[शतशब्दकथा स्पर्धा] जलधारा

nasatiuthathev's picture
nasatiuthathev in स्पर्धा
7 Aug 2015 - 7:14 pm

महादेवाच्या मंदिरात लगबग चालली होती, जलधारांचा आज तिसरा दिवस होता . जलधारा म्हणजे महादेवाची पावसासाठी केलेली आराधना ... पुरोहितांचा मंत्रघोष दुमदुमत होता . गावकरी आनंदात होते . गावकर्यांची इच्छा पूर्ण झाली होती , पाऊस दोन रात्री पासून मुसळधार बरसत होता . हा मात्र धापा टाकत तिथे पोचला.
याच्या कानात फक्त रात्री डोंगर माथ्यावरच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या . एका झाडाच्या मुळामुले वाचलेला हा ! तेवढ्यात कोणीतरी सांगितले कि “अरे डोंगरावरच्या शालू चे प्रेत मारुतीच्या पाराजवळ तरंगतय” तसा पळतच हा पारावर पोचला . तोंडातून शब्द फुटत नव्हता ....
एवढ्या पावसातही याच्या अश्रूंच्या जलधारा मात्र वेगळ्या पण धो धो कोसळत होत्या

प्रतिक्रिया

जेपी's picture

7 Aug 2015 - 7:32 pm | जेपी

+1
(अ-मिपानलेऊस)-जेपी

बहिरुपी's picture

7 Aug 2015 - 7:58 pm | बहिरुपी

+१

राघवेंद्र's picture

7 Aug 2015 - 8:05 pm | राघवेंद्र

+१

जगप्रवासी's picture

8 Aug 2015 - 12:29 pm | जगप्रवासी

+१

पैसा's picture

8 Aug 2015 - 12:34 pm | पैसा

+१

मुक्त विहारि's picture

8 Aug 2015 - 5:48 pm | मुक्त विहारि

+१

प्रीत-मोहर's picture

8 Aug 2015 - 6:52 pm | प्रीत-मोहर

+१

अमृत's picture

10 Aug 2015 - 8:35 am | अमृत

+१

बबन ताम्बे's picture

10 Aug 2015 - 11:12 am | बबन ताम्बे

+१

gogglya's picture

10 Aug 2015 - 3:10 pm | gogglya

+१