मी नाही अभ्यास केला

देवदत्त's picture
देवदत्त in जे न देखे रवी...
25 Mar 2008 - 9:07 pm

लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी.
(नवीन काही असल्यासही चालेल. :) )

दुपारचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले चार
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले पाच
दादाने फोडली काच
काच वेचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले आठ
ताईने फोडला माठ
पाणी पुसण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले नऊ
बाबांनी आणला खाऊ
खाऊ खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले दहा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले अकरा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

लेखक/कवी: अनामिक

(हेच लिखाण माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)

संस्कृतीबालगीतमुक्तकमौजमजाचौकशी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 9:30 pm | विसोबा खेचर

दुपारचे वाजले चार
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले चार
आईन दिला मार
मार खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले दहा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले दहा
बाबांचं थोबाड पहा
थोबाड पाहण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले अकरा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले अकरा
बाबांनी कापला बकरा
मटण खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

:)

तात्या.

देवदत्त's picture

25 Mar 2008 - 9:34 pm | देवदत्त

धन्यवाद तात्या,
ह्यातील 'बकरा' आणि 'थोबाड पहा' हे शब्द असल्यासारखे वाटत होते. कडवी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.

ठणठणपाळ's picture

25 Mar 2008 - 10:24 pm | ठणठणपाळ

>रात्रीचे वाजले अकरा
बाबांनी कापला बकरा
मटण खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या?

मी असं ऐकलं आहे,

रात्रीचे वाजले दहा
झोप आली पहा
डुलक्या घेण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

ठणठणपाळ

विसोबा खेचर's picture

26 Mar 2008 - 8:46 am | विसोबा खेचर

रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या?

हो खाल्ला आहे. काय म्हणणं आहे तुमचं?!:)

बाय द वे,

रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बानं तरी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या?

असं ठसक्यात तर तुम्हाला विचारायचं नव्हतं ना?:)

ठणठणपाळराव, 'बानं' ऐवजी 'बाबांनी' हा शब्द वापरल्यामुळे तुमच्या प्रश्नातली सगळी मजाच निघून गेली! :)

असो...

धन्यवाद ठणठणपाळराव, या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला!

असो..

आपला,
('बा' च्या आठवणीने अचानक हळवा झालेला) तात्या.

ठणठणपाळ's picture

26 Mar 2008 - 9:51 pm | ठणठणपाळ

>खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला!

वाचून वाईट वाटलं. यालाच जीवन ऐसे नाव..आणखी काय!

ठणठणपाळ

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2008 - 12:06 pm | प्रभाकर पेठकर

या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला!

तात्या, डोळे भरून आले. फार वाईट प्रसंग. असो. ईश्वरेच्छा, दूसरे काय म्हणणार आपण.

प्रमोद देव's picture

26 Mar 2008 - 8:55 am | प्रमोद देव

दुपारचे वाजले चार
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले चार
आईने दिला मार
रड रड रडण्यात वेळ गेला
मी नाही अभ्यास केला

yogeshpatil's picture

20 Sep 2008 - 2:23 am | yogeshpatil

रात्रीचे वाजले बारा
आकाशात दिसला तारा
तारा पाहण्यात एक तास गेला
पण मी नाही अभ्यास केला

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2008 - 2:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे माझ्यासाठी असणार पहा कसं ते: ;-)

रात्रीचे वाजले बारा
आकाशात दिसला तारा
तारा पाहण्यात एक तास गेला
बघा मी अभ्यास केला!

("तारका") अदिती

देवदत्त's picture

20 Sep 2008 - 6:22 pm | देवदत्त

मस्त एकदम :D

विनायक प्रभू's picture

20 Sep 2008 - 8:33 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
मला कविता येत नाही. नाही तर ह्या कवितेत आधुनिकपणा आणला असता.
बा लोक बाप असतात. ते काय पण करु शकतात.
वि.प्र.

देवदत्त's picture

20 Sep 2008 - 6:25 pm | देवदत्त

छान कडवी बनत आहेत.
आणखी नवीन/आधुनिक प्रकार येऊ द्यात.