बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!

जहीर सय्यद's picture
जहीर सय्यद in जनातलं, मनातलं
11 Dec 2012 - 12:06 am

मानवतेच्या इतिहासात पुरुषांनी स्त्रियांना समान हक्क दिले नाहीत. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय झाला. जसे जसे शिक्षणाचा प्रसार झाला माहिती ज्ञानाचा प्रसार झाला. मानवतेच्या एकूण जगाला समजून घेण्याच्या प्रक्रियेची उत्क्रांती होत आहे, लोकांची विचार करण्याची पद्धत बदलत चालली आहे. एकूण परिस्थिती बदलत आहे. २१ व्या शतकात देखील जर मनुष्य स्त्रियांना समान हक्क देवू शकत नसेल तर हे मानवतेच दुर्दैव समजावे. परंतु ह्या प्रश्नाची एक दुसरी बाजू देखील आहे. स्त्रियांना समान हक्क (Equality) देण्याच्या नावावर फेमिनीस्ट शक्ती स्त्री आणि पुरुषांना एकरूप (Identical) करण्याच्या घाट घालत आहेत किंबहुना ते त्याच्या हि पलीकडे कडे जाऊन ते Gynocentric (स्त्री केंद्रित) and Misandric (पुरुष द्वेषी) संस्कृती विकसित करीत आहेत.

एका वाक्यात मी असे म्हणेन कि हे जे काही चालले आहे ते "एका अतिरेकाचे उत्तर दुसर्या अतिरेकाने" देण्याचा प्रयत्न ह्या फेमिनीस्ट शक्ती करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक घातक, अतिरेकी, अव्यवहारिक, हिंसक, द्वेषपूर्ण, मूर्ख आणि हास्यास्पद संकल्पना निर्माण केल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत.

काही गोष्टी अश्या असतात कि ज्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. जेंव्हा कोणतीही पाश्चात्य संकल्पना मिडिया वर स्वार होऊन आपल्या पर्यंत येते तर आपली गणती "मागासलेल्या विचारांचे" या सदरात होऊ नये म्हणून आपण लगेच हिर हिरीने त्या चर्चेत भाग घेवून तावा तावाने पाठींबा देतो कारण आपण "शिकलेले लोक" असतो. परंतु आपण कधी स्वतःचे डोके देखील चालवायला पाहिजे आपला देश, आपली संस्कृती, आपली गरज आपली माती आणि आपले प्रश्न त्याच बरोबर ह्या जगाचा वेग आणि दिशा याची योग्य ती सांगड घालून निर्णय घ्यायला पाहिजे असे मला वाटते.

फिलॉसॉफी ची प्रोफेसर Christina Hoff Sommers प्रसिद्ध अमेरिकन लेखिका, Who Stole Feminism? या पुस्तकाद्वारे फेमिनिझम चे दोन भिन्न वैचारिक शाखां वर प्रकाश टाकते. एक आहे Equity feminism आणि दुसरी आहे त्याच्या अगदी उलट Gender feminism

Equity feminism: फेमिनिझम च्या ह्या शाखेचा उद्देश आहे स्त्रियांना संपूर्ण नागरिक आणि वैधानिक समानता मिळावी. आणि ह्या शाखेचे मूळ तिच्या मते classical liberalism मध्ये आहे. या फेमिनिझम ची सुरवात साधारणता १९१३ च्या काळात झाली. या काळात जी चळवळ सुरु झाली तिला First-wave feminism म्हणतात. स्त्रियांना मतदानाचे हक्क मिळावे त्याच प्रमाणे शैक्षणिक तसेच आर्थिक क्षेत्रात स्वतंत्र मिळावे या साठी प्रामुख्याने ओळखले जाते. या काळात स्त्री पुरुष समानता यावर जास्त जोर होता.

Gender feminism: हे लेखिकेच्या मते Gynocentric (स्त्री केंद्रित) आणि Misandric (पुरुष द्वेषी) आहे. हि शाखा "लैंगिक भूमिकेची" (Gender role) आलोचना करते आणि त्याला समूळ नष्ट करण्याची भाषा करते. या प्रकारच्या फेमिनिझम ची सुरुवात साधारण १९६० पासून सुरु झाली तर ती १९८० पर्यंत कार्यरत होती. चळवळीच्या ह्या दुसर्या लाटेला Second-wave feminism म्हणून ओळखले जाते. ह्या लेखात आपण याच प्रकारच्या फेमिनिझम बद्दल ओळख करून घेणार आहोत. या फेमिनिझम मध्ये काळानुसार अनेक स्त्री फीलॉसॉफर,सैद्धांतिक, विचाराकांनी स्त्री मुक्तीवदाला स्त्री पुरुष समानते कडून हळू हळू Gynocentric (स्त्री केंद्रित) आणि Misandric (पुरुष द्वेषी) सिद्धांताकडे कसे कसे घेवून गेले आणि फेमिनिझम हे फेमिनिझम न राहता विद्रोह्वाद आणि उग्रवाद मध्ये याचे परिवर्तन कसे झाले हे आपण पाहणार आहोत. या सदरात ज्या काही संकल्पना ह्या फेमिनीस्ट विचारवंतांनी निर्माण केल्या आहेत, त्यांचा एक एक करून आढावा घेवूया

कट्टरपंथी स्त्रीवाद
स्त्री मुक्ती आंदोलन च्या मते पितृसत्ताक पद्धती हि एक शक्ती व्यवस्था आहे जी नाते संबंधाना जटील करून पुरुष वर्गाचे वर्चस्व स्थापित करून स्त्रियांचे दमन होईल अशी समाजाची रचना करते. त्यांची भूमिका अशी आहे कि समाजाची जबरदस्तीने समूळ क्रांतिकारी पुनार्व्यावास्थापण करून ह्या पितृसत्ताक पद्धतीला आव्हान देऊन उलथून टाकणे.
Willis, "Radical Feminism and Feminist Radicalism", p. 117.

कट्टरपंथी स्त्रीवाद असे सांगतो कि पुरुषांनी स्त्रियांना काबीज करून नियंत्रित ठेवण्यासाठी "लिंग भूमिका प्रणाली" (Gender Role ) स्थापन केलेली आहे आणि हि प्रणाली विनातक्रार चालण्यासाठी पुरुषांनी लग्न, कुटुंब, वेश्या व्यवसाय आणि विषम लैंगिक संबंध ह्यांची निर्मिती केलेली आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर नष्ट करून टाकले पाहिजे.
Willis, "Radical Feminism and Feminist Radicalism", p. 130–132.

एवढेच नव्हे तर पुढे जाऊन ह्या फेमिनिस्ट लोकांचे म्हणणे आहे कि पितृसत्ताक पद्धती जबरदस्ती क्रांतिने उलथून त्या जागी स्त्रियांनी सत्ता आपल्या हातात घेवून इतर स्त्री पुरुषांवर नियंत्रण ठेवावे.

Daly Mary एक अमेरिकन फेमिनीस्ट फिलॉसॉफर लैंगिक समानतेच्या विरोधात होती,तिचे म्हणणे आहे कि स्त्रियांनी पुरुषांवर राज्य केले पाहिजे आणि सर्व प्रकारचे राजनैतिक आणि सामाजिक शक्ती स्त्रियांनी पुरुषांकडून हस्तगत करून टाकायला हवी.
Daly, Mary, Gyn/Ecology: The Metaethics of Radical Feminism, pp. 15 & xxvi (p. xxvi in New Intergalactic Introduction (prob. 1990)).
Daly, Mary, Gyn/Ecology: The Metaethics of Radical Feminism, p. xxvi (New Intergalactic Introduction (prob. 1990)).

Shulamith Firestone हि एक उच्च कोटीची कँनेडियन फेमिनीस्ट होती जिने कट्टरपंथी स्त्रीवाद ह्या शाखेची स्थापना करण्यात खूप मोठे योगदान दिले लेखिका म्हणते:
“पितृसत्ताक समाज रचने मध्ये स्त्रियांवर लैंगिक असमानता लादली जाते ती स्त्रियांच्या "जीवशास्त्रा" मुळे. त्यानंतर भौतिक, सामाजिक और मनोवैज्ञानिक नुकसान लादले जाते ती गर्भावस्था, प्रसूती आणि त्यानंतर मुलांचे संगोपन करण्याच्या नावाने. या जैविक निर्धारित जबाबदारी पासून स्त्रियांना पळवाट काढण्यासाठी सुटका करून घेण्यासाठी ती सल्ला देते कि मूले जन्मालाच घालायची असतील तर त्यांना प्रयोग शाळेत जन्माला घाला आणि त्याचे संगोपन सरकारने केले पाहिजे. कारण ती प्रसुतीला बर्बरतापूर्ण समजते आणि म्हणते कि तिची एक मैत्रीण असे म्हणते कि बाळाला जन्म देणे तिला "भला मोठा भोपळा हगण्यासारखे वाटते."
Political Ideologies: An Introduction, Andrew Heywood, 2003, Palgrave Macmillan, ISBN 0-333-96178-1, pp 272.
Sydie, R. A., Natural women, cultured men: a feminist perspective on sociological theory, University of British Columbia Press, 1994, pp. 143-148. ISBN 0-7748-0491-2

अशी विचारधारा निर्माण करून तिचा प्रसार करून ह्या विचारांना फेमिनिजम चे उद्देश्य, लक्ष बनविणाऱ्या मध्ये प्रामुख्याने १९६० च्या दशकातील Andrea Dworkin, Phyllis Chesler, Monique Wittig, Mary Daly, Jill Johnston, आणि Robin Morgan ह्यांचा मोठा हाथखंड आहे.

फ्रेंच लेखिका आणि सिद्घांतकार Monique Wittig हि “बया” तर विज्ञानाला देखील बस्तानात गुंडाळून ठेवायला निघाली. ती "जैविक" निर्धारणालाच मानत नव्हती. स्त्रीत्व, पौरुषुत्वा असं काही नसत असे तिचे म्हणणे होते. जे लोक सत्तेवर आहेत (पुरुष) त्यांनीच आपल्या फायद्यासाठी म्हणजे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लिंग भेद आणि वंश भेद असे भेद भाव निर्माण केलेले आहे असे तिचे म्हणणे होते. Monique Wittig आणि तिच्या समकालीन समविचारी तथाकथित बुद्धीवादी सह्योगींचे असे म्हणणे होते कि समाजातील स्त्री पुरुषांना विभक्त करून टाकायला पाहिजे, एकमेकानपासून दूर करून टाकायला पाहिजे. कारण त्यांच्या नुसार स्त्री पुरुषातील सहजीवन, संबंध, नाते आणि भूमिका हेच स्त्रियांच्या दमनाचे प्रमुख कारण होय.
Hoagland, Sarah Lucia. Lesbian Ethics: Towards a New Value, Institute for Lesbian Studies, Palo Alto, Ca.
Claire Duchen, Feminism in France (1986) p. 23-4

लैंगिक अलगाववाद
आता हे हेतू साध्य करण्या साठी स्त्रीवादी चळवळीच्या काही तथाकथित बुद्धिवादी स्त्रियांनी एक नवीन विचारधारा जन्माला घातली "लैंगिक अलगाववाद"
आता हे "लैंगिक अलगाववाद" काय आहे. काही "अतिरेकी" विचार सरणीच्या तथाकथित बुद्धिवादी स्त्रियांचे असे म्हणणे आहे कि. स्त्रियांच्या दमन अत्याचारामागे समाजातील स्त्री पुरुषांचे विषमलैंगिक संबंध जबाबदार आहे. विषमलैंगिक संबंध नैसर्गिक नियम आहे. मानवतेच्या इतिहासाने वैध ठरवलेले आहे. जगातील सर्व अब्राहामिक आणि अब्राहामिकेतर धर्मांनी प्रोहोत्सान दिलेले. जगातील अनेक थोर संस्कृतीने मान्य केलेले. मानव संन्कृतीच्या इतिहासात कुटुंब संस्थेच्या परिघातील एका स्त्री पुरुषाचे कायदेशीर लग्नाच्या बंधानातील विषमलैंगिक संबंध हे एक सर्वसामान्य, सर्वमान्य, नैतिक आणि वैज्ञानिक दृष्टीने गरजेचे आहे. थोडक्यात ह्या अतिरेकी तत्वांना कुटुंब संस्था असा उल्लेख करायचा देखील तारतम्य उरलेलं नाही ते आता थेट "विषमलैंगिक संबंध आणि "समलिंगी संबंध" (म्हणजे लैंगिक संबंधावरच सर्व गोष्टी मोजायला लागले आहेत) ह्या स्थराला येवून पोहोचले आहेत, असो. तर पर्यायाने या "अतिरेकी" विचार सरणीच्या तथाकथित बुद्धिवादी स्त्रियांच्या म्हणण्या नुसार "कुटुंब संस्था" हीच स्त्रियांवरील अत्याचाराला कारणीभूत असल्यामुळे पितृसत्ताक कुटुंब संस्था आणि ह्या संस्थेला समर्थन करणाऱ्या "समाज" संस्थेलाच समूळ नष्ट, उध्वस्त करायला पाहिजे.
Bunch, Charlotte. Learning from Lesbian Separatism, Ms. Magazine, Nov. 1976

विषमलैंगिक अलगाववाद
१९६८ मध्ये Roxanne Dunbar हिने स्थापित केलेली "Cell १६" फेमिनीस्ट संगठना. हिने सर्वप्रथम स्त्रियांना अश्या पुरुषान पासून कि जे त्यांच्या विचारधारेला मानत नाही अथवा समर्थन देत नाही, अलग राहण्यासाठी उद्युक्त केले. हे कायम अलग होणे नव्हे काही काळा पुरते होते. आणि हीच खरेतर समलैंगिक अलागाववादी ची पहिली पायरी मानली जाते.
Dunbar, Leghorn. The Man's Problem, from No More Fun and Games, Nov 1969, quoted in Echols, 165

समलैंगिक अलगाववाद
Charlotte Bunch, एक अमेरिकन फेमिनीस्ट कार्यकर्ता आणि लेखिका हिने अलगाववादाला समलैंगिक स्त्रियां साठी एक रणनीती बनविली कि स्त्रियांनी आपले व्यक्तिगत विकासासाठी ठराविक काळासाठी मुख्य धारेची सक्रियते पासून (पुरुषान पासून, कुटुंबापासून कि समाजापासून???) अलिप्त राहेव. काही विचारवंत स्त्रिया ह्या रणनीतीला अस्थाई स्वरुपाची रणनीती मानत तर काही विचारवंत ह्या प्रथेला संपूर्ण जीवना मध्ये अमलात आणायला पाहिजे असे मानत.
Davis, Flora. Moving the Mountain: The Women's Movement in America since 1960, University of Illinois Press, 1999, ISBN 0-252-06782-7, p271

आणि एवढेच नव्हे तर पुरुषांना विशेष अधिकार देणार्या सर्व गोष्टी, पद्धती आणि सर्व तर्हेने त्यांच्या पासून अलग व्हायचे, अशी सर्व संस्था, नाते, भूमिका, गतीविधी पासून स्त्रियांच्या अटी प्रमाणे संबंध तोडून टाकायाचे थोडक्यात "असहकार" घोषित करायचा आणि पुरुषांना जेरीस आणायचे.

Marilyn Frye आपल्या एका लेखात ह्याच गोष्टीचे अश्या पद्धतीने वर्णन करते:
“separation of various sorts or modes from men and from institutions, relationships, roles and activities that are male-defined, male-dominated, and operating for the benefit of males and the maintenance of male privilege—this separation being initiated or maintained, at will, by women."
Marilyn Frye, "Some Reflections on Separatism and Power." In Feminist Social Thought: A Reader, Diana Tietjens Meyers (ed.) (1997) New York: Routledge, pp. 406-414.

The Furies नावाचे स्त्रीवादी वर्तमानपत्र स्त्रियांना अशी शिकवण देतो कि पुरुषां पासून सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावे आणि फक्त अश्या स्त्रियांशी संबंध ठेवायचे कि ज्या स्त्रिया पुरुषांना ज्यामुळे विशेष अधिकार, फायदा मिळेल अश्या सर्व गोष्टींशी संबंध तोडून टाकतील. आणि पुढे जाऊन हा वर्तमानपत्र असा सल्ला देतो कि स्त्रिया आपल्या भगिनींना धोका देवून पुरुषांशी संबंध ठेवून त्यांच्या पासून फायदे उकळू शकतात अर्थात इथे "भगिनी" त्यांना म्हटले आहे ज्यांनी पुरुषांशी पूर्णपणे संबंध तोडून "समलिंगी संबंध" प्रस्थापित केलेले आहे.
Bunch, Charlotte/The Furies Collective, Lesbians in Revolt, in The Furies: Lesbian/Feminist Monthly, vol.1, January 1972, pp.8-9

कट्टरपंथी स्त्री-समलैंगिकता
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या "अतिरेकी" विचारसरणीचे तथाकथित बुद्धिवादी पुरुषांशी सर्व संबंध तोडून टाकण्याची उपाययोजना देतात हि वयक्तिक पातळी साठी तर आहेच त्या पुढे जाऊन हि त्यांची एक "वैचारिक भूमिका" आणि त्याच बरोबर "रणनैतिक भूमिका" सुद्धा आहे.
Chicago Women's Liberation Union, Hyde Park Chapter. Socialist Feminism: A Strategy for the Women's Movement, 1972, booklet

प्रत्यक्ष अंमलबजावणी
अलगाववादी फेमिनिजम ने समलैंगिक फेमिनिस्ट ना कुटुंबसंस्था आणि पुरुषां पास्न विभक्त होण्याचे फक्त तत्वज्ञान दिले असे नाही तर प्रत्यक्ष विभक्त होण्यासाठी परावृत्त केले. १९७० च्या दशकात अनेक समलिंगी फेमिनीस्ट वेगळे वेगळ्या intentional community, land trusts आणि land co-ops स्थापना करून तिथे विस्थापित झाले.
McGarry & Wasserman, Becoming Visible: An Illustrated History of Lesbian and Gay Life in Twentieth-Century America, Studio, ISBN 0-670-86401-3, p190.
McGarry & Wasserman, Becoming Visible : An Illustrated History of Lesbian and Gay Life in Twentieth-Century America, Studio, ISBN 0-670-86401-3, p187

त्यांच्याच पैकी एक समलिंगी लेखिका Joyce Cheney हिने अश्याच एका वसाहतीत जाऊन अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातूनच Lesbian Land हे पुस्तक जन्माला आले. त्यामध्ये Cheney सांगते कि ह्या लोकांच्या विस्थापित होण्यामागे महत्वाचे कारण होते कुटुंबसंस्था आणि पुरुषां पास्न पर्यायाने मुख्य धारा समाजापासून विभक्त होण्याची त्रिमितीय राजनीती.
Cheney, Joyce. Lesbian Land, Word Weavers Press, 1976
Valentine, Gill. Contested Countryside Cultures: Otherness, Marginalisation, and Rurality ed.: Paul J. Cloke, Jo Little, Routledge, ISBN 0-415-14074-9, pp109–110.

पुरुष द्वेष (Misandry)
Voltairine de Cleyre अराजकतावादी, फेमिनीस्ट लेखिका कुटुंब संस्था बद्दल असे विचार प्रकट करते:
“लग्न संस्था पुरुषांना कोणत्याही परिणामा शिवाय स्त्रियानवर बलात्कार करण्याची सूट देते, लग्न संस्था स्त्रियांना बांधील गुलाम बनवते. मग हि गुलाम आपल्या मालकाचे नाव धारण करते, आपल्या मालकाचे अन्न खाते, आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करते आणि आपल्या मालकाच्या passion च्या पूर्तते साठी सेवा करते.”
De Cleyre, Voltairine (2005), Sharon Presley and Crispin Sartwell, ed., Exquisite Rebel: The Essays of Voltairine De Cleyre – Anarchist, Feminist, Genius, Albany: State University of New York Press, ISBN 0-7914-6094-0

ओस्ट्रेलीयन फेमिनीस्ट लेखिका Mary Daly म्हणते:
“हि धरती पवित्र करायची असेल तर "पुरुषांची" इथून सफाई करायला पाहिजे.”
In the interview, she said, "If life is to survive on this planet, there must be a decontamination of the Earth. I think this will be accompanied by an evolutionary process that will result in a drastic reduction of the population of males."
Bridle, Susan (Fall/Winter 1999). "No Man's Land". EnlightenNext Magazine.

Otep Shamaya अमेरिकन फेमिनिस्ट सिंगर, सॉंग रायटर, कवी, लेखिका आणि पेंटर आणि “ओटेप” या बँड ची लीड वोक्यालीस्ट आपल्या एका "Menocide" नावाच्या गाण्यात जागील पुरुषांना संपवून टाकण्याचे आवाहन करते. ती म्हणते कि पुरुष हे "Infectious Human Waste" आहेत आणि जे पिडीत आहेत त्यांनी पुरुषांचे खून करावे आणि पुरुष संहार करावा.
http://glennsacks.com/blog/?p=3180#more-3180

आणि जेंव्हा तिला विचारले गेले तुझे काही लिखाण हे पुरुषांचा द्वेष करणारे असतात तर तिने ते असे बोलून काबुल केले कि ती द्वेष पसरवते...
"I don’t see it that way. Indeed, I am an emotional person and I use angry words, but they are aimed (mostly) at IDIOTS and MONGRELS. Perhaps YOU equate men with the likes of those scourge. But not me. I am an equal opportunity dispenser of rage. Ha!"
http://web.archive.org/web/20090503190209/http://www.imnotamonster.com/2...

Susan Brownmiller हि एक अमेरिकन फेमिनिस्ट लेखिका, पत्रकार, कार्यकर्ता हिचे जगप्रसिद्ध पुस्तक Against Our Will: Men, Women, and Rape. ह्या पुस्तका द्वारे ती असे सांगते कि जेंव्हा कधी स्त्रियांवर बलात्कार केला जातो तर त्या मागचे कारण पुरुषांची वासना नसून संपूर्ण पुरुष जात पूर्व नियोजित पद्धतशीर पणे योजनाबद्ध रित्या स्त्रियांवर पुरुष जातीचे धाक जरब अथवा धमकी म्हणून बलात्कार करतात. तिच्या म्हणण्या प्रमाणे बलात्कार हा वासनेचा गुन्हा नसून हिंसा आणि सत्तेचा गुन्हा आहे.
Kathryn Cullen-DuPont (1 August 2000). Encyclopedia of women's history in America. Infobase Publishing. pp. 6–7. ISBN 978-0-8160-4100-8. Retrieved 4 February 2012.
Sally Moore (1975). "'Rape Is a Crime Not of Lust, but Power,' argues Susan Brownmiller". Archive.People. Retrieved 5 February 2012.

फेमिनिस्ट उग्रवाद आणि त्यांच्या अतिरेकी संकल्पना
ऑस्ट्रेलिया ची आधुनिक इंग्रजी साहित्याची विद्वान, लेखिका. पत्रकार Germaine Greer, Paladin च्या प्रस्तावने मध्ये स्त्रियांना मुक्त होण्यासाठी मार्ग दाखवतांना सल्ला देतेकी स्त्रियांनी उत्क्रांती पेक्षा क्रांती द्वारे बदल आणले पाहिजे. स्त्रियांनी आपले शरीर जाणून घेतले पाहिजे, आपल्या शरीराला कबुल केले पाहिजे, स्वतः च्या मासिक धर्माच्या रक्ताचा स्वाद घेतला पाहिजे. ब्रम्हचर्य आणि एकपत्नीत्व ( Celibacy and Monogamy ) सोडून दिले पाहीजे...
(Foreword to the Paladin 21st Anniversary Edition, 2006).

Judith Butler एक प्रख्यात अमेरिकन फिलॉसॉफर एक भलतीच महान फिलॉसॉफी देवून जाते जी वाचून सामान्य माणसाचे तर डोकेच काम करत नाही.
“ …that we have desires that do not originate from our personhood, but rather, from social norms. The writer also debates our notions of "human" and "less-than-human" and how these culturally imposed ideas can keep one from having a "viable life" as the biggest concerns are usually about whether a person will be accepted if his or her desires differ from normality. She states that one may feel the need of being recognized in order to live, but that at the same time, the conditions to be recognized make life "unlivable". The writer proposes an interrogation of such conditions so that people who resist them may have more possibilities of living.”
बट्लर असे सांगते कि “मनुष्याला काही गोष्टी मनापासून मान्य नसताना देखील फक्त समाजाच्या दाबावा मुळे कराव्या लागतात, पुढे जाऊन ती सांगते कि "मनुष्य" आणि "मनुष्या पेक्षा कमी (पशु)" असे काही नसते. आणि समाज किंवा संकृती उगाच "मनुष्य" च्या नावाने अश्या गोष्टी आपल्यावर लादते (नैतिकता) कि माणसाचे जीवन असह्य होवून जाते. कारण जर एखाद्याची इच्छा हि मनुष्याच्या इच्छे पेक्षा वेगळी असेल तर त्याला स्वीकारले जात नाही. एखाद्याला जगण्यासाठी मान्यताप्राप्त (कि हा मनुष्या आहे) होण्याची गरज भासू शकते परंतु हीच मान्यता मिळविण्यासाठी त्याला जी बंधने पाळावी लागतात ती बंधने त्याचे जीवन असह्य करून टाकतात. लेखिका पुढे जाऊन म्हणते कि अशी जी बंधने आहे त्याचा विरोध केला गेला पाहिजे, कारण जे लोक हि बंधने झुगारु इच्छितात त्यांचे जीवन तरी सुकर होईल.”
Butler, Judith (2004). Undoing Gender. New York: Routledge

“ The supposed obviousness of sex as a natural biological fact attests to how deeply its production in discourse is concealed. The sexed body, once established as a “natural” and unquestioned “fact,” is the alibi for constructions of gender and sexuality, unavoidably more cultural in their appearance, which can purport to be the just-as-natural expressions or consequences of a more fundamental sex.”
पुढे जाऊन हि बया नैसर्गिक लिंग स्त्री आणि पुरुष या मधील फरक हा समाजाने किंवा संकृतीने निर्माण केलेला आहे असे सांगते. ती म्हणते कि एकदा का कोणी जीवशास्त्रा नुसार स्त्री हि स्त्री असते आणि पुरुष हा पुरुष असतो असे बळजबरीने लोकांच्या मनात बिंबवले कि मग पर्यायाने स्त्रीजात आणि पुरुषजात हे वेगळे आहे असे सिद्ध होते आणि मग विषम लिंगी संबंध सुद्धा नैसर्गिक आहे असे सिद्ध होते पर्यायाने लग्न, कुटुंब व्यवस्था हि गरज आणि कायदेशीर बनते पर्यायाने स्त्रिया "स्वैर" राहुशकत नाही, बंधनात येतात. म्हणून तिचे म्हणणे आहे कि स्त्री जात आणि पुरुष जात वेगवेगळे आहेत असं काही नसत.
Gender Trouble: Feminism and the Subversion of Identity. New York: Routledge. pp. 135–41.ISBN 84-493-2030-5.
Gender Trouble: Feminism and the Subversion of Identity. New York: Routledge. pp. 163–71, 177–8. ISBN 84-493-2030-5.

Monique Wittig हि फ्रेंच लेखिका फेमिनीस्ट थिअरीस्ट होती. ती स्वतःची ओळख "कट्टरपंथी समलैंगिक" म्हणून देत असे. तिला स्त्री लेखिका म्हणून उल्लेख केला असता ती म्हणत असे
“मी फक्त लेखिका आहे स्त्री वगैरे नाही.कारण स्त्री वगैरे असे काही नसते कारण लेस्बिअन होण्यासाठी स्त्रियांना विषमलैंगिक संबंधामध्ये पुरुषाने बनविलेल्या स्त्रियांच्या "मानदंडातून" बाहेर यावे लागते . मला फक्त लेखिका म्हणा”. लेस्बिअन स्त्रियान बद्दल बोलताना ती म्हणते कि “लेस्बिअन ह्या इतर स्त्रियान बरोबर संधीबद्ध होतात, संबंध ठेवतात किंवा राहतात असे म्हणणे चुकीचे आहे कारण "स्त्री" हि फक्त विषमलैंगिक विचार प्रणाली आणि विषमलैंगिक आर्थिक प्रणाली च्या डोक्यातून आलेली कल्पना आहे.”
तीने मटेरिअल फेमिनिजम या शाखेमध्ये देखील "मोलाची भर" घातली ती म्हणणे विषम लैंगिक संस्था हि एक “राजनीतिक” व्यवस्था आहे जिने सामाजिक संहितेचे निर्माण केलेले आहे. आणि या सामाजिक संहितेला लेस्बियन राद्दबातील ठरवतात.
Kirkup, James (2003-01-09). "Monique Wittig". The Independent. http://news.independent.co.uk/people/obituaries/article123410.ece. Retrieved 2007-06-08.

Katie Roiphe अमेरिकन पत्रकार आणि लेखिका या फेमिनीस्ट शक्तींच्या आक्रमक आणि अतिरेकी वृत्तीचे असे दर्शन करवून देते फेमिनिझम खरे तर स्त्रियांना मुक्त करण्या साठी आले होते परंतु हार्वर्ड आणि प्रिन्सेटोन युनिवर्सिटी मध्ये विध्यार्थी म्हणून शिकत असतांना लेखिकेला धक्का बसला जेंव्हा हेच फेमिनिझम स्त्रियांवर हुकुम आणि बंधने घालू लागला कि स्त्रियांनी काय बोलावयास हवं, कस विचार करावा आणि त्यांच्या भावना कश्या असाव्या.
The Morning After: Sex, Fear and Feminism (ISBN 0-316-75432-3) 1993. It was reprinted in 1994.

समलैंगिकता आणि Free Love
Free love हि एक सामाजिक चळवळ आहे. हि चळवळ "लग्न" ह्या बंधन चा विरोध करते त्या पासून निर्माण होणार्या सामाजिक बंधनाचा विरोध करते. ह्या चळवळीचा प्राथमिक लक्ष्य हे आहे कि जन्म नियंत्रण, आणि व्यभिचार ह्या गोष्टींना सामाजिक स्तरावर आणि कायद्याच्या स्तरावर मान्यता देणे आणि लग्न किंवा कुटुंबसंस्था मोडीत काढणे.
The Handbook of the Oneida Community claims to have coined the term around 1850, and laments that its use was appropriated by socialists to attack marriage, an institution that they felt protected women and children from abandonment
McElroy, Wendy. "The Free Love Movement and Radical Individualism." Libertarian Enterprise .19 (1996): 1.

Emma goldman हि एक अराजकतावादी फेमिनीस्ट होती इतर बर्याच फेमिनीस्ट प्रमाणे तीही Free Love ची खंदी समर्थक अथवा प्रचारक होती.
Goldman, Anarchism, p. 224.
See generally Haaland; Goldman, "The Traffic in Women"; Goldman, "On Love".

एक जर्मन sexologist आणि चिकित्सक Magnus Hirschfeld लिहिते कि Emma हि पहिली आणि एकच अमेरिकन होती जिने सर्व प्रथम समलैंगिक संबंधाचे सर्व सामान्य जनते समोर समर्थन आणि बचाव केला.
Goldman, Emma (1923). "Offener Brief an den Herausgeber der Jahrbücher über Louise Michel" with a preface by Magnus Hirschfeld.

Simone de Beauvoir फ्रांस मधील प्रसिद्ध फेमिनीस्ट फिलॉसॉफर, जिचे पुस्तक THE SECOND SEX फेमिनिस्ट जगात नावाजलेले आहे. ती एक धडाडीची कार्यकर्ता देखील होती तिने कधीही लग्न केले नाही, त्यामुळे तिला अभ्यासासाठी, लेखनासाठी, भटकंती साठी, राजकीय कार्य साठी तसेच स्त्री आणि पुरुष अशे दोनीही प्रेमिंशी संबंध ठेवायला भरपूर वेळ मिळाला आणि ती आपले प्रेमी "शेअर" करण्यसाठी ओळखली जाते. तिने शिक्षिकेचा पेशा करत असतांना अनेक कमी वयाच्या मुलींशी तिचे "प्रेमळ" संबंध होते.१९३९ मध्ये अश्याच एका "प्रकरणात" तिच्या वर कार्यवाही झाल्या नंतर शिक्षिकेच्या नोकरीतून कमी करण्यात आले होत. मग तिने तिच्या समविचारी बुद्धिवाद्यांच्या बरोबर मिळून फ्रांस मधील कायदे अधिक "शिथिल" व्हयला पाहिजे याच्या साठी कायदेशीर प्रयत्न केले होते.
A dangerous liaison: Simone de Beauvoir and Jean-Paul Sartre, By Carole Seymour-Jones (London 2008), page 216 and 274
New studies agree that Beauvoir is eclipsing Sartre as a philosopher and writer, The Independent, by Lesley McDowell, Sunday, 25 May 2008
Contingent loves: Simone de Beauvoir and sexuality, By Melanie Hawthorne (London, 2000), pages 65–78
BBC Radio 4 Start the Week BBC Radio 4, Andrew Marr, 21 April 2008
Mémoires d'une jeune fille rangée (1994, LGF – Livre de Poche; ISBN 978-2-253-13593-7/2006, Balland; ISBN 978-2-7158-0994-9)
Tête-à-tête: Simone de Beauvoir and Jean-Paul Sartre, Hazel Rowley, HarperCollins, 2005 , page 130-35, ISBN 0-06-052059-0; ISBN 978-0-06-052059-5
1977–1979 petitions and signatures (in French)

भ्रूण हत्या
Mary Anne Warren प्रसिद्ध अमेरिकन फेमिनीस्ट लेखिका आणि फिलोसोफी ची प्रोफेसर भ्रूण हत्येच्या एकाप्रश्न वर उत्तर देतांना ती सांगते कि:
चेतना (शुद्धी/भान) असणे वस्तू आणि घटना बद्दल आणि वेदनेची जाणीव असणे.
विवेक असणे (जटील समस्येचे समाधान करण्या इतपत.)
स्व प्रेरित गतिविधि (कि जी अनुवांशिक आणि प्रत्यक्ष बाहेरून नियंत्रित केलेली नसावी)
व्यक्तिगत रित्या अत्माजागृकता.
संवादाची क्षमता (कोणत्याही विषयावर, कोणत्याही माध्यमातून)

वरील सर्व किंवा या पैकी काही गुण असणे आवश्यक आहे त्यालाच आपण “व्यक्ती” म्हणू शकतो. या नियमा
नुसार “भ्रूण” हि व्यक्ती नसून त्या जीवाला कोणतेही व्यक्तित्व नसते म्हणून भ्रूण हत्या करण्यात काहीही हरकत नाही.
Warren, Mary Anne. Biomedical Ethics (4th ed.). pp. 434–440. http://instruct.westvalley.edu/lafave/warren_article.html.

स्त्री मुक्ती वाद्यांची “हिरो” Valerie Solanas आणि तिचा SCUM Manifesto
हि एक अमेरिकन फेमिनीस्ट कार्यकर्तीच नव्हे तर फेमिनिझम ची “हिरो” होती तिने एक पुस्तिका लिहिले होती SCUM Manifesto हि पुस्तिका जगभर फेमिनिझम चे क्लासिकल लिटरेचर म्हणून प्रसिद्ध आहे.
ह्या Manifesto मधून ती असा संदेश देते कि ह्या पुरुषांनी जगाचा सत्यानाश करून टाकलेला आहे. ह्या पुरुषांची जिवंत राहण्याची जगाला काहीही गरज नाही, म्हणून ह्या पुरुषांना खून हिंसा करून जनावरासारखे पळवून पळवून त्यांचा पाठलाग करून त्यांची शिकार केली पाहिजे. पुढे ती म्हणते हे काम जितक्या लवकर होईल तितके चांगले.
Marmorstein, Robert, A Winter Memory Of Valerie Solanis (sic), op. cit., p. 9, col. 2 ("[t]he central theme of SCUM is that men have fouled up the world, are no longer necessary (even biologically), and should be completely destroyed, preferably by criminal means such as sabotage and murder .... [t]he quicker, the better.").
Jansen, Sharon L., Reading Women's Worlds from Christine de Pizan to Doris Lessing, op. cit., pp. 147–148 (quoting p. 147 (Solanas posited men as animals who will be stalked and killed as prey, the killers using weapons as "phallic symbols turned against men") (emphasis so in original)) ("men are the real animals", per id., p. 148 and see p. 208).

पुढे ती म्हणते:
"Life" in this "society" being, at best, an utter bore and no aspect of "society" being at all relevant to women, there remains to civic-minded, responsible, thrill-seeking females only to overthrow the government, eliminate the money system, institute complete automation and eliminate the male sex."
तिच्या म्हणण्या नुसार स्त्रियांनी सरकारे (पुरुषांची) उलथून टाकली पाहिजे, चलन प्रणाली बंद करून टाकायला पाहिजे, सर्व कामांचे ऑटोमेशन करून टाकायला पाहिजे आणि पुरुष जातच समाप्त करून टाकायला पाहिजे.
Solanas, Valerie, SCUM Manifesto (Valerie Solanas, 1967), p. [1] (self-published) (copy from Northwestern University)

तिच्या थेरी नुसार पुरुषांना xy असे दोन गुणसूत्र असतात स्त्रियान कडे xx असे दोन x गुणसूत्र असतात.या y गुणसूत्रा मुळे पुरुष हा एक "अपूर्ण स्त्री" आहे.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, p. 31.

ह्या अपूर्णते मुळे पुरुष हा भावनात्मक स्तरावर खूप सीमित आहे, अहंकारपूर्ण आहे किंवा प्रामाणिक संपर्क साठी असमर्थ आहे. सहानुभूतीची कमतरता आणि शारेरिक उत्तेजना शिवाय दुसर्या कोणत्या हि गोष्टीशी संबंध प्रस्थापित करण्यात असमर्थ आहे.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, p. 32–33.

पुढे ती म्हणते कि पुरुष आयुष्यभर स्त्री बनण्या साठी प्रयत्नशील असतो कि जेणे करून त्याची न्यूनता भरून निघावी. हे कार्य तो अश्या पद्दतीने पार पडतो कि तो निरंतर शोध घेत, स्त्रियांच्या मागे मागे हिंडून जबरदस्तीने मैत्री करून, सहवास वाढवत स्त्रियांशी मिलन घडवून आणतो.

पुढे ती म्हणते कि या पुरुषांनी जगाचे शेण (shitpile) करून टाकले आहे आणि पुरुषान विरुद्ध गुन्हांची एक लांब लचक यादी देते. पुढे ती सांगते कि या सर्व गुन्हांमुळे पुरुष जातीला या भू तलावरून समाप्त करून टाकणे हे (Moral Imperative) नैतिक अनिवार्य आदेश आहे.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, pp. 67–70.

ती सांगते कि स्त्रियांनी पैसा-कार्य प्रणाली बंद करून त्या जागी ऑटोमेशन प्रणाली प्रचलित करावी
जेणे करून शासन व्यवस्था कोलमडून पडेल व पुरुषांची स्त्रियांवर राज्य करण्याची शक्ती संपुष्टात येईल.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, pp. 70–71, 80–81.

ती पुढे सांगते कि पुरुषांची शक्ती नष्ट करण्यासाठी एखादा आक्रमक दल बनवावा लागेल कारण नुसत्या सविनय कायदेभंग चळवळ स्थापून काहीही उपयोग होणार नाही कारण समाजात छोटे मोठे बदल घडवायचे असतील तर अशी चळवळ चालेल परंतु ह्या मोठ्या कार्य साठी म्हणजे संपूर्ण प्रणाली उध्वस्त करण्यासाठी हिंसक कार्यवाही होणे गरजेचे आहे. या तोडफोड आणि प्रत्यक्ष कार्यवाहीची रणनीती अमलात आणणाऱ्या या हिंसक आक्रमक दलाला ती SCUM असे नाव देते. जेकी तिच्या पुस्तकाचे नाव आहे. आणि जेंव्हा हा आक्रमक दल प्रत्यक्ष हल्ला बोलेल तर तो राष्ट्रपतीच्या मूर्ख आणि गलिच्छ तोंडावर करेल, SCUM जेंव्हा आक्रमण करेल तर तो अंधारात सहा इंची सुऱ्या ने करेल.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, pp. 71–80.

फेमिनिझम वर टीका
फेमिनिझम मुळे नैतिकतेचा र्हास होण्यास मदत झाली आणि समलैंगिक संबंध, अश्लीलता, अवैध संबंध व या सारख्या इतर अनैतिक गोष्टी सर्व सामान्य झाल्या.
Mary A. Kassian, The Feminist Mistake (2005) ISBN 1-58134-570-4
Carrie L. Lukas, The politically incorrect guide to women, sex, and feminism, Regnery Publishing, 2006, ISBN 1-59698-003-6, ISBN 978-1-59698-003-7

राजनीतिक दर्शन चे विद्वान, मानविकी चे प्रोफेसर, अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक Paul Gottfried आपले पुस्तक "The Trouble With Feminism" मध्ये सांगतात कि Gender Femenism हि एक सामाजिक विपदा ठरत आहे जी कौटुंबिक संस्थेचा बळी घेत आहे. आणि कुटुंबा पासून तुटलेले अनेक व्यक्ती सामाजिक अनागोंदीमध्ये ढकलले जात आहेत.
Gottfried, Paul (2001). "The Trouble With Feminism". LewRockwell.com. Archived from the original on 20 September 2006. http://www.lewrockwell.com/gottfried/gottfried9.html. Retrieved 2006-09-30.

स्त्री मुक्ती आंदोलनाने आपले (समानतेचे) ध्येय गाठले आहे परंतु आता ते पुरुषां पेक्षाही जास्त उच्च स्तरावर काबीज होण्याचा प्रयत्न करत आहेत.
Wattenberg, B (1994). "Has Feminism Gone Too Far?". MenWeb. Archived from the original on 13 October 2006. http://www.menweb.org/paglsomm.htm. Retrieved 2006-09-30.

Pizzey, Erin (1999). "How The Women's Movement Taught Women to Hate Men". Fathers for Life. Archived from the original on 26 September 2006. http://www.fathersforlife.org/pizzey/how_women_were_taught_to_hate_men.htm. Retrieved 2006-09-30.
Janice Shaw Crouse (2006). "What Friedan Wrought". Concerned Women for America. http://www.beverlylahayeinstitute.org/articledisplay.asp?id=10088&depart.... Retrieved 2006-09-30.

प्रसिद्ध अराजकतावादी विचारवंत बॉब ब्लँक ह्या अलगाववादी फेमिनिजम विचाराच्या मूर्ख पणा बद्दल असे काही सांगतात:
“फेमिनिस्ट स्त्रियांचे पुरुषान पासून सामाजिकरित्या वेगळे होणे हे खरेतर निरर्थक आहे, विसंगतीने भरलेले आहे. आणि कोणत्याही अलागाववादीला पितृसत्ताक पद्धतीशिवाय अस्तित्व टिकवून राहणे शक्य नाही. आणि इतर कोनापेक्षा अलागावावादीच इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करत असतात. “
Bob Black, Essay "Feminism as fascism", 1983.

प्रसिद्ध अमेरिकन स्त्रीवादी कार्यकर्ती आणि लेखिका Sonia Johnson, फेमिनीस्ट विचारधारेवर आक्षेप घेतांना असे सांगते:
“स्त्रीवादी अलगाववाद स्वतःला परिभाषित करण्याची जोखीमच घेतो कि कोणापासून हे स्वतःला अलग करतात, पुरुष (?).”
Johnson, Sonia (1989). Wildfire: Igniting the She/Volution.

प्रसिद्ध समलिंगी कावित्री Jewelle Gomez ह्याच्या Out of the Past नावाच्या एका लेखात ती सांगते कि जे आमच्या अस्तित्वाचा अंग / भाग होते त्यांच्या पासून अलग होणे हि एक अशी “भरारी” आहे कि जी (गोर्या स्त्रिया सोडून बाकी जगातील इतर स्त्रियांना) जमने शक्य नाही. (म्हणजे हे तिला कबूल आहे कि ते आपल्या अस्तित्वाच्या एक अंग किंवा भागा पासून (म्हणजे पुरुषा पासून) अलग होण्याचे "महान" कार्य करायला जात आहे. म्हणजे डोक दुखत असेल तर डोकेच कापून टाका अश्यातला भाग आहे हा.)
अमेरिकेची स्त्रीवादी विचारक आणि लेखिका Bell hooks सांगते कि अलागाववादी फेमिनिजम हे फेमिनिजम च्या अनेक मूळ उद्धेशाच्या म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या उलट दिशेने जाऊन “स्त्री केंद्रित” आणि स्त्रियांचे वर्चस्व असलेले आणि पुरुषांना वशीभूत करून पुरुष द्वेषाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करते.
bell hooks (2000), Feminism is for Everybody: Passionate Politics. Cited in Austin, Hannah (2004) "Separatism: Are We Limiting Ourselves?", EM 4:2.

शैक्षणिक संस्थां मध्ये फेमिनिझम चा दहशतवाद
Professing Feminism (१९९४) च्या संस्करण मध्ये Daphne Patai (विद्वान आणि लेखिका) फेमिनीस्ट राजकीय अजेंड्याला शैक्षणिक कार्यक्रमात जबरदस्तीने घुसविल्याचा ती निषेध करते. विशेष करून ह्या फेमिनीस्ट शक्ती युनिवर्सिटी कॉलेजेस मध्ये भाषा स्वातंत्र्या वर गदा आणतात. तिचे म्हणणे आहे कि ह्या राजनीतिकरण मुळे शिक्षणाचा पायाच निघून जाईल आणि शिक्षणाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. त्याच प्रमाणे तिने २००३ च्या ह्याच पुस्तकाच्या नवीन संस्करण मध्ये शैक्षणिक संस्था मधील Women's Studies या विषयचा अभ्यास करण्यासाठी तिने अनेक फेमिनीस्ट प्रोफेसरांची मुलाखती घेवून खूप मोठ्या प्रमाणात दस्तावेज पुरावे गोळा केले त्यावरून असा निष्कर्ष निघतो फेमिनीस्ट शक्तींची पद्धत, प्रथा, व्यवहार हा शिक्षणाशी विसंगत आहे आणि ते फेमिनीस्ट शैक्षणिक संस्थां आणि शिक्षणाला साधन बनवून “माहिती” आणि शोधकार्याला राजकीय अजेंड्यासाठी नाकारत आहे. (Heterophobia: १९९८) या पुस्तकात ती लिहिते कि आजकालचा फेमिनीझम हा स्त्री आणि पुरुषांच्या विषम लैंगिक संबंधाच्या विरोधात शत्रुत्वाच्या विषाने भरलेला आहे.
Professing Feminism: Cautionary Tales from the Strange World of Women's Studies (written with Noretta Koertge; Basic Books, 1994)
Professing Feminism: Education and Indoctrination in Women's Studies (with N. Koertge; new and expanded edition; Lexington Books, 2003)
Heterophobia: Sexual Harassment and the Future of Feminism (Rowman & Littlefield Publishers, 1998)

फेमिनीस्ट विचार धारेबद्दल कोणी शैक्षणिक चर्चा केली जी त्यांच्या राजकीय अजेंड्या विरुद्ध जात असेल तर फेमिनीस्ट शक्ती अश्या लोकांना आणि त्यांच्या विचारांना अँटी-फेमिनीस्ट ठरवून त्यांचा आवाज बंद केला जातो
Patai, Daphne; Noretta Koertge. Professing Feminism: Education and Indoctrination in Women's Studies. ISBN 0-7391-0455-1.

Christina Hoff Sommers अमेरिकन विद्वान आणि लेखिका म्हणते कि आजकालचे फेमिनिझम पुरुषांबद्दल अतार्किक शत्रुत्व ठेवतात. तिचा ह्या शक्ती विरुद्ध असा आरोप आहे कि हे लोक तथ्य आणि आकडेवारी बद्दल निष्काळजीपणे व्यवहार करतात. फेमिनिझम हे सत्य नाकारतात कि स्त्री आणि पुरुष दर्ज्याने समान तर आहेत परंतु ते शरीराने आणि पर्यायाने कार्याने किंवा जबाबदर्याने वेगवेगळे आहेत.
Sommers, Christina Hoff (2008-11-19) (PDF). What's Wrong and What's Right with Contemporary Feminism? (Speech). Hamilton College. pp. 18-19. Archived from the original on 2012-02-01. http://www.aei.org/files/2008/11/19/20090108_ContemporaryFeminism.pdf. Retrieved 2012-02-01.

सारांश
वर मी जेवढे संदर्भ दिले आहेत, ज्या ज्या स्त्रियांचे नाव घेतले ज्या ज्या पुस्तकांचे नाव घेतले किंवा ज्या ज्या सिद्धांत आणि विचारधारेचा उल्लेख केलेला आहे ते सर्व कोण आहे माहित आहे तुम्हाला? ते कोणी गल्ली बोळीतील थातूर मातुर स्त्री मुक्ती आंदोलनाच्या सामान्य कार्यकर्त्या नव्हे तर जागतिक स्तराच्या फेमिनीस्ट विचारवंत, लेखिका, सैद्धांतिक आहेत. कि ज्यांच्या मार्गदर्शनावर हि चळवळ प्रगती करत पुढचे पूल टाकत आहे, ह्यांच्या सल्ल्या नुसार "युनो" कार्यक्रम आखत आहे कि ज्याची अंमलबजावणी संपूर्ण जगात होत आहे. ह्या फेमिनीस्ट कार्यकर्त्यांनी शैक्षणिक संस्था, मोठ मोठ्या जागतिक स्तराच्या युनिवर्सिटीज मध्ये आपले साम्राज्य पसरवून एकूण शिक्षण पद्धतीवर आणि लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आपली पकड मजबूत केलेली आहे.
तर आपण वर जे काही वाचले त्याचा सारांश काय आहे ते पाहूया

सर्व प्रथम १९६८ मध्ये Roxanne Dunbar हिने स्थापित केलेली "Cell १६" फेमिनीस्ट संगठना. हिने सर्वप्रथम स्त्रियांना अश्या पुरुषान पासून कि जे त्यांच्या विचारधारेला मानत नाही अथवा समर्थन देत नाही, अलग राहण्यासाठी उद्युक्त केले. हे कायम अलग होणे नव्हे काही काळा पुरते होते. आणि दुसरे वैशिष्ट असे कि हे विषमलिंगी संबंधातून अलग होणे होते कारण तो पर्यंत ह्या स्त्रियांनी समलिंगी होण्यापर्यंत मजल मारली नव्हती. हीच फेमिनीस्ट अलगाववादाची पहिली पायरी होती.

काही फेमिनीस्ट विचार वाद्यांनी स्त्रियान साठी एक “रणनीती” बनविली कि स्त्रियांनी आपले व्यक्तिगत विकासासाठी ठराविक काळासाठी मुख्य धारेची सक्रियते पासून (पुरुषान पासून, कुटुंबापासून कि समाजापासून???) अलिप्त राहेव. काही विचारवंत स्त्रिया ह्या रणनीतीला अस्थाई स्वरुपाची रणनीती मानत तर काही विचारवंत ह्या प्रथेला संपूर्ण जीवना मध्ये अमलात आणायला पाहिजे असे मानत.कारण त्यांचे असे मानने आहे कि पितृसत्ताक कुटुंब संस्थेत राहून स्त्रियांची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून आपले काही ध्येय गाठण्यासाठी अल्पकाळ ह्या बंधनातून फारकत घ्यावी किंवा मग कायमची फारकत घेवून टाकावी.

मग पुढे जाऊन ह्यांनी पुरुष जाती पासून संपूर्ण अलग होवून एक वेगळा स्त्री समलिंगी जग तयार करण्याचा घाट घातला. जेथे सर्व स्त्रिया समलिंगी असतील आणि त्यांना पुरुषांशी कोणताही प्रकारचे देणे घेणे गरज अथवा संबंध नसेल. अर्थात या पायरी पर्यंत ह्या विचारवंत मानत होत्या कि त्या स्त्रिया आहेत. आणि त्या आपल्या हक्काच्या रक्षणा साठी पुरुषां पासून अलग होत आहेत. इथे थांबतील ते स्त्री मुक्ती आंदोलन कसले त्यांनी लगेच पुढची पायरी चढायला सुरुवात केली.

पुढे जाऊन ह्या विचारवंत म्हणायला लागल्या कि स्त्री पुरुष असे काहीही नसते. दोन्हीही मनुष्यप्राणी आहे आणि हा तर तो पुरुष प्रधान समाज आहे जो स्त्रियांना लहान पणापासून तू मुलगी आहेस तू बाहुलीशी खेळ तू मुलगा आहे तू घोड्याशी खेळ असे वर्षानु वर्षे बिंबवून त्याने स्त्री ला स्त्री बनवून टाकले आणि पुरुषाला पुरुष बनवून टाकले. आणि हे अतिरेकी विचारवंत अगदी ह्या थराला गेले कि त्यांनी जीवशास्त्रातील स्त्रीलिंगी, पुल्लिंगी ह्या नैसर्गिक आणि वैज्ञानिक सत्याला देखील मानण्यापासून इन्कार करून टाकल. ते आता म्हणायला लागले कि स्त्री पुरुष असे काहीही नसते दोन्हीही सजीव आहेत त्यांच्या मधील कोणत्या हि प्रकारचा वैज्ञानिक फरक त्यांना मान्य नाही.

त्या नंतर स्त्री स्वातंत्र्याची गाडी थांबयाचेच नाव घेईना. या पुढे जाऊन त्यांच्या महान विचारवंतांनी असे सांगायला सुरुवात केली कि या जगात जे काही वाईट चालले आहे युद्ध, रोगराई, हिंसा, वंशवाद, पैसे, लग्न, अविश्वास, कुरूपता, द्वेष, शासन व्यवस्था इ. इ. ह्या सर्व वाईट गोष्टींचा जबाबदार पुरुष आहे. म्हणून या पृथ्वीतलावरून पुरुषांना संपून टाकण्यात यावे. जगाच्या भल्यासाठी या जमिनीवरून पुरुषांना समाप्त करणे खूप गरजचे आहे.

फेमिनिझम स्त्रियांना स्वैराचार, विवाह बाह्य, अनैतिक संबंध, समलिंगी संबंध, अराजकता, अँबॉर्शन, कॉनट्रासेप्शन, भ्रूण हत्या ह्या गोष्टींची शिकवण देते तर या उलट लग्न, कुटुंब, विषमलिंगी संबंध, सामाजिक बांधिलकी, नैतिकता ह्या गोष्टींपासून परावृत्त करते.

त्याच प्रमाणे फेमिनिझम विशेषता स्त्री आणि पुरुष असे दोन विरोधी गट बनवतो. आणि दोघांना एकमेकाचा शत्रू ठरवून पुरुष पूर्वनियोजित, योजना बद्धरीतीने स्त्रियांना काबीज करून नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने (उदा. बलात्कार करून, त्यांना वेश्या बनवून, त्यांच्याशी लग्न करून कुटुंबा मध्ये चूल मुल मध्ये अडकवून) तिच्यावर गुलामगिरी लादून तिची वयक्तिक प्रगती, व्यक्तिमत्व संपवून तो स्त्रियांवर शासन करतो म्हणून स्त्रियांनी पुरुषांच्या तथाकथित सत्तेविरुद्ध बंड पुकारायला पाहिजे आणि पुरुषांची सत्ता उलथून टाकायला पाहिजे. एवढेच नव्हे तर स्त्रियांनी पुरुषांना काबीज करून त्यांच्यावर सत्ता गाजवायला पाहिजे. त्याहीपुढे जाऊन पुरुषांचे खून करून हिंसा करून पुरुषांना मारून टाकले पाहिजे ह्या जगाला पुरुषांची गरज नाही त्यामुळे पृथ्वी तलावरून पुरुषांना संपवून टाकले पाहिजे. आणि तेही लवकरात लवकर (असे म्हणणारे ते फेमिनीस्ट विचारवंत आहेत ज्यांच्या विचार व सिद्धांतावरून फेमिनीस्ट आंदोलन चालत आहे प्रगती करत आहे. हे विचारवंत फेमिनीस्ट कार्यकर्त्यांचे "हिरो" आहेत) अश्या पद्धतीने फेमिनिझम पुरुष द्वेषाचे कार्य करत आहे.

फेमिनिझम ने शैक्षणिक संस्थांना काबीज करून तिथे दपटशाही करून आपली सत्ता निर्माण केली आहे. तिथे ते पुरुष द्वेष आणि विषमलिंगी संबंध च्या विरुद्ध आपले राजकीय अजेंडे राबवीत आहे. तेथील शिक्षणाचे राजकीयकरण करून माहिती आणि आकडेवारी शी तडजोड करून आपल्या सोयीचे शोधकार्य करत आहे. ह्या फेमिनीस्ट शक्ती युनिवर्सिटी कॉलेजेस मध्ये दबाव गट तयार करून भाषा स्वातंत्र्या वर गदा आणतात.

फेमिनीस्ट विचार धारेबद्दल कोणी शैक्षणिक चर्चा केली जी त्यांच्या राजकीय अजेंड्या विरुद्ध जात असेल तर फेमिनीस्ट शक्ती अश्या लोकांना आणि त्यांच्या विचारांना अँटी-फेमिनीस्ट ठरवून त्यांचा आवाज बंद करून टाकतात.

शेवटी जाता जाता ती गोष्ट सांगतो जिला वाचून मी स्त्री मुक्ती आंदोलन चा अभ्यास करणेच बंद करून टाकले म्हणजे माझी पुढे हिम्मतच झाली नाही. ह्यांना लग्नाचे बंधन नकोय, मातृत्वाचे बंधन नकोय, लिंग भूमिकेचे बंधन नकोय, लैंगिकसंबंधाचे बंधन नकोय, सामाजिक बंधन नकोय, धार्मिक बंधन नकोय परंतु जेंव्हा फेमिनिस्टांची इडियालॉजी असे सांगायला लागली कि मनुष्य आणि पशु असे काही नसते हे सर्व मानवाने तयार केलेले अवडंबर आहे आह्माला पशु सारखे मोकाट सुटू द्या ...

बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!

समाजविचारलेखमतमाहिती

प्रतिक्रिया

लेख वाचला. थत्तेकाका म्हणतात त्याप्रमाणे असे टोकाचे स्त्रीमुक्तीवादी फार असतील असे नाही.पण टोकाच्या नसलेल्या स्त्रीमुक्तीवाद्यांनी मात्र स्त्रियांचेच नुकसान करणारी एक गोष्ट करून ठेवली आहे याचा अनुभव मध्यंतरी आला. एक २० वर्षे वयाची मुलगी अगदी आग्रहाने म्हणत होती की कॉर्पोरेटमध्ये स्त्रियांना अमुक एका पदाच्या वर जाता येत नाही.त्यावर मी माझ्या क्षेत्रातील काही उदाहरणे दिली-- उदाहरणार्थ आय.सी.आय.सी.आय च्या चंदा कोचर, अ‍ॅक्सिस बॅंकेच्या शिखा शर्मा, क्रिसिलच्या रूपा कुडवा, रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, इकॉनॉमिक टाईम्समध्ये नियमित लेखिका (क्रेडिट स्विस आणि त्यापूर्वी जे.पी.मॉर्गन चेजच्या) रमा विजापूरकर इत्यादी. इतकेच काय तर माझ्या बँकेतही चीफ रिस्क ऑफिसर होत्या कविता वेणुगोपाल या एक महिला. (त्या मध्यंतरी सोडून गेल्या पण दुसरीकडे जातील तिथेही त्यांनी तितक्याच तोलामोलाची नोकरी मिळणार हे नक्की). त्यावर तिचे म्हणणे होते की हे सगळे अपवाद आहेत!!

मला वाटते की जगात केवळ दोन प्रकारचे लोक असतात. एक तर सबबी सांगणारे आणि दुसरे म्हणजे सबबी न सांगणारे. आपल्याला एखादी गोष्ट करण्यात यश आले नाही तर त्याची कारणमिमांसा करताना आपल्या ल़क्षात येईल की त्यात महत्वाची कारणे आपल्याशीच निगडीत असतात आणि इतरांमुळे आपल्याला आलेले अपयश हे कारण त्या मानाने खाली असते.आणि सबबी सांगणारे लोक आयुष्यात फारसे काही मिळवू शकत नाहीत आणि अशांना फारसे गांभीर्याने घ्यायची गरजही नाही.आणि नोकरी सुरू करायच्या आधीच अशा सबबी सांगायची सुरवात करणे म्हणजे मनात एक प्रकारचा नकारात्मक दृष्टीकोन सुरवातीपासून ठेवणे.कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी अशी नकारात्मक दृष्टीकोन असलेली माणसे फारशी कोणालाच आवडत नाहीत.

"बक स्टॉप्स हिअर" आणि मी माझ्या अपयशासाठी इतर कशालाच्/कोणालाच जबाबदार धरणार नाही असे वाटणे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणे हीच यशाची पहिली पायरी आहे.माझी खात्री आहे की अनेक स्त्रिया चंदा कोचर किंवा शिखा शर्मांना आपले रोल मॉडेल मानून त्या जशा "अपवाद" झाल्या तशी मी पण का होणार नाही या जिद्दीने काम करत असतीलच.एकूणच आपल्याच पोटात किती आग आहे (fire in the belly) आणि आपण किती कष्ट करतो यावरच सगळे काही अवलंबून आहे. अशी महत्वाकांक्षेची आग कॉलेजमधील मुलींच्या मनात न पेटवता जर त्या कोणा स्त्रीमुक्तीवाल्याचे ऐकून जर आधीपासूनच सबबी सांगायला लागल्या तर अशांच्या हातून काहीही भव्यदिव्य होणार नाही हे अगदी लिहून घ्या.

तुम्ही मराठी असल्यामुळे तुमच्यावर अन्याय होतो आहे असे म्हणून "मनसे" आग भडकावणे खूप सोपे असते आणि त्याला बरेच लोक बळीही पडतात.त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच जर "मी स्त्री असल्यामुळे माझ्यावर अन्याय होणारच" असा नकारात्मक दृष्टीकोन हे स्त्रीमुक्तीवाले/वाल्या अनेक मुलींच्या/स्त्रियांच्या मनात निर्माण करत असतील तर अशी मंडळी स्त्रियांचेच नुकसान करत आहेत आणि दुर्दैवाने ते त्यांच्या लक्षात येत नसेल तर ती फार वाईट गोष्ट आहे.

बॅटमॅन's picture

12 Dec 2012 - 11:30 am | बॅटमॅन

क्लिंटनशी बाडीस. विशेषतः

तुम्ही मराठी असल्यामुळे तुमच्यावर अन्याय होतो आहे असे म्हणून "मनसे" आग भडकावणे खूप सोपे असते आणि त्याला बरेच लोक बळीही पडतात.त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच जर "मी स्त्री असल्यामुळे माझ्यावर अन्याय होणारच" असा नकारात्मक दृष्टीकोन हे स्त्रीमुक्तीवाले/वाल्या अनेक मुलींच्या/स्त्रियांच्या मनात निर्माण करत असतील तर अशी मंडळी स्त्रियांचेच नुकसान करत आहेत आणि दुर्दैवाने ते त्यांच्या लक्षात येत नसेल तर ती फार वाईट गोष्ट आहे.

याच्याशी तर हज्जारवेळा सहमत!!

विटेकर's picture

12 Dec 2012 - 11:55 am | विटेकर

अत्यंत संतुलीत प्रतिसाद !
Failure has 1000 excuses and Success doesn't need even one!
कै च्या कै चालले होते.. आता जरा बरे वाटले.
आपल्यावर होणार्‍या अन्यायाबाबत बोंबलत बसण्यापेक्षा पर्यायी उत्तर देऊन सक्षम होणे हाच खरा उपाय आहे.
डार्विनच्या सिद्धांतानुसार बळी तो कान पिळी हे तत्व आहेच पण हे जर सर्वथैव खरे असते तर आज जगात दुबले शिल्लक राहीलेच नसते ! आणि प्रयत्नवादालाही काही अर्थ राहीला नसता !
निसर्ग हा अत्यंत न्यायी आहे आणि तेथे सर्वांना समान संधी आहे !
one must work on his core competence and do his SWOT to survive than imitating others ( other religion , gender , language , race etc etc)

पिलीयन रायडर's picture

12 Dec 2012 - 12:24 pm | पिलीयन रायडर

काही करण्याच्या आधीच सबबी सांगणार्‍या व्यक्तीला कधीच यशस्वी होता येत नाही.
स्त्री मुक्तीच्या वेग वेगळ्या कल्पना अस्तित्वात आहेत.. पैकी माझ्या मते स्त्री जेव्हा स्वतःच ठरवेल त्या क्षणापासुन ती मुक्तच आहे.. आपल्या वर सतत अन्याय होतोय ही भावनाच तिला "बिचारी-बिचारी" बनवते. उलट मला माझे ध्येय मिळविण्या पासुन कोणिही रोखु शकणार नाही, मी स्त्री आहे ह्या गोष्टीचा माझ्या कामाशी काहीही संबंध नाही, मीही तो लावणार नाही असं ज्या ठरवतात, त्याच पुढे जातात..
मला अमुक तमुक करायच होतं पण नवर्‍यानी अडवलं, ह्या ला "अडवलं म्हणुन घरात बसले" , "त्याचं मन वळवलं" , "समजावुन पाहिलं, नाही जमलं सोडुन दिलं" , "समजावुन पाहिलं, नाही जमलं.. नवर्‍याला सोडुन दिलं" अशी बरीच व्हर्जन पहायला मिळतात.. ज्याला जे जेवढं महत्वाचं वाटतं ते तो करतो..
नवर्‍यानी मारल्यावर तो मार खाणारी असते तसंच त्याचा हात वरच्या वर धरणारी पण आहेच. हा प्रत्येकीच्या समजुतीचा, धाडसाचा भाग आहे..ह्यात स्त्री असण्याचा संबंध नाही..

स्त्री आधी स्वतःच्या "बिचारे -बिचारे" पणातुन मुक्त झाली पाहीजे.. तिच्या मनात आधी तीने स्वतःला आदर दिला पाहिजे तर समाज तिला समान संधी देईल... नाही तर "पुरुषाशिवाय स्त्रीला अर्थ नाही, शेवटी हळदी कुंकवाला विधवेला बोलवतात का??" असं म्हणणार्‍या बायका आहेतच ना..

कवितानागेश's picture

13 Dec 2012 - 1:44 pm | कवितानागेश

स्त्री आधी स्वतःच्या "बिचारे -बिचारे" पणातुन मुक्त झाली पाहीजे..
बाडीस.

चिगो's picture

12 Dec 2012 - 1:52 pm | चिगो

स्त्रीला तीचे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार म्हणजे स्त्रीमुक्ती.. हा अधिकार सर्वच बाबतीत असावा. शारिरीक, मानसिक, सामाजिक आर्थिक इ.इ... गंमत म्हणजे स्त्री 'प्रणयतृप्त' झाली की बाकी सगळं ठीक होतं,हा विचार पुरुषच मांडताहेत आणि त्याला दुजोरा देताहेत. कुठल्याही स्त्रीने ह्या विचाराला पाठींबा दिला नाहीये.. :-O (पुरुषांना स्त्रीयांबद्दल त्यांच्यापेक्षाही जास्त कळतं, हा युक्तीवाद आताच कानात वाजतोय.. ;-) ) चालु द्या..

('सरपंचपती' सारख्या शब्दांची चीड असलेला) चिगो

कपिलमुनी's picture

12 Dec 2012 - 4:23 pm | कपिलमुनी

मिपावरच्या धागापाडू मंडळींच्या बर्याच धाग्यानंतर एक चांगला धागा आणि त्या निमित्ताने झालेली चांगली चर्चा वाचायला मिळाली

सामान्य वाचक's picture

12 Dec 2012 - 5:05 pm | सामान्य वाचक

कमी होता १०० ला, घेऊन टाका

आबा's picture

12 Dec 2012 - 5:08 pm | आबा

सेंच्युरी झाली !

अन्या दातार's picture

12 Dec 2012 - 7:01 pm | अन्या दातार

धागाकर्त्याची मते वाचायला मिळाली असती तर???

संजय क्षीरसागर's picture

12 Dec 2012 - 7:33 pm | संजय क्षीरसागर

जाहिरला एका महत्त्वाच्या विषयावर लिहिल्याबद्दल आणि ज्यांनी विषयाला धरून प्रतिसाद दिले त्या सर्वांना धन्यवाद!

हा प्रतिसाद देतो.

एक स्त्री श्रीमंत असते, स्वतः अनेक पुरुषांशी संबंध ठेवते, ती स्वतंत्र असते, तिच्यावर कोणतेही बंधन नसते, असलेल्या पुरुषांवर ती सत्ता गाजवते तरीही ती समाधानी नसते

अनेकांशी संग हेच मुळात अतृप्ती दर्शवतं.

लेट मी गो इन्टू फायनर डिटेल्स. स्त्रिला प्रणयतृप्त करायला चार गोष्टी आवश्यक आहेत.

एक, स्त्री आणि पुरूष यांना एकमेकाविषयी वाटणारं प्रेम. कारण ते नसेल तर प्रणय आनंद देण्याऐवजी घेण्यासाठी होतो. त्या स्त्रीप्रती वाटणारी कृतज्ञता म्हणून पुरूष तिला आनंदी करण्याचा प्रयत्न करतो तर स्त्री त्याच्याशी अनिर्बंधपणे सर्वस्वी मोकळी होते.

दोन, प्रणयाबद्दल कोणत्याही प्रकारचा अपराधभाव दोघांच्याही मनात नको. सर्वस्वी मनमोकळेपणानं दोघांनी प्रणयात सहभागी व्हायला हवं. मजा म्हणजे हे फक्त वैवाहिक नात्यातच होऊ शकतं. अनेकांगी संबंधात कुणाची कुणाला काहीएक कमिटमेंट नसते.

तुम्ही म्हणता त्या सिनेमात अतृप्तीचं (मानसिक कारण) म्हणजे नेमकी हिच गोची आहे. वन नीडस टू बी कंप्लीटली कमिटेड टू हिज बिलव्हेड नाहीतर स्त्री संपूर्णपणे मोकळी होऊच शकत नाही.

आणि तुम्ही म्हणता त्या सिनेमात तर पुरूषांच्या मनात तिच्याविषयी कृतज्ञता असणं शक्यच नाही. सो नन ऑफ देम वील बी इन अ गिवींग मूड.

तिसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमालीच्या फुरसतीचा माहौल. स्त्रीला तृप्त करण्यासाठी वेळ शून्य झाली पाहिजे. थोडक्यात एक न उजाडणारी रात्र निर्माण करू शकणारा निवांत पुरूष हवा आणि त्यानं स्त्रीला त्या निर्वेध चित्तदशेत न्यायला हवं.

चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरूषाचं शरीर अत्यंत स्वस्थ (लवचिकता, श्वसन आणि अभिसरण हे तिन्ही पैलू उत्तम असलेलं) हवं. आणि त्याची चित्तदशा कमालीची अविचल हवी. स्रीला ऑरगॅझमपर्यंत न्यायला तो स्वतः अत्यंत स्थिर हवा.

अशा अवस्थेत तृप्त झालेल्या स्त्री आणि पुरूषाचं असं काही ट्युनिंग जमतं की दुसर्‍या कुणाशीही प्रणय इतका तृप्तीदायी होऊ शकणार नाही हे दोघांनाही कळतं.

यू वोंट बिलीव पण अश्या प्रणयातनं होणारं मूल इतकं लाघवी असतं की विचारता सोय नाही. अश्या अपत्याला जन्म देणारी स्त्री निसर्गाच्या त्या निर्मितीप्रक्रियेनं कमालीची सुखावते. तिला स्त्री देहाचा अनायासे अभिमान निर्माण होतो. तिला तिच्या स्त्रीत्वाचं सार्थक वाटतं.

विवाह या संकल्पनेमागे असलेल्या अत्यंत थोर भारतीय विचारप्रणालीचा म्हणूनच मला सार्थ अभिमान आहे.

राजेश घासकडवी's picture

13 Dec 2012 - 5:11 am | राजेश घासकडवी

तुमचे एकंदरीत बरेच पक्के गैरसमज आहेतसं दिसतंय.

RIP मानववंशशास्त्र. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2012 - 7:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजयराव आपले प्रतिसाद, प्रतिसादाची मांडणी, आणि प्रतिसादक म्हणून जवाबदारीने लिहिलेली उत्तरं मला नेहमीच भावतात, आणि सर्व पटतातच असं नाही, पण आपल्या मांडणीमुळे संवाद उत्तम होतो, असे वाटत असते, आवर्जून प्रतिसाद लिहिल्याबद्दल आभारी आहे.

स्त्रीच्या प्रणयाबद्दल काही रोचक मुद्दे येताहेत का, या उत्सूकतेने मी जरा मुद्देसूद काही येऊ द्या, म्हणालो पण प्रतिसादातले मुद्दे न पटणारे आहेत. क्षणभर असं समजू की स्त्री पूर्णार्थाने अगदी तृप्त झाली आहे. अगदी उच्चतम आनंदाची परिसिमा तीने कैक वेळा अनुभवली आहे. अगदी परमसूख असं म्हणू ते तिला मिळालं आहे, आणि त्यामुळे स्त्रीवादाचे प्रश्न निकालात निघतात असे मला अजिबात वाटत नाही.

जगभर व्यवस्थेने लिंगभेदाच्या निमित्ताने एक हितसंबंध जपण्यासाठी स्त्री-पुरुष असा सत्तासंबंध रचला. या सत्तासंबंधात स्त्रीला गौण म्हणजे अगदी दुय्यम,टाकावू असे स्थान दिलं. स्त्रीचा स्वभाव, स्त्रीचे शरीर, स्त्रीचे कर्तव्य, आणि जे काय असेल ते सर्व एका सत्तेने निश्चित केले आणि वर्षानुवर्ष तिच्यावर आजतागायत सत्ता गाजविण्याचा प्रयत्न केला. आता या सर्व विचारातून ती हळुहळु बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे.

स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत विचार केला तर जी विषमता दिसते त्याची जाणीव म्हणजे स्त्रीवाद, पुरुषसत्ताक 'सत्तेच्या ' कल्पनेला नकार देणे म्हणजे स्त्रीवाद, तर एक व्यक्ती म्हणून स्त्रीत्त्वाचा विचार व्हावा ही स्त्रीवादाची अंतिम अवस्था मानली पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघंही अगदी समान आहेत, लिंगभेदापलिकडचा विचार असा तो प्रवास चालू आहे, असे वाटते.त्यामुळे आपला मुद्दा मात्र तितकासा समाधानकारक वाटला नाही.

बाकी, विवाह संस्था, विवाहामुळे आलेले नियंत्रण, वगैरे हा दुसरा मुद्दा.... वेळ मिळाला की खरडेनच.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

13 Dec 2012 - 10:02 am | संजय क्षीरसागर

तुमचा संपूर्ण प्रश्न असा आहे :

प्रणयाच्या बाबतीत खुलासा यासाठी म्हणत होतो की सिमॉन दी बुव्होच्या द सेकंड सेकस मधे एक उदाहरण आहे की, एक स्त्री श्रीमंत असते, स्वतः अनेक पुरुषांशी संबंध ठेवते, ती स्वतंत्र असते, तिच्यावर कोणतेही बंधन नसते, असलेल्या पुरुषांवर ती सत्ता गाजवते तरीही ती समाधानी नसते. आता या पेक्षा अधिक कोणतं स्वातंत्र्य स्त्रीला हवे असेल ? प्रणय आणि तृप्तीच्या पलिकडे अधिक काही आहे का ?

प्रणय ही निसर्गानं स्वतःच्या पुनर्निर्मितीसाठी योजलेली प्रक्रिया आहे. द नेचर इज इंटरेस्टेड इन प्रोलिफरेशन. त्यामुळे अस्तित्वातली ती सर्वोच्च आनंदाची प्रक्रिया आहे. बाकी सत्ता, संपत्ती, (आणि बुद्धिकौशल्य..तो पुन्हा वेगळा विषय आहे) या तीन गोष्टीत माणसानी शोधलेला आनंद या मानसिक गोष्टी आहेत.

म्हणजे तुम्ही सर्वोच्च सत्तेचे सर्वेसर्वा असलात तरी ते पद निव्वळ एक्साइटमेंट आहे. म्हणून तर पूर्वीचे राजे जनानखाने राखून होते कारण अनलेस वन इज सेषिएटेड ऑन द बेसिक्स, एवरिथींग एल्स इज जस्ट अ क्रॅप.

याचा दुसरा पैलू तितकाच महत्त्वाचा आहे : जर तुम्ही एका स्त्रीला मल्टीपल ओरगॅझमप्रत नेऊ शकलात तर तुम्हाला जनानखाना ठेवण्याची गरज नाही. सत्ता आणि संपत्ती हे दोन मानवीमनातले फंडामेंटल इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स सोडले (बुद्धी हा तिसरा आहे पण त्यावर पुन्हा कधीतरी) तर तुम्ही सम्राटापेक्षा सुखी होता.

आय एम नॉट जोकींग, आपल्याकडे तेवढी प्रखर कल्पनाशक्ती नाही इतकंच अन्यथा प्रणयात, प्रणयानंतर आणि प्रियेच्या निव्वळ सहवासातले क्षण, हे सत्ताप्राप्ती, ती टिकवण्यासाठी जीवाची सतत होणारी घालमेल आणि बाहेर असो की आत सदैव युद्धप्रवण वृतीतून येणारं कमालीचं अस्वास्थ्य यापेक्षा केंव्हाही आणि कित्येक पटीनं अनमोल आहेत.

याचा दुसराही पैलू तितकाच महत्त्वाचा आहे. उभा जन्म आणि अत्यंतिक प्रयास करून एखाद्या दिग्गज कलावंतानं जगातल्या कोणत्याही स्टेजवर साधलेला क्लायमॅक्स किंवा ऑरगॅझम आणि प्रणयतृप्त स्त्रीनं साधलेली अवस्था यात काहीही फरक नाही. कारण त्या दोन्हीही मनाच्या शून्य अवस्था आहेत.

एक साधी निसर्गानं बहाल केलेली उपजत आहे तर दुसरी ती कमालीच्या प्रयासानं साधलेली स्थिती आहे. आपल्याला दिग्गज कलाकारासमोर न्यूनत्वाची भावना येते त्यामुळे नैसर्गिक ऑरगॅझम हा सांगितिक (किंवा कलेच्या क्षेत्रातल्या कोणत्याही) ऑरगॅझमपेक्षा कमीप्रतीचा वाटतो. वास्तविकात दोन्ही अवस्था एकच आहेत कारण त्या दोन्ही अवस्थांच्या परामावधीची चित्तदशा एकच आहे.

नाऊ कमींग टू द एंड. प्रणय ही निसर्गाची सृजनप्रणाली आहे आणि मनुष्य देह हे अस्तित्वाचं सर्वोच्च सृजन आहे. जो स्त्री देह या सृजनाची कलात्मकता आणि सौंदर्य जाणतो त्याला सृजनाच्या आनंदाची परिसिमा गाठता येते.

मानवी देह निर्मितीपुढे इतर कोणतही सृजन फिकं आहे पण ती इतकी साधी आणि आम प्रक्रिया आहे की आपल्याला त्याची किंमत कळत नाही.

प्रणयतृप्तीचे अनेकविध दैहिक आणि मानसिक अविष्कार आहेत. उदाहरणार्थ, प्रणयतृप्त स्त्रिच्या सर्व इंडोक्राईन सिस्टम्स अत्यंत प्रभावी आणि सक्षम होतात (विषेशतः पिट्यूटरी आणि थायमस ग्रंथी). तिच्या अंगोपांगी एक बहर येतो, सर्व देह डौलदार होतो, तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अनोखा निखार येतो.

तृप्त प्रणयातनं निर्माण होणारं मूल शांत, बुद्धिमान आणि सृजनशील असतं. त्याचं संगोपन हा अवर्णनीय आनंद असतो.

अशा युगुलाला आणि संततीला त्यांनी निसर्गाशी अनुरूपता साधल्यानं निसर्गात मुळात असलेलं स्वास्थ्य अनायासे लाभतं. त्यांना स्वविकासाचे आणि सृजनाचे नवे आयाम उपलब्ध होतात. सत्ता, संपती आणि संघर्ष यांनी व्यापलेल्या या मानवी दुनियेत ते त्यांचा अभाव असलेलं स्वतःच एक वेगळं जग निर्माण करतात.

अशी वेगवेगळी तृप्त कुटुंब एका शांततामय, सृजनशील, पारस्पारिक अनुबंध असलेल्या आणि आनंदी जगाची शक्यता निर्माण करतात.

चिगो's picture

13 Dec 2012 - 1:22 pm | चिगो

च्यामारी, आता कुणाच्या बाळाला 'लाघवी' म्हणायची सोय राहीली नाही.. उगाच 'साल्या, आमच्या सेक्शुअल परफाॅर्मन्सवर कमेंट करतोस ?' म्हणून मारायचे लोक.. ;-) :-D

जेनी...'s picture

14 Dec 2012 - 8:46 pm | जेनी...

=))

:D

या धाग्याची लांबीरूंदी बघुन अगोदरच शीण आला होता.. त्यात प्रतिसाद देखील इतके भरभक्कम कि सगळे वाचलेच नव्हते.

प्रणयाच्या बाबतीत इतकं रसीकतेनं, रोचकतेनं, अर्थपूर्ण, तरिही समजायला बर्‍यापैकी सोपं असं फार क्वचीत वाचायला मिळतं. आय लाईक्ड इट.

अर्धवटराव

पुष्कर जोशी's picture

13 Dec 2012 - 3:28 pm | पुष्कर जोशी

मधील मातृसत्ताक पद्धती बद्दल कोणी काही सांगेल का ?

मी एक मेघालयातील एकास भेटलो होते तो म्हणे मी माझ्या बायकोच्या घरी राहतो आईच्या नव्हे आणि त्याला त्यामुळे २ घराचे बघावे लागत होते ... माहेर सासर असे प्रकार त्यास होते ..

तिथे मुलास आईचे आडनाव मिळते आणि नवरा आपले जुनेच आडनाव चालू ठेवतो .. सर्व व्यवहार मुलुंच्या नवे होतात आणि सगळ्या कागदपत्रांमध्ये मुलीचेच नाव असते ... संपूर्ण घर आणि हे घरातील सगळ्या घाकटया मुलीस मिळते .. मोठ्या नाही .....

सध्या पुरते इतकेच ..

प्रतिसादकांनी लेखाचा विषय नीट समजून घ्यावा म्हणजे चर्चेची दिशा योग्य राहिल.

स्त्रिमुक्तीच्या दोनच फ्लॅंक्स आहेत:

1. Equity feminism म्हणजे स्त्रिला शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि निर्णय स्वातंत्र्य मिळावं. हा उद्देश या शतकात बव्हंशी साध्य झाला आहे. तो किती साध्य झाला आहे, झाला आहे की नाही अथवा त्यासाठी काय करायला हवं हा या लेखाचा विषयच नाही. त्यामुळे त्या अनुषंगानं ही चर्चा नेणं व्यर्थ आहे.

2. लेखाचा विषय Gender feminism आहे.

स्त्रियांच म्हणणं असं आहे की त्यांच्याप्रती असलेली असमानता त्या स्त्री आहेत म्हणून नाही तर त्यांनी ‘स्त्री देह’ धारण केलाय म्हणून आहे. म्हणजे स्त्री देह धारण करणं हेच अन्यायाच मुळ आहे.

त्यामुळे स्त्री देहाशी निगडित जी काही ‘शारीरिक असामनता’ आहे त्यावर त्यांचा हल्ला आहे. आणि मला वाटतं हे सहजीवनाला, स्त्री-पुरूष समन्वयाला आणि कुटुंबव्यवस्थेला सर्वथा घातक आहे.

यासाठी मी, एखादी व्यक्ती स्त्री देह का नाकारते याची मानसिकता उलगडतोय. आणि तो देह किती सार्थक आहे आणि त्याच्या निर्मिती मागे निसर्गाची काय किमया आहे ते सांगतोय.

तुम्हाला विषय आता कळला असेल त्यामुळे त्या अनुरोधानं प्रतिसाद द्यावेत ही विनंती

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Dec 2012 - 7:44 pm | निनाद मुक्काम प...

काही लेखांचे विषय वाचले की सगळ्यात पहिले मी ते पान उघडतो ,
व प्रतिसाद वाचायला लागतो.
प्रतिसादाने करमणूक ,प्रबोधन अश्या दोन्ही उद्दिष्ट साध्य होतात.

सासरी सुखी असलेला
मातृसत्ताक पद्धतीत रमणारा
व त्यावर आख्यान रचणारा
निनाद ,मुक्काम पोस्ट जर्मनी

मे तो भूल चला बाबुल का देश , सजनी का घर प्यार लगे
मेरे मैके भिजवावो संदेश..........

आनन्दिता's picture

18 Dec 2012 - 12:44 am | आनन्दिता

मे तो भूल चला बाबुल का देश , सजनी का घर प्यार लगे
मेरे मैके भिजवावो संदेश..........

पुरूष असं गाण गातायत अन बायका त्यांच्याकडे खट्याळ पणे बघतायत असे द्रुष्य आम्हास दाखवणारा "सोनियाचा दिनु" लवकरात लवकर येवो... ही सर्व देवींच्या चरणी
प्रार्थना !!!

आनंदी गोपाळ's picture

18 Dec 2012 - 12:04 pm | आनंदी गोपाळ

चर्चा वाचली.
लेख वाचायचा प्रयत्न केला पण जमले नाही.

चर्चा वाचून उभा राहिलेला प्रश्न.
संजय क्षीरसागर व जहीर सय्यद ही एकाच व्यक्तीची नावे आहेत का??

कारण फक्त संजय क्षीरसागर यांनी लेख "वाचलेला" दिसतो आहे, अन धागा लिहिणारे एक शब्दही बोलत नाहीयेत, फक्त संजय क्षीरसागर च बोलत आहेत.

पण त्याला बहुदा फक्त प्रश्न मांडायचा होता.

विषय महत्वाचा वाटल्यानं मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्यांना कळलं त्यांचे तसे प्रतिसाद आहेत. ज्यांना कळलं नाही किंवा जे कळून फ्रस्टेट झालेत त्यांनी विडंबनात्मक पोस्ट टाकल्या आहेत.

रामपुरी's picture

12 Jan 2013 - 3:09 am | रामपुरी

निखळ करमणूक करणारे प्रतिसाद... लेखाची लांबी बघून वाचायचे धाडस झाले नाही पण प्रतिसाद मात्र नंबरी आहेत. लेखाच्या लांबीवरचे, लेख अभ्यासपूर्ण असल्याचे, काहीच न कळल्याचे, 'तो मीच' च्या आविर्भावात सगळा लेख आपल्यालाच कळल्यासारखे असे विविध प्रकारचे प्रतिसाद वाचता वाचता वेळ कसा गेला काही समजलंच नाही. मजा आली. एक लंबर लेख.. आपलं प्रतिसाद

आत्तापर्यंत २ होमोसेक्श्युअल पुरुष भेटले आणि दोघेही स्त्रीद्वेष्टे होते. सगळे असतीलच असे नाही पण मला भेटलेले होते.
जर स्त्रिया लेस्बिअन असतील तर त्या पुरुषद्वेष्ट्या असतील यात आश्चर्य नाही. सर्व नसतील पण काही असू शकतील.

लेखाची लांबी बघून वाचायचे धाडस झाले नाही पण प्रतिसाद मात्र नंबरी आहेत.

संजयनी प्रणयाच्या सूक्ष्म छटांचे मंथन करून, वैचारिक क्षीरसागरातून विविध अनमोल रत्ने सादर केली. स्त्रीच्या देहात प्रणयाची तृप्ती मनात कुठे होते अशी विचारणा न केल्याबद्दल धन्यवाद.