शिवनेरिची वारी

झकासराव's picture
झकासराव in कलादालन
24 Nov 2009 - 9:22 pm

मध्यंतरी शिवनेरीला जाउन आलो.
आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिथे झाला त्या ठिकाणी जायचं ह्या कल्पनेनच सॉल्लिड्ड मस्त वाटत होतं.
काय करणार. ज्यावेळी पुण्यात येवुन पहिल्यांदाच लाल महाल पाहिला होता त्यावेळी तिथली माती कपाळाला लावणारी आम्ही येडी. त्यामुळे असं गडावर जायच म्हणल की स्फुरण चढतचं. :)
मग काय माहिती गोळा करुन चार टाळकी जमवुन निघालो.
फोटो टाकतोच पण आधी थोडासा इतिहास टाकतो गडाचा.
हा गड छत्रपतींच्या काळात स्वराज्यात नव्हता. वाचुन विश्वास नाही ना बसला. शाहु महाराजांच्या (सातारा गादी स्थापन केलले) काळात हा गड जिंकला मराठ्यानी.

तर आपण बघुया इतिहास गडाचा. **

हा किल्ला पुणे जिल्हातील जुन्नर गावाच्या जवळ आहे. हे गाव शकराजा नहपानाची राजधानी होती. पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव करुन जुन्नर व आजुबाजुच्या परिसरावर वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. ह्या मार्गावरुन चालणार्‍या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी ह्या मार्गावरिल गडांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांच्या काळातच इथे बरीच लेणी खोदण्यात आली.
सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट ह्या राजवटीखाली होता. सुमारे ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवानी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि ह्याच काळात शिवनेरीचे रुप गडाचे झाले. नंतर हा किल्ला बहमनी राजवटीखाली आला.
नंतर निजामशाहिची स्थापना झाली आणि त्यानी राजधानी अहमदनगरला हलवली.
१५९५ मध्ये हा किल्ला आणि जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला.
तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे जन्म झाला हे माहितीच आहे.
१६३२ साली राजानी हा गड सोडला. (अर्थात राजे त्यावेळी बालक होते)
१६३७ साली हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला होता.
पुढे १६७३ साली शिवरायानी गडाचा तत्कालीन किल्लेदाराला फीतवुन किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही.
पुढे १७१६ मध्ये हा किल्ला शाहुमहाराजानी मराठेशाहीत आणला. नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत झाला.

आता बघु फोटो.

पुण्यावरुन जाणार्‍याना नाशिक हायवे वरच नारायणगावातुन डावीकडे फाटा आहे जो जुन्नरला घेवुन जातो.
मुंबईवरुन येणार्‍याना माळशेज घाटाने याव लागेल.
आता गडावर जाण बरच सोप आहे. बर्‍याच वर पर्यंत गाडी रस्ता आहे. तिथुन वर पायर्‍या आहेत. अजिबातच दमछाक होत नाही. बरीच कुटुंब आली होती तिथे.

हा फोटो गाडी पार्किंच्याजवळुन घेतलाय. कातळ दिसतोय.

हा मुख्य दरवाजा. बरिचशी डागडुजी केली आहे पुरातत्व खात्याने.

हा गणेश दरवाजा. त्यावर दोन बाजुला दोन कसलीशी चिन्ह दिसत आहेत.

ही अशी चिन्हं विजयाच, सामर्थ्याच प्रतिक म्हणून वापरली जात असावीत का? कारण त्या वाघसदृश प्राण्याने मागच्या दोन पायात दोन हत्ती चिरडले आहेत. तर पुढच्या पायानेदेखील कशावरतरी हल्ला चढवला आहे.

हा गडावरुन दिसणारा सुंदर देखावा.

हा आहे हत्ती दरवाजा.

हत्ती दरवाज्यावर असे खिळे आहेत.

हा फोटो उगाचच एक प्रयत्न. मला लयी भारी फोटो काढता येतात ह्या गैरसमजातुन. हॅ हॅ हॅ....

वाटेत अशी लहान लहान पाण्याची टाकं दिसतात. पाणी किती स्वच्छ आहे ना. पण त्याच पाण्यात कुणी प्लॅस्टिकची पिशवी टाकुन ठेवली होती. :(
हे टाकं हत्ती दरवाज्याच्या जवळच आहे.

हा अंबारखाना. ह्यात जुन्या काळी धान्य साठवल जायच.

गडाच्या सुशोभीकरणाच्या अंतर्गत गडावर वेगवेगळी झाडं लावली आहेत. ठिकठिकाणी लॉन्स बनवले आहेत. हे रक्तपर्णी नावाच्या झाड. अंबारखान्याच्या जवळच आहे.

परत एकदा उगाचच हॅ हॅ हॅ.. क्लोज अपचा प्रयत्न...

उंचीची स्पर्धा करणारी निवडूंग.

हा उंच निवडुगांचा फोटो.

हे छत्रपतींचे जन्मस्थान आहे अशी पाटी आहे तिथे. ह्या इमारतीतच एक पाळणा आहे. तो शिवरायांचा आहे अस तिथे लिहिलय. पण त्याचा फोटो नाहि काढता आला.

इथे एक कौलारु इमारत आहे. त्यात हा पुतळा आहे.

एक जुनी इदगाहची भिंत आहे. त्याच्या बाजुला हा एक छोटा चौथरा आहे.

त्या चौथर्‍यावर अशी भाषा / लिपी दिसते. ही फारसी की अरेबिक?

त्याच चौथर्‍याच्या आत जाउन पाहिल तर असले किडे दिसले. प्रथमच पाहिले असले किडे.

हा फोटो गडाच्या सर्वात उंच ठिकाणावरुन काढलाय.

खाली उतरताना तिसर्‍या की पाचव्या दरवाज्यापासुन जवळ असलेल आणि आम्ही पहायच राहिलेल शिवाई देवीच मंदीर पाहिल. त्याच्या मागे काहि लेणी आहेत कोरलेली.
त्यात एकात स्तुप होत. तिथुन उतरुन थोडीशी पोटपुजा करुन आम्ही लेण्याद्री आणि ओझरचे गणपती करुन घरी परतलो.

हे लेण्याद्री. (जुन्नर पासुन १० किमीवर असेल. तिथुन पुढे ओझर साधारण १४-१५ किमी.)

बाकीचे फोटो खालील लिन्कवर आहेत.

http://picasaweb.google.com/zakasrao/Shivneri#

** गडाचा इतिहास लिहिण्यासाठी मला मेलवर आलेल्या माहितीचा संदर्भ घेतला आहे. त्या एका पीडीएफ मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांचा इतिहास, गडावर बघण्यासारखी ठिकाणं, जाव कसं, गडावर काय काय सोय होउ शकेल इत्यादी माहिती आहे. ही माहिती एकत्र करणार्‍या सगळ्या अज्ञात मंडळीना माझा साष्टांग दंडवत. ह्या माहितीचा खुप उपयोग होतो.

* इथे मराठा हे व्यापक अर्थाने आहे. त्यावर काथ्याकुट नको.

कलासंस्कृतीप्रवासइतिहाससमाजजीवनमानभूगोलछायाचित्रण

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

24 Nov 2009 - 9:36 pm | धमाल मुलगा

झक्या, लेका मस्त फोटो टाकलेस की :)

शिवनेरी गड मस्तच. आज तुझ्या (तिसर्‍या) डोळ्यानं पाहिला इथे मिपावर :)
आभार!

बाकी,
>>कारण त्या वाघसदृश प्राण्याने मागच्या दोन पायात दोन हत्ती चिरडले आहेत. तर पुढच्या पायानेदेखील कशावरतरी हल्ला चढवला आहे.
ते काहीतरी मला २ डोकी असलेल्या गरुडासारखं दिसलं... (च्छ्या: हल्ली स्कॉटीश राईट फारच डोक्यात घुमतंय.)
इथले इतिहासाचे अभ्यासक ह्यावर प्रकाश टाकतील तर फार उत्तम. :)

विशाल कुलकर्णी's picture

25 Nov 2009 - 12:19 pm | विशाल कुलकर्णी

सहमत ! मस्तच रे भाऊ ! ती पीडीएफ फाईलही पाठव ना मला.

छत्रपती शिवाजी महाराजकी जय...!

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Nov 2009 - 9:51 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री झकासराव, सुरेख चित्रे. जुन्या इदगाहाच्या भिंतीवर उथळ ग्राफिती दिसत आहे पण हत्ती दरवाजा, गणेश दरवाजा किंवा छत्रपतींच्या जन्मस्थानाची इमारत यांवर असे आढळत नाही (असलेली प्रयत्नपूर्वक काढण्यात आलेली दिसते.) इदगाहदेखिल ऐतिहासिक वास्तू आहे, त्यावर असा प्रयत्न झालेला दिसत नाही, हे लक्षनीय आहे.
(चित्रांची लांबी थोडी कमी करता येईल का?)

प्रभो's picture

24 Nov 2009 - 9:43 pm | प्रभो

सुंदर माहीती आणी फोटोही....मजा आली...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मदनबाण's picture

24 Nov 2009 - 9:50 pm | मदनबाण

फोटो क्लासच आलेत...
मला फक्त एकाच गोष्टीचा खुन्नस येतो ते म्हणजे प्रेम वीरांच्या स्वाक्षर्‍या... वाट लावतात असल्या अमुल्य वास्तुची !!!

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

गणपा's picture

24 Nov 2009 - 9:57 pm | गणपा

मला फक्त एकाच गोष्टीचा खुन्नस येतो ते म्हणजे प्रेम वीरांच्या स्वाक्षर्‍या... वाट लावतात असल्या अमुल्य वास्तुची !!!

एकदम मनातल बोललास रे बाणा.
साले हे असले अडाण*ट प्रेमवीर पोरीच्या बापा भावा समोर हिंमत नाही उभरहायची नी चाललेत आपली नाव अजरामर करायला..
-गणपा

गणपा's picture

24 Nov 2009 - 9:51 pm | गणपा

झकासराव अजुन एक सुंदर भटकंती.
प्रभावी लेखन आणि जोडीला सुरेख फोटो..
मस्तच..
इथे सर्वांबरोबर शेअर केल्या बद्दल आभारी आहे.
-गणपा.

टारझन's picture

24 Nov 2009 - 9:53 pm | टारझन

अप्रतिम फोटोज बद्दल श्री झकासरावांचे आभार !

- टारझन

jaypal's picture

24 Nov 2009 - 10:12 pm | jaypal

झकासरव आप्ली झकास भटकंती आणि झकास फोटो आवडले.
तब्येत एकदम झकास झाली.

****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विसोबा खेचर's picture

24 Nov 2009 - 10:50 pm | विसोबा खेचर

नतमस्तक...!

संदीप चित्रे's picture

24 Nov 2009 - 11:22 pm | संदीप चित्रे

आठवणी जाग्या झाल्या.
सचित्र सफरीबद्दल धन्स रे मित्रा.

स्वाती२'s picture

24 Nov 2009 - 11:34 pm | स्वाती२

सुरेख फोटो आणि माहिती. शिवनेरी स्वराज्यात नव्हता हे आज तुमचा लेख वाचून कळले. धन्यवाद.

लवंगी's picture

25 Nov 2009 - 12:28 am | लवंगी

बालशिवराय आणी जिजाऊचा फोटो सुंदर..

फोटो आणी माहिती बद्दल धन्यवाद

sujay's picture

25 Nov 2009 - 6:05 am | sujay

झकास सचित्र वर्णन.

सुजय

महेश हतोळकर's picture

25 Nov 2009 - 9:27 am | महेश हतोळकर

मस्त लेख आणि सुरेख छायाचित्रे.

गडाचा इतिहास लिहिण्यासाठी मला मेलवर आलेल्या माहितीचा संदर्भ घेतला आहे. त्या एका पीडीएफ मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांचा इतिहास, गडावर बघण्यासारखी ठिकाणं, जाव कसं, गडावर काय काय सोय होउ शकेल इत्यादी माहिती आहे. ही माहिती एकत्र करणार्‍या सगळ्या अज्ञात मंडळीना माझा साष्टांग दंडवत. ह्या माहितीचा खुप उपयोग होतो.

ही पिडीएफ मला पाठवाल का? गुगल निरोप्याचा पत्ता व्यनी ने देतो.

अगाऊ धन्यवाद.
महेश हतोळकर

सुमीत भातखंडे's picture

25 Nov 2009 - 12:06 pm | सुमीत भातखंडे

मस्त वाटलं.
शिवनेरीची चित्र-सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Nov 2009 - 1:37 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम रे!!! शिवनेरी दर्शन, घरबसल्या.

इदगाहच्या भिंतीवर अरेबिक मजकूर आहे. वाचायचा प्रयत्न करतोय. बहुतेक कबर या शब्दापासून सुरू होणारे वाक्य आहे.

बिपिन कार्यकर्ते

sneharani's picture

25 Nov 2009 - 2:04 pm | sneharani

फोटो आणि गडसुध्दा अगदी अप्रतिम.
छान सफर घडवलीत.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

25 Nov 2009 - 3:02 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्तच आहेत फोटो अन वर्णनही.लेण्याद्रीला गेलो होतो तेंव्हा शिवनेरी पहायचा राहिला होता,तुमच्या फोटोंमुळे घरबसल्या शिवनेरीची सफर घडली.किल्ला स्वराज्यात नव्हता ही माहितीही नवीनच कळली.धन्यवाद.

अमोल केळकर's picture

25 Nov 2009 - 3:17 pm | अमोल केळकर

झकास , मस्त, सुंदर इ.इ

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आनंद's picture

25 Nov 2009 - 6:36 pm | आनंद

>ही अशी चिन्हं विजयाच, सामर्थ्याच प्रतिक म्हणून वापरली जात असावीत का? कारण त्या वाघसदृश प्राण्याने मागच्या दोन पायात दोन हत्ती चिरडले आहेत. तर पुढच्या पायानेदेखील कशावरतरी हल्ला चढवला आहे.>
पुढच्या पायातला तो प्राणी की पक्षी कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्ट च्या (K.S.R.T.C) लोगो मधे दिसतो.

मस्त चित्रमय सफर ,

---- आनंद

अवलिया's picture

25 Nov 2009 - 6:47 pm | अवलिया

सु रे ख !!!!

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

झकासराव's picture

25 Nov 2009 - 7:17 pm | झकासराव

धन्यवाद मित्रहो.

http://www.esnips.com/web/maharashtratilgadkillemahiti

ह्या इथे ती पीडीएफ अपलोड केली आहे. तिथुन उतरवुन घ्या.
<<<<अरेबिक मजकूर आहे. वाचायचा प्रयत्न करतोय. बहुतेक कबर या शब्दापासून सुरू होणारे वाक्य आहे.>>>
फोटु काढतानाच ठरवल होत की तुम्हाला विचाराव अस. :)

माझी दुनिया's picture

26 Nov 2009 - 12:13 pm | माझी दुनिया

धन्यवाद झकासराव :D

फाइल उतरवून घेतली आहे.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Nov 2009 - 4:59 pm | घाशीराम कोतवाल १.२

व्वा झकासराव अहो आपली माणस तुम्ही जरा जुन्नर लेण्याद्रीची सफर घडवा हो लोकांना !!!
आंबेगाव निवासी कोतवाल

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

सूहास's picture

26 Nov 2009 - 8:09 pm | सूहास (not verified)

मस्त छोटेखानी सफर !!

उगाचच म्हणुन नाही तर फोटोग्राफी चांगलीच आहे झकासराव !!

बाकी मदनबाणाशी सहमत ...साल ते प्रेम वीरांच्या स्वाक्षर्‍यांची विडंबन पण नाय पाडता येत तिथे ...टार्‍याला सांगीतले तर तो दात पाडेल तिथे जाउन आणी म्हणेल हॅ हॅ हॅ ...

सू हा स...

झकासराव's picture

26 Nov 2009 - 9:33 pm | झकासराव

धन्यवाद मित्रहो.
बाकी मदनबाणाशी सहमत ..>>>
होय रे. ती एक डोकेदुखीच आहे.

साजिरा's picture

28 Nov 2009 - 1:27 pm | साजिरा

मस्त रे झकासा. :)
फोटो आणि वर्णन आवडले.