कित्ती दिवासाने भेटूया म्हणाली .. "बाहुबली दाखवशील?" रात्री वॉट'स अप वर मेसेज आला ,
कशीतरी धडपड करून तिकीट मिळवल .. अगदी लाल चुटूक ड्रेस आणि तशीच मस्त लिपस्टिक, सतत डोळ्यावर येणार्या रेशमी बटा , नुसता जीव वरखाली होत होता ..
..
मध्यंतरात मानसने अगदीच न राहवून आश्लेषाला विचारल काय ठरवूया आपण आता ?
..
थोडस कृत्रिम हसून म्हणाली थांबरे नक्की काय सांगू तुला माहीत आहेना मी कोण आहेते मग पुन्हा पुन्हा असा प्रश्न का करतोस?
अश्या कोरड्या उत्तरा नंतर पॉप कोर्न घश्या खाली उतरले नाहीत
चित्रपट संपल्यावर आश्लेषाशी फार काही न बोलता मानस घरी परतला..
..
घरी अंधार होता पण मानस खूप खुश होता तेवढ्यात फोनची कर्कश्य बेल वाजली..
प्रतिक्रिया
7 Aug 2015 - 2:37 pm | माम्लेदारचा पन्खा
इस्कटून सांगा की .
7 Aug 2015 - 4:14 pm | gogglya
मला वाटले फक्त मलाच काही कळले नाही.
7 Aug 2015 - 2:42 pm | थॉर माणूस
हे मात्र थेट to be continued... वाटतंय.
शेवटाचा थोडा पुन्हा विचार करा असं सुचवेन.
7 Aug 2015 - 3:05 pm | कहर
कथा कुठे आहे ?
7 Aug 2015 - 3:27 pm | प्यारे१
'मैं कौन हूँ' जानने के लिए पढ़िए सीक्वेल....
+१
7 Aug 2015 - 4:26 pm | खटपट्या
उत्तरकथेच्या प्रतीक्षेत..
7 Aug 2015 - 7:51 pm | dadadarekar
दोन कथा सेप्रेट पाहिजेत.
ही अर्धी वाटते.
9 Aug 2015 - 7:48 am | माझीही शॅम्पेन
कथेचे नाव बदलून दिल्याबद्दल सर्व प्रथम संपादक मंडळाला धन्यवाद !!
कुठल्याही सूचना न वाचता उत्तर प्रत्रिका लिहिण्याला सुरुवात करण्य्याची घातक सवय इथेही नडली :) पहिली गोष्ट ही संपूर्ण वाटली पाहिजे हे अगोदर लक्ष्यातच आल नाही
असो मानस नावाच्या व्दिभंग माणसाची हि कथा आहे आश्लेषा नावाची मुलगी त्याला बरेच दिवसांनी भेटते एकंदरीत दिवस मजेत जातो काही प्रश्नाची उत्तरे ती देत नाही पुढे देईल का ते नाही हे पुढील भागात बघू या
असो प्रतिक्रिया आणि मार्गदर्शनाबद्दल सर्व मित्रांचे आभार (७७ शब्द संपले :) )