✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शृँगार १२

अ
अनाहूत यांनी
Mon, 04/18/2016 - 17:14  ·  लेख
लेख
" Hi friend how r u ? " - राधिका " I m fine n hows u ? " - मी " काय बोलू fine म्हणू की खर सांगू ? " - राधिका " खरच सांग . " - मी " काही प्रॉब्लेम असला की कुणापुढे बोलाव तेच समजत नाही . बाबा किती रागीट आहेत ते तुम्हाला माहीत आहेच . त्यामुळे त्यांच्यासमोर काही बोलायची हिंमत्तच होत नाही . आणि आई एकतर ignore करते नाहीतर भांडायला येऊ का तिथे अस बोलते , त्यामुळे तिला काही सांगण्यात अर्थ वाटत नाही . तुम्ही सांगत होता ते पटत आहे , काही bad girls पण असतात . आमच्या क्लासमधे पण एक ग्रूप आहे , ज्या सगळ्यांना टॉंन्ट मारतात , खूप वाईट कमेंट करतात . Even girls नी ज्या गोष्टींमधे दुस-या girl ला मदत करावी किंवा तिला समजून तरी घ्याव त्या टॉपिकवर या टॉंटिंग करतात even about ... जाऊ द्या . त्यांना स्वतःलाही हे फेस करायच असूनही त्या अस कस करू शकतात ते समजतच नाही . आणि काही गोष्टी classmates ना ज्या good friend वाटतात म्हणून सांगितल्या त्यानी त्या गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या . त्यामुळे कुणाशी काही बोलाव काही शेअर कराव की नाही हा प्रश्न पडतो . पण का कुणास ठाऊक तुमच्यासोबत बोलावस वाटल , हे शेअर करावस वाटल . तुमच्याशी बोलून आधार वाटतो . " - राधिका " तुला ऐकतोय तेव्हा मला अस वाटायला लागल आहे की स्वतःबरोबरच बोलतो आहे . स्वतःलाच ऐकतो आहे . मीही सुरूवातीपासून थोडा अबोल , काहीसा एकलकोंडाच त्यामुळे मित्रही फार कमीच . पण पुढे त्या घटनेनंतर मला पुढे अनेक दिवस फार दडपण वाटत होत , अगदी शाळा सुरू झाली तरीही . आमची काहीतरी internal exam छोटी test वगैरे होती . त्यात मला फारच कमी मार्क्स् मिळाले होते हे मी माझ्या एका मित्राला सांगत होतो . तिथे मला याच कारण शेअर करायच होत पण तिथे कुणीतरी आल त्यामुळे मला पुढे बोलता आल नाही पण नंतर मला समजल की मला कमी मार्क्स् मिळाले हे सर्वांना समजल आहे , त्या तसल्या टेस्टला फारसा काही अर्थ नसतो पण मी फेल झालो अशी जाहिरातच झाली , आमचे नातेवाईक शेजारी सर्वांनाच . मी हुशार विद्यार्थी त्यात अस म्हटल्यावर नातेवाईकांनी लक्ष द्या अशी पालकांकडे सूचना केली . याच मला वाईट वाटत होतच पण ज्याला आपण मित्र मानून हे सांगू इच्छित होतो त्याने हे सर्वांपर्यंत पोहोचवल याच जास्त वाईट वाटत होत . पण याच्यानंतर जी गोष्ट सांगणार होतो ती सांगणच अशक्य झाल . मग हळूहळू सर्वांवरचाच विश्वास कमी कमी होत कायमस्वरूपी उडाला . याचा फार तोटा मला झाला पुढील आयुष्यात . सोप्या सोप्या गोष्टींचही टेंशन वाटू लागल . त्यामुळे वयापेक्षा पुढे मानसिक आणि शारिरीक स्थिती पोहोचली होती . आता जीमला जातो त्या फिजीकल वर्कआउट मुळे काही प्रमाणात परिस्थिती सुधारते आहे असे वाटते आहे . पण आपल्याला थोड समाजात मिसळायलाच हव किमान काही गोष्टी शेअर करायलाच हव्या . मेन इशू हा नाही की त्याच समाधान व्हाव पण फक्त शेअर करूनही तुझ्या मनावरचा भार थोडा हलका होईल . तुला ती सर्वांपर्यंत पोहोचायची भिती आहे ना मग असे लोक शोध जे किमान ऐकतील , जशी तुझी आई . तू म्हणते ती इग्नोर करते . पण तू ती ऐकते आहे अस समजूनच सांग . May be ती लक्ष नाही देणार पण एखादी मोठी गोष्ट जी तीला वाटेल तेव्हा नक्कीच ती काही स्टँड घेईल . तुझ्या स्कुलच्या टिचर ना सांग . जी मुलगी तुला असे टॉंट मारते तेव्हा तिला विचार की तिला हे नाही का फेस कराव लागत ? ती ऐकेल . नाहीच ऐकल तर इतर मैत्रीणींना सोबत घेऊन तिची तक्रार कर टीचरकडे . ती होईल ठीक पण नाहीच झाली तरी तुझ्या सोबत तेव्हा अशा मैत्रीणी असतील ज्यांना हा त्रास होतो आहे तिच्यामुळे आणि त्यांच्यासाठी तू heroच असशील . ज्यामुळे त्या तुझ्या आणखी close friends बनतील . आणि तुला भविष्यात चांगली साथही देतील . आयुष्य म्हणजे काही सगळ्या गोष्टी परफेक्ट करणे किंवा असणे नाही तर आपण परफेक्ट होण्याचा आणि सगळ परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणे आहे . " - मी " थँक्स तुमच्यामुळे फार आधार वाटला . आणि confidence ही वाटतो आहे . पण एक शंका आहे मी त्यांना hero का वाटेन heroine का नाही ? " ...क्रमशः भाग १ http://www.maayboli.com/node/55229 भाग २ http://www.maayboli.com/node/55239 भाग ३ http://www.maayboli.com/node/55264 भाग ४ http://www.maayboli.com/node/55293 भाग ५ http://www.maayboli.com/node/55354 भाग ६ http://www.maayboli.com/node/55545 भाग ७ http://www.maayboli.com/node/55591 भाग ८ http://www.maayboli.com/node/58057 भाग ९ http://www.maayboli.com/node/58315 भाग १० http://www.maayboli.com/node/58327 भाग ११ http://www.maayboli.com/node/58339 भाग १२ http://www.misalpav.com/node/35716

Book traversal links for शृँगार १२

  • ‹ शृँगार ११
  • Up
  • शृंगार १३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
4634 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

शृंगाराच्या वाढलेल्या

मराठी कथालेखक
Mon, 04/18/2016 - 17:41 नवीन
शृंगाराच्या वाढलेल्या वेगाबद्दल आभार !! बाकी मूळ विषय/कथा बाजूला पडत आहे की काय अशी शंका येते. असो. पुढचे भाग अशाच वेगाने येवू द्यात.
  • Log in or register to post comments

ह्म्म.. आता मलाही असे वाटायला

आनन्दा
Mon, 04/18/2016 - 18:36 नवीन
ह्म्म.. आता मलाही असे वाटायला लागले आहे.. अवांतर थोडे जास्ती होते आहे.. किंबहुना ते थोडे विषयाला सोडून चाललेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

वेग जरा बेताचा ठेवला तरी

राहूल.
Tue, 04/19/2016 - 15:21 नवीन
वेग जरा बेताचा ठेवला तरी चालेल पण भाग जरा मोठे टाका .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा