शृँगार ४

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
23 Feb 2016 - 9:12 pm

मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .

" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . "

" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "

" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "

" चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "

" चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "

तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .

वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम तिच्या अंगावर स्प्रे केला . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरल होत . ती अधिकच सुंदर दिसु लागली होती . ओढून तिला जवळ घेतल . तिच्या मानेवर हळूवारपणे ओठ टेकवले . हळूहळू ओठ तिच्या मानेची चुंबन घेत तिच्या कानांपर्यंत पोहोचले . तिच्या कानाची पाळी दातांमधे पकडून एक हळूवार बाईट .....टिंग टाँग..... परत ओठ तिच्या मानेवरुन फिरत होते ....टिंग टाँग.... ती थोडी दूर होण्याचा प्रयत्न करत म्हणाली ,
" अहो बाहेर कुणीतरी आल आहे वाटत बेल वाजते आहे . दार उघडा ना . "

" जाऊदे कुणी नाही . थोडा वेळ वाजवेल आणि जाईल असल तरी ."

अस म्हणत मी आणि माझे ओठ आपल्या कामात परत गर्क होण्याचा प्रयत्न करु लागलो . परत परत बेल वाजत होती . डोक्यात जात होती पण तरीही मी माझ कॉन्संट्रेशन ढळू न देण्याचा प्रयत्न करत होतो . पण बेल काय थांबायच नाव घेत नव्हती . शेवटी वैतागून मंजू दूर झाली आणि म्हणाली

" अहो एकदा पाहून तरी या कोण आहे . म्हणजे एकदा जाईल तरी . "

शेवटी मी जाऊन वैतागाने दार उघडले . बाहेर साक्षात वैताग अगदी तशाच वैतागलेल्या चेहऱ्याने उभा होता , सेक्रेटरी .

" अहो किती वेळा बेल वाजवायची ? "

"काय झाल ? "

सोबत दोन - तीन मेंबर होते . काहीतरी सिरीयस असाव अस वाटल .

" अहो काही तक्रारी होत्या लोकांच्या त्यामुळे आज सगळे मेंबर्स एकत्रच आलो होतो . "

" आमच्याबद्दल तक्रार ? "

" अहो तुमच्या एकट्याबद्दलच अस नाही ब-याच जणांबद्दल होत्या तक्रारी एक एक मिटवत तुमच्याकडे आलो . "

मनात विचार चालला होता काय तक्रार असेल आणि हे आले तेव्हा यांना काही आवाज तर ऐकू आला नाही ना ? का जाता-जाता आवाज आला म्हणून तर नाही ना आले हे ?

माझा विचार चालला होता तेवढयात

" अहो तुमच्या कुंड्यामधे जे पाणी टाकता त्याचे सगळे ओघळ येत आहेत भिंतीवर आणि तुम्ही फ्रंटला आहे त्यामुळे ते चांगल दिसत नाही आणि खाली कोणी असल कि त्याच्या अंगावर पडू शकत चिखलाच पाणी . "

म्हणजे यांचा हा सगळा आटापिटा यासाठी चालला होता . यांना आमच ओघळणार सांडणार पाणी अडवायच होत . एव्हढ कुणाच्या अंगावर सांडल होत काय माहीत ?

" अहो एवढ्यासाठी सर्वांनी यायची काही गरज नव्हती , जाता येता जरी सांगितल असत तरी मी ठेवल्या असत्या कुंड्या काढून . "

" अहो तेव्हढच नाही तेवढा रंग ही घ्या ना मारुन थोडा ते ओघळ तसे चांगले दिसत नाहीत . "

मी या लोकांना लवकर कटवाव म्हणून त्यांच ऐकत होतो तर हि संधी साधून ते काहीही म्हणन रेटू पाहत होते .

तेव्हढ्यात मंजू आली आणि त्यांना विचारु लागली

" पण आमच्या एकट्याच्याच कुंड्या आहेत का ? बाकीच्यांच्यापण आहेत ना . आणि असे ओघळ तर त्यांच्या इथही आहेतच की तुम्ही सांगितल का सगळ्यांना ? "

" तुम्ही फ्रंटला आहात . त्यामुळ ते चांगल दिसत नाही . "

" अहो फ्रंट काय आणि दुसरीकडे काय चांगल नाही दिसत ते कुठही चांगल नाहीच ना दिसणार . त्यामुळे सगळ्यांनाच सांगा ना . एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम कशाला ? "

आता यांच्या फ्रंट आणि बॅक मुळे आमच फ्रंट आणि बॅक आडल होत . आणि आता मंजूही ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हती .बराच वेळ याच्यावर काथ्याकुट करून झाल्यानंतर शेवटी त्या लोकांनाच मंजूच म्हणन मान्य कराव लागल . ते गेल्यानंतर पटकन दार बंद करून घेतल . चला आता कामाला लागुया तर मंजूला अजून त्याच्यावर बोलायच होत . शेवटी काय मग तिच बोलून होईपर्यंत ऐकून घ्याव लागल . तिच झाल्यावर तिला जवळ ओढून घेतल . तिची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली होती ती हलकेच बाजूला केली . तिला स्वतः जवळ आणखी ओढली . तिची बट परत चेहऱ्यावर आली . आता हलकेच बोटांनी ती बट व्यवस्थित तिच्या कानाच्यामागे खोवली . किती सुंदर दिसते आहे मंजू , ओह् मार डाला . माझे ओठ तिच्या ओठांच्या दिशेने निघाले होते . ओठातील अंतर कमीकमी होत चालल होत . तेवढयात टिंग टाँग ... परत बेल वाजली आणि मंजूने अक्षरशः मला ढकलून दिल .

" अहो पहा ना ते परत आले असतील . त्यांना अजून काहीतरी मुद्दा भेटला असेल म्हणून परत आले असतील तुम्ही व्हा पुढे मी येतेच जरा आवरुन माझ . "

अरे काय चालल आहे ? गेलो तसाच बाहेर आणि उघडला दरवाजा . बाहेर वॉचमन उभा होता .

" पानी भरके रखना साहब . पानी काफी कम बाकी है टंकी में . "

तेवढयात मंजू बाहेर आली आणि तिच्या कानावर ही गोष्ट पडताच तिन आज्ञा केली

" चला हो लवकर पाणी भरून घेऊ या . "

चला आता काय करणार भरतो पाणी . आज काय याच पाण्याच बघुया . आमच पाणी नुसत साठूनच राहिल आहे ते कधी सोडायच काय माहित ?

" अहो "

" हो आलो आलो "

..... क्रमशः
भाग १ http://www.misalpav.com/node/34867
भाग २ http://www.misalpav.com/node/34922
भाग ३ http://www.misalpav.com/node/34975

कथा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2016 - 9:56 pm | टवाळ कार्टा

;)

अनाहूत's picture

24 Feb 2016 - 8:30 am | अनाहूत

:-)

शित्रेउमेश's picture

24 Feb 2016 - 8:46 am | शित्रेउमेश

आमच पाणी नुसत साठूनच राहिल आहे ते कधी सोडायच काय माहित ??

हा हा हा हा... अशक्य हसलो... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2016 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेम टू सेम ! काहीही विचार मनात आला. मस्त चालु आहे. आता हे टिंग टोंग वाले मधे नका येऊ देऊ बुवा. मुड जातो.

-दिलीप बिरुटे
(चावट)

बॅटमॅन's picture

24 Feb 2016 - 3:00 pm | बॅटमॅन

के एल पी डी =)) =)) =))

पाणी गरम झालं आहे. आता आंघोळी होऊ द्या पटापट.. पानी चला जायेगा..

जे कोणी पुढील भागांची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी:

यांनी सगळे भाग इतर एका संस्थळावर टाकले आहेत. तर आत्ताच शेवटपर्यंत वाचून घेऊ शकतात. इतर संस्थळांची लींक इथे देणे मिपाच्या नियमात बसते कि नाही ते माहित नसल्याने लींक दिलेली नाहीये. पण उत्सुकता शमवण्यासाठी सांगुन ठेवले बस्स.

मराठी कथालेखक's picture

24 Feb 2016 - 4:50 pm | मराठी कथालेखक

अरेच्या ... म्हणजे यांचे सगळे भाग टंकून झाले आहे तर.. मग मिपाचाच शृंगार का म्हणून ताटकळवत ठेवलाय :)

अनाहूत's picture

24 Feb 2016 - 6:40 pm | अनाहूत

अहो माझे लिहूनपण झाले नाहीत सगळे भाग .

पियू परी's picture

25 Feb 2016 - 3:25 pm | पियू परी

अहो माझे लिहूनपण झाले नाहीत सगळे भाग .

>> इथे "तिकडच्या" लींका दिल्या तर चालतील का? तर दाखवते पुढचे भाग.

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2016 - 10:37 pm | टवाळ कार्टा

लिंका द्या की...खाली तर ते म्हणत आहेत अजून त्यांनी पुढचे भाग लिहिलेच्च नैत...टाईम ट्रॅव्हल याच जन्मात बघायला मिळणार तर :)

पियू परी's picture

25 Feb 2016 - 3:29 pm | पियू परी

इथे बघा: http://www.maayboli.com/user/58292/created

संपादक / अ‍ॅडमीनः इथे इतर ठिकाणच्या लींका चालत नसल्यास हा प्रतिसाद त्वरीत उडवण्यात यावा व मला माफ करावे. धन्यवाद. ___/\___

अनाहूत's picture

25 Feb 2016 - 5:32 pm | अनाहूत

तिथेही अपूर्णच आहे , फक्त काही पाऊले पुढे .
मला काही problem नाही लिंक बद्दल , admin ना आक्षेप नसल्यास .

निशांत_खाडे's picture

24 Feb 2016 - 4:58 pm | निशांत_खाडे

नेमाडे स्टायल मध्ये म्हणायचे तर 'निव्वळ मासिके चालवणारे वर्तमानपत्री लिखाण'
तुमच्याकडे कौशल्ये आहेतच. हे असले काहीही 'क्रमशः' करून कशाला लिहता?
'शृंगार' या शीर्षकाखाली हा एकंदर लेखनप्रपंच काही झेपला नाही. राग येऊ द्या हवा तर. आपण बोलायला घाबरत नाही ब्वा..

अनाहूत's picture

24 Feb 2016 - 5:56 pm | अनाहूत

पुढील भाग वाचा याच उत्तर नक्की मिळेल

निशांत_खाडे's picture

24 Feb 2016 - 10:21 pm | निशांत_खाडे

पाहूयात!

'शृंगार' या शीर्षकाखाली हा एकंदर लेखनप्रपंच काही
झेपनार नाही >> म्हणून तर "शृँगार" या शीर्षकाखाली लिहिले आहे

सुबोध खरे's picture

24 Feb 2016 - 7:18 pm | सुबोध खरे

शृंगार' या शीर्षकाखाली हा एकंदर लेखनप्रपंच काही झेपला नाही. राग येऊ द्या हवा तर. आपण बोलायला घाबरत नाही ब्वा..
सदस्यकाळ
3 days 19 hours

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2016 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

-दिलीप बिरुटे

निशांत_खाडे's picture

24 Feb 2016 - 10:23 pm | निशांत_खाडे

म्हणजे आता तुम्ही माझी गुणवत्ता आणि वय दोन्हीही मी मिपावर घालवलेल्या वेळेवरून ठरवताय कि काय ? छान!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2016 - 10:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाही हो आपण खुप चांगले लिहिणारे असू शकाल, आपण मोठे समीक्षकही असू शकाल, पण एखाद्याचं लेखन अगदी न झेपणारं आहे, हे व्यक्तिगत मत असू शकतं फक्त ''राग येऊ द्या हवा तर. आपण बोलायला घाबरत नाही'' हे कशाला नाय का ? :)

-दिलीप बिरुटे

या ठिकाणावर आपले मत येणे फार म्हणजे फार म्हणजे फारच महत्वाचे होते. प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब.

बायदवे, ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?, पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?,मासा भेटेना..मासा गावेना, मासा काही केल्या हाती लागेना..., संपादकीय (आपण संपादक आहात वाटते, जपून बोलायाला पाहिजे), लावणी माझं जग आहे... सुरेखा पुणेकर, पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?, समतेचा संदेश देणारं नाटक, कोण म्हणतं टक्का दिला ?

हे असले "अस्सल" मासिक चालवणारे वर्तमानपत्री लिखाण सोडून इतर काही लिहिण्याच्या (किंवा वाचण्याचा), प्रयत्न करत जा एवढी एकच माझी आपणाला विनंती आहे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब.
(माझा असा समज आहे कि तुम्ही "प्राध्यापक" म्हणून मराठी साहित्य किंवा कविता यांचे अध्यापन करत नसाल. आणि तो खरा ठरावा यासाठी मी नवस करतो आहे.)

राग येऊ द्या हवा तर, आपण बोलायला खरच घाबरत नाही! :-)

काय राव, इथे प्रेम मस्त बहरात आलय आणि तुम्हि भांडताय काय.

निशांत आपल वय ते किती मिपा वर आणी आपण वाचताय काय ? बालसाहित्य शोधा. हे झेपणार नाही . उगाच बालमनावर विपरीत परिणाम .

निशांत_खाडे's picture

24 Feb 2016 - 9:34 pm | निशांत_खाडे

म्हणजे आता तुम्ही माझी गुणवत्ता आणि वय दोन्हीही मी मिपावर घालवलेल्या वेळेवरून ठरताय कि काय ? छान!

जव्हेरगंज's picture

24 Feb 2016 - 7:34 pm | जव्हेरगंज

भाग सहा की सातच्या प्रतिक्षेत !

(त्यात कबुतरे ऊडवली आहेत यांनी ;-)

अभ्या..'s picture

24 Feb 2016 - 9:50 pm | अभ्या..

खरं की काय?
यीवू द्या यीवू द्या.
.
अटरियापर

जेपी's picture

24 Feb 2016 - 8:23 pm | जेपी

वाचतोय..

अनाहूत's picture

25 Feb 2016 - 9:43 am | अनाहूत

:-)

रातराणी's picture

25 Feb 2016 - 12:31 am | रातराणी

:)

अनाहूत's picture

25 Feb 2016 - 9:44 am | अनाहूत

:-)

असंका's picture

25 Feb 2016 - 11:24 am | असंका

एकदम भारी! धन्यवाद!

नाखु's picture

25 Feb 2016 - 12:57 pm | नाखु

अनाहुतांच्या धाग्यात अनाहूतांना घातलेल्या अनागोंदी गोधळाने अगदी अंधारभूत असल्यासारखे वाटले.

खुर्दा झालेला अना(खुदा)

भरत्_पलुसकर's picture

26 Feb 2016 - 3:50 am | भरत्_पलुसकर

छान छान!

अनाहूत's picture

26 Feb 2016 - 10:55 am | अनाहूत

धन्यवाद

अनाहूत's picture

2 Mar 2016 - 7:34 pm | अनाहूत