शृँगार ११

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
16 Apr 2016 - 10:28 pm

" तुमच्या बद्दल अस कस होऊ शकत ? "

" इथे physical strength कमी असण्यापेक्षा mental weakness मुळेच हा त्रास सहन करावा लागतो . "

" अरे brother sorry तुला आमच्यामुळे फार थांबाव लागल ." मघाचा बिल्डर अँड फ्रेन्डस् आले होते .

" अरे हे लोक्स कुठेपन पुस्तक ठेवतात त्यामुळ तुला त्रास, sorry हा भाई ." झालेल्या त्रासामुळ आणि त्याच्या थोड्याफार ताणाने त्याची original language परत आली होती .

" अरे इट्स् ओके चल फाड ६०० ची पावती . मला जरा पटकन जाऊन यायच आहे . " त्यानही अजिबात आढेवेढे न घेता पावती फाडली . मीही निघालो पटकन . बाहेर जाऊन नाष्टा केला . एक चक्कर टाकली आणि परत आलो . फिरताना मंजूला फोन करावा अस वाटत होत पण जे झाल होत त्यामुळे ते खूप अवघड वाटत होत . घरात येऊन बसलोच होतो तेव्हढ्यात मंजूचा फोन आला .

" I am sorry , मी त्या दिवशी बोलले कारण मला त्या विषयावर बोलायच नव्हत . मी जे बोलले तस मला कधीही वाटल नाही . "

" कधी येते आहेस माघारी ? "

" नको आत्ताच नको , मी राहते काही दिवस इथे . मी सांगेन तुम्हाला . "

" ठीक आहे . पण काळजी घे . "

" ok bye "

" bye "

या एका फोनने माझ्या डोक्यावरच केवढ मोठ ओझ कमी केल होत . खूप शांत वाटल होत . आपल्या कडून अस काही झालेल नाही ही भावना खरच खूप छान होती .
या आनंदात होतो तेव्हढ्यात डोअर बेल वाजली .

" हाय , तुम्ही काही कामात नाही ना ? "

" नाही नाही . तू ये ना . "

ती आत आली .

" जेवण झाल का तुझ ? "

" हो . मी जेवले . तुम्ही नसाल ना जेवला अजून ? "

" नाही . माझा नाष्टा जरा उशीराच झाला आहे . त्यामुळे जेवण जरा निवांतच . तु बोल काय म्हणते आहेस ? "

" ते मघाशी आपण बोलत होतो आणि आपला विषय अर्धवटच राहिला . "

" तुझी आई येते आमच्याकडे . मंजूच आणि त्यांच छान जमत . पण तू कधी आलेली नाहीस आमच्याकडे . आपण आज पहिल्यांदाच बोललो तरीही तू माझ्याशी इतक्या मोकळेपणानं बोललीस . "

" काही माहीत नाही पण तुमच्यावर फार विश्वास वाटला . कदाचित आपण बोलायच्या आधी तुम्ही त्या मुलांबरोबर जसे बोलत होता आणि कुणी कितीही अगदी छोटस , कमी महत्त्वाच किंवा अगदी फालतू जरी बोलल तरीही तुम्ही ते ऐकून घेत होतात आणि मग रिएक्ट होत होता . कुणाचही बोलण तुम्ही उडवून लावत नव्हता . सो म्हणूनच मला वाटल तुमच्याशी या गोष्टी शेअर कराव्या . नाहीतर काही लोकांशी खूप दिवस जरी ओळख असली तरीही त्यांच्याशी नाही अस बोलता येत . "

" समंजस आहेस . विचार करून वागतेस . "

" इथ जरा वेगळ आहे , मी बोलले तुमच्याशी तेव्हा मी हा विचार नव्हता केला . घरी गेल्यानंतर मला वाटल आपण इतक कस बोललो पहिल्यांदाच . इतर वेळी मी नेहमीच्या लोकांशीही इतक नाही बोलत कधी . त्यावर विचार केला आणि मग हेच एक कारण वाटल . "

" so nice . तुझ्या सबकॉन्शस माइंडने सगळ एनालिसीस केल . खरच काही लोकांना आपण आयुष्यभर भेटूनही ओळखू शकत नाही आणि काही लोकांना अगदी पहिल्या भेटीतच ओळखता येत . बाय द वे आपली ऑफिशीयली ओळख करून घेऊया का ? तू ..."

" मी राधिका आता 9th मधे आहे ."

" आणि मी ..."

" मी तुम्हाला friend म्हणू ? "

" हो चालेल ना . चालेल काय धावेल . "

" कुठे trademill वर कि रस्त्यावर ? "

" मला तर दोन्हीकडेही धावायची सवय आहे . "

यावर ती मोकळेपणानं हसू लागली . मीही त्यात सामील झालो .

" बर निघते मी friend , तुम्हाला अजून जेवायच आहे . तुम्ही स्वतःहून नाही सांगणार भूक लागली असली तरी . जेवून घ्या तुम्ही . आपण बोलूया परत . bye ."

" bye "

किती छान . हे छोट्या छोट्या गोष्टीवर हसणं , आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण हे सगळं विसरलोच आहे आपण . उगाचच लाईफ फार अवघड करून घेतली आहे आपण . चला एकदा मंजूला फोन करूया . मघाशीच बोललो म्हणून काय झाल परत फोन करूया .

" हे हाय मंजू ."

" हाय "

" मंजू तू ..."

" हे बघा मला सारख सारख परत बोलावू नका . आपल बोलण झाल आहे आत्ताच . मी म्हणाले ना मला थोड शांत होऊ द्या . मग बोलू आपण या विषयावर . "

" मी तर फक्त तू जेवलीस का हे विचारायला फोन केला होता . "

" हो जेवले मी . आणि तुम्ही सारखा सारखा नका करू फोन . मी सांगेन तुम्हाला . माझी मनस्थिती चांगली नाही आता . ठेवते . "

yes she need some time . थोडा फरक तर हवा ना टीनएजर आणि आपल्यात .

सोमवारपासून आपल रूटीन लाईफ सुरू झाल . दिवसभर ऑफिसमुळे तेवढाच वेळ जायचा . घरी आल की घर खायला उठायच . टिव्ही बघायचाही कंटाळा यायचा . पण काय करणार ? असाच फार बोर झालो होतो म्हणून टेरेस वर आलो होतो . थोडा वेळ फिरलो एवढ्यात कोणीतरी आल्याच जाणवल पाहिल तर राधिका होती .

" अरे तुम्ही इथे ? "

" हो फार बोर होत होतं म्हणून आलो होतो . आणि तू ? "

" मी नेहमीच येते छान वाटत इथे . "

" एकटीच येतेस ? "

" हो मला थोडा वेळ स्वतः बरोबर घालवायला आवडतो . "

मी स्वतःलाच प्रश्न विचारतो आहे आणि स्वतःच उत्तर देतो आहे अस वाटल . मलाही अस स्वतः बरोबर काही वेळ तरी घालवल्याशिवाय बर वाटायच नाही . तो माझ्यातला मी आता एकटा पडला आहे काहीसा . गेले काही दिवस कोणी नसत बरोबर तरीही त्या माझ्यातल्या मी पर्यंत नव्हत पोहोचता आल . आता प्रयत्न करेन बहुतेक सापडेल तो .

" काय झाल कुठे हरवला तुम्ही . तुम्हाला वाटल असेल ना काय वेडी मुलगी आहे ही . "

" नाही ग आधी मलाही आवडायच अस स्वतः बरोबर राहण पण नंतर वेळच नव्हता आणि आता वेळ आहे तरी नाही राहिलो स्वतःपाशी . "

" तुम्ही तुमचे शाळेत असतानाचे दिवस मिस करत असाल ना ? "

" काही दिवस मिस करतो आहे पण काही दिवस विसरण्याचा प्रयत्न करतो आहे."

"तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्याबरोबर शेअर कराल का ? अस ऐकल आहे की दुःख शेअर केल की कमी होत . "

" हे सगळ साचून राहील होत इतकी वर्ष पण आज मन मोकळ करावस वाटत आहे तुझ्यापुढे . तेव्हा मी 8th ची exam दिली होती आणि सुट्टीत गावी गेलो होतो . तिथे सगळ छान होत पण माझ्या दुरच्या आत्याची मुलगी जी आमच्यापेक्षा चार एक वर्षांनी मोठी होती ती सर्वांना bully करायची . माझ्यापेक्षा सगळे लहानच , जे सगळे तिला घाबरायचे कारण ती होतीच तशी ६ फुटांच्या आसपास उंची आणि तब्येतही फारच . पण मी काही तिच ऐकायचो नाही .

एकदा मी असाच एकटाच होतो घरी तेव्हा ती तिथे आली आणि नेहमीचच सुरू केल पण मी काही ऐकत नव्हतो . आणि आता इथे थांबायला नको म्हणून मी बाहेर निघालो तेव्हढ्यात तिने मला पाठीमागून पकडले . मी सुटण्याचा प्रयत्न करत होतो आणि जवळपास त्यात यशस्वी झालोच असतो . तिने पाहिल की ती काही जास्त वेळ मला पकडून ठेवू शकत नाही तेव्हा तिने सरळ तिचा हात पुढच्या बाजूला आणला आणि माझ्या प्राइव्हेट पार्टपाशी ठेवला . मला ते फारच विचित्र वाटल आणि मी सुटण्याचा आणखी प्रयत्न करत होतो तर तिने सरळ माझ्या प्राईव्हेट पार्टला पकडल . मी सुटण्याचा प्रयत्न केला की ती तिची पकड आणखी घट्ट करत होती . मला त्रास होत होता म्हणून मी थांबलो तेव्हा तीही थांबली . मला पाठीमागून घट्ट पकडून ती माझ्या कानात बोलली

" माझ सगळ ऐकायच आता नाहीतर सगळ्यांना सांगेन तुझी काय गंमत केली ते ."

मला का कुणास ठाऊक असच वाटत होत की ही माझीच चूक आहे आणि जर तिने हे सगळ्यांना सांगितलं तर सगळे आपल्यावर हसतील . म्हणून मी तिच ऐकत गेलो आणि कुणाला काही सांगितलं नाही . मी तिच ऐकत होतो तरीही ती तस नेहमी करतच होती आणि नाही ऐकल तर खूप जास्त करेन अस सांगत होती . दिवसेंदिवस तिची पकड आणखी घट्ट होत चालली होती . आणि आता तिने पकडण्या बरोबर कसही ओढायला सुरूवात केली होती . होणारा त्रास माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे पोहोचला होता .

अगदीच जेव्हा अशक्य झाल तेव्हा मी तिला होणा-या त्रासाबद्दल सांगितल आणि ती म्हणेल तस करेन पण आता हे बंद करण्याबद्दल सांगितल . ती म्हणाली की ती ते बंद करायला तयार आहे पण मला तिच्यासोबत नवरा बायको जस करतात तस कराव लागेल . त्यावेळी मला ते नक्की काय असत तेही माहीत नव्हत . पण तिच्या सोबत अस काही करन फार चुकीच आहे हे मात्र समजल होत . मी काहीच बोललो नाही पण दुस-या दिवशी मला घरी सोडून यायला सांगितल . मला काकांनी घरी आणून सोडल . घरी आलो तरीही मला भीती वाटत होती की ती इकडेही येईल . याबद्दल मी मित्रांसमोर विषय काढला होता पण प्रस्तावनेतच कोणी मुलगी कुठल्याही मुलाला अशी bully करू शकणार नाही अस त्यांच मत झाल आणि ते माझ्यावर हसू लागले . मी अजून हेही सांगितल नव्हत की नक्की काय केल आणि हे माझ्या स्वतःच्या बाबतीतच घडल आहे . मग मी याबद्दल कुणालाही सांगितल नव्हत आजपर्यंत .

मला फार राग यायचा तिचा व तिला मुलगी असली तरी खाड खाड थोबाडीत माराव्या अस वाटायच . पण एकदा मी बसमधून जाताना ती दिसली होती . तीने ज्याक्षणी माझ्याकडे पाहील तेव्हा मला इतकी भीती वाटली की माझे हातपाय लटलट कापू लागले . तस पाहिलं तर मी physically तिचा सामना करू शकलो असतो पण mental weakness मुळे काहीही नाही करू शकलो . त्याला कारणीभूत ठरली ती भीती जी लहानपणी माझ्या मनात भरून राहीली होती . त्यासाठी मला त्याच वेळी प्रतिकार करायला हवा होता . कोणाचीतरी मदत घेऊन याला वाचा फोडायला हवी होती . तू आता लक्षात घे हे कुणाच्याही बाबतीत घडू शकत आणि कोणीही करू शकत . Boy or girl कोणीही . आणि याला अशी गोष्ट घडल्या घडल्या प्रतिकार करायला हव ."

" sorry माझ्यामुळे तुम्हाला त्या आठवणींना परत सामोरे जावे लागले ."

" नाही its ok मलाही व्यक्त होता आल . तू यातून प्रतिकाराच महत्त्व मात्र समजून घे . कोणत्याही परिस्थितीत प्रतिकार must आहे . कोणाची मदत घ्यायलाही घाबरू नको . आणि यात आपली चूक नसते तर जो अस करतो त्याची चूक असते हे पहिल स्वतःला पटवून घे , मग सगळ होत ठीक . "

" हो . मी हे लक्षात ठेवेन . "

" चल आता जाऊया बराच वेळ झाला . "

... क्रमशः

भाग १ http://www.misalpav.com/node/34867
भाग २ http://www.misalpav.com/node/34922
भाग ३ http://www.misalpav.com/node/34975
भाग ४ http://www.misalpav.com/node/35040
भाग ५ http://www.misalpav.com/node/35115
भाग ६ http://www.misalpav.com/node/35170
भाग ८ http://www.misalpav.com/node/35325
भाग ९ http://www.misalpav.com/node/35678
भाग १० http://www.misalpav.com/node/35702

कथाविचार

प्रतिक्रिया

पण मूळ लेखनविषयाशी याचा सबंध जोडला असता तर बरं झालं असतं.

जव्हेरगंज's picture

16 Apr 2016 - 11:15 pm | जव्हेरगंज

कै च्या कै .

लगे रहो.

रातराणी's picture

17 Apr 2016 - 10:11 am | रातराणी

अर्र्र गाडी पार ट्रॅक बदलून दूसर्याच स्टेशनला लागली. या भागाची आवश्यकता नव्हती अस वाटतंय.

मराठी कथालेखक's picture

18 Apr 2016 - 11:41 am | मराठी कथालेखक

माझ्या आवडत्या विषयांकडे गाडी काहीशी वळली :)

कय चाललय कळायला मार्ग नाही.......

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद . असेच
प्रतिसाद येऊ द्या . बाकी या भागात विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे आणि शंकाच निरसन इथ करणे
खरच अवघड आहे . यांच उत्तर/उत्तरे पुढील
भागांमधून मिळतील .