श श क २०२२

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in स्पर्धा
6 Aug 2015 - 10:40

[शतशब्दकथा स्पर्धा ] टॅक्सी

तिने हळूच बाहेर पाहिलं. टॅक्सी सिग्नलवर थांबली होती. बाबा टॅक्सीवाल्याच्या शेजारी बसला होता. तिने एक सुस्कारा सोडला. त्यांच्या कारच्या सीटस् किती छान होत्या. मऊमऊ. पण बाबाला गेले वर्षभर एकपण पिक्चर किंवा सीरियल मिळाली नव्हती. म्हणून मग गेल्या आठवड्यात बँकवाले येऊन कार घेऊन गेले होते. तिला काहीच कळलं नव्हतं. तसंपण मम्मा दोन वर्षांपूर्वी बाबाला सोडून निघून गेल्यापासून बाबा कसंतरीच करायचा.

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in स्पर्धा
6 Aug 2015 - 10:19

[शतशब्दकथा स्पर्धा] दैवी शक्ती

आजुबाजुला मिट्ट काळोख होता. पक्या अजुनही पळतच होता शेताच्या बांधावरुन पळायला नीट जमतही नव्हते , पण जीव वाचवायचा होता , म्हणुन पळावे तर लागणारच होते. पायातील चप्पल अचानक तुटली पण चपलेची पर्वा न करता तो अनवाणी पायानी पळत होता ,गावातील दिवे अजुनही दुरवर दिसत होते , कधी एकदा गाव येते असे पक्याला झाले होते.

नाखु's picture
नाखु in स्पर्धा
6 Aug 2015 - 09:25

[शतशब्दकथा स्पर्धा] निर्णय

"वार्‍याने पण सकाळीच उच्छाद मांडलाय !" ती पुटपटली. पण खरंच वैताग बाहेरच्या घोंघावणार्याबद्दल का मनातल्या , नीट समजेना.
महिनाभरातल्या अनाकालनीय घडामोडी आणि हा असा ह्ट्टी..नको म्हटलं तरी कालची भेट आठवलीच.

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in स्पर्धा
6 Aug 2015 - 08:13

[शतशब्द कथा स्पर्धा] त्याग

माझे डोके उठले होते.समोर भकास तोंडाने अण्णा, तात्या बसले होते. ते दोघ्ं माधुकरी मागून आले होते. मिरजेच्या स्टेशनकड़े माझे मन धावे, तिथून वाराणसीला,माझ्या देवाकडे! पिंडितला शेखर नाही जिताजागता चंद्रशेखर आझाद.

"अण्णा ही भिक्षा कशी शिजवणार??"

उंबरठ्यात कृष्णा येऊन लाकडे भिजवुन गेली होती. मनातल्या क्रांतिकाऱ्याने बंधने झुगारली.
"द्या इकडे भिक्षा",

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in स्पर्धा
6 Aug 2015 - 05:27

[शतशब्दकथा स्पर्धा] हेल्पिंग हँड

सगळेे साचेबद्ध होते. साडेनऊला मेट्रोत शिरणे. तिथे खांबाला टेकून उभे राहणे. तो आल्यावर समोर 'महिलाओं के लिए' खाली कोपऱ्यात रेलून बसणाऱ्या 'तिची' एक नजर त्याच्याकडे आणि परत कानात इयरफोन हातात स्मार्टफोन. दर मिनिटाला गाणे बदलायच्या तिच्या सवयीची ह्याला मौज वाटे.

सटक's picture
सटक in स्पर्धा
6 Aug 2015 - 00:34

[शतशब्दकथा स्पर्धा] शाळा

ही काय पद्धत आहे लोकांशी वागण्याची?
श्वेतांबरा बाईंच्या डोळ्यात राग मावत नव्हता. भितीने जणू अद्रुश्य झाला तो..
काय केले होते त्याने? एका छोट्याश्या मुलीला ती हरवलेली असताना मदत केली होती. बाईंचा तास सोडून...
त्यांची शाळा होतीही तशी मोठी..सरदारांच्या वाड्यातच भरायची.

dadadarekar's picture
dadadarekar in स्पर्धा
6 Aug 2015 - 00:03

[शतशब्दकथा स्पर्धा] देवकी

' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली.

मुरलीधर श्रीकृष्णाचं चित्र असणारं पोस्टर होतं ते . दोन चार ठिकाणी फाटलेलंही होतं.

भिंतीवर गणपती , लक्ष्मी , हनुमान होतेच. त्याच रांगेत हेही चिकटलं . मुंबईमधील भाड्याच्या घरात पितळी देव आणि देवघर ही मिजास कशी चालणार ?

कालच युरिन टेस्ट पोझिटिव्ह आलेली !

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in स्पर्धा
5 Aug 2015 - 23:12

[शतशब्दकथा स्पर्धा]जगणं

सकाळीच लवकर उठलो. खबदाडीमधून किलकिल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिलं.रात्रीच्या प्रकाराची कुठलीही खूण आजूबाजूला दिसत नव्हती.

काल तो जमाव हातात काठ्या-दगड घेऊन मागे लागला होता.त्यांच्या हाती सापडलो असतो तर तिथेच ठेचलं असतं त्यांनी…. थोडीशी भूक लागली होती म्हणून एक पाव पळवला दुकानातून.

रातराणी's picture
रातराणी in स्पर्धा
5 Aug 2015 - 13:53

[शतशब्दकथा स्पर्धा] कातरवेळ

अख्ख्या दिवसभरात तिची आवडती वेळ दिवेलागनीची. कातरवेळ. कधी रिकाम्या हाताने न येणारी. कधी कटू कधी गोड आठवणी सोबत आणणारी. कधी खूप त्रागा व्हायचा पण तरीही वाट पहायची रोजच. मैत्रीणच वाटायची तिला.

यमन's picture
यमन in स्पर्धा
5 Aug 2015 - 13:11

[शतशब्दकथा स्पर्धा] बॉक्सर

हरलो की बाप दात ओठ खाऊन हाणायचा.
त्याच्या पुढे इतर स्पर्धकांचा मार काहीच वाटायचा नाही .
बाप स्वतः नावाजलेला बॉक्सर ;त्याच्या मते तो पोराला घडवत होता .
आजचा सामना महत्वाचा होता ;बापानी खूप पैसे लावले होते . हारून चालणार नव्हते .
पहिल्या राउंडला लीड घेतलं ;पण समोरच्याला मारताना ताकतच येत नव्हती .

अभ्या..'s picture
अभ्या.. in स्पर्धा
5 Aug 2015 - 12:25

[शतशब्दकथा स्पर्धा] अंतर

काय खरं नाही बघा आयटीचे साहेब. तुमचा निखिल आयटीलाच ना पुण्यात?
हो रे, चांगले पगार असतात पण त्यांना.
अमेरिकेत काय लैच मंदी आलीय म्हणं. मग ह्यांचं अवघडच की सगळं.
___________________________________________________________________
लहानशा गावातली सिंगल ब्रँच कोऑपरेटिव्ह बँक अन धडपडून मिळालेली मॅनेजरची खुर्ची.

सनईचौघडा's picture
सनईचौघडा in स्पर्धा
5 Aug 2015 - 12:01

[शतशब्दकथा स्पर्धा] बंदी

पारावर चार म्हातारी टकुरी काय ती असायची. पन कालपास्नं सरकारनं निर्णय घेतल्यावर गावतली तरणीबी जमा होवु लागली.

शिरप्या:- इच्चीभनं त्या सरकारच्या...

झिपर्या:- सालं आमची मजा सरकारला बगवली नाय...

मंद्या:- येकदम ८५७ साईटा बंद. पर काल आल्तं पेपरमंदी साईटा पुन्हा चालु झाल्याती.

गणप्या:- म्या म्हंतु आपन तालुक्याला जावुया..

शिरप्या:- कश्यापाई ?

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in स्पर्धा
5 Aug 2015 - 11:51

[शतशब्दकथा स्पर्धा] तो

तो

ब़जरबट्टू's picture
ब़जरबट्टू in स्पर्धा
5 Aug 2015 - 10:54

[शतशब्दकथा स्पर्धा] Appraisal

भडकलाच तो, एव्हढी वर्षे इंतजार केल्यावरही म्यनेजमेंट ने त्याला फक्त "Satisfactory" ग्रेड दिला होता, आणि तो जवान पोट्टा, "Extraordinary" घेऊन त्याचा बॉस बनला होता.
त्याने केलेली कामे मोठी होती, आजकालच्या या जवान पोरांसारखा भड़क डोक्याचा नव्हता तो, प्रत्येक कामात प्लानिंग असायचे त्याच्या, त्याला आठवला प्रोजेक्ट पूर्ण केल्यावर भेटलेला शाही Send-off .

कहर's picture
कहर in स्पर्धा
5 Aug 2015 - 10:12

[शतशब्दकथा स्पर्धा] वेग

"किती हळू चालवतोस रे. मागचे सगळे गेले पुढे"
"जाऊ दे गं. एकतर पावसामुळे रस्ता निसरडा झालाय"
"किती घाबरतोस रे जीवाला. लग्नाआधी किती बिनधास्त होतास"
"ती गोष्ट वेगळी होती. जबाबदारी नव्हती. आता तू आहेस. पिलू आहे. तुला सांगतो पिलू झाल्यापासून गाडी कधी ४०-५०च्या पुढे न्यावीशी वाटतच नाही. जरा वेग वाढला की ती येते डोळ्यासमोर आणि आपोआप ब्रेकवर पाय जातो"

योगी९००'s picture
योगी९०० in स्पर्धा
5 Aug 2015 - 08:58

[शतशब्दकथा स्पर्धा] चांगले दिवस..!!

सरकारने काळा पैसा भारतात आणल्याने मला जवळजवळ १५ लाख रू. मिळाले होते..!!

आज माज करूया म्हणून मी सकाळी उशीरा उठलो. नेहमीप्रमाणे मजूरीला न जाता आंघोळ करून ५ स्टार हॉटेलच्या दिशेने गेलो. जाताना नेहमीच्या टपरीवरील मग्रुर मालकाला डिवचण्यासाठी मुद्दाम थांबलो. चहा प्यायला एक चिटपाखरूपण नव्हते. सगळ्यांकडेच पैसा आल्याने कोणीच या फडतुस टपरीवर थांबणार नव्हते.

"मालक एक स्पेशल द्या!!".

जीएस's picture
जीएस in स्पर्धा
5 Aug 2015 - 04:38

[शतशब्द्कथा स्पर्धा] क्रांती

फुटेस्तोवर सुजलेली लोकल मंदावली तसा तो हातापयाच्या जेमतेम दोनतीन बोटांची पकड घट्ट करून जिवाच्या आकांताने लोंबकळू लागला. दारादारातून शिट्ट्या वाजल्या. रुळाकडेला बसलेली ती शरमेने अर्धमेली झाली. आतला बाहेरचा प्रत्येक जण असाच आपापल्या नरकात तुंबलेला.
'अरे हे काय जिणं आहे का?' त्याला लोकल गदागदा हलवून आत चिणलेल्या प्रत्येक मुडद्याला खडसावून जागे करावेसे वाटले.

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in स्पर्धा
4 Aug 2015 - 23:32

[शतशब्दकथा स्पर्धा] नवनिर्माण

भर पावसात चहूबाजूच्या सह्यकड्यांतील गहन शांततेला तीक्ष्ण बोचकारे काढत मशीनचा अजस्र हात आडवातिडवा फिरत होता. झाडं फाटून, उन्मळून पडत होती. डोंगराची ओली माती चामडी सोलावी तशी विदीर्ण होत उपसून निघत होती. खळाळणारे पाणी नव्या खड्ड्यात बिचकून थांबत रस्ता शोधत होते.

ताठ-कॉलर-शुभ्र-लुंगीवाला हाताची घडी घालून ते एकटक पहात होता.

बाजूचा मळकट-लेंगेवाला दाढीचे खुंट खाजवत चुळबुळत होता.

माझिया मना's picture
माझिया मना in स्पर्धा
4 Aug 2015 - 23:03

[शतशब्दकथा स्पर्धा] शाप

मोहिनी देवी सुन्न होऊन बसल्या होत्या. भविष्यातील भयंकर घटनांच्या चाहुलीने थरकाप झाला होता त्यांचा. ही जहागीर अजून किती बळी घेणार कळत नव्हते. सरकारांना परोपरीने सांगूनही जहागिरीचा मोह सुटत नाहीये..
का ही जहागीरच त्यांना सोडत नाहीये ? त्यांना आठवला तो सावत्र सासू राजलक्ष्मी देवींचा शाप..

समीरसूर's picture
समीरसूर in स्पर्धा
4 Aug 2015 - 22:23

[शतशब्दकथा स्पर्धा] काळजाचा ठोका

"झालं सगळं! आपल्या हक्काच्या घरात रहायला येणार आता आपण." संकेत आनंदी होता.

"हो ना, पण कर्ज खूप मोठं आहे रे. आपल्याला झेपेल ना हे?" सानिकाच्या स्वरात काळजी डोकावत होती.

"काळजी नको करूस. सॉरी, तुझ्या आवडत्या बांगड्या मात्र विकाव्या लागल्या..."

"नो प्रॉब्लेम! बांगड्या पुन्हा करता येतील.”