श श क २०२२
[शतशब्दकथा स्पर्धा] सामक्षाआमचं गाव काय हे न्हवे. ते तिते तळकोकणात!! |
[शतशब्दकथा स्पर्धा] "व्हॉटसअप "कानात इअर फोन कोंबून बाईक बुंगवत जायचं इतकच त्याला माहीत, रस्त्यावर गर्दी दिसली म्हणून उत्सुकतेने याने पण बाईकचा वेग कमी करून काय दिसतंय ते बघायला गेला. |
[शतशब्दकथा स्पर्धा] मातृत्वअनाथ आश्रमात लहान मुलांची किलबिल होती. मानसी व मानस दोन्ही मोठ्या अधीरतेने त्या मुलांना पाहत होती... कारण आज खूप प्रतीक्षेनंतर त्यांना एक मुलगी दत्तक मिळणार होती..... तेवढ्यात त्यांना बोलावण्यात आले. त्यांनी मुलीला दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. |
[शतशब्दकथा स्पर्धा] प्रतारणागेले कित्येक महिने नीट झोप लागली नव्हती, विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. शेवटी आज रात्रीच काम तमाम करण्याचा निश्चय केला तेव्हा जरा बरं वाटलं. हिच्या एकूण वागणुकीवरून तिचे बाहेर काहीतरी लफडं चालू असल्याची दाट शक्यता होती. फोनवर हळू आवाजात बोलणं, मी दिसल्याबरोबर बोलणं थांबवणं, फोन पासवर्ड घालून लॉक ठेवणं. ‘त्याच्याशी’ सतत हसत बोलणं आणि माझ्याशी बोलताना कपाळाला आठ्या……! |
[शतशब्दकथा स्पर्धा] - अंगार !"अच्छा हुआ वो पाववालेका दुकान जला दिया. बच्चा देखके बेवकूफ बनाता था वो. ऐसाहीच मांगता था उसको. अब कलसे हम चाचाके दुकानसे पाव लेंगे..." सायंकाळच्या वेळी शहर जाळपोळींनी उजळून निघाले होते. तसाच उजळलेला तो एक निरागस चेहरा. पाववाल्याला धडा मिळाला, आणि उद्या सुद्धा शाळेला सुट्टी असणार, या दुहेरी आनंदात झोपी गेला.. |
[शतशब्दकथा स्पर्धा] पारितोषिक !चौदाव्या आंतरराष्ट्रीय विज्ञानपरीषदेच्या शेवटच्या टप्प्यात स्वागत, तीनशेसाठ शोधांपैकी सर्वोत्तम `भूगर्भातून ऊर्जानिर्मितीच्या' प्रोफेसर रूसच्या संशोधनाला सर्वानुमते प्रथम पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. डॉक्टर मायकेलनी आपले भाषण संपवले. " माझ्यामते निर्णय घेण्यात घाई होतेय " सर्वांच्या नजरा मंचावर येणार्या व्यक्तीकडे वळल्या. |
[शतशब्दकथा स्पर्धा] कोण...?ती आत शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कणाकणाने जवळ येत होता. हा बाहेर दोन गोजिर्या पोरांना कसलीशी गोष्ट सांगत होता. '...ह्यांना आपल्याला एकट्याने सांभाळायचंय, आपण कुठेच कमी पडू नये...' आत डॉक्टर बोलले, "त्यांना त्रास नको व्हायला..." |
[शतशब्दकथास्पर्धा] दैवओ सायेब... !!! आज तरी माह्या बापाचा चेक आला का हो ? डागतराने आयचं आप्रेशन कराया सांगितलंय. पंधरा हजार रुपडे मागतोय..!!!! |
[शतशब्दकथास्पर्धा] दान"अरे,त्याला सांगु तरी काय? आणि कसं?...काय म्हणेल तो मला?..कशी जाऊ मी त्याला सामोरी?,नको रे अश्या संकटात लोटुस..माझ्यामधे आता धैर्य उरलं नाही...." "तुला जे हवे ते मी त्याच्याकडुन मिळविनही,तो देईलही..पण पुढे मी त्याला काय तोंड दा़खवु,सांग ना.." "जी गोष्ट आयुष्यभर नव-यापासुन,मुलांपासुन लपवत आले..आता त्यांच्याच भल्यासाठी ह्याच भांडवल करु बघतोस...अरे माझी थोडी लाज ठेव..." |
[शतशब्दकथास्पर्धा] भेटचर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरताच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती. पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली. ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?” |
[शतशब्दकथास्पर्धा] - डीलट्रेन हलली. |
[शतशब्द्कथा स्पर्धा] पहाट" मालक सोडा तिला, म्या हुवतर पाया पडते, पर लेकीला सोडा", तमासगीर कमळाक्कान हंबरडा फोडला. |
[शतशब्द कथा] रुख - रुखगाडी सिग्नलला थांबली आणि काल डेब्राकडून आलेल्या ईमेलचा मथळा आठवला 'Thank you and good bye'. राहुनचं गेलं काल तिचं मेल वाचायचं. |
[शतशब्दकथा स्पर्धा] शयनाअज्जिब्बात येत नाही ती,पूर्वीसारखी! एक काळ होता... ती माझी वाट बघत असायची. कधी येतोस रे माझ्या बाहुपाशात? असे म्हणत ! माझाहि रुबाब काही कमी नव्हता तेंव्हा . पण तो असायचा काही क्षणांपुरता. नंतर मी कधी विरघळून जायचो तिच्यात ? कळायचंहि नाही मला! कारण तेंव्हा मुळातच ती होती शयना. आणि मी??? केवळ शयनी! |
[शतशब्दकथा स्पर्धा] गोचीत्या दिवशी मी, बापलेकर, पालेकर थोडं लवकरंच शाळेत पोचलो. सकाळची शाळा सुटायला अजून अवकाश होता, म्हणून गेटवरच टिवल्या बावल्या करायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे चावताना च्युईंगम दोन बोटांनी बाहेर खेचणे, समोरच्या थियेटरवरचे 'तसल्या' सिनेमाचे पोस्टर न्याहाळणे इत्यादी टुकार उद्योग बापलेकरने सुरू केले होते. |
[शतशब्दकथा स्पर्धा] टॅक्स"मिस्टर उन्निथन, काय प्रकार आहे हा?" "इंन्स्पेक्टर, मी काही चुकीचे केले नाही , तुमचाच नियम फॉलो केलाय." "मिस्टर शर्मा, यांना नियम समजवा जरा, शेड्युल दाखवा" "साहेब, मी सरळ बिझिनेस केलाय, यात एका पैशाचीही चोरी नाही. "टॅक्स कमी भरलात की !" "टॅक्स म्हणून जवळपास साडेसात लाख रुपये भरलेत मी, " |
[शतशब्दकथा स्पर्धा] सुगंधी हातरूमाल"शरद ४१ वर्षाचा मला सोडून गेला.ती रात्र मला खूपच भयानक वाटली.सकाळी बेडवर शरद दिसला नाही.त्याच्या उशी खाली सुगंध लावलेला त्याचा हातरुमाल दिसला. उचलल्यावर, त्याला आवडणार्या सेंटचा, वास माझ्या नाकात गेल्यावर पुन्हा ताजी आठवण मला त्रास देऊ लागली होती.काल तळ्यावर जाण्याची खेपसुद्धा आमची शेवटचीच ठरली.रुमालावरच्या सेंटचा वास घेत मी हवं तेव्हडं मला रडून घेतलं.शरदीनी,माझ्या पायाशी घुटमळत होती. |
[शतशब्दकथा स्पर्धा]: प्रतिबिंबअनुने हळुच समोरच्या आरशात पाहीले. आरशात तिच्याबरोबरच आणखी तीन माणसे पाठमोरी उभी होती. ते तिघेही पलंगावर झोपलेल्या अभिकडे पाहात काहीतरी बोलत होते. ती स्त्री म्हणत होती, "अशोक, अरे दिसत तर कोणीच नाहीये पलंगावर? पण मग मघाशी कुणाचातरी धक्का लागला. उष्ण श्वास माझ्या मानेवर आदळले. मी उठुन पाहीलं तर तु झोपला होतास शांतपणे..माझ्याकडे पाठ करुन ! |
[शतशब्दकथा स्पर्धा] डिझाईनआई ग्ग!! लाथा मारतो की गम्मत करतो हा? फुटबॉल खेळणार नक्की कार्टा.." ती पोटाकडे पहात कौतुकाने म्हणाली. ~ दाराआडुन त्याने चटकन डोळे पुसले.. |
[शतशब्दकथा स्पर्धा] बळतो: माझ्या दोघींनी माझी साथ सोडलिये. आता तुलाही मी माझ्या बंधनातून मुक्त करतो. |
- ‹ previous
- 16 of 20
- next ›