रे मना ..
रे मना मोती पुन्हा निखळून गेले
थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले
आस होती आठवांना आसवांची
मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले
श्वास होते रोखलेले मी कधीचे
भास होते खास आज कळून गेले
जीव घेणे घाव देही सोसले मी
शीतवारे ना कधी जवळून गेले
खेळ जेव्हां जीवनाचे साहवेना
शोधते वैरी कुठे वितळून गेले
- संध्या
(२३.२०.२०१०)
गझलसम्राट कै सुरेश भट यांच्या एका गझलेतून प्रेरणा घेऊन
प्रतिक्रिया
20 Mar 2012 - 5:13 pm | चैतन्य दीक्षित
एकंदरित छान आहे गझल.
फक्त-
भास होते खास आज कळून गेले
इथे- खास आ- जकळून गेले- असे तोडून वाचावे लागले (मला तरी) त्यामुळे वृत्तात/मीटरमधे असूनही थोडं खटकलं.
चू. भू. दे. घे.
20 Mar 2012 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा
:-)
20 Mar 2012 - 5:27 pm | प्रचेतस
सुंदर कविता.
हा २० वा महिना कुठला ब्वा याचा विचार करतोय.
20 Mar 2012 - 6:39 pm | धन्या
कुणीतरी रसग्रहण टाका रे.
दोन दोन ओळींच्या जोडीतील फक्त पहिल्या ओळीच कळल्या. दुसर्या ओळीचा पहिल्या ओळीशी काय संबंध आहे हे आमच्या आधीच अधू असलेल्या मेंदूवर जोर देऊनही कळले नाही.
मी अकरावी बारावीला असताना लिहिलेल्या चारोळ्यांची वही खुप शोधली पण सापडतच नाही.
20 Mar 2012 - 6:43 pm | गणेशा
रसग्रहण नाही .. पण कवयत्रीची संमती असल्यास पॉझिटीव्ह उत्तर लिहावेसे वाटते.
20 Mar 2012 - 6:55 pm | प्रचेतस
ओपन फोरमवर संमतीची काय गरज रे?
बाय द वे कवयत्री नाही, कवयित्री. :)
21 Mar 2012 - 10:23 am | पक पक पक
बाय द वे कवयत्री नाही, कवयित्री.
कॉलिंग चौकट राजा
कॉलिंग चौकट राजा
कॉलिंग चौकट राजा
20 Mar 2012 - 6:42 pm | गणेशा
छान . आवडला शेर.
20 Mar 2012 - 6:55 pm | सांजसंध्या
@ वल्ली
फेब्रुवारी आहे तो महिना :) वर्षाचा दुसरा
@ धनाजीराव = करा कि बिनधास्त रसग्रहण... मला शिकायलाच मिळेल त्यातून. तुमच्या सूचनेवर विचार करेन नक्किच
@ गणेशा - नेकी और पूछ पूछ ?
@ चैतन्य दीक्षित - यती भंग म्हणायचंय का ? मान्य आहे. तुम्ही ज्या लयीत वाचली त्यावर अवलंबून आहे.
@ अतृप्त आत्मा - :)
20 Mar 2012 - 7:07 pm | गणेशा
@ सांजसंध्या - प्रयत्न करतो . पण वृत्तात लिहित नाहि.. कारण जमनार नाही.
20 Mar 2012 - 7:10 pm | हारुन शेख
'आस होती आठवांना आसवांची
मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले'
हा शेर काय जमून आलाय, बहोत उंचे ! या एका शेराने जिंकलेत तुम्ही आम्हाला. तुमची प्रतिभा लखलख करणाऱ्या बिजलीसारखी प्रकट झालीय या कडव्यात ! लिहित राहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
20 Mar 2012 - 7:38 pm | सांजसंध्या
@ हारूनजी
थँक्स अ लॉट् :)
20 Mar 2012 - 7:58 pm | धन्या
आमच्या पुणे ३० मधल्या एका मित्राने याच कवयित्रीच्या एका कवितेवर दिलेला प्रतिसाद आठवला. :)
20 Mar 2012 - 8:07 pm | सांजसंध्या
आमच्या पुणे ३० मधल्या एका मित्राने याच कवयित्रीच्या एका कवितेवर दिलेला प्रतिसाद आठवला..
:गोंधळलेली बाहुली:
20 Mar 2012 - 7:14 pm | सांजसंध्या
@ धनाजीराव.. बघा बरं पटतं का हे स्पष्टीकरण..
रे मना मोती पुन्हा निखळून गेले
थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले
आयुष्यातले चांगले क्षण (जे हसू आणू शकतात ) ते निखळून गेलेत... पुढची ओळ कल्पनाविस्तार फक्त..
आस होती आठवांना आसवांची
मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले
आठवणी अशा दुं:खद कि अश्रूंचीच आस होती.. पण ( अश्रूंनी भरलेले) मेघ ही ते गाव वगळून गेले.. रडण्याचीही सोय राहिली नाही.
20 Mar 2012 - 8:15 pm | धन्या
वरची प्रतिक्रिया पहिल्या वाचनानंतरची होती. काहीशी दुर्बोध वाटली कविता, कदाचित माझी कवितांबद्दलची जाण कमी असेल. :)
20 Mar 2012 - 8:19 pm | सांजसंध्या
कदाचित माझी कवितांबद्दलची जाण कमी असेल.
अजिबात वाटलं नाही असं :) खरंतर तुमचा मुद्दा रास्त वाटला म्हणूनच स्पष्ट केलं. त्रुटी दाखवतानाही कुणी दुखावला जाणार नाही ही काळजी तुम्ही घेतली .. मनापासून आभार आपले
20 Mar 2012 - 7:42 pm | पैसा
यतिभंगावर कोणी तरी उपाय सुचवा रे! चर्चा उत्तम चाललीये!
20 Mar 2012 - 7:51 pm | चौकटराजा
माला भ्या वाटतीय रसग्रहनाची म्हून
म्ह्न्तो माला खालील ओळ्या लई अवाल्ड्या
जीव घेणे घाव देही सोसले मी
शीतवारे ना कधी जवळून गेले
कारन रसग्ग्रहनात माजी अवास्ता आशीच झाली व्हती फक्कस्त " घाव देही" च्या जाग्याव "घाव मणि" ह्ये शबूद टाका .मंग बराबर माजीच
आवास्ता कवयित्रीने दर्शविली. म्हंजी साहित्याकाला परकाया पर्वेशाचा वरदहस्त आसतो आसं ज्ये मंगेशमामा पाडगावकर म्हंतात त्ये खरंच हाये
म्हनायचं !
20 Mar 2012 - 10:56 pm | शैलेन्द्र
"आस होती आठवांना आसवांची
मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले"
मस्त.. चित्रदर्शी प्रतिमा
21 Mar 2012 - 7:37 am | यकु
वरवर चित्रदर्शी, पण खोलवर कृत्रिम.
आठवांना आसवांची आस म्हणजे काय?
यामध्ये कुठल्याच जीवंत चलनवलनाचे चित्रण दिसत नाही, फक्त शब्दासमोर शब्द दिसतो.
मेघातून आठवांच्या अश्रूची अपेक्षा आहे आणि ते गाव वगळून पुढे निघून गेले म्हणजे रडू आले नाही का?
आठवण --> रडणे
वि. सू. : हा प्रतिसाद एका आजोबांकडून लिहून घेण्यात आला आहे ;-) मला शिव्या देऊ नये. ;-)
पळा ऽऽऽ !
((शब्दांचा खाटीक J-) ) यक्कू क्रूरसिंह
21 Mar 2012 - 7:44 am | सांजसंध्या
यक्कू
माझं त्या आजोबांशी कसलंही भांडण नाही. पण मधेच गदिमा, मधेच हिरवं आकाश ...कळ्ळं ना ? ;)
पोस्टमार्टेमला फुल्ल परवानगी आहे.
21 Mar 2012 - 8:56 am | चौकटराजा
रसग्रहनाला पोस्टमारर्टेमची उपमा द्यावी ?याबिगर दुसरा शबूद आपल्या शब्दकळेतून आला का न्हाई ? एकांद दुसरा फाल्ट काल्डा म्हून येकदम
संदेश बांद ? आनि आपला ल्हानपनचा ख्योळ आटावतो का? कुनी ग्या हा कुनी ग्या तो . अंग तस्शावानी आमी म्हंतो तुमी घ्या ग्रेस भट
आम्ही ग्येतो मंगू आन्ना आन गंपटराव ( हा शबूद पु भा भाव्यांचा बर्का ! ) .
21 Mar 2012 - 9:36 am | सांजसंध्या
हे राम..
21 Mar 2012 - 2:07 pm | चौकटराजा
ह्यो डायलाग जगाच्या इतिहासामंदी द्वोगंच म्हंगाले . येक म्हंजी दशेरत आनि दुगला म्हंजी गांदीबाबा ! आन दोगं बी बाप्ये व्हते !
संदरब - विकी चा पेड्या
21 Mar 2012 - 10:33 am | मिसळलेला काव्यप्रेमी
छान प्रयत्न!