मी (चुकून) संपादक झालो तर !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 12:25 am

संपादक व्हावं अशी अजिबात इच्छा नाहीये. पण ओशो म्हणतात, इमॅजिनेशन इज अ टॉय, वन कॅन प्ले विथ इट. बट माइंड यू, ओन्ली योर डिझायर शूड नॉट टेकओवर इट ! तर मी संपादक होण्याची शक्यता शून्य . त्यामुळे हा फक्त मौजमजेचा खयाली पुलाव आहे.

जे आयडी पॅन कार्डची कॉपी व्यवस्थापनाकडे पाठवणार नाहीत त्यांचे आयडी महिनाभरानंतर आपोआप ब्लॉक होतील. ही स्वच्छ मिपा अभियानांतर्गत माझी पहिली स्टेप असेल. या मोहिमेमुळे ३०,००० ची संख्या ३,००० वर आली तरी हरकत नाही पण सध्याचे डू आयडी, बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या आवतारात घुसखोरी हे प्रश्न एका झटक्यात आणि कायमचे निकालात निघतील.

सध्याच्या (इनक्लूडींग सद्याच्या) संपादक मंडळाला धक्का न लावता, मी अभ्याला चौथा संपादक म्हणून घेईन. एक स्त्री सदस्या पण मंडळात असलेली बरी असं वाटतं, तरी नक्की कुणाला घ्यावं म्हणजे उर्वरित स्त्री शक्तींचा कोप होणार नाही हा मोठा संभ्रमच आहे. त्यामुळे तूर्तास हे काँपोझिशन बेस्ट आहे. आभ्या आला की आम्हाला नव्या आणि भन्नाट आयडीया राबवता येतील (फॉर एक्झांपल उपरोल्लेखित स्वच्छता मोहिमेची आयडिया!)

शिवाय आरपार पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक आयडीला ब्लॉक करण्यापूर्वी आपलं म्हणणं मांडायची संधी दिली जाईल. म्हणजे मंडळाला `कुणी काय विचारु शकत नसलं' तरी सदस्याला चान्स देणं लोकशाहीला धरुने. इन द मीन टाईम त्या सदस्याचे प्रतिसाद कोल्ड स्टोरेजमधे ठेवले जातील. सदस्य समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही तरच कोल्ड स्टोरेज प्रतिसादांसकट तो ब्लॉक होईल.

सर्व सदस्यांचा एक अटेंडन्स लॉग ठेवण्यात येईल. म्हणजे ही शाळा नाही पण मोफत मजेसाठी सुद्धा जे वेळ काढू शकत नाहीत ते असून नसून सारखेच. या लॉग प्रमाणे वर्षाला किमान साठ दिवसांपेक्षा कमी वेळा लॉगीन झालेले सदस्य, १ एप्रिलला फूल होतील. अर्थात, अशा सदस्यांना सुबुद्धी झाल्यास त्यांनी पुन्हा रिक्वेस्ट केल्यावर त्यांची घरवापसी होऊ शकेल. पण हा प्रकार आयुष्यात फक्त दोनदा होईल.

मिपा डोनेशन फॅसिलीटी ही अभिनव योजना मी सुरु करीन. म्हणजे संकेतस्थळाची सुविधा जरी मोफत असली तरी ज्या सदस्यांना स्वेच्छेनं `आली लहर केला कहर' म्हणायचं असेल, त्यांना ती इच्छा पुरवता येईल. या डोनेशन्समधून वेगवेगळ्या स्पर्धांना कॅश प्रायझेस दिली जातील. त्यामुळे सदस्यांना `आम्ही आमचा वेळ देतो' वगैरे म्हणण्यापूर्वी विचार करावा लागेल.

याव्यतिरिक्त प्रत्येक टॅबमधल्या सर्वोत्कृष्ठ लेखनास सदस्यांची नॉमिनेशन्स मागवून, दर वर्षी, प्रथम आणि द्वितीय असे दोन कॅश पुरस्कार देण्यात येतील. यामुळे इथे येणार्‍या सर्व पोस्टसचा दर्जा बेफाम सुधारेल.

वर्षातून एकदा `मॅन ऑफ द इयर' अँड `वूमन ऑफ द इयर' हे दोन कॅश पुरस्कार जाहीर केले जातील. ज्या सदस्यांच्या लेखनाला भरघोस प्रतिसाद मिळत गेले, ज्या सदस्यांनी संकेतस्थळासाठी विविध उपक्रम राबवले (उदा. गोष्ट तशी छोटी किंवा उंच माझा झोका), ज्यांनी संकेतस्थळाच्या सुशोभनाची जवाबदारी पेलली अशा निकषांवर हे दोन प्रेस्टीजियस पुरस्कार देण्यात येतील.

निबंध संपला !

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

21 Mar 2017 - 12:36 am | ज्योति अळवणी

हम्म्म

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2017 - 7:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या लैच बिझी म्हणून माझंही 'हं' फक्त एक गोष्ट सांगावी वाटते की अभ्याला संपादक करणे म्हणजे 'योगी' मुख्यमंत्री होणे आहे ;)

पुलेशु संक्षी सेठ. लौ यू... ! :)

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

21 Mar 2017 - 1:07 am | संदीप डांगे

मस्त! चांगले आहे की! इफ ओन्ली मालक टेक ऑन हिज माइन्ड!

जव्हेरगंज's picture

21 Mar 2017 - 1:11 am | जव्हेरगंज

[[[याव्यतिरिक्त प्रत्येक टॅबमधल्या सर्वोत्कृष्ठ लेखनास सदस्यांची नॉमिनेशन्स मागवून, दर वर्षी, प्रथम आणि द्वितीय असे दोन कॅश पुरस्कार देण्यात येतील. यामुळे इथे येणार्‍या सर्व पोस्टसचा दर्जा बेफाम सुधारेल.

वर्षातून एकदा `मॅन ऑफ द इयर' अँड `वूमन ऑफ द इयर' हे दोन कॅश पुरस्कार जाहीर केले जातील. ज्या सदस्यांच्या लेखनाला भरघोस प्रतिसाद मिळत गेले, ज्या सदस्यांनी संकेतस्थळासाठी विविध उपक्रम राबवले (उदा. गोष्ट तशी छोटी किंवा उंच माझा झोका), ज्यांनी संकेतस्थळाच्या सुशोभनाची जवाबदारी पेलली अशा निकषांवर हे दोन प्रेस्टीजियस पुरस्कार देण्यात येतील..]]]>>>

कॅश नाही दिली तरी चालेल. नुसतीच नावं जाहिर केली तरी बहार येईल.

कळीचा मुद्दा : हे सगळं सिलेक्शन कसं करणार?

संदीप डांगे's picture

21 Mar 2017 - 2:16 am | संदीप डांगे

कळीचा मुद्दा : हे सगळं सिलेक्शन कसं करणार?
>> मतदान घेऊन...

आषाढ_दर्द_गाणे's picture

21 Mar 2017 - 2:35 am | आषाढ_दर्द_गाणे

< हात वर करून, उभ्याने संधीच्या प्रतीक्षेत >
नव्याने जोडल्या जाणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन म्हणून 'सर्वोत्कृष्ट पदार्पण' हा पुरस्कारही देण्यात यावा अशी सूचना करू इच्छितो.
हा पुरस्कार एकदाच मिळवता येईल. धन्यवाद.
< हात खाली, बसून >

पिलीयन रायडर's picture

21 Mar 2017 - 6:53 am | पिलीयन रायडर

माझ्यातर्फे हा पुरस्कार तुला! ;)

अभ्या..'s picture

21 Mar 2017 - 10:21 am | अभ्या..

हीहीहीहॉहॉहॉहेहेहे.
.
मुख्य निरिक्षक म्हणून संजयजी आणि मा. पिरातै यांची निवड व्हावी असे सुचवून खाली बसतो.
.
.
(त्यांचे ते भांडत बसतील, आम्ही गोंधळ घालायला मोकळे ;) दोघांनी पण हलके घ्यावे. आमच्यासारख्या गरीब पामराकडे वळू नये)

पिलीयन रायडर's picture

21 Mar 2017 - 7:01 pm | पिलीयन रायडर

मी नक्की तुझं कधी काय घोडं मारलंय? नाही आज तू सांगच...

हेहेहेहेहे, अरबी घोडं होतं गं चांगलं.
एवढं संजयजी म्हण्ताहेत तर संपादक बनून त्या घोड्यावर बसून जरासं मिरवावं म्हणलं तर....
कुठलं काय न कुठलं काय. :(

>>>मुख्य निरिक्षक म्हणून संजयजी आणि मा. पिरातै यांची निवड व्हावी असे सुचवून खाली बसतो.

माझे बेशर्त अनुमोदन!!

विशुमित's picture

22 Mar 2017 - 5:32 pm | विशुमित

घोडे सरळ एका रांगेत चालतील.

गेल्या डिसेंबरात मी असा धागा काढलेला माबो आणि ऐसीवर. http://www.maayboli.com/node/61272 ही माबोची लिंक. फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही :-(. ऐसीवरचा धागा उडाला.

कॅश पुरस्कार देण्यात येतील. यामुळे इथे येणार्‍या सर्व पोस्टसचा दर्जा बेफाम सुधारेल.

पुरस्काराने सुधारेल. कॅशने नाही.

>>बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या आवतारात घुसखोरी हे प्रश्न एका झटक्यात आणि कायमचे निकालात निघतील.>>

नाही पटलं. माझे चार अवतार आहेत. केवळ अवतार असणे चूक कसे? बेजवाबदार लेखन कुठंय?

संजय क्षीरसागर's picture

21 Mar 2017 - 10:12 am | संजय क्षीरसागर

यामुळे मतदान प्रक्रियेत समानता राहील. गरज पडल्यास होणारं आयडी ब्लॉकींग सुलभ होईल. एका व्यक्तीचं सर्व लेखन एका ठिकाणी वाचायला मिळेल.

अभ्या..'s picture

21 Mar 2017 - 10:22 am | अभ्या..

चार प्यानकार्ड हायेत का तुमच्याकडं कंकाका, व्हा फुडं ;)

फेसबुकवाले ,जीमेलवाले कित्येक अकाउंट उघडायला देतात. तुमच्या पुणेरी पाट्या कशाला? "पाचशे रुपयाची नोट असल्यास काउंटरवर अगोदर सांगावे,
कोणी चार अवतारात वेगवेगळे प्रतिशाद दिले तर काय नुकसान होतय?

खेडूत's picture

21 Mar 2017 - 10:42 am | खेडूत

तर काय!
चार आयडी असलेल्याकडे वेळ अन स्मरणशक्ती भरपूर आहे इतकंच!

भीमराव's picture

21 Mar 2017 - 12:21 pm | भीमराव

आधार कार्ड चालन का, प्यान कार्ड नाय मपल्या कडं, आणि मी लेखक नाय ऊगाच कुठं तर चुकार- टुकार प्रतीसाद टाकत राहातो, मग मला ठेवनार का? सर्वोतकृष्ट प्रतीसाद पुरस्कार ठेवणार काय?

कुरप्या येथे स्मायल्या कल्पाव्यात!

भीमराव's picture

21 Mar 2017 - 12:29 pm | भीमराव

आधार कार्ड चालन का, प्यान कार्ड नाय मपल्या कडं, आणि मी लेखक नाय ऊगाच कुठं तर चुकार- टुकार प्रतीसाद टाकत राहातो, मग मला ठेवनार का? सर्वोतकृष्ट प्रतीसाद पुरस्कार ठेवणार काय?

कुरप्या येथे स्मायल्या कल्पाव्यात!

संजय क्षीरसागर's picture

21 Mar 2017 - 1:21 pm | संजय क्षीरसागर

पण पॅनकार्ड हल्ली लागतंच शिवाय ते काढणं सुद्धा सोपंय.

चौकटराजा's picture

21 Mar 2017 - 4:13 pm | चौकटराजा

संजय क्षीरसागर हीच मला आता डू आय डी वाटायला लागलीय ! अरे अरे अरे.... वरीजीनल संजय उवाच कोठे गेले ...... ?

प्रसाद गोडबोले's picture

22 Mar 2017 - 6:26 pm | प्रसाद गोडबोले

येकझ्यॅक्टली !

मीही हेच म्हणणार होतो , हे संक्षी मुळ संक्षींसारखे काहीच लेखन करत नाहीत :(

मागे एकदा मित्रांसोबत गोव्याला गेलो होतो तेव्हा मला " काळ हा निव्वळ भास आहे " ह्याची एकदम प्रतीती आली तेव्हा वरीजीनल संक्षींची आठवण झाली होती !

मुळ संक्षी कम बॅक !!

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2017 - 6:44 pm | संजय क्षीरसागर

" काळ हा निव्वळ भास आहे " ह्याची एकदम प्रतीती आली तेव्हा वरीजीनल संक्षींची आठवण झाली होती !

ग्रेट ! आय एम सो हॅपी.

पण आता इथे अध्यात्मिक लेखन नाही, कारण हा फोरम सदस्यांना केवळ टिपी म्हणून हवायं. जेवढं प्रतिसादातून झळकेल (उदाहरणार्थ हे) तेवढं कृपया गोड मानून घ्या. अर्थात, प्रतिसादातून जे दिसेल त्याची इथल्या लेखनाशी सांगड असेलच (उदा. वरच्या प्रतिसादांच्या संदर्भात पैसा आणि काल).

अनन्त अवधुत's picture

21 Mar 2017 - 11:15 pm | अनन्त अवधुत

संपादकाच्या कमी आणि ऍडमिनच्या (योग्य मराठी शब्द सुचवा) जास्त वाटत आहेत.

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2017 - 12:00 am | संजय क्षीरसागर

मिपावरही फक्त हव्या त्याच आयडींच्या लेखांना व प्रतिसादांना फॉलो करायची सोय उपलब्ध झाली तर! असा एक विचार उगाच मनात येऊन गेला! ;-) संक्षी, संपादक झाल्यावर ह्या सूचनेचा विचार करा बरं का!

येस ! सर्चमधे हा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. मग तो बुकमार्क सेव केला की काम झालं !

जेपी's picture

22 Mar 2017 - 5:06 pm | जेपी

अर्रर्र..
आस काय होऊ नै हीच भावी अर्र सॉरी माजी संपादक पदी प्रार्रथना.!

मी (चुकून) संपादक झालो तर !

तर मी मिपावर लॉगिन करण्यापेक्षा माझ्या आयडीचं कोंडीत विसर्जन करेन.

मराठी कथालेखक's picture

23 Mar 2017 - 12:39 pm | मराठी कथालेखक

विवेक ठाकूरांकडे पॅनकार्ड होतं का ? :)

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2017 - 2:13 pm | संजय क्षीरसागर

विवेक माझा शाळेपासूनचा मित्र आहे. तो म्हणाला तू नाहीस तर इथे काही मजा नाही. आणि तुझ्या लेखनापुढे आमचे बीनकामाचे आयडी निरुपयोगी आहेत . तू लिही.
खरं तर मी रिलक्टंट होतो कारण माझ्या लेखनातून माझा इंपॅक्ट दिसणारच होता आणि त्यासाठी तर मला रिक्वेस्ट केली गेली. विवेकचा आयडी जाणार याची सर्वांना कल्पना होती, पण मला फॉलो करणारे इतके आहेत की विवेकची कल्पना सगळयांनी उचलून धरली. इन द मीन टाईम केव्हा तरी माझा आयडी चालू झाला. एका वेळी माझे दोन्ही आयडी चालू होते. अर्थात, आयडी कोणताही असला तरी मी मला पाहिजे तेच लिहीत होतो आणि लिहीत राहीन. आयडी ऑर नो आयडी यानं मला काही फरक पडत नाही.

आयडी ऑर नो आयडी यानं मला काही फरक पडत नाही.

आयडीशिवाय लॉगिन कसे करणार याची उत्सुकता आहे.

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2017 - 3:40 pm | संजय क्षीरसागर

अभिव्यक्तीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि इथे लिहीणं हा त्यापैकी एक आहे. आयडी नव्हता तेव्हाही मजेत होतोच. माझे मित्र माझ्या अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक प्रकाशित व्हावं यासाठी प्रयत्नशिल आहेत आणि त्या लेखांचं वेब ओरियंटेशन काढून पुनर्लेखन चालू आहे. आय हॅव फाऊंड माय वे. त्यामुळे वेळ असेल तर इथे लेखन करतो. हा आयडी नसण्यानं काही फरक पडणार नाही.

पिलीयन रायडर's picture

23 Mar 2017 - 6:48 pm | पिलीयन रायडर

एक मिनिट... म्हणजे तुम्ही विवेक ठाकुर ह्या व्यक्तिचा आयडी इथे लिहायला वापरत होतात का?

तुम्ही संपादक झाल्यावरचं माहिती नाही पण सद्य मिपा प्रशासनाच्या लेखी हा बहुदा नियमभंग असावा.

दुसरं असं की, तुमचं लिखाण महत्वाचं आहे आणि त्याचे अनेक चाहते आहेत असं तुम्ही वारंवार सांगत असता. पण अर्थात तुम्हाला मात्र कशानेच काही फरक पडत नाही. मग मिपावरच लिहीण्याची धडपड का? तुम्ही स्वतःचा ब्लॉगही काढुच शकता. चाहते असतील तर कुठेही येतीलच. त्यासाठी अवेध मार्गाने लिखाण का केले? आणि स्वतः असे करुन पुन्हा ह्या लेखात माणशी एक आयडी आणि पॅनकार्ड व्हेरिफिकेशन वगैरे कल्पना कशाला मांडत आहात?

विवेक ठाकुरांनी पॅनकार्ड दिलं तरी लिहीणार संक्षी असतील तर त्याचा उपयोग काय?

एका माणसाने चार आयडी काढण्याएवढंच एक आयडी चार माणसांनी वापरणं चुकीचं आहे.

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2017 - 11:37 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे. प्रश्न `आयडी' काय आहे हा नसून, `लेखन' काय आहे हा आहे. लेखन संकेतस्थळाच्या धोरणात आहे तोपर्यंत काही इश्यू नाही. तस्मात, अवैध आयडी ही तुमची वैयक्तिक कल्पना आहे.

ह्या लेखात माणशी एक आयडी आणि पॅनकार्ड व्हेरिफिकेशन वगैरे कल्पना कशाला मांडत आहात?

स्वीकृत आयडीनं स्वतःच्या लेखनाची जवाबदारी स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे. उदा. इथे एका आयडीनं तुमच्या मदतीच्या धाग्यावर इतका जबरी टोला हाणला की त्या धाग्याचा बाजाच वाजला आणि नंतर तो दिसलाच नाही कारण त्याला काही स्पष्टीकरण देण्याची गरजच भासली नाही..... अशी बेजवाबदारी राहाणार नाही.

मग मिपावरच लिहीण्याची धडपड का?

हे तुम्हाला विचारायचा काहीच अधिकार नाही हे माहिती असून सुद्धा विचारलेला, हा त्यातल्या त्यात एक बरा प्रश्न !

जे मला व्यक्तिशः ओळखतात त्यांना माझ्याशी वाद घालण्यात इंटरेस्ट नसतो, त्यांना माझी कंपनी हवी असते. इथे पब्लिकला मी काय म्हणतोयं यापेक्षा मला पेचात कसा पकडता येईल यात इंटरेस्ट असतो ( तुमचा प्रतिसाद नेमकी मानसिकता दाखवतो, त्यामुळे आता वेगळ्या उदाहरणाची गरज नाही). मी जर ब्लॉगवर लिहीलं तर मला जनरल पब्लिक, एखाद्या विषयावर कितपत विचार करु शकतं याचा अंदाज येणार नाही.

ओशोंनी स्वतःच्या एन्लायटन्मेटनंतर, विषयाची मांडणी, पब्लिक रिस्पॉन्स आणि आर्ग्युमेंटीव स्कील्स डिवेलप करायला कॉलेजमधे अनेक वर्ष अध्यापन केलं. ही हॅड अ लाइव्ह ऑडियन्स. सध्या ते करायची गरज नाही एखादं संकेतस्थळ असलं की झालं, वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स ! अधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं, मी ती प्रोसेस ओशोंपेक्षा सोपी केलीये.

वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स

..अँड इमॅजिनरी टू

पिलीयन रायडर's picture

24 Mar 2017 - 12:57 am | पिलीयन रायडर

अशी हवा काढुन घेऊ नये रे!

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2017 - 10:14 am | संजय क्षीरसागर

जे लिहूच शकत नाहीत किंवा पुस्तकं, व्यायम असे किरकोळ धागे काढतात त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे.

व्यायम नाही हो.. "व्या या म"

आता लेखन हा एक भास आहे, निर्वैयक्तीक आहे वगैरे सांगू नका.

मी तसे बरेच कांही लिहू शकतो. सध्या चार वर्षांपूर्वी लिहिलेली कविता तुमच्या साठी देत आहे. ही वाचा आणि शक्य झाल्यास रसग्रहण करा. विडंबन केलेत तर फक्त सगळ्यांना कळेल असे करा.

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2017 - 11:26 am | संजय क्षीरसागर

ज्यांच्याकडे लिहायला काही नसतं ते स्वतःची जळजळ कशीही काढतात. एखादा टायपो काढला म्हणजे त्यांना वाटतं काय कमाल केली ! स्वतःला घंटा काही जमत नसेल तर इतरांच्या लेखनावर निर्बुद्ध आरोप केले की झालं त्यांच्या जीवनाचं सार्थक ! असो, शूद्र आणि काँप्लीकेटेड विचारसरणीमुळे जीवन ब्लॉक होतं आणि एकूण स्वभावच विचित्र होतो असा मानःशास्त्राचा निष्कर्श आहे.

हा हा.. असूद्या हो. सगळेच कुठे तुमच्यासारखे रोब घालून स्व शोधत बसणार.

बीपी वाढवून घेऊ नका संक्षी, परत मित्रांच्या आयडीची मदत घ्यावी लागेल. =))

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2017 - 4:29 pm | संजय क्षीरसागर

मी योग्य वयात अध्यात्म केलं ते एक बरं झालं.

थोडं आवांतर होईल, पण विषय निघालायं तर मागे घडलेला एक मजेशीर किस्सा लिहीतो.

मधे एकदा कम्युनला सिसेप्शनमधे निवांत बसलो होतो. तिथे वरचं छप्पर ऑलमोस्ट उडालेला, थुलथुलीत पोटाचा, एक मॅन सायकलवर धापा टाकत आला. रोबमधे तर ते बेंगरुळ ध्यान फारच मजेशीर दिसत होतं. माझ्याकडे आला आणि हलक्या आवाजात म्हणाला,
`स्वामीजी, बडी फुर्सतमे लग रहे है आप'.
`येस ! क्या चाहते हो?'
`यहां पर-डेली कॉस्ट क्या होता है?'
`कुछ ८०० रुपया एंट्री है और खानेपिनेका ५००/६०० हो जाता है. कुल मिलाके १,५०० समझलो'
`मर गये! मेरी तो सारी आमदनी लग जाएगी. तो प्रामाणिकपणे म्हणाला.
`खैर, कितना वक्त लगता है सत्यको पानेमे?'
`तुम शादी-शुदा हो?' मी नेमका प्रश्न विचारला.
`नही तो, लेकीन उससे सत्य का क्या वास्ता?'
`अभी तो तुम्हारी नज़र यहां की गोरी युवतीयोंपरही भटक रही है !'
` आप भी कमाल करते है स्वामीजी !' तो पार कावराबावरा झाला.
`तुम एक काम करो, ये सत्यका पिछा छोडो, पहेले ठीकसे शादी करलो'
`वो तो मुश्कील है स्वामीजी, आजकलकी लडकीयां दुनियाभरका एक्सपिरियंस किये बैठी है. हमसे शादी नही निभेगी . और फिर बच्चोंका झमेला आजकी तारीखमें कोई नही चाहता' त्यानं सगळं मन एकदमच मोकळं केलं.
`ओके. फिर एक काम करो'
`जी हां स्वामीजी, बताईये' तो एकदम सावरुन बसला.
`तुम्हारे पास साईकल तो है ही, इसपे दूरदूर तक ट्रेक करो'
`इससे क्या होगा स्वामीजी ?'
`हमारे मराठीमे इसे कहेते है `धर हँडल आणि मार पायंडल'
`बहुत बढीया. ये मंत्र है? त्याला ते फारच आवडलेलं दिसलं. इससे क्या लाभ होता है जिंदगीमे ?'
` वैसे भी तुम्हारी जिंदगीमें अब हो क्या सकता है ? ये `धर हँडल आणि मार पायंडल' बस इतना ही तो आनंद है '
तो एकदम खुष झाला. आणि `धर हँडल आनि मार पायंडल' म्हणत सायकलवर टांग मारुन निघून गेला.

मोदक's picture

24 Mar 2017 - 5:08 pm | मोदक

=))

वाह!! तो तुम्हाला स्वामीजी म्हणाला तर!!

सुबोध खरे's picture

24 Mar 2017 - 8:51 pm | सुबोध खरे

खालच्या पातळीचें विडंबन पटलं नाही.

सतिश गावडे's picture

25 Mar 2017 - 9:05 am | सतिश गावडे

मी योग्य वयात अध्यात्म केलं ते एक बरं झालं.

अध्यात्म करतात? कसा करतात?

मोदक's picture

25 Mar 2017 - 9:54 am | मोदक

"सायकल वरून ट्रेक" केल्यासारखे काहीतरी असेल.

लंबूटांग's picture

24 Mar 2017 - 9:26 pm | लंबूटांग

तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे. प्रश्न `आयडी' काय आहे हा नसून, `लेखन' काय आहे हा आहे.

असे तुम्ही वर लिहीले आहे

पण

एका व्यक्तीचं सर्व लेखन एका ठिकाणी वाचायला मिळेल.

वगैरे वगैरे इथे लिहीले आहे http://www.misalpav.com/comment/927515#comment-927515

नक्की काय?

बाकी जोक्स अपार्ट पण पॅनकार्डची कॉपी वगैरे व्यवस्थापनाकडे दिल्यावर त्या माहितीच्या सुरक्षेची हमी कोण देणार? पॅनकार्डचा वापर करून आयडेंटिटी थेफ्ट वगैरे झाली म्हणजे?

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2017 - 10:30 pm | संजय क्षीरसागर

त्यामुळे पॅनकार्ड होल्डर व्यतिरिक्त ती कोणी वापरु शकत नाही. शिवाय पॅनकार्ड कॉपी हल्ली हॉटेल बुकींगसाठी सुद्धा दिली जाते. त्यामुळे सदस्यानं त्या कॉपीवर सबमिटेड ओन्ली फॉर .......पर्पज, ऑन.......(डेट) असा रिमार्क मारुन कॉपी दिली की काही धोका संभवत नाही.

एका व्यक्तीचं सर्व लेखन एका ठिकाणी वाचायला मिळेल.

कारण एका व्यक्तीचा फक्त एकच आयडी असेल.

तुमच्या विवेक ठाकूर ह्या आयडीने लिहीण्याचे समर्थन करताना

तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे. प्रश्न `आयडी' काय आहे हा नसून, `लेखन' काय आहे हा आहे.

. मग लेखन काय आहे हाच प्रश्न असेल तर एका आयडीने केलेय की बर्‍याच वेगवेगळ्या आयडीने याने काय फरक पडतो?

असो.

अनन्त अवधुत's picture

25 Mar 2017 - 7:10 am | अनन्त अवधुत

पॅनकार्डचा वापर फोटो आयडेंटिटी साठी करता येतो. पण पॅन मुळात आर्थिक कारणासाठी वापरतात, कोणत्याही ठिकाणी फोटो आयडेंटिटी म्हणून नाही. पॅन हे अत्यंत खाजगी (PII) असून असा कोठेपण शेअर करणे योग्य नाही. जेव्हा तुम्ही पॅनकार्ड शेअर करता तेव्हा पॅन पण शेअर करता.
जेथे पॅन तपासणारा आणि सादर करणारा संगनमताने गुन्हा करत आहेत, तिथे असे चोरलेले पॅन वापरता येतात.
उदा. अ ह्या व्यक्तीने ब च्या पॅन कार्ड ची कॉपी करून ऑनलाईन कर्जाचा अर्ज भरला.
किंवा प या सोनाराने एका व्यक्तीच्या कार्ड वरून दुसऱ्याला सोने विकले.
काही काही ठिकाणी केवळ पॅन हवा असतो, कार्डची गरज नाही. अशा ठिकाणी पण पॅनचा गैरवापर करता येतो. असो.

त्यामुळे सदस्यानं त्या कॉपीवर सबमिटेड ओन्ली फॉर .......पर्पज, ऑन.......(डेट) असा रिमार्क मारुन कॉपी दिली की काही धोका संभवत नाही

जिथे पेपर प्रिंट जमा करणार असाल तिथे हे कामात येऊ शकते, पण डिजिटल कॉपीला असा शेरा देण्याचा काही पर्याय नाही.

आणि सदस्यांकडून जर व्यवस्थापन पॅन कार्डची कॉपी घेणार असेल तर, तो डेटा सांभाळण्यासाठी येणार खर्च पण वाढेल (प्रायव्हसी आणि सुरक्षेच्या संदर्भात). वेबसाईट पण अधिक सुरक्षित करावी लागेल. खर्च किती वाढेल हे नक्की, किती त्याचा अंदाज मला नाही.
जाता जाता: 1. https://www.quora.com/Can-a-PAN-card-number-be-misused-in-any-way
2. https://en.wikipedia.org/wiki/Personally_identifiable_information
बघा हे दोन दुवे वेळ मिळाल्यास नक्की वाचा. पाहिल्यात पॅन कसा चुकूंच्या कारणासाठी वापरता येऊ शकतो हे सांगितले आहे. दुसऱ्यात PII संदर्भात माहिती आहे.

लंबूटांग's picture

25 Mar 2017 - 7:56 am | लंबूटांग

पण मी भारतात असताना पॅन कार्ड हे अस्तित्वात नव्हते / नुकतेच सुरू झाले होते. त्यामुळे मला नक्की कशासाठी वापरतात/ दुरुपयोग करू शकतात ते माहिती नव्हते.

मला वाटायचे की ते साधारण अमेरिकेत सोशल सिक्युरीटी नंबर असतो तसेच काहीसे असावे.

एकंदरीतच सद्ध्याच्या युगात आपल्यावर इतरांच्या वैयक्तिक माहितीची जितकी कमी जबाबदारी तितके चांगले. सद्ध्या अमेरिकेत तरी बर्‍याच कंपन्या आपले बिझिनेसेस PCI3 compliant करण्याच्या मागे लागल्या आहेत ज्यात इतर माहिती तर सोडाच पण क्रेडिट कार्ड नंबरसुद्धा फोनवरून घेण्याचे टाळले जाते.

अनन्त अवधुत's picture

28 Mar 2017 - 12:20 pm | अनन्त अवधुत

SSN चा आवाका फार मोठा आहे आणि पॅन आर्थिक कारणासाठी वापरला जातो. पण अंदाज घेण्यासाठी SSN सारखाच आहे असे म्हणता येईल.

संजय क्षीरसागर's picture

25 Mar 2017 - 1:05 pm | संजय क्षीरसागर

उदा. अ ह्या व्यक्तीने ब च्या पॅन कार्ड ची कॉपी करून ऑनलाईन कर्जाचा अर्ज भरला.

कर्ज देणारा आणि घेणारा चोरलेली पॅनकार्डस वापरुन कर्जाची प्रोसेस करत असतील तर पॅनकार्ड होल्डरला त्रास होण्याची शक्यता शून्य कारण कोणत्याही लोन डॉक्युमेंटवर त्याची सही नसेल.

सोनाराने एका व्यक्तीच्या कार्ड वरून दुसऱ्याला सोने विकले

तिथे सुद्धा सोनार खरेदीदाराची सही घेतोच.

जिथे पेपर प्रिंट जमा करणार असाल तिथे हे कामात येऊ शकते, पण डिजिटल कॉपीला असा शेरा देण्याचा काही पर्याय नाही.

हे उघड आहे.

आणि सदस्यांकडून जर व्यवस्थापन पॅन कार्डची कॉपी घेणार असेल तर, तो डेटा सांभाळण्यासाठी येणार खर्च पण वाढेल

कशासाठी सांभाळायचा डेटा ? एकदा पॅनकार्ड आयडीशी लिंक केलं की डिलीट करुन टाकायचा !

पॅनकार्ड सर्रास कुठेही देऊ नये हे मान्य पण जिथे त्याचा मिसयूज होणार नाही अशी खात्री आहे तिथे काहीच प्रॉब्लम नाही.

अनन्त अवधुत's picture

28 Mar 2017 - 12:25 pm | अनन्त अवधुत

पण असो. माझ्या बाबत, जर कोणत्याही फोरमने केवळ ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड मागितले तर मी आयडी रद्द करेल.

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2017 - 12:51 pm | संजय क्षीरसागर

याला एकतर युक्तिवाद हवा किंवा मग भीती व्यर्थ आहे हे तरी मान्य करायला हवं.

जिथे आपल्याला गैरवापर न होण्याची खात्री आहे आणि आयडीशी लिंक झाल्यावर जर पॅनकार्ड डिलीट होणारे तिथे नक्की काय प्रॉब्लमे ?

आदूबाळ's picture

28 Mar 2017 - 1:56 pm | आदूबाळ

जिथे आपल्याला गैरवापर न होण्याची खात्री आहे आणि आयडीशी लिंक झाल्यावर जर पॅनकार्ड डिलीट होणारे तिथे नक्की काय प्रॉब्लमे ?

गैरवापर होणार नाही आणि पॅनकार्ड डिलीट होईल हा विश्वासाचा, श्रद्धेचा भाग आहे. अर्थात ब्लॉकचेनसारखी टेक्नॉलॉजी वापरली तर गोष्ट वेगळी...

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2017 - 2:13 pm | संजय क्षीरसागर

विषय मिपाप्रशासनाचा आहे. इतकी उघड गोष्ट आहे म्हटल्यावर मग विश्वास काय, श्रद्धा काय ! काहीही काथ्याकूट चाललायं राव !

आदूबाळ's picture

28 Mar 2017 - 2:47 pm | आदूबाळ

अहो असं नव्हे. तुमचामाझा मिपाप्रशासनावर वैयक्तिकरीत्या विश्वास आहे, त्यामुळे आपण पॅनकार्ड, पासपोर्ट म्हणाल ते देऊ. पण नव्या आयडीला सुरुवातीलाच हा विश्वास कसा प्राप्त व्हावा?

मला उद्या काका हलवाई म्हणाला की खरवस खायचा असेल तर पॅनकार्ड दे तर मी हुडुत् करीन त्याला.

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2017 - 5:08 pm | संजय क्षीरसागर

काका हलवायानं खरवसासाठी पॅनकार्ड मागणं आणि आयडीनं जवाबदारीनं लेखन करावं, अनेक आयडी घेऊन गोंधळ माजवू नये यासाठी ओनरनं पॅनकार्ड मागणं यात कमालीचा फरक आहे.

शिवाय बरेच दिवस वाचनमात्र राहून आणि नक्की अंदाज घेतल्याशिवाय सदस्यत्व मागणारे बहुतेक असंभवच.

बाय द वे, ब्लॉकचेनबद्दल सांगशील का ?

बिटकॉईनसारखी आभासी चलनं ही टेक्नॉलॉजी वापरतात. मला कळलंय त्याप्रमाणे डेटाबेसमधला एक तुकडा म्हणजे एक ब्लॉक. त्यात रेकॉर्डं असतात, आणि तो आधीच्या ब्लॉकशी जोडलेला असतो. हा डेटा एन्क्रिप्ट केलेला असतो, आणि एका विशिष्ट पासवर्ड (प्रायव्हेट की) शिवाय डीक्रिप्ट करता येत नाही. हे ब्लॉक गावभर विखुरलेले असल्याने कोणाला एकाला ते चोरणं/हॅक करणं शक्य नसतं.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग पुढे येताहेत. त्यामध्ये 'माहिती सुरक्षित ठेवणे' हा एक मुख्य आहे.

[ यात मी तज्ज्ञ वगैरे आजिबात नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्यामध्ये हे तंत्रज्ञान क्रांती घडवू शकेल असं वाटतं, म्हणून हल्ली त्याबद्दल वाचायला सुरुवात केलेली आहे. अस्वस्थामा वगैरे मिपाकर जास्त अधिकारवाणीने माहिती देऊ शकतील. ]

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2017 - 6:35 pm | संजय क्षीरसागर

काही कालावधी नंतर डेटा आपोआप अदृष्य होतो असा पण एक फंडा आहे.

एका वेळी माझे दोन्ही आयडी चालू होते.

ऑ?? हाव कम?

काय आहे, नवीन आइडी नवीन अवतार असावा. तुम्हाला शैली बदलता आली पाहिजे . कितीही आइडी घ्या पण नियमात राहून लेखनाचा आनंद दुसय्रास द्या. इकडे गॅरी आहेत तसे.
बाकी या लेखातून काही करमणूक होत नाहीये॥ त्यापेक्षा "शेजाय्रांचा बोका माझी गाडीची सीट फाडतो - काय करू?" लेख अजूनही करमणूक करवतो.

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2017 - 11:57 pm | संजय क्षीरसागर

नवीन आइडी नवीन अवतार असावा. तुम्हाला शैली बदलता आली पाहिजे . कितीही आइडी घ्या पण नियमात राहून लेखनाचा आनंद दुसय्रास द्या.

याच्याशी सहमत आहे. पण जितके आयडी तितकी बेजवाबदार वृती हे पण तितकंच खरं आहे.

बाकी या लेखातून काही करमणूक होत नाहीये

माझे धागे जरा दमानं ताव पकडतात ! आता हळूहळू सुरुवात होईल असं दिसतंय.

आदूबाळ's picture

23 Mar 2017 - 10:21 pm | आदूबाळ

Quis custodiet ipsos custodes?

हे आठवलं!

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2017 - 10:42 am | संजय क्षीरसागर

प्रत्येक डेमोक्रॅटिक व्यवस्थेत सर्वजण (इन्क्लूडींग द गार्डस) एकसमान आहेत. लेखन हा संकेतस्थळाचा प्राण आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा हक्क आहे.

स्वातंत्र्य हा सर्वात सेंसिटीव इश्यू आहे त्यामुळे स्वातंत्र्याची क्लिअरकट व्याख्या हवी. या व्याख्येचा दुहेरी फायदा आहे. एकाबाजूनं ती व्यक्तिगत स्वातंत्र्याची सीमा आहे आणि दुसर्‍या बाजूनं ती इतरांचं स्वातंत्र्य प्रोटेक्ट करण्याची व्यवस्था आहे. ही क्लिअर-कट व्याख्या काँस्टीट्यूशनसारखी आहे, तिच्यावर कुणीही नसायला हवं (इन्क्लूडींग द गार्डस).
एखादा प्रतिसाद अगर लेख उडवण्यापूर्वी किंवा आयडी ब्लॉक करण्यापूर्वी नक्की कोणत्या नियमाचा आधार घेतला आहे हे डिक्लेअर नाही केलं तरी हरकत नाही पण एखाद्या सदस्यानं तशी रीतसर मागणी केल्यास त्याला तो नियम कळायला हवा, भले त्याला त्यावर अपील नसलं तरी चालेल. ही निर्वैयक्तिक नियम प्रणाली गार्ड ऑफ गार्डस म्हणून काम करेल.

जेपी's picture

24 Mar 2017 - 7:21 pm | जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त संक्षीना "भावी संपादक" ही पदवी आणी रु. 2000 च्या 5 नोटा देऊन सत्कार करण्यात येत आहे.

-शुमेच्छुक-
जेपी आणी तमाम संपादक पदाचे इच्छुक उमेदवार.

कंजूस's picture

24 Mar 2017 - 8:21 pm | कंजूस

>>माझे धागे जरा दमानं ताव पकडतात ! आता हळूहळू सुरुवात होईल असं दिसतंय.>>

चालेल चालेल.

>>जितके आयडी तितकी बेजवाबदार वृती >>
नाही तसं नाही. अमुक आइडी -अध्यात्म,तमुक - नवीन समाज जीवन, इत्यादी. लेखन बंद करा नाही.

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2017 - 10:33 pm | संजय क्षीरसागर

अमुक आइडी -अध्यात्म,तमुक - नवीन समाज जीवन, इत्यादी. लेखन बंद करा नाही.

एका आयडीनं असं सर्व लेखन केलं तर काय फरक पडतो ? शिवाय त्यातून व्यक्तीचा व्यासंगही कळतो.

ओशो कम्युनला `स्वामीजी' ही एकमेकांना संबोधण्याची कॉमन प्रणाली आहे. ते विशेष नाम नाही.

प्रसाद गोडबोले's picture

25 Mar 2017 - 12:39 am | प्रसाद गोडबोले

मी (चुकून) संपादक झालो तर ...

फक्त " बरं" इतकाच प्रतिसाद असलेले एक प्रतिसादाचे टेम्प्लेट तयार करीन आणि त्याचे वैशिष्ठ्य असेल की त्याच्यावर उपप्रतिसाद देता येणार नाही !

नो उपप्रतिसाद= नो विषयांतर+ नो फालतु वादविवाद + नो स्कोअर सेटलिंग !

बरं

मोदक's picture

25 Mar 2017 - 1:13 am | मोदक

(रोब) रं

यशोधरा's picture

25 Mar 2017 - 8:09 am | यशोधरा

मग काय ठरलं शेवटी?

सतिश गावडे's picture

25 Mar 2017 - 8:57 am | सतिश गावडे

सहमत आहे.

वगिश's picture

25 Mar 2017 - 10:40 pm | वगिश

मी दारु पिणे सोडले तर

अप्पा जोगळेकर's picture

28 Mar 2017 - 2:33 pm | अप्पा जोगळेकर

मी (चुकून) संपादक झालो तर !
तुम्ही संपादक झालात तर अतिशय चांगले होईल या संस्थळासाठी.
म्हणजे काय होईल की संपादनाच्या व्यग्र कामातून तुम्हाला लिहायला वेळच मिळणार नाही.

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2017 - 5:18 pm | संजय क्षीरसागर

पण एकदा आयडी पॅनलिंक्ड केले की उधम करणारे आयडी आपोआप वगळले जातील आणि प्रशासनावरचा ताण कमालीचा कमी होईल लक्षात आलं का ?

आता अगदी चाळीस हजार नाही परंतू पाच हजार व्यक्ती मिपाशी संबंधित असाव्यात आणि त्यामधल्या पाचशे वर्षभरात एकदा तरी लिहित असतील. प्यानकार्डानंतर तो आकडा पन्नासवर आला तर?

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2017 - 6:30 pm | संजय क्षीरसागर

हे आकडे ३,००० आणि २५० असे आहेत.

लिहीणारे लिहीत राहातील आणि नवेनवे आयडी येतच राहातील. इट इज अ लाइफ सायकल.

कंजूस's picture

28 Mar 2017 - 7:48 pm | कंजूस

म्हणजे महिन्यात चार पाच प्रतिसाद आले तर सगळी मजाच जाईल.
कॅसिनोमध्ये काही पगारी खेळाडू ठेवतात ते गर्दी दिसण्यासाठीच.

रिलेवंट प्रतिसाद देतात असा अनुभव आहे. सो महिन्याला ४/५ प्रतिसाद वगैरे शक्यता दिसत नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Mar 2017 - 8:12 pm | हतोळकरांचा प्रसाद

हे आपलं सहजच डोळ्याखालून घालावं - कुठेही पॅन कार्ड कॉपी देताना या गोष्टी माहित असलेल्या बऱ्या, कसे?

https://www.quora.com/Can-a-PAN-card-number-be-misused-in-any-way

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2017 - 9:33 pm | संजय क्षीरसागर

१. Even though if you are not related with the original transaction, if someone is going to quote your PAN for TDS, TCS or for some thing else, it will be recorded in your Form 26AS at later.

हे डिडक्टरच करु शकतो आणि त्यानं तसं केलं तर तो टॅक्स पॅनहोल्डरला (म्हणजे तुम्हाला) क्रेडीट होईल. हे पॅनहोल्डरला फायद्याचं आहे त्यामुळे असं कुणीही करणार नाही कारण तो डिडक्टरला रिवाइज्ड रिटर्न भरुन दुरुस्त करण्याचा उपद्याप होईल.

२) If someone is able to get your xerox copy of the PAN, then also it may be misused to obtain a loan or credit card or something else in your name

याविषयी वर लिहीलं आहे.

३) Chances are also there some suspicious person may try to register on the Income tax website and try to file income tax return by using your PAN number.

इन्कमटॅक्स साईटवर पॅनला मेल आणि मोबाईल अशी दुहेरी सिक्युरिटी आहे त्यामुळे हे जवळजवळ अशक्य आहे. त्याला तुमचा सेल आणि मेल दोन्ही हॅक व्हायला हवेत.

४) In order to register on the site the person should have to know your surname and date of birth correctly. This can be easily traced by your social profile. So be careful sharing your date of birth publicly on the social media.

पुन्हा गोंधळ. लेखकाला मेल आणि सेल सिक्युरिटीची कल्पनाच नाही !

६) Recently a scam came into light where a person got a refund of four crore rupees from tax department by giving fake PAN numbers of other people.

एकदम फेकू ! लाख रुपयांवरचे सगळे रिफंडस पेपर फॉर्ममधेच ( एसबीआय चेक्स) येतात. त्यावर पॅनहोल्डरचा अकाऊंट नंबर असतो. असा रिफंड त्याच बँक अकाऊंटला क्रेडीट होऊ शकतो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Mar 2017 - 10:21 pm | हतोळकरांचा प्रसाद

अनभिज्ञ पोस्ट? वेरी गुड! आपण पॅन कार्ड कॉपीजचा मिसयुज होऊ शकत नाही हे छातीठोकपणे सांगताय? वरील कोराचा एक धागा आहे, अशा अनेक चर्चा आणि पॅन कार्डचा गैरवापर सांगणारे धागे सहज मिळतील हो ! अर्थात या चर्चेनंतरही मतं बदलली जातील अशी अपेक्षा नाहीये, पण इतरांना पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल माहिती असावी म्हणून -

१. आणि २. फायद्याचं व्यवहार आहे का तोट्याचा हा नंतरचा मुद्दा आहे, अवैध व्यवहार होऊ शकतो हा मुद्दा आहे.
३. आणि ४. रजिस्टर करण्याचा मुद्दा आहे हो. माझ्या माहितीनुसार इन्कमटॅक्स वेबसाईट ला रजिस्टर करताना पॅन नं. आणि जन्मतारीख वगैरे असेल तर कुठलाही मोबाईल नं आणि ई-मेल टाकून रजिस्टर करता येतं असा तो मुद्दा आहे.
६. फेकू? खालील बातमी वाचून घ्या (असा अनेक बातम्या गुगल केल्या तर दिसतात) -

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://m.timesofi...

१) १. आणि २. फायद्याचं व्यवहार आहे का तोट्याचा हा नंतरचा मुद्दा आहे, अवैध व्यवहार होऊ शकतो हा मुद्दा आहे.

तोट्याचा व्यावहारासाठी फ्रॉड करणारा तुमच्या पाहाण्यात आहे का ?

२) ३. आणि ४. रजिस्टर करण्याचा मुद्दा आहे हो. माझ्या माहितीनुसार इन्कमटॅक्स वेबसाईट ला रजिस्टर करताना पॅन नं. आणि जन्मतारीख वगैरे असेल तर कुठलाही मोबाईल नं आणि ई-मेल टाकून रजिस्टर करता येतं असा तो मुद्दा आहे.

एखादा पॅन रजिस्टर्ड नसेल तरच ते शक्य आहे. रजिस्टर्ड पॅनच्याबाबतीत कुणाचेही डॅडी आले तरी ते अशक्य आहे. आणि ज्या सिग्मेंटची इथे चर्चा चालू आहे ते पॅन्स अनरजिस्टर्ड असणं शक्य नाही.
३) लिंक देण्यापूर्वी बातमी तरी नीट वाचत जा :

The CBI on Sunday arrested three income tax (I-T) officials and two of their accomplices in connection with a Rs 3-crore fraudulent tax refund scam.

हे पॅन कुठेही दिल्यानं झालेलं नाही तर डायरेक्ट आयटी ऑफिशियल्सनी केलेल्या फ्रॉडमुळे झालंय. थोडक्यात, पॅनकार्ड स्विटझर्लंडच्या लॉकरमधे ठेवलं तरी हे घडू शकतं.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 3:11 pm | हतोळकरांचा प्रसाद

"काहीही मुद्दा लावून धरायचाच असं आहे का?" हेच, हेच विचारायचे होते मला! तुम्ही एक तज्ज्ञ असतानांही पॅन कार्ड सारखी गोष्ट सेन्सिटिव्ह नाहीये आणि ती पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे देऊ शकता हे सांगायचं प्रयत्न करत आहात. मी फक्त ते कसे त्रासदायक ठरू शकते हे सांगायचं प्रयत्न केला तर मी मुद्दा लावून धरतोय?

आता -
१. माझ्या पाहण्यात असला तरच खरं मानणार का?
२.अहो रजिस्ट्रेशनचा मुद्दा ऑलरेडी रजिस्टर्ड गोष्टींना लागू करताय तुम्ही. अर्थातच न रजिस्टर केलेल्या अकाउंट्स ना रजिस्टर केले जाऊ शकते हेच सांगायचा प्रयत्न चाललंय ना? रजिस्टर्ड अकाउंटला कोणाचेही डॅडी रजिस्टर करतीलच कशाला? इथे चर्चा चालू असलेले लोक इन्कमटॅक्स वेबसाईटवर रजिस्टर असतीलच हे गृहीतक कशावरून?
३. मी तर वाचलीच हो बातमी, रादर तुम्ही बातमी आणि त्यातला अर्थ समजून घेत जावा. तो घोटाळा कोणी केला पॅन कोठून मिळवले, IT वाल्यानी स्वतःच काढले शोधून कि असेच मिळाले हा दुय्यम मुद्दा आहे, असे होऊ शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा एकच घोटाळा आहे का?

याशिवाय तुमचा पॅन वापरून बेनामी व्यवहार केले जाऊ शकतात हे तर उघडच आहे, तुम्ही त्या क्षेत्रातले आहात तुम्हाला नक्कीच माहिती असेल. नुसतं गुगल करून पहा किती लोकांच्या २६AS बद्दल तक्रारी आहेत. इतका सरळ मुद्दा आहे कि तुम्हाला, मला मिपा व्यवस्थापनाबद्दल विश्वास असू शकतो, सगळ्यांनाच असेल असे नाही. त्याला जोडून मुद्दा आला की पॅन विश्वास नसलेल्या ठिकाणी देणे धोकादायक ठरू शकते. यावर तुमहाला मुद्दा लावून धरायचाच असेल तर खुशाल धरा, सांगणे एवढेच की पॅन कार्ड वगैरे अव्यवहार्यच!