मी नाही अभ्यास केला

देवदत्त जे न देखे रवी...
लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी. (नवीन काही असल्यासही चालेल. :) ) दुपारचा वाजला एक आईने केला केक केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले दोन बाबांचा आला फोन फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले तीन ताईची हरवली पिन पिन शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला संध्याकाळचे वाजले पाच दादाने फोडली काच काच वेचण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला संध्याकाळचे वाजले सहा आईने केला चहा चहा पिण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला संध्याकाळचे वाजले सात आईने केला भात भात खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले आठ ताईने फोडला माठ पाणी पुसण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले नऊ बाबांनी आणला खाऊ खाऊ खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले दहा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले अकरा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला लेखक/कवी: अनामिक (हेच लिखाण माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)
वर्गीकरण

12 टिप्पण्या 6,374 दृश्ये

Comments

विसोबा खेचर नवीन

दुपारचे वाजले चार _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार आईन दिला मार मार खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले दहा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले दहा बाबांचं थोबाड पहा थोबाड पाहण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले अकरा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले अकरा बाबांनी कापला बकरा मटण खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला :) तात्या.

देवदत्त नवीन

धन्यवाद तात्या, ह्यातील 'बकरा' आणि 'थोबाड पहा' हे शब्द असल्यासारखे वाटत होते. कडवी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.

ठणठणपाळ नवीन

>रात्रीचे वाजले अकरा बाबांनी कापला बकरा मटण खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? मी असं ऐकलं आहे, रात्रीचे वाजले दहा झोप आली पहा डुलक्या घेण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला ठणठणपाळ

विसोबा खेचर नवीन

In reply to by ठणठणपाळ

रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? हो खाल्ला आहे. काय म्हणणं आहे तुमचं?!:) बाय द वे, रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बानं तरी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? असं ठसक्यात तर तुम्हाला विचारायचं नव्हतं ना?:) ठणठणपाळराव, 'बानं' ऐवजी 'बाबांनी' हा शब्द वापरल्यामुळे तुमच्या प्रश्नातली सगळी मजाच निघून गेली! :) असो... धन्यवाद ठणठणपाळराव, या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! असो.. आपला, ('बा' च्या आठवणीने अचानक हळवा झालेला) तात्या.

ठणठणपाळ नवीन

In reply to by विसोबा खेचर

>खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! वाचून वाईट वाटलं. यालाच जीवन ऐसे नाव..आणखी काय! ठणठणपाळ

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by विसोबा खेचर

या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! तात्या, डोळे भरून आले. फार वाईट प्रसंग. असो. ईश्वरेच्छा, दूसरे काय म्हणणार आपण.

प्रमोद देव नवीन

दुपारचे वाजले चार _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार आईने दिला मार रड रड रडण्यात वेळ गेला मी नाही अभ्यास केला

yogeshpatil नवीन

रात्रीचे वाजले बारा आकाशात दिसला तारा तारा पाहण्यात एक तास गेला पण मी नाही अभ्यास केला

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by yogeshpatil

हे माझ्यासाठी असणार पहा कसं ते: ;-) रात्रीचे वाजले बारा आकाशात दिसला तारा तारा पाहण्यात एक तास गेला बघा मी अभ्यास केला! ("तारका") अदिती

विनायक प्रभू नवीन

http://vipravani.wordpress.com/ मला कविता येत नाही. नाही तर ह्या कवितेत आधुनिकपणा आणला असता. बा लोक बाप असतात. ते काय पण करु शकतात. वि.प्र.

देवदत्त नवीन

छान कडवी बनत आहेत. आणखी नवीन/आधुनिक प्रकार येऊ द्यात.