✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शृँगार ६

अ
अनाहूत यांनी
गुरुवार, 03/03/2016 - 12:53  ·  लेख
लेख
रूटिन लाईफ सुरू होत मधुन अधुन बायकोला डॉक्टरांकडे जाण्यासाठी गळ घालत होतो . पण ती काही यायला तयार होत नव्हती आणि आमच ब्रम्हचर्य पालन सुरू होत . नविन अस काही घडत नव्हत . पण त्या दिवशी ऑफिसमध्ये थोडी नविन चर्चा सुरू होती . दळवी काका रिटायर होणार होते पुढच्या आठवड्यात त्यामुळे त्याबद्दल चर्चा सुरू होती . बाकी आमच्या ऑफिसचा बहुतेक स्टाफ हा जुनाच होता . सगळे कलिग जुनेजानतेच होते आणि मी जॉईन झालो तेव्हापासून फारसा बदलही नाही . त्यामुळे सर्वांना काकाच म्हणतो . तर सर्वांच मत अस होत की रिटारमेंटच्या दिवशी औपचारिक कार्यक्रम घेऊ पण आपली खरी पार्टी त्याच्या आधीच करावी , नंतर काही ठिक वाटनार नाही . सो संडेला पार्टी घ्यायचा विचार होता . मी मनात विचार करत होतो अस झाल तर एक सुट्टी गेली . आधीतर वेळ मिळत नाही आणि त्यात आणखी हे . तेवढयात इतरांनीही या बद्दल प्रॉब्लेम सांगितले आणि संडेला कुणाला काही काम निघाल तर अजून मेंबर कमी होतील म्हणून शनिवारीच ऑफिसनंतर भेटायच ठरल . शनिवारीही ऑफिस असणाऱ्या काही दुर्दैवी लोकांमध्ये आमचा समावेश होतो . असो त्यानंतर भेटायच म्हणजे फूल नाईट पार्टीच होणार . आणि यांच्या पार्टीज् म्हणजे.... असो . शनिवारी घरातून निघतानाच मंजूला रात्री उशीरा किंवा रविवारी सकाळी असच सांगून निघालो . ऑफिसनंतर सर्वजण डिसोझांच्या घरी पोहोचलो त्यांची फॅमिली बाहेरगावी गेल्यामुळे ही उत्तम सोय झाली होती . जातानाच लागणा-या सर्व गोष्टींची सोय केली होती . यावेळी घरी जाऊन जेवण बनविण्यापेक्षा बाहेरूनच मागविल होत जाता-जाताच त्याला ऑर्डर दिली होती त्यामुळे घरी पोहोचल्यावर काही वेळातच जेवणाच पार्सल घरी पोहोचणार होत . हे फारच चांगल होत कारण गेल्या वेळी जेवण बनवन्यातच फार वेळ गेला होता आणि जेवण ही बिघडल होत . त्यामुळे या वेळी आधीच सगळी तरतूद करून ठेवली होती , ज्याचे त्याचे ब्रँड, आवडती शीतपेय , चकना या सदरात मोडणा-या विविध वस्तू यांची रेलचेल होती . काही वेळ गप्पा होतील तर कसल काय काही जनांना आधी ग्लास मांडल्याशिवाय बोलण्यात अर्थ वाटत नव्हता . त्यामुळे जेवण यायची वाट न पाहता आधी या कार्यक्रमाची सुरूवात झाली . ग्लास मांडले गेले . ज्याचे त्याचे ब्रँड त्याच्यापाशी पोहोचले . Same ब्रँड वाल्यांचे एकत्र ग्रुप झाले . अशा ठिकाणी माझ्यासारख्या न पिणा-या माणसाची गोची होते . तेवढयात मलाही घेण्यासाठी आग्रह झाला . मी नकार दिला यावर डिसोझा म्हणाले " अरे बायकोला घाबरतो कि काय ? ती पिऊ देत नसेल . " " बायको पिऊ देत नाही , का ? अरे डायरेक्ट तोंड लावायच अन तिला प्यायला सुरूवात करायची . अरे बायका नाही म्हणतात पण त्यांना आवडत हे . पी तू बिनधास्त बायकोला . " " अरे इथे बायकोला प्यायच नाही चालल . इथ wine बद्दल बोलतोय आम्ही . " " अरे its big boys drink . ये तो अभी बच्चा है ." झालं म्हणजे drinks नाही केल कि बच्चा ठरणार , चांगल आहे . पण मला सवय आहे त्याची आजपर्यंत अनेक वेळा ऐकलय हे . " डिसोझा तू बाकी जाम रंगेल माणूस . तू तर बायकोला अजिबात सोडत नसचील . " " अरे अजिबात नाही . " " मग आता फॅमिलीला कस सोडल . " " अरे काम आहे म्हणून गेलेत सगळे . आणि आताची गोष्ट वेगळी आहे पण तेव्हा दोन दोन दिवस तिला कपडे घालू देत नव्हतो घरात . " " म्हणजे शेजा-या पाजा-यांना काय मॅटिनी शो असायचा म्हण कि . " " अरे नाय तेव्हा आमचा जूना बंगलो होता ना , काय बोलता तुम्ही वाड वडिलांचा . सो मस्त प्रायव्हसी होती नाहीतर आता बायकोच्या तोंडातून जरा मोठा आवाज निघाला तर शेजारी सगळ्यांना कळायच . " " म्हणजे आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो . " " तोंड दाबून ठिक आहे पण बुक्क्यांचा नाही ...." " अरे मग तोंड तरी कशाला ? ...." अशा तर गप्पा सुरू होत्या . तेव्हढ्यात जेवण आल मग सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरूवात केली . जेवतानाही गप्पा सुरूच होत्या . जेवण मस्त होत . नेहमी घरच जेवण चांगल पण कधीतरी बाहेर जेवल तर जाम मजा येते . बाकी हे लोक इकडच इतके खुलतात . हे सगळ चालल होत तेव्हढ्यात सावंत काकांनी मला विचारल " तुझ सगळ ठीक आहे ना ? " " अरे असणारच . आता काय त्याचे सुगीचे दिवस आहेत . " " जरा टेंशनमधे वाटला म्हणून विचारलं " " अरे टेंशन बिंशन घ्यायच नाही , होत सगळ बरोबर ." " बाकी बायकोला खुश ठेवलस कि सगळ जिंकला ." " अहो सोप आहे का बायकांना खुश ठेवायच ? कितीही केल तरी त्यांच समाधान होत नाही ." " अरे इतकही अवघड नाही बस बेडमध्ये खुश ठेव तिला खुश राहिल ती . " " आणि बघ बायकांच नाही म्हणजेपण होच असत . " " आणि कधी नाही म्हणजे नाही असल तरी तुला ते हो करायला यायला हव . " " म्हणजे काय forcefully किंवा रेप नाही करायचा . " " तुझ्या नुसत्या बोलण्याने तिची कळी खुलली पाहिजे . " " आणि ती स्वतःहून पुढे आली पाहिजे , नुसत्या बोलण्याने ." " बहुतेक वेळा हे मानसिकच असत त्यामुळे नुसत बोलून सुद्धा हे clear होत ." " आणि अगदी कधी फार दमायला झाल तिला तर २-३ दिवस थोडा ब्रेक द्यायचा याला . मग पुढच्या दिवशी मागची सारी कसर भरून निघते ." " तुझी बायको तर जॉबपण नाही करत ना मग तर तिला प्रवासाची दगदग ऑफिसच्या कामाच टेंशन अशा गोष्टींचा त्रासही नाही ." " आणि हे बघ थोडे ऍग्रेशन आण आयुष्यात नुसत पॅसीव असून चालत नाही ." " स्वतःहून पुढाकार घे . नुसत बायकोच ऐकत राहू नको . " इतक्यात परत घेण्याचा आग्रह झाला . थोडी घेतली म्हणजे ऍग्रेशन येईल म्हणून आग्रह होत होता . मी घेणारच नव्हतो पण आग्रह वाढल्यावर मनगटावरील बांधलेले धागे दाखवले . मग मात्र डिसोझा म्हणाले " ते बाबा तुज काय देवाच असेल तर राहूदे उगाच आमच्यामुळ नको ते ब्रेक व्हायला . ठेव तुजा दंड तुझ्यापाशी आमचा ग्लास राहूदे आमच्यापाशी ." " अरे डिसोझा मनगट म्हणतात त्याला , दंड नाही ." " हो आज दंड म्हणाला उद्या लं* म्हणशील . " " हो पण एकवेळ कोणी दंडाला दोरा बांधेल , तिथे कशाला बांधेल ? " " अरे दोरा बांधतात तो संयमनासाठी . ज्याला तिथल संयमन हव असेल तो बांधणार तिथे दोरा . " " अरे सावधान पोझिशन मधे दोरा बांधला तर तो विश्राम पोझिशन मधे पडणार नाही का ? " " आणि विश्राम मधे बांधला दोरा तर तो सावधान होताना काचनार नाही का ? " " अरे नुसता काचनार काय बोंन्झॉय होईल त्याच . " " हो ते बोन्झॉय बनवताना त्या झाडाच्या मुळ्या तारेने करकचुन बांधतात . मग ते झाड वयान वाढत पण साईझ नाही वाढत जास्त ." " तसा इथ काय साईझ वाढू द्यायचा नाही का काय ? " यावर सगळे मनसोक्त हसले . " अरे बायकोन तस फर्मान सोडल तर तेही कराव लागेल . " " हो बायकांना घाबरून तर सगळेच असतात . " " त्याच्यावर मस्त जोक सुचला आहे . " " हा सांग सांग . " सर्वांनी एकत्र मागणी केली . " तर मग ऐका , एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो...... क्राइम ब्रँच - हा…बोला.... पोलिस - साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली... क्राईम ब्रॉच - मग तुम्ही तिला अटक केली का नाही...... पोलिस - नाही साहेब.............. फरशी अजुन वाळली नाही ...... यावर मात्र सर्वांची हसून हसून मुरकुंडी वळली . ... क्रमशः भाग १ http://www.misalpav.com/node/34867 भाग २ http://www.misalpav.com/node/34922 भाग ३ http://www.misalpav.com/node/34975 भाग ४ http://www.misalpav.com/node/35040 भाग ५ http://www.misalpav.com/node/35115

Book traversal links for शृँगार ६

  • ‹ शृंगार ५
  • Up
  • शृँगार ८ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
13375 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

ये तोडा निसरडी जमीन पर चलने

अभ्या..
गुरुवार, 03/03/2016 - 13:39 नवीन
ये तोडा निसरडी जमीन पर चलने जैसा है. तोल संभालो. तबतक हम सांस संभालते है. अच्छे बॅलन्सपे तालीया अपनेआप बजेंगी. . फरशी वाळल्यावर प्रतिसाद येतील बहुतेक ;)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी ;)

बॅटमॅन
गुरुवार, 03/03/2016 - 14:23 नवीन
अगदी अगदी ;) (फरशी वाळायची वाट पाहणारा) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तोच प्रयत्न आहे . बाकी फरशी

अनाहूत
गुरुवार, 03/03/2016 - 18:05 नवीन
तोच प्रयत्न आहे . बाकी फरशी वाळत राहील , प्रतिसाद देत रहा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मर्यादाभंग होतोय

चलत मुसाफिर
गुरुवार, 03/03/2016 - 14:18 नवीन
आधीचे भाग असे नव्हते. तोल सांभाळावा ही नम्र विनंती
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल धन्यवाद . इथे

अनाहूत
गुरुवार, 03/03/2016 - 18:19 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद . इथे थोडी आवश्यकता असल्यामुळे कथा या बाजूला थोडी झुकली आहे , हा फक्त एक भाग आहे मुळ मुद्दा serious च आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

हम्म !!

खटपट्या
Fri, 03/04/2016 - 01:35 नवीन
हम्म !!
  • Log in or register to post comments

विषय खरंच खूप नाजूक..

शित्रेउमेश
Fri, 03/04/2016 - 10:09 नवीन
विषय खरंच खूप नाजूक.. महत्त्वाचा... इंटरेस्टिंग... आणि...???? बास... एकदम खास आहे हे मात्र तेवढच खरंय... फरशी वाळायची वाट पाहतोय..
  • Log in or register to post comments

:-)

अनाहूत
Fri, 03/04/2016 - 22:02 नवीन
प्रतिसाद येत राहू द्या , फरशी वाळत राहील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शित्रेउमेश

फरशी वाळण्याची वाट पाहतो आहे

राहूल.
Sat, 03/05/2016 - 13:37 नवीन
फरशी वाळण्याची वाट पाहतो आहे
  • Log in or register to post comments

वाळेल हळूह्ळू , काळजी नसावी.

अनाहूत
Sun, 03/06/2016 - 12:13 नवीन
वाळेल हळूह्ळू , काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहूल.

पहिला भाग ११ फेब ला सहावा ३

मराठी कथालेखक
Tue, 03/08/2016 - 17:16 नवीन
पहिला भाग ११ फेब ला सहावा ३ मार्चला. कथा अजून विशेष पुढे सरकली नाही.. शृंगार इतका ताणत राहिला तर क्लायमॅक्सच्या आधीच नीरस होईल ना राव ?
  • Log in or register to post comments

मचाक स्टाईल श्रुंगार येऊन

प्रचेतस
Tue, 03/08/2016 - 17:19 नवीन
मचाक स्टाईल श्रुंगार येऊन उडूनही गेला. आहात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

भाग ७ ?

मराठी कथालेखक
Tue, 03/08/2016 - 19:27 नवीन
ओह... मी कार्यालयीन कामकाजात व्यस्त होतो ... भाग ७ का ? की अजूनही भाग होते ? कशाला उडवलेत बुवा...आणि आता उडवायचे तर सगळेच भाग उडवायला हवेत ना. मालिकेतील एक-दोन भाग उडवण्यात काय अर्थ ? असो. दुसरीकडे कुठे वाचायला मिळतील का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अहो खुपच पांचट होता म्हणून

प्रचेतस
Tue, 03/08/2016 - 20:17 नवीन
अहो खुपच पांचट होता म्हणून उडवण्यात आला असावा. बहुधा मचाक संस्थळावर वाचावयास मिळू शकेल. ( मी तेथे सदस्य नसल्याने मिळू शकेलच असे ठामपणे सांगू शकत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मचाक काय आहे ?

राहूल.
Tue, 03/08/2016 - 20:22 नवीन
मचाक काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छोटा भीम, ऑगी, पोकेमॉन,

अभ्या..
Tue, 03/08/2016 - 20:23 नवीन
छोटा भीम, ऑगी, पोकेमॉन, डोरेमॉनचे संवाद असतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहूल.

शुद्धिपत्रक

प्रचेतस
Tue, 03/08/2016 - 20:22 नवीन
पांचटच्या ऐवजी चावट असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

संस्थळाची link मिळेल का?

राहूल.
Tue, 03/08/2016 - 20:25 नवीन
संस्थळाची link मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भाग ७ ही प्रकाशित केला होता

अनाहूत
Tue, 03/08/2016 - 20:09 नवीन
भाग ७ ही प्रकाशित केला होता पण बहूदा काढून टाकण्यात आला मिपा संपादकांकडून . http://www.misalpav.com/node/35211
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

Access denied

राहूल.
Tue, 03/08/2016 - 20:20 नवीन
Access denied You are not authorized to access this page. लिंक उघडत नाही
  • Log in or register to post comments

खास लोकाग्रहास्तव

जव्हेरगंज
Tue, 03/08/2016 - 20:27 नवीन
खास लोकाग्रहास्तव भाग ७ आनंद घ्या !;););)
  • Log in or register to post comments

आभारी आहे .

राहूल.
Tue, 03/08/2016 - 20:37 नवीन
आभारी आहे . वाचला भाग . थोड जास्त झाल आहे पण काढून टाकण्या इतकाही नव्हता अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मायबोलीचा विजय असो..

मराठी कथालेखक
Wed, 03/09/2016 - 12:38 नवीन
मायबोलीचा विजय असो.. काय हे मिपाचे संम...अहो. शृंगार हाही एक रस आहे याचे विस्मरण झालेले दिसते ? मला वाटते आपण आपल्या धोरणाचा/निर्णयाचा पुनर्विचार करावा. लेखक महाशय, आपण मायबोलीचे दुवे इथे देत रहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

जव्हेरगंज लिंक दिल्याबद्दल

अनाहूत
Wed, 03/09/2016 - 18:25 नवीन
जव्हेरगंज लिंक दिल्याबद्दल आभारी आहे . मला भाग ७ ची मिपा वरील लिंक उघडत होती त्यामुळे ती संपादकांनी उडवली की नाही हे नक्की माहीत नव्हते , पण तुम्ही माबो वरील लिंक दिली ते बरे झाले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल

अनाहूत
Wed, 03/09/2016 - 18:27 नवीन
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभार .
  • Log in or register to post comments

मिपावर माबो च्या लिंक

जेनी...
Wed, 03/09/2016 - 20:52 नवीन
मिपावर माबो च्या लिंक कश्यापायी ??? एवढे व्याप करण्यापेक्षा माबोवरच जाऊन वाचावं .... नै का?? ;)
  • Log in or register to post comments

अहो आता येऊद्या की पुढचा भाग

राहूल.
Fri, 03/11/2016 - 10:52 नवीन
अहो आता येऊद्या की पुढचा भाग , का परत नविन भाग उडवला ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा