शृँगार १४

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
24 May 2016 - 4:19 pm

आजकाल काय चालल आहे तेच कळत नाहीए . काय तर म्हणे परांजपे सर need your help . छे मलापण वाटल करावी मदत पण मदत म्हणजे काय त्यांना आज अर्जंट काही माहिती हवी आहे आणि ते फक्त त्यांना जाऊन एक्सप्लेन करायच नव्हत तर ती डॉक्यूमेंट त्यांच्या ऑफिसमध्ये मलाच घेऊन जायची होती . छे आता एवढचं बाकी राहील होत . तरीही गेलो तर तिकडे वेगळाच प्रकार , माझ्याकडून डॉक्यूमेंट घेऊन मला चक्क ऑफिसच्या बाहेर थांबायला सांगण्यात आल व जाऊ नये अशी गळही घालण्यात आली . आता काय बोलाव हे समजत नव्हत . फार अर्जंट आहे व हे त्यांना समजेल अशा भाषेत एक्सप्लेन करायच होत , असा विचार होता पण इकडे भलतच त्यांना यातल काही समजून घ्यायच नव्हत . मग मला काय नुसतं ते घेऊन येण्यासाठी इकडं पाठवल होत काय ? आणि काही काम असत तर मी त्यांच्या ऑफिसमध्येच थांबलो असतो पण तसही नाही मला चक्क बाहेर थांबायला सांगितल . जाऊदे आता काय पर्याय आहे ?

बाहेर आलो समोरच गार्डन होत तिथ जाऊन बसायच ठरवल . जाऊन बसलो आणि परत विचार करू लागलो , आता या मंजूला कस आणि काय समजवायच ? किती दिवस झालेत आता तिला अजून किती वेळ द्यायचा ? आणि वेळ देऊनतरी काही फरक पडणार आहे का ? नाही आता खूप झाल आता काहीतरी करायलाच हव . पण काय ? काय करायच ? असा विचार करत सहजच इकडे-तिकडे बघत होतो तर समोर पूजा दिसली , स्मोकिंग करत होती . मी पहात होतो इतक्यात तिनही माझ्याकडे पाहिलं आणि वेव्ह केल . मीही प्रतिउत्तर दिल . ती तिथून उठून इकडे येऊन बसली .

" सो बडी इकडे कुठे ? ऑफिस सोडून यावेळी इकडे कुठे ? "
आता काय सांगणार होतो मी ?
" जरा काम होत या ऑफिसमध्ये म्हणून आलो होतो . " माझ लक्ष जस्ट तिच्या सिगारेट कडे गेल .

" काय आहे ? करते मी स्मोक कधीकधी . डोक्याला काय कमी चिंता आहेत का ? तुमच आपल बर आहे सगळ लाईफ कस सेट झाल आहे . कशाची काही चिंता नाही आणि काळजी नाही . "

कोण कुणाला बोलत होत ? हद्द झाली आपल्याकड असच असत ना शाळेत असताना वाटायच आपल्याला किती अभ्यास करावा लागतो कॉलेज स्टूडंटस् मात्र उंडारतात , त्यांच भारी आहे . पुढे कॉलेजात अस वाटत जॉब नाही तोपर्यंत काही नाही . जॉबवाल्यांच भारी आहे . जॉब लागल्यावर वाटत मॅरीड लोकांच बर आहे सगळं सेट काही चिंता नाही . आणि आता कळतय सगळं मृगजळ आहे आणि आपण त्याच्यामागे धावत रहातो . तिचाही तोच भ्रम होता . तो मी तसाच राहू दिला आणि तिच्या बोलण्यावर फक्त स्माईल दिली .

" चांगल आहे तुम्ही हसा आमच्यावर आमची दुःख , टेन्शन्स् तुम्हाला काय कळणार ? या जनरेशनचे प्रॉब्लेमस वेगळे आहेत . "
म्हणजे मला जुन्या जमान्यात पाठवल होत .

" म्हणजे अगदी तस नाही यू आर स्टील यंग बट . "
म्हणजे यू आर नॉट सो यंग . ग्रेट मला थेट मोडीतच काढल होत . मी काहीही प्रतिक्रिया नाही दिली . याचा तिला बहुतेक राग आला .

" आता काय मोठाच चर्चेचा विषय झाला ना , मुलगी स्मोक करते म्हणजे काय ? तुम्हीही तसेच ओल्ड फॅशन्ड . मुलींनी स्मोक केल तर काय आभाळ कोसळणार आहे का ? "

" तस नाही कुणी स्मोक कराव कुणी नाही हा ज्याचा त्याचा निर्णय आहे . तो त्यानेच घ्यावा . ज्याला त्याला हक्क आहे आपल्या आयुष्याची कशी वाट लावावी . इथे मुलगा मुलगी असा भेद नाही . पण नॉर्मली मुली अशा ठिकाणी ओपनली स्मोक करत नाहीत म्हणून बस बाकी काही नाही . "

" हो मीही कधी अशा ठिकाणी स्मोक करत नाही पण आज .. जाऊदे . Just leave that topic . So tell how is your sex life ? "

विषय बदलण्यासाठी इतके टॉपिक आहेत , अगदी समोरच्याला अडचणीत टाकता येतील असे इतरही प्रश्न आहेत पण हे म्हणजे अती झालं . आता यावर उत्तरतरी काय द्याव ? आणि तिलाही याच्या उत्तराची अपेक्षा नक्कीच नसेल .

" relax , just kidding . "

" नाही ते ठीक आहे पण विचार करत होतो हाच प्रश्न मी तुला केला असता तर ? "

" what do you want to know , whether I am virgin or not ? "

"नाही हा तुझा Personal विषय आहे . मला याबद्दल विचारण्याचा काहीच हक्क नाही . "

" you are quite cool . जुन्या लोकांसारखी थिंकिंग नाही तुझी . उगा एखाद्या गोष्टीचा बाऊ करत नाही .आमच्या ग्रूपमध्ये का येत नाही ? कधी आमच्या कॉलेज ग्रूपमधे ये friend , तुला आवडेल . आणि त्यांनाही तू नक्की आवडशील . संडेला का येत नाही आमच्या कॉलेजमध्ये ? "

" सुट्टी असेल ना ? "

" नाही एक्स्ट्रा लेक्चर असत . मग त्यानंतर आम्ही खूप एंजॉय करतो . 8 to 9.30 लेक्चर असत . तू ये ना त्यानंतर . "

" ओके "

" आणि हो तू आता मला फारच कुल वाटायला लागला आहे . लग्न करशील माझ्याशी ? " सोबत एक रहस्यमय स्माईल . जोक म्हणून , सिरीयसली , मला चेक करण्यासाठी काहीएक कळल नाही त्यातुन .

पण मला मात्र शॉक बसला चांगलाच . काय चाललय काय ? मला यावर काय रिएक्ट व्हाव तेच कळेना . कसबस इतकच बोलू शकलो

" मंजूच काय मग ? "

" काय ? "

" तेच विचारतो आहे काय तिच ? "

" तूच सांग कुठे आहे ती ? आणि काय विचार आहे पुढे तिचा ? तुलातरी माहीत आहे ना . बॉस ये ट्वेंटी ट्वेंटी के जमाने में आप तो टाइमलेस टेस्ट खेलने लगे , वो शादी का बाद में पर बाकी सवालोंके जवाब जरूर ढूंढ लेना . "

माझ्या डोक्यात प्रश्नांच काहूर माजवून ती मात्र शांतपणे निघून गेली . खरच काय होत माझ्याकडे याच उत्तर ? अगदी काहीच नाही . आणि कधी मिळणार होती याची उत्तरं , तेही माहीत नाही . खरच मी कशाचाच विचार करत नव्हतो . मी खरच खूप जास्त समजूतदारपणा दाखवतो आहे हे तर चुकत नाही ना माझ ?

काहीही कारण नसताना तिने माझ्यावर marital rape चे आरोप केले नशीब परत किमान सांगितल तरी की ते खोट आहे . पण तोपर्यंत माझी , माझ्या मनाची काय अवस्था झाली याचा तिने विचारही केला नाही . आता वैवाहिक जीवनात काही प्रॉब्लेम असेल तर दोघांनी सोबत त्याला लढा द्यायला हवा पण हिच वेगळच कधीपासून तिकडे जाऊन बसली आहे , मला काळजी वाटते तिची पण तिच आपल काहीतरी वेगळच . प्रयत्नच करायला तयार नाही . आणि आता इतके दिवस दूर राहून फारच विचित्र वाटत आहे . का म्हणून हा त्रास सहन करतो आहे काय माहीत ? संसार म्हणजे फक्त शरीर संबंधच नाही तर तिथे दोघांचे सोबत असणे , त्यांचा संवाद हेही महत्त्वाचे आहे . आता नाही एकट राहता येत , मेंटली तितकी स्ट्रेंथ वाटत नाही , फारच वीक झाल्यासारख वाटत आहे मेंटली . I need her . I need her badly . ती का अंत पाहते आहे माझा , माझ्या सहनशक्तीचा ? नो आता स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय काही होणार नाही . माझाही काही हक्क आहे तिच्यावर . आता थोड एग्रेशन खूपच जरूरी आहे . आता विचार खूप झाला , कृती करन गरजेच आहे आता .

" हॅलो मी येतो आहे तुला घ्यायला परवा . "

" नको आत्ताच . "

" नको नाही मी तुला इकडे घेऊन येणार आहे . "

" एवढी घाई नका ना करू . थोडा वेळ द्या ना मला . "

" खूप वेळ झाला , आता इकडे ये आणि मग विचार कर . "

" ठिक आहे येते मी पण अस घाईगडबडीत नको . "

" घाई कसली आधीच खूप उशीर झाला आहे ."

" हो येते पण पुढच्या आठवड्यात . "

... क्रमशः
भाग १ http://www.misalpav.com/node/34867
भाग २ http://www.misalpav.com/node/34922
भाग ३ http://www.misalpav.com/node/34975
भाग ४ http://www.misalpav.comnode/35040
भाग ५ http://www.misalpav.com/node/35115
भाग ६ http://www.misalpav.com/node/35170
भाग ८ http://www.misalpav.com/node/35325
भाग ९ http://www.misalpav.com/node/35678
भाग १० http://www.misalpav.com/node/35702
भाग ११ http://www.misalpav.com/node/35716
भाग १२ http://www.misalpav.com/node/35730
भाग १३ http://www.misalpav.com/node/35976

कथा

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

24 May 2016 - 5:50 pm | मराठी कथालेखक

मस्त... मजा आली.. मग आता पुढच्या आठवड्यात खरंच आणा तिला.. नाहीतर पुन्हा महिन्याने उगवाल :)

अनाहूत's picture

24 May 2016 - 6:01 pm | अनाहूत

हो नक्कि

मराठी कथालेखक's picture

30 May 2016 - 1:02 pm | मराठी कथालेखक

मी वाट बघत आहे ...

फार वाट नाही पहावी लागणार . पुढील भाग घेऊन येतो आहे .

मराठी कथालेखक's picture

2 Jun 2016 - 7:17 pm | मराठी कथालेखक

तू छूपी है कहॉं .....

अभ्या..'s picture

24 May 2016 - 6:03 pm | अभ्या..

जमतेय. मस्त.
येऊद्या

आभारी आहे प्रतिसादाबद्दल . :-)