श श क २०२२
[शतशब्दकथा स्पर्धा] नक्षत्राच देणंविठ्या भकास नजरेने आभाळाकड पहात बसला होता. |
[शतशब्दकथा स्पर्धा] शिरानमस्कार,हे माझे मिपा वरील पहिले लेखन आहे म्हणून काही चूक झाल्यास क्षमा असावी. "ओ बाबा मले लय भूक लागली हाय पोटामंदे मंगाणपासुन कावळे बोंबलत हाय." |
[शतशब्दकथा स्पर्धा] निकालदहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. |
[शतशब्दकथा स्पर्धा] विश्वासघात !फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते. फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य !" |
(शतशब्दकथा स्पर्धा) समसजानेवारी २००८, |
[शतशब्दकथा स्पर्धा] मन्या१०-११ वर्षं अंगाखांद्यावर नाचून, बापाची गादी असल्यासारखं झोपलेलो असताना पोटावर बसून. गुदगुल्या करून , थंडीच्या दिवसात नको असतानाही कुशीत शिरून. सवय लावली हरामखोराने. |
[शतशब्दकथा स्पर्धा] रात्र आरंभ (भाग-१)खिडकीबाहेर पडणारा मुसळधार पाउस, अंधारलेलं आकाश,घोंगावणारा वारा, ढगांचा गडगडाट आणि कडाडणार्या वीजा ह्याचं गोष्टी दोन दिवस तिच्या सोबतीला होत्या. दिवाणखाण्यामधल्या घड्याळाने रात्रीच्या अकराचे टोल दिले तशी ती एकदम दचकुन जागी झाली. तो अजुनही घरी परतलेला नव्हता. तिनी त्याला परत एकदा भ्रमणध्वनीवर संपर्क करायचा विफल प्रयत्न करुन पाहिला. |
[शतशब्दकथा स्पर्धा] गणू"आई, मी शाळेत जाणार नाय" गणू रडत सांगत होता."पोरं मला जाडया जाडया चिडवत्यात. आणखीन मी आन समोरची सरस्वती जोडीनी शाळेत निघालो का पोरं गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती असं वरडत्यात." |
[शतशब्दकथा स्पर्धा] जलधारामहादेवाच्या मंदिरात लगबग चालली होती, जलधारांचा आज तिसरा दिवस होता . जलधारा म्हणजे महादेवाची पावसासाठी केलेली आराधना ... पुरोहितांचा मंत्रघोष दुमदुमत होता . गावकरी आनंदात होते . गावकर्यांची इच्छा पूर्ण झाली होती , पाऊस दोन रात्री पासून मुसळधार बरसत होता . हा मात्र धापा टाकत तिथे पोचला. |
[शतशब्दकथा स्पर्धा] येक रुपाया!नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी! बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२." |
[शतशब्दकथा स्पर्धा] "पोय्ये पोय्ये""पोय्ये ... पोय्ये..., १० - १२ वर्षाचा गोडुला जीव ! |
[शतशब्दकथा स्पर्धा] !! व्दिधाता !!कित्ती दिवासाने भेटूया म्हणाली .. "बाहुबली दाखवशील?" रात्री वॉट'स अप वर मेसेज आला , |
[शतशब्दकथा स्पर्धा] किंकाळी१९७५ च्या आसपास. |
[शतशब्दकथा स्पर्धा] थोडक्यात वाचलो!'परत तेच! मुद्दाम करतेय का?' पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती. तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का? 'विचारावं का मदत हवीय का म्हणून? नकोच, खरंच कुणाची वाट पहात असेल.’ पुन्हा लॅपटॉपकडे वळला. |
[शतशब्दकथा स्पर्धा] जातसरकारी साहेब हातात कागदपत्रांचा गठ्ठा सावरंत, जुनाट शाळेच्या अंधाऱ्या वर्गात शिरतात. छोटा साहेब तीथे बसलेल्या आठ दहा जनांना उद्देशुन बोलु लागतो |
[शतशब्दकथा स्पर्धा] सोलमेटलेक्चरला निघालेल्या अर्णवला थांबवून नेहाने विचारले, हिरमुसल्या नेहाकडे न बघता तो पुढे निघाला. |
[शतशब्दकथा स्पर्धा] देऊळक्लबहाऊसमध्ये सोसायटीच्या आवारात कोणते देऊळ उभारायचे यासाठी सदस्यांची मीटिंग सुरू होती. "मारूतीचे देऊळ बांधूया" बिराजदार म्हणाले. "नको. मारूतीमंदीर म्हणजे खेड्यात असल्यासारखं वाटतं" जोशी म्हणाले. "दत्तमंदीरच पाहिजे" पराडकरांची सूचना. "दत्त, विठोबा असल्या देवांची देवळे म्हणजे एखाद्या जुन्या पेठेत राहिल्यासारखं वाटेल" इति गोखले. |
[शतशब्दकथा स्पर्धा] लव्हतो सगळ्यांपासून अलिप्त राहणारा, वेगळा वेगळा होता. म्हणूनच तिला आवडायचा. तू काहीच कुणाशी शेअर का करत नाहीस असं तिने विचारल्यावर तो म्हणाला 'सिगरेट, मोजे आणि अंडरवेअर कधी शेअर करू नये'. हे ऐकल्यावरच तिने ठरवलं, ह्यालाच मी लव्ह देणार. |
[शतशब्दकथा स्पर्धा] हाक !"अंबामाय वाचवं गं माझ्या लेकराला....अहो आई बोलवा ना गजाननाला!!...सगळे शांत का बसलेत ?कोणी काहीच कसं करत नाही..डॉक्टरसुद्धा म्हणाले घरी घेऊन जा त्याला..आता काहीच होऊ शकत नाही..देवा काय करू मी आता? |
[शतशब्दकथा स्पर्धा] समरांगणतोफेच्या प्रचंड आवाजाने आसमंतात एक प्रकारची भयानकता पसरली....... पाठोपाठ बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांनी युद्धाची जणू घोषणाच केली........ वातावरणात भयानकता जाणवत होती....... धरणी जणू रक्त प्यायला आतुर झाली होती..... सगळी कडे रक्ताचा सडा...... अशातच एक सैनिक एकदम आवेशात गोळ्यांची बरसात करत पुढे जात होता.... त्याच्या कित्येक गोळ्या शत्रूच्या हृदयाचा ठाव घेत होत्या.... |
- ‹ previous
- 17 of 20
- next ›