(गिरनार पर्वतावर रंजिताची - गुरूंशी भेट)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
1 Feb 2012 - 11:57 am

सदरच्या विडंबनाकरता तामिळनाडूमधील काही महिन्यांपूर्वी सिने अभिनेत्री रंजिता आणि स्वामी नित्त्यानंद यांच्यातील गाजलेल्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. या स्कँडलबाबत अनेक संकेतस्थळांनी आणि हिंदी-इंग्रजी व सर्व दाक्षिणात्य वाहिन्यांनी काही काळ सातत्याने प्रकाश टाकला होता. सबब, या विडंबनाकरता आणि केवळ मौजमजा म्हणून इथेही त्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. मिपा मालक-चालक आणि संपादकवर्गाची त्याबाबत हरकत नसावी!

-- तात्या. (मिपा संस्थापक)

मित्र हो,
शशिकांत ओकांच्या धाग्यावरील रंजक माहिती वाचून एका जागृत स्वामींची एक आठवण सादर करत आहे.

या दुव्यावर त्यांची आणखी काही माहिती मिळेल.

गिरनार पर्वतावर रंजिताची - गुरूंशी भेट

गिरनार पर्वतावर चढायच्या १०,००० पायऱ्यांचा बिकट मार्ग

'मला आदेश आलाय भेटायला गिरनार पर्वतावर ये! मी चालले केव्हा परतेन माहित नाही.' सगळे सिनेरसिक चाहते आणि घरचे लोक हादरले. मार्च 2011 ची ती सुरूवात असावी. झाले, रंजिता जाणार गिरनारला म्हणून चर्चा सुरू झाली आणि रंजिताने आपले प्रयाण अहमदाबाद येथे केले. पुढे सात दिवसांनी रंजिता परत आली ती गुरूवारच्या शुटींगला हजर! सगळ्यांना हायसे वाटले आणि सिनेरसिक चाहत्यांना आणि पत्रकरांना गुरूंची भेट कशी झाली याबद्दल उत्सुकता लागली.

ही आमची रंजिता -

बाबा म्हणजे आमचे नित्त्यानंद बाबा. त्या भेटीचे वर्णन करताना रंजिता म्हणते, जवळजवळ जवळजवळ दहा हजार पायऱ्याचा तो मार्ग माझ्यासारख्या तिशी उलटलेल्या व्यक्तीला पाहून भयचकित व्हायला होते. गुरूंचे निमंत्रण, निश्चय व धीर करून मी निशंकपणे मार्गक्रमण करू लागले.

आणि हे नित्त्यानंद बाबा -

सकाळी सात-सव्वा सातची वेळ असेल. शंभर सव्वाशे पायर्‍या चढल्यावर आता पुढे एक पाऊल टाकणे शक्य नाही असे वाटून मी प्रार्थना केली, 'मला माफ करा, महाराजा! आपल्या दर्शनाला मी येऊ शकत नाही. इथुनच मला परतण्याची परवानगी द्या' असे मनोमन म्हणत लागलेली धाप आणि वरखाली होणारी छाती शांत होते न होते तोवर असा चमत्कार झाला की परत फिरायचे सोडा नंतर फारसे कुठेच न थांबता एकदम आठ हजार पायऱ्यांपाशी अन्य एका बाबांची गुहा आली. तेथे थांबणे झाले! ;)

चढणार्‍या आणि उतरणार्‍या स्त्री शिष्यांची गर्दी तुरळक होती. त्या गुहेपाशी आल्यावर थोडासा विश्राम घेऊन गुहेचे दर्शन घेण्यास मी पायऱ्यांवरून तिकडच्या वाटेला लागले. गुंफा म्हणजे काय? साधारण एक छोटीशी खोली असेल इतपत दगडाची खोबण! वज्रासनात बसण्याएवढी जागा! अंधार आणि शांतता! ;) ;)

प्रत्यक्ष गुहेपाशी एक तरूण रसरशीत शिष्या किलकिले डोळे करून वाटेत बसलेली. तिने रंजिताला भुवया उंच करून विचारले, 'क्युं आयी हो?' ते नटीवजा व्यक्तिमत्वाचे तारुण्य पाहून रंजिताने म्हटले, 'गुरू के दर्शन के लिए आयी हूँ।' असे म्हणून रंजिताने 'नित्त्यानंद स्वामी' अशी जोरदार हाक दिली. त्यावर त्या तरुणीने 'नित्त्यानंद स्वामी' असे प्रत्युत्तर दिले आणि म्हटले, 'यहाँ तो कोई गुरू या बाबा है नही। ये तो खाली गुफा है।' म्हणून गुहेकडे बोट केले. रंजिताने तिच्याकडे दुर्लक्ष केले. पटकन खालेल्ल्या मेंटॉसचा एक दीर्घ स्वाद घेत म्हणाली, 'देखते है।' त्यावर ती तरुणी म्हणाली , 'पता नही कितनी बॉलिवुड और टॉलिवुडवालीया आयी और चली गई। तुम्हें क्या वहाँ देखने को मिलेगा? खाली पत्थर!' पुन्हा रंजिताने तिच्याकडे दुर्लक्ष करून म्हटले, 'जो होगा वो गुरू देख लेंगे. मेरे लिए तो गुरूका बुलावा आया हुआ है। इसलिए मैं आयी हूँ। आगे का वो जाने...!!!' ;)

आता त्या तरुणीने मान डोलावली, 'ठीक है, तो आप जाओ अंदर। तिथे एक स्वस्तिकासारखे चिन्ह ढकलून पाहा..' असे म्हणून स्मित हास्य केले. रंजिताने पुन्हा एकदा 'नित्त्यानंद स्वामी' असे म्हटल्यावर त्या तरुणीने 'नित्त्यानंद स्वामी' असे तिला उत्तर दिले आणि ती समोर ठेवलेल्या रिकाम्या दारुच्या बाटल्यांच्या ढिगाकडे पाहत बसली...! :)

रंजिता त्या गुहेत म्हणजे एक दहा बाय बाराच्या एका खडकाच्या कोनाड्यात जवळ गेली. स्वस्तिका प्रमाणे खूण असावी त्या खडकावर दरवाजा समजून साशंकतेने जोर दिला. जणू काही एखादा पुराणा दरवाजा उघडण्यासाठीच तयार होता! एक वाट तयार झाली आणि रंजिता आपसुकपणे आत गेली आणि मागनं पुन्हा तो दगड एकमेकात चिकटून गेला. एकदम अंधार झाला. मिट्ट अंधारात काही कळत नव्हते. छातीची धडधड वाढली होती. हे काय अघटित झालय या विचाराने मन धास्तावले होते. नक्की काय घडलय याचा थांग लागेना आणि रंजिता व्याकूळ झाली. हळूहळू मनाची शांती झाल्यावर त्यांच्या डोळ्यांना प्रकाशाची जाणीव झाली

.... आणि त्या प्रकाशात एक धीरगंभीर, भव्य रूप समोर आढळले.
'आओ, मैने बुलावा भेजा था।' रंजिताची विचारणा झाली आणि रंजिताला स्वामी नित्त्यानंदांना पाहून अत्त्यानंद झाला! आणि रंजिता अचानक एका बेड, टीव्ही, पंखा वगैरे असलेल्या सुसज्ज खोलीत दाखल झाली! :)


……
पुढे रंजितां म्हणते मी साधारण तेथे अर्धा तासापेक्षा कमी म्हणजे सत्तावीस मिनिटे होते. त्यावेळात त्या प्रखर व्यक्तिमत्वाच्या आभा वलयात मला अनेक गोष्टींचे खुलासे झाले! काही चुका, काही अक्षम्य चुका व वर्तमानस्थिती व पुढील कार्याची दिशा यांचा झाडा घेऊन त्यांनी माझ्यावर सतत लक्ष असल्याचे दर्शवून दिले...!! :)

'आता तरी यापुढे सावध रहा आणि गुपचुपपणे येत जा असा सल्ला देऊन म्हटले, 'आतातरी तुझी साशंकता गेली की नाही? -हे पाहण्यासाठी तुला इथे भेटण्याचा आदेश दिला. इथे आलीस यातून तुझी परीक्षा झाली...! :)

........ रंजिताने हात जोडून त्यांच्याकडे पाहून मानेने हो म्हटले आणि कमी होत जाणाऱ्या प्रकाशाकडे पाहून डोळ्यातील घळघळणारे अश्रू सावरले, कपडे, पदर, ओढणी सारखी केली, ठाकठीक केली!

रंजिता त्यांना म्हणाली, "गुरू महाराजा, चुका पदरात घ्या. सांसारिक जगात वागताना आपसुक चुका होतात. नंतर जाणीव होते की तेही एक माझ्याकडून करून घेतले जाणारं नाटक आहे. याची जाणीव मला सतत आहे. आपल्या आर्शिवादाने..!" :)

रंजिताने पुन्हाःपुन्हा हात जोडले - 'आजचा दृष्टांत माझ्या आयुष्याचा अविस्मरणीय भाग ठरो..' :)

रंजिता पुढे म्हणते - 'प्रार्थना संपत नव्हती. पाय भरून आले होते. सारे अंग घुसळल्या गेल्यासारखे वाटत होते. घामाच्या धारा होत्या. अंधारात चाचपडत. जिथे तिथे जोर लावून ढकलण्याचा प्रयत्न केला. पुन्हा खडक सरकून दरवाजा झाला. त्यातून मी बाहेर आले. दुपारचे बारा वाजून गेलेले. बाहेर स्त्री-शिष्यांची ये-जा. ती तरुणी धुनीपाशी बसलेली . सत्यातील जगाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर हळूहळू तरळू लागले. तेव्हा नुकताच झालेला तो अदभूत अनुभव सत्य होता याची पूर्णतः खात्री पटली.

'क्यूं, क्या हुआ?' असे म्हणून तरुणीने डोळे मिचमिचे करून स्मितहास्य केले! :)

रंजिताने 'नित्त्यानंद' म्हटले. त्यांनी दिलेली उदी कपाळाला लावली. अन त्यानंतर जे घडले ते अदभूत होते. 'नित्त्यानंद' पुकारा करून तरुणीने माझ्याकडे पहात माझ्या हातात सहा रुद्राक्ष आणि एक पांढऱ्या रंगाचा मोत्यासारखा खडा दिला! जणु ते सर्व माझ्यासाठी तयारच ठेवलेले होते! त्या वेळी क्षणभर वाटले, आत भेटलेले व्यक्तिमत्व तेच तर नव्हते? 'नित्त्यानंदा'चा पुकारा करत करत रंजिता पुढे निघाली.

रंजिताचा हा अनुभव आम्हा बॉलिवुड-टॉलिवुडच्या पत्रकारांना अदभूतकथन वाटत होते. नंतर वेळोवळी रंजिताने त्या घटनेचा उल्लेख केला. म्हणाली, 'पुढे घसरगुंडीसारख्या जागेतून गेल्यावर, तो पहाड खाली उतरून पुन्हा दुसऱ्या पहाडावर चढण्याची एक जिकिरीची चढण चढून.... ' इत्यादी इत्यादी! सगळंच अद्भूत.! :)

रंजिता तेथून दर्शन घेऊन परतली आणि तिच्या डोळ्यात वेगळ्या प्रकारची चमक जाणवली. तिचा हा अनुभव ऐकून बॉलिवुडमधील आणि टॉलिवुडमधील अनेक स्वार्थी, शरीरसुखाला फुका चटावलेल्या अनेक नट्यांनी गिरनार पर्वताची व त्या गोरक्षगूहेची यात्रा केली. ना तेथे त्यांना गुहेतील खोबण दिसली ना ते धुनीवाले बाबा...!! :)

.....तर अशी आमची रंजिता..! स्वामींच्या आर्शीवादाने अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधी औषधोपचाराने दूर करण्याने योगक्षेम साधण्यास सदैव तत्पर असते..! :)

... दर गुरूवारी तिच्याकडे सायंआरती मोठ्या आनंदाची असते. . शिवाय शुटींग नसेल तेव्हा नित्त्यानंदांचे अधिष्ठान, अशा रंजिताच्या काही आठवणी....

जय नित्त्यानंद..! :)

विनोदवाङ्मयविडंबनमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

1 Feb 2012 - 12:19 pm | मी-सौरभ

विडंबनाची कल्पना हुच्च असली तरी ते करताना आळस केलेला जाणवतोय.
स्पष्ट्च बोलतो; तुमच्याकडून अजून चांगलं विडंबन अपेक्षित आहे :)

विसोबा खेचर's picture

1 Feb 2012 - 12:26 pm | विसोबा खेचर

विडंबनाची कल्पना हुच्च असली तरी ते करताना आळस केलेला जाणवतोय.

हो, थोडा आळस केला खरा..

स्पष्ट्च बोलतो; तुमच्याकडून अजून चांगलं विडंबन अपेक्षित आहे

आभारी आहे. परंतु कृपया फारश्या अपेक्षा ठेऊ नका. विडंबनक्षेत्रात मी अद्याप बराच कच्चा आहे याची जाणीव आहे, परंतु आमच्या शश्या ओकचा लेख वाचून अगदीच राहवलं नाही म्हणूनच विडंबन करावंसं वाटलं.. :)

व्यक्तिचित्र, संगीत हे माझे विषय आहेत. विडंबन हा माझा विषय नाही..

असो..

तात्या.

मी-सौरभ's picture

1 Feb 2012 - 12:39 pm | मी-सौरभ

तुमच्या सारख्या सिद्धहस्त लेखकाने असं करुन कसं चालेल??

मूकवाचक's picture

1 Feb 2012 - 12:26 pm | मूकवाचक

सत्सन्ग आणि सन्तसमागमातून मिळणारे समाधान न्यारे आणि दैवदुर्लभच असणार. त्यासाठी पूर्वसन्चित बलवत्तर हवे. ते सगळ्यान्च्याच नशिबात कसे असणार?

मनराव's picture

1 Feb 2012 - 12:32 pm | मनराव

छान.......

मित्र हो,
नको तिथे घुटमळणारे आपले मित्रवर्य, तात्यांवर मेंटॉसची भुरळ पडली. शब्दांची कसरत आणि प्रसंगाची नजाकत खेचरांच्या लेखणीने हळुवारपणे मांडून यातून एका आत्मकथेला कसे बाळसेदार विडंबनात सादर करता येते याचा सुंदर नमुना..
लगे रहो तात्या... भाई...

लगोलग ताजा कलम - काही आणखी बॉली व टॉलीवुडच्या महानायिकांनी गिरनारवरची मज्जा करायला पायऱ्या चढायसाठी करुणा भाकली म्हणतात...

वसईचे किल्लेदार's picture

1 Feb 2012 - 2:29 pm | वसईचे किल्लेदार

तात्यानु सलाम ... एकदम ब्येस लिवलय

शशिकांत ओक's picture

2 Feb 2012 - 10:35 pm | शशिकांत ओक

तात्या, सलाम नमस्ते...

ईन्टरफेल's picture

3 Feb 2012 - 1:30 pm | ईन्टरफेल

झकास विडंबन खुप आवडले .

आदिजोशी's picture

3 Feb 2012 - 3:24 pm | आदिजोशी

टंकायचे कष्ट घेणारच होतात तर रोशनी तरी पूर्ण करायची. लिस्ट फार मोठी आहे. कधी संपवताय??????