आर्थिक स्वावलंबन - स्वप्नांच्या वाटेवर

इडली डोसा's picture
इडली डोसा in लेखमाला
8 Mar 2017 - 6:08 am

.

"ए राजा, ऊठ"

"झोपू दे गं आई अजून थोडं..."

"अरे, शाळेत जायला उशीर होईल."

"होऊ दे.

दररोज मी का जायचं शाळेत याची दोन चांगली कारणं दे, तरच उठतो."

"एक म्हणजे तू आता पन्नास वर्षांचा घोडा आहेस आणि दुसरं म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस." हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल आणि हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित की हो ना राव, मलाही नाही जायचं रोज उठून काम करायला.

मला माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे..... पण जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर केलीच पाहिजे. मग काय, लागतो आपण त्याच मार्गाला आणि करतो नोकरी इमानेइतबारे आयुष्यभर. कारण आयुष्यभर काम केलं, तरच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतील असा एक पगडा आपल्या मनावर असतो. माझ्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आरामदायक जीवनासाठी मला आत्ता झटून काम केलंच पाहिजे ह्या विचाराचं मनावर इतकं पक्कं गारूड असतं की नोकरी कायमस्वरूपी टिकवण्याच्या ध्यासाने आपण पछाडले जातो. मग ऑफिसमधला वेळ वाढतो, प्राणप्रिय छंदांनाही आठवड्यातून एकदा / महिन्यातून एकदा अशी टाइमलाईन येते. माझ्या आवडत्या गोष्टींना मला वेळ द्यायचा आहे, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा आहे, मनसोक्त भटकायचं आहे आणि हवं तेव्हा हवं ते करायचं आहे हे विचार 'निवृत्तीनंतर करू, तेव्हा वेळच वेळ असेल' असं म्हणत हळूहळू बाजूला पडतात.

खरं तर आपण निवृत्तीपर्यंत काम का करतो? कारण बऱ्याचदा आपण गृहीतच धरलेलं असतं की आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यभरात ज्या काही सगळ्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमानुसार ठरवून दिलेल्या निवृत्तीचा दिवस येईपर्यंत काम केलंच पाहिजे. अशा वेळी जर तुम्हाला कोणी म्हणालं की "तुम्ही तुमच्या तिशीत, चाळीशीत किंवा आपण काम करण्याचं जे सर्वमान्य वय ठरवलं आहे, त्यापेक्षा लवकरच नोकरी सोडून देऊ शकता आणि आणि जे काही इमले मनात रचले आहेत, ते पूर्ण करू शकता", तर तुम्ही अशा वक्तव्यावर काय म्हणाल? "कसं शक्य आहे हे?" "सडाफटिंग लोकांना शक्य असेल, संसारी लोकांना कसं जमेल?" , "हम्म्म... असेल, पण मला शक्य होईल असं मला वाटत नाही" असं काहीतरी, की "खरंच, काय बरं करावं लागेल यासाठी? बघू या तरी आपल्याला जमतंय का?" असं काही? चला तर मग बघूच या हा प्रकार काय आहे.

आपण नोकरी करतो ते दर महिना ठरावीक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी. मग नोकरी न करता असं ठरावीक उत्पन्न आपल्याला मिळालं, तर त्याचा अर्थ आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीवर विसंबून राहायची गरज नाही. आर्थिक बाबतीत आता आपण स्वावलंबी झालो. म्हणजेच आपण जर नोकरी ही केवळ अर्थार्जनासाठी करत असू, तर ती करण्याची काही गरज अशा वेळी राहत नाही. 'आर्थिक स्वावलंबन' हे आपलं अंतिम ध्येय नसून आपल्याला गोष्टी हव्या तेव्हा करता येणं हे आहे. अर्थातच आर्थिक स्वावलंबन हा अंतिम ध्येय गाठण्यासाठीचा रस्ता आहे. मात्र आर्थिक स्वावलंबनापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्पे आहेत. सगळ्यात आधी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्यांवर कोणकोणत्या गोष्टींना प्राध्यान्य आहे हे ठरवणं. प्राधान्य असणाऱ्या या गोष्टींपैकी पैसा किती गोष्टींसाठी लागणार आहे, किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे? याप्रमाणे नजीकच्या आणि लांबच्या काळातल्या गरजा यांसाठी किती रक्कम लागेल? अशा प्रकारे साधारण रूपरेषा ठरली की त्यानुसार पैशाची तरतूद कशी करायची ते बघता येतं.

आमच्या बाबतीत सांगायचं झालं, तर आम्ही तसं उशिराच - म्हणजे तिशी ओलांडताना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा विचार करू लागलो. मी मुलीच्या जन्माच्या वेळी भारतात गेले असताना आम्ही - म्हणजे मुख्यत्वे माझा नवरा गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी बरीच पुस्तकं वाचत होता आणि आंतरजालावरही शोध घेत होता. लग्नापूर्वी त्याने शेअर मार्केटमध्ये आणि मी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती, पण ती फारशी काही फलदायी ठरली नव्हती. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय शोधायला हवा, ही जाणीव झाल्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या आणि तुलनेने भरवशाच्या अशा गुंतवणूक पर्यायांचा शोध सुरू झाला होता.

आमच्या गुंतवणुकीची गाडी योग्य मार्गाला लावण्याचं सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं आणि जालावरच्या या विषयावरचे ब्लॉग्स वाचून त्यानेच आमच्या बचतीची आणि गुंतवणुकीची रूपरेषा ठरवली. इतकंच नाही, तर या सगळ्या किचकट गोष्टी मला सोप्या भाषेत समजावून सांगून पैशाच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत नेहमी माझं मतही घेतलं. यातूनच आम्हाला ओळख झाली ती आर्थिक स्वावलंबनाची आणि मग सुरू झाला प्रवास एका ध्येयाकडे. आपण नोकरी का करतोय असा प्रश्न स्वतःला विचारला, तेव्हा खरं तर 'एवढं शिकलो ते यासाठीच ना? नाहीतर मग कशाला केली असती एवढी धडपड?' हा पहिला विचार होता. पण योगायोग असा की दोघंही ज्या विषयाचे पदवीधर आहोत, त्या विषयाशी संबंधित अगदी कमी काम करतो. निदान माझा नवरा त्याच्या पदव्युत्तर क्षेत्रात काम करतो. माझ्या कामाचा आणि माझ्या पदवीच्या विषयाचा आता काही संबंध उरलेला नाही. अनेकांचं होत असेल असं आणि ते ठरवून असेल तर उत्तमच आहे. पण माझ्या बाबतीत तरी अर्थार्जन या एकाच हेतूने मी नोकरीची कास धरलेली आहे आणि मला नोकरी न करण्याचा पर्याय मिळाला तर काय करता येईल, अशा चार-पाच गोष्टी तरी मनात नक्कीच आहेत. नवऱ्याला त्याचं काम आवडतं, पण अमेरिकेत आल्यापासून त्याने काही छंद जोपासले आहेत, ज्यासाठी जास्त वेळ द्यायला त्याला नक्कीच आवडेल. शिवाय आमची मुलगी हे मुख्य कारण आहेच. आम्हाला तिला भरपूर वेळ द्यायचा आहे, तिच्यासोबत भरपूर भटकायचं आहे आणि तिला अनुभवसमृद्ध करून त्यातून तिचं जीवन फुलवायचं आहे.... असा सगळा विचार करता करता लक्षात आलं की हे सगळं करायचं, तर आधी आर्थिक स्वावलंबन हवं.

सुरुवात केली ती आमचा महिन्याचा खर्च लिहून काढण्यापासून. किती खर्च होतो आणि किती बचत होते, याचा साधारण अंदाज घेतला. बचत वाढवण्यासाठी खर्चात कुठे कुठे कपात करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. शिवाय कंपनीकडून उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयींचा पुरेपूर फायदा घेतला. सगळ्या टॅक्सपूर्व खात्यांची मर्यादा कमाल केली. आमच्या सुदैवाने अमेरिकेत आम्ही ज्या गावात राहत होतो, ते साधारण पन्नास हजार लोकवस्तीचं गाव होतं, त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्याचा खर्च आणि रोजचा कामासाठी प्रवास वगैरे गोष्टींसाठी लागणारा खर्च मोठ्या शहरात राहण्याच्या मानाने कमी होता. इथे आमच्या मित्रपरिवारातली बरीच कुटुंबं आमच्या दोघांसारखीच एकाच कंपनीत काम करणारी होती. एकाच कंपनीत असलो, तरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिस लोकेशन्समध्ये कामाला होतो. गाव छोटं असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अगदी नगण्य म्हणण्याइतपत होती. तासाला एक बस अशी बसची वारंवारता होती. आमच्यासारख्याच परिस्थितीत असणाऱ्या इतर बऱ्याच कुटुंबांमध्ये नवरा-बायको दोघांकडे वेगवेगळ्या गाड्या होत्या. आम्ही मात्र दोघांत एकच गाडी वापरायचा निर्णय घेतला. गाव छोटं असल्यामुळे एक जण दुसऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून सहज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत जाऊ शकत होता. क्वचित प्रसंगी थोडी कसरत करावी लागली, तरी जोपर्यंत आम्ही तिथे राहत होतो, तोपर्यंत ही व्यवस्था आमच्यासाठी कामी आली. शिवाय तिथे नोकरी सुरू झाली की लगेच घर घेण्याचा सर्वसाधारण कल होता. दोघांना नोकरी आहे, घराची किंमत आवाक्यात, गृहकर्ज कमी व्याजदरात उपलब्ध आहेत, शिवाय घरभाडं देत छोट्या अपार्टमेंटमध्ये राहण्यापेक्षा महिन्याला तेवढाच हप्ता भरून स्वतःच्या मोठ्या घरात राहता येत असेल तर घर का घेऊ नये? असा सर्वसाधारण समज होता. यामुळे आम्हाला घर न घेण्यावरून बरीच विचारणा होता असे. पण घर घेणं म्हणजे एक मोठी आर्थिक जबाबदारी घेण्यासारखे होतं. थोडी शोधाशोध केल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचा एक धागा सापडला, ज्यात त्यांनी घर भाड्याने घ्यावं की विकत याचा निर्णय घेण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला होता. एका तक्त्यात घर विकत घेणं आणि भाड्याने घेणं या संदर्भातले वेगवेगळे आकडे (उदा., वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, विकत घेऊ पाहणाऱ्या घराचा प्रकार, घरभाडे, राहण्याचं ठिकाण इ.) टाकले, की त्या गावात घर विकत घ्यायचं असेल तर ती गुंतवणूक फलदायी ठरण्यासाठी साधारण किती वर्षं त्या घरात राहणं आवश्यक आहे, याचे आकडे मिळत होते. त्यानुसार आम्ही घर घेतलं, तर आम्हाला त्या ठिकाणी साधारण पाच-सहा वर्षं तरी राहणं गरजेचं होतं. अमेरिकेत मिडवेस्ट भागातल्या या ठिकाणी आम्ही तेवढा काळ राहू याची आम्हाला खातरी नव्हती, शिवाय कामाच्या ठिकाणी दर दोन-तीन वर्षांतून होणारी मनुष्यबळ कपात यासारख्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घर विकत न घेण्याचाच निर्णय घेतला. या झाल्या मोठ्या गोष्टी. आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बचत कशी होईल ते पाहतो. मोबाइल फोनचं बिल आम्हा दोघांचं मिळून साधारण महिन्याला शंभर डॉलर येत असे. थोडी शोधाशोध करून प्लॅन आणि सुविधा देणारी कंपनी बदलून ते चाळीसवर आणलं. यात एक विशिष्ट प्रकारचा फोनच वापरायचा आणि किती डेटा वापरायचा यावर मर्यादा होत्या, पण आमच्या आवश्यक गरजा यातून पूर्ण होत होत्या, त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला मुकतोय असं कधीच वाटलं नाही. शिवाय शक्य होईल तेवढं घरून डबा घेऊन जाणं आणि कँटीनमध्ये विकत घेऊन खाणं टाळलं. याचा दुहेरी फायदा होतो - पैसे तर वाचतातच, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जास्त आरोग्यदायक गोष्टीही खाल्ल्या जातात. अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून खर्चावर मर्यादा आणता येते. प्रत्येक गोष्ट करताना 'हे आपल्या ध्येयाला धरून आहे ना?' असा प्रश्न करत असतो. त्यामुळे वायफळ खर्चाला आपोआप चाप बसतो.

याचा अर्थ असा नाही की आम्ही काही सगळी मजा बंद करून फक्त पै न पै साठवत बसलो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, कोणत्या गोष्टीला प्रधान्य द्यायचं त्याची एक साधारण यादी सुरुवातीलाच तयार केली होती. त्यात सहकुटुंब वर्षातून एकदा एक मोठी सहल आणि वीकान्ताला जवळपास भटकंती, कँम्पिंग आणि नवऱ्याच्या रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंग या छंदासाठी वाजवी खर्च करण्याची आमची तयारी होती. या सगळ्या गोष्टींसाठी साहित्य घेताना आम्ही नेहमी उत्तम दर्जाचंच घेतो. पण जिथे पैसे वाचवणं शक्य आहे, तिथे या गोष्टी करतानाही वाचवतो. उदा., चांगलं साहित्य घेतानाही कुठे आणि कधी डिस्काउंट मिळतं ते बघून तेव्हा ते घेतो. सहली ठरवताना बऱ्याच आधी ठरवतो, त्यामुळे विमान तिकिटावर जास्तीचा खर्च वाचतो. शिवाय हॉटेल्स बुक करताना 'एअर बी अँड बी'सारख्या साइटवरून शोध घेऊन जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल ते बघतो. बाहेरच्या देशात गेलो, तरी लोकल ट्रान्स्पोर्टने फिरणं, स्वयंपाक करण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी राहणं अशा गोष्टी केल्याने कमी खर्चात नवनवीन देश आणि जागा पाहण्याची संधीदेखील मिळत आहे. वर्षातून एकदा आम्ही सगळ्या गुंतवणुकीचा आणि खर्चाचा आढावा घेतो. प्रत्येक गोष्ट करतानाच आपल्या अंतिम ध्येयाला अनुसरूनच ही गोष्ट आहे ना, याचा काटेकोरपणे विचार करतो.

वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथले अनुभव घेण्यावर कुटुंब म्हणून आमचा कल आहे. शिवाय आउटडोअर गोष्टी करण्याकडे जास्त ओढा असल्यामुळे अशा संधी त्या मानाने कमी उपलब्ध असणाऱ्या मिडवेस्टमधून बाहेर पडण्याचा आमचा विचार चालू होता. आमचं आर्थिक गणित कोलमडू न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून अखेर आम्ही सहा महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो. त्या वेळी आढावा घेताना लक्षात आलं की आपण आर्थिक स्वावलंबनाच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. इथेसुद्धा एक गाडी, ऑफिसच्या जवळच भाड्याने घर या गोष्टी तशाच चालू ठेवल्या आहेत. कॅनडामध्ये गुंतवणुकीचे काय चांगले पर्याय आहेत याचा शोध चालू आहे. इथे काही वर्षं राहिल्यानंतर कदाचित आणखी काही गोष्टी कळतील किंवा नव्या संधी समोर येतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल कदाचित बदलतही जाईल. आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. आम्ही चाळीशी गाठेपर्यंत, म्हणजे आणखी पाच-सहा वर्षांत हे होईल अशी अपेक्षा आहे.

एक मजेचा भाग म्हणून आपल्याला आर्थिक स्वावलंबन मिळवायला किती वेळ लागेल हे इथे चटकन बघता येईल. हे गणित कदाचित फक्त अमेरिकेत लागू असेल, भारतात यातल्या गणितात थोडा फार बदल होईल, पण मूळ संकल्पना तशीच राहील.

शेवटी हा लेख म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे. एखाद्याला यातली संकल्पना आवडलीच, तर त्यांनी स्वत: अभ्यास करून यातल्या खाचाखोचा जाणून घ्यायला हव्यात. अमुक अमुक एक गोष्ट करा आणि तुम्ही खातरीशीररित्या आर्थिक दृष्टीने लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल असं मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेगवेगळ्या. पैसा साठवणं हे अंतिम ध्येय नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वतंत्र्य मिळवणं हे आहे. आम्ही निवडलेला मार्ग हा आम्हाला योग्य वाटलेला मार्ग आहे. प्रत्येकाला तोच पटेल असं नाही. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे.

मला जरी या विषयातलं खूप जास्त ज्ञान नसलं, तरी आम्ही (म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यत्वे माझ्या नवऱ्याने) खालील पुस्तकं आणि ब्लॉग्ज फोरम्स वाचले / अजूनही वाचत आहोत :

आर्थिक स्वावलंबन, मुदतपूर्व निवृत्ती आणि गुंतवणूक यासाठी वाचलेल्या पुस्तकांची यादी.

- इंटेलिजंट इन्व्हेस्टर - बेंजामिन ग्रॅहम
- बॉगलहेड्स,गाईड टु इन्व्हेस्टींग
- कॉमन स्टॉक्स फॉर अनकॉमन प्रॉफिट्स
- अर्ली रिटायरमेंट एक्स्ट्रीम
- सिंपल पाथ टू वेल्थ
- द वेल्दी बार्बर
- द वेल्दी रेंटर
- हाऊ टू रिटायर हॅपी, वाईल्ड अँड फ्री

यू एस ब्लॉग्स / फोरम्स
१.एमएमएम
२. बॉगलहेड्स फोरम
३. मॅडफिएन्टिस्ट

भारतातल्या गुंतवणुकीसाठी आम्ही खालील संस्थळांचा वापर केला :
१. जागो इन्व्हेस्टर
२. सुब्रमनी
३. फ्री फिन कॅल

कॅनडा ब्लॉग्स / फोरम्स
१. फायनान्शिअल विस्डम
२. केनेडिअन काउच पोटेटो

तुम्हीसुद्धा असं काही करत असाल किंवा करायची इच्छा असेल, तर तुमचे अनुभव इथे शेअर करा. या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचंही स्वागत आहे.

धन्यवाद!

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

जागु's picture

17 Mar 2017 - 12:17 pm | जागु

छान आणि उपयुक्त लेख.

संजय क्षीरसागर's picture

17 Mar 2017 - 12:57 pm | संजय क्षीरसागर

मला काही छंद नाहीत, हे तुम्हाला कसं कळलं?

छंद विचारल्यावर तुम्ही उत्तर काय दिलंय ते पाहा.

तुमची गृहितके चुकीची आहेत, त्यामुळे निष्कर्श पण चुकीचाच आहे.

जमल्यास पुन्हा माझ्या पहिल्या प्रतिसादाला प्रामाणिक उत्तर द्या (दात घासतो! काय संबध? वगैरे फालतू उत्तरं नाहीत)

सुख सर्वांना सारखंच असतं, हे तुमचे गृहितक आहे की निष्कर्श?

अर्थात निष्कर्श ! प्रत्येकाच्या जाणीवेची प्रगल्भता वेगवेगळी असली तरी सर्वांची जाणीव एकच आहे. तस्मात, निर्वेध चित्तदशेचा आनंद (जो आर्थिक स्वातंत्र्याच्या या लेखातून मांडण्याचा प्रयत्न लेखिका करते आहे) तो सर्वांसाठी एकच आहे. आनंद हाच प्रत्येकाच्या जीवनाचा ध्यास आहे नाही तर तुमचे वार्षिक $ ७५,००० काय कामाचे ?

सिलेक्टिव्ह रीडिंग कसे करावे, हे पण तुमच्याकडून शिकतोय

आधी साध्या रीडिंगचं बघितलं तरी खूप होईल .

ते माझे मत आहे. का आणि कसे आहे, ते तुम्हाला सांगायला मी बांधील नाही. हे आधीच सांगितले आहे. तरीही पुन्हा स्पष्ट करतो, की उत्तरे गंभीरपणेच दिली आहेत. माझ्या दिनक्रमात सकाळी पहिली गोष्ट म्हणजे मी दात घासतो, हे बरोबर आहे.
आता तुमचं लॉजिक बरोबर कसं आहे, ते सिद्ध करा. मला काही छंद नाहीत, हे तुम्हाला कसं कळलं? अन्यथा पर्सनल अ‍ॅटॅक केला आणि निष्कर्श पण चुकीचाच आहे, म्हणून बिनशर्त माफी मागा.

आधी साध्या रीडिंगचं बघितलं तरी खूप होईल .
धागा आर्थिक स्वातंत्र्याचा आहे, उगीच तत्वज्ञ्यानाकडे नेऊ नका, आर्थिक स्वातंत्र्याबद्दल बोला.
आपल्या आवडत्या विषयाकडे धागा वळवण्याचा प्रयत्न लक्षात आला आहे. अजून एक गोष्ट शिकलो तुमच्याकडून. त्याबद्दल धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

17 Mar 2017 - 1:38 pm | संजय क्षीरसागर

ते माझे मत आहे. का आणि कसे आहे, ते तुम्हाला सांगायला मी बांधील नाही.... आता तुमचं लॉजिक बरोबर कसं आहे, ते सिद्ध करा. मला काही छंद नाहीत, हे तुम्हाला कसं कळलं?

स्वछंदी व्यक्तीचा दिनक्रम हा त्याच्या सर्वांगिण स्वातंत्र्याचा (त्यात आर्थिक स्वातंत्र्यही आलंच ) निदर्शक आहे. ज्याला छंदच नाही त्याचा दिनक्रम काय असणारे ? ही लिव्ज जस्ट द सेम डे अगेन अँड अगेन. तुम्हाला स्वतःचा छंद सांगणं ही बांधिलकी वाटते ? म्हणजे एकतर छंदाची चर्चा करणं आणि नवं काही शिकणं हा आनंद आहे याची तुम्हाला कल्पनाच नाही किंवा तुम्हाला काहीही छंद नाही.

धागा आर्थिक स्वातंत्र्याचा आहे, उगीच तत्वज्ञ्यानाकडे नेऊ नका, आर्थिक स्वातंत्र्याबद्दल बोला.

सॉलीड विनोद ! सर्वांगिण स्वातंत्र्यात आर्थिक स्वातंत्र्यही आलंच. नाही तर तुमच्या वार्षिक $ ७५,००० चा काय उपयोग ? पण तुम्ही अजून त्यातूनच बाहेर पडतांना दिसत नाही. मी विचारतोयं, समजा ती रक्कम तुमच्याकडे आहे (ज्याला तुम्ही सुखाचा सदरा समजतायं) पण मग तुम्ही दिवस भरात काय नाविन्यपूर्ण करतायं ? आणि कुठले छंद पुरवतायं ?

ही लिव्ज जस्ट द सेम डे अगेन अँड अगेन.

बरोबर आहे, मी रोजच दात घासतो. पण आता तुम्हाला सांगून काय फायदा म्हणा.
तुम्ही आयुष्यात रोज असे काय वेगवेगळे दिवे लावता हे सांगाल का सगळ्यांना? की आधी तुमचे छंद सांगा ना, म्हणून भोकाड पसरणार?

सर्वांगिण स्वातंत्र्यात आर्थिक स्वातंत्र्यही आलंच.

सर्वांगिण स्वातंत्र्याबद्दल बोलतंय कोण? तुमचे विनोद आणि लॉजिक फारच पुचाट आहेत बुवा.

मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, हे म्हणालो म्हणून तुम्हाला इतकी जळजळ का होतेय? ओके, शक्य आहे, असे म्हणा ना किमान.

संजय क्षीरसागर's picture

19 Mar 2017 - 5:22 pm | संजय क्षीरसागर

मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, हे म्हणालो म्हणून तुम्हाला इतकी जळजळ का होतेय?

हे कुठून काढलं ? तुम्हाला रोजचे आठ तास अर्थार्जनासाठी घालवायला लागतात. इट इज अ रुटीन. मग कसलं आलंय आर्थिक स्वातंत्र्य ? या उलट मी मन मानेल तेव्हा काम करतो आणि मनात नसेल तर कित्येक दिवस काम करत नाही. काम हा माझा छंद आहे आणि तुमच्यासाठी ती रोजची उस्तवार आहे.

सर्वांगिण स्वातंत्र्याबद्दल बोलतंय कोण?

जो सर्वांगिण स्वातंत्र्य देत नाही अशा पैश्याचा काय उपयोग ? तुम्ही अजून तिथपर्यंत पोहोचलेलेच दिसत नाही त्यामुळे तुम्हाला ते कळेल असं वाटत नाही.

तुम्ही आयुष्यात रोज असे काय वेगवेगळे दिवे लावता हे सांगाल का सगळ्यांना? की आधी तुमचे छंद सांगा ना, म्हणून भोकाड पसरणार?

मी तर केंव्हापासून तयार आहे. तुम्ही रोजचे आठ तास (ट्रॅवल टाईम असेल तर त्याही पेक्षा जास्त), आणि तोही दिवसाचा `प्राइम टाइम' आजही अर्थार्जनात घालवतायं, मग कसले आलेत छंद आणि कसला आलायं व्यासंग ? म्हणून तर तुम्हाला दिनक्रमाविषयी काहीही सांगता येत नाही !

माझा प्रत्येक दिवस वेगळा रंग घेऊन येतो. पण तुम्ही पहिल्यांदा कबूल तर करा की अजूनही तुम्ही फक्त अर्थाजनाशिवाय विशेष काहीही करत नाही.

अर्थात तुम्ही खाली दिलेल्या प्रतिसादात, मी त्यांचा सहज प्रतिवाद करीन अशी भीती दिसत असली तरी मला तसं करायची काही गरज नाही कारण तुमचा निष्कर्श तुम्ही लिहीला आहेच :

जर तुमचे टंपरामेंट (मराठी?) व्यवस्थित असेल आणि तुम्ही नियमित बचत केली आणि नशीबाने साथ दिली तर आर्थिक स्वावलंबन सहज शक्य आहे.

थोडक्यात तुमचा भर बचत, नशीब, टेंपरामेंट असल्या गोष्टींवर आहे आणि सर्वांच इप्सित `सो कॉल्ड आर्थिक स्वातंत्र्य' मिळवणं आहे. इतक्या कुचकामी लॉजिकवर जगणारे काहीही साहस करु शकणार नाहीत. कारण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे इतके पैसे अशी गोष्टच या जगात नाही.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता, या क्षणी आणि कधीही पैसा मला नमवू शकत नाही. पैसा माझ्या जीवनाची दिशा ठरवू शकत नाही. मी प्राथमिक आहे आणि पैसा दुय्यम आहे हे आकलन. अर्थात इतकी वैचारिक उंची गाठायला कितपत जमेल हे ज्याचं त्यानं ठरवावं.

उदय's picture

20 Mar 2017 - 3:37 am | उदय

काम हा माझा छंद आहे

द्या टाळी. मी हे आधीच लिहिलं होतं हा, २०१० साली, म्हणजे तुमचा तो भरल्यापोटी लिहिलेला लेख २०१२ साली येण्याआधीच. आतातरी मान्य करा ना गडे की मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, ही शक्यता आहे.

माझा प्रत्येक दिवस वेगळा रंग घेऊन येतो.

वेगळा रंग म्हणजे काय? हे तर तुम्ही सांगितलेच नाही. तुम्ही जीवन जगताय आणि बाकीचे आयुष्य काढताहेत/ ढकलताहेत हा तुमचा गोड गैरसमज दूर करा. माझ्या मते बहुतेक मिपाकर (मी पण आलो त्यात) मजेत असतात, आनंदात राहतात, आयुष्यात समाधानी आहेत. तुमच्यात आणि माझ्यात फरक काय? अरेरे. म्हणजे तुमचा "मी"पणा तर गळून पडला की. तुमच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात असा काय फरक आहे? माझ्या दृष्टीने तर काहीच नाही.

जो सर्वांगिण स्वातंत्र्य देत नाही अशा पैश्याचा काय उपयोग ?
तुमच्या गंडलेल्या लॉजिकचा हा एक नमुना. मी कुठे म्हणतोय की पैसा सर्वांगिण स्वातंत्र्य देतो?खिशात पैसा असला की आत्मविश्वास येतो, उद्या मला पोट भरायची भ्रांत नाही ही धमक येते. पैसा असला की रिस्क घेण्याची क्षमता वाढते आणि मग आपण आवडेल ती गोष्ट करू शकतो.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे इतके पैसे अशी गोष्टच या जगात नाही.
तुमच्यासारख्या सी.ए. माणसाने असे विधान करावे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एक उदा. घेऊ. समजा ईडली डोसा यांना भारतात त्यांच्या दॄष्टीने मजेत जगायला महिना १ लाख रुपये लागतात, म्हणजे वर्षाला १२ लाख. त्यांच्या अपेक्षेने इंव्हेस्टमेंट रिटर्न्स ८% आहेत आणि त्यांना मूळ मुद्दल पुढच्या पिढीला द्यायचे आहे (म्हणजे संपवायचे नाही). मग त्यांच्या दॄष्टीने १.५ कोटी ही झाली ना आर्थिक स्वातंत्र्याची संख्या. प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार हा आकडा बदलेल कदाचित, पण "आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे इतके पैसे" हे कुणालाही सहज काढता येईल ना.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता, या क्षणी आणि कधीही पैसा मला नमवू शकत नाही. पैसा माझ्या जीवनाची दिशा ठरवू शकत नाही. मी प्राथमिक आहे आणि पैसा दुय्यम आहे हे आकलन.
हे तर सर्वात विनोदी वाक्य. तुम्ही प्रोफाइलप्रमाणे केवळ विनोदी वाचतच नाही, तर लिहिता पण. याच्यावर नंतर बोलू, कदाचित तुमच्या त्या गंडलेल्या धाग्यावर.

विनोदी लेखन कसे करावे, याचा नमुना आज तुमच्याकडून शिकलो, याबद्दल तुमचे आभार.

तुमचा प्रतिसाद : द्या टाळी. मी हे आधीच लिहिलं होतं हा, २०१० साली.....

आणि आज सात वर्ष झाली तरी तुम्ही नित्यनेमानं आठ तास अर्थाजनासाठीच घालवतायं ! म्हणजे अजूनही तुम्हाला तुमचं अपेक्षित `सो कॉल्ड आर्थिक स्वातंत्र्य' मिळालेलं नाही.

तुमचा प्रतिसाद : तुमच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात असा काय फरक आहे?

अजूनही तुमचा दिनक्रम तोच आहे आणि दिवसाचे आठ तास भरल्याशिवाय तुम्हाला काहीही स्वातंत्र्य नाही. इतर कुणी आनंदात जगतं की नाही हा प्रश्न नाही, तुम्ही रुटीन जगतायं त्यामुळे तुमची (नोबेलप्राप्त) विचारसरणी गंडलीये हे तुमचा प्रतिसादच सांगतो.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता, या क्षणी आणि कधीही पैसा मला नमवू शकत नाही. पैसा माझ्या जीवनाची दिशा ठरवू शकत नाही. मी प्राथमिक आहे आणि पैसा दुय्यम आहे हे आकलन.

तुमचा प्रतिसाद : हे तर सर्वात विनोदी वाक्य. तुम्ही प्रोफाइलप्रमाणे केवळ विनोदी वाचतच नाही, तर लिहिता पण. याच्यावर नंतर बोलू, कदाचित तुमच्या त्या गंडलेल्या धाग्यावर.

मी सुरुवातीलाच म्हटलंय अर्थात इतकी वैचारिक उंची गाठायला कितपत जमेल हे ज्याचं त्यानं ठरवावं.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे इतके पैसे अशी गोष्टच या जगात नाही.

तुमचा प्रतिसाद : समजा ईडली डोसा यांना भारतात त्यांच्या दॄष्टीने मजेत जगायला महिना १ लाख रुपये लागतात, म्हणजे वर्षाला १२ लाख. त्यांच्या अपेक्षेने इंव्हेस्टमेंट रिटर्न्स ८% आहेत आणि त्यांना मूळ मुद्दल पुढच्या पिढीला द्यायचे आहे (म्हणजे संपवायचे नाही). मग त्यांच्या दॄष्टीने १.५ कोटी ही झाली ना आर्थिक स्वातंत्र्याची संख्या.

तेच तर म्हणतोयं ! तुमचा सगळा खयाली पुलाव भांडवल गोळा होण्यावर अवलंबून आहे. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे तुमचं भांडवल जमा होऊनही (ज्याला तुम्ही सदरा का काय ते समजतायं) भीती कायम आहे. तुम्हाला स्वतःच्या मर्जीनं जगता येत नाही.

तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! त्यानं माझ्या पैसा या मूळ लेखात मांडलेला विचार सिद्ध झाला. आणि या लेखावरही तुमची एकूण धमक आणि आकलन :

खिशात पैसा असला की आत्मविश्वास येतो, उद्या मला पोट भरायची भ्रांत नाही ही धमक येते. पैसा असला की रिस्क घेण्याची क्षमता वाढते आणि मग आपण आवडेल ती गोष्ट करू शकतो.

इतकंच आहे हे पण क्लिअर झालं.

दादा, पैसा उपयोगी वस्तू आहे पण अंगात धमक यायला जर एखादा पैश्यावरच अवलंबून असेल तर त्याची नज़र अजून पैश्यावरच आहे. पैसे असोत की नसोत, मी माझ्या मर्जीनं जगीन हे खरं साहस आहे आणि भांडवलावर अवलंबून व्यक्तीचा जन्म ते भांडवल जपण्यातच जातो. तो पैसा मनसोक्त खर्च करण्याचं साहस करु शकत नाही. त्याचा श्वास कायम पैश्यातच अडकलेला असतो.

तुमचा डॅनियल फक्त पैसे गोळा करायला शिकवतोयं आणि स्वातंत्र्य ही फक्त अमूक इतकं भांडवल असणार्‍यांची मक्तेदारी समजतोयं. ही इज कवरींग अ वेरी स्मॉल सेट अँड दॅट टू इज नॉट वर्कींग अ‍ॅज यू हॅव प्रूव्हड इट !आणि माझं म्हणणं आहे की पैसा ही दुय्यम गोष्ट आहे, आपण प्रथम आहोत. माझं स्वातंत्र्य हे पैश्यावर अवलंबून नाही, ते पैश्यापुढे लाचार न होणार्‍या प्रत्येकाला ते उपलब्ध आहे.

'आर्थिक स्वातंत्र्य' असलेली व्यक्ती काहीच कामधंदा करत नाही का? तुम्ही पण क्लाएंटबरोबर काम करताच ना? मुद्दा हा आहे की 'आर्थिक स्वातंत्र्य' आले की आपण स्वतःला आवडेल ते काम करू शकतो, स्वतःच्या टर्म्सनुसार. म्हणजे मी फक्त पार्टटाइम नोकरी करू शकतो, तुम्ही अधिकचे क्लाएंट नाकारू शकता, डॉ. सुबोध खरे त्यांना वाटले तर दुपारी दवाखाना बंद करून वामकुक्षी घेऊ शकतात, डॉ. म्हात्रे फक्त जगप्रवासच करायचा असे ठरवू शकतात, किती पीक मिळेल याची चिंता न करता मुविकाका त्यांना आवडेल तशी शेती करू शकतात वगैरे.

यापेक्षा सोप्या शब्दात कसं सांगू तुम्हाला, ते मला कळत नाहीये की समजून पण तुम्ही तुमचेच घोडे पुढे दामटताय?

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता, या क्षणी आणि कधीही पैसा मला नमवू शकत नाही.
एक काम करा. घरापासून दूर कुठेही जा एकदा, समजा हिमालयात गेलात तर तिथे पोचलात की तुमचे पैशाचे पाकिट, कपडे फेकून द्या. मग त्या थंडीत कुडकुडत, उपाशी पोटी म्हणा "या क्षणी आणि कधीही पैसा मला नमवू शकत नाही." असं १ महिना करा. जर जगला-वाचलात तर इथे येऊन तुमचे अनुभव सांगा.

संजय क्षीरसागर's picture

20 Mar 2017 - 9:21 pm | संजय क्षीरसागर

ते तुमच्या आवाक्यापलिकडे दिसतंय. इतर सदस्य काय करतात त्यांचं ते बघतील.

गेली १० वर्ष तुम्ही तुमच्या सो कॉल्ड डॅनियल थिअरीनं जगतायं तरी आजही आठ तास नोकरी चालू आहे याचा अर्थ तुम्ही मन मानेल तसं अजूनही जगू शकत नाही. तस्मात, त्या थिअरीला मनसोक्त जगण्याच्या अँगलनं शून्य किंमत आहे.

अगदी हेच मी माझ्या पैसा या लेखात म्हटलंय आणि तुम्ही ते इथे प्रूव करुन दाखवलंय.

दॅटस ऑल !

म्हणजे इतपत लॉजिक तरी कळायला हरकत नाही की प्लानिंगच्या नादात तुमची उमेदीची दहा वर्ष भविष्याकडे बघत जगण्यात घालवलीयेत. जी काय मजा केली असेल ती मिळालेल्या लिमीटेड सुट्टीत, नोकरीचं व्यावधान उरावर घेऊन केलीये. आणि आजही तुमचा रोजचा दिवस रुटीनच आहे.

आणि ही सेम दहा वर्ष (खरं तर सतरा वर्ष, पण ते जाऊं द्या) मी फुल मनसोक्त आणि बिनधास्त जगलोयं. मला भविष्याची कधीही चिंता नव्हती आणि नसणारे.

मी समयमुक्त जगतो आणि अनेक छंद जोपासलेत. माझा प्रत्येक दिवस वेगळा असतो. माझ्या दिवसाची सुरुवात मला जाग आल्यावर होते आणि मला जाग आल्याशिवाय उठवू शकेल असं कोणतंही व्यावधान मला नसतं. `आय गेट अप वेन आय वाँट' इथून माझ्या दिवसाची सुरुवात होते. इतक्या निर्भ्रांत चित्तदशेमुळेच की काय मला सकाळी लवकर जाग येते.

तदनंतर मी योगा आणि प्राणायाम करुन खेळायला जातो (तुम्ही दात घासून नोकरीला जाता !). साधारण दीड तास खेळल्यावर आम्ही चहा आणि गप्पांची मैफिल रंगवतो. घरी आल्यावर बहुतेकदा मी पत्नीला कुठे शॉर्ट ट्रीपला जायचं का? अशी ऑफर देतो. कधी काही काम असेल आणि तेही आर्जंट असेल तर जेवणापूर्वीच ते संपवतो. जेवल्यानंतर पिक्चर, लेखन, संगीत वगैरे सारखा मजेचा कार्यक्रम नसेल तर मी यथेच्छ झोपतो. मला दुपारच्या झोपेतूनही कुणी उठवत नाही. घरचे लोक क्लायंटला `ते झोपले आहेत' असंच सांगतात. निवांतपणे चहा आणि चॉईस ऑफ वेरीयस बिस्कीटस झाल्यावर, पुन्हा काही कामाचे आर्जंट फोन्स असतील तर त्यांचा निपटारा करतो. तदनंतर माझी संध्याकाळ नातेवाईक, मित्रमंडळी, यांच्याकडे जायला किंवा फारच मूड असेल तर दारुकामाला मोकळी होते.

त्यात आठवड्यातले दोन दिवस माझ्या एका स्नेह्यांकडे तीन तासांची संगीत मैफिल असते. गाणं- बजावण्याचा तो एक मस्त सोहळा असतो.

याशिवाय मी उत्तम पोहोतो त्यामुळे दुपारी मी जवळच्या कुठल्याही पूलला दीड-दोन तास पोहायला जाऊ शकतो. पुन्हा मी सिंथेसायझर बेस्ट वाजवतो त्यामुळे तो एक दिलखुलास आयटम असतोच.

याव्यतिरिक्त कधीही आणि केंव्हाही पत्नीनं फक्त प्रपोजल द्यायचा अवकाश की आम्ही दोन/तीन दिवस ट्रीपला जातो.... आता यापुढे माझी स्वच्छंद काम करण्याची पद्धत, मी केलेला पराकोटीचा अध्यात्मिक शौक, माझ्या लेखनाचे आणि साहित्यिक , शायरी, कविता, सिनेमे, नाटकं वगैरेच्या व्यासंगाचे आयाम वाचून तुम्हाला चक्कर येईल म्हणून जास्त डिटेल्स देत नाही.

उदय's picture

21 Mar 2017 - 4:22 am | उदय

@संजय क्षीरसागर,

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता, या क्षणी आणि कधीही पैसा मला नमवू शकत नाही.
एक काम करा. घरापासून दूर कुठेही जा एकदा, समजा हिमालयात गेलात तर तिथे पोचलात की तुमचे पैशाचे पाकिट, कपडे फेकून द्या. मग त्या थंडीत कुडकुडत, उपाशी पोटी म्हणा "या क्षणी आणि कधीही पैसा मला नमवू शकत नाही." असं १ महिना करा. जर जगला-वाचलात तर इथे येऊन तुमचे अनुभव सांगा.

याचे उत्तर तुम्ही नेहमीप्रमाणे शिताफीने टाळले आहे.

तुमचा प्रतिसाद वाचला. तुम्ही आयुष्यात काही फार महान करत आहात, असे काही वाटले नाही. तुम्ही जे काही करताय, ते सर्व मी करतोच, उलट त्याहीपेक्षा जास्त चांगले जीवन जगतो. अर्थात आधीच सांगितल्याप्रमाणे, मी कसा जगतो हे सांगायला मी तुम्हाला बांधील नाही आणि मला माझी प्रायव्हसी जास्त प्रिय आहे, त्यामुळे माझे छंद काय आहेत ते सांगायच्या फंदात मी पडणार नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की तुम्हीच काय ते परफेक्ट आयुष्य जगता, हा तुमचा भ्रम आहे.

तुमच्याकडून शिकण्यासारखे काहीही नाही ते कळले आहे, त्यामुळे तुमच्याबरोबर अधिक संवाद करायची इच्छा नाही. मी "आर्थिकदॄष्ट्या स्वतंत्र" असलो तरी माझ्याकडे लिमिटेड वेळ आहे, याची मला जाणीव आहे. currency of my life is time. त्यामुळे मी मला आवडेल त्या छंदात वेळ घालवतो आणि सुखात जगतो. कुणाला ते पटवून द्यायची गरज नाही.

पर्सनल अ‍ॅटॅक करण्याच्या तुमच्या सवयीवरून तुमची "वैचारिक उंची" एव्हाना सगळ्यांना कळली असेलच. तुमचा "मी"पणा आणी अहंकार अजून तुमच्या आयुष्यातून गेलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही स्वतःला जितके "सर्वांगिण स्वतंत्र" समजता, तसे तर अजिबात नाहीत. इतकेच सांगायला हा अखेरचा प्रतिसाद.

असो, दिवसाची सुरुवात करताना मला पुढील प्लाक रोज दिसतो, जो पुरेसा बोलका आहे.
know better

संजय क्षीरसागर's picture

21 Mar 2017 - 10:38 am | संजय क्षीरसागर

इथे रोजच्या जीवनात (७५००० $ की काय, नुसती बिनकामाची वार्षिक कमाई असून सुद्धा), रुटीनपेक्षा तुम्ही काहीही वेगळं जगू शकत नाही हे उघड आहे. सो थांबलात हाच शहाणपणा आहे.

अर्थात, तुम्हाला धन्यवाद दिले आहेतच. कितीही वर्ष घासली तरी जोपर्यंत नज़र पैश्यावर आहे आणि तोच आधार आहे तोपर्यंत लोक्स एकच दिवस अनेक वेळा जगतात हे माझं विधान तुम्ही सिद्ध केलं आहे.

व्यक्तिगत रोख तुमचा होता. `लॉजिक गंडलंय' ही सुरुवात तुम्ही केलीत. त्या कर्माची ही फळं आहेत. मी तुम्हाला फक्त दिनक्रम विचारला जो तुम्हाला शेवटापर्यंत सांगता आला नाही. याचं कारण प्रायवसी वगैरे काही नसून आठ तासाच्या नोकरीभोवतीचं सगळं चालू आहे हे आहे.

तुमची सुखाची कल्पना काय आहे आणि तुम्ही ती कशी अमलात आणताय? ते पण सांगताय ना?
(इथे आता रात्रीचे ३ वाजत आले आहेत, त्यामुळे उद्या बोलू.)

संजय क्षीरसागर's picture

17 Mar 2017 - 1:40 pm | संजय क्षीरसागर

तुमची सुखाची कल्पना वार्षिक $ ७५,००० उत्पन्न इतकीच आहे हे आधी कबूल करा.

पिशी अबोली's picture

17 Mar 2017 - 11:05 pm | पिशी अबोली

प्रातिसादिक स्वावलंबन म्हणजेच 'अहं ब्रह्मास्मि' च्या स्वप्नाच्या वाटेवरचे एक पाऊल!

आज मला साक्षात्कार होऊन विरक्ती आलेली आहे. आता मी स्वतंत्र आहे.

मूनशाईन's picture

18 Mar 2017 - 1:00 am | मूनशाईन

अतिशय उपयुक्त असा लेख. तिशी जास्त दूर नाही मात्र तुमच्या अनुभवातून नक्कीच लवकर सुरवात करता येईल. शिवाय तू दिलेल्या लिंक वाचून आता या विषयावर घरात चर्चा वाढायला मदत होईल.

रामपुरी's picture

18 Mar 2017 - 2:27 am | रामपुरी

मजा आली. उद्या परत येउन पुढच्या प्रतिक्रिया वाचतो. चालू ठेवा मालक.. :) :)
लेखा बद्दल बोलायचं तर पहिल्या काही ओळींनंतर परिच्छेद वाचन केलं. चुकीच्या कल्पनांवर आधारलेला लेख.. त्यामुळे आमचा पास (धुमडी आमाला फक्त बगायला आवडते)

प्रीत-मोहर's picture

18 Mar 2017 - 2:16 pm | प्रीत-मोहर

मी काय म्हणते, आर्थिक स्वावलंबनाचा विषय अंकात आला आहेच तर संक्षी, उदय आणि रामपुरीजींनी पामरांना पुरतेच शहाणे करायचे मनावर घ्याच

संजय क्षीरसागर's picture

18 Mar 2017 - 3:18 pm | संजय क्षीरसागर

रामपुरी हा आयडी, या विषयावर (काय कोणत्याच विषयावर) काहीही लिहू शकत नाहीत. गेल्या साडेआठ वर्षात (म्हणजे २००८ साली !) त्यांनी फक्त एक (तद्दन) पोस्ट लिहीली आहे. ती पोस्ट म्हणजे एक लेखनशून्य लिंक आहे आणि त्यावर स्वतःचा एकही प्रतिसाद नाही, यावरनं काय ते लक्षात येईल. माझा लेख किंवा प्रतिसाद दिसला की हा आयडी जागृत होतो. अर्थात, हे त्यांनी प्रतिसादात स्वतःच कबूल केलं आहे (धुमडी आमाला फक्त बगायला आवडते). तस्मात, काहीही वॅल्यू अ‍ॅडिशन शक्य नाही.

उदय स्वतः त्यांचं सो कॉल्ड`स्वातंत्र्यपूर्ण आयुष्य' कसं जगतात हे सांगायला तयार नाहीत कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही दिसत नाही.

माझे विचार पैसा या लेखात २०१२ सालीच मांडले आहेत. आणि तो लेख मनोगतवर त्याही पूर्वी प्रकाशित झाला होता. थोडक्यात, लेखात व्यक्त केलेली विचारसरणी गेली कित्येक वर्ष मी जगतो आहे. मला वाटतं, धिस इज अ प्रूफ इनफ !

शामसुता's picture

18 Mar 2017 - 3:38 pm | शामसुता

खरतरं तू भरपूर परिश्रम घेवून हा लेख लिहिला आहेस याची कल्पना येतेय. तू लिहित राहा...आर्थिक स्वावलंबनाच्या तुझ्या कल्पना वास्तवदर्शी आहेत.लेख आवडला. तू दिलेली माहिती,लिंक्स अतिशय उपयुक्त आहेत.

या धाग्यावर उल्लेख केलेला मिनिमलीजमबद्दल डॉक्यूमेंट्री नेटफ्लिक्सवर काल पाहिली. आवडली. आपल्यापैकी बरेचजण त्याची अंमलबजावणी करत असल्याने बरे वाटले. सुचवणीबद्दल आभार.

सुधांशुनूलकर's picture

18 Mar 2017 - 9:09 pm | सुधांशुनूलकर

लेखांमधल्या विचारांशी सहमत. गेल्या १२-१३ वर्षांत आम्ही दोघांनी असंच काहीसं करायचा प्रयत्न केलाय, तो थोडक्यात मांडतो.

'निवृत्तीनंतर मिळालेले पैसे बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर (आणि पेन्शनवर) उरलेलं आयुष्य सुखात काढायचं' अशा टिपिकल मानसिकतेतून साधारणतः १५ वर्षांपूर्वी बाहेर पडून आम्ही दोघं गुंतवणुकीचा गांभीर्याने विचार करायला लागलो. योग्य मार्गदर्शक - गुंतवणूक सल्लागार भेटले आणि सुरुवात झाली. त्या वेळेस आम्ही दोघेही वयाच्या चाळिशीत होतो.

मुख्यतः म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक सुरू झाली. सुरुवातीला दर महिन्याला थोडी रक्कम, 'थोडी जोखीम, कमी परतावा' अशा प्रकारच्या योजनेत गुंतवायला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू दरमहा रक्कम वाढवत नेली आहे आणि जास्त जोखीम-जास्त परतावा अशा योजनांमध्ये (म्हणजे योजनांची संख्याही वाढवली) गुंतवणूक आहे. सुरुवातीला मिडकॅप आणि आता लार्ज कॅप आणि मल्टिकॅप प्रकारचे फंड निवडले. तसंच दीर्घकालीन, मध्यमकालीन उद्दिष्टं निश्चित केली, आता अल्पकालीन (पुढील एक ते दोन वर्षांसाठी) उद्दिष्टंही ठरवून साध्य करता यायला लागली आहेत.
यात शेअर बाजारातली गुंतवणूक अंतर्भूत नाही.

साध्य : साधारणतः १७-१८% वार्षिक परतावा मिळू शकतो. याहूनही थोडा जास्त - २०-२२%पर्यंत शक्य आहे.

या बाबतीत आणखी काही मुद्दे :
१. गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला खूप मोलाचा ठरला.
२. अवाजवी परताव्याची हाव नको - सागाची लागवड, शेळी/एमूपालन, ** वर्षांत दामदुप्पट वगैरे योजनांकडे दुर्लक्ष केलं.
३. महिलांनी यात लक्ष घालून सगळं समजून घ्यावं, अशी महिलांना कळकळीची विनंती; तर आपल्या घरातल्या महिलांना - बायकोला / बहिणीला / मुलीला आपल्या गुंतवणुकीची माहिती देऊन त्यांनाही सामील करून घ्यावं ही पुरुषांना विनंती.
४. जे जे आपणांसी ठावे ते ते सकळांसी सांगावे - आपले मित्र, नातेवाईक, सहकर्मचारी इ.ना गुंतवणुकीसाठी उद्युक्त करत आलो.

@इडली डोसा - छान उपयुक्त लेखासाठी आभार आणि प्रतिसाद द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.

Give a Man a Fish, and You Feed Him for a Day. Teach a Man To Fish, and You Feed Him for a Lifetime
हा गंभीरपणे दिलेला प्रतिसाद आहे, संजय क्षीरसागर यांनी इथे दुर्लक्ष केल्यास बरे पडेल, विशेषतः इतरांना.

आपल्या शाळा-कॉलेजात पर्सनल फायनान्सचे प्राथमिक ज्ञानसुद्धा दुर्दैवाने शिकवले जात नाही, किमान मला तरी कधी कोणी शिकवले नाही. जे काही शिकलो ते चुका करत आणि त्या सुधारत, पुढे वाचन करून शिकलो. या विषयावर आंतरजालावर मराठीत खूप कमी माहिती मिळते आणि ती पण विखुरलेली. म्हणून इतरांना काही फायदा झाला तर बरे या हेतूने ऐसीअक्षरेवर मी १ लेखमाला लिहायला सुरू केले होते, त्याचे भागः
पर्सनल फायनान्स - भाग १ - अनुक्रमणिका
पर्सनल फायनान्स - भाग ३ - नवी नोकरी
पर्सनल फायनान्स - भाग ४ - सुरुवात कुठून करायची
पर्सनल फायनान्स - भाग ५ - कर्ज
पर्सनल फायनान्स - भाग ६ - माहिती मिळवणे
पर्सनल फायनान्स - भाग ७ - युटीलिटी थियरी
पर्सनल फायनान्स - भाग ८ - बिहेवियरल इकॉनॉमिक्स
पर्सनल फायनान्स - भाग ९ - इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी

सर्वप्रथम तुमची रिस्क प्रोफाइल बघा, तुम्हाला कितपत रिस्क घ्यायला जमेल, ते ठरवणे महत्वाचे आहे.
मग तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवा. माझी फार जुनी स्ट्रॅटेजी इथे आहे, आता त्यात बराच बदल झाला आहे, पण तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल साधारण अंदाज येईल.

नोकरीतून मिळणारे उत्पन्न तुम्हाला इतर मार्गाने मिळू लागले, तर तुम्ही रिटायर होऊ शकता. माझा एक्स-बॉस/मित्र ४२ व्या वर्षी रिटायर होउन आता पुण्याला स्थायिक झाला आहे. अमेरिकेत पण मला भरपूर जण माहीत आहेत, ज्यांना नोकरी करत राहाण्याची गरज नाही किंवा ज्यांनी आता दुसरे करियर निवडले आहे. माझ्या दॄष्टीने यात विशेष काही नाही. जर तुमचे टंपरामेंट (मराठी?) व्यवस्थित असेल आणि तुम्ही नियमित बचत केली आणि नशीबाने साथ दिली तर आर्थिक स्वावलंबन सहज शक्य आहे.

संजय क्षीरसागर's picture

19 Mar 2017 - 5:26 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही दिलेल्या प्रतिसादात, मी त्यांचा सहज प्रतिवाद करीन अशी भीती दिसत असली तरी मला तसं करायची काही गरज नाही कारण तुमचा निष्कर्श तुम्ही लिहीला आहेच :

जर तुमचे टंपरामेंट (मराठी?) व्यवस्थित असेल आणि तुम्ही नियमित बचत केली आणि नशीबाने साथ दिली तर आर्थिक स्वावलंबन सहज शक्य आहे.

थोडक्यात तुमचा भर बचत, नशीब, टेंपरामेंट असल्या गोष्टींवर आहे आणि सर्वांच इप्सित `सो कॉल्ड आर्थिक स्वातंत्र्य' मिळवणं आहे. इतक्या कुचकामी लॉजिकवर जगणारे काहीही साहस करु शकणार नाहीत. कारण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे इतके पैसे अशी गोष्टच या जगात नाही.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता, या क्षणी आणि कधीही, पैसा मला नमवू शकत नाही. पैसा माझ्या जीवनाची दिशा ठरवू शकत नाही. मी प्राथमिक आहे आणि पैसा दुय्यम आहे हे आकलन. अर्थात इतकी वैचारिक उंची गाठायला कितपत जमेल हे ज्याचं त्यानं ठरवावं.

ट्रेड मार्क's picture

21 Mar 2017 - 2:05 am | ट्रेड मार्क

आर्थिक विषयांशी संबंधित लेख आले की तुम्ही हेच सांगत असता. पण म्हणजे नक्की काय करायचं आणि कसं करायचं हे मात्र तुम्ही सांगत नाही. माझ्या कार्डच्या लेखावर आणि आता या लेखावरसुद्धा तुम्ही नुसतं गोल गोल फिरताय. पैसे दुय्यम आहेत हे ठीक आहे पण म्हणून ते नकोतच किंवा त्याची गरजच नाही असं नाही ना? गेल्या १७ वर्षांत तुम्ही किती लोकांचे काम पैसे न घेता केलेत? जर पैसे एवढेच दुय्यम आहेत तर तुम्ही तुमच्या Clients ना त्यांना पाहिजे तेवढी फी जेव्हा त्यांच्या मनाला येईल तेव्हा द्या अशी सूट अगदी तुम्ही काम करायला लागल्यापासून सगळ्यांना देता का?

आवडली म्हणून आणि आहे नाही ते सगळे पैसे गोळा करून आवश्यक ती रक्कम जमा होत असेल म्हणून पुढचा मागचा विचार न करता रोल्स रॉईस घ्याल का? (कृपया रोल्स रॉईस म्हणजे काय किंवा मला गाडी चालवता येत नाही वगैरे सांगू नका.) अगदीच तुम्हाला गाडी म्हणजे काय हे माहित नसेल तर तुमच्याकडचे सगळे पैसे/ इन्वेस्ट्मेन्ट्स (?) खर्च करून मिळेल अशी कुठलीही वस्तू/ सेवा घ्या.

तुम्ही व्यवसाय करत असल्याने वेळेची थोडीफार अडजस्टमेन्ट करणे तुम्हाला जमते. पण मग एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये एक महिना किंवा तिन्ही महिने तुम्ही पूर्ण सुट्टी घेऊ शकाल का? आणि अशी सुट्टी दर वर्षी घ्यायला जमेल का?

तुम्ही जे म्हणताय ते कसं करावं हे स्टेप बाय स्टेप सांगावं अशी एका CA कडून आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे. पूर्णपणे नाही जमलं तरी थोडंफार तरी अमलात आणू शकतो. पण नुसतंच तुम्ही जगताय तेच फक्त जगणं आणि आम्ही जगतोय ते आमच्याच गळ्यातलं लोढणं हा गैरसमज का ठेवता?

संजय क्षीरसागर's picture

21 Mar 2017 - 10:44 am | संजय क्षीरसागर

पैसा हा लेख वाचा ! आणि साहस करा. त्यात सगळं आलंय.

ट्रेड मार्क's picture

22 Mar 2017 - 12:29 am | ट्रेड मार्क

त्यावरील प्रतिक्रिया आणि चर्चा सुद्धा वाचल्या. तुम्ही सोडून बाकी सगळे कुढत जगतात, फक्त पैश्यांचा विचार करतात, छंद जोपासत नाहीत असं जे तुम्हाला वाटतंय त्यावर आक्षेप आहे.

माझं असं मत आहे की तुमचा बाकी सगळ्यांबद्दल गैरसमज झाला आहे. तुम्ही आयुष्यात किती वाईट परिस्थिती बघितली आहे हे मला माहित नाही. पण स्वानुभवावरून सांगतो जेव्हा घरात खायची पण भ्रांत असते तेव्हा भूक भागवण्यासाठी अन्न आणि ते घेण्यासाठी फक्त पैसेच लागतात. त्याच वेळेला तुम्ही अगदी एकटे असता कारण जग हे फक्त पैसा मानतं. जे या परिस्थितीतून जातात त्यांना पैश्याची किंमत असते आणि त्याचे नियोजन कसे करायचे हे पण कळतं.

पण याचा अर्थ असा नाही की आम्ही फक्त पैश्याच्या मागे लागतो आणि जीवनाचा आनंद घेत नाही. पैसा हे सर्वस्व नक्कीच नाही पण पैश्यांशिवाय काम होतही नाही. या आधी सांगितल्याप्रमाणे मला रोज पैश्यांची चिंता वाटत नाही. रोज किती तास काम करायचं, ते कुठल्या वेळी करायचं हे मी ठरवू शकतो. मनाला येईल तेव्हा मी आज काम करणार नाही हे सुद्धा सांगू शकतो आणि मीच नव्हे तर आपल्यापैकी बरेच जणांना हे स्वातंत्र्य असेल/ आहे. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या, काम, आजूबाजूची परिस्थिती, सांपत्तिक स्थिती, पाठबळ हे सर्व वेगवेगळं आहे. जो तो आपल्या परीने आनंदात आणि मनाला येईल तसं जगतच असतो.

इथेही वर उत्तर देताना तुम्ही मी विचारलेले प्रश्न खुबीने टाळलेले आहेत हे तुमच्या लक्षात आणून देतो.

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2017 - 1:42 am | संजय क्षीरसागर

पैसा हे सर्वस्व नक्कीच नाही पण पैश्यांशिवाय काम होतही नाही.

हा एकमेव गैरसमज जेव्हा दूर होईल तेव्हा तो लेख तुम्हाला समजेल.

१) श्वास पैश्यानं चालत नाही. श्वास चालू आहे म्हणून पैश्याला अर्थ आहे.
२) मुळात श्वास चालू असणं हे कोट्यावधी फॅक्टर्सवर अवलंबून आहे पण आपल्याला ते कळत नाही.
३) श्वास चालू असणं हे अठरा कोटी किलोमिटर्स दूर असणारा सूर्य तळपत राहाण्यावर अवलंबून आहे. तिकडे सूर्य विझला तर इकडे आपण संपलो.
४) या अठरा कोटी किलोमिटर्सच्या त्रिज्येभोवती पृथ्वी कायम एकसमान अंतर ठेवून फिरायला हवी.
५) पृथ्वीच्या या परिक्रमेत कोणत्याही ग्रहानं चुकून जरी प्रवेश केला तर एका क्षणात सगळा खेळ खलास होईल.
६) पृथ्वी चुकून स्वतःभोवती फिरायची थांबली तर सूर्यासमोरचा भाग खाक होईल आणि पलिकडचा थंडीनं निर्जीव होईल.
७) पृथ्वी असाशी कलली आहे म्हणून ऋतू आहेत, हा अँगल बिघडला तर वातावरणात उलथापालथ होईल.
८) या अँगलमुळे समुद्र चंद्राशी संधान राखून आहेत आणि समुद्र आहेत म्हणून पर्जन्य आहे आणि पर्जन्य आहे म्हणून वृक्ष आहेत आणि त्यांचा उत्छ्वास आपला श्वास आणि आपला उत्छ्वास हा त्यांचा श्वास आहे.
१०) शरीर जीवंत राहायला श्वास प्रमुख असला तरी इतर सर्व सिस्टीम्स जसे की हृदय, न्यूरो सिस्टम, ब्लड सर्क्युलेशन, आणि तदनुषंगिक अनेक अज्ञात प्रक्रिया चालू राहाण्यावर जीवंत असणं अवलंबून आहे.

हे तुम्हाला समजतील इतके ज्ञात फॅक्टर्स झाले. ते सर्व या क्षणी हजर असतील तरच जीवनात एखादी घटना घडू शकेल.... आणि यातला एक जरी फॅक्टर कोसळला तरी घटना घडणार नाही. ते सर्वच्या सर्व फॅक्टर्स आपल्या नियंत्रणा बाहेर आहेत. आणि यातल्या एकाही फॅक्टरचा पैश्याशी शाट संबंध नाही ! खुद्द बिल गेटस सुद्धा यातला एकही फॅक्टर नियंत्रित करु शकत नाही.

थोडक्यात, आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपल्याला खायला मिळतंय आणि खायला मिळतंय म्हणून आपला श्वास चालू आहे असं समजणं हा शुद्ध मूर्खपणा आहे.

ते नोबेल देणारे आणि घेणारे हे सर्व पॅरामिटर्स न जाणताच, आणि त्यामुळेच गृहित धरुन, `पैश्यामुळे घटना घडली' असा कमालीचा अज्ञान मूलक अर्थ काढतायंत. पण वस्तुस्थिती अशीये की इतक्या अब्जावधी नियंत्रणबाह्य फॅक्टर्सवर आधारित असलेली घटना, ते फॅक्टर्स कायम राहातील असं गृहित धरुन केवळ पैश्यामुळे घडली असं मानणं हे निर्बुद्धपणाचं लक्षण आहे.

इट इज द अदर वे राऊंड, घटना घडायची नसेल तर पैसा हे केवळ निमित्त होतं आणि घटना घडायचीच असेल तर पैसा शाट काही करु शकत नाही.

ट्रेड मार्क's picture

22 Mar 2017 - 2:13 am | ट्रेड मार्क

१ ते १० मुद्दे मलाही माहित आहेत. पैसे अनावश्यक आहेत हे तत्वज्ञान म्हणून ठीकच आहे.

ते सर्व या क्षणी हजर असतील तरच जीवनात एखादी घटना घडू शकेल.... आणि यातला एक जरी फॅक्टर कोसळला तरी घटना घडणार नाही. ते सर्वच्या सर्व फॅक्टर्स आपल्या नियंत्रणा बाहेर आहेत. आणि यातल्या एकाही फॅक्टरचा पैश्याशी शाट संबंध नाही

ज्योतिष सांगणारे आणि नियती, नशीब मानणारे लोक हेच तर म्हणतात.

हे जे सांगताय ते तुम्ही व्यवहारात किती आणलंय? तुम्ही म्हणता की मला वाटेल तेव्हा काम करतो, बाकी छंद जोपासतो, पैश्यांची चिंता करत नाही. पण म्हणजे तुम्ही काम करताच ना? ते तरी कशाला करता? बरं ते ही छंद म्हणून करता असं मानलं तर त्याचे पैसे कशाला घेता? वर उदय यांनी म्हणल्याप्रमाणे आहे ते सगळं सोडून, जवळ एकही पैसा न ठेवता हिमालयात एक महिना राहून दाखवा.

म्हणूनच मी वरच्या प्रतिसादात विचारलेले प्रश्न परत एकदा वाचा आणि त्याची खरी खरी उत्तरं द्या. कृपया तुम्हाला सोयीस्कर असलेले मुद्दे घेऊन चर्चा करू नका. सर्व प्रश्नांची, जरी तुम्हाला अडचणीचे वाटले तरी, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कदाचित जी चर्चा होईल ती तुमच्या आणि आमच्याही फायद्याची असेल.

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2017 - 11:27 am | संजय क्षीरसागर

कदाचित जी चर्चा होईल ती तुमच्या आणि आमच्याही फायद्याची असेल.

तुम्हाला अजूनही पैश्यामुळेच घटना घडते हा भ्रम आहे, त्यामुळे चर्चा (मी लिहीलं तर) तुम्हाला उपयोगी होईल.

हे जे सांगताय ते तुम्ही व्यवहारात किती आणलंय? तुम्ही म्हणता की मला वाटेल तेव्हा काम करतो, बाकी छंद जोपासतो, पैश्यांची चिंता करत नाही. पण म्हणजे तुम्ही काम करताच ना? ते तरी कशाला करता? बरं ते ही छंद म्हणून करता असं मानलं तर त्याचे पैसे कशाला घेता? वर उदय यांनी म्हणल्याप्रमाणे आहे ते सगळं सोडून, जवळ एकही पैसा न ठेवता हिमालयात एक महिना राहून दाखवा.

मी हे गेली काही दशकं जगतोयं! मला हिमालयात जायची गरज नाही. अज्ञानी लोकांना तो सायास करायला लागतो आणि महाअज्ञानी इतरांना तो करायला सांगतात. हिमालयाची शांतता मी माझ्या घरीच आणलेली आहे. कारण शांतता इथे तिथे सर्वत्र एकसारखीच आहे.

तुम्ही ही हिंमत वर्कींग डेला घरच्याघरी करुन बघा.

१) सकाळी डोळे उघडल्याशिवाय उठणार नाही.
२) भूक लागल्याशिवाय जेवणार नाही.
३) घड्याळ किंवा वेळेची दखल घेणार नाही.
४) मनात आलं तरच काम करीन.
५) छंद किंवा आनंद वर्सेस काम असा विकल्प आला तर काम फाट्यावर मारीन.
६) असं जगून सुद्धा काम वेळेपूर्वीच आणि उत्तम प्रकारे कंप्लीट करीन.
७) मग जे पैसे मिळतील ते मिळतील.

येत्या सोमवारी सुरु केलं आणि शुक्रवारपर्यंत फेफरं येऊन, सोमवारी पुन्हा रुटीन सुरु केलं नाहीत तर इथे प्रामाणिकपणे अनुभव लिहा . आणि फेफरं न येता मजा आली तर किमान तीन महिने हा कार्यक्रम राबवा, तुम्हाला मी काय जगतो याची झलक मिळेल. आणि तुम्ही पुन्हा व्यर्थ प्रश्न विचारणार नाही.

मी पैश्यामुळे घटना घडते असं कुठे म्हणलंय? तुम्ही लिहा तर खरं, मग फायदा ज्याला होईल त्याला होईल. तुम्ही कशाला चिंता करताय?

मी हे गेली काही दशकं जगतोयं!

म्हणजे ज्यांचं काम करता त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेत नाही? अगदी पहिल्या कामापासून तुम्ही पैसे घेत नाही का? जर घेताय तर मग कशाला घेता? मी तुम्हाला जे विचारतोय आणि करायला सांगतोय ते वाचून तुम्हाला फेफरं आलंय असं वाटतंय.

तुम्ही ही हिंमत वर्कींग डेला घरच्याघरी करुन बघा.

हे सगळं बहुतेकांना अगदी रोज करणं जमणार नाही. याचे कारण पैसे हे नसून असलेली जबाबदारी आहे. माझ्या वेगळ्या टाइम झोन मध्ये असलेल्या टीम माझ्यासाठी थांबलेल्या असतात, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणे ही माझी जबाबदारी आहे. नोकरी करणे आणि व्यवसाय करणे यात हा फरक असतोच. आम्हाला ठरलेली वेळ पाळायला लागते आणि स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या निभावायला लागतात. पण म्हणजे आम्ही १२ महिने २४ तास पैश्यांच्या मागे लागलोय हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही मी सांगतोय ते करून बघाच. नाहीतर तुम्ही जगताय तेच फक्त जीवन आणि बाकीचे जगतात ते मरण या भ्रमात तुम्ही आनंदात जगा. आमच्या जगात आम्हाला आनंदाने जगू दे, काय? उगाच सगळ्या अर्थविषयक धाग्यावर तीच तीच टेप वाजवून आमचा वेळ कशाला वाया घालवता? तुम्हाला नसलं तरी तुमच्या मते आम्हाला पैश्यांच्या मागे लागायला लागतं.

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2017 - 12:42 am | संजय क्षीरसागर

हे सगळं बहुतेकांना अगदी रोज करणं जमणार नाही.

नुसत्या कल्पनेनीच धरणी दुभंगली ! पण निदान कबूल तरी केलंत हे काय कमीये. तुम्ही जवाबदारी घेता आणि मी काय गोट्या खेळत नाही. माझी काम वेळेपूर्वीच कंप्लीट असतात. नोकरी आणि व्यावसाय ही फनी कंपॅरिजन आहे. तुम्ही आठवडाभर रजा काढून मी सांगितलेला उपक्रम राबवून बघितला असता, पण त्याला हिंमत लागते. आणि मी तर फक्त आठवडाभर म्हणत होतो पण नुसत्या कल्पनेनंच तुम्ही खचलात.

घटना घडण्यासाठी जे (नॉन फिनान्शियल) फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते मी तुम्हाला सांगितल्यावर, मान्य करण्याखेरीज गत्यंतर राहीलं नाही. पण त्याची तुम्हाला शून्य कल्पना होती, तुम्ही त्यावर फक्त स्वतःचा बचाव केला.

कारण ज्या क्षणी मला तो बोध झाला त्या क्षणी मी त्याची प्रचिती घेण्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं ! मी तसं जगलो आणि आय मेड मनी सेकंडरी फॉर ऑल माय लाइफ. त्याला गटस लागतात.

आम्ही १२ महिने २४ तास पैश्यांच्या मागे लागलोय हा तुमचा भ्रम आहे.

हे कुठून काढलं ? तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये किंवा जे काय तुम्हाला `स्वातंत्र्य वाटतंय' ते फार लिमीटेड आहे इतकाच मुद्दा आहे. आणि पैसे कमवू नका हे मी कधीही आणि कुठेही म्हटलेलं नाही. पैसा दुय्यम आहे आणि आपण प्रथम आहोत हा माझा एकमेव मुद्दा कायम आहे. तस्मात, मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे.

आमच्या जगात आम्हाला आनंदाने जगू दे, काय? उगाच सगळ्या अर्थविषयक धाग्यावर तीच तीच टेप वाजवून आमचा वेळ कशाला वाया घालवता?

हा पुन्हा ज्योक ! प्रश्न तुम्ही विचारलायं आणि मी उत्तर दिलंय. तुमची हौस तुम्हाला नडली, नाहीतर मला उत्तर द्यायची घंटा गरज नव्हती. एनी वे, इथून पुढे जवाबदारीनं लिहा.

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2017 - 3:24 pm | संजय क्षीरसागर

मी काही कुणाला कमी वगैरे लेखत नाही. माझं लॉजिक गंडलंय असा मुद्दा निघाला म्हणून पहिल्यांदा प्रतिसाद दिले. नंतर तुम्ही पॉइंट-बाय-पॉइंट सांगा म्हटल्यावर सुद्धा मी सरळपणे लेखाची लिंक दिली. पण त्यावर तुम्ही अशी शेरेबाजी केली : इथेही वर उत्तर देताना तुम्ही मी विचारलेले प्रश्न खुबीने टाळलेले आहेत हे तुमच्या लक्षात आणून देतो. थोडक्यात, तुम्हाला वाटलं की आय कॅन बी कॉर्नर्ड आणि मी तुम्हाला जगातली कोणतीही घटना घडण्यासाठी लागणारे नॉन-फिनान्शियल फॅक्टर्स दाखवून दिल्यावर सुद्धा तुम्ही पार व्यक्तिगत लेवलला प्रतिसाद रेटणं चालूच ठेवलं : हे जे सांगताय ते तुम्ही व्यवहारात किती आणलंय? तुम्ही म्हणता की मला वाटेल तेव्हा काम करतो, बाकी छंद जोपासतो, पैश्यांची चिंता करत नाही. पण म्हणजे तुम्ही काम करताच ना? ते तरी कशाला करता?.

सो नाऊ इट वॉज माय टर्न ! मी जगतो तेच लिहीतो त्यामुळे मला पेचात पकडणं असंभव आहे. जी काही प्रश्नोत्तरं झाली आहेत त्यात कुणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. आणि स्वतःची शेखी मिरवण्याचा तर नाहीच नाही कारण बाकीचे कितपत स्वतंत्र आहेत हे मी जाणतो. मला फक्त एकच सांगायचं होतं की १.५० कोटी खात्यात जमा असणं की $ ७५, ००० बिनकामाचं वार्षिक उत्पन्न असणं असल्या फँटास्टिक निरुपयोगी आयडीया इथे लिहून ज्यांच्याकडे तशी क्षमता नाही त्यांना नाराज करु नका किंवा गाजर दाखवू नका. ज्यांच्याकडे त्याहूनही जास्त पैसे आहेत ते सुद्धा सर्वांगिण मुक्ततेनं जगू शकत नाहीत.

ट्रेड मार्क's picture

25 Mar 2017 - 1:28 am | ट्रेड मार्क

तुम्ही पैसे घेता का नाही प्रश्न फारच अडचणींचा वाटतोय बहुतेक. त्यामुळे मग फेफरं येईल, धरणी दुभंगली, वैयक्तिक हल्ले म्हणून आरडाओरडा हे सगळं चालू झालं. मुळात तुमचं लॉजिक खरंच गंडलेलं आहे. समोरचा काय म्हणतो हे तुम्हाला पटकन कळत नसावं आणि आपण स्वतः काय म्हणालो याचाही विसर पडत असावा.

तुम्ही ही हिंमत वर्कींग डेला घरच्याघरी करुन बघा.

हे तुम्हीच म्हणालात आणि मग पुढच्या प्रतिसादात "तुम्ही आठवडाभर रजा काढून मी सांगितलेला उपक्रम राबवून बघितला असता" असं म्हणताय. सुट्टी घेऊन सगळे बहुतेक त्यांना पाहिजे तसंच वागतात. मूड असेल तर गोट्याही खेळत असतील. पण त्यावेळातही कर्जाची चिंता करत बसत नाहीत.

घटना घडण्यासाठी जे (नॉन फिनान्शियल) फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते मी तुम्हाला सांगितल्यावर, मान्य करण्याखेरीज गत्यंतर राहीलं नाही. पण त्याची तुम्हाला शून्य कल्पना होती, तुम्ही त्यावर फक्त स्वतःचा बचाव केला.

हेच स्वतःला सर्वज्ञानी आणि इतरांना मूर्ख समजणं आहे.

मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे.

माझा क्रेडिट कार्डचा धागा काय किंवा सदरचा धागा काय, विषय पैसे कसे वाचवायचे हा आहे. पूर्णपणे वेगळा विषय असताना तुम्ही मधेच मी कसा शहाणा अशी जाहिरात करत बसता हे जास्त बालिश आहे.

माझ्या या क्रेडिट कार्ड विषयीच्या धाग्यात तुम्ही म्हणता की तुम्ही आयुष्यात कधी कर्ज काढलं नाही. पुढे, या प्रतिसादात तुम्ही म्हणता "क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही.". क्रेडिट कार्ड वापरणं म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे ना? त्यापुढे तुम्ही गृहकर्जावर गेलात. आता त्यापुढील तुमचेच सगळे प्रतिसाद वाचा.
मग इथे कशी फिरवाफिरवी केलीत बघा.

वर नंतर हे ही म्हणताय

जी काही प्रश्नोत्तरं झाली आहेत त्यात कुणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. आणि स्वतःची शेखी मिरवण्याचा तर नाहीच नाही कारण बाकीचे कितपत स्वतंत्र आहेत हे मी जाणतो.

तुमच्या प्रत्येक प्रतिसादात "तुम्हारा जीना भी कोई जीना है लल्लू" हा सूर कायम आहे.

एकही धाग्यात फ्लॅट घेण्याइतके पूर्ण पैसे नसतील तर काय करायचं हे तुम्ही सांगू शकला नाहीत. तुम्ही ३.५ लाखाला पहिला फ्लॅट घेतला तेव्हा दागिने व इतर इन्व्हेस्टमेंट विकून पैसे उभे केलेत हे तुम्हीच सांगितलंय. त्या इन्वेस्ट्मेन्ट्स तुमच्या होत्या का याचं उत्तर टाळलंत. कारण २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२ साली तुमच्याकडे स्वतःचे ३.५ असतील तर तुम्ही त्याआधी बरीच वर्ष काम करत असावेत. म्हणजे आत्ता तुम्ही ६५+ असू शकता. त्यामुळे तुम्ही जो दिनक्रम सांगताय त्यात नवल काहीच नाही.

एवढंच काय कुठल्या डेबिट कार्ड्स वर चार्जेस लागत नाहीत हे सांगितल्यावर, बघतो आणि सांगतो म्हणालात आणि पुढे गायब झालात. स्वतःला तुम्ही अर्थविषयक सल्लागार म्हणवता आणि इतक्या सध्या गोष्टी पण माहित नसाव्यात तुम्हाला? आता म्हणाल की मी पैश्यांची चिंता करत नाही, होउदे खर्च.

अजून उत्खनन केलं तर तुमच्याच सांगण्यात किती विसंगती आहे आणि तुम्ही सोयीस्कर प्रतिसाद कसे देता याचे अजून पुरावे देता येतील. पैसे कसे मिळवावे आणि वाचवावे याचे नवनवीन फंडे समाजाने आम्हा पामरांसाठी उपयुक्त आहे. तेव्हा उगीच या विषयांवर असलेल्या धाग्यांवर अध्यात्म सांगून धाग्याचे काश्मीर करू नये.

आणि हो, जे तुम्ही क्लेम करताय त्याची सत्यासत्यता बघायला आमच्याकडे काहीच मार्ग नाही. मिपावर सुद्धा तुमचे क्लायंट आहेत म्हणताय पण कोणी तुमच्या बाजूने काही बोललेलं नाही. तेव्हा तुम्ही जिथे तिथे मी कसा छान जगतो हे सांगत बसता त्याला स्वतःची टिमकी वाजवणे म्हणतात.

लंबूटांग's picture

25 Mar 2017 - 4:14 am | लंबूटांग

_/\_

संजय क्षीरसागर's picture

25 Mar 2017 - 2:58 pm | संजय क्षीरसागर

या धाग्यावरचा तुमच्यासाठीचा शेवटचा प्रतिसाद खाली दिला आहे.

इडली डोसा's picture

21 Mar 2017 - 2:07 am | इडली डोसा

सोप्या शब्दात आणि लेमॅनला समजेल अश्या भाषेत लिहिल्यामुळे जड वाटत नाहिये. ज्यांना पर्सनल फयनान्स संकल्पनांबाबत काहिच माहित नाही पण सुरुवात करायची आहे अशा सर्वांसाठी उपयुक्त.

सपे-पुणे-३०'s picture

19 Mar 2017 - 2:59 pm | सपे-पुणे-३०

निश्चितच सुयोग्य आर्थिक नियोजन ही सुखी भविष्याची किल्ली आहे. आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिक्षण लांबल्यामुळे आमचं अर्थार्जन त्यामानाने उशिरा सुरु झालं. त्यावेळी स्टायपेंडमधून पैसे वाचवून शेअर्स मध्ये गुंतवले. सुदैवाने त्यात चांगला फायदा झाला. नंतर हळूहळू म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवायला सुरुवात केली. यांत वेळोवेळी घेतलेलं गुंतवणूक सल्लागाराचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं. सध्याची शेअर्स, म्यु.फंडाची व इतर गुंतवणूक ही लॉन्गटर्म साठी करतो आहोत.

अमित खोजे's picture

20 Mar 2017 - 11:30 pm | अमित खोजे

अर्रे, तुमचा आणि माझा प्रवास अगदी सारखाच चाललेला दिसतोय. कॅनडात कुठे स्थायिक झाला आहेत? मी सुद्धा आत्ताच म्हणजे २०१५ मध्ये कॅनडात आलो. ट्रम्पची चाहूल अगोदरच लागली होती का असे बऱ्याच जणांनी विचारले.

सध्या मिसिसागा, टोरांटो येथे राहतो. जमल्यास व्यनि करा. इथेच आपला एक कट्टा होऊन जाईल.

संजय क्षीरसागर's picture

25 Mar 2017 - 2:57 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही एकतर न वाचता प्रतिसाद देता त्यामुळे निष्कारण वेळ जातो किंवा मग तुम्हाला अर्थच कळत नाही. त्यामुळे इथून पुढे तुमच्या विचारणा फाट्यावर मारण्यात येतील. तद्वत माझ्या प्रतिसादांची दखल तुम्ही न घेतलेली बरी कारण पूर्वग्रहामुळे ते तुम्हाला समजतील असं वाटत नाही.

१) तुम्ही पैसे घेता का नाही प्रश्न फारच अडचणींचा वाटतोय बहुतेक.

मी काय लिहीलंय ते नीट वाचा :

पैसे कमवू नका हे मी कधीही आणि कुठेही म्हटलेलं नाही. पैसा दुय्यम आहे आणि आपण प्रथम आहोत हा माझा एकमेव मुद्दा कायम आहे. तस्मात, मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे.

या जगात पैसे न घेता कुणी काम करेल हा विचार मुळातच व्यर्थ आहे.

२) तुम्ही ३.५ लाखाला पहिला फ्लॅट घेतला तेव्हा दागिने व इतर इन्व्हेस्टमेंट विकून पैसे उभे केलेत हे तुम्हीच सांगितलंय. त्या इन्वेस्ट्मेन्ट्स तुमच्या होत्या का याचं उत्तर टाळलंत.

आम्ही एकत्र कुटुंबात राहातो. माझे वडील, भाऊ, मी आणि आई या सर्वांनी मिळून घर घेतलं. आम्ही कर्ज घेतलं नाही. त्यावरनं माझ्याकडे सगळे पैसे होते हा निष्कर्श तुम्ही तुमच्या बुद्धिनी काढलायं.

३) आता तुमच्या अनाकलाची हद्द बघा :

आत्ता तुम्ही ६५+ असू शकता. त्यामुळे तुम्ही जो दिनक्रम सांगताय त्यात नवल काहीच नाही.

माझा हा दिनक्रम गेली वीस वर्ष आहे ! हे पुन्हा एकदा नीट वाचा हा दिनक्रम गेली वीस वर्ष आहे ! आणि ते नवल आहे !

आता माझा मुद्दा नीट लक्षात घ्या :

लेखातल्या प्लानिंगप्रमाणे तो प्लानिंग करणार्‍याकडे आजही नाही आणि भांडवल जमा झाल्यावरही शक्य नाही, कारण स्वातंत्र्य साहसावर अवलंबून आहे, पैश्यावर नाही.

४) तुम्ही प्रतिसाद वाचतच नाही याचा पुन्हा हा नमुना पाहा :

सुट्टी घेऊन सगळे बहुतेक त्यांना पाहिजे तसंच वागतात. मूड असेल तर गोट्याही खेळत असतील. पण त्यावेळातही कर्जाची चिंता करत बसत नाहीत.

पुन्हा तसाच फनी अर्थ ! सुट्टी घेऊन तो उपक्रम राबवून बघा म्हणजे सर्वांगिण स्वातंत्र्याची कल्पना येईल, कारण नोकरी करतांना तो शक्य नाही. सुट्टीत तुम्ही गोट्या खेळता का आणखी काही याच्याशी त्याचा दूरान्वये ही संबंध नाही.

४) तुम्हाला अलिकडलं वाक्य पलिकडल्या वाक्याशी सुद्धा जोडता येत नाही !

क्रेडिट कार्ड वापरणं म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे ना?

कारण मी ऑलरेडी म्हटलंय "क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही." आणि मजा म्हणजे ते तुमच्या वाक्याच्या अलिकडे, तुम्हीच नमूद केलंय.

५) एवढंच काय कुठल्या डेबिट कार्ड्स वर चार्जेस लागत नाहीत हे सांगितल्यावर, बघतो आणि सांगतो म्हणालात आणि पुढे गायब झालात.

हे कुठून काढलं ? माझ्या कार्डवर चार्जेस लागतात आणि मी फक्त नॅशनलाइज्ड बँकेत पैसे ठेवतो आणि त्यांचंच कार्ड वापरतो हे तिथेच सांगितलं आहे.

पण तुम्हाला मूळ मुद्दाच कळत नाही, तो असा होता :

कार्ड वापरुन आणि लोन्स घेत व त्यांची परतफेड करत, स्वतःचं सिबील रेटींग वाढवणं, यापेक्षा लोन न घेणं श्रेयस्कर आहे.

६) तुमचा घोर गैरसमज बघा :

घटना घडण्यासाठी जे (नॉन फिनान्शियल) फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते मी तुम्हाला सांगितल्यावर, मान्य करण्याखेरीज गत्यंतर राहीलं नाही. पण त्याची तुम्हाला शून्य कल्पना होती, तुम्ही त्यावर फक्त स्वतःचा बचाव केला.

हेच स्वतःला सर्वज्ञानी आणि इतरांना मूर्ख समजणं आहे.

अजूनही तुम्हाला श्वास प्रायमरी आहे हे मान्य नाही ! यावरनं आता काय समजायचंय ते समजा.

७) आता तुमचा हा विनोद पाहा :

जे तुम्ही क्लेम करताय त्याची सत्यासत्यता बघायला आमच्याकडे काहीच मार्ग नाही.

मी तरी तुम्हाला कुठे वेरिफाय करु शकतोयं ? पण एखाद्या व्यक्तीविषयी जाणून घ्यायला आणि व्यासंगाचा अंदाज यायला, त्याच्या लेखनाची रेंज पुरेशी आहे. तुम्ही इथे किती आणि कायकाय विषयावर लिहीलंय ते बघितलं की जगण्याचा आवाका लक्षात येतोच.

८) हे फारच बालीश वाटतंय का पाहा :

मिपावर सुद्धा तुमचे क्लायंट आहेत म्हणताय पण कोणी तुमच्या बाजूने काही बोललेलं नाही.

इथला एकही क्लायंट मला अजून प्रत्यक्ष भेटलेला नाही . आमचा सगळा संवाद फोन्स आणि मेल्सवर आहे. आणि तरीही माझ्या क्लायंटसना, मी एकटा कुणालाही पुरुन उरेन याची खात्री आहे !

वेशीवरचा म्हसोबा's picture

25 Mar 2017 - 4:07 pm | वेशीवरचा म्हसोबा

तुम्ही तुमची लाल आहे हे सांगण्यासाठी गुलाबी रंग का वापरता?
लाल रंगालाही लाज वाटेल इतकी तुम्ही स्वतःची लाल करत असल्यामुळे हायलाईट करण्यासाठी तुम्ही लाल रंग वापरायला हवा.

म्हणजे या प्रतिसादावरुन तुमच्या आकलनाच्या मर्यादा पुरेश्या स्पष्ट होतात पण हिंमत असेल तर तुमचं एकूण काय ज्ञान आहे यासंबधी एखादी पोस्ट टाका आणि मग स्वतःचा रंग काय होतो पाहा.

वेशीवरचा म्हसोबा's picture

26 Mar 2017 - 7:14 am | वेशीवरचा म्हसोबा

ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानाची येता-जाता, उठता-बसता आपल्या ज्ञानाची टिमकी वाजवत फिरत नाही.

तुम्हाला "उथळ पाण्याला खळखळाट फार" ही म्हण ऐकली असेलच . त्या म्हणीतले उथळ पाणी आहात तुम्ही. ओशोंची चार पुस्तकं वाचून तुम्हाला "आपल्याला आत्मज्ञान झाले आहे" असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तुम्ही सारासार विचार करण्याची अजिबात क्षमता नसलेली व्यक्ती आहात.

तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर You have no conscience about what you are speaking about yourself and people and what people are speaking about you.

अहंकाराने काठोकाठ भरुन अहंकार ओसंडून वाहणाऱ्या व्यक्तीने आत्मज्ञानाच्या गप्पा करणे हा मोठा विनोद आहे.

संजय क्षीरसागर's picture

26 Mar 2017 - 10:14 am | संजय क्षीरसागर

आता नीट वाचा कदाचित जन्मभरासाठी उपयोगी होईल. कारण प्रतिसादातून तुमची वाचनशून्यता झळकते आहे :

ओशोंच्याबाबतीत बोलायचं झालं तर ते असं आहे :

ज्याच्याकडे काहीही वकूब नाही अशा व्यक्तीचा न्यूनगंड, एखादी व्यासंगी व्यक्ती समोर आली की ज्याम उफाळून येतो, असा ह्युमन सायकॉलॉजिचा निष्कर्श आहे. त्यामुळे बेवकूब व्यक्ती, एकतर अशा व्यक्तीला शरण जाते (कारण आपल्याकडून हे होणे नाही याची तिला खात्री असते) किंवा मग त्या व्यक्तीच्या हननाची संधी शोधत राहाते (त्यामुळे ती व्यक्ती, आपल्याच लेवलला किंवा त्याही खाली आहे असं मानसिक समाधान लाभतं). यासाठी बेवकूब व्यक्तींचा पूर्वापार चालत आलेला हुकमी डाव म्हणजे त्या व्यक्तीला अहंकारी ठरवणे !

या उलट, न्यूनगंड नसलेली ओपन माइंडेड व्यक्ती, अशा व्यासंगी व्यक्तीच्या ट्रेटसचा आभ्यास करते आणि तसा व्यासंग आपल्या जीवनात आणण्यासाठी प्रयत्नशील होते. याचा दुहेरी फायदा होतो, एकतर तिच्या व्यक्तीमत्वाला नवे आयाम मिळतात आणि दुसरं म्हणजे (मनात किल्मिष आणि तुलना नसल्यानं) अशी व्यक्ती व्यासंगी व्यक्तीपेक्षाही वेगळी परिमाणं शोधू शकते .

ओशोंचे कोट्यावधी निंदक आणि लक्षावधी फॉलोअर्स पहिल्या कॅटेगरीत आहेत. माझं भाग्य एवढंच की मी स्वतःला दुसर्‍या कॅटेगरीत आणू शकलो.

वरची स्टोरी एवढ्यासाठी सांगितली की तुमचा ओशोंच्या साहित्याचा काही व्यासंग असेल तर फक्त एकच पोस्ट इथे टाका. तुम्हाला तुमच्याच भाषेत सांगतो, कुठेकुठे आणि कायकाय रंग झालेत हे बघायला, मागे- पुढे, खाली-वर, आणि वेगवेगळ्या कोनात आरसे लावायला लागतील.

आता तुम्ही प्रतिसाद कितपत वाचता हे बघा. माझ्या प्रतिसादांचा उद्देश आजच नाहीतर पाचवर्षापूर्वी माझा पैसा हा लेख इथे प्रकाशित झाला तेव्हापासून एकच आहे :

पैसा दुय्यम आहे आणि आपण प्रथम आहोत हा माझा एकमेव मुद्दा कायम आहे

मला फक्त एकच सांगायचं होतं की १.५० कोटी खात्यात जमा असणं की $ ७५, ००० बिनकामाचं वार्षिक उत्पन्न असणं असल्या फँटास्टिक निरुपयोगी आयडीया इथे लिहून ज्यांच्याकडे तशी क्षमता नाही त्यांना नाराज करु नका किंवा गाजर दाखवू नका

कदाचित इतक्या सौम्य रंगांची तुम्हाला सवय नाही पण ती सोय होईपर्यंत चालवून घ्या.

ट्रेड मार्क's picture

28 Mar 2017 - 4:06 am | ट्रेड मार्क

तुमचे प्रतिसाद खरं तर फाट्यावर मारण्यासारखे असतात. धाग्याचा विषय कुठला आहे याचे तुम्हाला आकलन होत नसावे म्हणून पैश्यांशी संबंधित लेखांमध्ये तुम्ही सतत तुम्ही कसे आयुष्य जगता आणि बाकी लोक कसे किडामुंग्यांचे आयुष्य जगतात हे सांगत बसता. एवढ्या वेळा इतक्या मिपाकरांनी विचारूनसुद्धा तुम्ही कोणालाही समजेल, पटेल असं उत्तर देऊ शकला नाहीत. तुम्ही सांगताय ते आचरणात कसं आणायचं हे स्टेप बाय स्टेप सांगू शकला नाहीत. तुम्हाला एकदम साक्षात्कार झाला म्हणताय म्हणजे काय झालं? आणि तुम्ही म्हणता हेच अंतिम सत्य का याचं स्पष्टीकरण तुम्हाला देता आलं नाही.

पैसे कमवू नका हे मी कधीही आणि कुठेही म्हटलेलं नाही.

बरोब्बर. "पैसे" मिळवण्यासाठी तुम्ही व्यवसाय करता. आम्हाला पैसे मिळवण्यासाठी नोकरी करावी लागते. त्यामुळे त्या अनुषंगाने जी बंधने असतात ती पाळायलाच लागतात. तुम्हीच म्हणलंय "नोकरी आणि व्यावसाय ही फनी कंपॅरिजन आहे.". एकीकडे तुम्ही जे सतत म्हणता की तुम्हाला कधीही काम केलं; नाही केलं तरी चालतं आणि दुसरीकडे जे तुम्ही सतत म्हणता की तुम्ही सोडून सगळ्यांना आठ तास काम करायला लागतं ही जास्त फनी कंपॅरिजन आहे. व्यवसायात असल्याने तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा काम करू शकता. त्यात तुम्ही सांगितलंय की तुमच्याकडे कोणी कामाला नाहीये त्यामुळे तर तुम्हाला हे अजूनच शक्य आहे. नोकरी करत असणाऱ्या बहुतेकांना कामाची एक ठराविक वेळ असते जी पाळणे बंधनकारक असते, त्यात हिमतीचा संबंध कुठे येतो? नोकरी करणारे २४ तास पैश्याच्या मागे लागलेले असतात ही समजूत तुम्ही का करून घेतलीये? जसे तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही स्वतंत्र नाही किंवा जे स्वातंत्र्य आहे ते लिमिटेड आहे तेच तुम्हालाही लिमिटेड आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला म्हणलं की टॅक्सेस कॅल्क्युलेट आणि फाईल करायच्या वेळेस तुम्ही पूर्ण ३-४ महिने रजा घ्या. त्यावर तुम्ही उत्तर दिलं नाही.

"मी क्लायंटला चार्ज करतो की नाही ही विचारणा अत्यंत बालीश आहे"

बालिश नाहीये कारण पैसे तुम्हालाही मिळवावेच लागतात. तुम्ही कसे मिळवता आणि आम्ही कसे मिळवतो हा भाग वेगळा कारण तुमचा व्यवसाय तुम्ही एकट्याने करू शकाल असा आहे आणि आम्ही नोकरी करतो. व्यवसाय असल्याने तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काम करू शकता. जे स्वातंत्र्य सगळ्या व्यासायिकांना असेलच असेही नाही. उद्या वकिलाला तुम्ही म्हणाल कोर्टाच्या वेळेत तुम्हाला जायला लागतं म्हणजे लिमिटेड स्वातंत्र्य आहे.

आम्ही एकत्र कुटुंबात राहातो. माझे वडील, भाऊ, मी आणि आई या सर्वांनी मिळून घर घेतलं. आम्ही कर्ज घेतलं नाही. त्यावरनं माझ्याकडे सगळे पैसे होते हा निष्कर्श तुम्ही तुमच्या बुद्धिनी काढलायं

बरोब्बर. म्हणजे तुमच्याकडे पैसे नव्हते तर आणि त्यावर उपाय म्हणून तुमच्या घरातील स्त्रीधन तुम्ही विकून टाकलं, वडिलांनी साठवलेले ठेवींच्या स्वरूपातील पैसे वापरून टाकले. हेच आम्ही स्त्रीधनाला शक्यतो हात न लावता, आईवडिलांनी कष्ट करून साठवलेले पैसे न खर्च करता बाहेरून पैसे उभे करून घर घेतो, ज्यात बँकेकडून कर्ज घेणं हे पण अंतर्भूत आहे. यात फक्त उद्याचा विचार नसून घरातील स्त्रियांचा, त्यांच्या दागिन्यांचा आणि वडिलांचे पैसे न खर्च करण्याचा विचार आहे.

हे पुन्हा एकदा नीट वाचा हा दिनक्रम गेली वीस वर्ष आहे ! आणि ते नवल आहे !

यात नवल तुम्हाला वाटतंय. स्वातंत्र्य आम्हालाही आहेच पण आम्ही उगाच डंका पिटत नाही.

लेखातल्या प्लानिंगप्रमाणे तो प्लानिंग करणार्‍याकडे आजही नाही आणि भांडवल जमा झाल्यावरही शक्य नाही, कारण स्वातंत्र्य साहसावर अवलंबून आहे, पैश्यावर नाही.

तीन वेगवेगळ्या पण रिलेटेड गोष्टीमध्ये तुम्ही गोंधळ घालताय.

१. पैश्याचे स्वातंत्र्य: हे प्रत्येकाच्या मानण्याप्रमाणे आहे. एखाद्याकडे पैसे नसतील म्हणजे रोज किंवा महिन्याला मिळेल त्यावर पोट असेल तर त्याला हे स्वातंत्र्य कमी असेल. पण मग एखादे साहस करून तो जास्त पैसा मिळवू शकतो. घर घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर कर्ज काढण्याशिवाय दुसरा मार्ग आहे का? प्रस्तुत लेखाचा उद्देश तुम्ही वायफळ खर्च कमी करून कशी गुंतवणूक करावी हा आहे. माझ्या क्रेडिट कार्डच्या लेखाचा मी क्रेडिट कार्ड्सचा माझ्या फायद्यासाठी कसा वापर करून घेतला हा आहे. म्हणून आम्ही कोणीच पैश्याच्या दृष्टीने स्वतंत्र नाही का निष्कर्ष काढून तुम्ही मोकळे झालात?

२. वेळेचे स्वातंत्र्य: हे पैसे मिळवण्याचा जो मार्ग स्वीकारला आहे त्यावर अवलंबून आहे. नोकरी करणाऱ्याला ठरवलेल्या वेळात आणि ठराविक वेळ काम करायला लागतं. व्यवसाय करणाऱ्याला व्यवसायाच्या स्वरूपावर हे स्वातंत्र्य अवलंबून आहे. तुमच्या अशिलाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्याच्या रिटर्न्स वर प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरं ठराविक वेळेत द्यायची आहेत तर तुम्ही माझा मूड नाही हे उत्तर देऊ शकणार नाही.

३. आयुष्याचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य: प्रत्येक जण आपापल्या परीने आयुष्याचा आनंद घेतच असतो. हा तुमचा गैरसमज आहे की तुम्ही सोडून सगळे अगदी दुःखात जगत आहेत. या आधीपण मी सांगितलंय की नोकरी करत असूनही मी मला वाटेल तेव्हा काम करू शकतो. अगदी ८ ला ऑफिसला जायलाच पाहिजे असं नाही आणि रोज जायला पाहिजे असंही नाही. आजही मी ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो आणि मग जाऊ नये असं वाटलं म्हणून गेलो नाही. मस्त ३ तास ताणून दिली नंतर बायकोबरोबर गप्पा हाणल्या.

तुम्हाला प्रतिसाद वाचूनही समजत नाहीत याचा उत्तम नमुना -

सुट्टी घेऊन तो उपक्रम राबवून बघा म्हणजे सर्वांगिण स्वातंत्र्याची कल्पना येईल, कारण नोकरी करतांना तो शक्य नाही.

नोकरी करत असूनही मला वाटलं म्हणून आज सुट्टी घेतली आणि मला पाहिजे तसं वागलो. या आधीही असं बरेचदा केलंय आणि यापुढेही करीन. आणि हो, आजच्या दिवसाचा पगार मला मिळणारच आहे. नसता मिळाला तरी फारसा फरक पडला नसता. पैश्याची चिंता करायची अजिबात गरज भासली नाही, किंबहुना तो विचारच मनात आला नाही.

क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही.

अहो म्हणजे कर्ज घेतलंच ना? त्याची परतफेड करायला लागणारच ना? मग मी कर्जमुक्त जीवन जगतो हा तुमचा दावा पोकळ आहे. कारण शॉर्ट टर्म का होईना तुम्ही कर्ज घेताच.

माझ्या कार्डवर चार्जेस लागतात आणि मी फक्त नॅशनलाइज्ड बँकेत पैसे ठेवतो आणि त्यांचंच कार्ड वापरतो हे तिथेच सांगितलं आहे.

इतरांनी पुराव्यासहित सिद्ध केलंय की नॅशनलाइज्ड बँकांचे डेबिट कार्ड्स वापरून चार्जेस लागत नाहीत. एसबीआय च्या डेबिट कार्डावर चार्जेस लागत नाहीत हे गणामास्तर यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही बघून सांगतो म्हणालात आणि नंतर सांगितलंच नाहीत.

तुम्ही म्हणताय "कार्ड वापरुन आणि लोन्स घेत व त्यांची परतफेड करत, स्वतःचं सिबील रेटींग वाढवणं, यापेक्षा लोन न घेणं श्रेयस्कर आहे.". पण तुम्ही तर क्रेडिट कार्ड्स वापरता ना? एकाच वेळी इतकी विरोधाभासी वाक्य तुम्ही कशी काय लिहू शकता? सिबिल रेटिंग आत्ता सुरु झालंय, क्रेडिट कार्ड्स वापरणं बऱ्याच आधीपासून चालू आहे.

अजूनही तुम्हाला श्वास प्रायमरी आहे हे मान्य नाही ! यावरनं आता काय समजायचंय ते समजा.

असं तुम्हाला का वाटतं? काहीही हं संक्षी.

पण एखाद्या व्यक्तीविषयी जाणून घ्यायला आणि व्यासंगाचा अंदाज यायला, त्याच्या लेखनाची रेंज पुरेशी आहे. तुम्ही इथे किती आणि कायकाय विषयावर लिहीलंय ते बघितलं की जगण्याचा आवाका लक्षात येतोच.

आयला मिपावरचे ३-४ लेख वाचून मी काय आहे हे तुम्हाला सगळं कळलं? भारीये की. तुमचे लेख आणि प्रतिसाद वाचून बऱ्याच लोकांनी तुमच्याविषयी अंदाज बांधलेत, त्यामुळेच तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत.

इथला एकही क्लायंट मला अजून प्रत्यक्ष भेटलेला नाही . आमचा सगळा संवाद फोन्स आणि मेल्सवर आहे. आणि तरीही माझ्या क्लायंटसना, मी एकटा कुणालाही पुरुन उरेन याची खात्री आहे !

स्वतःविषयी किती ते गैरसमज. एका प्रश्नांची तुम्ही धड उत्तरं देऊ शकत नाही. विषयाला धरून प्रतिवाद करता येत नाही. त्यामुळे असोच.

पण तुमची हौस फिटत नाही !

१) तुम्ही सांगताय ते आचरणात कसं आणायचं हे स्टेप बाय स्टेप सांगू शकला नाहीत.

मी सांगतोयं ते स्टेप-बाय-स्टेप नाही. आज आणि आत्ता आचरणात आणायचंय.

तुम्ही फक्त आठवडाभर रजा घेऊन नक्की काय करुन पाहा, ते पण वर सांगितलंय पण तुमची हिम्मत नाही (हे तुम्हीच कबूल केलंय !)

तस्मात, तुमच्याकडून वायफळ प्रतिसादांशिवाय काहीही होणे नाही.

२)यात नवल तुम्हाला वाटतंय. स्वातंत्र्य आम्हालाही आहेच पण आम्ही उगाच डंका पिटत नाही.

स्वतःचा युक्तीवाद बोगस ठरला की दुसरा निरर्थक मुद्दा सुरु ! पहिल्यांदा तुम्ही म्हणालात की सिक्स्टी प्लसला अशा दिनक्रमाचं नवल नाही, पण तोंडावर आपटल्यावर आता म्हणतायं `आम्ही डंका पिटत नाही'.

तुमच्याकडे घंटा स्वातंत्र्य नाही आणि हिम्मतही नाही. तुम्ही सारखे मागे लागलात म्हणून मी दिनक्रम लिहीला. तुम्हाला ते वाचूनच खचून गेल्यासारखं झालंय, पण उगीच बाजू सावरायची म्हणून आता डंका वगैरे चालू केलंय

आता फक्त नशीब समजा की त्यात रोजच्या दिनक्रमातले भोजनोत्सव, स्नानोत्सव, संगीत, लेखन, इतर वेगवेगवेगळ्या आयामांचं एक्स्प्लोरेशन (उदा, मी सध्या शास्त्रीय संगीत शिकतोयं !), आठवड्याला होणारे बहुरंगी कार्यक्रम (उदा. परवा सचीन जांभेकर आणि मोहन भंडारी (काराओके सॉफ्टवेअरचे निर्माते) यांच्या समोर स्टेज परफॉर्मन्सची संधी मिळाली आणि कहर म्हणजे गाण्याला वन्समोअर मिळाला!), नव्या रेस्टॉरंटसच एक्सप्लोरेशन (उदा. माझ्या मुलानं नुकतंच डेक्कन एटचं इंटिरिअर केलंय, त्याला दिलेली भेट), मागच्याच आठवड्यात अँबी वॅली सिटीला केलेली बहारदार ट्रीप... बरीच मोठी यादी आहे. पण वाचून कदाचित फीट येईल म्हणून थांबतो.

३) एका प्रश्नांची तुम्ही धड उत्तरं देऊ शकत नाही. विषयाला धरून प्रतिवाद करता येत नाही.

तुमच्या सगळ्या प्रतिसादावर वेळ खर्च करणं व्यर्थ आहे.

४) सो, लेटस कम टू अ सिंपल टेस्ट .

तुमचं स्वातंत्र्य, तुमचे विविध व्यासंग, स्वतःच्या कामचा छंद करण्याची तुमची हुशारी (असेल तर) , नातेसंबधात तुम्ही भरलेले रंग (हे समजलं तरी खूप आहे), तुम्ही आयुष्य खुलवण्यासाठी एक्सप्लोअर करत असलेले नवे आयाम (आला का फेस?) हे सगळं एका झटक्यात क्लिअर होईल.... बाकी सगळं सोडा :

हिंमत असेल तर तुम्ही फक्त तुमचा दिनक्रम लिहा. फुल्ल पितळ उघडं पडेल !

अप्पा जोगळेकर's picture

28 Mar 2017 - 3:27 pm | अप्पा जोगळेकर

साहेब,

हे सगळ्या प्रतिसादांमधे वारंवार तुम्ही वाचून फीट येईल, वाचून चक्कर येईल असे लिहिण्यामागे काही विशिष्ट उद्देश आहे का ?
नाही म्हणजे तुम्ही लैच पैसेवाले आहात म्हणून हे रेस्टॉरंट नि आम्बी व्हॅली सगळ करताय. चांगल आहे. एन्जॉय.
मी लै शाना बाकीचे वेडझवे. बाकीच्यांनी माझ्यासारखे जगून दाखवावे हा सोस कशाकरता ?
ही आदर्श जीवनशैली असला काही भ्रम काढून टाका.

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2017 - 4:54 pm | संजय क्षीरसागर

१) चर्चा जगण्यातल्या सर्वांगिण स्वातंत्र्याची आहे हे तुमच्या पहिल्यांदा लक्षात येतंय का ते पाहा.
२) आणखी थोडी कपॅसिटी असेल तर, जगण्यातलं स्वातंत्र्य दिनक्रमात रिफ्लेक्ट होतं हे लक्षात येईल.
३) प्रतिसाद देण्यापूर्वी वाचनाची सवय लावून घेतली तर मी, उदय आणि ट्रेमा यांना दिनक्रमाविषयी विचारलं होतं. ते दोघंही, दिनक्रम सोडून बाकीचंच ठोकतायेत (कारण त्याविषयावर लिहीण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही).
४) नंतर ट्रेमानी मला स्टेप-बाय-स्टेप स्वातंत्र्याबद्दल लिहायची विनंती केली.
५) मी प्रामाणिकपणे सांगितल्यावर फुल पलटी मारुन `सिक्स्टी प्लस'ला कुणीही असं जगेल वगैरे भंपकपणा सुरु केला.
६) त्यामुळे मी गेली काही दशकं तसा जगतोयं हे (ऑलरेडी सांगितलेलं) पुन्हा सांगणं क्रमप्राप्त झालं

७) एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

८) आता तुम्हाला खरंच उद्देश वगैरे समजू शकत असेल तर पूर्वग्रहाचा चष्मा काढा आणि हे पुन्हा वाचा, (कारण ते आधी लिहून सुद्धा न वाचल्यामुळे, तुम्हाला क्रेडीट कार्डच्या धाग्यापासून आजपावेतो, सॉलीडच त्रास होतोयं )

आपण प्राथमिक आणि पैसा दुय्यम आहे. श्वास चालू असणं हे पैश्यापेक्षा जास्त अनमोल आहे. जे काय प्लानींग (नोबेल विजेते डॅनियल वगैरें ची उदाहरणं देऊन) इथे लिहीलं जातंय ते भविष्यकालीन स्वातंत्र्य आहे आणि पुढचा श्वास आत येईलच याची काहीही ग्वाही नाही. त्यामुळे अशा स्वातंत्र्याला छदाम अर्थ नाही. ती केवळ स्वप्नांची वाट आहे.

ज्याला सर्वांगिण स्वातंत्र्य हवंय त्याला आताच तसं जगायला सुरुवात करायला हवी, भले त्याची सांपत्तिक स्थिती काहीही असो. आणि हे पैशाचं नाही तर साहसाचं काम आहे.

तुमचा चष्मा काढा म्हणजे दिसेल की मी श्रीमंत नाही फक्त साहसी आहे आणि साहस फक्त एकदाच करायला लागतं हे सांगतोयं.

तुम्हाला फक्त माझ्या भाषेतली वावगी वाक्यं दिसतायंत. पण मी सामन्यांच्या बाजूनं आहे हे समजल्यावर, स्वतःच्या गैरसमाजाची हद्द बघून नक्की चक्कर येईल !

ट्रेड मार्क's picture

29 Mar 2017 - 2:41 am | ट्रेड मार्क

तुम्ही उगाच त्रास देताय तो सोडून बाकी काहीच नाही

उगाच प्रत्येक धाग्यावर येऊन स्वतःची टिमकी वाजवत बसता.

चर्चा जगण्यातल्या सर्वांगिण स्वातंत्र्याची आहे हे तुमच्या पहिल्यांदा लक्षात येतंय का ते पाहा.

या धाग्याचा विषय पैसे कसे वाचवावे, इन्व्हेस्टमेंट कश्या कराव्या हा आहे, हे तुमच्या लक्षात येतंय का? सर्वांगिण स्वातंत्र्याची चर्चा करण्यासाठी तुम्ही धागा काढा, तिथे करू.

मी सांगतोयं ते स्टेप-बाय-स्टेप नाही. आज आणि आत्ता आचरणात आणायचंय.

आत्तापर्यंत सगळ्यांनी किमान १०० वेळा तरी सांगितलं असेल की आम्ही सगळे आनंदाने जगतोय. आपलं जीवन हे पैश्यापेक्षा मोठं नक्कीच आहे, यात तुम्ही काय वेगळं सांगताय? पण पैसाही अगदीच गौण आहे असे नाही. आमच्याकडे घर घेण्यासाठी एकरकमी पैसे (आहे नाही ते सगळं liquidate करूनही) नाहीत मग घर कसं घ्यायचं? यावर तुमचं उत्तर आहे की घर घेऊच नका. आमच्यावर कर्ज असूनही आम्ही १२ महिने २४ तास कर्जफेडीची चिंता करत नाही हे सांगूनही तुम्हाला पटत नाही. नोकरी असल्याने ठराविक वेळेत काम करणे बंधनकारक आहे हे तुम्ही मान्य करत नाही.

तुम्ही फक्त आठवडाभर रजा घेऊन नक्की काय करुन पाहा, ते पण वर सांगितलंय पण तुमची हिम्मत नाही (हे तुम्हीच कबूल केलंय !)

मी आधीच सांगितलंय रजा घेऊन मी मला पाहिजे तसाच वागतो. आठवडाभरच काय मागच्याच वर्षी महिनाभर रजा घेऊन मनाला येईल/ जो मूड असेल तसाच वागत होतो. तुम्ही वर्किंग डेला करून दाखवा म्हणालात, त्यावर मी म्हणलं की ते शक्य नाही याचं कारण म्हणजे माझ्यावर अवलंबून असलेल्या टीम्स आणि स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या आहे. पण वर्किंग डेला सुध्दा आज काम करणार नाही असं सांगण्याचं स्वातंत्र्य मला आहे.

मी, उदय आणि ट्रेमा यांना दिनक्रमाविषयी विचारलं होतं. ते दोघंही, दिनक्रम सोडून बाकीचंच ठोकतायेत

काहीही बरळताय. तुमच्या प्रतिसादांमधला आणि दाव्यांमधला फोलपणा दाखवून दिल्यावर डोक्यात वात शिरलेला दिसतोय. माझा कालचाच प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. तुमच्या सोयीसाठी परत लिहितो. सकाळी उठलो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो. पण काम करू नये अशी इच्छा झाली, म्हणून मी आज काम करणार नाही असं सांगून टाकलं. मग मी आणि बायकोने ३/४ तास झोप काढली. बाहेरून जेवायला आणूया यावर आम्हा दोघांचे एकमत झाले, म्हणून बाहेरून जेवण आणलं आणि गप्पा मारत जेवलो. थोडा वेळ टीव्ही बघितला, मिपावर टीपी केला. नंतर मुलीला आणायला गेलो, थोडा वेळ तिच्याशी खेळलो. मग एका मित्राबरोबर लॉन्ग वॉकला गेलो. येऊन जेवलो आणि गप्पा मारून थोड्यावेळाने झोपलो. यात कुठेही मला आपल्याकडे किती पैसे आहेत, किती कर्ज आहे, पुढे आपलं कसं होणार हा विचार मनाला शिवला नाही. आता हे मला पाहिजे तसं मी जगलो. याचा उगाच मी डंका पिटला नाही आणि पिटायची गरजही नाही. तुम्ही मागेच लागलात म्हणून सांगितलं.

एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

परिस्थिती नेमकी उलट असेल अशी समजूत तुम्ही करून घेतली आहे. कारण तुम्ही सोडून इतर कोणी स्वच्छंदी जगूच शकत नाही असा दुराग्रह तुम्ही करून घेतला आहे.

तुमचा चष्मा काढा म्हणजे दिसेल की मी श्रीमंत नाही फक्त साहसी आहे

तुम्ही फारच विनोदी आहात अशी मला दाट शंका आहे. १९९२ साली ३.५ लाख एकरकमी असणारा माणूस मी श्रीमंत नाही म्हणतोय! वर दुसऱ्याच्या जिवावर, भले आईवडील का असेना, त्यांची सगळी पुंजी वापरून घर घेतलं आणि स्वतःला साहसी म्हणवत आहेत!! हा अजूनच मोठा विनोद.

आता फक्त नशीब समजा की त्यात रोजच्या दिनक्रमातले भोजनोत्सव, स्नानोत्सव, संगीत, लेखन, इतर वेगवेगवेगळ्या आयामांचं एक्स्प्लोरेशन (उदा, मी सध्या शास्त्रीय संगीत शिकतोयं !), आठवड्याला होणारे बहुरंगी कार्यक्रम (उदा. परवा सचीन जांभेकर आणि मोहन भंडारी (काराओके सॉफ्टवेअरचे निर्माते) यांच्या समोर स्टेज परफॉर्मन्सची संधी मिळाली आणि कहर म्हणजे गाण्याला वन्समोअर मिळाला!), नव्या रेस्टॉरंटसच एक्सप्लोरेशन (उदा. माझ्या मुलानं नुकतंच डेक्कन एटचं इंटिरिअर केलंय, त्याला दिलेली भेट), मागच्याच आठवड्यात अँबी वॅली सिटीला केलेली बहारदार ट्रीप... बरीच मोठी यादी आहे. पण वाचून कदाचित फीट येईल म्हणून थांबतो.

यात एवढं विशेष काय आहे? मी दोन वर्षांपूर्वी पोहायला शिकलो. लहानपणी संधी मिळाली नाही त्यामुळे राहून गेलं होतं. माझी ६ वर्षांची मुलगी आणि मी एकदमच माझ्या पत्नीकडून शिकलो. लहानपणापासून स्टार गेझिंगचं आकर्षण आहे, आता स्वतःचा टेलिस्कोप आहे. इथल्या ऍस्ट्रॉनॉमी क्लब बरोबर ग्रहतारे बघायला जातो.

सो, लेटस कम टू अ सिंपल टेस्ट .

मला माझ्या कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर फिरायला जायचा छंद आहे. फार आधीचं सांगत नाही पण मागच्या वर्षी नायगारा ट्रिपमध्ये $२०० प्रतिदिन देऊन हॉर्सशू फॉलच्या अगदी समोर २६व्या मजल्यावर executive suite घेऊन राहिलो होतो. वर्षातून २-३ वेळा आम्ही मित्रमंडळी कुटुंबासहित एखाद्या तळ्याकाठी, डोंगरावर वा बीचवर एक मोठं घर २-३ दिवसांसाठी भाड्याने घेतो. तिथे विविध खेळ, खाणे पिणे, बार्बेक्यू व जवळच्या ठिकाणी फिरतो. याशिवाय दर आठवड्याला आम्ही भेटतोच. मी माझ्या कुटुंबाला घेऊन वेगळं फिरायला जातो. मला आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांनाच वेगवेगळी Cuisines try करायला आवडतात. जे आम्ही नेहमीच, म्हणजे आठवड्यातून २-४ वेळा तरी करतोच. ती cuisines घरी पण बनवून बघतो. तसेच गाण्यांच्या कार्यक्रमाला जातो, मूव्हीज, मराठी नाटके यांना जातो. मला गाड्यांचा शौक आहे, त्यामुळे विविध गाड्या मी चालवलेल्या आहेत. वर म्हणल्याप्रमाणे आम्ही रोड ट्रिपला जातो तेव्हा आरामदायीप्रवास व्हावा म्हणून फुल्ली लोडेड होंडा ओडिसी माझ्याकडे आहे. त्यात मुलींना मूव्हीज बघण्यासाठी स्प्लिट स्क्रीन आहे, म्हणजे दोघी एकाच वेळेला वेगवेगळा चित्रपट बघू शकतात आणि त्याच वेळी मी व पत्नी पुढे आमची आवडीची गाणी ऐकू शकतो. एकूण ८ लोक आरामात बसू शकतील एवढी जागा आहे ज्यात आम्ही ४ जणं जातो. येत्या ३-४ महिन्यात बरंच फिरणार आहे, जाऊन आलो की सांगतो. So, we also live a good life, but we just don’t brag about it.

माझं काम म्हणजे इतरांच्या चुका काढणं आहे जे मी अगदी लहान असल्यापासून आवडीने करत आलो आहे. त्यात भर म्हणजे मला इतरांना फुकाचे सल्ले द्यायला पण आवडतं आणि सल्ले देणं हा सुध्दा माझ्या कामाचा भाग आहे. स्वतःची लाल करणाऱ्यांवर चढायला पण मला खूप आवडतं, जे मी तुम्हाला दिलेले प्रतिसाद वाचून कळलंच असेल. असो. तुम्हाला आधीच "ग"ची बाधा झालीये आणि त्यात प्रतिप्रश्न आल्याने तुम्ही भंजाळलेले दिसताय. त्यामुळे मग फेफरं येईल, फेस येईल वगैरे चालू आहे. तेव्हा तुम्ही तुमचे दळण वगैरे आनंदोत्सव करा मी माझे आनंदोत्सव करतो, काय म्हणता?

आणि हो, मी माझा पहिला फ्लॅट कर्ज काढूनच घेतला होता. वरील सर्व करत असतानाच ते कर्ज पूर्णपणे फेडून टाकले. दुसरा फ्लॅट तयार होतोय, झाला की त्याचे पण कर्ज फेडून टाकणार आहे.

आपल्यात फरक म्हणजे मी कृतज्ञ आहे कारण मी शून्यापासून (खरंतर मायनसमधून) सुरुवात केलीये. असं म्हणतात की वैश्विक शक्ती तुम्हाला मदत करत असते. तेव्हा जे मी करू शकलो, जे मला मिळालं यासाठी त्या शक्तीप्रती मी कृतज्ञ आहे. तुम्ही मात्र सगळं मी केलं, मी करतोय हे करत बसला आहात आणि इतरांना क्षुद्र ठरवत आहात.