[शतशब्दकथा स्पर्धा] किंकाळी

सिध्दार्थ's picture
सिध्दार्थ in स्पर्धा
7 Aug 2015 - 11:37 am

१९७५ च्या आसपास.
काळ्या आभाळाची सावली नजीक येत होती. तिला आज घरी जाण्यास उशीर झाला होता. अंधार वाढू लागल्याने ती जनावरांना घेऊन गावाकडे निघाली. वाटेत एक नदी होती. दुपारच्या जास्त पावसाने पाणी वाढले होते पण पूल नसल्याने नदीत पाय ठेवण्यावाचून पर्याय नव्हता. चार जनावरांच्या शेवटून ती दहा वर्षाची पोर नदीत उतरली.
एका मोठ्या विजेच्या कडकडाटा बरोबर पावसाच्या सरी येऊन अंग भिजवू लागल्या. नदीच्या मध्यापर्यंत आल्यावर तिचा तोल गेला. ती प्रवाहाबरोबर वाहू लागली. नाका तोंडात पाणी गेले. वाहून जाताना काठावरच्या एका दगडाला पकडून ती स्वतःला सावरून अडखळत उभी राहिली, कसे बसे मागे वळून तिने बघितले, ती मनातल्या मनात समाधानी झाली, शेवटचे जनावर सुखरूप नदीपार गेले होते पण दुसर्‍याच मिनिटाला पायाखालचा दगड घसरला आणि तिच्या तोंडातून किंकाळी निघाली.

प्रतिक्रिया

+१
१०० शब्दात अतिशय परिणाकारक

dadadarekar's picture

7 Aug 2015 - 12:14 pm | dadadarekar

नुसताच प्रसंग आहे. कथा नाही.

सिध्दार्थ's picture

7 Aug 2015 - 12:35 pm | सिध्दार्थ

दोन भागांमध्ये आहे शशक
हा त्यातला पहिला भाग

दोन भागांमध्ये आहे शशक म्हणजे द्विशशक झाली राव …

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2015 - 8:29 pm | अत्रुप्त आत्मा

@दोन भागांमध्ये आहे शशक म्हणजे द्विशशक झाली राव … >> अगदी बरोब्बर.. शतशब्द कथेमधे शेवटाला जो खेळ घडणं अपेक्षित असतं..तसं काहिही नाहिये यात. नुसतं असल्यासारखं वाटतय. कथाबीजाशी त्या शेवटानी काहितरी पंच दिला पाहिजे..ते होत नाहीये यात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2015 - 12:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

द-बाहुबली's picture

7 Aug 2015 - 12:27 pm | द-बाहुबली

डोळे पाणावले.

अविनाश पांढरकर's picture

7 Aug 2015 - 12:41 pm | अविनाश पांढरकर

+१

जडभरत's picture

7 Aug 2015 - 1:03 pm | जडभरत

+१
अर्र
वाईट वाटलं.
पण सगळेच जण अशा दु:खांत शशक का लिहितात?

प्यारे१'s picture

7 Aug 2015 - 1:09 pm | प्यारे१

+१

बहिरुपी's picture

7 Aug 2015 - 8:00 pm | बहिरुपी

+१

एस's picture

7 Aug 2015 - 8:05 pm | एस

+१

टुंड्रा's picture

8 Aug 2015 - 9:49 am | टुंड्रा

+1

नूतन सावंत's picture

8 Aug 2015 - 1:58 pm | नूतन सावंत

+१

तीरूपुत्र's picture

8 Aug 2015 - 10:36 pm | तीरूपुत्र

+१ शेवट वाईट आहे...

प्रिशू's picture

14 Aug 2015 - 2:58 pm | प्रिशू

जराही उत्कंठा नाही.