पुतिन बर्‍याचदा मुद्द्याचे बोलतात, आजही बोलले!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
8 Dec 2010 - 8:51 pm

आज रशियाचे पंतप्रधान (आणि खरेखुरे "बिग बॉस") असलेल्या पुतिनसाहेबांनी एक उत्तुंग षट्कार मारलेला आहे. वाचा इथे http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/7065924.cms
(पुतिन यांचे 'दस नंबरी' निवेदन वाचून/ऐकून चिनी नेत्यांनीसुद्धा टाळ्या वाजविल्या असतील.)
पुतिन यांनी या आधीही यू-ट्यूबद्वारा असाच २०-२० छाप षट्कार मारला होता. तो दुवा सापडल्यास (नंतर) पाठवून देईन. पण आजचे त्यांचे निवेदन वाचून मी एकदम 'दिलखुष' झालो!
आजच्या ताज्या वक्तव्यात ते म्हणतात की तुरुंगात खितपत पडलेल्या 'विकीलीक्स'चे शिट्टीवादक (याने कि whistle-blower) संचालक ज्यूलियन अस्सांज यांना सार्‍या जगाने मदत करावी आणि त्यांचे नांव येत्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकासाठीही सुचवले जावे!
क्रेमलिनच्या सूत्रांनी रशियन वार्तासंस्थांना सांगितले कीं सामाजिक आणि बिगर-सरकारी संस्थांनी त्यांना कशी मदत करायची याचा विचार केला पाहिजे आणि त्यांना नोबेलचे पारितोषिक देण्याचाही विचार केला पाहिजे. बहुदा त्यांना शांतता पारितोषिक म्हणायचे असावे!
हा विचार त्यांनी नक्कीच कांहींशा उपरोधाने मांडला असणार! रशियाने आतापर्यंत अशा जाहीर करण्यात आलेल्या राजनैतिक 'अतिगुप्त' केबल्सवर फारसे भाष्य केलेले नसून या तर्‍हेच्या माहितीने रशियाचा अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर फारसा परिणाम होणार नाहीं असेही नमूद केले आहे.
दरम्यान अस्सांज यांच्यावर स्वीडनमध्ये केलेल्या बलात्काराचे आरोप ठेवण्यात आलेले असून ब्रिटिश न्यायालयाने त्यांना जामीनही नाकारण्यात आला आहे. स्वीडनने त्यांना आपल्याकडे सोपविण्याची (extradition) मागणी केलेली आहे.
काल अस्सांज यांनी पहिल्यांदाच तुरुंगात एक रात्र घालविली!
जर यासेर अराफात आणि यित्साक राबिन यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळू शकते तर सार्‍या दुतोंडी राजकारण्याचे वस्त्रहरण किंवा भांडेफोड करणार्‍या अस्सांजना कां मिळू नये? ते नक्कीच अशा पारितोषिकावर अधिकार सांगू शकतात. त्यांच्या 'विकीलीक्स'मुळे जगात एक तर शांतता नांदेल किंवा तिसर्‍या महायुद्धाला तोंड लागेल. पण अस्सांजने सार्‍या जगाला मस्त हिसका दाखवून सार्‍यांची-विशेषतः हिलरीबाईंची-भंबेरी उडविली आहे. 'विकीलीक्स'ने पाकिस्तानच्या सर्व नव्या-जुन्या दुतोंडी नेत्यांचेही वस्त्रहरण केले असून त्याची अर्थातच मला खूप खुषी झाली आहे!
जय विकीलीक्स!

राजकारणमौजमजाप्रकटनमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

अर्धवट's picture

8 Dec 2010 - 9:05 pm | अर्धवट

मस्तच.. आणि ओबामांना मिळू शकते नोबेल तर त्या ज्युलिअन बाबाला का नको

श्रावण मोडक's picture

8 Dec 2010 - 9:19 pm | श्रावण मोडक

बातमीत कुठंही पुतीन असा उल्लेख दिसला नाही. अ सोर्स असं म्हटलं आहे. हा स्रोत कोण आहे याविषयी कुतूहलच आहे.

इन्द्र्राज पवार's picture

8 Dec 2010 - 9:38 pm | इन्द्र्राज पवार

सहमत...

मीही पुतीन नावामुळेच श्री.काळे यानी उल्लेख केलेली ती बातमी वाचली. ते अशासाठी की रशियन राजकारणी असे थेट वक्त्यव्य शक्यतो कधीच करत नाहीत. जे काही होते ते क्रेमलिनच्या अधिकृत मुखियामार्फतच. टाईम्सच्या बातमीत तर स्पष्टच म्हटले आहे की, "अ सोर्स इन क्रेमलिन कोटेड..." म्हणजे ही कबुलीदेखील अधिकृत होऊ शकत नाही.

या अगोदरच (दि.२९.११.२०१० रोजी) मिडियासमोर अधिकृतपणे सामोरे येऊन प्रेसिडेंट पुतीन यांचे प्रेस सेक्रेटरी नतालिया तिमाकोव्हा यानी त्यांची 'विकिलिक्स' बाबतची भूमिका रोखठोक शब्दात स्पष्ट केली आहेच. त्या म्हणाल्या, "विकिलिक्सच्या तथाकथित कागदपत्रे प्रसिद्ध बातमीवर आम्ही कॉमेन्ट करण्यासारखे महत्वाचे काही नाही. हॉलिवूडतत्सम काल्पनिक नायकाच्या भरार्‍यावर भाष्य करणे गरजेचे नसते...." असे म्हणतानाही त्यानी त्या बातमीला त्यांच्या नजरेत काय महत्व आहे हे दर्शविले होते. त्यामुळे आज प्रसिद्ध झालेल्या टाईम्समधील बातमीच्या आधारे तीत पुतीनना गोवण्याचे काही कारण नाही असे वाटते.

श्री.काळे यानी थेट पुतीनचे नाव असलेले वृत्त पाहिले/वाचले असले तर नव्याने प्रतिसाद देता येईल.

इन्द्रा

ही 'टाइम्स'वरील बातमी मी वाचली त्यावेळी मथळ्यात पुतीन यांचे नांव होते. वरील प्रतिसादातील तथ्य पहाण्यासाठी पुन्हा 'टाइम्स'चे वेब पान उघडले तर ती संपूर्ण बातमीच नाहींशी झाली आहे. अगदी Search function वापरूनही सापडली नाहीं. त्यामुळे मीही गोंधळात पडलो आहे.
पण पुतिन हे स्पष्टवक्ते आहेत हे त्यांच्या यू-ट्यूबवरील कांहीं भाषणावरून वाटते. पण ते दुवे शोधायला वेळ लागेल!
असो. सत्य सापडेपर्यंत हे वृत्त संपादित करायला हवे, तरी कुणी संपादकाने ते करावे ही विनंती. नंतर पुतिन यांच्या नावाचा उल्लेख सापडला तर परत इथे लिहीन!
नजरचुकीबद्दल क्षमस्व.


विकीलीक्स रॉक्स... इंटरनेटवर जाहिरपणे अमेरिकेची त्यांनी बुच मारली आहे,आणि अमेरिकेला त्यांना ऑनलाइन राहण्या पासुन रोखताना तोंडाला फेस आला आहे हे मात्र नक्की...
आधी अ‍ॅमेझॉन तर्फे गळेचेपी केली मग पे-पॅल द्वारे पैसा रोखला गेला पण त्याच्या त्यांच्यावर काही एक फरक पडलेला दिसत नाहीये... नविन आयपी घेउन ही मंडळी अमेरिकेला परत वाकुल्या दाखवुन मोकळी झाली आहेत.

सुधीर काळे's picture

8 Dec 2010 - 10:22 pm | सुधीर काळे

अस्सांज इंग्लंडमध्ये तुरुंगात आहेत तरी 'विकिलीक्स'ने नवी गुपिते आजही प्रसृत केलीच आहेत!
जय हो!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Dec 2010 - 10:45 pm | निनाद मुक्काम प...

पुतीन हे जबरी व्यक्तिमत्व के जी बी चे माजी हेर व कराटे मध्ये विशेष प्राविण्य .
पण सुंभ जळला तरी पीळ जात नाही. ह्या न्यायाने अजूनही रशियाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रचंड पैसा डिफेन्स वर खर्च करतात. जमेल तसे अमेरिका व पाशास्त्या जगाला कोंडीत पकडायला प्रयत्न करतात. मग ती युरोपातील शेपानास्त्र प्रणाली चा मुद्दा असो किंवा युरोपला नैसर्गिक वायू पुरवठ्याचा मुद्दा असो ..पण पायाखाली काय जळतय ह्याची जाणीव नाही त्यांना .. .रोटी कपडा मकान ह्याच्या शोधात जेव्हा रशियन गौरांगना इतर देशात जाऊन स्वताची बोली लावलेले पहिले आहे .खरच वाईट वाटते . .समाजवाद हरला .सोवियत संघाचे विघटन ह्यात त्यांचा काय दोष .आजही पुतीन साहेब भारत व चीनला शस्त्र पुरवतात .ह्यात चीन भारताहून जास्त शस्त्र त्यांच्य्कडून घेतोय. (त्यांची भूक व झेप मोठी आहे .व लक्ष्य अमेरिका )त्यामुळे दोघे जवळ येत चालले आहेत ..म्हणून भारताने सुद्धा अमेरिकन दोस्ताना केला आहे .अर्थात पुतीन व भारत आजही संबध ठेवून आहेत .
सध्या पुतीन व त्याचे पंतप्रधान ह्याच्यात शीतयुद्ध चालले आहे. तेही सत्तेसाठी. ह्यात पुतीन ह्यांना पाशास्त्या जगाचा विशेतः अमेरिकेचा हात असण्याचा संशय येणे रास्तच आहे .म्हणून ह्या न त्या मार्गाने त्यांची अमेरिकेला कोंडीत पकडायचा डाव असतो .रशिया व नाटो मध्ये मिलन होण्याचे संकेत आहेत .तेव्हा पुतीन युरोपच्या जास्त जवळ जाऊन अमेरिकेला शह देण्याच्या प्रयत्नात आहे .जेणेकरून अमेरिकेच्या अफगाण माघारी नंतर त्या भागात रशिया स्वताचे अस्तित्व टिकवू शकेन .
पण मला वाटते त्यांनी भारताची डिफेन्स बरोबरच संशोधन व इतर जसे टेलिकॉम व अजून बर्याच शेत्रात भागीदारी करणे आवश्यक आहे .ती प्रकिया सुरु आहे पण कूर्मगतीने . अमेरिका व फ्रांस व युके भारताबरोबरचा व्यापार येत्या ५ वर्षात जवळजवळ दुप्पट करण्यासाठी वचन बध्द आहेत .त्या दृष्टीने पुतीन साहेबांनी केवळ व्यापारासाठी भारतात एक दौरा करावा .व आपली जुने संबंध येत्या दशकात वेगळूं उंचीवर न्यावे असे वाटते (ता क : भारतीय व रशियन ह्या देशातील सामान्य लोकांचे सूर किती लवकर जुळतात .ह्याची प्रचीती मला आमच्या लंडनमधील हॉटेलात काम करताना आली म्हणजे आमचे भारतीय सहकारी जे भारत अरेंज मेरेज होण्याआधी जेव्हा सिंगल होते तेव्हाचा त्यांचा अनुभव. .आमचे कुटुंब आमच्या परंपरागत मित्र राष्ट्रातील मैत्री संबंधांवर विशेष लक्ष ठेवून असते .( प्रीकोशन इस बेटर देन क्युअर असे म्हणतात ना त्यातला हा भाग )

अस्सांज वर अमेरिकेबाहेर गुन्हा दाखल होतो तो बलात्काराचा.
बातम्यात असंही म्हटलंय की "परस्पर सहमतीने ठेवले गेलेले लैंगिक संबंध".

अस्सांज हा काही गुन्हेगार ठरत नाही. त्यातल्या त्यात तो अमेरिकेविरोधात काम करत असल्याने ब्रिटीश कायद्यान्वये गुन्हेगार ठरत असला तरी त्याला संशयाचा फायदा देऊन गुन्हेगार मानता येत नाही.

भारतातील पेपरने तर केवळ याच एका आरोपावरून अस्सांजची रेवडी उडवायला सुरूवात केली आहे.

बाकी रामजाणे घन:श्यामबापू!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 5:31 am | निनाद मुक्काम प...

@भारतातील पेपरने तर केवळ याच एका आरोपावरून अस्सांजची रेवडी उडवायला सुरूवात केली आहे.
अहो अमेरिका सी आय ए मार्फत जगभरातील देशात स्वताचे हस्तक निर्माण केले आहेत ते देशातील प्रसारमाध्यमे .राजकारणी /व्यावसायिक /व प्रशासनात कार्यरत असतात .त्यामुळे हे साहजिकच आहे .अणु करार केला अमेरिकेने आपल्याशी एवढी मगजमारी करून .पण फायदा सर्व प्रथम फ्रेंच कंपनीचा होणार .मग अमेरिकेची जळजळ नाही का होणार ? मग भूमिपुत्रांना वाटेल ते सांगून भडकावणे म्हणजे घातला खो .ह्या आधी रशियाने भारताला अणु भट्टी बांधून दिल्या का नाही झाला तेव्हा गदारोळ .? सध्या जगभरात प्रमुख राष्ट्रांकडे अण्वस्त्र शमता आहे .त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध न करता वॉर ऑफ ४थ जनरेशन हि संकल्पना जगभर प्रचलित आहे. एखाद्या राष्ट्राच्या महत्वाच्या घटक ह्या ना त्या मार्गाने वश करायचे म्हणजे तो देश दुसर्यांच्या धोरणानुसार चालू लागतो .(हाच आक्षेप त्या १० रशियन हेरांवर ठेवून त्यांची अमेरिकेतून रशियात हकालपट्टी केली .)पेड न्यूज वर नांदेड मधून जो आसुड ओढण्यात आला आहे .त्याची सुरवात ह्या महासत्तांनी कधीच केली आहे . .पाशिमात्या देश भारताचे चांद्रयान वा इतर प्रगती बद्दल कमी नि गरिबी बाबत जास्त लिहितात .

सुधीर काळे's picture

9 Dec 2010 - 7:54 am | सुधीर काळे

काल एक बातमी वाचली कीं अस्सांज हे TIME नियतकालिकाच्या Man of the Year च्या स्पर्धेत सगळ्यात पुढे आहेत. त्यांच्या पाठोपाठ आहेत तुर्कस्तानचे पंतप्रधान Recep Tayyip Erdoğan (याचा उच्चार कसा करायचा ते माहीत नसल्याने रोमन लिपीत लिहिले आहे) आणि (हो!) लेडी गागा. पण या शर्यतीत अस्सांज खूपच पुढे आहेत.

बेसनलाडू's picture

9 Dec 2010 - 8:20 am | बेसनलाडू

लेडी गागा 'मॅन' ऑफ द यर शर्यतीत? टाइमने गागाचे शिक्रेट फोडले की काय? ;) गागापासून धडे घेऊन वीनस आणि सेरेना विल्यम्स यांनी पुरुषांच्या गटात एकेरी-दुहेरी खेळाव्यात काय?
(पोकरफेस्ड)बेसनलाडू

मदनबाण's picture

9 Dec 2010 - 8:35 am | मदनबाण

जरा अवांतर :---

लेडी गागाने सध्या यूट्युबवर धुमाकुळ घातला आहे... ;) म्हणजे तिच्या गाण्याचे अल्बम हे सर्वात जास्त लोकांनी पाहिले आहेत म्हणे.... (http://www.bbc.co.uk/newsbeat/1162659)
सध्या सतत प्रकाश झोतात राहण्याचा या बयेचा प्रयत्न आहे !!! ;) हल्लीच हिने बार्बी डॉल जाळली होती आणि त्या बाहुलीचे मुंडके उडवले होते !!!

बेसनलाडू's picture

9 Dec 2010 - 1:18 pm | बेसनलाडू

कशीही/कसाही असली तरी आपण गागाबाईंच्या गाण्यांचे पंखे आहोत. गाडी चालवताना टेलिफोन, बॅड रोमान्स, पोकर फेस, जस्ट डान्स यांतले काही ऐकले नाही, तर गाडी चालवताना मजा येत नाही बॉ! ;)
(डान्सर)बेसनलाडू

सुधीर काळे's picture

9 Dec 2010 - 9:00 am | सुधीर काळे

सॉरी! त्या 'किताबा'चे नांव Person of the year असे आहे. (पण गागाबाईंकडे फोडण्यासाठी इतर 'शीक्रेट' बरीच असतील!)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 10:32 pm | निनाद मुक्काम प...

त्याचा हेतू नक्कीच चांगला आहे .बाकी काका तुम्ही पुस्तक मराठीत भाषातर करून मराठी रसिकांना अमेरिकन भानगडी समजून सांगितल्या तुमचे कार्यही मानलेच पाहिजे .
पण खूप जण विकीलीक्स हे अमेरिकन inside जॉब मानते (किंबहुना पातळ यांत्रि महासत्तेच्या स्वभावामुळे असे म्हणण्याची एक परंपरा विविध देशातील विचार वंतात आहे .
पण त्याला मिळणारा निधी व सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे खबरी हे ह्या शतकातील एक मोठे गूढ आहे
भारताने मस्त अशी प्रतिक्रिया दिली आहे .
संपूर्ण माहिती हाती येईस्तोवर सरकार भाष्य करणे टाळेल. अर्थात आम्ही अधिक माहिती वाचण्यासाठी उत्सुक आहोत .
भारताने मस्त अशी प्रतिक्रिया दिली आहे .
संपूर्ण माहिती हाती येईस्तोवर सरकार भाष्य करणे टाळेल. अर्थात आम्ही अधिक माहिती वाचण्यासाठी उत्सुक आहोत .
बाकी सध्या हॉटेलात मोठ्या कंपन्यातील बडे अधिकारी संध्याकाळी मादिरापानास जमतात तेव्हा चार पाच युरोपियन एखाद दुसरा अमेरिकन जेव्हा कंपूत असतो .तेव्हा चर्चेत विकीलीक्स निघाले कि तो अमेरिकन माणूस जरा आलोच म्हणून कल्टी मारतो ...