मी (चुकून) संपादक झालो तर !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 12:25 am

संपादक व्हावं अशी अजिबात इच्छा नाहीये. पण ओशो म्हणतात, इमॅजिनेशन इज अ टॉय, वन कॅन प्ले विथ इट. बट माइंड यू, ओन्ली योर डिझायर शूड नॉट टेकओवर इट ! तर मी संपादक होण्याची शक्यता शून्य . त्यामुळे हा फक्त मौजमजेचा खयाली पुलाव आहे.

जे आयडी पॅन कार्डची कॉपी व्यवस्थापनाकडे पाठवणार नाहीत त्यांचे आयडी महिनाभरानंतर आपोआप ब्लॉक होतील. ही स्वच्छ मिपा अभियानांतर्गत माझी पहिली स्टेप असेल. या मोहिमेमुळे ३०,००० ची संख्या ३,००० वर आली तरी हरकत नाही पण सध्याचे डू आयडी, बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या आवतारात घुसखोरी हे प्रश्न एका झटक्यात आणि कायमचे निकालात निघतील.

सध्याच्या (इनक्लूडींग सद्याच्या) संपादक मंडळाला धक्का न लावता, मी अभ्याला चौथा संपादक म्हणून घेईन. एक स्त्री सदस्या पण मंडळात असलेली बरी असं वाटतं, तरी नक्की कुणाला घ्यावं म्हणजे उर्वरित स्त्री शक्तींचा कोप होणार नाही हा मोठा संभ्रमच आहे. त्यामुळे तूर्तास हे काँपोझिशन बेस्ट आहे. आभ्या आला की आम्हाला नव्या आणि भन्नाट आयडीया राबवता येतील (फॉर एक्झांपल उपरोल्लेखित स्वच्छता मोहिमेची आयडिया!)

शिवाय आरपार पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक आयडीला ब्लॉक करण्यापूर्वी आपलं म्हणणं मांडायची संधी दिली जाईल. म्हणजे मंडळाला `कुणी काय विचारु शकत नसलं' तरी सदस्याला चान्स देणं लोकशाहीला धरुने. इन द मीन टाईम त्या सदस्याचे प्रतिसाद कोल्ड स्टोरेजमधे ठेवले जातील. सदस्य समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही तरच कोल्ड स्टोरेज प्रतिसादांसकट तो ब्लॉक होईल.

सर्व सदस्यांचा एक अटेंडन्स लॉग ठेवण्यात येईल. म्हणजे ही शाळा नाही पण मोफत मजेसाठी सुद्धा जे वेळ काढू शकत नाहीत ते असून नसून सारखेच. या लॉग प्रमाणे वर्षाला किमान साठ दिवसांपेक्षा कमी वेळा लॉगीन झालेले सदस्य, १ एप्रिलला फूल होतील. अर्थात, अशा सदस्यांना सुबुद्धी झाल्यास त्यांनी पुन्हा रिक्वेस्ट केल्यावर त्यांची घरवापसी होऊ शकेल. पण हा प्रकार आयुष्यात फक्त दोनदा होईल.

मिपा डोनेशन फॅसिलीटी ही अभिनव योजना मी सुरु करीन. म्हणजे संकेतस्थळाची सुविधा जरी मोफत असली तरी ज्या सदस्यांना स्वेच्छेनं `आली लहर केला कहर' म्हणायचं असेल, त्यांना ती इच्छा पुरवता येईल. या डोनेशन्समधून वेगवेगळ्या स्पर्धांना कॅश प्रायझेस दिली जातील. त्यामुळे सदस्यांना `आम्ही आमचा वेळ देतो' वगैरे म्हणण्यापूर्वी विचार करावा लागेल.

याव्यतिरिक्त प्रत्येक टॅबमधल्या सर्वोत्कृष्ठ लेखनास सदस्यांची नॉमिनेशन्स मागवून, दर वर्षी, प्रथम आणि द्वितीय असे दोन कॅश पुरस्कार देण्यात येतील. यामुळे इथे येणार्‍या सर्व पोस्टसचा दर्जा बेफाम सुधारेल.

वर्षातून एकदा `मॅन ऑफ द इयर' अँड `वूमन ऑफ द इयर' हे दोन कॅश पुरस्कार जाहीर केले जातील. ज्या सदस्यांच्या लेखनाला भरघोस प्रतिसाद मिळत गेले, ज्या सदस्यांनी संकेतस्थळासाठी विविध उपक्रम राबवले (उदा. गोष्ट तशी छोटी किंवा उंच माझा झोका), ज्यांनी संकेतस्थळाच्या सुशोभनाची जवाबदारी पेलली अशा निकषांवर हे दोन प्रेस्टीजियस पुरस्कार देण्यात येतील.

निबंध संपला !

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

29 Mar 2017 - 3:54 pm | संजय क्षीरसागर

१) माझ्या पाहण्यात असला तरच खरं मानणार का?

स्वतःच्या तोट्यासाठी फ्रॉड करणारी व्यक्ती बिनडोक असेल असा अर्थ आहे त्या वाक्याचा.

२) इथे चर्चा चालू असलेले लोक इन्कमटॅक्स वेबसाईटवर रजिस्टर असतीलच हे गृहीतक कशावरून?

नसतील कशावरुन ? पेपर रिटर्न रद्द झाल्यावर पॅन रजिस्टर्ड करण्याशिवाय पर्यायच नव्हता.

३) मी तर वाचलीच हो बातमी, रादर तुम्ही बातमी आणि त्यातला अर्थ समजून घेत जावा.

जिथे आयटी अधिकारीच फ्रॉड करतात तिथे कुणाचाच पॅन सुरक्षित नाही. तो तुम्ही घरात ठेवा की लंडनला.

४) याशिवाय तुमचा पॅन वापरून बेनामी व्यवहार केले जाऊ शकतात हे तर उघडच आहे,

नक्की कोणता बेनामी व्यावहार होऊ शकतो ? फारच इंटरेस्टींग माहिती आहे ही, जरा तपशिलात कळवाल का ?

५) लोकांच्या २६AS बद्दल तक्रारी आहेत.

सगळ्या तक्रारी टॅक्स क्रेडीट न मिळाल्यामुळे होतात. फुकटचं टॅक्स क्रेडीट मिळाल्यावर तक्रार कशाला होईल?

ओके. आता पुढे ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 4:04 pm | हतोळकरांचा प्रसाद

काही नाही, चालू द्या!

सुबोध खरे's picture

29 Mar 2017 - 11:56 am | सुबोध खरे

नव्या मुंबईतील भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली एक शक्कल.
निश्चलनीकरणामुळे उद्योग धंद्यांनी बँकेतून पैसे काढता येत नाहीत म्हणून कानावर हात ठेवले. यावर या अधिकाऱ्यांनी तिवारी म्हणून माणसाच्या नावाने चेक द्या म्हणून चेक घेतले.
कोणा तरी दुसऱ्याच तिवारी म्हणून माणसाचा पॅन आणि आधार कार्डची फोटोकॉपी वापरून एका तिवारी नावाच्या माणसाने नव्या मुंबईत सहकारी बँकेत खाते उघडले. त्या खात्यात या भ्रष्ट लोकांनी तेथील उद्योगधंद्याकडून आपले घेतलेले भ्रष्टाचाराच्या पैशाचे चेक भरले.नंतर निर्बंध उठवल्यावर ते पैसे रोखीने त्या खात्यातून मग काढून घेतले आणि ते खाते आता बंदहि केले. सहकारी बँकेचा एकंदर कारभार ढिसाळ असतो त्यामुळे या खात्याच्या सत्यासत्यतेची चौकशी होईस्तोवर वेळ जातो. त्यातून जुन्या नोटा ते घेत नसल्याने आयकर खात्याचे या काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. नंतर एवढे पैसे भरले गेले म्हणून आयकर अधिकाऱ्यांनी चौकशी केले असताना कोणतरी गरीब भाजी विकणारा भय्या ज्याने मोबाईलच्या सिम कार्डासाठी दिलेले पॅन आणि आधार कार्डाचे झेरॉक्सचा असा गैरवापर केलेला आढळला. आता हा प्रकार अफरातफर म्हणून आहे आणि आयकर खाते आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सरकारी अधिकारी कानावर हात ठेवत आहेत आणि "दुसरा" तिवारी गायब आहे. तेंव्हा आपल्या पॅन किंवा आधार कार्डाचा गैरवापर होणारच नाही असे म्हणणे हे चुकीचे आणि अज्ञानजन्य आहे. आणि प्रत्येक वेळेस झेरॉक्स देताना ती कशासाठी देत आहोत हे सही शेजारी लिहिणे हे सुरक्षितते चाय दृष्टीने आवश्यक आहे.

संजय क्षीरसागर's picture

29 Mar 2017 - 12:01 pm | संजय क्षीरसागर

आयकर अधिकारीच फ्रॉड करायला लागले तर कोणताच पॅन सुरक्षित नाही मग भले झेरॉक्सवर तुम्ही काहीही लिहून द्या.

आदूबाळ's picture

29 Mar 2017 - 1:23 pm | आदूबाळ

मला हे झेरॉक्सवर लिहून द्यायचं प्रकर्ण नीटसं कळलं नाही. फोटोशॉप आणि तत्सम गोष्टी वापरून त्या लिहून द्यायचा नामोनिशाण मिटवता येईल, किंवा त्यावरची सही तशीच ठेवून 'ज्यासाठी दिलंय ते कारण' बदलता येईल. त्याने सिक्युरिटी कशी येणार? की हा आपला 'दिल बेहलाने के लिये' टैपचा उपाय आहे?

संजय क्षीरसागर's picture

29 Mar 2017 - 1:31 pm | संजय क्षीरसागर

१) झेरॉक्समधे फोटो आणि सहीवर अ‍ॅक्रॉस लिहून दिलं की ते मिटवणं औघड !

२) ती झेरॉक्स इतर ठिकाणी वापरणंही औघड.