लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग - ४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
16 Jan 2017 - 2:29 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग - १
लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग - २
लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग - ३

लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग - ४

ताडिपत्रीला ( येथे ताडिपत्री असे म्हटले तर कोणालाही कळत नाही. तेथे सगळे याला ताडपत्री असेच म्हणतात) जायला सकाळीच नाष्टा वगैरे करुन निघालो. रमतगमत कॉलेजच्या आठवणी काढत निवांत चाललो होतो तेवढ्यात लक्षात आले की आपण हॉस्पेटवरुन चाललो आहोत. आजवर संध्याकाळी हंपीमधे मुक्काम आमच्यापैकी कोणीही टाकला नव्हता. जयचे की नाही, जायचे की नाही असे करत शेवटी जायचे ठरविले. नुसतेच गेलो नाही तर के एस आर टी डी सीच्या सौजन्याने चांगले तीन दिवस राहिलो. हे हॉटेल हंपीमधेच आहे. (हॉस्पेटला रहाण्यात काही अर्थ नाही हे मी अनुभवाने सांगू शकतो) दोन दिवसांवर एक दिवस फुकट अशी सूटही मिळाल्यावर कोण नाही राहणार ? शिवाय भाड्यातही चांगली सूट मिळाली. अर्थात हे सगळे ऑफसिझन असल्यामुळे असे व्यवस्थापक सांगण्यास विसरला नाही. पण एकंदरीत सगळे कर्मचारी चांगलेच होते. जेवणही चांगले आणि मुख्य म्हणजे थंडगार बीअर मिळत होती. आख्या हॉटेलमधे फक्त आम्हीच असू. दुसर्‍या दिवशी एक गाडी आली व संध्याकाळी गेली.

मी हंपीवर एक लेखमाला लिहिली होती त्याच्यानंतर हंपीवर काही लिहावे असे वाटत नाही. ते लिखाणा खालील लिंक्सवर उपलब्ध आहे.

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-१
विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२
विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-३
विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-४
विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ५
विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ६

आता यावेळी काढलेले काही फोटो.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire
राणीवशाची भिंत व त्यामधे देखरेखीसाठी उभे केलेले मनोरे. लोटस महालावर गिलाव्यातील नक्षिकाम फार सुंदर आहे.

हा तो महाल...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हंपीमधी सगळ्यादूर हे दृष्य दिसते..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नृसिंहाची मूर्ती अंदाजे १५ फूट उंच असावी. त्याचाच एक क्लोजअप.

विरुपाक्ष मंदीराबाहेर विकायला ठेवलेला गजरा. मला दक्षिण भारतातील स्त्रियांच्या फुलांच्या वेडाचे फार कौतुक वाटते. कुठेही जायचे असल्यास केसात गजरा माळलेला असलाच पाहिजे... आणि गजरे असतातही स्वस्त आणि ताजे...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विरुपाक्ष मंदीर.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विरुपाक्ष मंदीरात एक कामशिल्प आहे. जेथे मोठी घंटा बांधली आहे त्याला पाठ करुन समोर वर पाहिले की ते आपल्याला दिसेल. त्याचे छायाचित्र टाकून आजचा भाग संपवतो. पण वर दिलेल्या लिंक्स वाचण्यास विसरु नका...उद्या विठ्ठल मंदीर..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच उत्तम. दोन फोटोंच्या मध्ये एक ओळ रिकामी सोडल्यास लेख अधिक पाहणीय होईल असे सुचवतो.

कर्नाटकात जायचा योग कधी येईल माहीत नाही.

पैसा's picture

12 Feb 2017 - 9:34 pm | पैसा

क्लासिक!