गिरनार पर्वतावर चितळेबाबांची - गुरूंशी भेट

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
6 Jan 2012 - 1:22 am

मित्र हो,
नवनाथांच्या धाग्यावरील रंजक माहिती वाचून एका जागृत नाथपंथियाची एक आठवण सादर करत आहे.
आमचे चितळे बाबा या ब्लॉगवर त्यांची आणखी माहिती मिळेल.

गिरनार पर्वतावर चितळेबाबांची - गुरूंशी भेट

गिरनार पर्वतावर चढायच्या १०,००० पायऱ्यांचा बिकट मार्ग

‘मला आदेश आलाय 'भेटायला गिरनार पर्वतावर ये! मी चाललो केव्हा परतेन माहित नाही.' सगळे भक्तगण आणि घरचे लोक हादरले. मार्च 2011 ची ती सुरूवात असावी. झाले, बाबा जाणार गिरनारला म्हणून चर्चा सुरू झाली आणि बाबांनी आपले प्रयाण अहमदाबाद येथे केले. पुढे सात दिवसांनी बाबा परत आपले गुरूवारच्या पुजेला हजर! सगळ्यांना हायसे वाटले आणि शिष्यगणांना गुरूंची भेट कशी झाली याबद्दल उत्सुकता लागली.

सौराष्ट्र भागातील जुनागढ यापूर्वीचे संस्थान राजधानीचे स्थळ. स्थळापासून काही किलोमीटर अंतरावरील रिझव्ह फॉरेस्ट मधे सिंहाची पैदास व राखण केली जाते. याच गीरजवळ गिरनार पर्वतावर अनेक नरशार्दुल गेल्या हजारो वर्षापासून वास्तव्य करून आहेत. दत्तात्रय, गोरक्षनाथ अशा नवनाथांनी व काही अन्य महाभागांनी कठोर तपश्चर्या करून तेथे वास्तव्य केल्याच्या खुणा गुहा आणि गिरीकंदरातून मिळतात.

साधारण तीन हजार पायऱ्यांपाशी जैन तिर्थंकारांचे वास्तव्यही या पर्वतावर असल्याने गिरनार पर्वताची यात्रा भारतीयांना शेकडो वर्षापासून आकर्षित करते. बाबा म्हणजे आमचे चितळे बाबा, त्या भेटीचे वर्णन करताना म्हणतात, ‘जवळजवळ दहा हजार पायऱ्याचा तो मार्ग माझ्यासारख्या सत्तरी उलटलेल्या व्यक्तीला पाहून भयचकित व्हायला होते. गुरूंचे निमंत्रण, निश्चय व धीर करून मी निशंकपणे पायऱ्या चढायला लागलो.

सकाळी सात-सव्वा सातची वेळ असेल. शंभर सव्वाशे पायऱ्या चढल्यावर आता पुढे एक पाऊल टाकणे शक्य नाही असे वाटून मी प्रार्थना केली, 'मला माफ करा, महाराजा! आपल्या दर्शनाला मी येऊ शकत नाही. इथुनच मला परतण्याची परवानगी द्या' असे मनोमन म्हणत लागलेली धाप शांत होते न होते तोवर असा चमत्कार झाला की परत फिरायचे सोडा नंतर फारसे कुठेच न थांबता एकदम साधारण आठ हजार पायऱ्यांपाशी गोरक्षनाथांची गुहा आली. तेथे थांबणे झाले!
चढणारे आणि उतरणारे यांची गर्दी तुरळक होती. त्या गुहेपाशी आल्यावर थोडासा विश्राम घेऊन गुहेचे दर्शन घेण्यास मी पायऱ्यांवरून तिकडच्या वाटेला लागलो. गुंफा म्हणजे काय? साधारण एक छोटीशी खोली असेल इतपत दगडाची खोबण! वज्रासनात बसण्याएवढी जागा! अंधार आणि शांतता!

प्रत्यक्ष गुहेपाशी एक वृध्द किलकिले डोळे करून वाटेत बसलेले. त्यांनी बाबांना भुवया उंच करून विचारले, 'क्युं आए हो?' ते गोसावीवजा व्यक्तिमत्वाचे वृध्द पाहून बाबांनी म्हटले, ‘गुरू के दर्शन के लिए आया हूँ।‘ असे म्हणून बाबांनी ‘अलख निरंजन’ अशी जोरदार हाक दिली. त्यावर त्या गोसाव्यांनी 'अल्लख निरंजन' असे प्रत्युत्तर दिले आणि म्हटले, ‘यहाँ तो कोई गुरू या बाबा है नही। ये तो खाली गुफा है।‘ म्हणून गुहेकडे बोट केले. बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पटकन सुलगावलेल्या बिडीचा एक दीर्घ झुरका घेत म्हणाले, ‘देखते है।‘ त्यावर ते गोसावीबाबा म्हणाले, ‘पता नही कितने लोग आये और चले गए। तुम्हें क्या वहाँ देखने को मिलेगा? खाली पत्थर!’ पुन्हा बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून म्हटले, ‘जो होगा वो गुरू देख लेंगे. मेरे लिए तो गुरूका बुलावा आया हुआ है। इसलिए मैं आया हूँ। आगे का वो जाने।‘
आता त्या गोसावीबाबांनी मान डोलावली, ‘ठीक है, तो आप जाओ अंदर। तिथे एक स्वस्तिकासारखे चिन्ह ढकलून पाहा.’ असे म्हणून स्मित हास्य केले. बाबांनी पुन्हा एकदा ‘अलख निरंजन’ असे म्हटल्यावर गोसावी बाबांनी ‘अलख निरंजन’ असे त्याला उत्तर दिले आणि ते समोर ठेवलेल्या राखेच्या ढिगाकडे पाहत बसले.

बाबा त्या गुहेत म्हणजे एक दहा बाय बाराच्या एका खडकाच्या कोनाड्यात जवळ गेले. स्वस्तिका प्रमाणे खूण असावी त्या खडकावर दरवाजा समजून साशंकतेने जोर दिला. जणू काही एखादा पुराणा दरवाजा उघडण्यासाठीच तयार होता! एक वाट तयार झाली आणि बाबा आपसुकपणे आत गेले आणि मागनं पुन्हा तो दगड एकमेकात चिकटून गेला. एकदम अंधार झाला. मिट्ट अंधारात काही कळत नव्हते. छातीची धडधड वाढली होती. हे काय अघटित झालय या विचाराने मन धास्तावले होते. नक्की काय घडलय याचा थांग लागेना आणि बाबा व्याकूळ झाले. हळूहळू मनाची शांती झाल्यावर त्यांच्या डोळ्यांना प्रकाशाची जाणीव झाली
.... आणि त्या प्रकाशात एक धीरगंभीर, भव्य रूप समोर आढळले.
‘आओ, मैने बुलालावा भेजा था।‘ बाबांची विचारणा झाली आणि बाबांची क्षणभर बोबडीच वळली.
……
पुढे बाबा म्हणतात, ‘मी साधारण तेथे अर्धा तासापेक्षा कमी म्हणजे सत्तावीस मिनिटे होतो. त्यावेळात त्या प्रखर व्यक्तिमत्वाच्या आभा वलयात मला अनेक गोष्टींचे खुलासे केले. काही चुका, काही अक्षम्य चुका व वर्तमानस्थिती व पुढील कार्याची दिशा यांचा झाडा घेऊन त्यांनी माझ्यावर सतत लक्ष असल्याचे दर्शवून दिले.’
‘आता तरी यापुढे सावध रहा’ असा सल्ला देऊन म्हटले, ‘आतातरी तुझी साशंकता गेली की नाही?’ हे पाहण्यासाठी तुला इथे भेटण्याचा आदेश दिला. इथे आलास यातून तुझी परीक्षा झाली.’
........ बाबांनी हात जोडून त्यांच्याकडे पाहून मानेने हो म्हटले आणि त्या कमी होत जाणाऱ्या प्रकाशाकडे पाहून डोळ्यातील घळघळणारे अश्रू सावरले. ‘गुरू महाराजा, चुका पदरात घ्या. सांसारिक जगात वागताना आपसुक चुका होतात. नंतर जाणीव होते की तेही एक माझ्याकडून करून घेतले जाणारं नाटक आहे. याची जाणीव मला सतत आहे. आपल्या आर्शिवादाने.’ बाबांनी पुन्हाःपुन्हा हात जोडले आणि प्रार्थना केली माझ्याकडून गुरूप्रेरणेने सतत आदेश मिळत राहोत आणि आयुष्याच्या अंतापर्यंत ते जनकल्याणाकरिता सदा उपयोगी ठरोत. आजचा दृष्टांत माझ्या आयुष्याचा अविस्मरणीय भाग ठरो.’
….प्रार्थना संपत नव्हती. पाय भरून आले होते. घामाच्या धारा होत्या. अंधारात चाचपडत. जिथे तिथे जोर लावून ढकलण्याचा प्रयत्न केला. पुन्हा खडक सरकून दरवाजा झाला. त्यातून मी बाहेर आलो. दुपारचे बारा वाजून गेलेले. बाहेर लोकांची ये-जा. ते गोसावीबाबा धुनीपाशी बसलेले. सत्यातील जगाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर हळूहळू तरळू लागले. तेव्हा नुकताच झालेला तो अदभूत अनुभव सत्य होता याची पूर्णतः खात्री पटली.
‘क्यूं, क्या हुआ? असे म्हणून गोसावी बाबांनी मिचमिच्या डोळ्यांनी पाहिले. बाबांनी ‘अलख निरंजन’ म्हटले. त्यांनी दिलेली उदी कपाळाला लावली. अन त्यानंतर जे घडले ते अदभूत होते.' अलख निरंजन' पुकाराकरून गोसावी बाबाने माझ्याकडे पहात माझ्या हातात सहा रुद्राक्ष आणि एक पांढऱ्या रंगाचा मोत्यासारखा खडा दिला! जणु ते सर्व माझ्यासाठी तयारच ठेवलेले होते! त्या वेळी क्षणभर वाटले, आत भेटलेले व्यक्तिमत्व तेच तर नव्हते? ‘अलख निरंजन’ चा पुकारा करत करत बाबा पुढे निघाले.

बाबांचा हा अनुभव आम्हा शिष्यगणांना अदभूतकथन वाटते होते. नंतर वेळोवळी बाबांनी त्या घटनेचा उल्लेख केला. म्हणाले, ‘पुढे घसरगुंडीसारख्या जागेतून गेल्यावर, तो पहाड खाली उतरून पुन्हा दुसऱ्या पहाडावर चढण्याची एक जिकिरीची चढण चढून साधारण दहा हजार पायऱ्या चढून गुरुदत्तांचे स्थान आले.
तेथे बाबा दर्शन घेऊन परतले आणि वेगळ्या प्रकारची चमक जाणवली. त्यांचा हा अनुभव ऐकून त्यांच्या घरातील मुलांनी गिरनार पर्वताची व त्या गोरक्षगूहेची यात्रा केली. ना तेथे त्यांना गुहेतील खोबण दिसली ना ते धुनीवाले बाबा...

.....असे आमचे बाबा, नवनाथांच्या विशेषतः जालंधर नाथांच्या, आर्शीवादाने अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधी औषधोपचाराने दूर करण्याने प्रत्येकाचा योगक्षेम साधण्यास सदैव तत्पर असतात.
... दर गुरूवारी त्यांच्याकडे सायंआरती मोठ्या आनंदाची असते. . शिवाय नवरात्रात देवीचे अधिष्ठान, अशा बाबांच्या काही आठवणी....
’अलख निरंजन!’


जुनागढ जवळ गिरनारचा नकाशा

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

6 Jan 2012 - 2:38 am | रामपुरी

"ना तेथे त्यांना गुहेतील खोबण दिसली ना ते धुनीवाले बाबा..."
हा हा हा हा
एप्रिल महिन्याची १ तारीख होती काय हो?

(स्वगत- बेंबट्या, कुंभार हो गाढवांस तोटा नाही)

पाषाणभेद's picture

6 Jan 2012 - 2:43 am | पाषाणभेद

जालींदर बाबा की जय.

त्या देवळावर चक्क ताजमहालाची छाप दिसते आहे!

प्रचेतस's picture

6 Jan 2012 - 8:23 am | प्रचेतस

काय हे पाभे, ताजमहाल हे तेजोमहालयच आहे हे तुम्हास माहित नाही काय? तेही पु.ना ओकांचेच लिखाण आहे. ;)

शेवटून दुसरा फोटो जुनागढ चे नवाब महाबत खान यांचा मकबरा आहे . मी खाली त्याची माहीती दिली आहे पण जास्त सविस्तरपणे देऊ शकले नाही नंतर कधीतरी नक्की देईन .

कवितानागेश's picture

6 Jan 2012 - 10:16 am | कवितानागेश

:)
अशाच प्रकारचे अनेक आश्चर्यकारक अनुभव श्री. जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकातही वाचले आहेत.

अवांतरः असे उंच पर्वतावरचे मंदीरे, महाल बघून 'इन्का सिटी' ची आठवण येते.

मृगनयनी's picture

6 Jan 2012 - 1:58 pm | मृगनयनी

अशाच प्रकारचे अनेक आश्चर्यकारक अनुभव श्री. जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकातही वाचले आहेत.

सहमत! आणि शशिकान्त'जी... खरंच साष्टांग नमस्कार!!! __/\__ :)

खूप भाग्यवान आहात! साक्षात दत्तगुरु आणि नवनाथान्चे निवासस्थान असलेल्या गिरनार पर्वतावर तुम्हाला इतका दिव्य अनुभव आला!!!.. इतकी पुण्यवान माणसे जगात खूप कमी असतात!!!! तुमच्यावर दत्तगुरुन्ची अशीच्च कृपादृष्टी असू देत!!!!! :)

असाच एक अनुभव "साद देती हिमशिखरे"वाल्या प्रधानांना पण आलेला होता... ते लन्डनला असताना अश्याच एका सिद्धपुरुषाने पहाटेच्या वेळी त्यान्ना काही मिनिटांसाठी हिमालयावर नेले होते..व तेथील गुरुवर्यांकडून प्रधानान्ना गोमातेचे धारोष्ण दूधदेखील देण्यात आले होते...आणि पुन्हा अलगदपणे प्रधानान्ना त्यान्च्या लंडन्मध्ये राहत असलेल्या वास्तूत सुखरूप पोचवण्यात आले... प्रधानांना देखील ही घटना प्रथमत: भास असल्याप्रमाणेच वाटली. व पुढे आलेल्या अनुभवांवरून ती घटना प्रत्यक्ष घडली गेल्याचे स्पष्ट झाले... :)

धन्या's picture

6 Jan 2012 - 3:20 pm | धन्या

साक्षात दत्तगुरु आणि नवनाथान्चे निवासस्थान असलेल्या गिरनार पर्वतावर तुम्हाला इतका दिव्य अनुभव आला!!!.. इतकी पुण्यवान माणसे जगात खूप कमी असतात!!!! तुमच्यावर दत्तगुरुन्ची अशीच्च कृपादृष्टी असू देत!!!!!

तुमची काहीतरी गफलत होत आहे. अनुभव ओक काकांना नाही, त्यांच्या गुरुंना आला होता. (असं त्यांनी लिहिलं आहे ;) )

- आळंदीला गेल्यावर ज्ञानदेवाच्या मंदीराची पायरी सुद्धा न चढता इंद्रायणीच्या घाटावर दिव्य अनुभव घेतलेला,

शशिकांत ओक's picture

6 Jan 2012 - 7:47 pm | शशिकांत ओक

मृगनयनी जी,
धनाजी म्हणतात ते बरोबर आहे. तो अनुभव चितळेबाबांना आलेला आहे. त्यांनी तो व अन्य कथन केल्यावर त्याला शब्दांकित करण्यास मला प्रेरणा मिळाली व नंतर त्यातून चितळेबाबांवर दोन ब्लॉग्ज तयार झाले.
१) चितळेबाबांचे आत्मकथन २) चितळेबाबांच्या साधकांचे अनुभव.
त्या लिंक्ससाठी मला व्य.नि.वर संपर्क करावा.

आनंदी गोपाळ's picture

6 Jan 2012 - 10:44 pm | आनंदी गोपाळ

सग्ळे फटू जालावरून साबार घ्येत्लेत ;) बाकी अनुबव काय वर्णावा!

(आधी आत्मीक आनंदात डुंबलेला) गोपाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jan 2012 - 12:00 am | बिपिन कार्यकर्ते

त्या लिंक्ससाठी मला व्य.नि.वर संपर्क करावा.

गूगलच्या जमान्यात?!!! :)

मृगनयनी's picture

7 Jan 2012 - 11:36 am | मृगनयनी

तुमची काहीतरी गफलत होत आहे. अनुभव ओक काकांना नाही, त्यांच्या गुरुंना आला होता. (असं त्यांनी लिहिलं आहे Wink )

ह्म्म्म..... !!!.... मला आधी वाटलं..की खुद्द शशिकान्त'जीन्ना हा अनुभव आलेला आहे.... कारण या आधी ओकसाहेबाना अनेक दिव्य ऋषींचे विविध रुपातून अनुभव आलेले आहेत... :)

असो... पण "बाबा"न्ना आलेला हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे....
आपल्या पुण्यातही अशा अनेक विभूति, सिद्धपुरुष आहेत... ज्यान्ना असेच काही दिव्य अनुभव आलेले आहेत...

- आळंदीला गेल्यावर ज्ञानदेवाच्या मंदीराची पायरी सुद्धा न चढता इंद्रायणीच्या घाटावर दिव्य अनुभव घेतलेला,

धन्या'जी.... हा अनुभव जर दैवी / अध्यात्मिक दृष्ट्या दिव्य असेल.. तर ऐकायला / वाचायला नक्की आवडेल!! :)

हिमालयात त्याना नक्कीच धारोष्ण दुघ दिले कि धारोष्ण गोमुत्र?

माझ्याकडून गुरूप्रेरणेने सतत आदेश मिळत राहोत आणि आयुष्याच्या अंतापर्यंत ते जनकल्याणाकरिता सदा उपयोगी ठरोत.

आणि आता तसे आदेश देणे सुरु आहे..

शिवाय हे सर्व अनुभव चितळेबाबांनीच सांगितले..

धन्य...

चितळे नावाच्या व्यक्तींच्या कर्तृत्वाबद्दल मला आधीपासूनच आदर आहे. उदा. चितळे दूध.. चितळे बाकरवडी.. काय खपते राव.. लोक रांग लावून विकत घेतात..

आणि अजूनही त्यांचे दुकान दु. १ ते ४ बंद असते.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2012 - 11:25 am | अत्रुप्त आत्मा

आणि अजूनही त्यांचे दुकान दु. १ ते ४ बंद असते. कारण त्यांना पुण्यात राहयचय ना..! ;-)

शाहिर's picture

6 Jan 2012 - 1:07 pm | शाहिर

एकदा चितळेंच्या दुकानाला २ वाजता आग लागली . बंब वाल्यांनी फोन केला ..दुकान उघडा आग लागली आहे ..
चितळे रागावून म्हणाले ..१-४ दुकान बंद असते..

( पांचट)

विसोबा खेचर's picture

6 Jan 2012 - 11:33 am | विसोबा खेचर

शशिशेठ, छान रे.. :)

तुझा,
तात्या.

शशिकांत ओक's picture

6 Jan 2012 - 8:43 pm | शशिकांत ओक

धन्यवाद.तात्या.

शिल्पा नाईक's picture

6 Jan 2012 - 12:29 pm | शिल्पा नाईक

अहो साहेब या दंतकथे पेक्षा गिरनार पर्वतावर कसे जायचे ते सांगीतलं असतत तर फार छान झाल असत.

कवितानागेश's picture

6 Jan 2012 - 2:00 pm | कवितानागेश

दंतकथेत सांगितल्याप्रमाणे १०,००० पायर्‍या चढून गिरनार पर्वतावर पोचता येते! :)

मूकवाचक's picture

6 Jan 2012 - 5:42 pm | मूकवाचक

दत्तात्रय, गोरक्षनाथ अशा नवनाथांनी व काही अन्य महाभागांनी कठोर तपश्चर्या करून तेथे वास्तव्य केल्याच्या खुणा गुहा आणि गिरीकंदरातून मिळतात.
- आणि त्यासाठी १ एप्रिललाच शोध घ्यायला हवा असा नियमही कुठल्या 'दन्तकथेत' नाही. असो.

शेवटुन दुसरा देवळाचा फोटो आणि जंगलच्या राज्याचा फोटो आवडला.
धन्यवाद.

परवा माझी टिंग्याबाबा शी पुरंदर पर्वतावर भेट झाली त्याचे फोटो आहेत का कोणाकडे ;)

आत्मशून्य's picture

6 Jan 2012 - 3:13 pm | आत्मशून्य

ओक साहेब अनुभव कथनासाठी धन्यवाद.

http://www.panoramio.com/photo/52200978
http://www.tourtravelworld.com/heritage-tours/monuments/mahabat-maqbara.htm

Mahabat Maqbara


Started in 1878 by Mahabat Khanji and completed in the year 1892 by his successor, Bahadur Kanji, the Mahabat Maqbara, Junagadh houses the tombs of Mahabat Khan, Baha-ud-din, and minister of Nawab Rasul Khanji. It has the blend of Indo-Islamic structure and represents the equality and religious egos and exchange of new culture

जास्त काही लिहीत नाही ..कारण मला त्यामुळे परवीन बॉबी आठवली. :-( परमेश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो !
Her father Vali Mohammed Babi, was an administrator with the Nawab of Junagadh.

शशिकांत ओक's picture

6 Jan 2012 - 8:09 pm | शशिकांत ओक

वहीदा,
तु म्हणतेस ते बरोबर आहे.
मी त्याठिकाणी गेलेलो नाही. काही माहिती मिळाली त्यावर आधारित तो फोटो टाकला गेला. क्षमस्व.
ती इमारत खरोखर ती कबर प्रेक्षणिय आहे.
गिरनारवरील
दत्त मंदिराची माहिती व फोटो सोबत देत आहे.

ओक काका
मग तसा बदल लेखात करा ना,
जिथे मकबरा दिला आहे तिथे गिरनारवरिल दत्त मंदीराचे फोटो टाकावे हि नम्र विनंती ! कारण मकबराचे फोटो तिथे असणे चुकीचे आहे. तिथे गिरनार मंदीराचे फोटो असायला हवेत .

बाकी ते तुमचे आध्यात्मिक गुरु आहेत त्यामुळे मी कोणाच्याही गुरुवर्यांचा अपमान करु इच्छित नाही अन तुमच्या भावनांना इजा ही पोहचू इच्छित नाही.

खुदा कब किसको किस जरिए से नवाजेगा कोई नहीं जानता ! कब किसकी दुवांएं काम आएगी कोई नहीं जानता. हम किसीके इबादत में खलल नहीं डालना चाहते. हम आपके एहतेराम की इज्जत करते हैं सिर्फ यह आर्टिकल से मकबरे की तस्वीर हटा देना यह गुजारिश !
शुक्रिया !!

शशिकांत ओक's picture

7 Jan 2012 - 12:38 am | शशिकांत ओक

वहिदाजी,
आता तो बदल कसा करावा ते सांगा. कारण आपल्या प्रतिसादानंतर इच्छा असूनही मी तसा बदल करून पाहू शकलो नाही म्हणून लिंक दिली आहे.

वाहीदा's picture

7 Jan 2012 - 12:50 am | वाहीदा

गणपा , पैसा ताई are the best people to help नाहीतर मग संपादक मंडळ आहेच :-)
असो मला तुमचा धागा भरकटवायचा नाही
त्यामुळे त्यांना व्यनी, खरड करावी

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jan 2012 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार

अनुभव आवडला.

जशी श्रद्धा तसे फळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jan 2012 - 5:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गिरनार पर्वतावर चढायच्या १०,००० पायऱ्यांचा बिकट मार्ग

बाप रे.....! एवढ्या पायर्‍या चढायच्या..?

बाकी, भाव तिथे देव.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

6 Jan 2012 - 7:43 pm | तिमा

या देशातल्या समस्त गुरु आणि बाबांना माझे आवाहन(आव्हान नव्हे) आहे की त्यांना जी दैवी शक्ति प्राप्त झालेली आहे त्याचा उपयोग त्यांनी फक्त भक्तांच्या कल्याणासाठी न करता या देशातील सर्व जनतेसाठी वा पर्यायाने या देशासाठी काहीतरी करावे व या देशाला आत्ताच्या अवस्थेतून बाहेर काढावे.

-- दे.भ. तिरशिंगराव अलखनिरंजणे

अन्या दातार's picture

6 Jan 2012 - 9:23 pm | अन्या दातार

>>दे.भ. तिरशिंगराव अलखनिरंजणे
दे.भ. नंतर प राहिला का हो तिमा??

तिमा's picture

7 Jan 2012 - 2:02 pm | तिमा

'प' राहिला नाही. पूज्य आचार्य अत्रे यांनी दे.भ. =देशभक्त व दे. द्रो. = देशद्रोही अशी व्याख्या करुन ठेवली आहे.

अर्धवटराव's picture

7 Jan 2012 - 2:05 am | अर्धवटराव

हम्म्म्म... अफाट दिसतय काम.
बाकि या नाथपंथीय (वा तत्सम इतर) लोकांचे, त्यांच्या गुरुंचे मला नवल वाटते... सिरियसली... कशाला एव्हढ्या कॉम्पेक्स घटना घडवतात?? सरळ सोप्या पद्धतीने काम केलं तर नाहि का जमणार?

अर्धवटराव

अन्या दातार's picture

7 Jan 2012 - 9:06 am | अन्या दातार

कशाला एव्हढ्या कॉम्पेक्स घटना घडवतात??

बहुदा तो त्यांचा युएसपी असावा. ;)

शशिकांत ओक's picture

31 Jan 2012 - 12:56 pm | शशिकांत ओक

राव,
आपले आयुष्य इतके गुंतागुंतीचे आहे, त्यात अगदी आपल्या सारख्या सामान्यांच्या जीवनातील घटनांकडे पाहिले तर त्यातून सर्व काही सोपेपणाने का घडत नसावे याचे उत्तर कदाचित मिळेल. पहिल्या रिळात जर खलनायकाला गोळी मारुन खातमा केला तर पुढील सिनेमा पहायची झगझग कशाला करावी लागेल. पण तसे होत नाही. हिरोला आधी मार खावा लागतो. रामाला सीता गमवावी लागते. हनुमानाला शेपटीला आग लाऊन घ्यावी लागते.
त्या मानाने काही हजार पायऱ्यांची चढउतर फारच सोपी मानावी लागेल. असो.

अर्धवटराव's picture

2 Feb 2012 - 11:46 pm | अर्धवटराव

कथानक /स्क्रिप्ट सोपं असावं असा अट्टहास नाहि. निसर्ग आपल्या पद्धतीने काम करतो... मानवाला त्यातल्या प्रत्येक गोष्टी कळल्याच पाहिजे असाहि आग्रह नाहि. पण एकाला काहि "जगावेगळे" अनुभव आले तर ते दुसर्‍याला चमत्कार म्हणुन सांगायचे आणि त्याच्या जिज्ञासेची तहान विस्मयतेने भागवायचा अट्टहास धरायचा हे सर्वथा चुक आहे.

अर्धवटराव

अमोल केळकर's picture

7 Jan 2012 - 9:34 am | अमोल केळकर

मस्त लेख :)

अमोल केळकर

शशिकांत ओक's picture

31 Jan 2012 - 12:57 pm | शशिकांत ओक

धन्यवाद अमोल,

अजातशत्रु's picture

7 Jan 2012 - 12:33 pm | अजातशत्रु

कुणाच्या *सबकॉन्शस माईड मधे कधी अन काय काय आदेश येतील सांगणे कठीण आहे,
.
.
.
.
.
.

( ..............)