडू